Prelims > Click Here
Mains > Click Here
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
2012 >> CLICK HERE >>
2013>> CLICK HERE >>
2014>> CLICK HERE >>
2015>> CLICK HERE >>
2016>> CLICK HERE >>
2017>> CLICK HERE >>
2018>> CLICK HERE >>
2019>> CLICK HERE >>
2020>> CLICK HERE >>
2022>> CLICK HERE >>
➡️ टी. राजा सिंगापूरमधील FATF मिशनचे नेते आहेत.
➡️ सथापना : फायनान्शिअल अक्शन टास्क फोर्स (FATF) FATF ही पॅरिसमधील G7 शिखर परिषदेदरम्यान 1989 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक आंतरशासकीय संस्था आहे.
➡️ मख्य कार्य : हे देशाच्या मनी लाँडरिंग विरोधी आणि दहशतवाद विरोधी वित्तपुरवठा पायाभूत सुविधांची ताकद मोजते. मनी लाँड्रिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि इतर संबंधित धोक्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीच्या अखंडतेसाठी मानके सेट करणे आणि कायदेशीर, नियामक आणि ऑपरेशनल उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.
➡️ तयाचे सचिवालय: पॅरिसमधील आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (OECD) मुख्यालयात आहे.
➡️ सदस्य संख्या :FATF मध्ये सध्या 39 सदस्य आहेत. भारत हा FATF चा सदस्य आहे.
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
(३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
(३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
(३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
(३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
(३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.
(३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
(३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
(३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
(४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
(४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
(४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.
(४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
(४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
(४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.
(४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
(४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
(४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
(४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
(५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६ सप्टेंबर
प्रश्न १) दलित पँथरची स्थापना केव्हा झाली?
१) ९ जुलै १९७२ २) ९ जुलै १९७०
३) ११ डिसेंबर १९७३ ४) ११ एप्रिल १९७०
प्रश्न २) बाल हत्या प्रतिबंधकगृहाच्या स्थापनेचा उत्तर सांगा?
१) मुलींच्या हत्येविरोधात जनजागृती करणे
२) अविवाहित स्त्रिया व विधवा यांना आधार देणे
३) भारतातील महिला शिक्षणाचा प्रसार करणे
४) भ्रूण हत्त्या व बालहत्या प्रथा रोखणे
प्रश्न ३) अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना लोकहितवादी यांनी केली.
ब) लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते
१) अ योग्य २) अ, ब योग्य
३) फक्त ब योग्य ४) दोन्ही चूक
प्रश्न ४) खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते ?
१) जलप्रदूषण २) ध्वनी प्रदुषण
३) मृदा प्रदूषण ४) हवा प्रदूषण
प्रश्न ५) पृथ्वीबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
अ) पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास १२७५६ किलोमीटर आहे.
ब) पृथ्वीची ध्रुवीय व्यासाची लांबी १२७१४ किमी आहे.
१) फक्त अ २) फक्त ब
३) दोन्ही बरोबर ४) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- २, प्रश्न ३ -३, प्रश्न ४- २, प्रश्न ५ -३.
===========================
प्रश्न १) गोपाळ बाबा वलंगकर यांनी कोणती संस्था स्थापन केली?
१) आर्यन दोष परिहार समाज (१८९०) दापोली
२) ब्राह्मो समाज (१९२८) मुंबई
३) सत्यशोधक समाज (१८७३) कोल्हापूर ४) आर्य समाज (१८७५) ठाणे
प्रश्न २) किसन फागुजी बनसोड यांच्या विषयी अयोग्य पर्याय ओळखा?
१) त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला
२) त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी सन्मान बोधक निराप्रीतसमाज समाज स्थापन केली.
३) त्यांनी प्रथम अपृश्यता निवारण परिषद मुंबई येथे भरवली.
४) त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालयाची स्थापना केली.
प्रश्न ३) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी केव्हा केली?
१) १५ ऑगस्ट १९३६ २) १५ ऑगस्ट १९३७
३) २५ ऑगस्ट १९३३ ४) ३६ जाने. १९३०
प्रश्न ४) भारतातील पूर्वेकडील पर्यटन स्थळे कोणती आहेत?
