२८ मे २०२६

जिल्हाधिकारी

– जिल्हा हा प्राचीन कालखंडापासून महत्वाचा घटक मानला जातो.  जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार चालतो.

– रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या मते ” जिल्हाधिकारी असे कासव आहे ज्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती उभा आहे”. जिल्हाधिकारी या पदाचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये विकास होत गेला आहे.

कालखंड                           जिल्हाधिकाऱ्यांचे नाव

मौर्य कालखंड                      राजुका

गुप्त कालखंड                      वीसयापती

मोगल कालखंड                    अमीर / अमल गुजर

ब्रिटीश कालखंड                   जिल्हाधिकारी


भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद १४ मे १७७२ रोजी वॊरन हेस्टींगंज यांनी निर्माण केले. ( महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे )

– १७८७ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायदानाची वदंडाधिकाऱ्याची कामे सोपविली.

– सुरवातीला जिल्हा धिकारी होण्यासाठी ( ICS- Indian Civil Services ) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते.

– भारतामध्ये १९४६ ला ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले.

– सुरेंद्रनाथ बेनर्जी हे भारतातील पहिले ICS  परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती होय. 

– सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS अधिकारी होय. 

– ICS परीक्षेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग वदावा यासाठी ‘ली कमिशनच्या‘ शिफारशीच्या आधारावर भारतामध्ये १९२६ ला सांघिक लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली ( UPSC ).

– स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांघिक लोकसेवा आयोगाचे रूपांतर केंद्रीय लोकसेवा आयोग असे करण्यात आले व भारतीय राज्यघटनेचा कलम ३१५ मध्ये तरतूद करण्यात आली.

– जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील IAS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो.

– महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७ (१) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो.

पात्रता                    पदवीधर असावा

निवड                     केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे

नेमणूक                   राज्य शासन

दर्जा                       IAS चा

कार्यक्षेत्रे                  जिल्हास्तर

वेतन व भत्ते              राज्य शासन

कार्यकाळ                 ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

नियंत्रण                   विभागीय आयुक्त

रजा                       राज्य शासन

राजीनामा                 राज्य शासन

बडतर्फी                  केंद्र शासनाच्यावतीने


२३ मे २०२६

My Strategy : संयुक्त पूर्व परीक्षा

1) पेपर सोडवत असतांना जे जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा शेवटी गणिते सोडवताना उपयोग होतो.

शेवटी गोल काळे करण्यामुळे गोंधळात ते चुकतात आणि वेळ वाया जातो.


2) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न इतिहास,विज्ञान व गणितात असतात ते Skip करत चला.


3) Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.


4) आज आणि उद्या महत्वाचे चार्ट/कलमे/आकडेवारी/गणिते सूत्र/current topics बघून घ्यावे


5) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 10 मिनिटे डोळे लावून आपल्या प्रेरणस्थानाचे स्मरण करा.


6) लक्षात ठेवा तुमची लढाई ही "स्व" ची "स्वतःशी" आहे 


7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.


8) केंद्रावर पोहोचल्यावर मित्रांना भेटून फालतू गप्पा करायच्या टाळून ,चालू घडामोडी वाचण्यावर भर दिला तर उत्तम.

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी शेवटच्या आठवड्यात नियोजन काय असावे?


 राज्यसेवा पूर्वसाठी इतिहासामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण 15 प्रश्नांपैकी आठ ते नऊ प्रश्न हे प्राचीन व मध्ययुगीन भारतावर विचारले जातात.त्यामध्ये देखील 5 ते 6 प्रश्न प्राचीन व दोन-तीन प्रश्न मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात.


 ♦️आता आपण प्राचीन व मध्ययुगीन भारतासाठी नक्की काय Strategy असायला पाहिजे याविषयी बघूयात.


1.राहिलेल्या 7 दिवसातील कमीत कमी आठ ते दहा तासांचा वेळ तुम्ही प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला द्यायला हवा.


त्यामध्ये देखील शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा टॉपिक वाचला तर जास्त फायदा होईल.कारण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या facts खूप लवकर विसरून जातात.कोणी जर हा घटक Skip केला असेल तर अजूनही वेळ आहे हा टॉपिक करून घ्या.कारण Basic reading वरती देखील 4-5 प्रश्न बरोबर येऊ शकतात.


2. प्राचीन  भारतातील काही महत्त्वाच्या घटकांवर आयोग हमखास प्रश्न विचारत आहे. उदा.सिंधू खोरे संस्कृती,महाजनपदे, मौर्य कालखंड,गुप्त कालखंड,गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, वैदिक कालखंड etc.


या सर्व कालखंडातील आयोग व्यक्तीवर जास्त प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे व्यक्तींचा अंदाज घेऊन चांगला अभ्यास करा.या कालखंडातील संस्कृती,भाषा,लोकांची जीवन जगण्याची पद्धती,कला-संस्कृती याचा अंदाज घ्या.


3. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2-3 प्रश्न विचारले जातात.यामध्ये मुघलांचे आगमन आणि भारतातील मुघल घराण्याची स्थापना, मुघलकालीन कला,साहित्य,संस्कृती इ अनुषंगाने अभ्यास करा.त्यानंतर दिल्ली सलतनत,भक्ती चळवळ, सुफी चळवळ, सीख धर्मीयातील विविध चळवळ या वरती आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारतो.


♦️Booklist-


तुम्ही आतापर्यत ज्या booklist मधून read केलं आहे त्यामधून revise करा.


आणखी कोणी जास्त केलं नसेल तर फक्त 6,7 आणि 11 th चे Stateboard मधून Cover करून घ्या. एक optimum Level चे marks नक्कीच भेटतील.


♦️आता आता तुम्ही दोन जानेवारी साठी  प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे प्रश्न सोडवताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात.


1. इतिहासाचे बरेच प्रश्न हे व्यक्तीविशेष म्हणजेच Personality based विचारले जातात. त्यामुळे शेवटचं revision घेताना व्यक्तींवर जास्त focus राहू द्या.अजून आयोग महत्वाच्या व्यक्तींवरतीच प्रश्न विचारतो त्यामुळे Options मध्ये तुम्हाला जर एखादी महत्त्वाची व्यक्ती दिसत असेल तर तेच उत्तर निवडले पाहिजेत.

उदा.2018 च्या Prelims ला अल्लाउद्दीन खिलजी वरती multistatement प्रश्न आला होता. त्यामध्ये अमीर खुसरो हा नामवंत कवी त्याच्या दरबारी होता हे वाक्य होते. आणि तेवढं वाक्य माहित असली की प्रश्न सुटेल.


2. इतिहासामध्ये उत्तरे ही most Inclusive पर्यायचीच असतात.2020 च्या परीक्षेमध्ये शहाजहाच्या दरबारातील चित्रकार विचारले होते. आणि ऑप्शन खूपच Narrow होते.म्हणजे फक्त ab, फक्त bc, फक्त cd आणि चौथा abd. अशा वेळी चौथा म्हणजे most inclusive Option उत्तर असते.

 

3. इतिहासामध्ये एक Timeline असते ती timeline perfect लक्षात आली पाहिजे. उदा.महाजनपदे, मौर्य आणि गुप्त या timeline मधील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सभोवतालच्या छोट्या गोष्टी जरी माहिती असलं तरी प्रश्न Tackle होतो.


4. प्राचीन व मध्ययुगीन भारतातील 8-9 प्रश्नांपैकी साधारणता दोन ते तीन प्रश्न हे जोड्या लावा यावरती असतात. पुढील पाच-सहा दिवस तुम्ही आयोगाचे 2017 पासून 2020 पर्यंत चे पेपर घेऊन  जोड्यांचे पॅटर्न व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये काही कॉमन ऑप्शन्स दिसतील तीच उत्तरे बऱ्यापैकी असतात. किंवा प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहासामध्ये 1234 किंवा 4321 या जोड्यांचा पॅटर्न देखील चालतो.


5. प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न हे out of box असतात. पण त्यालादेखील logic लागू शकत. उदा.2019 मध्ये Achaemenid विजयानंत्तर कंभोज मध्ये कोणता उद्योग सुरु झाला असा प्रश्न होता. आपलं Confusion हे जहाजबांधणी व ब्लॅंकेट बनवणे यामध्ये होत. पण कंभोज हे शहर समुद्रकाठावर वसलेलं नव्हतं याचाच अर्थ तिथं जहाजबंधनी उद्योग सुरु होणे थोडे अवघड आहे.त्यामुळे ब्लॅंकेट बनवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो.


6. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील Options संबंधीचा. तो कोणता? समजा एखाद्या प्रश्नातील Options मध्ये दोन पर्याय जर Close दिसत असतील तर तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त असते.प्रश्न सोडवताना ही Technique तुम्ही निश्चितच वापरू शकता.


7. 2020 ला प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न थोडे tough होते हे मान्य आहे पण त्यामध्येदेखील आपण वरती सांगितल्याप्रणे वेगवेगळे method वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो.


सर्वांना शुभेच्छा!

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.

____________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.


____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________


6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️


____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.


____________________


9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️


____________________


10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.


पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

Combine 2026 Geography खालीलप्रमाणे....


संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️


🔅महाराष्ट्र स्थापना..

महसूल विभाग, जिल्हा,तालूके, घनता,साक्षरता,स्ञी-पुरूष प्रमाण...


