07 May 2024

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ पासूनच लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.माहिती अधिकारातून हा संभ्रम दूर झाला असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वर्णनात्मक पॅटर्नची तयारी सुरु करावी. एमपीएससीकडून परीक्षांचे निकाल लावण्यास दिरंगाई होत आहे. तसेच परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही.

त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ लागू होण्याची शक्यता कमी आहे. हा पॅटर्न लागू करण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवली जाऊ शकते. अशी चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे.

यामुळे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रामाचे वातावरण होते. त्यामुळे एका विद्यार्थ्यांने माहिती अधिकारातून ही माहिती एमपीएससीला विचारली होती. त्यावर एमपीएससीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला आहे.

औरंगाबाद खंडपीठामध्ये शपथपत्र...
खंडपीठात आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये सुद्धा वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करण्यासंबंधी बाब अधोरेखित केली आहे. आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ ही बाब लक्षात घेऊनच निर्णय २०२५ पासून लागू करण्यासंबंधी आयोगाने निर्णय घेतला ही बाब नमूद केलेली आहे. २०२४ मध्ये होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे.

चालू घडामोडी :- 06 मे 2024

◆ फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे प्रवीण सुद उपस्थित होते.

◆ बांगलादेशा मध्ये 03 ते 20 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान ICC महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे.

◆ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

◆ 'ला लिगा फुटबॉल' स्पर्धेचे विजेतेपद 'रेयाल माद्रिद' संघाने पटकावले आहे.

◆ माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक 'पोलंड' या देशाची टेनिस पटू आहे.

◆ वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी 'भविष्य' पोर्टल लाँच केले आहे.

◆ भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी केले आहे.

◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद जपान ने पटकावले आहे.

◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तान चा पराभव केला आहे.

◆ AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कतार येथे करण्यात आले होते.

◆ UNICEF ने करिना कपूर या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ उत्तराखंड टुरिझमने "नक्षत्र सभा" ही भारतातील पहिली  खगोल- पर्यटन मोहीम सुरू केली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

06 May 2024

राष्ट्रीय सभेची (काँग्रेस ) महत्वाची अधिवेशन

🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖

क्र.   स्थळ       वर्ष        अध्यक्ष व महत्व
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1.  मुंबई       1885     व्योमेशचंद्र बॅनर्जी

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°                     
2. कोलकाता  1886   दादाभाई नौरोजी
                               1ले पारशी अध्यक्ष

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
3. चेन्नई      1887   बद्रूद्दीन तैयबजी
                            1ले मुस्लिम अध्यक्ष

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
4. अलाहाबाद 1888    जॉर्ज यूल
                               1ले परदेशी अध्यक्ष

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
16वे. लाहोर  1900  नारायण गणेश
                               चंदावरकर
                            1ले मराठी अध्यक्ष

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
22वे. कोलकाता  1906   दादाभाई 
                                     नौरोजी
                               'स्वराज्य' हे ध्येय
                               
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
23वे  सुरत  1907  डॉ.रासबिहारी घोष
                           - जहाल मवाळ फूट

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
25वे. लाहोर  1909  पं.मदनमोहन
                                 मालवीय
                          - रौप्य महोत्सवी
                              अधिवेशन

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
32वे.  लखनौ   1916  बाबू अंबिकाचरण
                                 मुझुमदार
                              - जहाल मवाळ युती
                            - काँग्रेस-मुस्लिम लीग
                                     युती

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
33वे. कोलकाता  1917  श्रीमती ऍनि
                                      बेझंट
                                -1ली स्त्री अध्यक्षा
                                -1ली परदेशी स्त्री
                                    अध्यक्षा
- या अधिवेशनात वि .रा. शिंदे यांनी मांडलेला अस्पृश्यता विरोधी ठराव संमत करण्यात आला.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
36वे.    नागपूर  1920  चक्रवर्ती विजय
                                  राघवाचार्य.
                             - असहकराचा ठराव
                                   मंजूर

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
41वे. कानपूर  1925   सरोजिनी नायडू
                              - 1 ली भारतीय
                              महिला अध्यक्षा

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
44वे. लाहोर 1929  पं.जवाहरलाल नेहरू
                            - संपूर्ण स्वातंत्र्याचा
                                 ठराव

