11 April 2022

कवी व त्यांची टोपण नावे,मराठी व्याकरण

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
कवी व त्यांची टोपण नावे

1यशवंत दिनकर पेंढारकर
----- यशवंत
2मोरोपंत रामचंद्र पराडकर
----- मोरोपंत
3चिंतामण त्र्यंबक खानोलकर
-----आरती प्रभू
4गोपाल हरी देशमुख
----- लोकहितवादी
5शंकर काशिनाथ गर्गे
----- दिवाकर
6कृष्णाजी केशव दामले
----- केशवसुत
7सौदागर नागनाथ गोरे
----- छोटा गंधर्व
8रघुनाथ चंदावरकर
----- रघुनाथ पंडित
9हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
----- कुंजविहारी
10दासोपंत दिगंबर देशपांडे
----- दासोपंत
11सेतू माधवराव पगडी
----- कृष्णकुमार
12नारायण वामन टिळक
----- रेव्हरंड टिळक
13माणिक शंकर गोडघाटे
----- ग्रेस
14वसंत ना. मंगळवेढेकर
----- राजा मंगळवेढेकर
15कृष्ण शास्त्री चिपळूणकर
----- मराठीचे जॉन्सन
16केशवसुत----आधुनिक मराठी काव्याचे जनक
17बा.सी. मर्ढेकर
----- मराठी नवकाव्याचे जनक
18सावित्रीबाई फुले
----- आधुनिक मराठी कवितेच्या जननी
19संत सोयराबाई
------ पहिली दलित संत कवयित्री
20ना.धो.महानोर
----- रानकवी
21यशवंत दिनकर पेंढारकर
----- महाराष्ट्र कवी
22न. चि. केळकर
----- साहित्यसम्राट
23दादोबा पांडुरंग तर्खडकर
----- मराठी भाषेचे पाणिनी
24वि.वा. शिरवाडकर
----- कुसुमाग्रज
25राम गणेश गडकरी
----- गोविंदाग्रज/बाळकराम
26विष्णुशास्त्री चिपळूणकर
----- मराठी भाषेचे शिवाजी

मराठी व्याकरण

🌷 स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.

🌷 संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

🌷 नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.

🌷 अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.

🌷 शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.

🌷 सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.

🌷 शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.

🌷 साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

🌷प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.

🌷 धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.

🌷 टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.

🌷 मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.

🌷 महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.

विरूध्द अर्थी शब्द ,समानार्थी शब्द

मराठी व्याकरण व लेखन:
🔹विरूध्द अर्थी शब्द

अतिरेकी✖विवेकी
रसिक✖अरसिक
अतिवृष्टी✖अनावृष्टी
अधोगती✖प्रगती
  गोड✖कडू
अबोल✖बोलका
अवनती✖उन्नती
अमृत✖विष
नीती✖अनीती
आरंभ✖शेवट
आशा✖निराशा
आळशी✖कामसू
आस्तिक✖नास्तिक
आराम✖कष्ट
इष्ट✖अनिष्ट
अब्रू✖बेअब्रू
उंच✖बुटका
निरभ्र✖आभ्राच्छादित
एकमत✖दुमत
उलट✖सुलट
आदर✖अनादर
उपद्रवी✖निरूपद्रवी
आघाडी✖पिछाडी
गुण✖अवगुण/दोष
अपराधी✖निरपराधी
साकार✖निराकार
अशक्त✖सशक्त
शकुन✖अपशकुन
सुकाळ✖दुष्काळ
अपमान✖सन्मान
सावध✖बेसावध
अवघड✖सोपे
प्रकाश✖काळोख
विधवा✖सधवा
कंजुस✖उदार
मंद✖चपळ
सुर✖असुर
विघटन✖संघटन
स्वामी✖सेवक
तेजी✖मंदी
पाप✖पुण्य
खोल✖उथळ
नागरी✖ग्रामीण
देव✖दानव
कमाल✖किमान
उचित✖अनुचित
सुसंवाद✖विसंवाद
तप्त✖शीतल
खंडन✖मंडन
ज्ञान✖अज्ञान
पचन✖अपचन
सासर✖माहेर
जहाल✖मवाळ
वियोग✖संयोग
संवाद✖विवाद
श्वास✖निःश्वास
सुसह्य✖असह्य
सुरस✖निरस 
रणशूर✖रणभीरू
आंतरजातीय✖सजातीय
वर✖वधू
स्थूल✖कृश
सुरूप✖कुरूप
ज्ञात✖अज्ञात
______________

