स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
17 November 2021
16 November 2021
MPSC सराव प्रश्न
Q 1. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते?
Ans: गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते
Q 2. खालीलपैकी कोणत्या नद्यांमध्ये ताज्या पाण्याचे डॉल्फिन आहेत?
Ans: गंगा नदीमध्ये गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहेत.
Q 3. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Ans: गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे
Q 4. सिंधू नदीची एकूण लांबी किती आहे?
Ans: सिंधू नदीची एकूण लांबी 3180 किमी आहे.
Q 5. द्वीपकल्पात पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे?
Ans: नर्मदा नदी (रेवा म्हणूनही ओळखली जाते) ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम प्रवाही नदी आहे.
Q1. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
Ans. उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 199,812,341 आहे.
Q2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
Ans.क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. ते 342,239 किमी 2 व्यापते
Q3. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
Ans. सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. सिक्कीमची एकूण लोकसंख्या 610,577 आहे.
Q4. क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?
Ans. जम्मू आणि काश्मीर, नव्याने गठित केंद्रशासित प्रदेश हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे जो 125,535 चौ. किमी व्यापतो.
Q5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
Ans. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे ज्याचे क्षेत्र 3,702 चौ. किमी आहे.
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
(३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
(३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
(३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
(३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
(३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.
(३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
(३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
(३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
(४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
(४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
(४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.
(४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
(४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
(४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ ऑगस्ट
(४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
(४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
(४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
(४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
(५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६
Current affairs questions
1. ख्यातनाम इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.
अ. बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र, भारतातील लेखक, इतिहासकार आणि नाटय व्यक्तिमत्त्व होते.
ब. 2019 मध्ये पद्मविभूषण आणि 2015 मध्ये महाराष्ट्रभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क. ते मुख्यतः त्यांच्या शिवाजी जाणता राजावरील लोकप्रिय नाटकासाठी प्रसिद्ध होते.
1. अ, ब, क
2. अ, क
3. ब, क
4. अ, ब
उत्तर-1
------------------------------------------------------------
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला-हफ्ता ग्रामीण ( PMAY-G) कोणत्या राज्यातील लाभार्थ्यांना हस्थांतरीत केला आहे?
1. आसाम
2. त्रिपुरा
3. नागालँड
4. उत्तराखंड
उत्तर- 2
------------------------------------------------------------
3. भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान स्वातंत्र्य सेनानी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
1.भोपाळ
2. झाशी
3. रांची
4. छिंदवाडा
उत्तर-3
------------------------------------------------------------
4. भारत सरकारने अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या संचालकांचा कार्यकाळ सध्याचा 2 वर्षांवरून किती वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी 2 अध्यादेश जारी केला आहे?
1. 4 वर्ष
2. 5 वर्ष
3. 6 वर्ष
4. 3 वर्ष
उत्तर-2
------------------------------------------------------------
5. भारतातील...... हे राज्य पायनियरिंग टेक्नोप्रेन्योरशिप मालिका स्टार्ट-उप मिशन आणि सिस्को लॉन्चपॅड एक्सिलरेटर प्रोग्राम संयुक्तपणे होस्ट करेल.
1. गुजरात
2. कर्नाटक
3. केरळ
4. दिल्ली
उत्तर-3
------------------------------------------------------------
6. खालीलपैकी कोणत्या देशातून 100 वर्षांनंतर देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात परत आली?
1. कॅनडा
2. ऑस्ट्रेलिया
3. इंग्लंड
4. अमेरिका
उत्तर-1
------------------------------------------------------------
7. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. 15 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो .
ब. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे.
क. त्यांच्या मृत्यूपूर्वी, भारताने 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला , हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी जागतिक बालदिन म्हणून साजरा केला.
1. अ, ब
2. ब, क
3. अ, क
4. अ, ब, क
उत्तर-2
Correct ans-अ. 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो
------------------------------------------------------------
8. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) 12 डिसेंबरपासून 'भारत दर्शन-दक्षिण भारत यात्रा' सुरू करणार आहे. ही यात्रा कोणत्या ठिकाणापासून सुरू होईल?
1. तिरुपती आणि गंटूर
2. तिरुपती आणि कुर्नुल
3. अमरावती आणि विजयवाडा
4. हैदराबाद आणि सिकंदराबाद
उत्तर- 4
------------------------------------------------------------
9. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 -10 वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विरगाथा प्रकल्प सुरू केला आहे.
ब. सशस्त्र दलातील अधिकारी आणि जवानांच्या शौर्याचे आणि धैर्याचे स्मरण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आहे.
