25 April 2022

महाराष्ट्र - जलाशय व धरणे /General Knowledge

MPSC All Competitive Exam:
🔴 महाराष्ट्र - जलाशय व धरणे.

🔶कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

🔶जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

🔶बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

🔶 भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

🔶गंगापूर - (गोदावरी) नाशिक

🔶 राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

🔶मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

🔶 उजनी - (भीमा) सोलापूर

🔶तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

🔶यशवंत धरण - (बोर) वर्धा

🔶 खडकवासला - (मुठा) पुणे

🔶 येलदरी - (पूर्णा) परभणी

__________________________

General  Knowledge*

● गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात 'बन्नी' नावाच्या म्हैस-जातीच्या भारतातील पहिल्या IVF रेडकूचा जन्म झाला?
उत्तर : गीर सोमनाथ

●  कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिवस” साजरा करतात?
उत्तर : २४ ऑक्टोबर

● कोणती व्यक्ती "द ऑरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स" हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर : वेंकटराघवन सुभा श्रीनिवासन

●  कोणत्या संस्थेने “गरुड” ॲप तयार केले?
उत्तर : भारतीय निवडणूक आयोग

● कोणत्या दिवशी “जागतिक विकास माहिती दिवस” साजरा करतात?
उत्तर : २४ ऑक्टोबर

● कोणत्या व्यक्तीला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात २०१९ या वर्षासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला?
उत्तर : रजनीकांत

● कोणती २०२१ साली “जागतिक पोलिओ दिवस”ची संकल्पना आहे?
उत्तर : डिलिव्हरिंग ऑन ए प्रॉमिस

●  कोणत्या संस्थेने "PEC लिमिटेड" या कंपनीला 'नॉट फिट अँड प्रॉपर (अयोग्य)' म्हणून घोषित केले?
उत्तर : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडल

MPSC All Competitive Exam

MPSC All Competitive Exam➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

'एक्झरसाइज अजेय वॉरीयर' याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

1. ते भारत आणि अमेरिका यांच्यातील 6 वे संयुक्त कंपनीस्तरीय लष्करी प्रशिक्षण आहे.

2. प्रशिक्षण उत्तराखंडच्या चौबटिया येथे सुरू झाले.

दिलेल्यापैकी कोणते विधाने अचूक आहे?

(A) फक्त 1
(B) फक्त 2 ✅✅
(C) 1 आणि 2
(D) एकही नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या खेळाडूने 7 ऑक्टोबर 2021 रोजी ओस्लो (नॉर्वे) येथे खेळविण्यात आलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले?

(A) विनेश फोगाट
(B) साक्षी मलिक
(C) अंशु मलिक ✅✅
(D) हेलन मरौलीस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) ओडिशा
(B) छत्तीसगड ✅✅
(C) केरळ
(D) गुजरात

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक आरोग्य संघटनेने ______ नामक मलेरियाविरोधीची जगातील प्रथम लसीला मान्यता दिली.

(A) RTS,S/AS01 (RTS,S) ✅✅
(B) RTP,P/AS01 (RTP,P)
(C) RTT,T/AS01 (RTT,T)
(D) RTY,Y/AS01 (RTY,Y)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

खालीलपैकी कोणत्या भाषेसाठी ‘बहुभाषिक स्मृतिभ्रंश संशोधन आणि मूल्यांकन (मुद्रा / MUDRA) टूलबॉक्स’ विकसित करण्यात आले?

(A) बंगाली
(B) कन्नड
(C) हिंदी
(D) वरील सर्व ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

______ संस्थेने “शिफ्टिंग गियर्स: डिजिटलायझेशन अँड सर्व्हिसेस-लेड डेव्हलपमेंट” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला.

(A) आंतरराष्ट्रीय चलननिधी
(B) जागतिक व्यापार संघटना
(C) जागतिक बँक ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

खालीलपैकी कोणती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष करांच्या संकलनासाठी मंजुरी मिळविणारी पहिली अनुसूचित खासगी बँक ठरली?

(A) आयसीआयसीआय बँक
(B) कोटक महिंद्रा बँक ✅✅
(C) इंडसइंड बँक
(D) युनियन बँक ऑफ इंडिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला साहित्यातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ प्राप्त झाला?

(A) अब्दुलरजाक गुरनाह ✅✅
(B) क्लाऊस हॅसलमन
(C) स्युकुरो मनाबे
(D) जॉर्जियो पॅरीसी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीची पारादीप बंदर न्यास याचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली?

(A) नंदीश शुक्ला
(B) राजीव जलोटा
(C) रवी एम. परमा
(D) पी. एल. हरनाध ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणता “निसर्ग आणि लोकांसाठी उच्च महत्वाकांक्षी संधि (HAC)” यामध्ये सहभागी होणारा प्रथम BRICS देश ठरला?

