03 April 2024

चालू घडामोडी :- 02 एप्रिल 2024

◆ T20 मध्ये 300 बळी टिपणारा महेंद्रसिंग धोनी पहिला यष्टीरक्षक आहे.

◆ एमएस धोनी T20 मध्ये 7000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.

◆ राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा एक वाहन एक फास्टग हा नियम देशभरात 01 एप्रिल पासून लागू झाला आहे.

◆ मुंबई मध्ये RBI चा 90वा स्थापन दिवस साजरा करण्यात आला.

◆ सिमरन ब्रम्हदेव थोरात ने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे.

◆ तुळजापूर हे तीर्थक्षेत्र 'कवड्यांचे गाव' म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो च्या प्रधान महासंचालक पदी "शेफाली सरण" यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद महाराष्ट्र या राज्याच्या संघाने पटकावले.

◆ महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने 39वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

◆ महाराष्ट्र राज्याच्या महिला खो खो संघाने 25वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

◆ आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा हा खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.

◆ अमेरिकेत झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद "जानिक सिनर" यांनी जिंकले आहे.

◆ FICCI लेडी ऑर्गनायझेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी जॉयश्री दास वर्मा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ स्टॉकहोम जल पुरस्कार 2024 "तैकान ओकी" यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ स्टॉकहोम जल पुरस्कार हा 1991 या वर्षांपासून दरवर्षी पाण्यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

◆ सीता राम मीना यांची "नायजर गणराज्य" या देशाच्या भारताच्या राजदूत पदी निवड झाली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

02 April 2024

चालू घडामोडी :- 01 एप्रिल 2024

◆ हॉकी इंडिया च्या 2023 वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरीष्ठ पुरस्काराने हार्दिक सिंह यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 अशोक कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ हॉकी इंडिया च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पी. आर. श्रीजेश यांना सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.

◆ भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू मॅथ्यु एबडेन यांनी मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने टेनिस दुहेरी स्पर्धेचे 26वे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत पाहिले स्थान पटकावले आहे.

◆ देशातील आसाम राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे.

◆ महाराष्ट्र राज्याच्या बालमृत्यू दरात प्रति एक हजार 22 वरुन 18 पर्यंत घट झाली आहे.

◆ महाराष्ट्र राज्याचा नवजात मृत्युदर प्रति एक हजार 13 इतका होता. तो आता 11 पर्यंत कमी झाला आहे.

◆ UNO च्या शाश्वत विकास ध्येयानुसार सन 2030 पर्यंत नवजात मृत्युदर 12 पेक्षा कमी करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते.

◆ UNO चे नवजात मृत्युदर कमी जे उद्दिष्ट ठेवले होते. ते महाराष्ट्र राज्याने 2020 या वर्षामध्ये गाठले आहे.

◆ महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे रमेश बैस यांच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ उत्तरप्रदेशातील मथुरा या ठिकाणच्या सांझी क्राफ्ट कलेला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे.

◆ भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव जैसलमेर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे.

◆ जैसलमेर ,राजस्थान येथे 01 ते 10 एप्रिल या कालावधी दरम्यान भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे.

◆ बसिरो डिओमाये यांची सेनेगल या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला नुकतेच 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.

◆ हवामान संबंधी असणारे INDRA ॲप लाँच करण्यात आले आहे.

◆ ''गमाने" नावाचे चक्रीवादळ मादागास्कर या देशात आले आहे.

◆ गोवा च्या जायफळ टॅफी (कॅन्डी) ला पेटंट मिळाले असून याची प्रक्रिया गोवा च्या ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात 'डॉ.ए आर देसाई' यांच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे.

01 April 2024

1857 उठावाची केंद्र आणि नेते

❑ बरेली  ➭   खान बहादुर खान 


❑ कानपुर  ➭   नाना साहब


❑ आरा (बिहार)  ➭   कुँवर सिंह


❑ अवध  ➭   हजरत महल 


❑ झाँसी ➭   रानी लक्ष्मीबाई


❑ हरियाणा  ➭   राव तुलाराम


❑ सम्बल ➭   सुरेंद्र साईं


❑ इलाहाबाद ➭   लियाकत अली


❑ ग्वालियर / कानपुर ➭   तात्या टोपे


❑ लखनऊ ➭   बेगम हजरत महल 


❑ बैरकपुर ➭ मंगल पांडे


नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?



- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखला दिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. 


- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.


-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते. 


-  डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं. 


- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.

सराव प्रश्नसंच


Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?

(a) बिहार

(b) झारखंड

(c) कर्नाटकक

(d) राजस्थान✅


Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?

(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ

(b) प्राण्यांची पैदास✅

(c) पीक फेरपालट

(d) वरीलपैकी कोणतेही नाही


Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?

(a) गहू

(b) शेंगा✅

(c) कॉफी

(d) रबर


Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?

(a) महात्मा गांधी✅

(b) डॉ. बी.आर. आंबेडकर

(c) जी डी बिर्ला

(d) स्वामी विवेकानंद


Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?

(a) कावरत्ती

(b) अमिनी

(c) मिनिकॉय

(d) नील✅


Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?

(a)बिडेसिया

(b) कर्म

(c) रौफ✅

(d) स्वांग


Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?

(a) गहू✅

(b) भात

(c) मसूर

(d) हरभरा


Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?

(a) हिमाचल प्रदेश

(b) जम्मू आणि काश्मीर

(c) कर्नाटक

(d) आसाम✅


Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

(a) लियाकत अली खान

(b) चौधरी खालिक-उझ-जमान

(c) मोहम्मद अली जिना✅

(d) फातिमा जिना


Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?

(a) ध्यानचंद

(b) लिएंडर पेस

(c) सचिन तेंडुलकर✅

(d) अभिनव बिंद्रा


मागोवा इतिहासाचा....

८ मे,१९१५ लॉर्ड हार्डिंग्जच्या हत्तीवर बॉम्बस्फोट करणाऱ्या रासबिहारी बोस आणि शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिवस !


२३ डिसेंबर, १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग्ज आपल्या लवाजम्यासह कलकत्त्याहून निघून दिल्लीत प्रथमच पोचणार होता. एखाद्या राजासारखी हत्तीवरील हौद्यात बसून त्याची लेडीसह मिरवणूक निघणार होती. अन्य मांडलिक राजांचे हत्ती, घोडे, उंट त्याच्यापुढे असणार होते. इंग्रजांशी एकनिष्ठता दाखवण्याची उत्तम संधी ! रासबिहारी बोस आणि त्यांचे सहकारी यांनी या हत्तीवरच बॉम्ब फेकायचा  निर्धार केला. जुन्या किल्ल्यापासून लाहोर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तीन मजली इमारत त्यांनी हेरली. मिरवणुकीच्या वेळी इथे महिला घराच्या माड्यांवर बसून गम्मत पाहणार हे उघड होते. इमारतीत महिलेच्या वेशात जाऊन बसायचे आणि वरून बॉम्ब टाकायचा हे ठरले. मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी, वसंतकुमार विश्वास आणि स्वतः रासबिहारी यामध्ये सहभागी होते. हा बॉम्ब रासबिहारींनी स्वतः निर्माण केला होता. त्याचे नाव होते लिबेर्टो. हा सुरक्षिततेसाठी दोन भागात बनवलेला बॉम्ब होता.


लॉर्ड हार्डिंग्ज पत्नीसह हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या हौद्यात बसला, त्याच्या मागे जमादार बसला आणि राजाच्या ऐटीत मिरवणूक सुरु झाली. क्रान्तिकारकांनी ठरविलेल्या ठिकाणी हत्ती आला. बसंत कुमार बिस्वास बुरखाधारी स्त्रीचा वेष घालून वरच्या मजल्याच्या गच्चीत बसले होते. योग्य ठिकाणी हत्ती येताच त्यांनी बॉम्बचे दोन सुटे भाग जुळवले आणि नेम धरून बॉम्ब हौद्यावर फेकला. जमादार खलास झाला. पाठीकडच्या  चांदीच्या जाड पत्र्यामुळे हार्डिंग्ज वाचला परंतु जखमी झाला , त्याचा अंगरखा फाटला, पुढच्या सत्कार कार्यक्रमातून माघार घेण्याइतकी त्याची तब्येत बिघडली. मिरवणुकीचा त्याने इतका धसका घेतला, की पुढे कपूरथळामध्ये अशी मिरवणूक निघाली तेव्हा त्याने तेथील राजाला स्वतःच्या शेजारी बसवूनच मिरवणुकीत भाग घेतला !