अ) इटानगर. ब) काजिरंगा
क) तवांग. ड) इफाळ
१) अ,ब, क २) ब, क, ड
३) अ, क, ड ४) वरील सर्व
प्रश्न ५) प्रदूषणामुळे पुढील कोणत्या घटकाची गुणवत्ता कमी होते?
अ) खडक ब) हवा
क) मृदा ड) पाणी
१) अ, ब, क २) ब, क
३) अ, ब ४) वरील सर्व
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================
प्रश्न १) गांधींजींच्या प्रारंभीच्या जीवन कार्यकाळात कोणत्या आंदोलनाचा समावेश होता?
अ) चंपारण्य सत्याग्रह.
ब) खेडा सत्याग्रह
क) मुळशी सत्याग्रह.
ड) अहमदाबाद आंदोलन
१) अ,ब, ड. २) अ, क, ड
३) फक्त अ व ब ४) अ, ब, क, ड
प्रश्न २) ब्रिटिशांनी भारतात....युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली?
१) बक्सार २) वादीवांस
३) प्लासी. ४) श्रीरंगपट्टनम
प्रश्न ३) पहिले फॅक्टरी कमीशन......यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते.
१) मोरारजी गोकुळदास
२) दिनशा पेटीट
३) अबुर्थ नॉट
४) अलम ह्युम
प्रश्न ४) जगनाथपूरी हे भव्यमंदिर.....राज्यात आहे?
१) छत्तीसगड २) ओरिसा
३) झारखंड ४) बिहार
प्रश्न ५) सात बेटांच्या दरम्यान असलेल्या समुद्र बुजवून कोणत्या शहराची भूमी तयार केली आहे?
१) सुरत २) कन्याकुमारी
३) मुंबई ४) विशाखाट्टणम
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -३, प्रश्न ४- २, प्रश्न ५ -३.
==========================
प्रश्न १) खालीलपैकी कोणाला क्रांती कार्याचे जनक म्हणतात?
१) विष्णुबुवा ब्रह्मचारी
२) वासुदेव बळवंत फडके
३) चाफेकर बंधू
४) अनंत कान्हेरे
प्रश्न २) जपानमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणी घेतले?
१) के डी कुलकर्णी
२) दादासाहेब खापर्डे
३) काकासाहेब खाडिलकर
४) गोविंद पोतदार
प्रश्न ३) पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे?
१) स्वामी दयानंद २) लोकमान्य टिळक
३) महात्मा फुले ४) सेनापती बापट
प्रश्न ४) तेलंगणातील वरंगळ येथे खालील पैकी कोणते उद्योग आढळतात
अ) कापड उद्योग. ब) साखर उद्योग
क) लोह,पोलाद उद्योग. ड) सिमेंट उद्योग
१) अ आणि ड २) क आणि ड
३) अ, ब, क ४) फक्त अ
प्रश्न ५) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तेलशुद्धीकरण उद्योग नाहीत?
१) हाजिर २) तुर्भे
३) चंद्रपूर ४) बैरोनी
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -२, प्रश्न २- ४, प्रश्न ३ -४, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================
प्रश्न १) बाल विवाह रोखण्यासाठी संमती वयाचे विधेयक मांडणारे समाजसुधारक कोण आहेत?
१) बेहरामजी मलबारी
२) गो. ग.आगरकर
३) वासुदेव गणेश जोशी
४) विष्णुशास्त्री पंडित
प्रश्न २) बेहरामजी मलबारी हे या समाजाचे होते.
१) सिंधी २) पारशी
३) मारवाडी ४) मुस्लिम
प्रश्न ३) भारतीय शेतकऱ्यांची दैन्यस्थितीचे वर्णन शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात कोणी केले?
१) न्यायमूर्ती रानडे २) जगन्नाथ शंकशेठ
३) लोकहितवादी ४) म.ज्योतिबा फुले
प्रश्न ४) पश्चिम घटामध्ये उगम पावून अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या कोणत्या?
