06 August 2022

Pre Exam कशी पास व्हावी ?


खूप जणांना पडलेला हा प्रश्न!


मी माझ्या अनुभवावरून काही मुद्दे मांडत आहे

१. प्रिलिम चा कट ऑफ किती लागतो आणि येणाऱ्या attempt ला किती लागेल एक अंदाज लक्षात घ्यावा


२.आपल्याला पास व्हायला किती मार्क हवेत , तो आकडा म्हणजे आपले ध्येय होय.


३. त्या धेयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची, अचूक दिशेने प्रयत्नची, योग्य स्टडी मटेरियल ची.


४. स्टडी मटरियल निवड खूप महत्त्वाची असते. त्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. शक्यतो जे टॉपर आलेत त्यांना फॉलो केले तरी चालेल.


५. एकदाका पुस्तकांची यादी ठरवली की जोपर्यंत परीक्षा होऊन जात नाही,  आपण पास होत नाही तोपर्यंत पुस्तके बदलायची नाहीत.


६. त्या पुस्तकाच्या उणीवा चुका भरून काढण्यासाठी टीपणी वही घालावी. त्यात एक्स्ट्रा मुद्दे लिहून काढावे. आणि पुस्तका बरोबर ते पण पुन्हा पुन्हा वाचावे.

एवढ्यासाठी पुस्तक च बदलणे तोट्याचे ठरेल. सारखी पुस्तके बदलली की आपले वाचन परिपूर्ण होत नाही. त्या विषयाचे सखोल ज्ञान मिळत नाही. पुस्तकाच्या खोलीचा अंदाज यायला वेळ लागतो. एक च पुस्तक सारखे सारखे वाचल्याने विषयाचे परिपूर्ण आणि सखोल ज्ञान मिळते आणि खूप चांगले आकलन होते. प्रश्न लवकर कमी वेळेत सुटतात


७. नियमित प्रश्नांचा सराव करावा . 

८. आयोगाचे पेपर वारंवार चाळावे. 

९. टेस्ट सिरीज शक्यतो आयोगाच्या वेळेच्या ५-१० मीन आधी संपेल अशा दृष्टीने सराव करावा.


१०. कमी मटेरियल आणि खूप वेळा रिविजन केल्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना विचार करायला लावणारा वेळ वाचतो आणि आपण आपण वेळेत पेपर सोडवून चांगले मार्क मिळवू शकतो.

११. १००० kicks are not important but one kick that practiced १००० times is more powerful.


Sunil jadhav sir(Officer Katta)

राज्य लोकसेवा आयोग MPSC कडून राज्यसेवा, गट ब, गट क, तसेच तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा :-


(१) स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.


(२) राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.


(३) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरीता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. 


(४) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा / हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल / येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.


(५) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा इत्यादी) निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. 


(६) सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा' (Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच, सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.


(७) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.


(८) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या/वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा' तसेच 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा' या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील.


 (९) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा' तसेच 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा' या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील.


(१०) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करीता 'मराठी व इंग्रजी' तसेच 'सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी' अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. 


(११) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल.


(१२) मुख्य परीक्षेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरीता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.


(१३) पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरीता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल...


(१४) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही. 

समाजसुधारक या टॉपिक वर कसे प्रश्न विचारले जातात



⛳️  समाजसुधारक यांचे

पूर्णनाव, जन्मठिकाण, शिक्षण- नोकरी, सामाजिक कार्य,  संस्था-संघटना, उद्देश, वर्तमानपत्र, पुरस्कार, त्यांचे सहकारी, त्यांच्याबद्दल असलेली मते, त्यांचे विचार  यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.


1) महात्मा फुले


2) महर्षी धोंडो केशव कर्वे 

         

3) डॉ बाबासाहेब आंबेडकर  

 

4) राजा राममोहन रॉय 

      

5) म.गो.रानडे   

               

6) रमाबाई रानडे   

            

7) पंडिता रमाबाई.

            

8) राजर्षी शाहू महाराज 

    

9) गोपाळ हरि देशमुख

       

10) गो.ग.आगरकर 


11) महर्षी वि.रा.शिंदे   

               

12) जगन्नाथ शंकरशेठ 

             

13) गोपाळ कृष्ण गोखले 

  

14) कर्मवीर भाऊराव पाटील


15) बाळशास्त्री जांभेकर


सुजॉय लाल थाओसेन यांच्याकडे ITBP च्या DG चा अतिरिक्त कार्यभार आहे



🔹नवी दिल्लीतील सशस्त्र सीमा बलचे महासंचालक डॉ. सुजॉय लाल थाओसेन यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस महासंचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली . 