बॉम्बस्फोट करून पाचही जण यशस्वीरीत्या गायब झाले. या स्फोटाच्या तपासात इंग्रजांना थेट यश कधीच मिळाले नाही. पण पुढे फितुरीमुळे रासबिहारी सोडून अन्य चौघे पकड़ले गेले. रासबिहारी जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिन्द सेना उभारली. 

मास्टर अमीरचंद न्यायालयात बेडरपणे उद्गारले, 'तुम्ही ब्रिटिश संख्येने आहात कितीसे ? सर्व भारतीय तुमच्याकड़े पाहुन थुंकले तरी त्या लोटात तुम्ही वाहून जाल, दुर्दैवी आम्ही आहोत, आधी कोण थुंकणार यावर भांडत बसू.'


प्रत्यक्ष कोणताही पुरावा नसुनही इंग्रजांनी दिल्ली कारागृहात अवध बिहारी, भाई बालमुकुंद आणि मास्टर अमीरचंद यांना आजच्याच दिवशी फासावर चढवले तर बसंतकुमार बिस्वास या तरुणाला अम्बाला कारागृहात ११ मे दिनी फाशी देण्यात आले.

हडप्पा संस्कृती थोडक्यात......



▪️(इंग्रजी: Harappan civilization)

👉 ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे.

▪️हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो.

▪️इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.

▪️या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात.

▪️नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात.

▪️जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.

▪️हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.

▪️उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या.

🛑 अशाच प्रकारच्या संस्कृतीचे
      अवशेष पश्चिम भारतात

👉कालीबंगन,
👉धोळावीरा,
👉सरकोटडा,
👉लोथल,
👉दायमाबाद

इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.


'कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?



जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच विचारला जातो. मात्र आता या प्रश्नाचं कोडं लवकरच उलघडणार आहे. भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्त्व विभागाने केला आहे. नऊ वर्षांच्या महाराजा दुलिप सिंह यांच्यासोबत करण्यात आलेल्या तहानुसार त्यांनी कोहिनूर हिरा हिसकावून नेला असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने दिली आहे. 


महाराज रणजित सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता, हा सरकारचा दावा पुरातत्व विभागाच्या खुलाशामुळे आता खोटा ठरला आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली होती. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच अँग्लो-शीख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंह यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता, असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.


सामाजिक कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय दाखल करून कोणत्या आधारावर कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता?, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्तर दिले आहे. कोहिनूर हिऱ्याची माहिती मागवण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हते. म्हणून मी तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो अर्ज एएसआयकडे पाठवला, असे रोहित सबरवाल यांनी सांगितले. रोहित यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नोंदीनुसार लाहोरमध्ये लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलिप सिंह यांच्यात 1849 साली कथित करार झाला असल्याचं सांगितलं. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे कोहिनूर हिरा सोपवला होता. परंतु दुलिप सिंह यांच्या इच्छेनुसार तो इंग्रजांकडे सोपवला नव्हता, हेच स्पष्ट होत आहे. कारण करार झाला त्यावेळी दुलिप सिंह केवळ 9 वर्षांचे होते, असे एएसआयने रोहित सबरवाल  यांना पाठवलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

काँग्रेस अधिवेशनातील काही ठळक घटना

  

१) कलकत्ता अधिवेशन 

- १९०६

- स्वराज्याचा ठराव 


२) सुरत अधिवेशन

- १९०७ 

-काँग्रेस मध्ये पहिली फूट 


३) लखनौ अधिवेशन 

- १९१६

- हिंदू मुस्लिम ऐक्याचा ठराव


४) कलकत्ता अधिवेशन

- १९२०

- असहकार चळवळीला मान्यता


५) लाहोर अधिवेशन

- १९२९ 

- पूर्ण स्वराज्याचा ठराव


६) कराची अधिवेशन

- १९३१

- मूलभूत हक्कांचा ठराव


७) आवडी अधिवेशन

- १९५५

- समाजवादी समाज रचनेचा ठराव


८) फरीदाबाद अधिवेशन

- १९६९

- कॉंग्रेस मधील दुसरी फूट


२ री पंचवार्षिक योजना


◆ कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१

◆ प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग

◆मॉडेल : Mahalanobis Model

◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.


