04 May 2022

महाराष्ट्रातील समाजसुधारक – राजर्षि शाहू महाराज

राजर्षि शाहू महाराज

जन्म – 16 जुलै 1874.
मृत्यू – 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल----

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

1917 – विधवा विवाहाचा कायदा.

1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन..

1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे
ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे :------

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.

राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.

कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या,
हा संदेश. He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.
शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.
टीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.

संख्या व संख्याचे प्रकार

संख्या व संख्याचे प्रकार –Number

मुख्य प्रकार ------------------

नैसर्गिक संख्या Natural Numbers –

----------1,2,3,4,5,6,…..या क्रमाने येणार्‍या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात. यालाच क्रमवार संख्याही म्हणतात. यामध्ये 0 ही संख्या येत नाही म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही..


पूर्ण संख्या Whole Numbers : --------

नैसर्गिक संख्या संख्या 0 पकडून {0, 1, 2, 3, …} इ. कोणताही अपूर्णांक किंवा दशांश भाग या मध्ये येत नाही. आणि (-)नकारात्मक संख्या नाही.

पूर्णांक संख्या Integers :------------

पूर्णांक पूर्ण संख्यांसारखे असतात परंतु त्यामध्ये नकारात्मक संख्या देखील समाविष्ट असतात. {… , ⁻2, ⁻1, 0, 1, 2, …}
परिमेय संख्या Rational Numbers: [p/q – a≠0] p या पूर्णांकांला q या शुन्येत पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या. सर्व धन व ऋण पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेद शुन्येतर आहे. अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात.

अपरिमेय संख्या –-------------

Infinite Numbers – ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या होत. उदा.- √(३ ) , √(२ ) इत्यादी या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही.

पूर्ण संख्याचे प्रकार -----------------

A. समसंख्या – EVEN NUMBER :· ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला सम संख्या म्हणतात. उदा .2, 8, 10

B. विषमसंख्या –--------------ODD NUMBER:· ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला विषमसंख्या म्हणतात. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात.

संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम – --RULES:

1. सम संख्या + सम संख्या = सम संख्या
2. सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
3. विषम संख्या – विषम संख्या = सम संख्या
4. सम संख्या x सम संख्या = सम संख्या
5. विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या
6. सम संख्या – सम संख्या = सम संख्या
7. सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या
8. विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
9. सम संख्या x विषम संख्या = सम संख्या

C. मूळ संख्या – PRIME NUMBER:.------------
ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.

उदा. 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी. (फक्त 2 ही समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी सर्व मूळसंख्या ह्या विषम संख्या आहेत) 1 ते 100 संख्यांचा दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या खाली दिल्या आहेत. उदा. 3-5, 5-7, 11-13, 17-19, 29-31, 41-43, 59-61, 71-73.

D. जोडमुळ संख्या :·---_------
ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत.

E. संयुक्त संख्या –------------
-COMPOSITE NUMBER: मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदा. 4,6,8,9,12 इ.

स्पर्धा परीक्षे मध्ये  विचारलेले सरासरी  प्रश्न :

1. 9587 – ?= 7429 – 4358.

समजा 9587 – x=7429 – 4358

तर 9587 – x =3071

उत्तर x=9587-3071= 6516.

भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या ‘मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट‘ कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले.

सतत पडणार्‍या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक खास ‘दुष्काळ समिती‘ नेमली होती. याच समितीच्या शिफारशीन्वये 1883 मध्ये ‘दुष्काळ संहिता‘ तयार करण्यात आली.

लॉर्ड लिटनने इ.स. 1877 मध्ये दिल्ली येथे दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला ‘भारताची सम्राज्ञी‘ किंवा ‘कैसर-ए-हिंद‘ हा किताब दिला.

लॉर्ड लिटनने मार्च 1878 मध्ये ‘व्हरनेक्यूलर प्रेस अॅक्ट‘ (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली.

भारतीयांनी वरील कायद्याची ‘मुस्कटदाबी कायदा‘ (The Gagging Act) अशी संभावना केली.
1879 मध्ये लॉर्ड लिटनने ‘स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट‘ पास करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले.