(A) दक्षिण आफ्रिका
(B) रशिया
(C) चीन
(D) भारत ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

| General  Knowledge*

● कोणत्या देशाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याचे “नुरी” नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : दक्षिण कोरिया

●  कोणत्या देशाला “नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट” हे शीर्षक असलेल्या अहवालात ‘कंट्री ऑफ कंसर्न’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले?
उत्तर :  भारत, हैती, उत्तर कोरिया

● त्रेचाळीस देशांनी ____ देशाला उईघुर नामक मुस्लिम समुदायासाठी कायदे अंमलबजावणीदरम्यान पूर्ण आदर सुनिश्चित करावे असे आवाहन केले आहे.
उत्तर : चीन

●  कोणत्या संस्थेने रिलायन्स रिटेल या कंपनीसोबतच्या २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय करारावरील अंतरिम स्थगिती उठविण्याची फ्युचर रिटेल या कंपनीची याचिका फेटाळली?
उत्तर : सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर

● भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्याविरोधात याचिका दाखल केली?
उत्तर :  कलम १३१

● कोणत्या व्यक्तीला ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) "सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार"ने सन्मानित केले जाईल?
उत्तर : मार्टिन स्कोर्सेज

● भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चार अखिल भारतीय वित्तीय संस्थांसाठी (AIFI) किमान __ भांडवल प्रस्तावित केले आहे.
उत्तर : ११.५ टक्के

●  कोणत्या चित्रपटाची ‘ऑस्कर २०२२’ पुरस्कारांच्या नामांकन यादीत भारताकडून अधिकृत नोंदणी करण्यात आली?
उत्तर : कुझंगल

भारतातील सर्वात लांब

🌊🇮🇳भारतातील सर्वात लांब🇮🇳🌊

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा )

वन संधारण आणि विकास

वन संधारण आणि विकास
वन हद्दीचे सीमांकन
रोपवाटिका
वन-वणवा प्रतिबंध प्रकल्प
शात्रोक्त वन व्यवस्थापन
मूल्यनिर्धारण घटकांचे बळकटीकरण
पर्यायी वनीकरणासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्प) पद निर्मिती
भूमी अभिलेख कक्षाची निर्मिती
पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनांचे महत्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षातील अपरिमीत वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. यामुळे वातावरणात तापमान वाढ, वातावरणीय बदल, पूर, दुष्काळसदृश परिस्थिती, गारांचा पाऊस अशा अनपेक्षितरीत्या येणाऱ्या समस्यांना आपणाला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणीय समतोलासाठी वनांचे जतन आणि संवर्धन मोठ्या प्रमाणावर करणे ही आज काळाची गरज बनली आहे. यावर उपाय म्हणून वन विभागाने वन संधारण, संवर्धन आणि विकासासाठी काळाची गती ओळखून मोठ्या प्रमाणावर पावले उचलली आहेत. १ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८३ लाख वृक्ष लावले तर ते जगविण्यासाठी कष्टही घेत आहे. राज्यातील ३३ टक्के क्षेत्र हे वनाच्छादीत करण्यासाठी तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे धोरण शासनाने आखले आहे. हे प्रयत्न निश्चितच आश्वासक आहेत. त्यामुळे या उपक्रमांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

पर्यावरण आणि पर्यावरणीय समस्या या आज सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे. समाजातील प्रत्येक जाणती व्यक्ती ही मग ती लहान असो व वयोवृद्ध, स्त्री असो वा पुरुष, सर्वच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत असून वनांच्या संवर्धनासाठी आणि विकासाठी प्रयत्नशील आहे. यादृष्टीने राज्य शासनाच्या वनविभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. राज्याच्या वन धोरणाप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलव्याप्त क्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे आहे, मात्र सद्यस्थितीत ते फक्त २१ टक्के आहे.
वन हद्दीचे सीमांकन
शेतकऱ्यांकडून वनक्षेत्रावर शेतीसाठी अतिक्रमण केले जाते. हे थांबविण्यासाठी वन विभागाकडून वन हद्दीचे सर्वेक्षण, वनक्षेत्रात जमावबंदी व सीमांकन करण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. वन विभागाकडून वन हद्दीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी वन जमिनीवर रहोणाऱ्या अतिक्रमणाला मोठा आळा बसेल.
रोपवाटिका
राज्यात असणाऱ्या वनक्षेत्राचा विचार करून ज्या क्षेत्रात वनांची घनता कमी आहे, त्या क्षेत्रात भौगोलिक वातावरणात तग धरू शकणाऱ्या वृक्ष प्रजातींची लागवड करून वनांची घनता वाढविण्यावर भर दिला जात आहे. रोपवन यशस्वी होण्यासाठी रोपे ही सुदृढ व जोमदार वाढणारी लागतात. यासाठी रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सागवान, बांबू आणि इतर प्रजातींची लागवड करण्यासाठी रोपे तयार केली जात आहेत.
वन-वणवा प्रतिबंध प्रकल्प
वनक्षेत्राची हानी ही मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्याने होत असते. वनांचे आग लागून तेथील जैव विविधता संकटात येते. ही बाब लक्षात घेता राज्यामध्ये १९८४ वर्षापासून वन-वणवा प्रतिबंध प्रकल्प सुरु करण्यात आला असून त्यात आधुनिक वन-वणवा तंत्रज्ञान व अवजारांचा वापर करून वणव्यापासून वन वाचवले जाते. सध्या या प्रकल्पाची व्याप्ती चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. पुढील कालावधीत त्याची व्याप्ती राज्यातील इतर वनवृत्तामध्ये, वनक्षेत्रात वाढविण्याचा वनविभागाचा मानस आहे.
शात्रोक्त वन व्यवस्थापन