समानार्थी शब्द 

खंड - भाग, तुकडा, दंड, अनेक देशांचा समूह
 
खाट - बाज, खाटले, बाजले
 
खास - खुद, स्वत:विशेष, मुद्दाम
 
खूण - संकेत, ईशारा, चिन्ह
 
खूळ - गडबड, छंद, वेड
 
खेळकुडी - थट्टा, खेळ, गंमत
 
गणपती - गजवदन, गजानन, गणराज, लांबोदर
 
विनायक - विघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
 
गर्व - अभिमान, घंमेड, अंहकार
 
गाय - धेनु, गोमाता, गो, कामधेनू
 
गरज - निकड, आवश्यकता, जरूरी
 
गृह - धाम, घर, सदन, भवन, निवास
 
गोपाळ - गिरीधर, मुरलीधर, गोविंद
 
गावठी - अडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
 
घमेंडखोर - अंहकारी, गर्विष्ठ, बढाईखोर
 
घृणा - शिसारी, किळस, तिटकरा
 
घोर - काळजी, चिंता, विवंचना
 
घेर - चक्कर, प्रदक्षिणा, फिरणे
 
घडी - घटका, पडदा, पट, घडयाळ
 
घात - नारा, हंगाम, वध, समसंख्याचा गुणाकार
 
घाणेरडा - ओंगळ, घामट, गलिच्छ,
 
घोट - चूळ, आवंडा, घुटका
 
चंडिका - दुर्गा, उग्र, निर्दय

तापट - संतापी, चलाख

ताकीद - बजावून सांगणे, जरब, आज्ञा
 
ताठपणा - गर्व, अहंकार, उद्धटपणा
 
तिरस्कार - कंटाळा, वीट, तिटकारा
 
तेज - चकाकी, टवटवी, तजेला
 
तारणे - वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
 
तळं - तलाव, धरण, तटाक
 
तरुण - जवान, यौवन, युवक
 
तोंड - मुख, वदन, आनन
 
त्रास - वैताग, ज्वर, ताप
 
थट्टा - चेष्टा, मस्करी, विनोद
 
थोर - श्रेष्ठ, मोठा, महान
 
थंड - गार, शीत, शीतल
 
दंग - मग्न, गुंग, आश्चर्यचकित
 
दंडक - नियम, चाल, वहिवाट
 
दरवेशी - फिरताभिक्षेकरी, माकड किंवा अस्वल घेऊन पोट भरणारा
 
दीन - दुबळा, गरीब, नम्र
 
देव - ईश, सुर, परमेश्वर, ईश्वर, अमर
 
देवालय - देऊळ, राऊळ, मंदिर
 
दुर्धर - अवघड, गहन, श्रीमंत
 
धनु - कमठा, कोदंड, चाप, धनुष्य
 
धनाढ्य - सधन, धनिक, श्रीमंत

शब्दसमूहाबद्दल एक शब्द ,समान अर्थाचे शब्द, समानार्थी शब्द

मराठी व्याकरण व लेखन:
शब्दसमूहाबद्दल एक शब्द

१) जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय
२) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
३) जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू
४) सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी
५) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी
६) गावाचा कारभार - गावगाडा
७) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या
८) तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा
९) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई
१०) घोड्यांना बांधण्याची जागा - पागा

समान अर्थाचे शब्द

१) आनंद = हर्ष, मोद, संतोष     
२) दिवस = वार, वासर, अहन
३) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
४) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
५) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज    
६) पान = पर्ण, पत्र, पल्लव
७) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी  
८) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही 
९) तोंड = आनन , मुख, वदन
१०) दैत्य = दानव, राक्षस, असुर

समानार्थी शब्द

अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
 
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी
 
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन
 
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
 
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी
 
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
 
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित
 
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
 
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश
 
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश
 
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
 
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
 
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन
 
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद
 
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य
 
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
 
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
 
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले
 
इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र
 
उकल - उलगडा, सुटका, मोकळे
 
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
 
उपाय - तजवीज, इलाज, उपचार
 
उमाळा - तरंग, लोट, उकळी
 
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ
 
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक
एकता - ऐक्य, एकी, एकजूट,
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
ओज - तेज, पाणी, बळ 
ओढ - कल, ताण, आकर्षण 
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
ओळख - माहिती, जामीन, परिचय 
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव 
कपाळ - ललाट, भाल, निढळ 
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
काक - कावळा, वायस, एकाक्ष 
किरण - रश्मी, कर, अंशू 
काळोख - तिमिर, अंधार, तम 
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

मराठी व्याकरण व लेखन:
शब्दसिद्धी व त्याचे प्रकार :

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.