🔸डॉ. थाओसेन हे 1988 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 


🔹डॉ. थाओसेन यांना आयपीएस संजय अरोरा यांच्याकडून प्रभार व पारंपारिक दंडुका स्वीकारण्यात आला . 


🔸1962 मध्ये स्थापन झालेली ITBP भारत-चीन सीमेवर गस्त घालते. याव्यतिरिक्त, छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवायांसारख्या अनेक अंतर्गत सुरक्षा कार्यांसाठी याचा वापर केला जातो.


अर्थव्यवस्था ओळख

ॲडम स्मिथ आणि त्यांची ग्रंथसंपदा (राष्ट्रांची संपत्ती)

भांडवलशाही आणि आणि समाजवादी अर्थव्यवस्था मधील फरक

अर्थव्यवस्थांचा चे प्रकार
नियोजित अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे
प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम

गिनी गुणांक -(०ते१)
०- समानता,१- विषमता

😱राष्ट्रीय उत्पन्न

राष्ट्रीय उत्पन्न समिती -(1949)
अध्यक्ष-महालनोबिस

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
१.उत्पादन पद्धत
२. उत्पन्न पद्धत
३.खर्च पद्धत

राष्ट्रीय उत्पन्नातील संकल्पना-
१. स्थूल देशांतर्गत उत्पाद(GDP)- आधारभूत वर्ष -२०१७-१८(रवींद्र ढोलकिया समिती)
2.स्थूल राष्ट्रीय उत्पादन(GNP)
3. निव्वळ देशांतर्गत उत्पादन(NDP)
4.निव्वळ राष्ट्रीय उत्पादन(NNP)

स्थिर किंमत व चालू किंमत(Real GDP आणि Nominal GDP)

दरडोई उत्पन्न- उत्पन्न/लोकसंख्या

हरित GDP (२००४-०५(चीन)

वित्त आयोग व अध्यक्ष

🔰 पहिला वित्त आयोग
👤 अध्यक्ष : के. सी. नियोगी
⌛ शिफारस कालावधी : १९५२-१९५७

🔰 दुसरा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : के. सन्थानम्
⌛ शिफारस कालावधी : १९५७-१९६२

🔰 तिसरा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : ए. के. चन्दा
⌛ शिफारस कालावधी : १९६०-१९६६

🔰 चौथा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : डॉ. पी. व्ही. राजमन्नार
⌛ शिफारस कालावधी : १९६६-१९६९

🔰 पाचवा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : महावीर त्यागी
⌛ शिफारस कालावधी : १९६९-१९७४

🔰 सहावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : के. ब्रह्मानंद रेड्डी
⌛ शिफारस कालावधी : १९७४-१९७९

🔰 सातवा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : जे. एम. शेलात
⌛ शिफारस कालावधी : १९७९-१९८४

🔰 आठवा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : यशवंतराव चव्हाण
⌛ शिफारस कालावधी : १९८४-१९८९

🔰 नववा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : एन. के. पी. साळवे
⌛ शिफारस कालावधी : १९८९-१९९४

🔰 दहावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : के. सी. पंत
⌛ शिफारस कालावधी : १९९५-२०००

🔰 अकरावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : ए. एम. खुस्रो
⌛ शिफारस कालावधी : २०००-२००५

🔰 बारावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : डॉ. सी. रंगराजन
⌛ शिफारस कालावधी : २००५-२०१०

🔰 तेरावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : डॉ. विजय केळकर
⌛ शिफारस कालावधी : २०१०-२०१५

🔰 चौदावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : डॉ. वाय. व्ही. रेड्डी
⌛ शिफारस कालावधी : २०१५-२०२०

🔰 पंधरावा वित्त आयोग
👤 अध्यक्ष : एन. के. सिंह
⌛ शिफारस कालावधी : २०२०-२०२५ .