राज्यातील वनव्यवस्थापन हे शास्त्रोक्तरित्या करण्यासाठी पुणे, नागपूर याठिकाणी दोन विभाग सुरु करण्यात आले आहेत. या दोन विभागांतर्गत ११ विभाग हे नेमून दिलेल्या प्रादेशिक वन विभागाच्या कामांचे नियोजन तयार करतात. आता पारंपरिक पद्धतीत बदल झाला असून सुदूर संवेदन शास्त्राचा वापर व सॅटेलाईट इमेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून वृक्ष घनतेचे वर्गीकरण केले जात आहे. यासाठी भारतीय वन व सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या नकाशांचा आधार घेतला जातो.
मूल्यनिर्धारण घटकांचे बळकटीकरण
वन प्रशासनाचे काम हे अधिक चांगले व्हावे, कार्यक्षमतेत वाढ व्हावी म्हणून मूल्यनिर्धारण घटकांचे बळकटीकरण, लेखा व लेखापरीक्षा कक्ष, प्रधान मुख्य वनरक्षक यांच्या कार्यालयात गोपनीय कक्ष, निवृत्ती वेतन कक्ष इत्यादी कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
पर्यायी वनीकरणासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्प) पद निर्मिती
वन(संवर्धन) अधिनियम १९८० च्या अंतर्गत वनक्षेत्रात इतर विकास प्रकल्पासाठी जर जमीन हवी असेल तर त्यासाठी केंद्र शासनाकडे तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवावा लागतो. त्या प्रस्तावाच्या पाठपुराव्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील केंद्रस्थ अधिकारी यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या संघटनेचे बळकटीकरण करून पर्यायी वनीकरणासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्प) पद निर्माण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती

महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती


महाराष्ट्राच्या  एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते.
महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्यक्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते.
महाराष्ट्रात दगडी कोळसा, मँगनीज, लोह खनिज, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात.
महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ  इत्यादी जिल्हे येतात.
शिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी ठिकाणी देखील खनिजे आढळतात.
1] लोहखनिज :
भारतातील एकूण लोहखनिजाच्या साठ्यांपैकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात  लोहखनिजाचे साठे प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळतात.

पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड येथील लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत .


चंद्रपूर : चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत.
गडचिरोली : गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात.
गोंदिया : गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्यात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.
सिंधुदुर्ग : या जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकड्यांत दोन किमीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत.
कोल्हापूर : या जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.
2] बॉक्साइट :
बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनिअम निर्मितीसाठी केला जातो.

भारतातील सुमारे २१ टक्के बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे उच्च प्रतीचे आहेत. ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्यांत आढळतात.

कोल्हापूर :  शाहूवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साईटचे साठे आढळतात. येथील बॉक्साईटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनिअम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनिअम कारखान्यात धातुनिर्मितीसाठी होतो.
रायगड : या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने मुरुड, रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.
ठाणे : या जिल्ह्यात सालसेट बेट व तुगार टेकड्यांच्या प्रदेशात बॉक्साईटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांव्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साईटचे साठे आढळतात. बॉक्साईटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.
3]मँगनीज :
भारतातील एकूण मँगनीज साठ्यांपैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनीजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांत आढळतात.

भंडारा : या जिल्ह्यात आढळणारे मँगनीजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.
नागपूर : या जिल्ह्यात मँगनीज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासून पूर्वेस, रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्यात कांद्री, मनसर, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनीजचे साठे आढळतात.
सिंधुदुर्ग : या जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनीजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनीजचे साठे आढळतात.


4]चुनखडी :
बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासून तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर ह्या जिल्ह्यांत आढळतात.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे सर्वांत जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदूरबार, नांदेड इत्यादी ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात वरोरा व राजुरा ङ्मा तालुक्यांत चुनखडीचे साठे आढळतात.
5] डोलोमाईट :
याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलादनिर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो.
डोलोमाईट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर ह्या जिल्ह्यांतही थोडे साठे आढळतात.
भारतातील डोलोमाईटच्या एकूण साठ्यांपैकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो.
6]कायनाईट :
हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिमेंट उद्योग इत्यादी ठिकाणी कायनाईटचा उपयोग होतो.
महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया ह्या जिल्ह्यांत कायनाईटचे साठे आढळतात.
7] मीठ :
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत विशेषत: रायगड, ठाणे, मुंबईलगतच्या भागात मीठ तयार केले जाते.
मिठाचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त रासायनिक उद्योगातही केला जातो.


