29 March 2024

लक्षात ठेवा!

✅ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)

✅ भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ

✅ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम

✅ प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा

✅ जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश 

✅ सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

✅ मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल

✅ लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड

✅ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली

✅ केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड

✅ मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014

✅ भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश

✅ भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली

✅ भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)

✅ मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम

✅ मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब

✅ सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार

✅ सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

✅ ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली

✅ ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली

✅ ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश

मुलभुत कर्तव्य (Fundamental Duties)


◼️मुलभूत कर्तव्य मूळ घटनेत नव्हती तर स्वर्णसिंह समितीच्या (1976 च्या) शिफारशीनुसार : 42 वी घ.दु. 1976 ला घटनेत नवीन भाग 4A समाविष्ठ केला त्यात कलम 51A समाविष्ठ करून त्यात मूलभूत कर्तव्ये देण्यात आली. त्यात 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ठ करण्यात आली.

◻️स्वर्णसिंह समितीने सांगितलेले कोणत्या शिफारशी घटनेत घेण्यात आल्या नाहीत 👇

    🔻कर देणे  

    🔻कर्तव्य पालन न केल्यास दंड

◼️मूलभूत कर्तव्यांचा अमल : 3 जानेवारी 1977

◻️मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली : रशिया.

◼️86 वी घ.दु. 2002 ला 11वे/K मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ठ करण्यात आले.

◻️कोणकोणत्या देशात मूलभूत कर्तव्य आहेत जपान, व्हिएतनाम, नेदरलँड, रशिया, भारत.

◼️मूलभूत कर्तव्य नसणारे देश: अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मना, आस्ट्रेलिया

◻️मूलभूत कर्तव्ये- न्यायप्रविष्ठ नाहीत हे केवळ भारतीय नागरिकानाच लागु आहेत.

◼️हेतू : घटनाबाह्य व विध्वंसक कृत्याना नियंत्रणात ठेवणे.

◻️भारतीय घटनेचा सर्वात महत्त्वाचा भाग असून सर्वात दुर्लक्षित भाग आहे.

◼️मूलभूत हक्कांना पूरक आहेत.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

NATO चर्चेत आहे त्याबद्दल जाणून घेवू

➢स्वीडन अधिकृतपणे NATO चा 32 वा सदस्य बनला आहे.

➢ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ने अलीकडेच युरोपमधील आपला सर्वात मोठा लष्करी सराव स्टेडफास्ट डिफेंडर 2024 सुरू केला.

➢ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ने अलीकडेच शीतयुद्ध काळातील सुरक्षा कराराचे औपचारिक निलंबन जाहीर केले आहे.

➢ फिनलंड नाटोचा 31 वा सदस्य बनला.

✔️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO).
➢ निर्मिती : ४ एप्रिल १९४९.
➢ मुख्यालय : ब्रसेल्स, बेल्जियम
➢ सरचिटणीस : जेन्स स्टोल्टनबर्ग (नॉर्वे).
➢ एकूण सदस्य : 32 (स्वीडन).
➢ वॉशिंग्टन कराराद्वारे स्थापित.

➢ सध्या नाटोचे 32 सदस्य आहेत.
➢ 1949 मध्ये, युतीचे 12 संस्थापक सदस्य होते: बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स.
➢ इतर सदस्य देश आहेत: ग्रीस आणि तुर्किये (1952), जर्मनी (1955), स्पेन (1982), झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड (1999), बल्गेरिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया (2004). ), अल्बानिया आणि क्रोएशिया (2009), मॉन्टेनेग्रो (2017) आणि उत्तर मॅसेडोनिया (2020), फिनलंड (2023) आणि स्वीडन (2024).

भारत स्वातंत्र्याचा कायदा, 1947

◻️5 जूलै 1947 रोजी ब्रिटीश संसदेत मांडला.

◼️18 जूलै 1947 रोजी राजाची मान्यता.

◻️3 जून 1947 रोजी माऊंट बॅटन योजना जाहीर (फाळणीची योजना) ही योजना मुस्लीम लीग व काँग्रेसने मान्य केली. भारत स्वातंत्र्याचा कायदा-1947 संमत करून योजना लगेचच अंमलात आली.

🟠 कायद्यातील तरतुदी

🔻ब्रिटीश राजवट संपुष्टात 15 ऑगस्ट 1947 पासून स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र - भारत, पाकिस्तान निर्माण झाले.