🔅महाराष्ट्र :स्थान ,विस्तार व आकार

महाराष्ट्र व भारत अक्षवृत्त व रेखावृत्त विस्तार, महाराष्ट्र व भारताचे  क्षेञफळ,महाराष्ट्र व भारत विस्तार (पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण)


🔅महाराष्ट्र राजकीय भूगोल 


प्रशासकीय विभाग, क्षेञफळानुसार क्रम,तालुका क्रम ,प्रादेशिक विभागानुसार क्रम,विभाग व त्यांच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके

जिल्हांची सरहद्द ,जिल्हा व त्याला लागून असणाऱ्या जिल्हांची सीमा


🔅प्राकृतिक भूगोल(रचनात्मक)

कोकण किनारपट्टी सह्याद्री/पश्चिम घाट,देश/महाराष्ट्र पठार/दख्खन पठार, खलाशी,वलाटी, डोंगर रांगा,खडक आढळ,शिखरे,घाट,लेण्या.....


🔅भारताची व महाराष्ट्राची जनगणना..


एकूण लोकसंख्या,स्ञी-पुरूष प्रमाण, साक्षरता,घनता,SC व ST लोकसंख्या,जिल्हे अनुसूचित जमाती,लोकसंख्या वाढ,जनगणना..


🔅स्थलांतर 


स्थलांतर शेती शेती (प्रकार) ,सर्वाधिक स्थलांतर क्रम, 


🔅नदीप्रणाली 


पूर्व वाहिनी नद्या(गोदावरी,भीमा,कृष्णा) ,पश्चिम वाहिनी नद्या (तापी ,कोकण,नर्मदा)..

कोकणातील नद्या:उत्तर कोकण-मध्य कोकण-दक्षिण कोकण....उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा..लांबीनुसार व क्षेञफळानुसार क्रम..


🔅खनिज संपत्ती .


🔅धरणे,पठार, धबधबे,हवामान,


🔅वनसंपत्ती,महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने,अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प 


🔅महाराष्ट्रातील उर्जा साधन संपत्ती


औष्णिक विद्युत केंद्र(प्रकल्प), जलविद्युत, खनिज तेल व नैसर्गिक वायू,अणुऊर्जा प्रकल्प, अणुभट्या ,पवनउर्जा 


🔅राष्ट्रीय महामार्ग 44,53

रेल्वे ,पर्यटन 


🔅कृषी(min 2 question)...रोग ,रासायनिक खत, शेळी, मेंढ्या,म्हैस,  यांच्या जाती किंवा विविध पिकांची जात याच्यावरती प्रश्न येतो ...त्याचबरोबर वनस्पती(मुख्य पीके) Scientific Name, सुद्धा विचारू शकतात..etc


🔅india मधील..कर्कवृत्त क्रम, सरहद्द,मृदा,खनिज, खिंडी,महत्वाच्या नद्या...हवामान, महत्वाचे प्रकल्प,...व्यवस्थित करा..


जास्तीत जास्त revision करा ....भरपूर मार्क मिळवून देणारा विषय आहे....

Question banks

 प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.

1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल 

2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √

3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी 

4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल


प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.

अ. पृथ्वीचे परीभ्रमण 

ब. पृथ्वीचे परिवलन

क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे    

ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे


1) अ,ब 

2) ब, क, ड

3) सर्व कारणीभुत घटक   √

4) अ,ब व क


प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.

अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह


1) अ,ब, क 

2) अ, ब, ड 

3) अ,ब,ड √

4) वरील सर्व


प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.

अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.

ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.

क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.


1) अ,क

2) अ 

3) अ,ब 

4) वरील सर्व. √


प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.

अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी

इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच 

उ. भुस्तंभ


1) सर्व योग्य 

2) सर्व अयोग्य 

3) क, ड, इ, ई, उ 

4) इ, ई.  √


प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.

अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.

ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.

क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.


1) अ 

2) ब 

3) क 

4) यापैकी नाही.  √


प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

अ. ऑस्टे्रलिया 

ब. नामिबिया 

क. ब्राझिल 

ड. चिली


1) अ,ब,क 

2) ब व क 

3) अ,ब, क 

4) सर्व योग्य.  √


प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.

अ. छोटा नागपूर 

ब.माळवा 

क. बुंदेलखंड 

ड. बाघेलखंड


1) ब,क,ड,अ.  √

2) क,ब,ड,अ 

3) अ,क,ड,ब 

4) ब,क,अ,ड


प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)

अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.

ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.

क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची

आहे.


1) अ व ब 

2) ब व क 

3) अ व क 

4) सर्व योग्य.  √


प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.


1. चिरोली   

2. गरमसूर 

3. गाळणा 

4. मुदखेड


.      अ     ब      क    ड

1)    3     4      2     1.  √

2)    3     4      1     2

3)    1     2      3     4

4)    1     2      4     3

👍




राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-



सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सगळे विषय पुन्हा करण्याचं असाध्य नियोजन करू नका. 


✳️ CSAT बद्दल:-


CSAT चा दिवसाला एक Question पेपर time लावून solve करून त्याचे analysis करा.(वेळ दुपारी ३ ते ५ च असू द्या)

शक्यतो आयोगाच्या पूर्वीच्या Question पेपरवरच भर द्या.

गणिते सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या  गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेच्या पेपरचा सुद्धा वापर करा.