Economy Question set

१) दारिद्रय निर्मुलन ( गरीबी हटाओ ) आणि आत्मनिर्भरता( Self - Reliance )....पंचवार्षिक योजनेची प्रमुख  ही उद्दिष्टे होती . ( STI पूर्व २०११ )

१) ३
२) २
३) ५✅✅
४) ६


२ . अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गतगुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता?
( PST मुख्य २०१५ )
१) ३३.३%
२ ) ३६.७ % ✅✅
४ ) ३०,० %
३ ) २४.८ %

3. नव्या भारताबाबत पंडीत नेहरूंचा दृष्टीकोण खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे ? ( राज्यसेवा मुख्य २०१८ )

१ ) भांडवलशाहीचे तत्व
२ ) समाजवादाचे तत्त्व
३ ) लष्करशाहीचे तत्व
४ ) लोकशाही समाजवादाचे तत्व✅✅

४) उत्तरांचल छत्तीसगड , झारखंड या राज्यांची निर्मिती ...... या पंचवार्षिक योजनेत झाली . ( PSI पूर्व २०१५ )

१) ९✔️✔️
२) ७
३) १०
४) ८

५ दहाव्या योजनेसाठी खालीलपैकी कोणते / ती विधान / ने लागू होते ? ( ASO Main 2019 )

( अ ) दहाव्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल , 2002 ते 31 मार्च , 2007 होता .

ब ) जी.डी.पी. वृद्धी इष्टांक 8 %
क ) 2007 पर्यंत साक्षरता वाढ 8 %

पर्यायी उत्तरे

1 ) फक्त अ
2 ) फक्त अ आणि ड
3 ) फक्त अ , ब आणि क ✔️✔️
4 ) यापैकी सर्व

६ भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विका भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमान आधारित होती ?

१ ) एस . व्ही . एस . राघवन प्रतिमान
२ ) चक्रवर्ती प्रतिमान
३ ) केळकर प्रतिमान
४ ) महालनोबिस प्रतिमान✅✅

७ पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द कोणता होता ? ( राज्यसेवा पूर्व २०११ )

१) जलदगती
( २ ) अधिक रोजगारी
( 3 ) उत्पन्नाप
( ४ ) गरिबी हटाव✅

८ खालील विधाने विचारात घ्या . ( ASO मुख्य २०१८ )

अ ) भारतीय नियोजन प्रक्रिया ही वित्तीय व्यूहरचनेच्या अभावामुळे ग्रस्त आहे .

ब ) रचनात्मक अवनतीबरोबरच ( Structural retrogression ) औद्योगिक वृद्धी दर कमी होता .

क ) भारतीय आर्थिक नियोजनाचे राजकीय ( Political phi losophy ) तत्वज्ञान बरोबर होते .

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहे / आहेत ?

१ ) अ आणि ब ✅✅
२ ) ब आणि क
३ ) फक्त क
४ ) फक्त अ

९ खालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचा स्विकार करण्याचे कारण नाही ? ( ASO मुख्य २०१८ )

१ ) अपुरी नैसर्गिक संसाधने ✅✅

२ ) बाजार यंत्रणेच्या मर्यादा

३ ) सामाजिक न्यायाची गरज

४ ) विकासासाठी साधन संकलन आणि वाटप ( Resource collection & digitization )

१०  दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णत : होऊ स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ? शकली नाही याचे कारण म्हणजे ( Asst मुख्य २०१५)

१) राजकीय संघर्ष
२) अन्नधान्याची तीव्र टंचाई
३) युद्धावर झालेला प्रचंड खर्च
४) परकीय चलनची तीव्र टंचाई ✅

रुपयाची परिवर्तंनियता (Convertibility of Rupee) :

अर्थ: जगातील चलने परस्परांमध्ये विनिमयक्षम (Exchangeable) असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनांमध्ये करता येते.
मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा(Exchange Control) टाकत असतात.
मात्र जेंव्हा एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे/मर्यादा नसते तेंव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हंटले जाते.
उदा.
1) विनिमय करायच्या चलनाच्या संख्येवर बंधन नसते, म्हणजेच हवे तेवढया चलनाचा विनिमय करता येऊ शकेल.

2) विनिमय दर सरकार ठरविणार नाही. तर तो दोन्ही चालनाच्या मागणी आणि पुरवठयाच्या परस्पर संयोगाने परकीय चलन बाजारात ठरेल.

3) सर्व व्यवहारांसाठी असा बाजारात ठरलेला (Market Determined) एकच दर असेल म्हणूनच या व्यवस्थेला पूर्ण परिवर्तनीय व्यवस्था (Fully-Convertible System) असे म्हणतात.

02 August 2022

हरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक !


➡️बर्मिंघम येथे सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक भेटले आहे.

➡️वेटलिफ्टींग या क्रिडा प्रकारात हरजिंदर कौर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.

➡️हे पदक तीने 71 किलो वजनी गटात जिंकले आहे.