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
45वे. कराची  1931 सरदार वल्लभभाई
                                  पटेल
                            - मूलभूत हक्काचा
                               ठराव

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
50वे. फैजपूर  1936  पं. जवाहरलाल
                                   नेहरू
                            - सुवर्ण महोत्सवी
                              अधिवेशन
                          - ग्रामीण भागातील
                           1 ले अधिवेशन

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
60वे. आवडी 1955   यु. एन. ढेबर
                             - समाजवादी
                              धोरणाचा ठराव

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
78वे.  मुंबई   1985     राजीव गांधी
                              - काँग्रेस शताब्दी
                                 अधिवेशन.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
* इतर काही महत्वाची माहिती ::

- 1924      बेळगांव    महात्मा गांधी
- लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेस चे अध्यक्ष बनू शकले नाहीत.

- भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी
काँग्रेस अध्यक्ष ::
आचार्य जे. बी. कृपलानी (1946-1947)

- स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती ::
  मौलाना आझाद (1940-1946)

- स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भुषविलेली व्यक्ती ::
सोनिया गांधी (1998- 2017).

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖

चालू घडामोडी :- 05 मे 2024

◆ करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर फोर्स ट्रेनिंग कमांडचा पदभार स्वीकारला आहे.

◆ हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे चंदीगड विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

◆ सुबोध कुमार (IAS) यांची आयुष मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सानिया कद्रे यांची J&K साठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रोड नेटवर्कमध्ये(रस्ते आणि महामार्गाचे जाळे) प्रथम स्थानी अमेरिका हा देश आहे.

◆ रोड नेटवर्क अर्थात रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्यामध्ये भारताने चीनला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

◆ भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे.

◆ भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान 'फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी' या कंपनीने बनवले आहे.

◆ भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला FWD-200B असेही म्हंटले जाते.

◆ जगातील व भारतातील पहिली CNG बाईक बजाज या कंपनीने तयार केली आहे.

◆ ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी-20 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.

◆ काँगो देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे.

◆ जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे.

◆ चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत पाकिस्तान या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे.

◆ चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये पाकिस्तान या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

05 May 2024

महत्वाचे ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

चालू घडामोडी :- 04 मे 2024

◆ आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो.

◆ ई-वाहन खरेदी करणाऱ्यामध्ये देशात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ अनोळखी कॉलरचे नाव दिसण्यासाठी 'ट्राय' नवीन नियम आणणार आहे.

◆ चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची 'चांग-ई-६' ही चंद्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

◆ युक्रेनने जगातील पहिली एआय प्रवक्ता निर्माण केली असून, ती नियमितपणे माध्यमांना व्हिडीओंच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

◆ पूर्णिमा देवी बर्मन यांना 'ग्रीन ऑस्कर' व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 मिळाला आहे.

◆ दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये युएई या देशाने सर्वाधिक 286 पदके जिंकली आहेत.

◆ सौदी अरेबिया हा देश भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशांच्या यादीत भारत 159 व्या स्थानावर आहे.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार नॉर्वे हा देश प्रथम स्थानावर आहे.

◆ पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे.

◆ जेरेमिया मानेले यांची सोलोमन द्वीप या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम [HIMARS(रेंज-300km] रशिया देशाची आहे.

◆ 4 मे हा दिवस 1999 पासून आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

04 May 2024

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प

𝟏)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

𝟐)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

𝟑)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

𝟒)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

𝟓)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ𝟓 नदी - मध्य प्रदेश

𝟔)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

𝟕)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

𝟖)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

𝟗)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

𝟏𝟎)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟏𝟏)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

𝟏𝟐)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟏𝟑)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

𝟏𝟒)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

𝟏𝟓)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

𝟏𝟔)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

𝟏𝟕)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

𝟏𝟖)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

𝟐𝟏)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

𝟐𝟎)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

𝟐𝟏)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

𝟐𝟐)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

𝟐𝟑)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟐𝟒)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

𝟐𝟓)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟐𝟔)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

𝟐𝟕)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

चालू घडामोडी :- 03 मे 2024

◆ ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन’ दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो.

◆ 2024 मध्ये भारत प्रतिष्ठित '46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक' आयोजित करेल.

