09 August 2023

येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप.

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..

♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..

1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
          मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये  प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.

2)Active voice and passive voice
        यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2  प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.

3)Tense : काळ
        मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .

4)Direct & Indirect Speech-
        यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after

5)Types of Sentence-
    या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.

6)Spelling Mistake
        TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित  अभ्यासायला हवा.

7)Parajumbles-
         हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.

♦️Vocabulary-
      Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms  व antonyms  या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.

♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स

2) कोणताही एक प्रश्नसंच
   
      वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..

तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐

08 August 2023

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा

Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

परीक्षा टप्पे कसे?

पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

सामान्य ज्ञान

▪️जगाची प्रदक्षिणा करणारी पहिली अंध व्यक्ती - जेम्स होल्मन.


▪️जागतिक बँक - स्थापना: वर्ष 1944; 

▪️मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.


▪️इस्लामिक विकास बँक (IsDB) - स्थापना: वर्ष 1975; 

▪️ठिकाण: जेद्दाह, सौदी अरब.


▪️आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966; 

▪️मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स


▪️आफ्रिकन विकास बँक ग्रुप (AfDB) - स्थापना: 10 सप्टेंबर 1964; 

▪️मुख्यालय: अबिजान, कोट डी'आईवर.


▪️नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) - स्थापना: वर्ष 2015; 

▪️मुख्यालय: शांघाय, चीन.


▪️राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) - स्थापना: 15 ऑक्टोबर 1984; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️विशेष संरक्षण गट (SPG) - स्थापना: 30 मार्च 1985; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️भारतीय स्पर्धा आयोग (CCI) - स्थापना: 14 ऑक्टोबर 2003; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ - स्थापनाः 1 जून 2016; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) – स्थापना: 18 ऑक्टोबर 2010; 

▪️प्रधान खंडपीठ: नवी दिल्ली.


▪️भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (TRAI) - स्थापना: 20 फेब्रुवारी 1997

▪️मुख्यालय: नवी दिल्ली

चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे


➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

👉 सचिन तेंडुलकर


➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 888


➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 384


➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

👉 1272


➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?

 👉 शिर्डी ते भरवीर


➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?

👉 मुंबई


➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

👉 नीरज चोप्रा


➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

👉 सिद्धरामय्या


1) 45 व्या मिसेस युनिव्हर्स सौन्दर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले?

✅ डॉ. जान्हवी राणे


2) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा कोणत्या दोन राज्याचा जल प्रकल्प आहे?

✅ महाराष्ट्र व गोवा


3) महाराष्ट्राच्या सातारा जिल्यातील कोणत्या नगरपरिषदेला उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या गटात तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?

✅ मलकापूर


4) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये ग्रामपंचायत गटात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?

✅ जालना


5) पाकिस्तान देशातील सत्ताधारी मुस्लिम लीग नावाज गटाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

✅ शाहबाज शरीफ


6) कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने इंडोनिशिया ओपन 1000 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?

✅ चिराग सेट्टी व सात्विकसाईराज


7) गोवा व महाराष्ट्र बार कोंन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

✅ विवेक घाटगे


8) इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

✅ भारत


9) भारताच्या अभिषेक वर्मा याने कोलंबीया येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

✅ सुवर्णं


10) भारतात कुठे सॅफ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?

✅ बंगळूरू


◆ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

➡️ दादासाहेब फाळके.


◆ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

➡️ रूडाल्फ डिझेल.


◆ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

➡️ अनंत भवानीबाबा घोलप.


◆ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

➡️ 270 ते 280 ग्रॅम.


◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

➡️ 4 सप्टेंबर 1927.


◆ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

➡️ पुणे.


◆ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

➡️ जेम्स वॅट.


◆ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

➡️ प्रल्हाद केशव अत्रे.


◆ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

➡️ भावार्थ दीपिका.


◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

➡️ 8 जुलै 1930


1) फिनलंड या देशाच्या नविन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?

✅ पेटेरी ऑरपो


2) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात  आली आहे?

✅ स्वामीनाथन जानकीरमण


3) जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला?

✅ सलमान रश्दी


4) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशहा शेख ने कोणते पदक जिंकले आहे?

✅ सुवर्ण


5) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली?

✅ नेपाळ


6) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून ते २५ जून कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?

✅ अमेरिका

 

7) महीला इमर्जिंग आशिया कप 2023 कोणत्या देशाने जिंकला?

✅ भारत


8) भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी म्हणून कोणती कंपनी उदयास आली?