लोकसंख्या

लोकसंख्या


1 लोकसंख्या एक साधन संपदा
2 लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :
2.1 1)  नैसर्गिक घटक :
2.2 2) आर्थिक घटक :
3 लोकसंख्येची संरचना :
3.1 अ) वय संरचना :
3.2 ब ) साक्षरता :
3.3 क ) लिंग गुणोत्तर :
3.4 लोकसंख्येची घनता :
3.5 लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण
3.6 इ ) स्थलांतर:
3.7 ई ) कुटुंबाचा आकार :
3.8 फ) अनुसूचित जातींची लोकसंख्या :
3.9 भ) अनुसूचित जमातींची लोकसंख्या :
4 महाराष्ट्रातील आदिवासी
4.1 1) भिल्ल :
4.2 2) गोंड :
4.3 3) कातकारी :
4.4 4) कोरकू :
4.5 5)  वारली :

लोकसंख्या

राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना  घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना  ही मालिकेतील 15वी  असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 %  अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.

लोकसंख्या एक साधन संपदा
लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते
महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  इ. स.  2011 च्या जनगणनेनुसार  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
लोकसंख्येची वाढ

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थळ निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. त्यानंतर गेल्या 50 वर्षांमध्ये उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.
दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. 1961 ते 1971 च्या काळात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 27.45% इतका होता. तर भारताचा 24.8% होता. 1981 ते 1991 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धीदर 25.73% इतका होता. यावेळी भारताचा लोकसंख्या वृद्धीदर 23. 85% होता. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग 15.99 % आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 35.94% आहे. मुंबई मध्ये  सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर (-) 7.57% नोंदला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रथमच हा दर ऋणात्मक आहे.
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :
महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण,पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या (9.84%) असून सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग (0.08%) जिल्ह्यात आहे. लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो.

1)  नैसर्गिक घटक :
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.

2) आर्थिक घटक :
मुंबई – पुणे, कोल्हापूर – इचलकरंजी, औरंगाबाद – जालना व नागपूर विभाग या प्रदेशात वाहतूक, उद्योगधंदे, व्यापाऱ यांचा विकास झाल्याने लोकसंख्या दाट आढळते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला असल्यामुळे तसेच पूर्व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असल्याने तेथे जास्त लोकसंख्या आढळते.

लोकसंख्येची संरचना :
लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.

अ) वय संरचना :
लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते. सामान्यपणे 0 ते 14 वयोगट व 60 पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा (परावलंबी) समजला जातो तर 15 ते 59 वयोगट कार्यक्षम समजला जातो.  वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहित असणे आवश्यक असते.

सामान्यपणे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो. इ.स.  2001 च्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 42% तर काम न करणाऱ्यांचे प्रमाण 58% होते. यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे.

जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.

किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वाधिक (23%) असून मुंबई शहरात सर्वात कमी (16.1%) आहे.

युवा लोकसंख्येचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक (20.5%) सिंधुदुर्गमध्ये ते सर्वात कमी (16.5%) आहे.

जनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.

राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.

राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्र
अनुक्रमांक क्षेत्र कुटुंबे पुरुष स्त्रिया
1.एकूण 5.161.163.97
2.ग्रामीण 3.680.762.93
3.नागरी 1.480.401.04
भारत
अनुक्रमांक क्षेत्र कुटुंबे पुरुष स्त्रिया
1.एकूण 49.7613.5236.24
2.ग्रामीण 38.3610.3528.02
3.नागरी 11.403.178.22
ब ) साक्षरता :
साक्षरता हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. महाराष्ट्रात 83% लोक साक्षर असून स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण 67.5% आहे तर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 80.2% आहे, तर मुंबई व मुंबई उपनगर मध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 87% आहे. कारण हा पूर्णपणे नागरी विभाग आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्राच्या सरासरी साक्षरते इतकी आहे तर मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र विभागांमध्ये हे प्रमाण कमी आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांत  आदिवासी जमातींचे प्रमाण जास्त असल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.

राज्यातील साक्षरतेचे प्रमाण 2001 मधील 76.9% पासून 2011  मध्ये 82.3% पर्यंत वाढले आहे. या कालावधीकरिता स्त्री-साक्षरता दरांमधील वाढ (8.9%) आहे. ही पुरुष साक्षरता दरापेक्षा (2.4%) अधिक आहे. स्त्री – पुरुष साक्षरता दरामधील तफावत 2001 मधील 18.9% वरून 2011 मध्ये 12.5% पर्यंत कमी झाली आहे. राज्यातील ग्रामीण व नागरी भागातील साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 77% व  88.7% आहे.  साक्षरता दरातील ग्रामीण- नागरी तफावत देखील 2001 मधील 15.1% वरून 2011 मध्ये 11.7% पर्यंत कमी झाली आहे.

क ) लिंग गुणोत्तर :
एखाद्या लोकसंख्येत स्त्रियांची संख्या दर हजार पुरुषाबरोबर किती अशा स्वरूपात लिंगगुणोत्तर सांगता येते. लिंगगुणोत्तरावरून लोकसंख्येची सामाजिक स्थिती समजते.ज्या लोकसंख्येत स्त्री-पुरुषांना समान दर्जा असतो  तेथे हे प्रमाण हजाराच्या जवळ असते. महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी आहे.

महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांमध्ये लिंग गुणोत्तर 992 वरून 929 वाढलेले आढळते. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यात (1122) आहे. कारण येथून पुरुषांचे व्यवसायानिमित्त स्थलांतर जास्त होते तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर (838) जिल्ह्यात आहे. मुंबईकडे अन्य राज्यांतून व्यवसायानिमित्त पुरुषांचे होणारे स्थलांतर जास्त आहे.

संपूर्ण लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर निर्धारित केले जाते त्याचप्रमाणे अलीकडे 0 ते 6 या वयोगटासाठी देखील बाल लिंग गुणोत्तर काढले. याचा उपयोग व भविष्यकाळातील लोकसंख्येचे अंदाज करण्यासाठी होतो तसेच तो लोकसंख्येच्या एक सामाजिक निकष मानला जातो. महाराष्ट्रात या वयोगटातील लिंग गुणोत्तर 894 इतके आहे. सर्व राज्यातील सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर गडचिरोली (961) जिल्ह्यात आहे. तसेच सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर बीड (807) जिल्ह्यात आहे.

बाल लिंग गुणोत्तर प्रमाण :
राज्यातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण 2001 मधील 913 वरून 19 कमी होऊन 2011 मध्ये 894 झाले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2011 मध्ये हे प्रमाण सर्वात कमी 807 असून वर्ष 2001 ते 2011 या कालावधीमध्ये 86 गुणांची मोठी घसरण नोंदविली आहे. सन 2001 ते 2011 या कालावधीत कोल्हापूर (863), सातारा (895),  सांगली (867) आणि चंद्रपूर (953) जिल्ह्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये किंचित सुधारणा झाली आहे.

तिसरा लिंग गट :
जनगणनेमध्ये इतर या तिसऱ्या लिंग गटाच्या 2011च्या जनगणनेत प्रथम समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये किन्नर लोकसंख्येसह ज्या व्यक्ती इतर गटांमध्ये नोंद करून घेण्यास इच्छुक आहेत. अशांचाही समावेश करण्यात आला आहे. जनगणना 2011 नु सार राष्ट्रीय पातळीतील सुमारे 4.88 लाख व्यक्तींची नोंद या गटांमध्ये करण्यात आली असून त्यापैकी 8.4%  व्यक्ती  राज्यामध्ये आहे. राज्यातील या गटाचा कार्य सहभाग दर 38 असून राष्ट्रीय पातळीवर तो 34 आहे.

लोकसंख्येची घनता :
एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात.

लोकसंख्येची घनता = एकूण लोकसंख्या / एकूण क्षेत्रफळ
महाराष्ट्राची  घनता = 11,23,72,972 / 3,07,713 = 365.18
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून लोकसंख्या 11, 23, 72, 972 इतकी आहे त्यामुळेच राज्याची सरासरी घनता लोकसंख्या घनता 365 इतकी आहे.

लोकसंख्येचे घनतेनुसार वितरण
1)   अतिविरळ घनतेचे प्रदेश: ( 150 पेक्षा कमी लोकसंख्या)
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता अत्यंत विरळ आहे. या जिल्ह्यात वनक्षेत्र जास्त असून आदिवासी लोकांचे अधिक प्रमाण आहे. शेती, वाहतूक व उद्योगांचा विकास न झाल्याने या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता अतिविरळ आहे.

2) विरळ घनतेचे प्रदेश: (151 ते 300 लोकसंख्या )
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो. त्यामुळे धुळे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये विरळ लोकवस्ती आढळते. राज्याच्या पूर्व भागात डोंगराळ  आणि वनांचा प्रदेश असल्याने भंडारा,गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत लोकसंख्या विरळ आढळते तर अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादनातील अनिश्चितता व भटक्या जाती -जमातीचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्या विरळ आढळते.

3) मध्यम घनतेचे प्रदेश: (301 ते 450 लोकसंख्या)
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता मध्यम आढळते या प्रदेशांमधे शेती हा प्रमुख व्यवसाय असून औद्योगिकरणात प्रगती होत आहे.

4) जास्त घनतेचे प्रदेश: (451 ते 600 लोकसंख्या)
यामध्ये नागपूर व कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून वाहतूक मार्गाचे केंद्र आहे तर कोल्हापूर जिल्हा शेती व औद्योगिक उत्पादनात विकसित असल्याने तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे.

5) अति जास्त घनतेचे प्रदेश: ( 601 पेक्षा जास्त लोकसंख्या)
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता दर चौरस  किलोमीटरला 600 पेक्षा जास्त आहे.

मुंबई हे एक नैसर्गिक बंदर, महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञान व वाहतुकीचा विकास झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रदेशांकडे लोकसंख्येचे स्थलांतर झाल्याने लोकसंख्येची घनता अती जास्त आहे.