लॉर्ड लिटनने अलिगड येथे स्थापन झालेल्या मुस्लिम विद्यापीठास प्रोत्साहन दिले.

लॉर्ड रिपन या उदारमतवादी व्हाईसरॉयची नियुक्ती लॉर्ड लिटननंतर झाली.

इ.स. 1881 मध्ये लॉर्ड रिपनने इंग्लंडप्रमाणे भारतात ‘फॅक्टरी अॅक्ट‘ पास केला.

लॉर्ड लिटनने केलेला देशीवृत्तपत्रबंदी कायदा लॉर्ड रिपनने 19 जाने. 1881 रोजी रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले.

इ.स. 1854 मध्ये ‘वुड समितीने‘ केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पाहण्यासाठी लॉर्ड रिपनने 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ‘हंटर समिती’ नेमली.

लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक ठराव पास केला. त्यामुळे त्यास ‘स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक‘ असे म्हटले जाते.

‘इलबर्ट बिल‘ पास करून रिपनने मोठेच धाडस केले परंतु युरोपियनांच्या सामुहिक प्रतिकारामुळे ते अस्तित्वात येऊ शकले नाही.

लॉर्ड डफरिनच्या कारकिरर्दितील महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.
लॉर्ड डफरिनच्या काळात लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 मध्ये करण्यात आली.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते.

नेहरूजी यांना लहान मुलं खूप आवडत म्हणून त्यांना लहान मुलं नेहरूचाचा म्हणून ओळखायचे.

त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असलेले व्यक्तिमत्व, त्याचं नाव आजही देशाच्या राजकारणात नेहमी घेतलं जात. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.

1 जन्म

2 शिक्षण

3 जीवन

4 राजकीय जीवन प्रवास

5 पंडित नेहरू यांचे कार्य

6 1935 चा कायदा

7 भारत छोडो आंदोलन

8 मृत्यू

जन्म ------------------
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर, 1889 रोजी झाला. पंडित नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूप राणी असे होते. यांना दोन बहिणी होत्या.

एक विजयालक्ष्मी आणि दुसरी कृष्णा पंडित असे त्यांची नावे होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे एक महान दृष्टी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणा बौद्धिक शक्ती आणि देशप्रेम असलेले व्यक्ती होते.

शिक्षण -------------------

नेहरूजीं यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिक्षकांकडून झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला.

या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये परत भारतात आल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात सहभागी झाले. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी परकीय जुलुमी राजवटीखाली देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला.

जीवन ---------------

पंडित नेहरू यांच्या वयाच्या 15 व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे शिक्षणाकरता राहिले. त्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला.

1917 साली त्यांना इंदिरा प्रियदर्शनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचा 1931 साली मृत्यू झाला व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे 28 फेब्रुवारी, 1936 रोजी निधन झाले. पंडित नेहरू यांचे जीवन साधे आणि जगापेक्षा वेगळे होते.

काही लोक कदाचित त्याचे औचित्य सिद्ध करू शकत नाही. पण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्रिमूर्ती भवनात राहत असेल, तेव्हा त्यांचे आयुष्य अगदी साधेपणाने जगले.

उन्हाळ्यात जेव्हा ते किशोर मूर्ती भवनात जेवणासाठी येत असेत, तेव्हा विश्रांतीसाठी ते इमारतीतल्या सोफ्यावर बसायचे त्या इमारतीत एयर कंडीशनर बसविण्यात आले होते;

परंतु तेथे येणाऱ्या अतिथीसाठी चालवले गेले. रात्रीचे जेवण झाल्यावर पंडित नेहरू त्यांच्या खोलीत जात असत. तिथे फक्त एक छत पंखा आणि एक टेबल फॅन असायचा, तो टेबल फॅन इतका आवाज करायचा की, त्याचा आवाज आजूबाजूच्या खोल्यांमध्ये पोहोचायचा.

राजकीय जीवन प्रवास --------------

विदेशात शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर पंडित नेहरू महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाले व 1912 मध्ये भारतात त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू 1912 मध्ये झालेल्या बंकिपुर काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित होते.