गणिताचे फॉर्म्युले, logics एका पेजवर separately काढून ठेवा आणि त्यांची वेळोवेळी उजळणी करा. 


✳️ GS बद्दल:-


संपूर्ण GS पुन्हा आठवडाभरात संपवण्याच्या  मागे लागू नका, त्याऐवजी स्वतः चा अभ्यास check करायचा असेल तर PYQ सोडवा.

असे topics जे की फक्त पुर्वलाच आहेत आणि तुमचे वाचायचे राहिले आहेत तर ते वाचून काढा जसे की :- Ancient history, World geography.

रात्री जेवल्यानंतर एक तास रिलॅक्सेशन म्हणून current affairs वाचा.

पेपरच्या आदिच्या दिवशी काय वाचायचे आहे त्याची एक यादी तयार करा:-

जसे की:-

1. CSAT फॉर्म्युले व logics.

2. तयार केलेल charts:-Constitutional non constitutional bodies.

3. जनगणना च्या notes.

4. Constitution चे महत्त्वाचे  articles.

5. World geography Maps.



✳️ काही महत्वाच्य‍ा गोष्टी:-

नवीन काही वाचू नका, जे काही आधी वाचले आहे तेच वाचा.

Daily अभ्यास 9 ते 10 तास खूप झाला, परीक्षा आली आहे म्हणून खूप अवाजवी असा अभ्यास करायला जावू नका कारण लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर तुमच्या संयमाची व आत्मविश्वासाची पण आहे.

स्वतःचे झोपण्याचे खाण्या-पिण्याचे एक चांगले routine असू द्या.

रात्री जागणे, दिवसा झोपणे, बाहेरचे खाणे या गोष्टी टाळाच.

Group discussion पेक्षा Self study वर च भर द्या.

स्वतःच्या अभ्यासाची हुशारीची इतरांबरोबर तुलना करू नका.

अनावश्यक व दडपण आणणार्‍या गोष्टींची चर्चा टाळा व अशा लोकांपासून पण दूर राहा जसे की पेपर कसा असेल, पेपरच्या आधीच cut off किती असेल, जागा वाढतील का वगैरे वगैरे..



येणाऱ्या राज्यसेवा पूर्व साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐


महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.


🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 

🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 

🔶पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 

🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.

🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.

🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.

🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.

🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 

🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.

🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.

🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 

🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 

🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 

🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 

🔶 राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. 

मागासवर्गीय आयोग

 सध्या मागासवर्गीय आयोग Current मध्ये आहेत.... येणाऱ्या Exams मध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहेत....✅✅


🔴भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत 

राष्ट्रपती आदेशाद्वारे, "सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीची चौकशी" करण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य वाटतील अशा व्यक्तींचा नेतृत्वाखाली आयोग नियुक्त करू शकतात.


📌आतापर्यंतचे मागासवर्गीय आयोग :-


📍1st मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 29 January 1953

➡️अंतिम अहवाल:- 30 मार्च 1955 रोजी सादर

➡️अध्यक्ष : काकासाहेब कालेलकर

➡️कार्य:- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या परिस्थितीचा व पार्श्वभूमीचा अभ्यास करणे व 'शैक्षणिकदृष्ट्या मागास' म्हणून लोकांची निवड करण्याचे निकष ठरवले.

➡️अहवाल:- ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतात 2399 मागास गट आहेत. त्यापैकी 837 'सर्वात मागास' आहेत आणि मागासलेपणाचा प्रमुख पुरावा म्हणून जातीचा उल्लेख केला. 


⚠️तथापि, केंद्र सरकारने, जातविहीन समाज निर्माण करण्याच्यादृष्टीने, शिफारसी नाकारल्या.


📍2nd मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 1 जानेवारी 1979

➡️अंतिम अहवाल:- 31 डिसेंबर 1980

➡️अध्यक्ष:- B.P. मंडल (बिहारचे CM)

➡️मुख्य उद्देश:- भारतातील सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची ओळख करून देणे आणि जातीय असमानता आणि भेदभाव दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार करणे हे मंडल आयोगाचे मुख्य उद्देश होते .

➡️वैशिष्ट्ये:- मागासलेपणा निश्चित करण्यासाठी अकरा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशक वापरले

➡️शिफारसी:- ओबीसीना सरकारी नोकरीत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली.



📍3rd इतर मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 2 ऑक्टोबर 2017

➡️अहवाल: 31 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर

➡️रचना :- चार सदस्यीय आयोग)

➡️अध्यक्ष:- दिल्ली H.C च्या माजी मुख्य न्या. जी.राहिणी

➡️सदस्य:-3

🔴1. जे.के. बजाज (चेन्नईच्या सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक)

🔴2. गौरी बसू (भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण संचालक, कोलकाता)

🔴3. विवेक जोशी (रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त) 


➡️समितीचे सचिव:- यू. वेंकटश्वरालू

➡️या आयोगाला आत्तापर्यंत 14 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती.