इ ) स्थलांतर:
स्थलांतर ही प्रक्रिया असून स्थलांतरामुळे व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अल्प काळ किंवा दीर्घ काळासाठी वास्तव्यास जातात. सामान्यपणे नैसर्गिक आपत्ती, व्यवसाय, युद्ध, बदली, शिक्षण, विवाह, पर्यटन इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात.
महाराष्ट्रामध्ये, मोठ्या शहरांमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे तसेच महाराष्ट्रात ग्रामीण भागातून ग्रामीण भागाकडे असे स्थलांतर प्रामुख्याने शेतमजुरांच्या स्थलांतरातून आढळते. जलसिंचित भागाकडे इतर भागातून मजुरांचे स्थलांतर होते. विवाहामुळे स्त्रियांचे स्थलांतर होते. ग्रामीण भागातील समस्यांमुळे रोजगार मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय सुविधांसाठी लोक स्थलांतर करतात.
लोक ज्या भागातून स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या कमी होऊन मनुष्यबळाची कमतरता जाणवते, तर लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता वाढून सामाजिक सेवा सुविधांवर ताण पडतो.
ई ) कुटुंबाचा आकार :
राज्यामध्ये सामान्य कुटुंबाची ज्यात बेघर व संस्थानांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा समावेश नाही.
महाराष्ट्रात कुटुंबसंख्या 2. 43% कोटी असून त्यामध्ये 98. 9% लोकसंख्या आहे.
राज्यातील सामान्य कुटुंबांचा सरासरी आकार अनुक्रमे 4.5 ते 4.7 आहे.
अखिल भारतीय स्तरावर सामान्य कुटुंबात सरासरी आकार 4.8 असून तो अजा व अज प्रवर्गासाठी देखील सारखाच आहे.
फ) अनुसूचित जातींची लोकसंख्या :
जनगणना 2011 नुसार राज्यातील अजा प्रवर्गातील 1.33 कोटी ( एकूण लोकसंख्येच्या 11.8%) आहे. अजा प्रवर्गाच्या लोक संख्येतील (2001 ते 2011 या कालावधीतील) दशवार्षिक वाढ 34.3% आहे.

अजा प्रवर्गाच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2001 मधील 71.9% वरून 2011 मध्ये 76% पर्यंत वाढला आहे.

भ) अनुसूचित जमातींची लोकसंख्या :
जनगणना 2011 नुसार राज्यातील अज प्रवर्गातील लोकसंख्या 1.05 कोटी (एकूण लोकसंख्येच्या 9.4%) आहे.

अज प्रवर्गाच्या लोकसंख्येतील (2001 ते 2011) दशवार्षिक वाढ 22.5% आहे. अज प्रवर्गाच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2001 मधील 55. 2  वरून 2011 मध्ये 65.7% पर्यंत वाढला आहे.

वर्तमान स्थितीतील महाराष्ट्राची लोकसंख्या (महाराष्ट्र आर्थिक पाहणी – 2015 – 16)
क्रमांक जनगणना वर्षे
(दशक)

लोकसंख्या
(कोटीत )

दशवार्षिक वाढ साक्षरता प्रमाण लिंग प्रमाण घनता दर
चौ. किमी

नागरीकरण प्रमाण
1.19613.9623.6%35.1%93612928.2%
2.19715.0427.5%45.8%93016431.2%
3.19816.2824.5%57.2%93720435.0%
4.19917.8925.7%64.9%93425738.7%
5.20019.6922.7%76.9%92231542.4%
6.201111.2415.99%82.3%92936545.2%
महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे दशक1961 – 7127.45%
महाराष्ट्राचे सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे दशक1911-21(-2.91%)
महाराष्ट्राचे 2001- 11 लोकसंख्या वाढीचा दर15.99%
महाराष्ट्रातील लोकसंख्या प्रमाण (भाषेनुसार )
क्रमांक भाषा प्रमाण
1.मराठी 72.21%
2.हिंदी 11.57%
3.उर्दू 7.47%
4.गुजराती 2.51%
5.तेलगू 1.52%
6.कन्नड 1.36%
7.सिंधी 0.77%
8.तामिळ 0.57%
9.मल्याळम 0.44%
10.बंगाली 0.34%
महाराष्ट्राच्या लोकसंख्येची तुलनात्मक माहिती (2011) :
क्रमांक घटक महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा सर्वात लहान जिल्हा
1)क्षेत्रफळ (चौ. किमी) 307713 अहमदनगर – 17034
पुणे – 15637