1919 मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादच्या अध्यक्ष सुद्धा बनले होते. 1916 मध्ये ते प्रथमच महात्मा गांधी यांना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. 1920 सली त्यांनी उत्तर प्रदेशाच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला.

1920-1922 दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. 1923 मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले. 1916 मध्ये त्यांनी इटली, स्विझरलँड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया या देशांचा दौरा केला.

1928 मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करतांना त्यांना लाठी हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय कॉंग्रेस सभेला ते उपस्थित होते.

1928 मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. 1929 पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले व संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय असे त्यांनी तिथेच निश्चित केले. दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहामुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला.

14 फेब्रुवारी, 1935 रोजी त्यांनी उत्तर खंडामधील अल्मोडा तुरूंगामध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. 7 ऑगस्ट, 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ‘भारत छोडो’ ही क्रांतिकारी घोषणा केली. पुढच्या दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले, ही त्यांची सर्वात शेवटची ठरली.

पंडित नेहरूंनी नऊ वेळा कारावास भोगला. 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. 1940 मध्ये आग्नेय आशियाला जाऊन आले. त्यानंतर 6 जुलै, 1924 रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

पंडित नेहरू यांचे कार्य -----------------

पंडित नेहरू हे 1916 मध्ये महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून प्रेरित होऊन जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले. ते खादीचा वापर करू लागले.

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहीला.

अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिका याबद्दल त्यांना 1955 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.

जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी नियोजन आयोग स्थापन केला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहित केले आणि सलग तीन पंचवार्षिक योजना सुरू केल्या. त्यांच्या धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले.

भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विकासामध्ये नेहरूंची मोठी भूमिका होती. जवाहरलाल नेहरूंनी टिटो आणि नासेर यांच्यासोबत आशिया आणि आफ्रिकेत वसाहतवादाच्या निर्मूलनासाठी एकत्रितरित्या चळवळ उभी केली.

1935 चा कायदा -------------------

जेव्हा ब्रिटीश सरकारने 1935 अधिनियमचा कायदा लागू केला तेव्हा कॉग्रेस पक्षाने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला.

नेहरू निवडणुकीपासून दूर राहिले परंतु त्यांनी पक्षासाठी देशभर जोरदार प्रचार केला. कॉग्रेसने जवळजवळ प्रत्येक प्रांतात सरकारे स्थापन केली आणि मध्यवर्ती विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकल्या.

नेहरू कॉग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले आणि गांधीजीनंतर राष्ट्रवादी चळवळीतील ते दुसरे मोठे नेते झाले.

भारत छोडो आंदोलन ----------_--

1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलना-दरम्यान त्यांना अटकही झाली होती आणि 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती. 1947 मध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या विभाजन आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ब्रिटीश सरकारशी झालेल्या वाटाघाटीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

1947 मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पाकिस्तानसह नवीन सीमेवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि दंगली, सुमारे 500 राज्ये भारतीय संघटनेत एकत्रित करणे, नवीन राज्यघटना तयार करणे, संसदीय लोकशाहीसाठी राजकीय व प्रशासकीय चौकट स्थापणे यासारख्या भयंकर आव्हानांना त्यांनी प्रभावीपणे सामना केला.

जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी नियोजन आयोग स्थापन केला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहित केले. त्यांच्या धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विकासामध्ये नेहरूंची मोठी भूमिका होती. जवाहरलाल नेहरूंनी टिटो आणि नासेर यांच्या सोबत आशिया आणि आफ्रिकेत वसाहतवादाच्या निर्मूलनासाठी एकत्रितरित्या चळवळ उभी केली.

कोरियन युद्ध संपविणे, सुएझ कालव्यावरील वाद मिटविणे आणि कॉंगो करारासाठी भारताच्या सेवा आणि आंतरराष्ट्रीय पोलिसिंग यासारख्या इतर आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करण्यात त्यांनी मध्यस्थ म्हणून काम केले.