◆ ‘वैशाली रमेश बाबू’ यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ‘ग्रँडमास्टर’ या पदवीने सन्मानित केले आहे.

◆ न्यूझीलंडमध्ये 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती (JTC) बैठक पार पडली.

◆ 'हितेश कुमार सेठिया' यांची तीन वर्षांसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ EZTax ने भारतातील पहिले AI-सक्षम IT फाइलिंग मोबाइल ॲप लाँच केले आहे.

◆ वरिष्ठ IRS अधिकारी 'प्रतिमा सिंग' यांची 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड' (DPIIT) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रा. मोहम्मद रिहान यांनी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचे (NISE) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे.

◆ युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव "व्हिक्टोरिया शी" हे आहे.

◆ जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे.

◆ जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस चा वेग 100GB पर सेकंद आहे.

◆ UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने नामिबिया या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे.

◆ भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहचला आहे.

◆ नॉर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर 32व्या स्थानावर आहे.

◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे.

◆ आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे.

◆ व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन(UK) या देशाकडून देण्यात येतो.

◆ भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते ग्रेट निकोबार बेट या भगात राहतात.

◆ 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

03 May 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा

1) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत🔰

 D. गुरदयालसिंग धिल्लन.


____________________________


2) खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?

(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.

(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.

(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.

(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.


पर्यायी उत्तरे 

A. (a), (b), (d)

B. (a), (b), (c)🔰

C. (a), (c), (d)

D. (b), (c), (d).


____________________________


3) राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :

(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.

(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,

(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.

(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.


पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b) आणि (c)

 B. (b) आणि (c)🔰

 C. (a), (b) आणि (d)

 D. (a), (c) आणि (d).


___________________________


____________________________


4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता🔰

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________________


5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_____ समावेश होतो.


 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा🔰

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.


____________________________


6) पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.

(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. फक्त (b)🔰

 C. दोन्ही

 D. कोणतेही नाही.


____________________________


7) भारतीय राज्यघटनेतील ___ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21🔰

 C. कलम 22

 D. कलम 31.


____________________________


8) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा🔰

 C. सात

 D. आठ.


____________________________


9) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.


पर्यायी उत्तरे :

 A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.🔰


____________________________


10) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा🔰

 D. चार.


1) खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत?

  A. पर्जन्य🔰

 B. देव

 C. दहिवर

 D. सर्व प्रकाराचे मेघ.


2) खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो?

 A. कार्बन डायऑक्साइड

 B. सल्फर डायऑक्साइड 

 C. क्लोरोफ्लोरोकार्बन🔰

 D. नाइट्रोजन डायऑक्साइड.



3) खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?

 A. अॅन्थ्रासाईट🔰

 B. बिटूमिनस

 C. लिग्नाईट

 D. पीट.


4) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 A. सातपुडा, हरिश्चंद्रगड, सातमाळ, शंभूमहादेव

 B. सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव 🔰

 C. शंभूमहादेव, सातमाळ, सातपुडा, हरिश्चंद्रगड

 D. सातपुडा, सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड.


5) उष्मागतिक रूपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम :

 A. शीत किंवा उबदार🔰

 B. स्थिर व अस्थिर

 C. शीत व स्थिर

 D. उबदार व अस्थिर.



6) कोरड्या व ओल्या फुग्याचा तापमापक कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात ? 

 A. हवेचा भार

 B. तापमान 

 C. सापेक्ष आर्द्रता🔰

 D. वृष्टी.



7) ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

 A. तपांबर

 B. स्थितांबर 🔰

 C. बाह्यांबर

 D. दलांबर.


8) दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 A. भिमा, निरा, कृष्णा, वारणा

 B. वारणा, कृष्णा, भिमा, निरा 

 C. कृष्णा, वारणा, भिमा, निरा

 D. वारणा, कृष्णा, निरा, भिमा.🔰


9) _________ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते.

A. मॉलीबडेनम

B. जस्त

C. मँगनीज

D. बोरॉन.🔰



10) ________ हा न्युक्लीक आम्ल, फायटीन आणि फॉस्फोलिपिडचा महत्वाचा घटक आहे. 

A. फॉस्फरस🔰

B. नायट्रोजन

C. पोटॅशियम

D. कॅल्शियम.




१)  भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.