⭐स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 9 पदके जिंकली असून , वेटलिफ्टींग मध्ये 7 पदके जिंकली आहेत

महत्त्वाचा मुद्दा पाठ कराच नक्की वाचा


🔥भाबर:-
1.मोठे दगड ,गोटे वाळू इत्यादींनी तयार झालेला सुमारे 30km लांबीचा पट्टा शिवालीक पर्वताच्या दक्षिण पायथ्याशी आढळतो.
2.या भागास भाबर म्हणतात.
3.या भागात हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्या लुप्त होतात.

🔥तराई:-
1.बाबरच्या दक्षिणेस हा पट्टा असतो.
2. या पट्ट्यात नद्या लुप्त होतात.
3. तराई या प्रदेशात दलदलीचा प्रदेश असे म्हटले जाते.

🔥 भांगर:-
1.जुन्या गाळ संचयन झालेलं क्षेत्रास भांगर म्हणतात.
2.ही एक परिपक्व मृदा असते.

🔥 खादर:-
1.पुरक्षेत्राचे नवीन गाळ संचयन क्षेत्रास खादर म्हणतात.
2.ही मृदा नवीन गाळाची मृदा असते.
3.ही मृदा अल्कालियुक्त मृदा असते.
4.ह्या मृदेत ह्युमस चे प्रमाण कमी असते.

North-south क्रम:-

😉Short trick:-  भा-त-भाकर -खाना👍

🔥🔥👉👉👉भाबर-तराई-भांगर-खादर

01 August 2022

सपर्धात्मक चालू घडामोडी प्रश्नावली..


Q.1) सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरली आहे?

>> रोशनी नादर


Q.2) बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारताची कोणती खेळाडू ध्वजवाहक ठरली?

>> पीव्ही सिंधू


Q.3) 2022 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकले?

>> अमेरिका (13 सुवर्ण)


Q.4) ICC सदस्यांची यादीत कोणत्या तीन देशांना सदस्यत्वाचा दर्जा मिळाला?

>> कंबोडिया, उझबेकिस्तान आणि कोट डी’आयव्होर


Q.5) कोणत्या राज्य सरकारने पोलिसांसाठी ‘स्मार्ट ई-बीट’ प्रणाली सुरू केली?

>> हरियाणा


Q.6) सरकारी अहवालानुसार, शिकारी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे गेल्या तीन वर्षांत भारतात  एकूण किती वाघांचा मृत्यू झाला?

>> 329


Q.7) केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF), 27 जुलै 2022 रोजी  कितवा स्थापना दिवस साजरा केला?

>> 84 वा


Q.8) अलीकडेच कोणी राष्ट्रपती कोविंद यांच्या पूर्वसुरींची छायाचित्रे दाखविणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे?

>> अनुराग ठाकूर


Q.9) अलीकडेच अतुलानंद गोस्वामी यांचे निधन झाले आहे, ते प्रसिद्ध......होते?

>> लेखक


 Q.10) बॉब राफेल्सन यांचे निधन झाले आहे, ते प्रसिद्ध......होते?

>> नामांकित दिग्दर्शक


Q.11) जागतिक हिपॅटायटीस दिवस जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 28 जुलै


राष्ट्रीय काँग्रेसची ठराव:- मागणी -



राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात अनेक ठराव पास करण्यात आले ते ठरव मागण्यांच्या स्वरूपात काँग्रेसने सरकारकडे सादर केले ते पुढील प्रमाणे आहेत.

1. भारतीय प्रशासनाची चौकशी करण्यासाठी सरकारने एका रॉयल कमिशन ची नियुक्ती करावी.

 2.भारताची पद्वा इंडिया कौन्सिल वर विनाकारण पैसा खर्च होत असल्यामुळे ते रद्द करण्यात यावे.

 3. प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळात लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना अधिक संख्येने अंतर्भाव केला जावा तसेच यात लोकनियुक्त प्रतिनिधींना प्रशासना संबंधित प्रश्न विचारण्याचा तसेच अर्थसंकल्पावर मतदान करण्याचा हक्क देण्यात यावा .

४.पंजाब प्रांतआणि संयुक्त प्रांतांत विधान सभेची स्थापना करण्यात यावी.

5. पाच लष्करावर होणाऱ्या खर्चात कपात करावी तसेच लष्करावर होत असणारा खर्च भारताबरोबर नाही करावा लष्करातील इंग्रजां साठी असणाऱ्या जागेवर भारतीयांची सुद्धा नेमणूक करावी संस्था स्थापन कराव्यात 

6. भारतात व ब्रिटन मध्ये घेतल्या जाणाऱ्या आयसीएस च्या पदासाठी परीक्षा एकाच वेळी घेण्यात यावेत तसेच या स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी.