◆ प्रकल्प : 

★ १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने 

★ २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने

★  ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने 

★ ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ

★ ५. नानगल व रुरकेला खत कारखाने.

★ ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला.


● महत्वपूर्ण घटना : 

★ १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर. 

★ २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.

★ ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. 

★ ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल 

★ ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 

★  ६. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण 

★ ७. बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना-1957


दूसरी गोलमेज परिषद



  तारिख :- 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931

  परिषदेचा कार्यकाल :- 3 महिने.

  एकुण प्रतिनिधी :- 107

🖍या परिषदेतील बहुतेक सर्व प्रतिनिधी हे सरकारने निवडलेले एकनिष्ठ, सांप्रदायिक असे होते.

🖍यावेळी इंग्लडमधील मजुर पक्षाचे सरकार जावून त्याजागी संयुक्त राष्ट्रीय सरकार अधिकारावर येवून आयर्विन ऐवजी आता विलिंग्डन हा साम्राज्यवादी व्हॉईसरॉय झाला, तसेच सॅम्युअल होअर हा व्यक्ती भारत मंत्री होता.

🖍परमुख उपस्थित महिला :- बेगम शाहनवाज व राधाबाई सुब्बरायन.

🖍या परिषदेस गांधीजी हे राजपुताना बोटीने गेले व तेथे गांधीजी हे एकमेव काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होते.

🖍इतर महत्वाचे प्रतिनिधी :- मदन मोहन मालवीय, आस. अय्यर, तेजबहादुर व चिंतामणी,मुंजे व जयकर , आंबेडकर व श्रीनिवासन, जीना व सरोजीनी व 2 इतर महिला, व्ही.व्ही.गीरी.

🖍यावेळी लंडनला जाताना गांधींनी आपल्या बरोबर डॉ. अन्सारी यांना सोबत नेण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र लॉर्डविलिंगडन यांनी त्यास नकार दिला.

🖍या दुसऱ्या परिषदेच्या सेक्रेटरी जनरल गटात सी.डी. देशमुख यांचाही समावेश होता.

🖍पहिल्या गोलमेज परिषदेत उपस्थित असलेले सर्व जण हे दुसऱ्या परिषदेत उपस्थित होते.

🖍यावेळी काँग्रेसच्या वतीने गांधींजींसोबत सरोजीनी नायडु याही उपस्थित होत्या.

🖍काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणुन गांधीजींना या परिषदेत उपस्थित करण्याचे प्रमुख कार्य हे तेजबहादुर सप्रु व एम.आर.जयकर तसेच व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री यांनी केले व गांधी आयर्विन करार घडुन आणला व गांधीजींनी या परिषदेत पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, परंतु त्यांनी मुस्लिम व अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध केला.

🖍या परिषदेत ब्रिटिशांनी मुस्लिम, हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपियन आणि अॅग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची घोषणा केली होती व या परिषदेत भारतातील जातीय गटांचे नेते यशस्वी ठरलेत.

🖍ही परिषद अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरून बारगळली.

🖍ठरल्याप्रमाणे गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहिले.परंतु या परिषदेतुन काहीही निष्पन्न न झाल्यामुळे शेवटी जानेवारी 1932 महिन्यात सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले.

🖍नतर 1934 मध्ये गांधींनी पाटणा अधिवेशनात हे आंदोलन मागे घेतले.

विवाहाचे प्रकार



1) ब्रह्म विवाह :

 दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.

विवाहाचा हा प्रकार सर्वश्रेष्ठ

 

2) देव विवाह : 

एखाद्या धार्मिक कार्य या उद्देश्याने किंवा मूल्य रूपात आपली कन्या एखाद्या विशेष वराला सोपवणे याला 'देव विवाह' असे म्हणतात. परंतू या विवाहात कन्येच्या इच्छेकडे दुर्लक्ष केलं जातं. हा मध्यम विवाह आहे.


3) आर्श विवाह : 

कन्या-पक्षाला कन्येचे मूल्य चुकवून (सामान्यतः गो दान करून) कन्येशी विवाह करणे याला 'अर्श विवाह' असे म्हणतात. हा मध्यम विवाह आहे.