➡️उद्देश : ओबीसींमधील अधिक मागासलेल्यांना आरक्षणाच्या फायद्यांचा लाभ घेता यावा यासाठी आणि आरक्षणाच्या लाभांचे अधिक न्याय्य वितरणाचे सुनिश्चितीकरण आणि ओबीसींमध्ये उप-वर्गीकरण करता येईल असे निकष आणि मापदंड ठरवणे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 प्रश्न ,-दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?

अ) पंजाबी

ब) गुजराती✅

क) हिंदी

ड) तमिळ

___________


प्रश्न-भारतीय कृषि अनुसंधान संस्था कोठे आहे?

अ) मुंबई

ब) कानपूर

क) नवी दिल्ली✅

ड) कर्नाल

___________


प्रश्न-दुधाचा महापूर हि योजना भारतात दुसऱ्यांदा केव्हा सुरू झाली?

अ)1971

ब)1975

क)1979✅

ड)1991

___________


प्रश्न-दुधाचा महापूर ही योजना भारतात  तिसऱ्यांदा केव्हा सुरू झाली?

अ)1971

ब)1979

क)1991✅

ड) यापैकी नाही

___________


प्रश्न-2011 साली झालेली भारताची कितवी लोकसंख्या जनगणना होती?

अ) 13वी

ब) 14वी

क)15वी✅

ड)16वी

___________


प्रश्न-पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर कोणते?

अ) लोथल

ब) आगाखान पॅलेस

क) आनंद

ड) आनंद भवन✅

___________


प्रश्न-दलितांचा मुक्ती राजा या शब्दात डॉक्टर आंबेडकरांचा गौरव कोणी केला?

अ) डॉक्टर बेव्हरेल  निकोल्स

ब) शाहू महाराज✅

क) महात्मा ज्योतिबा फुले

ड) यापैकी नाही

___________


प्रश्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली?

अ) भंते प्रज्ञानंद

ब) भंते चंद्रमणी महास्थिर✅

क) भंते सद्दतिस्स

ड) भंते संघरत्न

___________


प्रश्न-1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकर यांना कोणती पदवी बहाल केली?

अ) एम. ए.

ब) पी.एच.डी✅ 

क) एल. एल.डी 

ड) डी. एस.सी.

___________


प्रश्न-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली?

अ) कलम 340✅

ब) कलम 341

क) कलम 342

ड) कलम 343

___________


प्रश्न-विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला?

अ) 1989 

ब) 1990✅

क) 1992 

ड) 1994

___________


प्रश्न-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

अ) थॉट्स ऑन पाकिस्तान✅

ब) बुद्ध आणि त्यांचा धम्म

क) हू वेअर शुद्राज

ड) द अनटचेबल्स

___________


प्रश्न- एकात्मिक आदर्श कृषि ग्राम योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

अ) केरळ 

ब) बिहार 

क) उत्तराखंड✅

ड) महाराष्ट्र

___________


प्रश्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरु पैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला गुरु मानले?

अ) महात्मा ज्योतिबा फुले 

ब) तथागत गौतम बुद्ध 

क) संत कबीर ✅

ड) यापैकी नाही

___________


प्रश्न-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली?

अ) 14 ऑक्टोबर 1935 

ब) 13 ऑक्टोबर 1955 

क) 14 ऑक्टोबर 1955 

ड) 13 ऑक्टोबर 1935✅

___________


प्रश्न -......... रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला?

अ) 1 ऑगस्ट 1920✅

ब) 1 ऑगस्ट 1925 

क) 1 ऑगस्ट 1929 

ड) 1 ऑगस्ट 1935

___________


प्रश्न - कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली?

अ) 1969 

ब) 1972 

क) 1980 

ड) 1985✅

__________


प्रश्न -...... हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे?

अ) जायकवाडी 

ब) भाक्रा नांगल✅ 

क) तुंगभद्रा 

ड) हीराकुंड

___________


प्रश्न - ओलान हे ऐतिहासिक शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

अ) व्हेनिस✅

ब) नेपल्स 

क) मिलान

ड) तुरीन

___________


प्रश्न- भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील .........क्रमांकाचा देश आहे?

अ) पहिल्या 

ब) सहाव्या 

क) सातव्या✅

ड) आठव्या

___________


प्रश्न - अंदमान निकोबार बेटाची राजधानी ......आहे?

अ) पोर्ट ब्लेअर✅ 

ब) कवरत्ती

क)  दिल्ली 

ड) सिल्वासा

___________


प्रश्न - इंदिरा गांधी कालवा....... राज्याच्या वायव्य भागात आहे?

अ) राजस्थान✅

ब) गुजरात 

क) उत्तर प्रदेश 

ड) मध्य प्रदेश

___________


प्रश्न - महात्मा गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक कधी सुरू केले?

अ) 1930 

ब) 1933✅

क) 1936 

ड) 1939

___________


प्रश्न-कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?