 7.स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक अधिकार देण्यात येऊन त्यांना स्वायतत्ता देण्यात यावी .

8.ब्रह्मदेश आणि भारताचे एकत्रीकरण करण्यात येऊ नये.

 9 .न्यायदान विभाग आणि कार्यकारी शाखेचे अधिकारी एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित करू नये 

10 .भारतीय वस्तूंसाठी संरक्षण खात्याच्या धोरणाचा अवलंब करावा तसेच मिठावरील लावला कर रद्द करण्यात यावा 11.भारतातील सर्व लहान मोठ्या उद्योगात उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन करावे तसेच नवीन उद्योगधंद्यांना चालना द्यावी व बेकारी निवडण्याचा सरकारने प्रयत्न करावा.

12. काँग्रेसचे अधिवेशन प्रत्येक डिसेंबर महिन्यात देशाच्या विविध प्रांतात घेण्यात यावे .

13.भारतातील लोकांना लष्करी प्रशिक्षण देण्यात यावे.

14. भूमिकर निश्चित करण्यात येऊन तो स्थायी स्वरूपाचा असावा .

15.शेतकऱ्यांची आर्थिक शोषण थांबवण्यात यावे शेतकऱ्यांच्या कर्जाचा रुपाने अर्थसाह्य करावे भारतात औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन कराव्यात.


 16.वर्तमानपत्रावर लादलेले निर्बंध दूर करावे बंगाल रेगुलेशन मुंबई रेगुलेशन तसेच मद्रास रेगुलेशन अॅक्ट रद्द करण्यात यावी कारण याच कायद्याच्या आधारे टिळकांना राजद्रोहाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

महत्त्वाचे घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.



घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)


♦️मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर


♦️नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान


♦️कसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत


♦️वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड


♦️करुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर


♦️चदनापुरी नगर संगमणेर – पुणे


♦️सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर


♦️बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा


♦️मांजरसुभा घाट बीड बीड – नगर


♦️अबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर


♦️ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण


♦️धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई


♦️बोर घाट पुणे पुणे – मुंबई


♦️खबाटकी घाट सातारा पुणे – सातारा


♦️दिवा घाट पुणे पुणे – बारामती


♦️कभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण


♦️आबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी


♦️आबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव


♦️फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार प्रदान



सोलापूर: प्रमोद बनसोडे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे अध्यक्षतेखालील तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव संजय नवले, पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी स्विकारला.

     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व विद्यापीठाच्या गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला.

   यावर्षीचा सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार  हा एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला मिळाला असुन अल्पावधीतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयातुन इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत नागरीक घडविण्याची महत्वकांक्षा आपल्या खांद्यावर घेऊन सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालय गगनभरारी घेत आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर गुणवत्ता सिद्ध करून पोचलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आहे. शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण करून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

   पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाला यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना प्रदान करण्यात आला.

  या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, 

उद्योजक किशोर चंडक, डाॅ. विकास पाटील, डाॅ. सुरेश पवार आदीउपस्थित होते.

   या कार्यक्रमास संस्थेचे सचिव  संजय नवले, सोलापूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, सोलापूर सिंहगड इन्स्टिट्युटचे इस्टेट मॅनेजर डाॅ. दत्तात्रय नवले, प्रा. अनिल निकम, प्रा. सुमित इंगोले आदी उपस्थित होते.

27 July 2022

अभयारण्य आणि जिल्हे.


१) मयुरेश्वर अभयारण्य पुणे


२) सागरेश्वर अभयारण्य सांगली


३) ताम्हिणी अभयारण्य पुणे


४) अनेर अभयारण्य धुळे


५) यावल अभयारण्य जळगाव


६) येडशी अभयारण्य उस्मानाबाद


७) गौताळा अभयारण्य औरंगाबाद


८) टीपेश्वरअभयारण्य यवतमाळ


९)इसापूर अभयारण्य यवतमाळ


१०)मेळघाट अभयारण्य अमरावती


११)काटेपूर्णा अभयारण्य वाशिम


१२)वान अभयारण्य अमरावती


१३)पैनगंगा अभयारण्य नांदेड

उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

घटना कलम क्र. 214 नुसार प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे सध्या देशात 24 इतकी उच्च न्यायालये आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात तीन खंडपीठे आहेत 1. पणजी (गोवा) 2. नागपूर 3. औरंगाबाद

रचना :

न्यायाधीशांची संख्या :

उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधिश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधिश असतात. तसेच त्या त्या राज्यातील परिस्थितीनुसार न्यायाधिशांची संख्या कमी जास्त असते.