 


4) प्रजापत्य विवाह : 

कन्येची संमती घेतल्याविना पालकाद्वारे तिचा विवाह अभिजात्य वर्गाच्या (धनवान आणि प्रतिष्ठित) वरासोबत करणे याला 'प्रजापत्य विवाह' असे म्हणतात.


5) गंधर्व विवाह : 

या विवाहाचे वर्तमान स्वरूप म्हणजे प्रेम विवाह. कुटुंबाच्या समंतीविना वर आणि कन्या यांच्याद्वारे विधीशिवाय आपसात विवाह करणे याला 'गंधर्व विवाह' असे म्हणतात. वर्तमानात हे केवळ यौन आकर्षण आणि धन तृप्ती या हेतूने केलं जातं आणि याला प्रेम विवाह असे नाव दिलं जातं.


 


6) असुर विवाह : 

कन्येला खरेदी करून (आर्थिक रूपाने) विवाह करणे याला 'असुर विवाह' असे म्हणतात.


 


7) राक्षस विवाह : 

कन्येच्या संमतीविना तिचे अपहरण करून बळजबरी विवाह करणे याला 'राक्षस विवाह' असे म्हणतात.


 


8) पैशाच विवाह :

 गुंगीत असलेल्या कन्येचा (गहन निद्रा, मानसिक कमजोरी इत्यादी) लाभ घेत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणे आणि तिच्यासोबत विवाह करणे याला 'पैशाच विवाह' असे म्हणतात.


🔷या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.


ब. जीनांचे चौदा मुद्दे

1) भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी.

2) शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

3) सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

4) सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

5) केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

6) स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

7) पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

8) सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

9) कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.

10) मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

11) राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

12) मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

13) केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

14) केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.


पक्षांतरबंदी कायदा

◾️ ५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. 


◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. 


◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.


◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. 


◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.


◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. 


‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

मसुदा समिती (Drafting Committee)


📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात आली.


लॉर्ड विलिंग्टन (1931-36)

दुसरी गोलमेज परिषद . पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ. 1934 ला आंदोलन मागे.

पंतप्रधान मॅक्डोनाल्डद्वारा कम्युनल अवॉर्डची घोषणा. त्याविरोधात गांधींचे उपोषण येरवडा येथे.


🍀  पणे करार – 1932

1935 चा भारत सरकार अधिनियम


🌸  1935 – आरबीआयची स्थापना

🍀  1935 भारतापासून बर्मा वेगळा

🌸   समाजवादी पक्ष (1934) – आचार्य नरेंद्र देव – जयप्रकाश नारायण

🍀  अखिल भारतीय किसान सभा – 1936


महर्षी धोंडो केशव कर्वे 

☘️  मबई येथील शेठ मुळराज खटाव यांनीही विद्यापीठाच्या वसतिगृहासाठी ३५००० रुपये देणगी दिली होती. 

🌷  आश्रमाने चालविलेले कॉलेज व विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेली पुणे येथील कन्याशाळा विद्यापीठाकडे

देण्यात आली.

☘️   सातारा, सांगली व बेळगाव येथे स्थानिक लोकांच्या मदतीने हायस्कूल काढले व तेही विद्यापीठास

जोडले. अहमदनगर, हैदराबाद, सिंध व नागपूर येथे विद्यापीठाचा विस्तार झाला.


🌸🌸🌸🌸🌸🍀🍀🍀🌸🌸🌸🌸🌸🍀🍀


डफरिन, लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन : 


(२१ जून १८२६–१२ फेब्रुवारी १९०२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८८४–८८ या काळातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल.

 फ्लॉरेन्स (इटली) येथे जन्म. लहानपणापासून डफरिनवर त्याच्या हुशार आईचा (हेलनचा) प्रभाव होता. 

ईटन आणि क्राइस्टचर्च (ऑक्सफर्ड) येथे शिक्षण झाल्यानंतर काही वर्षांतच त्यास डफरिनची सरदारकी (अर्ल) मिळाली. साहजिकच तो हाउस ऑफ लॉर्ड्‌समध्ये बसू लागला व तेथे विविध विषयांवर भाषणेही देऊ लागला. 

तत्पूर्वी म्हणजे १८६२ मध्ये त्याचे हॅरिअट रोअन या युवतीशी लग्न झाले.