अ) वेदगंगा 

ब) वारणा

क) कृष्णा

ड) पंचगंगा✅

___________


प्रश्न -1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कोणत्या ठिकाणी स्थापन झाले?

अ) विशाखापट्टणम 

ब) कांडला✅

क) कोचीन 

ड) यापैकी नाही

राष्ट्रपती निवडणूक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल. सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून चाचपणी सुरू झाली आहे. राज्यातील २८८ आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते. राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० एवढी आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल त्या उमेदवाराला राज्यातून २८ हजारांच्या आसपास मते मि‌ळण्याची शक्यता आहे.


● राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?


- राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात. 

- देशातील ७७६ खासदार (५४३ लोकसभा आणि २३३ राज्यसभा) आणि ४१२० आमदार अशा एकूण ४८९६ जणांना मतदानाचा अधिकार असतो. 

- खासदारांच्या एका मताचे मूल्य हे ७०८ आहे. प्रत्येक राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारे आमदारांच्या मतांचे मूल्य हे वेगगेवळे असते. 

- खासदारांची एकूण मते ही ५,४९,४०८ एवढी आहेत. 

- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ एवढी होतात. या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य हे १०,९८,९०३ एवढे आहे. 

- पाच लाखांपेक्षा अधिक मते मिळवणारा निवडून येतो.

- निवडून येण्यासाठी एकूण मताच्या 50% मते + 1 मत पडणे आवश्यक असते.


● अन्य महत्त्वाच्या राज्यांमधील आमदारांच्या एका मताचे मूल्य किती आहे?


- राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते.

- उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक २०८ आहे. याशिवाय तमिळ‌नाडू १७६, ओडिशा १४९, बिहार १७३, झारखंड १७६, बिहार १७३, आंध्र प्रदेश १५९, कर्नाटक १३१, गुजरात १४७ असे मतमूल्य असते.


● खासदारांच्या मतांचे मूल्य कमी होणार?


- लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे मूल्य हे ७०८ आहे. हे मूल्य एकूण विधानसभा आमदारांची मते भागिले एकूण खासदारांची संख्या या आधारे निश्चित केले जाते. 

- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ आहेत. या संख्येला लोकसभा व राज्यसभेचे एकूण खासदार ७७६ याने भागले जाते. त्यातून खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०८ निश्चित करण्यात आले. 

- जम्मू आणि कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू आणि कश्मीरमध्ये अद्याप विधानसभेची निवडणूक झालेली नाही. सध्या जम्मू आणि कश्मीरमध्ये आमदार नाहीत. यामुळे एकूण आमदारांच्या मतांची संख्या कमी होईल. त्याचा परिणाम खासदारांच्या मतांच्या मूल्यावर होणार आहे. 

- खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ वरून घटून ७०० होण्याची शक्यता वर्तविली जाते.


● राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?


- राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व त्याला एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येने भागले जाते. त्यातून येणारी संख्या ही एका मतांचे मूल्य मानले जाते. 

- १९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी चार लाख १२ हजार २३५ होती. या संख्येला २८८ ने भागले जाते. त्यातून एका मताचे मूल्य हे १७५ होते. एकूण २८८ आमदार गुणिले १७५ अशी पद्धतीने राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० होतात.


● राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात ?


- राष्ट्रपती एका निर्वाचन गणाकडून निवडला जातो.

- यामध्ये संसदेचे (राज्यसभा आणि लोकसभा) फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी (खासदार) आणि राज्यांच्या फक्त विधानसभेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार मतदान करतात.

- याशिवाय दिल्ली आणि पाॅडेचेरीचे निवडून आलेले आमदारही निवडूनकीत मतदान करतात.

- एखादा खासदार किंवा आमदार अनुपस्थित होता त्यामुळे निर्वाचन गण अपूर्ण होता या कारणास्तव निवडणूकवर अक्षेप घेता येत नाही.


● संविधानिक तरतुदी


- कलम 52: भारताचा एक राष्ट्रपती असेल

- कलम 53: भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल

- कलम 54: राष्ट्रपतीची निवडणूक 

- कलम 55: निवडणुकीची पद्धत

- कलम 56: राष्ट्रपतींचा कार्यकाळ

- कलम 57: पुनर्निवडीसाठी पात्रता 

- कलम 58: राष्ट्रपतीपदासाठी पात्रता


● राष्ट्रपतीच्या निवडणूकीसंबंधी वाद


- राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या शंका व तक्रारींचे निरसन केवळ सर्वोच्च न्यायालयातच केलं जातं. 

- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वैध ठरवली तरी राष्ट्रपतींनी या आधी केलेल्या कोणत्याही कृती रद्द होत नाहीत व पुढेही अमलात राहतात.

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

साडी


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 अरबी समुद्र


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

ठोसेघर धबधबा


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

औरंगाबाद


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

पुणे


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 भूकंप


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 नाशिक


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

नांदेड


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

 गडचिरोली


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

 रत्नागिरी.

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

१८ मे २०२६

माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...



अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला...

त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील...

मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार
..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...

 वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..!

ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...

 तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."

शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...

असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे...!

स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरणासह उत्तरतालिका....

विषय : महाराष्ट्र राज्य भूगोल स्पष्टीकरण....

प्र.1) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते ?

अ) नाशिक
ब) अहमदनगर
क) कोल्हापूर
ड) पुणे

उत्तर : क) कोल्हापूर

प्र.2) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?

अ) ११,२०,५४,६६६
ब) ११,२३,७४,३३३
क) १२,३३,७५६,५४२
ड) २१,११,३३,६६६

उत्तर : ब)  ११,२३,७४,३३३ : सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ईतकी आहे.

प्र.3) महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?

अ) २९ जिल्हे
ब) ३४ जिल्हे
क) ३६ जिल्हे
ड) ३८ जिल्हे

उत्तर : क) ३६ जिल्हे
स्पष्टीकरण : सन २०११ च्या जणगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतात एकूण ६४० जिल्हे होते, त्यांपैकी ३५ जिल्हे महाराष्ट्र राज्यात होते,  आता ०१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 'पालघर' या नवा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३६ इतकी झाली आहे.

प्र.४) दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य देशात कितव्या स्थानावर आहे ?

अ) दुसर्या
ब) चौथ्या
क) सातव्या
ड) नवव्या

उत्तर : महाराष्ट्रात देशातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यांच्या ३ % टक्के साठे आहेत, दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य देशात सातव्या स्थानावर आहे.

प्र.५) उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे ?

अ) पहिल्या
ब) दुसर्या
क) तीसर्या
ड) चौथ्या

उत्तर : उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसर्या स्थानावर असला तरी साखरेच्या उत्पादनात मात्र प्रथम स्थानावर आहे.

पॉलिटी या विषयाची शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये कशी तयारी कराल??

⭕️ पॉलिटी या विषयाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात पैकी किमान बारा प्रश्न हे कोअर पॉलिटी वर असतात तर एखादा दुसरा प्रश्न हा पंचायत राज या घटका वरून पडतो. 2018 पर्यंत चे पेपर पाहता आयोगाचा ट्रेंड सोपा वाटतो परंतु 2019 आणि 2020 मधील पूर्व परीक्षांमध्ये आयोगाने लांबलचक व अवघड प्रश्न विचारल्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रश्नांचा दर्जा मध्यम कठीण आणि वेळखाऊ असेल अशी मनाची तयारी आपण करून ठेवायला हवी.



⭕️ सपूर्ण पॉलिटी आता इथून पुढे उजळणी करणे शक्य नाही त्यामुळे नेमक्या घटकांचा अभ्यास आपण करायला हवा. उदाहरणार्थ संसद राष्ट्रपती निवडणूक आयोग राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आणीबाणी केंद्र-राज्य संबंध या घटकांवर आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हे घटक आपण पुन्हा पुन्हा मूळ पुस्तकातुन वाचणे फायदेशीर ठरेल.



⭕️ इतर काही घटक जसे की दुय्यम न्यायालये, लोकपाल, भारताचे महालेखापाल व महा नियंत्रक, महाधिवक्ता व महान्यायवादी अशा निवडक घटकांचे महत्त्व जरी अनन्यसाधारण असले तरी त्यांचे पाठांतर करणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे या घटकांना शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये वेळ न देता तो वेळ मागे उल्लेख केलेल्या घटकांसाठी वापरता येईल. 



⭕️ याव्यतिरिक्त महत्वाची कलमे, table of precedence , घटनादुरुस्त्या यासारख्या गोष्टी देखील विसरून चालणार नाहीत. कमी वेळेत आणि कमी कष्टात आपल्याला गुण मिळवून देण्यासाठी हे घटक अत्यंत किफायतशीर ठरतात. त्यामुळे परिक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी या घटकांवर नजर फिरविणे अनिवार्य आहे.



⭕️ पचायत राज या घटकावर ती एक ते तीन प्रश्न पडू शकतात. त्यामुळे इतक्या थोड्या गुणांसाठी भरपूर वेळ खर्ची पाडणे बिलकुल अपेक्षित नाही. तुम्ही आज पर्यंत तयार केलेल्या नोट्स अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोट्स वापरून तुम्ही हे दोन तीन गुण सहज मिळू शकतात. किशोर लवटे सरांच्या पंचायतराज पुस्तकाच्या मागे शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत त्याचादेखील तुम्ही वापर करू शकता. 



❇️ पॉलिटी हा पूर्व परीक्षांमधील सर्वाधिक आउटपुट देणारा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये या विषयांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वीसपेक्षा कमी गुण मिळणे अपेक्षित नाही. आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नांचा जोरदार अभ्यास आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून केलेले वाचन यांच्या जोरावर 12 ते 15 प्रश्न आपण बरोबर सोडवू शकतो. त्यामुळे या विषयाकडे व्यवस्थित लक्ष देऊन याचे नियोजन करावे.