✅ रिलायन्स


9) क्रेडाई गार्डन पीपल्स पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

✅ अमीत शाह


10) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता?

✅ 21 जून


1) नुकतेच कोणत्या मराठी अभिनेत्रीला 2023 साठी चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?

✅ आशा काळे


2) देशातील पहिली ओमिक्रोन प्रतिबंध लस कोणत्या कंपनीने विकसित केली?

✅ जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स


3) दिल्ली विद्युत नियमक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ उमेश कुमार


4) भारतातील पहिला motoGP रेसिंग इव्हेंट कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आला होता?

✅ उत्तर प्रदेश


5) जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 कोणत्या विमानसेवा कंपनीला मिळाला?

✅ indiGO


6) योगाद्वारे देशाचा प्रचार करणारे पहिले विदेशी सरकार म्हणुन कोणत्या देशाने इतिहास रचला?

✅ ओमान


7) भारताने कोणाला G20 मध्ये शामिल होण्याचा प्रस्ताव दिला?

✅ आफ्रिकन युनियन


8) मुक्ता योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे?

✅ ओडिसा


9) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 23 जून

अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे


अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.


चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.


परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.


रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.


शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.


मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.


ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.


बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.


कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.


सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा


💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

भूगोल प्रश्नसंच


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

राज्य आणि त्यांचे प्रमुख नृत्य

💃आंध्रप्रदेश
👉कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।

💃 आसाम
👉बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।

💃बिहार
👉जाट–जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, डोमचक, बिदेसिया।

💃गुजरात
👉गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

💃हरियाणा
👉झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

💃हिमाचल प्रदेश
👉झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी।

💃जम्मू और कश्मीर
👉रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली।

💃कर्नाटक
👉यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी।

💃केरल
👉कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।  

💃महाराष्ट्र
👉लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।  

💃ओडीसा
👉ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।

💃उत्तराखंड
👉गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली।

💃गोवा
👉तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल। 

💃मध्यप्रदेश
👉जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच। 

💃छत्तीसगढ़
👉गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।

💃झारखंड
👉अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच

💃पश्चिम बंगाल
👉काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।

💃पंजाब
👉भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला। 

💃राजस्थान
👉घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।  

💃तमिलनाडु
👉भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।

💃उत्तर प्रदेश
👉नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता।

💃अरुणाचल प्रदेश
👉बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम। 

💃मणिपुर
👉डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह। 

💃मेघालय
👉शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो। 

💃मिजोरम
👉छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्

05 August 2023

प्रश्न मंजुषा


 प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?


1.महाराष्ट्र ✔️

2.उत्तर प्रदेश

3.गुजरात

4.मध्य प्रदेश


 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?


१.मध्य प्रदेश

२.कर्नाटक ✔️

३.ओडिशा  ‌‌

४. पश्चिम बंगाल



 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?


१.12

२.16 

३.26 ✔️

४. 22




प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?


१.8 महिने

२.3 महिने ✔️

३.6 महिने

४.12 महिने



 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?


१.जी-यात्रा

२.सारथी ✔️

३.स्पॉटिफाई

४.मी-परिवाहन


 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?


१. गंगा

२. कावेरी

३.नर्मदा

४.गोदावरी ✔️



प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?


१.भारत आणि पाकिस्तान ✔️

२.भारत आणि चीन

३.भारत आणि म्यानमार

४.भारत आणि अफगाणिस्तान



 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?


१.बौद्ध ✔️

२.हिंदू

३.जैन

४.वरीलपैकी नहीं



 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?


१.अकबर ✔️

२.हुमायूं

३.शाहजहां

४. शेरशाह सुरी




 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?


१. नायट्रस ऑक्साईड ✔️

२.कार्बन मोनॉक्साईड

३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड






 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?


१.राज कपूर

२.दादा साहेब ✔️

३.मीना कुमारी

४.अमिताभ बच्चन



स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे



 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?


१.कोनराड झुसे ✔️

२.केन थॉम्पसन

३.लन ट्यूरिंग

४.जॉर्ज बुले




 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?


१.लखनौ ✔️

२.हैदराबाद

३.जयपूर

४.म्हैसूर




 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?


१.अलादीन ✔️

२.युनिव्हर्सल सोल्जर

३.वेग

४.लोह माणूस



Q.15  जागतिक यकृत दिन २०१९ ची  थिम काय होती ?