न्यायाधिशांची नेमणूक :

उच्च न्यायालयातील सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशाची नेमणूक करताना राष्ट्रपती सर न्यायाधिश आणि घटकराज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेतात. तर इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना भारताचा सर न्यायाधिश त्या राज्याचा राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधिश यांचा सल्ला घेतो.

न्यायाधिशांची पात्रता : घटना कलम क्र. 217 नुसार पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याने कमीत कमी दहा वर्ष कोणत्याही न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.

3. कमीत कमी दहा वर्षापर्यंतएक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.

4. राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडीत असावा.

कार्यकाल :

वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.

शपथविधी :

संबंधित राज्याचा राज्यपाल न्यायाधीशास शपथ देतो.

उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र :

1. प्रादेशिक क्षेत्राधिकार

2, प्रारंभीक अधिकार क्षेत्र

3. पुर्न निर्णयाचा अधिकार क्षेत्र

4. न्यायालयावर देखरेख ठेवण्याचा अधिकार (घटना कलम क्र. 227 नुसार संपूर्ण राज्याच्या न्यायव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे.)

महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती

महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती

केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 76 नुसारच एक महान्यायवादयाचे पद निर्माण केलेले आहे.
हा महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो.
या महान्यायवादयाला अनेक वैधानिक स्वरूपाची कार्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे महान्यायवादयाला प्रथम कायदा अधिकारी तसेच हे पद राजकीय स्वरूपाचे म्हणून ओळखले जाते.
अशा महान्यायवादयाची नेमणूक पुढीलप्रमाणे केली
जाते.

1. नेमणूक

महान्यायवादयाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात.
महान्यायवादयाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.
राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी केली जाते.

2. पात्रता

भारतीय घटना कलम 76 नुसार महान्यायवादी पदावर नियुक्ती होणार्‍या व्यक्तीच्या अंगी पुढील पात्रता आवश्यक आहे.
ती व्यक्ति भारताचा नागरिक असावी.
त्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
त्यांनी देशाच्या उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून/उच्च न्यायालयात 10 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे.
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रता त्याच्या अंगी असाव्यात.

3. कार्यकाल

भारतीय राज्यघटनेत महान्यायवादयाचा तसा कार्यकाल ठरविलेला नाही.
परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महान्यायवादी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले रती महान्यायवादी मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती
त्याला पदच्युत करतात.

4. वेतन व भत्ते

महान्यायवादयाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवास्थान मोफत दिले जाते.
शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.
एकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेवह्या मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.
महान्यायवादयाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते.
निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

5. अधिकार व कार्ये

राष्ट्रपतीने मागितलेल्या कायदेशीर बाबीच्या बाबतीत सल्ला देणे.
केंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.
महान्यायवादयाला खाजगी वकिली देखील करता येते. परंतु एखाद्या खटल्यामध्ये एक पक्ष केंद्र सरकारचा असेल तर केंद्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.
योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.

नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.

1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.

अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.

यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.

संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.

त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.

मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.

राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

केंद्र सरकारचे महत्वाचे आयोग

.     🟠 केंद्र सरकारचे महत्वाचे आयोग 🟠

🟠आयोग : पंधरावा वित्त आयोग

🔹अध्यक्ष : एन. के. सिंग
🔸सचिव : अरविंद मेहता
🔹स्थापना : नोव्हें, 2017
🔸कालावधी : 2021 - 2026

🟠आयोग : 7 वा वेतन आयोग

🔹अध्यक्ष : अशोककुमार माथुर
🔸सचिव : मीना अगरवाल
🔹स्थापना : 28 फेब्रु. 2014
🔸इतर सदस्यः विवेक राई, रथीन रॉय

🟠आयोग : निती (NITI) आयोग

🔹अध्यक्ष : पंतप्रधान(पदसिध्द अध्यक्ष)
🔸उपाध्यक्ष : सुमन बेरी
🔹सचिव : अमिताभ कांत
🔸स्थापना : 1 जाने. 2015
🔹NITI ने नियोजन आयोगाची जागा घेतली

🟠आयोग : भारतीय निवडणूक आयोग

🔹मुख्य निवडणूक आयुक्त : सुशील चंद्रा
🔸इतर निवडणूक आयुक्त  : राजीवकुमार, अनुपचंद्र पांडे
🔹स्थापना : 25 जाने. 1950
🔸25 जाने : राष्ट्रीय मतदार दिन