🔻व्हाईसरॉय पद रद्द- त्याजागी- प्रत्येक देशाच्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसार ब्रिटीश सम्म्राट 'गर्व्हनर जनरल' नियुक्त करेल.

🔻कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आला.

🔻भारतमंत्री पद रद्द- त्याजागी 'राज्यसचिव'.

🔻संस्थानांचा अधिकार- भारतात/पाकिस्तानात/स्वतंत्र राहण्याची मुभा.

🔻नविन राज्यघटना तयार होईपर्यंत- 1935 च्या कायद्यानुसार राज्यव्यवस्था पाहिली जाईल.

🔻इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून 'भारताचा सम्राट' हे शब्द काढण्यात आले.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

28 March 2024

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती' सुरू केले.

◆ SEBI ने वैकल्पिक आधारावर T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती मंजूर केली.(SEBI ची स्थापना 21 फेब्रुवारी 1992 रोजी वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.)

◆ काश्मीर खोऱ्यात, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन अधिकृतपणे लोकांसाठी खुले करण्यात आले.

◆ श्रीजा अकुलाने WTT फीडर स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

◆ मित्तलबेन पटेल यांनी लिहिलेल्या 'सरनामा वगर्ण मानवियो" या पुस्तकावर आधारित गुजराती चित्रपट "भारत म्हारो देश चे" ने गुजरात सरकारद्वारे आयोजित 'गुजरात राज्य पुरस्कार 2021 मध्ये 6 पुरस्कार जिंकले आहेत.

◆ मुंबई ने बिजिंग या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर बनले आहे.

◆ हुरून रिसर्च 2024 च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार जगातील अब्जाधिश शहराच्या यादीत मुंबई शहर तिसऱ्या स्थानावर पोहचले आहे.

◆ जगात सर्वाधिक अब्जाधीश च्या यादीत न्युयॉर्क हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत चीन हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतीय वंशाचे डॉ. टी एन सुब्रमण्यम(गणित तज्ञ) यांचे निधन झाले. ते 'जनरल मोटर्स' वाहन कंपनीचे संस्थापक होते.

◆ महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 या श्रीलंका देशात खेळवल्या जाणार आहेत.

◆ स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते 2017 या वर्षी रामकृष्ण मिशन चे अध्यक्ष(16 वे) झाले होते.

◆ भारताचा आघाडीचा टेबल टेनिस पटू जी. साथीयान जागतिक क्रमवारीत 60व्या स्थानी पोहचला आहे.

◆ लोकसभा निवडणुक 2024 साठी केंद्रिय निवडणुक आयोगाने दिव्यांगासाठी 'सक्षम' हे ॲप लाँच केले आहे.

◆ जागतिक रंगभूमी दिवस दरवर्षी 27 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

◆ 27 मार्च या दिवशी 1961 पासून जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो.[पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला]

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

24 March 2024

चालू घडामोडी :- 23 मार्च 2024

◆ 1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार.(RBI ची स्थापना :- 1 एप्रिल 1935)


◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान देशाच्या 'ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पाहिले विदेशी व्यक्ती ठरले आहेत.


◆ बिहार राज्यात सुपौल जिल्ह्यात कोशी नदीवर देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येत आहे.


◆ बिहार राज्यात 10.2km लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे.


◆ इस्रो कडून भारताच्या पहिल्या पुष्पक या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे.


◆ इस्रो ने पुष्पक या अवकाश यानाची यशस्वी चाचणी कर्नाटक राज्यातील चीत्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे.


◆ हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन इंद्रावती' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


◆ भारत सरकारने हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सूरू केले आहे.


◆ खगोशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला 'शिव आणि शक्ती' नाव दिले आहे.


◆ डॉ. विजय भटकर यांना संगणक शास्त्र या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


◆ Google Deepmind या कंपनीने SIMA AI मॉडेल लाँच केले आहे.


◆ शांघाय ऑपरेशन ऑर्गायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन भारत या देशात करण्यात आले होते.


◆ इंटरनॅशनल टेलिकम्यूनिकेशन युनियन च्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी डॉ. नीरज मित्तल यांनी निवड झाली आहे.


◆ भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट अरुणाचल प्रदेश या राज्यात सूरू करण्यात आले आहे.


◆ उत्तर प्रदेश राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषीत केला आहे.


