10 April 2022

नगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती,लक्षात ठेवा

नगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते.
नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत.
10,000 ते 30,000 लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग नगरपरिषद, 30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद तर 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद असते.
नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात.
नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात.
नगर परिषेदेवरील सदस्यास ‘नगरसेवक’ म्हणतात.
नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
नगरपरिषदेचा कालावधी 5 वर्षाचा असतो म्हणजेच दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात.
नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
नगराध्यक्षावर आणला गेलेला अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास दूसरा अविश्वास ठराव किमान एक वर्ष आणता येत नाही.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान 50% नगर सेवकांची अनुमती लागते.
नगराध्यक्षावरील अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
नगर पालिकेचे वार्ड्स जिल्हाधिकारी निर्माण करतात.
आपल्या शहरात सांडपाण्याची व्यवस्था करणे, जन्ममृत्युची नोंद ठेवणे, आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची आवश्यक कामे आहेत.
मुख्याधिकार्‍याची निवड MPSC मार्फत तर नेमणूक राज्यशासन करते.
नगरपालिका/परिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास असतो.
नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते.
नगर परिषदेमध्ये 5 विषय समित्या असतात.
सध्या महाराष्ट्रात 223 नगरपरिषदा आहेत.

_____________________

01.) आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय

02.) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

05.) भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

 11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12.)  स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

 13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

 14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

 15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

 17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा

पोलिस प्रशासन बद्दल माहिती,महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

पोलिस प्रशासन बद्दल माहिती

12 डिसेंबर 1867 रोजी मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा संमत करण्यात आला.
1963 मध्ये मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा रद्द करण्यात आला.
22 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्र ग्रामीण मुलकी कायदा संमत करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुलकी व सामन्य प्रशासनाच्या दृष्टीने सहा विभाग केलेले आहेत. यांना महसूल विभाग असे सुद्धा म्हणतात.
प्रत्येक विभागाचा प्रमुख विभागीय आयुक्त असतो.
ग्रामीण मुलकी प्रशासनाची रचना :-

विभागीय आयुक्त = विभाग
जिल्हाधिकारी = जिल्हा
प्रांत अधिकारी = जिल्ह्याचा काही भाग
तहसीलदार = तालुका/तहसील
तलाठी = गाव

______________________

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती



3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.


महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.


महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.


महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.


महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.


महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.


महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.


आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.


महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.


महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.


सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.


पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.


________________________

महत्वाचे प्रश्नसंच

1)‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2).  √

2)_______ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली.  √
(C) भोपाळ
(D) चेन्नई

3)________ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग.   √
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

4)कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज.  √
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

5)_____ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली.  √
(D) लखनऊ

6)कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र.  √

7)_________ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर.  √
(D) महेंद्र सिंग धोनी

8)विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र.  √

9)फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T).  √
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

10)_____ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर.  √
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

महत्त्वाची माहिती


1)खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवाडा.
अ) सर्वात आधी १९५२ मध्ये फ्रान्स या देशात GST लागू झाले 
ब) भारताच्या आधीसुद्धा हा GST जवळपास १६० देशांमध्ये लागू आहे 
क) भारतामध्ये हि संकल्पना २००२ साली अटल बिहारी वाजपेयी यांनी मंडळी 

१) फक्त क चूक
२) फक्त अ आणि ब
३) तिन्ही बरोबर
४) फक्त ब.  √

2)GST चा ढाचा तयारकरण्यासाठी भारतात सर्वात पहिल्यांदा ,खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात आली होती.