नाशिक – 15539

मुंबई शहर – 157
मुंबई उपनगर – 446

भंडारा – 3890

2)लोकसंख्या 11.23 कोटी पुणे – 94.26 लाख
मुंबई उपनगर – 93.32 लाख

ठाणे – 88.19 लाख

सिंधुदुर्ग – 8.48 लाख
गडचिरोली – 10.71 लाख

हिंगोली – 11.78 लाख

3)दसवार्षिक वाढ 15.99%ठाणे – 35.94%
पुणे – 30.34%

औरंगाबाद – 27.80%

मुंबई शहर – -7.60%
रत्नागिरी – -4.80%

सिंधुदुर्ग – -2.20%

4)घनता (दर चौ. किमी) 365मुंबई उपनगर – 20980
मुंबई शहर – 19652

ठाणे – 1157

गडचिरोली – 74
सिंधुदुर्ग – 163

चंद्रपूर – 193

5)साक्षरता 82.34%मुंबई उपनगर – 89.90%
मुंबई शहर – 89.20%

नागपूर – 88.40%

नंदुरबार – 64.40%
जालना – 71.50%

धुळे – 72.80%

6)लिंगप्रमाण दर 929रत्नागिरी – 1122
सिंधुदुर्ग – 1036

गोंदिया – 999

मुंबई शहर – 832
ठाणे – 858

मुंबई उपनगर – 860

7)लिंगप्रमाण दर (0 ते 6 वयोगट )894गडचिरोली – 961
गोंदिया – 956

चंद्रपूर – 953

बीड – 807
जळगाव – 842

अहमदनगर – 852

महाराष्ट्रातील आदिवासी
महाराष्ट्रातील पर्वतीय प्रदेश व जंगलाच्या परिसरात प्राचीन आदिम जमातीचे लोक राहतात. सर्वसामान्यपणे त्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते. मानवी समाजात सांस्कृतिक परंपरेच्या  दृष्टिकोनातून त्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. विभिन्न प्रकारच्या नैसर्गिक पर्यावरणात राहत असूनही या लोकांनी आपली संस्कृती व समाज व्यवस्था यांचे जतन केले आहे. भौगोलिक दृष्ट्या एकाकी पडल्यामुळे त्या प्रदेशाबाहेर मानवी विकासापासून ते वंचित झालेले आहे. पुढे महाराष्ट्रातील काही प्रमुख जमातीचे वैशिष्ट्ये दिलेली आहे.

1) भिल्ल :
प्राचीन काळी मध्यपूर्व आशियातून आलेल्या प्रोटो आॅस्ट्राॅलाॅईड लोकांचे भिल्ल हे वंशज होत. काही मानववंशशास्त्रज्ञांच्या मते भिल्ल जमात भारतातील प्राक – द्रविड जमातीपैकी एक असावी, असे मानले जाते. या जमातीची महाराष्ट्रात वस्ती प्रामुख्याने उत्तर सह्याद्री डोंगर रांगा व सातपुडा डोंगर रांगात आढळते. या ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. भिल्ल जमातीचे लोक जंगलात राहून शिकार करतात. हजारो वर्षापासून हा व्यवसाय असल्याने नैसर्गिक पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे.

भिल्ल जमात आजही रानटी अवस्थेत राहतात. ते शरीराने धडधाकट व खुजे असतात. ते  रुंद नाकाचे, काळ्या रंगाचे असून त्यांचे शरीर राकट आहेत. त्यांचे केस द्रविड लोकांप्रमाण लांब असतात. भिल्ल स्त्रिया उजळ रंगाच्या व बांधेसूद असतात. भिल्ल अत्यंत विश्वासाने वागतात. कुठलीही दगाबाजी करत नाहीत. ते अत्यंत धाडसी व शूरवीर असतात.

1857 च्या उठावात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचे प्रमुख व्यवसाय शेती, शिकार, पशुपालन व वन्य पदार्थ जमा करणे इत्यादी आहेत.

2) गोंड :
गोंड ही जमात भारतातील सर्वात मोठी व प्राचीन आदिवासी जमात आहे. महाराष्ट्रात या जमातीचे अस्तित्व पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. द्रविडियन आणि इंडो-आर्यन लोकांच्या दरम्यान असणाऱ्या गुंतागुंतीच्या वांशिक पद्धतीतून या जमातीची निर्मिती झाल्याचे मानले जाते.

गेल्या काही शतकात महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात गोंडांना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. गोंड लोकांची सत्ता ज्या भूमीवर होती तिला गोंडवाना भूमी म्हणत. गोंडराजे एकेकाळी शासक म्हणून होते. गोंड ही आदिवासी जमात इमानदार, शक्तिशाली, सरळ प्रवृत्तीची निर्भय जमात आहे.

या जमातीतील लोकांची शारीरिक वैशिष्ट्ये मध्यम उंची, काळा रंग, चपटा व बसका चेहरा, मध्यम आकाराचे डोळे, निग्रो प्रमाणे बसके, रुंद नाक, दाट काळे व कुरळे केस आहेत.

या जमातीत विवाह वराच्या घरी होतात. विवाहाचे वेळी भोजन, मद्यपान व समूह नृत्य असते. गोंड स्त्रियांना स्वातंत्र्य असते. त्यांच्या विवाहपूर्व संबंधांबाबत आक्षेप घेतला जात नाही. गोंडांची युवागृहे विशेष प्रसिद्ध आहे त्यांनाच गोटुल म्हणतात. गोटुल मध्ये रात्री गोड तरुण-तरुणी एकत्र जमतात. त्यातून त्यांचे प्रेम संबंध व लैंगिक संबंधही जूळतात. अशांचेच विवाह करून देतात.

3) कातकारी :
काथोडी या नावाने ओळखली जाणारी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रहाणारी एक जमात आहे. सह्याद्रीत रायगड, ठाणे, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत डोंगराळ व उंच पठाराच्या प्रदेशात वसाहत करून राहत. गावापासून दूर नदीकाठी अगर डोंगरकपारीत  त्यांची वसाहत असते. म्हणून ही खरीखुरी अरण्यवासी जमात आहे.