23 March 2024

चालू घडामोडी :- 22 मार्च 2024

◆ चांद्रयान- 3' मोहिमेसाठी अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'एव्हिएशन वीक पुरस्कार' इस्रोला मिळाला आहे.

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये समिती स्थापन केली होती.

◆ 18 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान, पूर्व समुद्रकिनाऱ्यावर, अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) युद्धसराव पार पडणार आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये भारताच्या पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम अँड ॲक्वेदिक सेंटरचे अनावरण केले.

◆ झोमॅटोने 'शुद्ध शाकाहारी (प्योर व्हेज) डिलिव्हरी फ्लीट सुरु केला आहे. जो ग्रीन डिलिव्हरी बॉक्समध्ये 'शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्‌समधून ऑर्डर घेईल.

◆ दक्षिण कोरियाकडून 'लोकशाहीसाठी AI जोखीम इशारा परिषदेचे आयोजन करण्यात आले.(दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष :- यून सुक योल)

◆ मिझोरामचे माजी मुख्य सचिव लालमलसावमा यांची लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भरत नाट्यममधील योगदानाबद्दल डॉ. उमा रेळे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ राजस्थानने धरणे, जलाशय आणि कालव्यांमधील पाण्याची पातळी आणि उपलब्धतेची वास्तविक- वेळ माहितीसाठी एक समर्पित पोर्टल सुरु केले आहे.

◆ UN अहवालानुसार "प्लॅनेट ऑन द ड्रिंक: 2014-2023 है रेकॉर्डवरील सर्वात उष्ण दशक ठरले.

◆ भारत निवडणूक आयोगाने भूषण गगराणी यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ नयना जेम्सने तिसऱ्या इंडियन ओपन जंपमध्ये सुवर्णपदक जिंकले.(चंद्रशेखरन नायर स्टेडियमवर पहिली इंडियन ओपन जंप स्पर्धा झाली.)

◆ मुस्तफा सुलेमान यांची मायक्रोसॉफ्टचे नवे एआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.(AI लॅबचे सह-संस्थापक :- मुस्तफा सुलेमान)

◆ 2024 मध्ये पॅरिस याठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 'शरथ कमल'(खेळ :- टेबल टेनिस) खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे.

◆ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून 'मेरी कोम' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रशियातील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सौमेंदु बागची यांच्या इराण या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ चिली देशात भारताचे राजदूत म्हणून अभिलाषा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ टी. आर्मस्ट्रांग चांगसन यांची क्युबा या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

22 March 2024

चालू घडामोडी :- 21 मार्च 2024

◆ चेन्नई सुपकिंग्ज पुरुष IPL संघाचे नेतृत्व (कॅप्टन्सी) ऋतुराज गायकवाड करणार.

◆ ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ अंतरराष्ट्रिय वन दिवस 21 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत 10वा क्रमांक आहे.

◆ आंतरराष्ट्रिय वन दिन 2024 ची थीम "वन आणि नवसंशोधन: चांगल्या जगासाठी नवीन उपाय' आहे.

◆ अमेरीका या देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट तयार केला आहे.

◆ ब्राझील देशातील 'रियो डी जेनेरो' येथे या दशकातील सर्वाधिक(62.3°C) तापमानाची नोंद झाली आहे.

◆ जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत भारताचा 126वा क्रमांक आहे.

◆ जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत फिनलंड हा देश प्रथम स्थानावर आहे.

◆ जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत फिनलंड सलग सातव्यांदा प्रथम स्थानावर आहे.

◆ जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत अफगाणिस्तान हा देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे.

◆ संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 20 मार्च या दिवशी जागतिक आनंदी अहवाल सादर केला जातो?l.

◆ राईजिंग भारत संमेलनाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.

◆ ICC टी-20 फलंदाजी क्रमवारीत "सूर्यकुमार यादव" हा खेळाडू प्रथम स्थानावर आहे.

◆ मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने "भारतीय रेल्वे" सोबत करार केला आहे.

◆ 'मेगन' हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया या देशात आले आहे.

◆ तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन दक्षिण कोरिया या देशात करण्यात आले आहे.

◆ अमेरिका आणि जर्मनी या दोन देशांना 10 वर्षात पहिल्यांदा जागतिक आनंदी देशांच्या यादीत पहील्या 20 मध्ये स्थान मिळाले नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पंच प्रयाग

1. देवप्रयाग: येथे भगिरथी आणि अलकनंदा नदीचा संगम होतो.