अ) उल्हास, सावित्री, वाशिष्ठी
ब) तेरेखेल, मांडवी, पेरियार
१) फक्त अ २) फक्त ब
३) अ व ब ४) यापैकी नाही
प्रश्न ५) माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेटे..... नदी पात्रत आहे?
१) कोसी २) गंडक
३) ब्रह्मपुत्रा ४) गंगा
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- २, प्रश्न ३ -४, प्रश्न ४- ३, प्रश्न ५ -३.
=======================
════════════════════
प्रश्न १) टिपू सुलतान व इंग्रज यांच्यात झालेला कोणत्या लढाईमध्ये टिपू सुलतान धारातीर्थी पडला?
१) श्रीरंगपट्टनम १८९९
२) विरंगपट्टनम १७९७
३) श्रीरंगपट्टनम १७९९
४) श्रीरंगपट्टनम १७९०
प्रश्न २) बिहारमधील कोणाचा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा राबव्यावा लागल्या?
१) जमीनदारांचा उठाव २) शेतकऱ्यांचा उठाव
३) भिल्लांचा उठाव ४) संथाळांचा उठाव
प्रश्न ३) 'कर्नाटक युद्ध' कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले?
१) इंग्रज-फ्रेंच २) इंग्रज-पोर्तुगीज
३) फ्रेंस - डच ४) डच - इंग्रज
प्रश्न ४) पृथ्वी गोलाकार आहे याबाबतची योग्य निरीक्षणे ओळखा?
अ) कृत्रीम उपग्रह व अवकाश यान यांनी घेतलेले छायाचित्र
ब) समुद्र मार्गाचा प्रवास
क) चंद्रग्रहणाचा वेळ अर्ध्या किंवा चतकोर वर्तुळासारखी सावली दिसते
१) अ, ब, क २) अ,ब
३) अ, क ४) ब, क
प्रश्न ५) विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील फरक किती किमी चा आहे.?
१) ४२ २) ३६
३) ५६ ४) १२
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -३, प्रश्न २- ४, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- १, प्रश्न ५ -१.
===========================
◾️उदा.
एका परिक्षेत 30% विधार्थी गणितात नापास झाले. 20% विधार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विधार्थी दोन्ही विषयांत नापास झाले, तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विधार्थी उत्तीर्ण झाले?
1. 40%
2. 30%
3. 70%
4. 60%
उत्तर : 60%
क्लृप्ती :-
परिक्षेत नापास झालेल्यांची टक्केवारी = (गणितात नापास) + (इंग्रजीत नापास) - (दोन्हीविषयांत नापास)
केवळ गणितात नापास विधार्थी %=30-10=20% 30% + 20% - 10 = 40%
इंग्रजीत नापास विधार्थी %=20-10=10%
दोन्ही विषयात मिळून नापास %=10% गणित नापास → (30%)
:: परिक्षेत नापास विधार्थ्यांची टक्केवारी = 40% इंग्रजी नापास → (10%)
:: उत्तीर्ण विधार्थ्यांची टक्केवारी = 60% दोन्ही विषयात नापास → (20%)
◾️उदा.
150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?
1. 96
2. 54
3. 90
4. 30
उत्तर : 96
स्पष्टीकरण :
150 चे 60% = 90 90 चे 60% = 54
:: 150-54 = 96
◾️उदा.
एका परिक्षेत 70% विधार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विधार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विधार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विधार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेस एकूण किती विधार्थी बसले होते?
1. 7500
2. 5000
3. 6000
4. 8000
उत्तर : 5000
स्पष्टीकरण :-
इंग्रजी गणित दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण परिक्षेत एकूण अनुत्तीर्ण विधार्थी %=
उत्तीर्ण 70% 65% 25% 30+35-25 = 40%
अनुउत्तीर्ण 30% 35%
:: परिक्षेत एकूण अनुउत्तीर्ण विधार्थी = 40%
:: उत्तीर्ण विधार्थी = 100-40 = 60%
:: 60% विधार्थी = 3000
:: एकूण विधार्थी = 3000×100/60 = 5000
◾️उदा.
एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% ने वाढते, तर 3 वर्षांनंतर ती किती होईल ?
1] 15,297
2] 15,792
3] 15,972
4] 15,927
उत्तर : 15,972
वर्ष (n) मुद्दल (P) दर (R) व्याज (I) रास (A)
1} 12,000 10% 1200 13,200
2} 13,200 10% 1320 14,500
3} 14,500 10% 1452 15,972 15,927
सूत्र :-
A=P×(1+r/100)n :: A=12,000×(11/10)3
= 12,000×1331/1000=1331×12=15,972
नमूना अकरावा –
◾️उदा.
एका गावची लोकसंख्या 3,630 आहे, ती दर 10 वर्षानी 10% ने वाढते; तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?
1] 2,500
2] 3,000
3] 3,300
4] 2,904
उत्तर : 3,000
क्लृप्ती :-
P= A/(1×r/100)n ∷ P= 3630/((11/10)2 )=(3630/11)/10×11/10
∷ 3,630×10/11×10/11=3,000
नमूना बारावा -
◾️उदा.
एका खोलीचे भाडे शे. 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनंतर शे. 25 ने वाढविले, तर मूळ भाडयात शेकडा वाढ किती झाली?
1] 20%
2] 45
3] 25%
4] 50%
उत्तर : 50%
स्पष्टीकरण :-
मूळ भाडे 100 मानू 20% वाढ = 120 वर पुन्हा 25% वाढ = 120 ×25/100=30
मूळ भाडयातील वाढ = 20+30 = 50%
नमूना तेरावा –
◾️उदा.
एका पुस्तकाची किंमत शे. 20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला. तर पूर्वीच्या उत्पन्नात शे. कितीने फरक पडला?
1] 20% कमी
2] 25% जास्त
3] 25% कमी
4] फरक नाही
उत्तर : फरक नाही
स्पष्टीकरण :
100 प्रतींची 100 रु. किंमत मानू 100-20=80रु. 100 प्रती = 80 रु.
तर 125 प्रती = 125/100×80/1=100 आताचे उत्पन्न – पूर्वीचे उत्पन्न = फरक
= 100-100 = 0
◾️उदा.
साखरेची किंमत शे. 60 वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
1] 37.5%
2] 60%
3] 40%
4] 20%
उत्तर : 37.5%
सूत्र :
(100×टक्के )/(100+60 )=(100×60 )/(100+60 )=(100×60 )/160=6000/160=37.5%
◾️उदा.
3/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल?
1] 0.6
2] 0.006
3] 0.06
4] 60.0
उत्तर : 0.006
स्पष्टीकरण :
प्रथम व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा व नंतर 100 ने भागा.
अथवा
दोन स्थळांनंतर डावीकडे दशांश चिन्ह धा. 3/5%=0.6/100=0.006
◾️उदा.
7/12 चे 6%=किती ?
1] 0.35
2] 0.035
3] 3.5
4] 0.0035
उत्तर : 0.035
1) संविधान दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 नोव्हेंबर
2) “मिलन 2020” नावाचा बहुपक्षीय नौदल सराव कुठे होणार आहे?
उत्तर : विशाखापट्टनम
3) उत्तरप्रदेश राज्य सरकारने कोणत्या रोगासाठी लसीकरण मोहीम राबवविण्यास सुरुवात केली?
उत्तर : फायलेरिया
4) कोणत्या राज्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी 14400 हा मदत क्रमांक सेवेत चालू केला आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश
5) राष्ट्रीय प्रतिकांचा गैरवापर केल्यास किती दंड ठोठावला जाऊ शकतो?
उत्तर : रु. 500
6) ‘मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?
उत्तर : 12 वा
7) कोणत्या राज्यात रॉकेट लॉन्चिंग पॅड उभारण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे?
उत्तर : तामिळनाडू
8) ‘युवाह’ नावाचा युवा कौशल्य उपक्रम कोणाच्या वतीने राबवण्यास सुरूवात झाली?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)
9) NuGen मोबिलिटी शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : हरयाणा
10) कोणत्या पत्रकाराने या वर्षीचा ‘CPJ आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य पुरस्कार’ जिंकला?