१. चरणसिंग

२. व्ही.पी.सिंग

३. अटलबिहारी वाजपेयी

४. पी.व्ही.नरसिंहराव


२) सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक कोणत्या मैदानवर झळ\कावले होते.

१. वानखेडे स्टेडीयम

२. ईडन गार्डन

३. लॉर्डस

४. शेर- ए - बांगला स्टेडीयम


३) २०१८ च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.

१. राजस्थान

२. पंजाब

३. हरियाणा

४. हिमाचल प्रदेश


४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.

१. ऑक्टोंबर १४

२. ऑक्टोंबर १५

३. ऑगस्ट १४

४. सप्टेंबर १४


५)  खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.

१. राजीव गांधी

२. व्ही.पी. सिंग

३. चौथरी चरणसिंग

४. चंद्रशेखर


६) १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?

१. चंद्रशेखर

२. लालकृष्ण अडवाणी

३. रामविलास पासवान

४. व्ही. पी.सिंग


७) सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २५ शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.

१. विराट कोहली

२. महेला जयवर्धने

३. केन विल्यम्सन

४. स्टीव्ह स्मिथ


८)  ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा ४३ वां सदस्य देश ठरला.

१. चीन

२. पाकिस्तान

३. भारत

४. ब्राझील


९)  युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.

१. १४ ते २० नोव्हेंबर

२. २० ते २४ नोव्हेंबर

३. १९ ते २५ नोव्हेंबर

४. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर


१०) जागतिक व्यापार संघटनेने २०१९ या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.

१. ७ ऑक्टोंबर

२. १५ ऑक्टोंबर

३. ६ नोव्हेंबर

४. २६ नोव्हेंबर


११) अवयवदानात परिणामकारक चळवळ उभी करणाऱ्या ----------------- या राज्याला केंद्र सरकरने सर्वोत्तम राज्याचा दर्जा दिला.

१. गुजरात

२. महाराष्ट्र

३. तामिळनाडू

४. आंध्र प्रदेश


१२) बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन ---------- शहरामध्ये पहिलीह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

१. पुणे

२. नागपूर

३. औरंगाबाद

४. नाशिक

 

१३)  ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे

१.      झरिया

२.      धनबाद

३.      नोएडा

४.      गाज़ियाबाद – उत्तर प्रदेश

 


१४) 6 जानेवारी 2020 रोजी किसान विज्ञान कॉंग्रेस कोठे आयोजित केली गेली होती? 

१. नवी दिल्ली

२. बंगळुरू

३. पुणे

४. मुंबई

 


१५) राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे ............ देशातील पहिले राज्य ठरले.

१.     केरळ

२.     तामिळनाडू

३.     महाराष्ट्र

४.     आंध्र प्रदेश




राज्यसेवा पूर्व परीक्षा 


उत्तरे :-

१:-४, २:-४, ३:-३, ४:-१, ५:-२, ६:-२, ७;-४, ८:३, ९:-३, १०:-१ ११:-१ १२:-४, १३:.-१, १४:-२ १५:-४



1) 1875 मध्ये बाबू शिशिर घोष यांनी 'इंडियन लीग' नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ?

(a) लोकांना राजकीय शिक्षण देणे

(b) लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे

(c) जमिनदारांच्या हिताचे रक्षण करणे

(d) जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे


पर्यायी उत्तरे :

A. (a), (b) फक्त🔰

B. (c) आणि (d) फक्त 

C. (b) आणि (c) फक्त

D. (a) आणि (c) फक्त.



2) 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ____ सहभागी होत्या.

A. बेबी कांबळे

B. ताराबाई शिंदे 

C. शांताबाई दाणी🔰

 D. आवंतिकाबाई गोखले.


3) _ यांनी 'नॅशनल इंडियन अॅसोसिएशनची' स्थापना केली.

A. मेरी कारपेंटर🔰

 B. सिस्टर निवेदीता

 C. मॅडम कामा

D. डॉ. अॅनी बेझंट.


4) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते  ही होते.

(a) इतिहासकार

(b) अर्थशास्त्रज्ञ

(c) शिक्षणतज्ञ

(d) कवी


पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (c) फक्त

 B. (b) आणि (d) फक्त 

C. (c) आणि (d) फक्त

 D. (a), (b), (c) फक्त.🔰



5) एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ____ यांचा समन्वय होता.