१) दिग्विजय सिंह   
२) अरविंद पांगरीत   
३) राहुल गांधी  
४) असीम दासगुप्ता   .  √

3)GST Council बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) याच्या chairperson पदी NITY आयोगाचे vice chairperson असतात 
ब) सदस्यांची गणपूर्ती हि एकूण सदस्यसंख्येच्या ४०% ठरवण्यात आली आहे
क) निर्णय घेण्यासाठी बहुमत म्हणजे ३/४ मते आवश्यक असतील 
वरील विधांपैकी असत्य विधान शोध 

१) सर्व 
२) क सोडून सर्व.   √
३) ब सोडून सर्व 
४) एकही नाही 

4)पुढील वैशिष्ट्य कोणत्या नदीचे आहे ते ओळखा :
   अ ) या नदीमुळे मुंबईच्या बऱ्याच भागातील लोकांची तहान भागवली जाते . 
   ब ) हि नदी महाराष्ट्रातील  सर्वात शेवटी निर्माण झालेल्या जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे. 
   क ) हि नदी भारतातील प्रदूषित नदीपैकी एक आहे.

१) वैतरणा नदी.  √
२) सूर्या नदी 
३) वाशिष्टी नदी 
४) मिठी नदी 

5)भारतात पहिल्यांदा जेण्डर बजेट कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडले होते?

१) 2005-2006.  √
२) 2016-2017
३) 2008-2009
४) 2013-2014

____________________

1)‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

1. भाषिक व सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 2000 पासून दरवर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी हा दिन पाळतात.

2. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बांग्लादेशाचा पुढाकार होता.

3. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी वर्ष 2018 ला आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष पाळला.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) केवळ (2).  √
(D) (1), (2) आणि (3)

2)‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिलेल्या खेळांमध्ये प्रतिभावंत खेळाडूंना 8 वर्षांसाठी वर्षाकाठी 8 लक्ष रुपये प्रदान केले जातात.

2. ही एक केंद्रीय योजना असून ती युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय राबवित आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

3)कचऱ्यामुळे कमी होणार्‍या आकारामुळे सेन्की नदी चर्चेत आहे. ही नदी कोणत्या शहरामधून वाहते?
(A) शिलांग
(B) दिसपूर
(C) इटानगर.  √
(D) इम्फाळ

4)जगातले सर्वात मोठे क्रिडामैदान चर्चेत आहे. त्याचे नाव ____ हे आहे.
(A) सरदार पटेल क्रिडामैदान, मोटेरा, अहमदाबाद.  √
(B) ईडन गार्डन, कोलकाता
(C) मेलबर्न क्रिकेट मैदान
(D) सिडनी क्रिकेट मैदान

5)‘अटल नवकल्पना अभियान’ हा _ यांचा प्रमुख उपक्रम आहे.
(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
(B) NITI आयोग. √
(C) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

6)‘हेराथ महोत्सव’ हा कोणत्या राज्यातला एक महत्वाचा उत्सव आहे?
(A) आसाम
(B) नागालँड
(C) जम्मू व काश्मीर.  √
(D) त्रिपुरा

7)_______ या राज्यात प्रथम ‘भारत-बांगला पर्यटन उत्सव’ आयोजित करण्यात आला.
(A) पश्चिम बंगाल
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) ओडिशा

8)_______ या शहरात तृतीय चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
(A) अहमदाबाद.  √
(B) सुरत
(C) वडोदरा
(D) नवी दिल्ली

9)‘जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक’ हा ___ यांचा प्रकल्प आहे.

1. न्यूक्लियर थ्रेट इनिशीएटीव्ह (NTI)

2. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी (CHS)

3. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU)

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3).  √

10)कोणत्या संस्थेनी ‘थिरुमती कार्ट अॅप’ विकसित केले?
(A) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), गोवा
(B) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), इलाहाबाद
(C) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), त्रिची, तामिळनाडू.  √
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), दिल्ली

आजचे प्रश्नसंच


1)चर्चेत असलेले ‘क्रॅस्पेडोट्रोपिस ग्रेटाथुनबर्गे’ हे काय आहे?
(A) पर्यावरणीय कार्यकर्ता
(B) गोगलगायची नवी प्रजाती.  √
(C) सस्तन प्राण्याची नवी प्रजाती
(D) जिवाणूची नवी प्रजाती

2)‘H1B व्हिसा’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हे अमेरिकेच्या मालकांना कोणत्याही व्यवसायात परदेशी कामगारांना तात्पुरती नोकरी देण्यास परवानगी देते.