➖➖➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

प्र. अलीकडेच भारतातील कोणत्या राज्याला "भारताचे पहिले हरित राज्य" बनवण्याच्या योजनेबाबत "जागतिक बँकेने" वचनबद्ध केले आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश

प्र. भारतातील पहिली डिजिटल वॉटर बँक 'AQVERIUM' अलीकडेच कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे?
उत्तर :- बंगलोर

प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने नवीन क्रीडा धोरण 2022-27 लाँच केले आहे?
उत्तर :- गुजरात सरकार

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल 'कु. कुमुदबेन जोशी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्र. अलीकडे कोणत्या संस्थेने शालेय मुलांसाठी 'युविका' हा युवा वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केला आहे?
उत्तर :- इस्रो

प्र. अलीकडेच FIDE चेस ऑलिम्पियाड 2022 च्या 44व्या आवृत्तीसाठी यजमान राष्ट्र म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर :- भारत

प्र. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?
उत्तर :- झुलन गोस्वामी

प्र. अलीकडेच नवी दिल्ली येथे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान-विकसित ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) टोयोटा मिराईचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर :- नितीन गडकरी

प्र. अलीकडेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कोणत्या राज्यासाठी 1.42 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे?
उत्तर :- जम्मू आणि काश्मीर

प्र. अलीकडेच SSLV च्या घन इंधन आधारित बूस्टर स्टेजची यशस्वी चाचणी कोणी केली आहे?
उत्तर :- इस्रो

प्र. अलीकडेच 2050 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित करणारे पहिले दक्षिण आशियाई शहर कोणते ठरले आहे?
उत्तर :- मुंबई

प्र. अलीकडे कोणत्या मंत्रालयाने भारतातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल कार टोयोटा मिराई लाँच केली आहे?
उत्तर :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

प्र. अलीकडेच भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि वैज्ञानिक संशोधनासाठी ३१व्या जीडी बिर्ला पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर :- प्राध्यापक नारायण प्रधान

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या महसूल विभागाने जमिनीचे सर्वेक्षण किंवा जमिनीचा तपशील मिळवण्यासाठी 'दिशंक अॅप' सुरू केले आहे?
उत्तर :- कर्नाटक

Q. अलीकडेच कोणता दिवस संयुक्त राष्ट्रांनी इस्लामोफोबियाशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे?
उत्तर :- १५ मार्च

प्र. अलीकडेच भारत बायोटेकने टीबी लसीसाठी कोणत्या देशातील बायोफार्मास्युटिकल फर्म Biofabri सोबत भागीदारी केली आहे?
उत्तर :- स्पेन

प्र. अलीकडे गौण कर्जासाठी कर्ज हमी योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे?
उत्तर :- ३१ मार्च २०२३

प्र. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने देशातील 13 प्रमुख नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी एका प्रकल्पाची घोषणा केली आहे?
उत्तर :- पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय

----------------------------------------

प्र. अलीकडे हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2022 मध्ये कोण अव्वल आहे?
उत्तर :- एलोन मस्क

प्र. महात्मा गांधी हरित त्रिकोण कोठे अनावरण केले गेले आहे?
उत्तर :- मादागास्कर

प्र. नुकताच जागतिक निद्रा दिन २०२२ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- १८ मार्च

प्र. अलीकडेच मिस वर्ल्ड २०२१ चा खिताब कोणी जिंकला आहे?
उत्तर :- कॅरोलिना बिलाव्स्का

प्र. प्रसिद्ध फिनटेक व्यवसाय इव्हिलिएंट टेक्नॉलॉजीज विकत घेण्याची घोषणा कोणी केली आहे?
उत्तर :- रेझरपे

प्र. नुकताच ग्लोबल रिसायकलिंग डे २०२२ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- १८ मार्च

प्र. अलीकडेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- रमेश मूर्ती

प्र. भारताचा आयुध निर्माण दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- १८ मार्च

___________________________________

Q1. मणिपूरचे मुख्यमंत्री कोण झाले?

उत्तर:- एन. बिरेन सिंग
(एन. बिरेन सिंग यांची मणिपूरच्या पदावर फेरनिवड झाली आहे.
मणिपूरची राजधानी इंफाळ
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग (भाजप पक्ष)
मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन
मणिपूरचे मुख्य न्यायाधीश पी व्यंकट संजय कुमार)

Q2. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2022 नुसार सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे?