क. वीर गाथा प्रकल्पाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांमध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्य कृत्ये आणि बलिदानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे .
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त क
4. एकही नाही
उत्तर-1
Correct ans- अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 -12 वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विरगाथा प्रकल्प सुरू केला आहे.
------------------------------------------------------------
10. 15 नोव्हेंबर हा दिवस कोणत्या भारतीय राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?
1. झारखंड
2. छत्तीसगड
3. केरळ
4. गुजरात
उत्तर-1
------------------------------------------------------------
1.खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिसर्व बँक-एकात्मिक लोकपाल योजना सुरू केली आहे.
ब. आरबीआय रिटेल योजना मध्यमवर्गीय, कर्मचारी, छोटे आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या लहान गुंतवणूकदारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या रोख्यांमध्ये थेट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी माध्यम म्हणून काम करेल.
क. आरबी-एकात्मिक लोकपाल योजना आरबीआयने नियमन केलेल्या संस्थानविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण करणे ही योजना एक राष्ट्र- एकलोकपाल वर आधारीत आहे.
1. अ, ब, क
2. अ, ब
3. ब, क
4. अ, क
उत्तर-1
------------------------------------------------------------
2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि पोस्ट विभागाने ग्रामीण ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे?
1. बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स
2. भारती एक्सा जनरल इन्शुरन्स
3. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स
4. एचडीएफसी ERGO जनरल इन्शुरन्स
उत्तर-1
------------------------------------------------------------
3. किसान भवन आणि मधुमक्षिकापालन परोषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
1. केरळ
2. त्रिपुरा
3. मेघालय
4. नागालँड
उत्तर-4
----------------------------------------------------------
4. नुकतीच कोणत्या व्यक्तीची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या महासंचालक पदी नेमणूक करण्यात आली?
1. राकेश अस्थाना
2. सत्य नारायण प्रधान
3. अतुल करवाल
4. यापैकी नाही
उत्तर-2
------------------------------------------------------------
5. नुकतीच केंद्र सरकारने किती राज्यांना कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे?
1. पाच
2. सात
3. आठ
4. नऊ
उत्तर-2
------------------------------------------------------------
6. भारतातील पहिले विश्वस्तरीय रेल्वेस्टेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात केले जाणार आहे.
1. मुंबई
2. दिल्ली
3. चेन्नई
4. भोपाळ
उत्तर-4
------------------------------------------------------------
7. नेहरू: द डिबेट्स दॅट डिफाइंंड इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
अ. त्रिपुरदमन सिंह
ब. सलमान खुर्शीद
क. आशिष चौधरी
ड. आदिल हुसेन
1. अ आणि ड
2. ब आणि क
3. अ आणि क
4. अ आणि ब
उत्तर- 1
------------------------------------------------------------
8. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळविराच्या नेतृत्वाखाली क्रू मिशन स्पेस-एक्सचे प्रक्षेपण करण्यात आले?
1. राजा चारी
2. सुनीता विल्यम्स
3. सिरिशा बंदला
4. रवीश मल्होत्रा
उत्तर-1
------------------------------------------------------------
9. राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
1. निर्मला सीतारमन
2. पी.सी मोदी
3. पियुष गोयल
4. यापैकी नाही
उत्तर- 2
------------------------------------------------------------
10. नुकताच जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा करण्यात आला?
1. 8 नोव्हेंबर
2. 9 नोव्हेंबर
3. 11 नोव्हेंबर
4. 12 नोव्हेंबर
उत्तर-4
===========================
GK Questions and Answers 2021
प्र. १. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?
१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२
प्र. ३. जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%
प्र.४. कलम १ (३) नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;
१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व
प्र.५. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -
I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक
प्र. ६. सध्या भारतीय राज्यघटनेत (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?
१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४
प्र.७. १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?
१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व
प्र.८. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य ओळखा.
अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.
पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड
प्र. ९. कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?
१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील
प्र. १० कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?
१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल
उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटक
सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात - बिहार, गुजरातमधील स्थितीही चिंताजनक
🔰देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरात दिली आहे.
🔰दशातील सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात असून ही संख्या ६.१६ लाख आहे. त्यात मध्यम कुपोषित मुले १.५७ लाख, तर जास्त कुपोषित मुलांची संख्या ४.७५ लाख आहे.
🔰दसऱ्या क्रमांकावर बिहार असून तेथे ४.७५ लाख कुपोषित मुले आहेत. त्यात ३ लाख २३ हजार ७४१ मुले मध्यम कुपोषित तर १ लाख ५२ हजार ०८३ मुले जास्त कुपोषित आहेत.