2. मुक्कामाचा कालावधी पाच वर्षांचा असून तो आठ वर्षांपर्यंत वाढवितात येतो.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवड करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2). √

3)पंधरावी ‘जी-20 शिखर परिषद’ _मध्ये भरणार.
(A) सौदी अरब. √
(B) टोकियो
(C) नवी दिल्ली
(D) अमेरिका

4)भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते ___ येथे ‘कृषी तंत्रज्ञान व नवकल्पना’ विषयक परिषदेचे आणि प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) चंद्रशेखर आझाद विद्यापीठ, कानपूर
(B) आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट
(C) प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद.  √
(D) डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, समस्तीपूर

5)नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे (NF) कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन ही संस्था _ येथे भारतातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधत आहे.
(A) शिलांग
(B) मणीपूर
(C) दिसपूर
(D) कोहिमा.  √

6)कोणत्या राज्य विधानसभेच्या सभापतींना ‘आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले?
(A) केरळ विधानसभा.  √
(B) कर्नाटक विधानसभा
(C) तेलंगणा विधानसभा
(D) आंध्र विधानसभा

7)________ कडून ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ सादर करण्यात आले.
(A) अर्थ मंत्रालय, भारत सरकार
(B) भारतीय रिझर्व्ह बँक. √
(C) NITI आयोग
(D) यापैकी नाही

8)‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ मोहिमेच्या अंतर्गत जम्मू व काश्मीर आणि लडाख यांची जोडी कोणत्या राज्यासोबत तयार केली गेली?
(A) तामिळनाडू.  √
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) उत्तरप्रदेश

9)कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ‘जागरूकता कार्यक्रम 2020’ चालवला आहे?
(A) महिला व बाल विकास मंत्रालय
(B) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(D) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय.  √

10)34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
(A) डी. गुकेश.  √
(B) अर्जुन एरिगसी
(C) आर्यन चोप्रा
(D) कार्तिक वेंकटरमन
  
__________________________

1)३६ चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेले असलेले व पूर्णांकात बाजू असलेले एकूण किती आयात काढता येतील?

A) ३
B) ४    √
C) ६
D) ५

2)एका वर्गातील ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी १८ होते तर शिक्षकांचे वय किती?

A) ४१
B) ५७   √
C) ५२
D) ५०

3)एका मिश्रधातूमध्ये ३७% पितळ, ४६% जस्त व उरलेले तांबे आहे, तर त्या प्रकारच्या ५०० ग्रॅम मिश्रधातूमध्ये किती तांबे आहे?

A) ९० ग्रॅम
B) ८० ग्रॅम
C) ८५ ग्रॅम    √
D) १०० ग्रॅम

4)A चा पगार B च्या पगाराच्या 20% कमी आहे. तर B चा पगार A च्या पगाराच्या किती टक्क्यांनी जास्त आहे?

A) 16%
B) 25%   √
C) 20%
D) 10%

5)एका समभूज चौकोनाचे कर्ण १२ सें.मी. व १६ से.मी. आहेत, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?

A) २८
B) १९२
C) ९६    √
D) १०८

6)९ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या ५ संख्यांची सरासरी १२ आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी २० आहे. तर सहावी संख्या काढा?

A) ७५
B) १५   √
C) २५
D) २०

7)एक घड्याळ दर तासाला ६ सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला ६ सेकंद मागे पडते, तर सकाळी ८ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता त्यांच्यात किती फरक पडेल?

A) १२० मिनिटे
B) ४ मिनिटे   √
C) ० मिनिटे
D) ३ मिनिटे

8)एका वस्तूच्या मूळ किंमतीत २०% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत २०% वाढ झाली, तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होईल?

A) ४% ने घट   √
B) ८% ने घट
C) ८% ने वाढ
D) ४% ने वाढ

9)दोन संख्यांचा लसावि ३१५ असून त्याचा मसावी २१ आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?