2. रुद्रप्रयाग: येथे मंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम होतो.

3. नंदप्रयाग: येथे नंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम होतो.

4. कर्णप्रयाग: येथे पिंडार आणि अलकनंदा नदीचा संगम होतो.

5. विष्णुप्रयाग: येथे धौलीगंगा आणि अलकनंदा नदीचा संगम होतो.

- प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम.
- उत्तराखंड राज्यामध्ये वरील पाच संगम स्थित आहेत, यानांच पंच प्रयाग असे म्हंटले जाते.
- उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथे गंगा यमुना आणि गुप्त रूपात असलेली सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होतो, म्हणून अलाहाबादलाच प्रयाग म्हणून ओळखले जाते.
- परंतु अलाहाबादचा पंचप्रयागात समावेश होत नाही.

21 March 2024

एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्या, पण तारखा नाही सांगितल्या

 

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे.


युपीएससी पुढे ढकलेल्या परीक्षांची तारीख सांगू शकते तर एमपीएससी का नाही ; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा संतापजनक सवाल



पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र परीक्षा पुन्हा कधी घेणार याची तारीख जाहीर केली नसल्यामुळे स्पर्धी परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तसेच माजी सनदी अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतूदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल. असे कारण एमपीएससीने घोषणापत्रकात नमूद केले आहे. मात्र पुन्हा परीक्षा कधी घेणार हे सांगितलेले नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाने 'एक्स' समाजमाध्यमावर दिली होती. त्यावेळी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने ही परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. असे स्पष्ट केले होते. तसचे ही परीक्षा आता २६ मे ऐवजी १६ जून रोजी होणार आहे. असे यूपीएससीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. यूपीएससीने तारीख पुढे ढकल्याचे कारण देवून तारीखही जाहीर केली. तर मग एमपीएससीला एवढे तंतोतंत काम करणे का शक्य होत नाही. असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला असून संताप व्यक्त केला जात आहे. 

परीक्षांच्या नियोजनाची मुख्य जबाबदारी ही  एमपीएससीच्या सचिवाची असते. सचिवांनी पुढाकार घेवून नियोजन करणे आपेक्षित आहे. मात्र रोजचा दिवस पुढे ढकलायचा एवढाच कारभार सध्या एमपीएससीच्या कार्यालयात सुरु आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  तसेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा या निगरगट्ट अधिकाऱ्यांना काहीही देणे घेणे पडलेले नाही. त्यामुळे अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांना सेवेत पु्न्हा कधी घेणार याची कोणतीही तारीख देऊ नये. म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांची अवस्था समजेल, असा संताप विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केला.

या तारखांना होणार होत्या परीक्षा 

- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - २८ एप्रिल २०२४ रोजी

- समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा - १९ मे, २०२४ रोजी 


जग सोशल मीडियाच्या पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगतात आले आहे. तंत्रज्ञान इतकं फास्ट झाला आहे, तरीही या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा वेळेवर रिझल्ट लागत नाही आणि वेळेवर तारखा जाहीर करत नाही. कोडगी व्यवस्था ! दुर्दैव! 
- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

एमपीएससी विध्यार्थीच्या आयुष्यशी खेळत आहे. लोकसभा निवडणूक समोर ठेऊन एमपीएससीला वेळापत्रक जाहीर करता आले असते. आणि विद्यार्थींना मनस्ताप झाला नसता. विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात. एमपीएससी विद्यार्थींचा अंत पाहत आहे. 
- राहुल माने, स्पर्धा परीक्षार्थी

परीक्षांचा तारखा पुढे ढकलल्या जातील याची कल्पना विद्यार्थ्यांना होती. यूपीएससीने तत्काळ विद्यार्थ्यांचा विचार करुन नवीन वेळापत्रक जाहीरे केले. त्यानंतर एमपीएससीच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र यूपीएससीच्या घोषणेनंतर एमपीएससीने दोन ते तीन दिवसांचा वेळ घेतला पण नवीन तारखा जाहीर केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आयोगाने लवकरात लवकर परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करता येईल.
- नितीन आंधळे - स्पर्धा परीक्षार्थी

एमपीएससीचा प्रत्येक वेळेचा घोळ आहे. प्रामाणिकपणा, वेळेवर परीक्षा घेणे, निकाल लावणे हा प्रकार एमपीएससीच्या अधिकाऱ्यामंमध्ये नाही. युपीएससी जर वेळेवर निकाल लावते, विद्यार्थ्यांना वेळोवेळो सूचना देत असते, तर ते एमपीएससीला का जमत नाही. कितीतरी विद्यार्थ्यांनी केवळ निकाल वेळेवर लागत नाही म्हणून एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणे सोडून दिले आहे.
- प्रशांत कोळी, स्पर्धी परीक्षार्थी

चालू घडामोडी :- 20 मार्च 2024

◆ विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी "सखी" बहुउद्देशीय ॲप विकसित केले आहे.


◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम आणि जलचर केंद्राचे अनावरण केले.


◆ भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवानीचा चीनच्या शंगराओ सिटी येथील जागतिक बिलिर्डस संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे.


◆ NVIDIA ने Humanoid रोबोट्‌ससाठी प्रोजेक्ट GROOT फाउंडेशन मॉडेल जाहीर केले.


◆ शास्त्रज्ञांनी मंगळावर 29,600 फूट उंच आणि 450 किलोमीटर रुंद पसरलेल्या 'नोक्टिस ज्वालामुखी या प्रचंड ज्वालामुखीचा शोध लावला आहे.


◆ विनय कुमार, 1992 बॅचचे IFS अधिकारी, यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ 1997 च्या बॅचचे IFS अधिकारी टी. आर्मस्ट्राँग चांगसान यांची क्युबातील भारताचे पुढील टराजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ झारखंडचे टराज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.


◆ 'जागतिक चिमणी दिन' दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमधील 'कलिंगा स्टेडियम' येथे भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्रांचे उद्घाटन केले.


◆ भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एक्स टायगर ट्रायम्फ-24’ सुरू झाला आहे.


◆ गयानाने भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे.


◆ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी विवेक सहाय यांची पश्चिम बंगालचे नवे महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ निवडणूक आयोगाने ‘नो युवर कॅन्डीडेट’ ॲप लाँच केले आहे.


◆ IQAIR च्या अहवालानुसार बिहारचे बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.


◆ नेपाळ सरकारने अधिकृतपणे पोखरा ही देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे.


◆ ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ ने आपला 37 वा स्थापना दिवस साजरा केला.


◆ कुमार व्यंकटसुब्रमण्यम हे P&G इंडियाचे नवे सीईओ बनले आहेत.


◆ मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कवयित्री ‘प्रभा वर्मा’ यांना सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.


◆ ‘नॉर्थ ईस्ट गेम्स 2024’ ची तिसरी आवृत्ती नागालँडमध्ये सुरू झाली आहे.


◆ उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘त्रिनेत्र 2.0’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.


सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?

उत्तर malic ऍसिड


२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर टार्टारिक आम्ल


3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर लैक्टिक ऍसिड


4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर ऍसिटिक ऍसिड


5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?

उत्तर फॉर्मिक आम्ल


6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर सायट्रिक आम्ल


7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर ऑक्सॅलिक ऍसिड


8) किडनी स्टोनला काय म्हणतात?

उत्तर कॅल्शियम ऑक्सलेट


9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?

उत्तर हायड्रोक्लोरिक आम्ल


10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?

उत्तर केरळा


11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर गुरुग्राम (हरियाणा)


12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर तिरुवनंतपुरम


13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर श्री हरिकोटा


14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?

उत्तर नवी दिल्ली


15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?

उत्तर कटक (ओडिशा)


16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?

उत्तर भारत


17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?

उत्तर मेजर ध्यानचंद


18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?

उत्तर हरितगृह वायू


19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?

उत्तर ओझोन थर संरक्षण


20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?

उत्तर आर्द्र प्रदेशांचे संवर्धन


21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?

उत्तर 1912 मध्ये जन्म


22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर वॉशिंग्टन डी. सी


23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर मनिला


24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर नैरोबी, केनिया)


25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर जिनिव्हा.


26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर पॅरिस


27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर लंडन


28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर व्हिएन्ना


29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर पॅरिस


30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर जिनिव्हा


31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?

उत्तर space-x


32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर संयुक्त अरब अमिराती (UAE)


33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?

उत्तर PSLV C37


34) शिपकिला पास कोठे आहे?

उत्तर हिमाचल प्रदेश


35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

उत्तर शिपकिला पास


36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर सिक्कीम


37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर अरुणाचल प्रदेश


38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर मणिपूर


39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?

उत्तर मध्य प्रदेश


40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?