उत्तर : नेहा दिक्षित
1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे
२) बाळासाहेब शिंदे
2) इंग्रजी व्याकरण- १) बाळासाहेब शिंदे
२) एम जे शेख
3) अंकगणित - १) नितीन महाले
२)पंढरीनाथ राणे
4) बुद्धीमत्ता चाचणी- १)जी. किरण
२) सतिष वसे
5) इतिहास - १) ग्रोव्हर, बेल्हेकर
२) जयसिंग पवार
6) भूगोल - १)ए. बी. सवदी
२) खतीब
7) अर्थशास्त्र - १) रंजन कोळंबे
२)किरण देसले
8) राज्यव्यवस्था - १) रंजन कोळंबे
२) किशोर लवटे
9) सामान्य विज्ञान- १) सचिन भस्के
२) रंजन कोळंबे
10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड
१) एकनाथ पाटील
२) प्रकाश गायकवाड
वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.
तर लागा तयारीला... All The Best
मित्रांनो, आपण पाहत असतो की जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यानांच सर्व मान -सन्मान, प्रसिद्धी, समाजात Status या गोष्टी भेटत असतात.
पण जे अपयशी होतात किंवा लवकर यश येत नाही त्यांचं काय? नक्की त्यांचं चुकत कुठं? ते मागे का राहतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधन्याचा आपण प्रयत्न करू
आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे साधारणतः दोन गट करू शकतो.
1. जुने ( 4-5) वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी..
2. नवीन ( साधारणता 1 वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी)
दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांच नंतर बघू पण पहिल्या गटातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं नक्की काय चुकत ते पाहू.
1) अभ्यासाविषयी आलेली मरगळ / साचलेपणा..
4-5 वर्षांपासून अभ्यास करत असल्यामुळे अभ्यासात थोडीशी मरगळ किंवा Saturation आलेले असते. त्यामुळे अभ्यास होत नाही. पण मित्रांनो मग ऐन परीक्षेच्या वेळी मग अभ्यास होत नाही आणि परीक्षा नापास होतात. पण ज्यावेळी अभ्यासात Saturation यायला लागत तिथूनच खरी तुमच्या अभ्यासाची सुरुवात व्हायला पाहिजेत.
Never Give up चा approach इथं जास्त काम करू शकतो. So consistent राहायला पाहिजे..
2. अभ्यास करून आलेला Overconfidence/ Attitude..
जुन्या मुलांमध्ये याच प्रमाण खूप जास्त आहे. मला सर्व येतंय,मी कोणाला कशाला काय विचारत बसू,माझा खूप अभ्यास झालाय , आता फक्त Exam होऊ दे मग बघतोच असा दृष्टिकोन या मुलांचा असतो तशी नवीन मुले Humble असतात.
आवश्यक व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन ती अभ्यास करतात आणि उत्तीर्णही होतात. त्यामुळेच नवीन मुले उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे..
3. अभ्यासाची अयोग्य दिशा. -
सुरुवातीपासूनच कोणाकडून मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा योग्य अभ्यास्पद्धती माहित नसल्यामुळे दरवर्षी परीक्षेत त्याच - त्या चुका होतात. आणि निकाल मग यायचा तोच येतो. मग Regret करत बसतात की आपण हे तेव्हाच असं करायला पाहिजे होत, योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होत इ. अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर सुरुवातीपासूनच सावध असणं आवश्यक आहे.
जुन्या विद्यार्थ्यांकडून अजूनही अशा चुका होत असतील तर वेळीच सावध व्हा आणि योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करा. जिथून मिळेल तिथून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा.मग पुढचा व्यक्ति तुमच्यापेक्षा भले लहान का असेना.त्याचा सन्मान करा. त्याच्याकडून नवीन काहीतरी शिका.