➡️ Love Your Liver and Live Longer

01 August 2023

1935 चा कायदा.

▪️ त्यात 321 कलम, 14 भाग व 10 परिशिष्ट होती.

▪️अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती पण अस्तित्वात आले नाही कारण संस्थानिकांना संघराज्यात सामील होणे ऐच्छिक होते ते सामील न झाल्याने संघराज्य या कायद्यानुसार कधीच अस्तित्वात आले नाही.

▪️ तीन सूची होत्या: संघ सूची, प्रांतिक सूची, समवर्ती सूची.

▪️ या कायद्यानुसार शेषाधिकार गव्हर्नर जनरल कडे होते 1919 च्या कायद्यानुसार मात्र केंद्र सरकारला होते.

 ▪️1919 च्या कायद्यानुसार  प्रांतिक स्तरावर dyarchy व्यवस्था निर्माण करण्यात आली होती ती आता केंद्र पातळीवर निर्माण करण्यात आली.

▪️ प्रांतिक स्तरावर 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली ते 1937 ते 1939 पर्यंत होती.

▪️ संघराज्य कायदेमंडळ द्विग्रहीच ठेवण्यात आलं जे की 1919 च्या कायद्यामध्ये प्रथमतः निर्माण करण्यात आले होते.

▪️ सहा प्रांतात द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं: बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार, आसाम.

 ▪️ फेडरल कोर्टाची स्थापना  1 आक्टोंबर 1937 रोजी 1935 च्या कायद्यानुसारच करण्यात आली पुढे 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टात त्याचे रूपांतरण झाले.

 ▪️फेडरल रेल्वे ऑथोरिटी निर्माण करण्यात आली.

 ▪️केंद्राकडून राज्यांना निर्देशाची कल्पनाही याच कायद्यानुसार घेण्यात आली.

 ▪️केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध 1935 च्या कायद्यातून घेण्यात आलेले आहेत.

▪️ आणीबाणी विषयक तरतुदी

 ▪️Advocate General हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी स्थापन.

 ▪️रिझर्व बँक स्थापनेची तरतूद होती पण स्थापना RBI ACT 1934 नुसार 1935 ला RBI ची स्थापना झाली. 

▪️या कायद्याने भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.

 ▪️या कायद्यावरील मत :

 पंडित नेहरू. : एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले मशीन असे म्हणाले.

 बॅरिस्टर जिना म्हणाले: संपूर्णपणे कुजलेला मूलभूतरित्या आयोग्य आणि पूर्णपणे अस्विकाराह्य असे ते म्हणाले.

 श्री राजगोपालचारी म्हणाले: द्विशासनापेक्षा खराब कायदा होता.

 पंडित मदन मोहन मालवी म्हणाले: हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे तो वर्करणी काहीसा लोकशाहीवादी वाटत असला तरी आतून पूर्णपणे पोकळ आहे.

           

31 July 2023

बल व बलाचे वर्गीकरण

· निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.

1. गुरुत्व बाल

2. विधुत चुंबकीय बाल

3. केंद्रकीय बल

4. क्षीण बल

गुरुत्वबल (Gravitational Force) :

· सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

· न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.

· हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

· एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

· गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.

· न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

· F=G m1 m2 /r2 G = विश्वगुरुत्व स्थिरांक

· SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

· CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

पृथ्वीचे गुरुत्व त्वरण -

· एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

· पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते.

· गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.

· गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी)

· पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे.

· g चे मूल्य ध्रुवावर_ 9.83m/s2 आहे.

· g चे मूल्य विषुववृत्तावर_ 9.78m/s2 आहे.

वस्तुमान (Mass)-

· कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान हो अदिश राशि असून SI एकक kg आहे.

· वस्तुमान सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.

· जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.

वजन (Weight-

· एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

· वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

· वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)

·

· g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.

· वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.

· गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो. तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो. कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.

मुक्तपतन-

· झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.

· मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खर्यात अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे.

विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :

· सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते.

इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

· विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

· लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे.

· आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात.

· धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

· स्थिर विधुतकण गतीमान असतील तरच चुंबकीयबल प्रयुक्त होते. विधुतचुंबकीय बल आकर्षणबल किंवा प्रतिकर्षणबल असे शकते.

· अनुमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील परस्पर आकर्षणाला कारणीभूत बल हे विधूतचुंबकीय बलच असते. त्यामुळे अणूंचे अस्तित्व टिकून असते.