पश्चिम बर्लिन, ऑस्ट्रिया आणि लाओस यासारख्या अन्य महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पडद्यामागील महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मृत्यू ---------------

पंडित जवारलाल नेहरू यांचे निधन 27 मे 1964 रोजी झाले. त्यांची समाधी स्थळ हे दिल्लीतील शांतीवन येथे आहे.

इंदिरा गांधी हा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या व आजपर्यंत भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान.

इंदिरा गांधी हा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या व आजपर्यंत भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान.

| इंदिरा गांधी

1.1 जन्म व बालपण

1.2 शिक्षण

1.3 वैयक्तिक जीवन

1.4 राजनैतिक जीवन

1.5 पंतप्रधान

1.6 भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

1.7 मृत्यू

इंदिरा गांधी ----------

इंदिरा गांधींना आतापर्यंत सर्वात बलवान पंतप्रधान मानले गेले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खूप धैर्यवान व ग्रेट होते. त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जात असे. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.

जन्मबालपण ---------

इंदिरा गांधी यांचा जन्म 17 नोव्हेंबर, 1917 रोजी अलाहाबाद येथे कश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा होते. इंदिरा या जवाहरलाल नेहरू यांची कन्या रत्न होती. त्यांच्या आईचे नाव कमला नेहरू असे होते. त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरू हे व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते.

राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. इंदिरा गांधीचे लहानपण अलाबादमधील आनंद भवन येथे गेले. इंदिरा गांधीच्या लहानपणी तिचे वडील बहुतेक वेळेस राजकीय कारणांमुळे दूर किंवा तुरुंगात असतात. त्यामुळे शक्यतो वडिलांशी पत्राद्वारे मर्यादित संपर्क होता. आई आजारी होती. त्यांच्या आईचा क्षय रोगाने मृत्यू झाला होता.

शिक्षण ---------

इंदिरा गांधीचे मुख्यतः शिक्षण घरीच झाले. 1934 मध्ये मॅट्रिक परीक्षेसाठी त्या अधून मधून शाळेत जात असत. त्यांचे शिक्षण विविध शाळा आणि संस्थांमध्ये झाले. दिल्लीचे मॉडल स्कूल सेंट सिसिलिया अहमदाबादमधील सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हॅट स्कूल आणि जिनिव्हा इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत मुलाखतीत त्यांनी इंदिराचे नाव प्रियदर्शनी असे ठेवले.

सर्वांकडे प्रेमाने पाहणारी असा प्रियदर्शनी नावाचा अर्थ होता होतो. पुढे त्या इंदिरा प्रियदर्शनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. वर्षभराने त्यांनी युनिव्हर्सिटी सोडली आणि आजारी आईची काळजी घेण्यासाठी युरोपमध्ये गेल्या. तिथे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेतला.

1937 मध्ये आईच्या निधनानंतर त्यांनी कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास सुरू केला असताना, इंदिरा नेहमी आजारी पडत आणि आजारातून बरे होण्यासाठी त्या इंग्लंडला जात असत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत होता. 1940 मध्ये त्या स्विझरलँडमध्ये असताना, जर्मन आर्मीने तेथे हल्ला केला होता. इंदिरा गांधीजींनी परत येण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वाटेत पोर्तुगालमध्ये दोन महिन्यांसाठी अडकून पडल्या होत्या. त्या 1941 ला इंग्लंडमध्ये परतल्या आणि तिथून आपले शिक्षण अपूर्ण सोडून भारतामध्ये परतल्या.

वैयक्तिक जीवन ----
इंग्लंडमध्ये असताना त्यांचे भविष्यात होणारे पती फिरोज गांधी यांच्याशी त्यांची भेट होत असे. फिरोज गांधी हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते. फिरोज गांधी गुजरातमधील पारसी परिवारातून होते. इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये, म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा आपल्या मतावर ठाम होत्या व त्यांनी मार्च 1942 मध्ये विवाह केला. फिरोज गांधी सुद्धा राजकारणात सक्रिय होते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा सदस्य होते.

1942 च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला व दरम्यानच्या काळात फिरोज गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला व 1960 मध्ये फिरोज गांधी यांचा मृत्यू झाला.