पुणे करार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी


डॉ बाबासाहेब अांबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे येथे झालेला समझौता (करार)


पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.




करारनाम्याच्या अटी


पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत.


१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती:


२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील.


३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल.


४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल.


५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल.


६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. .


७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल.


८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल.


९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या.


१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला

फॉरवर्ड ब्लाॕक पक्ष

◾️सभाषचंद्र बोस यांनी 1939 च्या त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर 3 मे 1939 रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली .

◾️ फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 

◾️"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."

◾️या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


➡️ पक्षाचे उद्दीष्ट -

◾️कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


◾️बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवीशर त्याचे उपाध्यक्ष झाले.

◾️जनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 

◾️जलै 1930 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


◾️आध्र प्रदेश-अन्नपुर्ना

◾️मबई- सेनापती बापट, हरी विष्णू

◾️कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम

◾️बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


➡️मुखपत्र-फार्वड ब्लॉक


➡️"नागपुर-पहिली परिषद "


◾️20-22 जून 1940 रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.

◾️परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि 22 जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 

◾️बरिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.


महाराष्ट्र संबंधित महत्वाचे वन लाइनर


1) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
👉 9.7 टक्के .
2) महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?
👉 मध्ये प्रदेश .
3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
👉 रत्नागिरी.
4) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
👉 गोंदिया.
5) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?
👉 रत्नागिरी.
6) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता?
👉 सिंधुदुर्ग.
7) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?
👉 नाशिक.
8) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
👉 अंबोली (सिंधुदुर्ग).
9) महाराष्ट्रात वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
👉 ठाणे जिल्ह्यात.
10) विदर्भातील नंदनवन कोणते?
👉 चिखलदरा.
11) संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे?
👉 शेगाव जिल्हा बुलढाणा .
12) महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
👉 नाशिक

13) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
👉 नाशिक.
14) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
👉 सातपुडा.
15) महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
👉 यवतमाळ.
16) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
👉 NH 6 .
17)cस्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
👉 भगुर (नाशिक ).
18) महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
👉 नांदेड.
19) महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?
👉 सोलापूर.
20) छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
👉 कोल्हापूर येथे 1895 ला.
21) महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
👉 अमरावती.
22) पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
👉 जुन्नर.
23) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
👉 भीमा.
24) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
👉 प्रवरानगर(जी अहमदनगर ). 
25) महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
👉 गोदावरी.
26) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
👉 गोदावरी.
27) महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
👉 अहमदनगर.
28) संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
👉 अमरावती.
29) यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
👉 प्रीतिसंगम
30) भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले?
👉 कर्नाळा जिल्हा रायगड.
31) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
👉 मोझरी (अमरावती)
32) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
👉 कोयना प्रकल्प.
33) महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
👉 गंगापूर (नाशिक)
34) महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
👉 औरंगाबाद.
35) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 बुलढाणा

चालू घडामोडी :- 31 मार्च 2024

◆ IIT मद्रास येथे सहाव्या शस्त्र रॅपिड FIDE मानांकन प्राप्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ICC च्या वार्षिक पुनरावलोकनानंतर शरफुद्दौला इन्ने शाहीद आयसीसी एलिट पॅनेलमधील पहिला बांगलादेशी पंच बनला आहे.

◆ सौदी अरेबिया महिला हक्क आणि लैंगिक समानता या विषयावरील संयुक्त राष्ट्र मंचाचे अध्यक्षपद भूषवणार आहे.[संयुक्त राष्ट्रातील सौदीचे राजदूत अब्दुलअजीझ अलवासिल यांची अध्यक्षपदी निवड झाली.]

◆ दुबईतील मादाम तुसाद येथे अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

◆ बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

◆ 1952 म्हणजे लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाची मर्यादा 25000 इतकी होती.

◆ सार्वत्रिक निवडणुकीत आत्तापर्यंत वाढ होऊन 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी झाली आहे.

◆ मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा मेक्सिको येथे पार पडणार आहे.

◆ 2024 मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू(517 अब्ज डॉलर) असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर ॲपल ही कंपनी आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात मनेरगा च्या मजुरी दरात 24 रुपयांची वाढ झाली आहे.