उत्तर:- १३६ वा
(वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2022 मध्ये भारत 136 व्या क्रमांकावर आहे. जागतिक आनंद निर्देशांकाच्या 10 व्या आवृत्तीनुसार, या वर्षीच्या निर्देशांकात एकूण 146 देशांना स्थान देण्यात आले आहे.
जागतिक आनंद निर्देशांकाची जीडीपी पातळी, आयुर्मान, आयुर्मान • निवडीचे स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराची धारणा या घटकांवर क्रमवारी लावली जाते.
संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक निर्देशांकात फिनलंडला पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून निवडण्यात आले आहे, तर अफगाणिस्तान हा सर्वात दुःखी देश मानला गेला आहे, या निर्देशांकात पाकिस्तान १२१ व्या क्रमांकावर आहे.
पहिल्या तीन देशांची नावे
1) फिनलंड
2) डेन्मार्क
३) आइसलँड)

Q3. 'Tata Consultancy Services (TCS)' चे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर:- राजेश गोपीनाथन
(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांपैकी एक आहे
TCS- 1968 ची स्थापना.
मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र)

Q4. आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2022 कधी साजरा केला जातो?

उत्तर:- २० मार्च
(👉२० मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो.
लोकांच्या जीवनातील आनंदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.

Q5. क्रिकेट आशिया चषक 2022 चा खेळ कुठे होणार आहे?

उत्तर:- श्रीलंका
(आशिया चषक स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते, यावेळी ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.
आशिया चषक स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि एक क्वालिफायर विजेता असे सहा संघ सहभागी होणार आहेत.
हे क्वालिफायर सामने UAE, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात खेळवले जातील.)

Q6. पीक विविधीकरण निर्देशांक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर:- तेलंगणा
(पीक विविधीकरण निर्देशांक सुरू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
पीक वैविध्यता निर्देशांकानुसार, तेलंगणा राज्यात 77 प्रकारची पिके घेतली जातात, त्यापैकी फक्त 10 विविधतांसाठी निवडली गेली आहेत, हा निर्देशांक तेलंगणा राज्याच्या भविष्यात पीक विविधीकरणासाठी आधार म्हणून काम करेल.)

Q7. Flipkart Health+ चे नवीन CEO कोण बनले आहे?

उत्तर:- प्रशांत झवेरी
(Flipkart Helb + (Flipkart Health +) हा Flipkart कंपनीचा एक भाग आहे, जो घरी बसून वापरकर्त्यांना ऑनलाइन वैद्यकीय सल्ला आणि निदान सेवा पुरवतो.
फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स कंपनी आहे.
वॉलमार्ट ही मूळ कंपनी आहे
फाउंडेशन 2007
मुख्यालय बंगलोर (कर्नाटक)

Q8. भारतीय तटरक्षक दलाने तटरक्षक दलाच्या ताफ्यात पाचवे ऑफशोर गस्ती जहाज 'सक्षम' समाविष्ट केले आहे.

उत्तर:- गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL)
(हे ऑफशोअर गस्ती जहाज अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि दळणवळण उपकरणे, सेन्सर्स आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे, 105 चौरस मीटर (344 फूट 6 इंच) लांब आणि सुमारे 2400 टन वजनाचे आहे, जहाज कोचीच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. तटरक्षक दल आहे.
हे गस्ती जहाज विशेष आर्थिक क्षेत्रांच्या निगराणीसाठी आणि तटरक्षक सनदीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर कर्तव्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तैनात केले जाते.

Q9. 19 मार्च 2022 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) द्वारे कोणता स्थापना दिवस साजरा केला जातो?

उत्तर:- ८३ वा
(केंद्रीय राखीव पोलीस दलाने 19 मार्च रोजी आपला 83 वा स्थापना दिवस साजरा केला, या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
CRPF हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय पोलीस दल आहे, ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते, CRPF ची स्थापना 1939 मध्ये प्रथमच झाली.
CRPF:- केंद्रीय राखीव पोलीस दल
27 जुलै 1939 रोजी स्थापना झाली
मुख्यालय नवी दिल्ली
महासंचालक कुलदीप सिंग
महानिरीक्षक पी.एस. राणीपासे
मोटो- सेवा आणि निष्ठा)

Q10. जागतिक चिमणी दिन 2022 कधी साजरा केला जातो?

उत्तर:- २० मार्च
(👉 20 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक स्पॅरो डे म्हणून साजरा केला जातो, हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

--------------------------------------