उत्तर ओडिशा


41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर कर्नाटक


42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर झारखंड


43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर महाराष्ट्र


44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?

उत्तर चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)


45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?

उत्तर पंचायत शैली


46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?

उत्तर चारबाग शैली


47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?

उत्तर हुमायूनची कबर


48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?

उत्तर द्रविड शैली


49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?

उत्तर चोल शासक


५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?

उत्तर तंजोर. 

नदया व त्यांचे उगमस्थान:-

गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



 #Combine #Prelims साठी भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 12 उपघटकांचा अभ्यास करावे लागतात. त्यातील साधारणतः 6 घटकांचा आज आपण आढावा घेऊ.         


❇️ 1.मूलभूत संकल्पना -

यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित,विकासनशील, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?इ. संकल्पना clear करून घ्या.कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये छान दिल्या आहेत.


प्रश्न - शक्यतो येत नाही. पण या Topic च्या Concepts clear असल्याशिवाय पुढील अर्थव्यवस्था पण समजत नाही.


❇️ 2. राष्ट्रीय उत्पन्न - खूपच conceptual Topic आहे. यातील प्रत्येक concept जोपर्यत व्यवस्थित समजत नाही तोपर्यत खूप अवघड वाटतो. पण एकदा लक्षात आल की मग यासारखा सोपा घटक नाही. कोळंबे सरांच्या पुस्तकात छान cover केलाय.


प्रश्न - Gdp vs Gnp,

        Ndp vs Nnp,

       Gross vs Net

       Value Addition etc. संकल्पनावरती प्रश्न विचारला जातं असतो. अणखी Gdp चे base years चांगले करून ठेवा आणि या base years च्याच Gdp, Poverty, unempolyment etc साठी figure करत चला.


❇️ 3.आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना - आर्थिक नियोजनाची पार्शवभूमी, भारतातील पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी, वृद्धीची उद्दिष्ट्ये, प्रतिमान, Model, योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये चांगली करून ठेवा.


प्रश्न - योजनेचा कालावधी, पंचवर्षिक योजना राबवत असताना राबविलेल्या महत्वाच्या योजना या बाबी चांगल्या करून ठेवा. हा Topic देसले सरांच्या पुस्तकातून चांगला cover होतो.


❇️ 4.दारिद्र्य व बेरोजगारी - Concepts आणि Facts याच मिश्रण असलेला घटक. दारिद्र्यचे प्रकार, Recall Periods,दारिद्र्य मोजमापच्या समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास करावा लागेल.दारिद्र्याच्या figures तोंडपाठ करा. हमखास प्रश्न येतोच.

बेरोजगारी मध्ये त्याच्या व्याख्या म्हणजे श्रम शक्ती कार्य शक्ती बेरोजगारीचा दर या व्यवस्थित करून ठेवा. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती पण चांगल्या करायला हव्यात. हा टॉपिक  कोळंबे सर आणि दिसले सरांच्या पुस्तकातून चांगला करा 


प्रश्न - साधारणता दारिद्र्याचे प्रकार, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या  इ. घटकांवरती नियमित प्रश्न विचारले गेले आहेत.


❇️ 5. लोकसंख्या - यामध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ करून टाका. उदाहरणार्थ. लिंग गुणोत्तर,साक्षरता, लोकसंख्या वृद्धि, लोकसंख्या घनता इ. अलीकडे आयोग लोकसंख्येच्या धोरणांवरतीदेखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 1976 आणि 20 00 लोकसंख्या धोरण चांगलं करून ठेवा.

 देसले सर भाग 2 मधून हा टॉपिक चांगला कव्हर होतो.


❇️ 6. Rbi व बँकिंग - यामध्ये आरबीआयची पार्श्वभूमी, कार्य, त्यामध्ये देखील संख्यात्मक व गुणात्मक साधने आणि एकंदरीत भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये आरबीआयची असलेली भूमिका या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वाचले तरी चालेल.


प्रश्न - आरबीआयची पार्श्वभूमी आरबीआयचे विविध कायदे उदा 1934 act, 1949 बँकिंग रेगुलशन act यावरती प्रश्न विचारले जातात. ते चांगले करा. Rbi ची संख्यात्मक साधने जसं की CRR, SLR, Repo Rate, Reverse Rapo Rate, Open Market Operations (Omos) etc चांगले करा.