     शब्दांचे खालील प्रकार पडतात.

1. तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.

उदा.  राजा, भूगोल, चंचू, पुष्प,  परंतु,  भगवान,  कर,  पशु,  अंध,  जल, दीप,   पृथ्वी,  तथापि,  कवि,  वायु,   भीती,   पुत्र,  अधापि,  मति,  पुरुष,  शिशु,  गुरु,   मधु,  गंध,  पिता,  कन्या,  वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान,  संत,  निस्तेज, कर,  जगन्नाथ, दर्शन,  उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प,  घृणा,  पिंड,  कलश,  प्रात:क, दंड,  पत्र,  ग्रंथ,  उत्तम,  आकाश,  पाप,  मंत्र,  शिखर,  सूत्र,  कार्य,  होम, गणेश,  सभ्य,  कन्या,  देवर्षि,  वृद्ध संसार,  प्रीत्यर्थ, कविता,  उपकार, परंतु,  गायन, अश्रू,  प्रसाद,  अब्ज,  राजा,  संमती,  घंटा,  पुण्य,  बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा,  प्रकाश,  सत्कार,  देवालय, तारा,  समर्थन, नयन,  उत्सव,  दुष्परिणाम, नैवेध

2. तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना तदभव शब्द असे म्हणतात.

उदा.  घर,  पाय,  भाऊ,  सासू,  सासरा,  गाव,  दूध,  घास, कोवळा,  ओळ, काम, घाम,  घडा,  फुल,  आसू,  धुर, जुना,  चाक, आग, धूळ,  दिवा,  पान, वीज,  चामडे, तहान,  अंजली,  चोच,  तण, माकड,  अडाणी,  उधोग, शेत, पाणी, पेटी,  विनंती,  ओंजळ,  आंधळा, काय,  धुर,  पंख, ताक, कान, गाय

3. देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात.

उदा.  झाड,  दगड,   धोंडा,  घोडा,   डोळा,  डोके,   हाड,   पोट,  गुडघा, बोका,  रेडा,  बाजारी, वांगे,  लुगडे,  झोप,  खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर,  पीठ,  डोळा, मुलगा, लाजरा,  वेढा,  गार  लाकूड ओटी  वेडा  अबोला लूट  अंघोळ उडी शेतकरी आजार रोग ओढा चोर वारकरी मळकट धड ओटा डोंगर    

परभाषीय शब्द

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात.

1. तुर्की शब्द

उदा. कलगी, बंदूक, कजाग

2. इंग्रजी शब्द

उदा.  डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

3. पोर्तुगीज शब्द

उदा.  बटाटा,  तंभाखू,  पगार,  बिजागरी, कोबी,  हापूस,  फणस,  घमेले,  पायरी,  लोणचे,  मेज,   चावी,   तुरुंग,  तिजोरी,  काडतुस,

4. फारशी शब्द

उदा.  रवाना, समान, हकीकत,  अत्तर,  अब्रू,   पेशवा,  पोशाख,  सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम,  लेजीम,  शाई,  गरीब, खानेसुमारी,  हजार, शाहीर, मोहोर, सरकार,  महिना, हप्ता.

5. अरबी शब्द

उदा. अर्ज, इनाम,  हुकूम,  मेहनत, जाहीर,  मंजूर, शाहीर, साहेब,  मालक, मौताज, नक्कल,  जबाब, उर्फ, पैज, मजबूत,  शहर,  नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल

6. कानडी शब्द  
उदा.  हंडा, भांडे,  अक्का,  गाजर,  भाकरी,  अण्णा,  पिशवी,  खोली,  बांगडी,  लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड,  खलबत्ता, किल्ली,  तूप,  चिंधी, गुढी,  विळी, आई, रजई,  तंदूर,  चिंच,  खोबरे, कणीक, चिमटा,  नथ,  तांब्या,  उडीद, पाट,  गाल,  काका,  टाळू,  गादी, खिडकी,  गच्ची, बांबू,  ताई,  गुंडी, कांबळे