◆ मनेरगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन 297 रुपये मजुरी मिळणार आहे.

◆ देशात मनेरगा अंतर्गत हरियाणा राज्यात सर्वाधिक 374 रुपये मजुरी दर आहे.

◆ देशात अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यात मेनेरगा अंतर्गत सर्वात कमी 234 मजूरी दर आहे.

◆ SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र या राज्याच्या GDP वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे.

◆ SBI च्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात गुजरात या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली आहे.

◆ भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान 'तेजस'च्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी बंगळुरू येथे घेण्यात आली आहे.

◆ भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रिय क्रिकेट समितीच्या ICC एलिट पॅनल मध्ये सलग पाचव्यांदा स्थान कायम राखले आहे.

◆ ICC ने 2024-25 च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या 12 पंच च्या यादीत 'नितीन मेनन' या एकमेव भारतीयाचा समावेश आहे.

◆ IIT गुवाहाटी द्वारे भारतातील पहिली स्वाइन  लस बनवण्यात आली आहे.

◆ राजस्थानमध्ये जगातील पहिल्या ओम आकारचे मंदिर निर्माण करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महत्त्वाचे पुरस्कार 2023 & 2024

भारत रत्न पुरस्कार 2024 :- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 :- शेनिस पॅलासिओस
मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
आशिया कप 2023 :- भारत
यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 :- क्लॉडिया गोल्डिन
शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी

31 March 2024

चालू घडामोडी :- 30 मार्च 2024

◆ वेस्ट इंडिज चा क्रिकेट पटू सुनिल नरेन हा 500 टी-20 क्रिकेट सामने खेळणार जगातील चौथा खेळाडू ठरला आहे.

◆ लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रिय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे.

◆ मुंबई आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ 56 व्या पुरूष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो- खो स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 'नोएडा' येथे पार पडल्या आहेत.

◆ नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने 'तीन' सुवर्ण पदके जिंकले आहेत.

◆ नोएडा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 15 पदके जिंकली आहेत.

◆ जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी "पी. एन. जी ज्वेलर्स" महाराष्ट्र राज्यातील पहिली सराफी पेढी ठरली आहे.

◆ पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप 2024 चे आयोजन '' या देशात करण्यात आले आहे.

◆ पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या विनय कुमार या खेळाडूने 59 वयोगटात सुवर्ण पदक पटकावले आहे.

◆ इंडिया टीबी अहवाल 2024 'केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने' जारी केला आहे.

◆ 30 मार्च हा दिवस राजस्थान या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रिय शून्य कचरा दिवस 30 मार्च रोजी साजरा केला जातो.

◆ अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024, UNEP आंतरराष्ट्रिय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे.

◆ भारताचा फुटबॉल पटू सुनिल छेत्री याने भारतासाठी 150वा अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला आहे.

◆ देवेंद्र झाझरिया यांची पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (PCI) चे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

◆ स्टार इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जैन यांना प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू(155.8km/h) टाकणारा मयंक यादव हा पहिला खेळाडू ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

30 March 2024

निवडणूक आयोगाच्या घटनात्मक तरतुदी....

❇️ भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.


घटनात्मक तरतुदी:-


1)कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.


2)कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.


3)कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.


4)कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.


5)कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.


6)कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.

संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.


आयोगाची संरचना आणि जबाबदारी:-


❇️ आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.


❇️ निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

नागरिकत्वाची क्रमवारी


देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू...


पहिला नागरिक :- राष्ट्रपती

दुसरा नागरिक :- उपराष्ट्रपती

तिसरा नागरिक :- पंतप्रधान

चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)

पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती

सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष

सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता

आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)

नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश

दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री

११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)

१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख

१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री

१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश

१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री

१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी

१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)

१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री

१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष

२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)

२१ वा नागरिक :- खासदार

२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)

२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य

२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी

२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव

२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी


या सर्वांनंतर देशातील सामान्य व्यक्ती असतो देशाचा २७ वा नागरिक


राष्ट्रपती निवडणूक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल. सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून चाचपणी सुरू झाली आहे. राज्यातील २८८ आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते. राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० एवढी आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल त्या उमेदवाराला राज्यातून २८ हजारांच्या आसपास मते मि‌ळण्याची शक्यता आहे.


● राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?


- राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात. 

- देशातील ७७६ खासदार (५४३ लोकसभा आणि २३३ राज्यसभा) आणि ४१२० आमदार अशा एकूण ४८९६ जणांना मतदानाचा अधिकार असतो. 

- खासदारांच्या एका मताचे मूल्य हे ७०८ आहे. प्रत्येक राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारे आमदारांच्या मतांचे मूल्य हे वेगगेवळे असते. 

- खासदारांची एकूण मते ही ५,४९,४०८ एवढी आहेत. 

- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ एवढी होतात. या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य हे १०,९८,९०३ एवढे आहे. 

- पाच लाखांपेक्षा अधिक मते मिळवणारा निवडून येतो.

- निवडून येण्यासाठी एकूण मताच्या 50% मते + 1 मत पडणे आवश्यक असते.


● अन्य महत्त्वाच्या राज्यांमधील आमदारांच्या एका मताचे मूल्य किती आहे?


- राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते.

- उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक २०८ आहे. याशिवाय तमिळ‌नाडू १७६, ओडिशा १४९, बिहार १७३, झारखंड १७६, बिहार १७३, आंध्र प्रदेश १५९, कर्नाटक १३१, गुजरात १४७ असे मतमूल्य असते.


● खासदारांच्या मतांचे मूल्य कमी होणार?


- लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे मूल्य हे ७०८ आहे. हे मूल्य एकूण विधानसभा आमदारांची मते भागिले एकूण खासदारांची संख्या या आधारे निश्चित केले जाते. 

- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ आहेत. या संख्येला लोकसभा व राज्यसभेचे एकूण खासदार ७७६ याने भागले जाते. त्यातून खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०८ निश्चित करण्यात आले. 

- जम्मू आणि कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू आणि कश्मीरमध्ये अद्याप विधानसभेची निवडणूक झालेली नाही. सध्या जम्मू आणि कश्मीरमध्ये आमदार नाहीत. यामुळे एकूण आमदारांच्या मतांची संख्या कमी होईल. त्याचा परिणाम खासदारांच्या मतांच्या मूल्यावर होणार आहे. 

- खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ वरून घटून ७०० होण्याची शक्यता वर्तविली जाते.


● राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?


- राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व त्याला एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येने भागले जाते. त्यातून येणारी संख्या ही एका मतांचे मूल्य मानले जाते. 

- १९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी चार लाख १२ हजार २३५ होती. या संख्येला २८८ ने भागले जाते. त्यातून एका मताचे मूल्य हे १७५ होते. एकूण २८८ आमदार गुणिले १७५ अशी पद्धतीने राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० होतात.


● राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात ?


- राष्ट्रपती एका निर्वाचन गणाकडून निवडला जातो.

- यामध्ये संसदेचे (राज्यसभा आणि लोकसभा) फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी (खासदार) आणि राज्यांच्या फक्त विधानसभेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार मतदान करतात.

- याशिवाय दिल्ली आणि पाॅडेचेरीचे निवडून आलेले आमदारही निवडूनकीत मतदान करतात.

- एखादा खासदार किंवा आमदार अनुपस्थित होता त्यामुळे निर्वाचन गण अपूर्ण होता या कारणास्तव निवडणूकवर अक्षेप घेता येत नाही.


● संविधानिक तरतुदी


- कलम 52: भारताचा एक राष्ट्रपती असेल

- कलम 53: भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल

- कलम 54: राष्ट्रपतीची निवडणूक 

- कलम 55: निवडणुकीची पद्धत

- कलम 56: राष्ट्रपतींचा कार्यकाळ

- कलम 57: पुनर्निवडीसाठी पात्रता 

- कलम 58: राष्ट्रपतीपदासाठी पात्रता


● राष्ट्रपतीच्या निवडणूकीसंबंधी वाद


- राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या शंका व तक्रारींचे निरसन केवळ सर्वोच्च न्यायालयातच केलं जातं. 

- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वैध ठरवली तरी राष्ट्रपतींनी या आधी केलेल्या कोणत्याही कृती रद्द होत नाहीत व पुढेही अमलात राहतात.