🔰गजरातमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण ३.२० लाख असून त्यातील १.५५ लाख मध्यम कुपोषित तर १.६५ लाख जास्त कुपोषित आहेत.
भारतात कधी येणार ५जी सेवा? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; म्हणाले
🔰अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
🔰अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं.
🔰यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.
‘स्पेसएक्स’चे आणखी चार अंतराळवीर अवकाशात ; ६० वर्षांत ६०० अंतराळवीराचा प्रवास
🔰अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि स्पेसएक्स यांनी चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पाठवले आहे. खराब हवामानासह अनेक कारणांमुळे दीर्घ विलंबानंतर, स्पेसएक्स रॉकेट अखेर बुधवारी या अंतराळवीरांना घेऊन रवाना झाले. ज्यात ६० वर्षांत अंतराळात पोहोचणाऱ्या ६००व्या अंतराळवीराचा समावेश आहे.
🔰यएस स्पेस एजन्सी नासाने सांगितले की जर्मनीचे मॅथियास मौरर यांचा बुधवारी अंतराळात गेलेल्या चार व्यक्तींमध्ये समावेश होता, जे अंतराळात जाणारे ६००वे व्यक्ती ठरले. मॅथियास मौरर व्यतिरिक्त, इतर तीन अंतराळवीर २२ तासांच्या उड्डाणानंतर गुरुवारी संध्याकाळी अंतराळ स्थानकावर पोहोचतील. त्याला œc ३ असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटमध्ये ४४ वर्षीय भारतीय अमेरिकन राजा चारी देखील होते, जे यूएस एअर फोर्स फायटर जेटचा प्रशिक्षित पायलट होते. त्यांना मिशन कमांडर बनवण्यात आले आहे.
🔰खराब हवामानामुळे रॉकेटच्या उड्डाणाला विलंब झाला. बुधवारी रात्री रिमझिम पावसात चार अंतराळवीरांनी आपल्या कुटुंबाचा निरोप घेतला. हवामान तज्ज्ञांनी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला होता आणि त्यात सुधारणाही झाली.
🔰दोन दिवसांपूर्वी, स्पेसएक्स स्पेसक्राफ्ट यानातून नासाचे अंतराळवीर शेन किमब्रो आणि मेगन मॅकआर्थर, जपानचे अकिहितो होशिडे आणि फ्रान्सचे थॉमस पेस्केट हे पृथ्वीवर परतले. अंतराळ केंद्रात त्यांनी २०० दिवस व्यतीत केले आहेत.
कळसुबाई बियाणे संवर्धन समितीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
🔰कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी’ मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वात वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय ‘जीनोम सेव्हियर कम्युनिटी’ पुरस्कार या वर्षी तालुक्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीला मिळाला आहे. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.
🔰नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात ११ नोव्हेंबर रोजी भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच बीज माता पद्माश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी हा पुरस्कार व स्वीकारला.
🔰सथानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
🔰अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे.
प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड
🔰राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेतील निवडणुकीत त्यांना हे यश मिळाले आहे.
🔰सयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस तिरूमूर्ती यांनी प्रा. बिमल पटेल यांचे अभिनंदन केले असून त्यांना या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पटेल (वय ५१) यांना १९२ सदस्य देशांपैकी १६३ मते मिळाली. त्यात त्यांनी आशिया- पॅसिफक गटातील चीन, दक्षिण कोरिया व जपान या देशांवर मात केली आहे.
🔰परा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड झाली असून आमचे या संस्थेतील योगदान व आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचे प्रयत्न महत्त्वाचे राहतील असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. चीनच्या दंडेलीविरोधात अप्रत्यक्षपणे भारताने आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचा इरादा व्यक्त करून इशारा दिला आहे. ज्या देशांनी भारताला मतदान केले त्यांचे दूतावासाने आभार मानले आहेत.
🔰भारताचे पटेल यांना १६३ मते मिळाली. थायलंडला १६२, जपानला १५४, व्हिएतनामला १४५ मते मिळाली आहेत. चीनला १४२ मतांवर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाला १४०, सायप्रसला १३९ तर मंगोलियाला १२३ मते मिळाली.