 A. मक्ता, रयतवारी, कायमधारा 

 B. रयतवारी, महालवारी, मौजेवारी 

 C. मौजेवारी, कायमधारा, रयतवारी🔰

D. मक्ता, मौजेवारी, महालवारी.


6) पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?

(a) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल् -अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.

(b) वयाच्या चौविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हीलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.

पर्यायी उत्तरे :

A. महमद इक्बाल

B. बॅरिस्टर जिन्हा

C. अबूल कलाम आझाद🔰

D. शौकत अली.


7) पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?

A. वक्तृत्त्व - कला आणि साधना

B. आमच्या आठवणी🔰

C. दगलबाज शिवाजी

D. माझी जीवन गाथा.


8) होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?

A. खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.

B. अमरावती होमरूल लीगचे खापर्ड अध्यक्ष होते. 

C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते🔰

D. नागपूरच्या परिसरात मुंजेनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.



9) ते लहूजींचे शिष्य होते.लहूजींना त्यांचा अभिमान होता.ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.ते कोण?

A. जोतीबा फुले🔰

 B. यशवंत फुले 

 C. मेघाजी लोखंडे

D. नारायण लोखंडे.


10) खालील व्यक्तींपैकी कोणी फग्र्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?

(a) बी.जी. टिळक

(b) जी.के. गोखले

(c) धों.के. कर्वे

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b) फक्त 

 B. (b), (c) फक्त 

C. (a), (c) फक्त

D. (a), (b), (c). 🔰



1) स्वराज पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते ?

(a) न.चि. केळकर

(b) शांताराम दाभोळकर

(c) पुरूषोत्तमदास त्रिकमदास

(d) भूलाभाई देसाई 

(e) जाफरभाई लालजी


पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c) फक्त

 B. (c), (d), (e) फक्त

 C. (a), (b), (c) आणि (d) फक्त 

 D. (a), (b), (c), (d) आणि (e). 🔰



2)पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.

(a) : ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी

(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया

(c) अँन ऑटोबायोग्राफी


पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (a)

 C. (c), (a), (b) 

 D. (a), (c), (b). 🔰



3) 'रयत शिक्षण संस्थेचे' _ हे उद्दिष्ट नव्हते.

 A. मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे. 

 B. मुलाना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे. 

 C. मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण देणे.

 D. समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्रि-पुरुषांचे संघ निर्माण करणे.🔰



4) 1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?

 A. सुचेता कृपलानी

 B. मृदूला साराभाई

 C. अरुणा असफ अली🔰

 D. लीलाताई पाटील.


5)_________ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.

 A. शंकरराव देव🔰

 B. जमनालाल बजाज 

 C. के.एफ्. नरिमन

 D. किशोरलाल मश्रूवाला.


6) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.

 A. अहमदाबाद, चंपारण, खेड़ा

 B. खेडा, अहमदाबाद, चंपारण

 C. चंपारण, अहमदाबाद, खेड़ा 🔰

 D. चंपारण, खेडा, अहमदाबाद.


7) गो.ग. आगरकरांविषयी काय खरे नाही?

 A. धर्माच्या चौकटित राहूनच विवेकाचे पालन केले पाहीजे.🔰

 B. नीतीमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही.

 C. प्रखर बुद्धिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

 D. 'कवि, काव्य व काव्यरति' हा त्यांचा निबंध आहे.


8) साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ____ येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आला.

 A. कोचार्ज 🔰

 B. आनंदपुरा

 C. जालीसाना 

 D. दलोद.


9) पहिल्या गोलमेज परिषदे विषयी काय खरे आहे ?

(a) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले.

(b) ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.

(c) काँग्रेस धरून 57 ब्रिटीश अमला खालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.

(d) परिषदेस एकूण 89 सभासद होते.


पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b) फक्त

 B. (a), (b) आणि (d) फक्त🔰

 C. (b), (c) आणि (d) फक्त

 D. (c) आणि (d) फक्त.


10) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती ?


A. समता, गुलामी, जनता

B. बहिष्कृत भारत, जनता, गुलामी 

C. बहिष्कृत भारत, जनता, समता🔰

D. बहिष्कृत भारत, समता, गुलामी.


वाचा :- राज्यघटना निर्मिती

1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? 