A) २९४
B) १६८   √
C) १४०
D) २८६

10)दोन रेल्वे एकाच लांबिच्या असून त्या परस्परांच्या विरूद्ध दिशेने जात आहेत. त्या एकमेकांना ५४ सेकंदात ओलांडतात, तर त्यांचा वेग अनुक्रमे ७२ कि.मी./तास व ४८ कि.मी./तास असेल तर गाड्यांची प्रत्येकी लांबी किती मीटर असेल?

A) ८००
B) ९५०
C) ८००
D) ९००.  √

11)जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?

 15 ऑगस्ट 2013

 24 ऑगस्ट 2013

 26 ऑगस्ट 2013.  √

 वरील पैकी कोणतेही नाही

12)एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?

 श्री. शंकरराव चव्हाण

 श्री. यशवंतराव चव्हाण. √

 श्री. वसंतराव पाटील

 श्री. शरदचंद्र पवार

13)ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

 ठाणे

 अंदमान

 मंडाले

 एडन.  √

14) इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

 नीळ

 भात फक्त

 गहू फक्त

 भात व गहू.  √

15)‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

 जगन्नाथ शंकर सेठ

 बाळशास्त्री जांभेकर.  √

 भाऊ दाजी लाड

 छत्रपती शाहू महाराज

16) —–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

 79

 59

 49.  √

 39

17)रेडी बंदर हे —— च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

 आंबा

 नैसर्गिक वायु

 कोळसा

 लोह खनिज.  √

18)कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?

 सिमेंट उद्योग

 चर्मोद्योग

 काच उद्योग

 रबर माल उद्योग.  √

19)भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?

 गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुर

 गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय

 गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम.  √

 गुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड

.20) खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?

 स्वामिनाथन समिती

 चेलय्या समिती

 नरसिंहम समिती.  √

 केळकर समिती

लक्षात ठेवा


Ques. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर नाही

A. या पदाला घटनात्मक दर्जा आहे
B. त्यांची नेमणुक राष्ट्रपती द्वारे केली जाते
C. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो
D. संसदेच्या सल्लाशिवाय राष्ट्रपती त्यांना पदावरून काडू शकतात
Ans. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो

Ques. योग्य विधान ओळखा अ. कलम 43 नुसार भारतात कुटीरउद्योगाला चालना देणे सरकारची जबाबदारी आहे. ब. कलम 40 नुसार पंचायत राज्याची स्थापना करणे केंद्राची जबाबदारी आहे.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Ans. वरील दोन्ही

Ques. भारतात जनहित याचिकेची सुरूवात ...................झाली

A. घटनादुरूस्तीने
B. न्यायालयीन पुढाकाराने
C. राजकीय पक्षांच्या पुढाकाराने
D. संसदेच्या कायद्याने
Ans. न्यायालयीन पुढाकाराने

Ques. योग्य विधान ओळखा अ. मतदार संघ पुनरर्चना आयोगाच्या शिफारसी लोकसभेत किंवा विधानसभेत सादर केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येत नाही.
ब. मतदार संघ पुनरर्चना आयोगाच्या शिफारशींना कोर्टात आवाहन देता येऊ शकते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Ans. फक्त अ

Ques. आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसद संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी कायदा करू शकते .........

A. सर्व राज्य सरकाराच्या सहमतीने
B. 2/3 राज्य सरकाराच्या सहमतीने
C. संबंधित राज्य सरकाराच्या सहमतीने
D. कोणत्याही राज्य सरकाराच्य सहमतीने
Ans. कोणत्याही राज्य सरकाराच्य सहमतीने

Ques. केंद्रीय आर्थिक संसादनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण दिते ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. आंतरराज्य परिषद
C. नियोजन आयोग
D. वित्त आयोग
Ans. वित्त आयोग

Ques. खालील नद्यांच्या त्यांच्या खोर्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा .
(१) ब्रह्मपुत्र
(२) कृष्णा
(३) तापी
(४) कावेरी