धन्यवाद..

बंगाल राज्य व बंगाल युद्धे

 प्लासीची लढाई 

      बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.

सिराजउद्दौला (कार. १० एप्रिल १७५६-२३ जून १७५७) हा ⇨अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. अंधारकोठडीची तथाकथित घटना याच वेळची [⟶ अंधारकोठडी, कलकत्त्याची]. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. ⇨रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले (२ जानेवारी १७५७). तेव्हा सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला (९ फेब्रुवारी १७५७). या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करावयाचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले (२३ मार्च १७५७) आणि सिराजउद्दौलाविरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला. 

कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या : (१) फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी. (२) फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात आणि (३) फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत. सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापतिपदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याचे चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.

विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. त्यामुळे नबाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. पुढे फ्रेंचांबरोबरच्या युद्धात (कर्नाटक) त्यांना या वेळची बरीच साधनसामग्री उपयोगी पडली [⟶ इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील]. बंगालमधील फ्रेंचांचे वर्चस्व कमी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तिथे दृढतर झाली. यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.



बक्सारची लढाई

(२२ ऑक्टोबर १७६४). मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.

लढाईची पार्श्वभूमी व कारणे

प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा सुभेदार मीर जाफर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कुरकुर करू लागला. मीर जाफरनंतर त्यास कोणी वारस नसल्याने, त्याच्या जावयास-मीर कासिमला सुभेदारी द्यावी या कंपनीच्या बेताला मीर जाफरने संमती दिली नाही. ब्रिटिशांचे पारडे बंगालमध्ये जड होत असल्याचे पाहून मीर जाफरने डचांच्या स्वारीला फूस दिली. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०) वरील घटनांवरून मीर जाफरबद्दल कंपनीला संशय आला आणि त्यामुळे कंपनीने त्यास पदच्युत केले व मीर कासिमला सुभेदारपद दिले. सुभेदारीच्या बदल्यात मीर कासिम कंपनीच्या मर्जीप्रमाणे सुभ्याचा कारभार करील, अशी कंपनी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. कंपनी व कंपनीच्या इंग्रज नोकरांनी मीर कासिमला कर न देता व्यापार चालू केला. बंगाल सुभ्यातील (बंगाल, बिहार, व ओरिसा) प्रजेने व जमीनदारांनी कंपनीच्या व्यापाराबद्दल तक्रारी केल्या. यावरून मीर कासिमने कंपनीकडे तक्रार केली. त्याच्या कर वसुलीत मोठी घट येऊ लागली. कंपनीने या घटनांकडे दुर्लक्षच केले. मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला. वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते. मीर कासिमने कंपनीला एलिसबद्दल कळविले होते. मीर कासिम नमत नाही हे पाहून त्याऐवजी मीर जाफरला परत सुभेदार करण्याचे कंपनीने ठरविले. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासिमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. बंगालमधून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मीर कासिम तयार झाला. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मोंघीरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मोंघीर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. शाह आलमसुध्दा शुजाउद्ददौल्यापाशी होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला.

बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दीदैल्याकडे आले.

पाटण्याहून निघालेल्या कंपनी सैन्याला (सेनापती मेजर हेक्टर मन्रो) बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली. कंपनीचा जय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला.

मोगली सैन्याचा पराभव होण्याची कारणे

खंबीर नेतृत्वाची उणीव व भाडोत्री यूरोपीयांची दगाबाजी. मीर कासिमने यूरोपीय पध्दतीचे कवायती सैन्य प्रथमच हिंदुस्थानात तयार केले होते. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या त्याच्या बंदुका कंपनी बंदुकापेक्षा परिणामकारक होत्या. असे असूनही राइनहार्टने दगा दिल्यामुळे मोगलांना पराभव पतकारावा लागला. पुढे २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या असईची लढाई ही बसारच्याच लढाईची पुनरावृत्ती होती. बक्सारच्या विजयामुळे संपूर्ण बंगाल सुभ्याचा कारभार कंपनीच्या हातात आला; मोगल सम्राट शाह आलम तिच्या आश्रयास आला; कलकत्ता ते अयोध्या प्रांतांच्या पश्चिमी हद्दीपर्यंत वा अप्रत्यक्ष कंपनीची हुकूमत आल्यामुळे मराठ्यांच्या व पठाण -रोहिल्यांच्या कारवायांना पायबंद घालणे कंपनीला सुलभ झाले. रॉबर्ट क्लाईव्हच्या वक्तव्यावरून संपूर्ण मोगल साम्राज्य कंपनीच्या हातात आल्यासारखेच होते. ३ मे १७६५ रोजीकोरा येथे शेवटची लढाई होऊन शुजाउद्ददौलासुध्दा कंपनीचा मांडलिक झाला. मराठ्यांना किंवा एतद्देशीय राजसत्तांना या संघर्षाच्या दूरगामी परिणामाची जाणीव झाली नाही.