एन् एम् राॅय(1934)


2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? 

नेहरू रिपोर्ट

 

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली? 

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना) 


4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते? 

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स


5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? 

24 मार्च 1946


6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली? 

16 मे 1946


7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 

389


8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या? 

जुलै -आॅगस्ट 1946


9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? 

296


10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या? 

काँग्रेस 208


11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली? 

299


12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 

70


13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते? 

संयुक्त प्रांत(55)


14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला? 

10 लाख

 

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 

15


16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते? 

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात) 


17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 

9ते23 डिसेंबर 1946


18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते? 

211


19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 

सच्चिदानंद सिन्हा 


20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? 

ए के अँथनी 


21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली? 

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)


22)घटना समितीचे सल्लागार कोण होते? 

बी एन राव

 

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? 

हरेंद्र मुखर्जी 


24)घटना समितीचे सचिव कोण होते? 

व्हि आर अय्यंगार

 

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले. 

11

भारताची राज्यघटना प्रश्नसंच

 दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालतला ............... चे  अधिकार दिलेले आहेत . ]

- १) सञ न्यायालय

- २) उच्च न्यायालय

- ३) दिवाणी न्यायालय#

- ४) जिल्हा न्यायालय


 राज्यपाल हा सोन्याच्या पिंजरयातील पक्षी आहे असे विधान कोणी केले अाहे ? ]

- १) सरोजनी नायडू

- २)  सी . राजगोपालाचारी#

- ३) एन . के अय्यर

- ४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही


  खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ? ]

- १) राष्ट्रपती

- २) राज्यपाल#

- ३) मुख्य निवडणूक

- ४)  वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही


 राज्यसभेचे सभापती कोण असतात? ]

- १) राष्ट्रपती

- २) उपराष्ट्रपती#

- ३) मुख्यमंत्री

- ४) उपमुख्यमंञी


 विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा .

१) उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाठतात .

२) उपराष्ट्रपतीना राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाढताना त्याचे वेतन व भत्ता मिळतो . ]

- १) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

- २) दोन्ही विधाने चूक आहेत .#

- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे.

- ४) वरीलपैकी दोन बरोबर आहे.


 सुरूवातीला म्हणजेच जाने १९५० मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये .................. भाषा होत्या . ]

- १) ८

- २) १२#

- ३) ९

- ४) १४


विभाजनानंतरच्या आंध्रप्रदेशाची  राजधानी अमरावती ...............….. सारखी बनविली जाणार आहे . ]

- १) शांघाय

- २) सिंगापूर#

- ३) अँमस्टरमँड

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


भारतात घटनात्मकरित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली आहे ? ]

- १) १४

- २) १८

- ३) २०

- ४) २२#




 भारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंञ घटना अस्तित्वात आहे ? ]

- १) केरळ

- २) मेघालय

- ३) आसाम

- ४) जम्मू काश्मीर#


भारतीय राज्यघटना दुरूस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणचा सहभाग असतो ? ]

- १) मतदार

- २)  संसद#

- ३) राज्य विधीमंडळे

- ४) न्यायपालिका


 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटनादुरूस्ती च्या पद्धतीची तरतूद आहे ? ]

- १) ३६९

- २) ३६५#

- ३) १२८

- ४) ३६९


 उच्च न्यायालय हे घटनेच्या कोणत्या भागात उल्लेख आढलतो ? ]

- १) भाग ५

- २)भाग ६@

- ३) भाग ४

- ४)भाग ६


 बाँबे उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? ]

- १) १९६२

- २) १९६६@

- ३) १८६२

- ४)१८५४


 दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? ]

- १) १९६६

- २) १८६२@

- ३) १९६१

- ४) १९५४


अहलाहाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? ]

- १) लखनौ@

- २) नागपूर

- ३) पनजी

- ४) जयपूर


 कनिष्ठ न्यासव्यवस्था घटनेच्या भाग किती मध्ये आहे ? ]

- १ )भाग ६@

- २) भाग ३

- ३)भाग ५

- ४) भाग ७


 विधानसभेचा कार्यकाल किती आहे ? ]

- १) ५ वर्ष@

- २) ४ वर्ष

- ३) ६ वर्ष

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


 विधानपरिषधेचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]