7. गुजराती शब्द
उदा.  सदरा,  दलाल,  ढोकळा,  घी,  डबा,  दादर, रिकामटेकडा, इजा, शेट

8. हिन्दी शब्द
उदा.  बच्चा,  बात,  भाई, दिल, दाम, करोड,  बेटा, मिलाप,  तपास,  और, नानी, मंजूर,  इमली

9. तेलगू शब्द
उदा.  ताळा,  अनरसा,  किडूकमिडूक,  शिकेकाई, बंडी, डबी

10. तामिळ शब्द
उदा. चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा

सिद्ध व सधीत शब्द

1. सिद्ध शब्द

भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.

उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

सिद्ध शब्दांचे तीन प्रकार पडतात.

1. तत्सम   2. तदभव   3. देशी

2. सधीत शब्द

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो.

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात
अ) उपसर्गघटित   ब) प्रत्ययघटित    क) अभ्यस्त    ड) सामासिक

अ) उपसर्गघटित शब्द

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.
वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्याि शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

ब) प्रत्ययघटित शब्द

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.
वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

क) अभ्यस्त शब्द

एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.

उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

अभ्यस्त शब्दांचे खालील तीन प्रकार पडतात.
1. पूर्णाभ्यस्त   2. अंशाभ्यस्त   3. अनुकरणवाचक

1. पूर्णाभ्यास शब्द

एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

2. अंशाभ्यस्त शब्द

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

3. अनुकरणवाचक शब्द

ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

ड) सामासिक शब्द

जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्याध शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.  

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.      
    

 

विरुद्धार्थी शब्द/समानार्थी शब्द


मराठी व्याकरण व लेखन:
विरुद्धार्थी शब्द

1) अस्ताव्यस्त ×  व्यवस्थित

2) उत्कर्ष  ×  अपकर्ष

3) तीक्ष्ण  × बोथट

4)चंचल  × स्थिर

5)उणे  ×  अधिक

विरुद्धार्थी शब्द

1) कीर्ती -- अपकीर्ती

2) गतकाल -- भविष्यकाळ

3) गुळगुळीत -- खडबडीत

4) उतरण -- चढण

5)जन्म -- मृत्यू
-------------------------------

समानार्थी शब्द

1) ओझे - भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी

2) ओंड - लोंगर, टरफल

3) ओढाळ - उनाड, भटक्या

4)ओढ - माया , लळा, कल

5) अंत - शेवट, मरण, मृत्यू,

__________________
समानार्थी शब्द

बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
माणूस = मानव
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता 
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत 
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा 
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
परिश्रम = कष्ट, मेहनत   
पती = नवरा, वर 
पत्र = टपाल 
पहाट = उषा  
परीक्षा = कसोटी 
पर्वा = चिंता, काळजी 
पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री 
पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज
पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती
प्रकाश = उजेड 
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक
प्रजा = लोक 
प्रत - नक्कल
पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी
प्रदेश = प्रांत 
प्रवास = यात्रा    
प्राण = जीव 
पान = पत्र, पत्ता, पर्ण 
प्रासाद = वाडा 
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन 
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ  
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पोपट = राघू, शुक
पाऊस = वर्षा, पर्जन्य 
पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी 
पिशवी = थैली 
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन 
पुंजा = पूजन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती  
फलक = फळा   
फांदी शाखा 
फूल = पुष्प, सुमन, कुसुम

निफड - गरज, जरूरी, लकडा
 
निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
पंगत - भोजन, रांग, ओळ
 
पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
पान - पर्ण, पत्र, दल
 
परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
पाय - चरण, पाऊल, पद
 
पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
फट - चीर, खाच, भेग
 
फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
फरक - अंतर, भेद


मराठी व्याकरण व लेखन:
विरुद्धार्थी शब्द

इहलोक x परलोक
तेजी x मंदी
पुरोगामी x प्रतिगामी  
श्रेष्ठ x कनिष्ठ
स्वच्छ x घाणेरडा
सुटका x अटक
सुभाषित x कुभाषित  
हिरमुसलेला x उत्साही
स्वार्थ x परमार्थ
विलंब x त्वरा

समानार्थी शब्द 

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
 
ढाळणे - गाळणे,  अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य