राजनैतिक जीवन -------

इंदिरा गांधी यांनी 1930 साली ‘वानर सेना’ नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1955 मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी 1959 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या 1964 साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या.

लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे 1966 मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने 186 मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या 24 जानेवारी, 1966 रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. 14 प्रमुख व्यापारी बॅकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.

पंतप्रधान-------
इंदिरा गांधी प्रधानमंत्री बनल्या आणि मोरारजी देसाई उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बनले. पंतप्रधान पदाच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच इंदिरा गांधीना खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना गुंगी गुडिया संबोधत प्रसार माध्यमे आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली गेली.

1971 च्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधींची सर्वात मोठे यश म्हणजे डिसेंबर 1971 मध्ये पाकिस्तान वर युद्धात मिळवलेला विजय. या निर्नायक विजयानंतर स्वतंत्र बांगलादेशची स्थापना झाली. त्यावेळी विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना दुर्गा देवी असे संबोधले. पाकिस्तानवरील या विजयामुळे इंदिरा गांधीचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांना पुढे ‘आयर्न लेडी ऑफ इंडिया’ हि म्हटले गेले.

पाकिस्तान विरुद्ध विजय मिळाला असला तरी काँग्रेस सरकारला या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जसे की दुष्काळ, तेल संकट, वाढती महागाई इत्यादी. 1973 ते 75 दरम्यान इंदिरा गांधींची लोकप्रियता घटली आणि त्यांना बिहार व गुजरात राज्यातून प्रतिकार होऊ लागला. बिहारमध्ये ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण या परिस्थितीच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी निवृत्तीमधून बाहेर पडले.

12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींची 1971 मध्ये झालेल्या लोकसभेची निवडणूक गैरवर्तनाच्या कारणास्तव अमान्य घोषित केली. विरोधकांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत राज नारायण यांनी प्रचारासाठी सरकारी संसाधने वापरल्याचा आरोप केला. गांधींनी सरकारमधील त्यांच्या एका सहकारी अशोक कुमार सेन यांना न्यायालयात आपला बचाव करण्यास सांगितले होते. खटल्याच्या वेळी गांधींनी आपल्या बचावाचा पुरावा दिला.

जवळजवळ चार वर्षानंतर कोर्टाने त्यांना अप्रामाणिक निवडणूक पद्धती, अत्यधिक निवडणूक खर्चासाठी आणि सरकारी यंत्रणा आणि अधिकारी पक्षाच्या उद्देशाने वापरल्याबद्दल दोषी ठरवले. न्यायाधीशांनी मात्र त्यांच्यावर लाचखोरीचे अधिक गंभीर आरोप नाकारले.

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध ------

1971 च्या काळात पाकिस्तानी सैन्याने पूर्व भारतात जनतेवर अत्याचार करण्यात सुरुवात केली होती. शेख मुजीबुर रहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे एक कोटी निर्वासित भारतात आले त्यांचा भार भारतावर पडत होता. तरी पाकिस्तान भारतालाच दुषणे देत होता. यादरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात घेऊन जाळले व 1971 च्या डिसेंबरमध्ये भारताने युद्धाची घोषणा केली.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिले. पण इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. त्यांनी भारतासाठी आपले बलिदान दिले. इंदिरा गांधी यांच्या नावाखाली अनेक जनकल्याण योजना चालवल्या जातात. जसे इंदिरा आवास योजना, इंदिरा पेन्शन योजना ई.

मृत्यू. ---------

1 ऑक्टोबर 1984 रोजी, गांधींच्या दोन अंगरक्षक, सतवंतसिंग आणि बेअंतसिंग यांनी त्यांच्या सफाईरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या बागेत त्यांच्या सेवा शस्त्रास्त्रांनी गोळी झाडल्या. सतवंत व बियंट यांनी विकेट गेटवरून जात असताना शूटिंग केली. बेन्टसिंगने तीन वेळा गोळी झाडल्या आणि सतवंत सिंगने ३० गोळ्या मारल्या. गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सतवंत आणि केहर दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली.

_____________________