तर जुन्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर त्यांनी नक्की विचार करा.. आता प्रश्न राहिला नवीन विद्यार्थ्यांचा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच योग्य मार्गावर राहिले, योग्य Direction ने, योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर त्यांच्या वरील चुका होणार नाहीत आणि त्यांचा यशापर्यंतचा प्रवास सुलभ आणि लवकर होईल..
तरी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा आणि आपला योग्य मार्ग निवडवा अन्यथा शेवट वेगळा सांगायला नकॊ.
धन्यवाद 🙏
▪️ शपथग्रहण सोहळा - ३० जून २०२२
▪️ पूर्ण नाव - एकनाथ संभाजी शिंदे
▪️ जन्म - ९ फेब्रुवारी १९६४
▪️ मुळगाव - दरे ( महाबळेश्वर, जि. सातारा)
▪️ शिक्षण - बी. ए. (मराठी & राजकारण)
▪️ विधानसभा मतदारसंघ - कोपरी-पांचपाखाडी
▪️ पत्नीचे नाव - लता एकनाथ शिंदे
▪️ मुलाचे नाव - श्रीकांत एकनाथ शिंदे
▪️ गुरू - आनंद दिघे
▪️ राजकिय पक्ष - शिवसेना
▪️ पालकमंत्री - ठाणे जिल्हा व गडचिरोली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 १९८४ - शिवसेना शाखाप्रमुख म्हणून नियुक्त
🔸 १९८६ - बेल्लारी तुरुंगात ३० दिवस कारावास
🔸 १९९७ - ठाणे महानगरालिकेचे नगरसेवक
🔸 २००४ ते २०१९ सलग चारदा आमदार म्हणून विजयी
🔸 २०१४ - एका महिन्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून कार्य
🔸 २०१५ ते २०१९ - सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री
🔸 २०१९ - सात ते आठ महिने आरोग्य मंत्री म्हणून पदावर.
🔸 २०१९ ते २०२२ - नगरविकास विभागाचे मंत्रीपद
(1) घटकराज्याचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्यीय स्वरूपाचे आहेत.
▪️केंद्रशासित प्रदेशाचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत.
(2) घटकराज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांचे वाटप झालेले आहे.
📌याउलट, केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्राचे नियंत्रण आणि प्रशासन असते.
(3) घटकराज्यांना स्वायत्तता असते.
▪️केंद्रशासित प्रदेशांना स्वायत्तता नसते..
(4) घटकराज्यांच्या प्रशासकीय संरचनेत एकसारखेपणा आढळतो.
📌केंद्रशासित प्रदेशांची प्रशासकीय रचना भिन्न स्वरूपाची आहे.
(5) घटकराज्याच्या कार्यकारी प्रमुखाला राज्यपाल म्हणतात.
▪️केंद्रशासित प्रदेशांचा कार्यकारी प्रमुख विविध पदनामांनी ओळखला जातो. उदा. प्रशासक किंवा ले. गव्हर्नर किंवा मुख्य प्रशासक. इ.
🎯राज्यघटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी पुढील चार प्रकारच्या वर्गवारीतील लोक भारताचे नागरिक असतील असे नमूद केले होते.
🔴 'अधिवासा' द्वारे नागरिक
(Citizens by Domicile)
▪️कलम 5
🔴 'स्थलांतरा' द्वारे नागरिक
(Citizens by Migration)
▪️कलम 6.
🔴 'पुनर्वास्तव्या'द्वारे नागरिक (Citizens by Resettlement),
▪️कलम 7.
🔴 'नोंदणी'द्वारे नागरिक (Citizens by Registration)
▪️ कलम 8
🎯 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व बद्दल तरतूदी करण्याचा अधिकार घटनेने कलम 11 अन्वये संसदेला देण्यात दिलेला आहे.