 अशा पद्धतीने वरील सहा घटकांची आपण तयारी केली तर Combine Exam मध्ये आपल्याला या घटकांमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.



पण राहीलेले 6 उपघटक Cover करूयात.


❇️ 1. सार्वजनिक वित्त व कररचना -


 यामध्ये सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, अर्थसंकल्प, FRBM कायदा, अर्थशंकल्पची रचना (महसूली व भांडवली )सार्वजनिक कर्ज, तुटीचे प्रकार, करांचे प्रकार, प्रत्येकाचा वाटा, करसुधारणेसाठी नेमलेल्या समित्या अणि वित्त आयोग विशेषतः 15 वा वित्त आयोग हे घटक चांगले करा.


प्रश्न - साधारणता 3-4 प्रश्न या उपघटका वरती विचारले जातात. दिवसेंदिवस प्रश्नांची depth वाढत असल्यामुळे आपल्याला deep level ला जाऊन Study करावा लागेल. Combine 20 मधील कर्जावरील प्रश्न तसेच Frbm प्रश्नावरून आपण भविष्यात प्रश्न किचकट येणार आहेत हे सांगू शकतो. यासाठी अगोदर कोळंबे सर अनि नंतर देसले सरांचे पुस्तक चांगले करून ठेवा.


❇️ 2.परकीय व्यापार व व्यवहारतोल -


 यामध्ये साधारणता आयात - निर्यात आकडेवारी, वस्तुगट, देशांचा क्रम, Fdi ची काही आकडेवारी, व्यवहारतोलाच्या Basic concepts चांगल्या करून ठेवा.आयात निर्यात धोरणनावर एक नजर टाकून घ्या.


प्रश्न - यावरती आयात - निर्यात वस्तूंचा क्रम, देशांचा क्रम यावरती प्रश्न विचारला जातोय. Combine 20 मध्ये अभियांत्रिकी वास्तुवर प्रश्न आला होता. यामध्ये logic असं होत की अभियांत्रिकी वस्तू हा अनेक वस्तूंचा समूह आहे किंवा group आहे. बाकीचे single वस्तू होत्या so answer अभियांत्रिकी वस्तू आल.


❇️ 3. कृषी उद्योग सेवा -


 यामध्ये 1950,1991,2011,2020 या वर्षांमध्ये कृषी, उद्योग अणि सेवा या तिन्ही क्षेत्राचा असलेला Gdp तील वाटा अणि रोजगारातील वाटा करून ठेवावा लागेल. हे chart स्वरूपात आपण लक्षात ठेवू शकतो. शक्य झाल्यास कृषी, उद्योग या घटकांच्या Basic scheme करून ठेवा.


प्रश्न - आकडेवारीवर थेट प्रश्न विचारला जातोय Gdp च्या base year चे आकडे चांगले करून ठेवा. उदा.1950,1990-91,199-2000,2004-05,2011-13,2017-18.


❇️ 4. शासकीय योजना, धोरणे, चालू घडामोडी -


 साधारणतः 2-3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात.2014 पासून योजनांचा अभ्यास बारकाईने करा. 2014 पूर्वीच्या महत्त्वाच्या योजनांची पीडीएफ आपल्या ग्रुप वरती शेअर केली आहे ते एकदा पाहून घ्या. त्यामध्ये दिलेल्या योजना चांगल्या करून ठेवा.


प्रश्न - समाजातील दुर्बल घटक विशेषता महिला,बालक, वृद्ध, सामाजिक समावेशन अशा अनेक योजनांवर आयोग  जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो. देसले सर भाग 2 मधून या योजना चांगले करून ठेवा


❇️ 5. LPG ( Liberalization, Privatization, Globalization )


 हा थोडा Conceptual घटक आहे. यासाठी तुम्हाला भारतीय नियोजनाचा एकंदरीत प्रवास माहित असायला हवा.1991 च्या आर्थिक संकटास कारणीभूत घटक अणि त्यावर मात करण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना केल्या याचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल. त्यामध्ये मग उदारीकरण, खाजगीकरण  आणि जागतिकीकरण या गोष्टी संकल्पना सहित समजून घ्याव्या लागतील.


प्रश्न -साधारणता एक प्रश्न या घटकावर विचारला जातो. या घटकासाठी PYQ चांगले करून ठेवा म्हणजे नवीन प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक ठीक राहील.