- १)  ५ वर्ष

- २) ६ वर्ष@

- ३)  ४ वर्ष

- ४)  यापैकी एकही पर्याय योग्य नाही


 सर्वोच्च न्यायालयाचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]

- १) ५ वर्ष

- २) ६ वर्ष

- ३) ४ वर्ष

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही@


 मसुदा समिती चे उपाध्यक्ष कोण होते ? ]

- १) गोपालस्वामी अय्यंगार@

- २) डॉ बाबासाहेब आबेंडकर

- ३) के एन मुन्शी

- ४ ) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


किती वर्षो पूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती  अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता यत नाही ? ]

- १) २०

- २) १५@

- ३) १०

- ४) एकही पर्याय योग्य नाही


 माहितीचा अधिकार अधिकार अधिनिमय , २००५ चे  कलम १९ व त्याचे उपकलम १ मधील निर्णयाच्या विरूद्ध किती दिवसांत दुसरे अपील करता येते ? ]

- १) १२० दिवसांत

- २) ६० दिवसांत@

- ३) ९० दिवसांत

- ४) ३० दिवसांत


मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंञ्याशी निगडित असेल तर ती  माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? ]

- १) २४ तास@

- २) ४८ तास

- ३) एक आठवडा

- ४) १५ दिवसांत


 ………........ हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती अायुक्त होते . ]

- १) श्री रंगराजन मिश्रा

- २) श्री वजाहत हबीबुल्ला@

- ३) श्री सत्यानंद मिश्रा

- ४) एकही पर्याय योग्य नाही


उच्च न्यायालयेव सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाही ? ]

- १) विधान बरोबर@

- २) विधान चूक

- ३) फक्त सर्वोच्च न्यायालय कक्षेत येते

- ४) एकही पर्याय योग्य नाही


)माहितीचा अधिकार ऑनलाइन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ? ]

- १) गुजरात@

- २) पश्चिम बंगाल

- ३) आंध्र प्रदेश

- ४) वरीलपैकी नाही


) भारतीच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्यीय असे कोणी केले ? ]

- १)  के सी व्हेअर@

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज

- ४) वरीलपैकी नाही


 भारतीय घटनेचे वर्णन वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी केले? ]

- १) के सी व्हेअर

- २)  मॉरिस जोन्स@

- ३) ग्रँनवील ऑस्टिन

- ४) ईवोर जेनिंग्ज


 भारताच्या घटनेचे वर्णन सरकारी संघराज्य असे कोणी केले ? ]

- १) ग्रँनवील ऑस्टिन@

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज

- ४) एकही पर्याय योग्य नाही


 भारताच्या घटनेचे वर्णन "केंद्रीकरणाची प्रवृती असलेले संघराज्य " असे कोणी केले ? ]

- १) के सी व्हेअर

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज@

- ४) वरीलपैकी नाही


 १) राष्ट्रपती नामधारी प्रमुख , तर पंतप्रधान वास्तव प्रमुख .

२) मंञी कायदेमंडळाचे सदस्य असणे . ]

- १) वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहेत@

- २)  वरीलपैकी दोन्हीही चूक आहेत

- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे

- ४)  वरीलपैकी दोन बरोबर आहे


 वार्षिक वित्तीय विवरणपञक............... च्या संमतीने संसदेत सादर केले जाते ? ]

- १) राष्ट्रपती@

- २) राज्यपाल

- ३) मुख्यमंत्री

- ४)  वरीलपैकी नाही


 राष्ट्रपती ना क्षमादान अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आला ? ]

- १) कलम ६१

- २) कलम -७१

- ३) कलम - ७२@

- ४) वरीलपैकी नाही


 राष्ट्रपती चे वैधानिक अधिकार कोणत्या कलमाने सागण्यात येतात ? ]

- १) कलम १२४

- २) कलम १२०

- ३) कलम १२३@

- ४) वरीलपैकी नाही


 विधानसभेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे ? ]

- १) कलम १७०@

- २) कलम १७१

- ३) कलम १६९

- ४) वरीलपैकी नाही


देशात सर्वप्रथम कुटूंब न्यायालयांचा स्थापना कोणत्या साली झाली ? ]

- १) १९९९@

- २) १९१०

- ३) १९९१

- ४) वरीलपैकी नाही