13 November 2025

श्वसनासंबंधी संज्ञा (Respiratory Terms)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1.Hypercapnia (हायपरकॅपनीया)

➤ शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडची साठवणूक होणे

➤ सुरुवातीस श्वसन क्रिया वाढते, परंतु नंतर चेतासंस्थेवर विपरित परिणाम होतो

➤ गंभीर स्थितीत कोमा किंवा मृत्यू होऊ शकतो


2.Eupnea (युप्नीया)

➤ सामान्य व निरोगी श्वसन

➤ दर: 12 ते 18 श्वास प्रति मिनिट


3.Hypopnea (हायपोप्नीया)

➤ श्वसनाचा दर किंवा खोली कमी होणे

➤ झोपेमध्ये आढळणारी स्थिती, विशेषतः स्लीप अ‍पनिया मध्ये


4.Hyperapnea (हायपरऑप्नीया)

➤ श्वसनाचा दर किंवा खोली जास्त होणे

➤ व्यायाम किंवा ताणाच्या वेळी सामान्यपणे घडते


5.Dyspnea (डिसप्नीया)

➤ श्वास घेण्यास त्रास होणे

➤ लक्षण: गुदमरणे, छातीत जडपणा, श्वसनासाठी प्रयत्न करणे


6.Hypoxia (हायपॉक्सिया)

➤ शरीराच्या ऊतींना आवश्यकतेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळणे

➤ विविध प्रकार: हायपॉक्सिक, अ‍नेमिक, सायटोमिक, इस्केमिक


7.Anoxia (अ‍नॉक्सिया)

➤ शरीराच्या ऊतींना अजिबात ऑक्सिजन न मिळणे

➤ हायपॉक्सियाची अत्यंत तीव्र अवस्था


8.Asphyxia (अ‍स्फिक्झिया)

➤ Hypoxia + Hypercapnia

➤ ऑक्सिजनचा अभाव + CO₂ चे संचयन

➤ लक्षणे: गुदमरल्यासारखे वाटणे, बेशुद्ध होणे, त्वचेचा निळसर रंग


9.Cyanosis (सायनोसिस)

➤ रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ निळसर दिसणे

➤ हायपॉक्सियाचे दृष्यमान लक्षण

No comments:

Post a Comment