२०३० पर्यंत चीनकडे असतील तब्बल एक हजार अण्वस्त्र, अमेरिकेने सादर केला अहवाल
🔰जपानला मागे टाकत चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. आता जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न चीन करत आहे. व्यापार, उद्योग, अवकाश तंत्रज्ञान, खेळ, संशोधन, विज्ञान, वहातुक अशा विविध क्षेत्रात चीन अमेरिकेवर कुरघोडी करत जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रही मागे नाहीये. चीन गेल्या दोन दशकांपासून वेगाने संरक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
🔰असं असतांना अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या लष्करी तयारीबाबत खास करुन अण्वस्त्र क्षमतेबाबत एक अहवाल तयार केला आहे. यानुसार चीनकडे २०३० पर्यंत एक हजार अण्वस्त्र असतील असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी चीनकडे सुमारे ३५० अण्वस्त्रे असावीत असा एक अंदाज होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनचे लष्करी सामर्थ्य वाढत असून २०३० पर्यंत एक हजार अणु बॉम्ब तयार करण्याची क्षमता चीनकडे झालेली असेल असं या अहवालात म्हंटलं आहे.
🔰चीनकडे जमिनवरुन जमिनीवर मारा करणारी, पाण्याखालून पाणबुडीतून जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. तसंच दीर्घ पल्ला असलेली बॉम्बफेकी विमानेही चीनकडे तयार होत आहेत.
🔰एवढंच नाही तर लष्कर, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुडी यांमध्ये लक्षणीय वाढ चीन दरवर्षी करत आहे. यामुळेच जास्तीत जास्त अण्वस्त्र वाहून नेता येतील, वेळप्रसंगी हल्ला करता येईल अशी क्षमता चीनची तयार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्वस्त्रासाठी आवश्यक असलेल्या प्लुटोनियमच्या निर्मितीकडे चीनकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ‘फास्ट ब्रीडर रिएक्टर’ प्रकारातील अणुभट्टीबाबत मोठी गुंतवणूक चीन करत आहे.
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
♻️ डायनामोमीटर : इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे
♻️ हॉट एअर ओव्हम : अधिक तापमान वाढविणारे उपकरणकॉम्युटरक्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र
♻️ रेफ्रीजरेटर : तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण
♻️ स्पिडोमीटर : गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण
♻️ हायड्रोफोन : पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण
♻️ टेलेस्टार : तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.
♻️ टाईपराईटर : टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण
♻️ टेलीग्राफ : सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.
♻️ अल्टीमीटर : समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
♻️ ऑक्टोक्लेव्ह : दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.
♻️ सिस्मोग्राफ : भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र
♻️ अॅमीटर : अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.
♻️ अॅनिमोमीटर : वार्याचा वेग व दाब मोजण्यासाठी
♻️ गायग्रोस्कोप : वर्तुळाकार भ्रमण करणार्या वस्तूची गती मोजणारे उपकरण.
♻️ पायरोमीटर : उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण
♻️ बॅरोमीटर : हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण
♻️ टेलिप्रिंटर : तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.
♻️ मायक्रोस्कोप : सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
♻️ क्रोनीमीटर : जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.
♻️ लॅक्टोमीटर : दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.
♻️ कार्डिओग्राफ : हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.
♻️ सायक्लोस्टायलिंग : छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.
♻️ कार्बोरेटर : पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.
♻️ मॅनोमीटर : वायुचा दाब मोजणारे उपकरण
♻️ ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी
♻️ मायक्रोफोन : ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.
♻️ रडार : रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.
♻️ हायड्रोमीटर : द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
♻️ मायक्रोमीटर : अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर – 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
♻️ थर्मोस्टेट : ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.
♻️ थिअडोलाईट : उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.
फुल व त्याची अंगके
◾️ निदलपुंज (Calyx) :
_____________
कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.
◾️ दलपुंज (Corolla) :
_____________
दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो.
◾️ पुमंग (Androecium) :
_____________
फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.
◾️ जायांग : (Gynoecium) :
_____________
फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.
◾️ परागीभवन
_____________
परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासन पढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते.
__________________________
दाब बद्दल संपूर्ण माहिती
· अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.
· खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.
· बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.
· यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.
· लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.
· पेचकस स्क्रुला लंब असल्यास लावलेले बल स्क्रुच्या टोकाकडे सर्वाधिक संक्रमित होते.
· यावरून असे स्पष्ट होते की वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.
· एखाधा पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.
· दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.
· दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ
· लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.
· दाब = उत्प्लाविता / क्षेत्रफळ
· SI पद्धतीमध्ये दाब N/m२ मध्ये मोजतात. त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल’ (Pa) असेही म्हणतात.
· बल वाढल्यास दाब वाढतो.
· बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ कमी झाल्यास दाब वाढतो.
· फळे कापायच्या सुरीला धार लावल्यामुळे सूरीवर लावलेले बल किमान क्षेत्रफळावर कार्य करते अन फळ चटकन कापले जाते.