❇️ 6. किमती चलनवाढ व पैसा -


 या घटकावर ती आत्तापर्यंत एकच प्रश्न विचारला असून तो 2017 साली पैसा या घटकावर विचारण्यात आला होता. त्यानंतर या घटकावर ती प्रश्न विचारण्यात आला नाही. तरीही किमती व चलन वाढ हे घटक कोळंबे सरांच्या पुस्तकातून पैसा हा घटक देसले सरांच्या पुस्तकातून वाचून ठेवा.


 अशा पद्धतीने तुम्ही कम्बाईन पूर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची परिपूर्ण तयारी करू शकता.




राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

महाराष्ट्र नदिप्रणाली आणि पर्वतरांगा

💐 महाराष्ट्र मध्ये बरेच लहानमोठ्या पर्वतरांगा🏔🏔 आहेत .


💐तया पुर्व- पश्चिम  पसरलेल्या पर्वतरांगाच्यामुळे वेगवेगळ्या नद्यांची खोरी विभगली गेली आहेत.


💐 सह्याद्री पर्वतरांग 🏔 ह 

उत्तरं - दक्षिण अशी पसरली आहे जी रांग नद्यांची पठारावरील नद्या आणि कोकणातील नद्या असे विभाजन करते


💐 सातमाळा-अजिंठा🏔, हरिश्चंद्र-बालाघाट🏔, शंभूमहादेव🏔 या डोंगररांगा सह्याद्रीच्या उपरांगा आहेत


‼️पठारावरील नद्या आणि पर्वतरांगा🏔🏔 च विभाजण‼️


💐पश्चिम वाहिनी नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रागा मधून वहाते


💐 सातपुड्याच्या दक्षिणेस तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.सातपुडा आणि सातमाळा-अजिंठा यांच्या मधून.


💐 पर्ववाहिनी गोदावरी नदी, उत्तरेकडील सातमाळा-अजिंठा व दक्षिणेकडील हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग यांच्या मधून वहाते.


💐 हरिश्चंद्र-बालाघाट व महादेव डोंगर रांगा दरम्यान, भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वहाते.


💐महादेव डोंगरांगेच्या दक्षिण कडून कृष्णा नदी वहाते.


भूगोल प्रश्न व उत्तरे


Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी 


Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी 


Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड

अजिंठा (लेणी)



इतिहास

◾️पराचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे.

◾️ तयांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी.

◾️परातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत.

◾️हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत.

◾️ या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

◾️वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

🟢 रचना

◾️अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत.

◾️लणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

◾️हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे.

◾️महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

◾️विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे.

◾️ह विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली.

◾️बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

◾️अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने १९८३ साली घोषित केलेली लेणी आहेत.

◾️या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला.

◾️समिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.

लक्षात ठेवा

🔸१) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले ..... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय,

 - आंध्र राज्य


🔹२) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते ?

- १ नोव्हेंबर, १९५६


🔸३) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.

- राज्यपाल


🔹४) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? 

- सर्व मंत्री व मुख्यमंत्री


🔸५) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.

- राष्ट्रपती


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६



कोकणातील नद्या व त्यावरील खाडी ,गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


कोकणातील नद्या व त्यावरील खाडी

✍️ नदी  - खाडी

✍️ वैतरणा - दातीवर

✍️ उल्हास  - वसई

✍️ पाताळगंगा -  धरमतर

✍️ कुंडलिका  - रोह्याची खाडी

✍️ सावित्री  - बाणकोट

✍️ वशिष्ठी - दाभोळ

✍️ शास्त्री - जयगड

✍️ शुक - विजयदुर्ग

✍️ गड - कलावली

✍️ कर्ली - कर्ली

✍️ तेरेखोल - तेरेखोल



☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान

✍️ पूर्ण - अजिंठा डोंगरात

✍️ मांजरा - पाटोदा पठारावर, बीड

✍️ पैनगंगा - मराठवाड्यात अजिंठा टेकड्यात

✍️ वर्धा - एमपी -बैतूल

✍️वैनगंगा - मध्यप्रदेश मैकल

✍️ इंद्रावती - ओरिसा (दंडकारण्यात)

_________________


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

गोरा या कांदबरीचे लेखक कोण आहे ?
रविंद्रनाथ टागोर.

हैद्राबाद हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
मुशी.

धनराज पिल्ले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
  हॉकी.

चॉंदबीबीची राजधानी कोठे होती ?
अहमदनगर.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला ?
सिंदखेडराजा.