A. २,१,४,३
B. २,४,३,१
C. १,२,४,३
D. १,३,२,४
Ans. १,२,४,३

Ques. खालील विधाने पाहवित व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगवे .
(१) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे .
(२) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते .
(३) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा २ वर्गवारीत मोडते - जुनी - बांगर आणि नवी - खादार.
(४)खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते .
(५) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटँश , फॉस्फोरिक अँसिड व लाइज असते .
(६) गाळाची मृदा ऊस , भात ,गहू व कडधान्यांकरता उत्कृष्ट असते .

A. ३
B. ४
C. ५
D. एकही नाही .
Ans. एकही नाही .

Ques. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हावामानात आढळात नाही .?

A. येथे हिवाळा नसतो .
B. दुपारी पाऊस पडतो .
C. वर्षभर सारखेच (Uniform)तापमान असते .
D. प्रतिरोध पर्जन्य .
Ans. प्रतिरोध पर्जन्य .

Ques. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण ......
(१) मोठ्या प्रमाणात अन्नधान्यावर अवलंबून राहणे .
(२)मासे साठवण्याच्या मर्यादित सोई .
(३) सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही .
(४) जास्त चांगली बाजरपेठ नाही .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

A. १,३,आणि ४
B. २,३,आणि ४
C. १,२,आणि ४
D. फक्त ३
Ans. १,२,आणि ४

Ques. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे .मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते ?

A. राजस्थान
B. मध्य प्रदेश
C. महाराष्ट्
D. उत्तर प्रदेश
Ans. राजस्थान

Ques. 'लू 'हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य वाहणारं महिने .........

A. एप्रिल - मे
B. मे - जून
C. जून - जुलै
D. अॉक्टोबर - नोव्हेंबर
Ans. मे - जून

Ques. खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?
(a)जन्मदर
(b)मृत्यूदर
(c)लोकसंख्येचे आकारमाण
(d)स्थालांतर

A. (b) (c) आणि (d)
B. फक्त (c)
C. फक्त (d)
D. वरीलपैकी कोणतीही नाही
Ans. वरीलपैकी कोणतीही नाही

Ques. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त ............. आहे

A. 97° 25E
B. 68° 7'E
C. 82° 50'E
D. 90° 25'E
Ans. 97° 25E

Ques. गुरूशिखार खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखार आहे ?

A. छोटा नागपूर
B. अरवली
C. विंध्या
D. मालवा
Ans. अरवली

Ques. खालीलपैकी कोणत्या राज्याच्यी किनारी प्रदेशात थोरियम हे अनूउर्जेसाठी म्हतवाचे खनिज इंधन आढळते ?

A. केरळ
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. कर्नाटक
Ans. केरळ

Ques. मान्सूनच्या परतीच्या काळात ऑक्टोबर-नोहेंबर मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात पाऊस पडतो ?

A. आंध्रप्रेदश व तमिळनाडू
B. प.बंगाल व आसाम
C. केरळ व तामिळनाडू
D. महाराष्ट्र व गुजरात
Ans. आंध्रप्रेदश व तमिळनाडू

Ques. सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कुठे होतो ?

A. गंगोत्री
B. यमुनोत्री
C. मान सरोवर जवळ
D. सांभर सरोवर जवळ
Ans. मान सरोवर जवळ

Ques. जगातील सर्वात अधिक पाऊस खालीलपैकी कुठे पडतो ?

A. चेरापुंजी
B. मनाली
C. मौसिनराम
D. सिक्कम
Ans. मौसिनराम

Ques. भारतातील घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश संख्येचा योग्य पर्याय निवडा.

A. 28,7
B. 29,7
C. 28,6
D. 28,8
Ans. 28,8

Ques. विष्णूपुरी धरण कोणत्या नदी वर आहे ?

A. कोयना
B. पैनगंगा
C. भीमा
D. वरीलपैकी एक ही नाही
Ans. वरीलपैकी एक ही नाही