· गुरुत्वबल आणि विधुतचुंबकीय बल ही दोन्ही बले दोन वस्तु बऱ्याच अंतरावर असतानासुद्धा कार्यरत असतात. या दोन्ही बलांना दीर्घमर्यादा क्षेत्र असलेली किंवा लांब पल्ल्याची बले असे म्हणतात.

केंद्रकीय बल (Nuclear Force) :

· अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.

· अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.

· या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

· केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.

· दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.

· केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.

क्षीण बल (Weak Force) :

· इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.

· हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.

· निसर्गात सापडणार्‍या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.

द्रव्याचे वर्गीकरण (Classification of Matter's)

   भौतिक                    रासायनिक
        👇                        👇
  1) स्थायू.            ‌      1) मूलद्रव्य
  2) द्रव.             ‌ ‌       2) संयुगे
  3) वायु.                    3) मिश्रण
  4) आयनायू plasma
  5) Bose Einstein
      Condensate BEC

1)  स्थायू.(Solid)

◆ यांना निश्चित आकार व आकारमान असते.

◆ स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही म्हणून असंपिड्य  असतात.

◆ स्थायू हे अधिक दृढ असतात.

◆ स्थायू मधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, म्हणजेच त्यांच्या दोन कणा मधील अंतर खूपच कमी असते.

◆ यांच्यामध्ये सर्वाधिक आकर्षण (Stong Intraction) असते.

◆ स्थायू हे लवचिक असतात (elastic).

◆ काही स्थायूंना बाह्यबल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात या गुणधर्माला अकार्यता (प्लास्टिसिटी) म्हणतात.

◆ म्हणजेच अकार्यता,स्थितिस्थापकता, दृढता, असंपीड्यता हे स्थायू चे प्रमुख गुणधर्म आहेत.

★ स्थायू चे प्रमुख दोन प्रकार

1) अस्फटिकी स्थायू ( amorphous solid ):-

◆ अनियमित आकाराचे कण मिळून हे स्थायू तयार होतात, यांनाच आभासी स्थायू म्हणतात.

उदा . काच रबर प्लास्टिक
    
2) स्फटिकी स्थायू ( crystalline solid ):-

◆ यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फटिकी कणे असतात, यामधील कणाची मांडणी ही नियमित असते.

उदा. मिठ, हिरा, ग्राफाईट इ.
============================

2) द्रव (Liquid):-

◆ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो.

◆ यात अंतररेणूय आकर्षित बल (Inter Molecular force of attraction) स्थायू पेक्षा कमी व वायू पेक्षा जास्त असते.

◆ यामध्ये दोन रेणू तील परस्परांत स्थायु पेक्षा जास्त व वायू पेक्षा कमी असते.

◆ द्रव्य कमी संपिड्य असतात
============================

3) वायु (Gases):-

◆वायूला निश्चित आकार व आकारमान  नसते.

◆ वायू मधील दोन रेणू मधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ परंतु दोन रेणू मधील आकर्षित बल सर्वात कमी असते.

◆ वायू सर्वात जास्त संपिड्य (Compressible) असतात.
============================

4). आयनायू (plasma )

◆ पदार्थांची ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते.

◆ ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते.

◆ निऑन बल्प यामध्ये निऑन वायू असतो.

◆ Fluorescent bulb - यामध्ये हेलियम वायू असतो.

◆ सूर्य आणि तारे हे याचा अवस्थेमुळे चमकतात.
============================

5) बोस आईन्स्टाईन कंडेनसेट ( BEC )

◆ 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ एस एन बोस यांनी या पाचव्या अवस्थेतीची संकल्पना मांडली.

◆ या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजेच BEC शोधून काढली.

◆ खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करुन की अवस्था प्राप्त होते.
============================

◆ बाॅइल्सचा नियम :- दाब आकारमान संबंध नियम
   
◆ तापमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या आकारमानाच्या व्यस्तानुपाती असतो
  
        p1V1 = p2V2
============================

Charles low. -  तापमान आकारमान संबंध नियम

◆ दाब स्थिर असताना दिलेल्या वायूच्या आकारमान हे नेहमी त्याच्या तापमानाच्या समानुपाती असते.

  V directly proportional to T
  
   V1 / T1 =  V2 / T2
============================

★ गे लुस्सेकस  चा नियम:- दाब -  तापमान संबंध

◆ आकारमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या तापमानाशी समानुपाती असतो.

  P directly proportional to T

p1/T1.= p2 / T2
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