🔹शिखराचे नाव - उंची(मीटर) -जिल्हे🔹
🔸कळसूबाई - 1646 - नगर
🔹साल्हेर - 1567 - नाशिक
🔸महाबळेश्वर - 1438 - सातारा
🔹हरिश्चंद्रगड - 1424 - नगर
🔸सप्तशृंगी - 1416 - नाशिक
🔹तोरणा - 1404 - पुणे
🔸राजगड - 1376 - पुणे
🔹रायेश्वर - 1337- पुणे
🔸शिंगी - 1293 - रायगड
🔹नाणेघाट - 1264 - पुणे
🔸त्र्यंबकेश्वर - 1304 - नाशिक
🔹बैराट - 1177 - अमरावती
🔸चिखलदरा - 1115 - अमरावती
Q. 1) कोणता देश "संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटन" मधून बाहेर पडला आहे?
- रशिया
Q.2) "BADMINTON एशिया चाम्पिं अनशिप २०२२" कोठे आयोजित होणार आहे? - मनिला, फिलिपाईन्स
Q. 3) "वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ACCOUNTANTS" चे आयोजन कोठे होणार आहे?
- मुंबई
Q. 4) "क्वार जलविद्युत योजना" कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे?
- जम्मूकाश्मीर
Q. 5) चर्चेत असलेले "मालचा महाल" कोठे आहे?
- दिल्ली
Q.6) NASSCOM च्या CHAIRMAN पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- कृष्णन रामानुजन
Q.7 ) चर्चेत असलेले पर्सीवरेस रोवर" कोणत्या अंतरीक्ष एजेन्सी शी संबंधित आहे?
- नासा
Q.8) "टाईम्स हायर एजुकेशनइम्पेक्त (THE) रेन्किंग २०२२" नुसार पहिले स्थान कोणाला प्राप्त झाले आहे?
- वेस्टर्न सिडनी युनिवर्सिटी
Q.9) "बीटकॉईनला" आपले आधिकारिक चलन करणारा दुसरा देश कोण बनला आहे?
- मध्य आफ्रिकी गणराज्य
१) "ईमान्यूअल मक्रोन" यांची कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?
✅️ - फ्रांस
२) "वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडीचर रिपोर्ट २०२१ नुसार भारत सैन्य खर्चामध्ये कितव्या क्रमांकावर आहे?
✅️- ३
३) २४ वे "उन्हाळी बधीर ऑलम्पिक" कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
✅️ - ब्राझील
४) चर्चेत असलेले "उर्जा प्रवाह" जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?
✅️INDIAN COAST GUARD
५) संरक्षण मंत्रालयाने कोठे "डेफ कनेक्ट २.०" चे अयोजन केले आहे?
✅️- दिल्ली
६) कोणत्या राज्य सरकारने "स्पेसटेक फ्रेमवर्क कार्यक्रम सुरु केला आहे?
✅️ तेलंगना
७) कोणत्या देशाने "ट्रायलटरल कोर्पोरेशन फंड" सुरु केले आहे?
✅️- भारत
८) सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने किती युटूब चनेल वर "सुरक्षेच्या कारणाने" बंदीघातली आहे?
✅️ १६
९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे देशातील पहिले "सामुदायिकरेडीओ स्टेशन" "दुध वाणी" चेउद्घाटन केले आहे?
✅️- गुजरात
१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितव्या "रायसीनाडायलोग" चे उद्घाटन केले आहे?
✅️- ७ व्या
. स्पर्धात्मक चालू घडामोडी
१) पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे?
- नरेंद्र मोदी
२) "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे?
- विनोद राय
३) अलीकडेच कोणत्या दक्षिण आशियाई देशाने स्वतःला “डीफालटर" घोषित केले आहे?
- श्रीलंका
४) नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यां “१०६४ भष्टाचार विरोधी app" सुरु केले आहे ?
- उतराखंड
५) अलीकडेच कोणत्या राज्याच्या "कांगडी चाय" ला GI tag भेटला आहे ?
- हिमाचल प्रदेश
६) भारत आणि कोणत्या देशात “२ + २ डायलोग" आयोजित केला आहे?
- अमेरिका
७) सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे?
- गुजरात
८) दरवर्षी "मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस " केव्हा साजरा करण्यात येतो?
- १२ एप्रिल
N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या
क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.
उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16 या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14
संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी
n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2
उदा. 1)
क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13
1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10
N या क्रमश: संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2
उदा.2
1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81×20/2 = 810
(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20)
नमूना पहिला –
उदा.3
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
32
30
34
28
उत्तर : 32
क्लृप्ती :-
सरासरी संख्या ही क्रमवार संख्यांच्या मधली संख्या असते.
32, 34, [35], 36, 38
नियम –
क्रमश: असलेल्या अंकांची सरासरी = (पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ 2
वरील सूत्रानुसार 1+20/2 = 10.5, 1+10/2 = 5.5
यावरून (10.5-5.5) = 5
नमूना दूसरा –
उदा.4
क्रमश: 1 ते 100 अंकांची बेरीज किती?
5050
10050
10100
2525
उत्तर : 5050
क्लृप्ती :
क्रमश: संख्यांची बेरीज = सरासरी × एकूण संख्या = 1+100/2 ×100 किंवा
= 101×100/2 = 101×50 = 5050
नमूना तिसरा-
उदा.5
35, 39, 45, 36, आणि 4* या दोन अंकी संख्यांची सरासरी 39 आहे; तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानचा * च्या जागे वरील अंक कोणता?
3
5
0
7
उत्तर : 0
क्लृप्ती :
सरासरी = 39 [मधली संख्या (35 36 39 45 4*)]
एकूण = 39×5 = 195
एकक स्थानी 5 येण्यास 5+9+5+6+* = 25 = 0 = 25
0+5 = 5
:: * = 0
नमूना चौथा –
उदा.6
क्रमश: पाच विषम संख्यांची सरासरी 37 आहे. त्यापुढील 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे; तर त्या दहाही संख्याची सरासरी किती?
44
43
42
40
उत्तर : 42
क्लृप्ती :
एकूण संख्यांची सरासरी = सरसरींची बेरीज / एकूण संख्या (N) 37+47/2 = 42
नमूना पाचवा –
उदा.7
एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?
74 कि.ग्रॅ.
71 कि.ग्रॅ.
75 कि.ग्रॅ.
100 कि.ग्रॅ.
उत्तर : 74 कि.ग्रॅ.
नावाड्याचे वजन = (सरासरीतील फरक × विधार्थ्यांची संख्या) + नवीन सरासरी
क्लृप्ती :
सरसरीतील फरक = 24 -22 2×25.
नावाड्याचे वजन = 50+24 = 74
नमूना सहावा –
उदा.8
एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्षे आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्षे आहे व उरलेल्या मुलांची सरासरी 16 वर्षे आहे, तर त्या वर्गात एकूण मुले किती?
60
45
40
50
उत्तर : 60
स्पष्टीकरण :-
15 मुलांच्या वयांची सरासरी एकूण मुलांच्या सरासरी पेक्षा 3 ने कमी व उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 1 ने जास्त आहे. एकूण भरून काढावयाची वर्षे = 3×15 विधार्थी = 45 वर्षे
उरलेल्या विधार्थ्यांपैकी 1 विधार्थी 1 वर्ष भरून काढतो.
उरलेले विधार्थी = 1×45 = 45 विधार्थी
:: एकूण विधार्थी = 45+15 = 60 विधार्थी
नमूना सातवा –
उदा.9
एका दुकानदाराची 30 दिवसांची सरासरी विक्री 155 रु. आहे पहिल्या 15 दिवसांची सरासरी विक्री 190 रु. असल्यास; नंतरच्या 15 दिवसांची एकूण विक्री किती?
285
2375
1800
1950
उत्तर : 1800
क्लृप्ती : –
(155 – सरसरीतील फरक)×15
= (155-35)×15
= 120×15
= 1800
नमूना आठवा –
उदा.10
ताशी सरासरी 60 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहचते. जर ती ताशी सरासरी 50 कि.मी. वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशीरा पोहचते. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?
300 कि.मी.
150 कि.मी.
450 कि.मी.
यापैकी नाही
उत्तर : 150 कि.मी.
स्पष्टीकरण :-
एकूण अंतर x मानू
∷x/50-x/60=30/60
∶:(6x-5x)/300=1/2
x= 300/2
=150 कि.मी.