एका कातवाडीत 15 ते 50 झोपड्या असतात. शिकार करणे, कोळसा पाडणे, कंदमुळे व वाळलेली लाकडे गोळा करून खेडोपाडी विकणे, गोड्या पाण्यात मासेमारी करणे, शेतावर मोलमजुरी करणे इत्यादींची त्यांची व्यवसाय आहे. हे लोक निष्णात शिकारी असून तिरंदाजीतील त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे ते शिकारीसाठी धनुष्याचा वापर करतात.

कातकरी हा वर्णाने काळा, मध्यम उंचीचा, पिंगट काळ्या व विरळ केसांचा सरळ, उंच व किंचित पुढे आलेल्या कपाळाचा,  दबलेल्या अशा सरळ नाकाचा, रुंद तोंडाचा, लहान हनुवटीचा, सडपातळ पण रेखीव असा असतो. तो अत्यंत बळकट व चिवट पण तेवढाच आळशी असतो. स्त्रिया उंच व सडपातळ असतात.

या जमातीतील पुरुष अंगात बंडी, कमरेला लंगोटी व डोक्याला फटकूर असा सर्वसाधारण वेश असतो, तर स्त्रिया आखूड लुगडी व चोळी घालतात. काचमण्याच्या माळा, पोथी,  बांगड्या व कर्णफुल घालण्याची त्यांना आवड असते.

कातकऱ्यांची भाषा मुळात भिल्ली भाषा आहे. ही जमात महाराष्ट्रात अनेक शतकापासून राहत असल्याने ती मराठीच्या वळणावर गेली आहे.

4) कोरकू :
ही जमात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतात आढळते महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील गाविलगड डोंगराच्या मेळघाट परदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. कोरू याचा अर्थ माणूस कोरकू याचा अर्थ माणसे असा होतो. कोरकू जमात कोल उर्फ मुंडा मानव वंशाचे एक शाखा समजतात.

लढवय्या पणा बदल व कोरकू स्त्री लुटमारी करण्याबद्दल ख्याती आहे.

कोरकूंच्या लग्नात बोरीच्या झाडाचे महत्व फार आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरदेव व त्याचे आई-वडील बोरीच्या झाडाजवळ जातात. पुजारी त्यांना दोरीने झाडाला गुंडाळतात. नंतर एक कोंबडा मारून त्याचे रक्त झाडाच्या मुळाशी शिंपडतात व त्या झाडाभोवती सात फेरे घेतले जातात व अशाप्रकारे विवाह होतो.

5)  वारली :
महाराष्ट्रात या जमातीचे प्रमुख वस्ती ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. वरुड या शब्दावरून वरुडाई   – वारली – वारूली अशी शब्दाची उत्पत्ती झाली. वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटाने वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात.  शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. झोपडीच्या परिसरात पालेभाज्या, सुरण, अळू, मका, भोपळा, मिरची यादी फळ भाज्या लावल्या जातात.

वारली जमातीचे वर्ण उजळ, मोठे नाक, पिंगट तपकिरी डोळे, काटक देहयष्टी व मध्यम उंची ही वारले यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये आहे. पुरुष शेंडी ठेवतात आणि कुडते व लंगोटी लावतात. लुगडे कमरेला 3 वेढे  देऊन गुडघ्यापर्यंत नेसतात आणि गाठीची चोळी घालतात.

क्रमांकविभागआदिवासी जमाती
1.सह्याद्री विभाग
(ठाणे, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, पालघर)

महादेव कोळी, कोकण, ठाकर, वारली, कातकरी, मल्हार कोळी, ढोर कोळी
2.सातपुडा विभाग
(धुळे, जळगाव, नंदुरबार, अमरावती)

भिल्ल, गावित, पारधी, धानका, पावरा, हुबळा, कोलम, तडवी, कोरकू, माबची, ढानका, गोंड
3.गोंडवन विभाग
(भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड)

गोंड, पराधन, कोया, माडिया गोंड, आंध, हलबा, करवा
महाराष्ट्र : अनुसूचित जमाती
क्रमांक जिल्हे जमाती
1)रायगड ठाकर, वारली, कातकरी
2)पालघर व ठाणे वारली, पारधी, महादेव कोळी, ठाकर
3)पुणे कातकरी, ठाकर, महादेव कोळी
4)अहमदनगर कातकरी, ठाकर, महादेव कोळी, वारली
5)नाशिक कातकरी, ठाकर, महादेव कोळी, वारली, पारधी
6)धुळे गोमीन, भिल्ल, पारधी, कोलम
7)नंदुरबार गोमीन, भिल्ल, पारधी, पावरा, कोलम
8)जळगाव भिल्ल, पावरा, कोलम
9)अमरावती कोरकू, ढानका, गोंड, कोलम
10)यवतमाळ शेरारी, पराधन, आंध
11)नांदेड आंध, गोंड
12)चंद्रपूर गोंड, कोया, हलबा
13)गडचिरोली माडिया गोंड, कोया, हळबा गोंड