13 November 2025

उत्तरवैदिक काल (1000–600 इ.स.पू.)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1. साहित्य आणि स्त्रोत📚

➤ उत्तरवैदिक काळातील मुख्य ग्रंथ: सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद

➤ ऋग्वेद संहितेचा दहावे मंडल देखील या काळात समाविष्ट

➤ यावेळी वैदिक साहित्य धार्मिक विधी, गूढ मंत्र, औषधी, समाजरचना यावर केंद्रित


2. भौगोलिक क्षेत्रफळाचा विस्तार

➤ सप्तसिंधू क्षेत्रातून आर्यांचा गंगा-यमुना दोआब, कोसळ (पूर्व उत्तर प्रदेश) व विदेह (उत्तर बिहार) कडे स्थलांतर

➤ जंगलांची साफसफाई करून स्थायिक शेती व वस्ती वाढवली


3. 🔱 राजकीय रचना (Polity)

➤ जनपद संकल्पनेचा उदय - जमिनीवर आधीच्या गोत्र/जनांची सत्ता

➤ राष्ट्र या शब्दाचा वापर प्रथम याच काळात

➤ राजा/राजन म्हणजे प्रमुख; आता तो विशिष्ट भूप्रदेशाचा रक्षक

➤ राजन्य शब्दाचे रूपांतर क्षत्रिय वर्गात - शक्तिशाली सैन्यप्रधान

➤ राज्य व राजसत्ता आता वंशपरंपरागत; राजसूय, वाजपेय यांसारख्या विधींचा वापर राजसत्तेच्या वैधतेसाठी

➤ करप्रणालीचा प्रारंभ: ✅️ → बली: शेती उत्पादनावर लावला जाणारा कर

✅️ → शुल्क: टोल व व्यापार कर

✅️ → भग: राज्याचा भाग म्हणून घेतलेले उत्पादन

➤ सभा आणि समिती यापैकी सभा अधिक प्रभावशाली

➤ राजा मुख्यतः क्षत्रिय वर्गातूनच निवडला जाई

➤ ब्राह्मण यांचा वाढता प्रभाव – पूजा व यज्ञ यामधून संपत्ती आणि प्रतिष्ठा


4. 👨‍👩‍👧‍👦 समाजजीवन व व्यवस्था

➤ पितृसत्ताक कुटुंबपद्धती – गृहपती ला विशेष स्थान

➤ गोत्र प्रणाली सुरू – एकाच गोत्रातील विवाह वर्ज्य

➤ एकपत्नी विवाह आदर्श, परंतु बहुपत्नीत्वही अस्तित्वात

➤ चातुर्वर्ण्य व्यवस्था अधिक स्पष्ट: ✅️ → ब्राह्मण: धार्मिक विधी व शेतीशी संबंधित विधी

✅️ → क्षत्रिय: शासन व संरक्षण

✅️ → वैश्य: कृषी, व्यापार व उद्योग

✅️ → शूद्र: सेवा – उच्चवर्णीयांसाठी

➤ उपनयन संस्कार – केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच (द्विज)

➤ आश्रम व्यवस्था:

✅️ → ब्रह्मचर्य → गृहस्थ → वानप्रस्थ

✅️ → नंतर संन्यास आश्रम ची संकल्पना उदयास आली

➤ स्त्रियांचे स्थान:

✅️ → सार्वजनिक निर्णयप्रक्रियेत सहभाग नव्हता

✅️ → बालविवाह वाढीस लागले

✅️ → स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त


5. 🕉️ धर्म व धार्मिक जीवन

➤ इंद्र व अग्नी यांचा प्रभाव कमी; विष्णु व रुद्र (शिव) उदयाला

➤ पुषण – शूद्रांचा देव

➤ यज्ञांची संख्या व प्रचंडता वाढली – प्राणीबलिदान प्रचलित

➤ महत्त्वाचे यज्ञ:

✅️ → राजसूय: राज्याभिषेक

✅️ → वाजपेय: सत्ता-प्रदर्शन

✅️ → अश्वमेध: सार्वभौमत्वासाठी

➤ ब्राह्मण वर्ग यज्ञांतून दान, दक्षिणा स्वरूपात संपत्ती प्राप्त करीत

➤ यज्ञप्रधान परंपरेविरुद्ध प्रतिक्रिया – उपनिषदांमध्ये तत्त्वचिंतन व आत्मज्ञानावर भर


6. 🌾 अर्थव्यवस्था (Economy)

➤ स्थलांतरित पशुपालनावरून स्थायिक शेतीकडे संक्रमण

➤ लोखंडी अवजारांचा वापर: शेती अधिक उत्पादक बनली

✅️ → लोखंडी फावडे, नांगर

➤ दुहेरी पीकपद्धती सुरू – गहू, बार्लीबरोबर तांदूळ

➤ धान्य प्रकार:

✅️ → व्रीही, तंदुल, साली – सर्व तांदळाचे प्रकार

✅️ → याशिवाय गहू, डाळी, बाजरी, ऊस, तिळ, मटकी

➤ मिश्र शेती – शेती + पशुपालन

➤ पशुधन: म्हैस, बैल, गाय यांचा शेतीसाठी उपयोग

➤ इंद्राला ‘नांगराचा अधिपती’ अशी पदवी

➤ राजसूय यज्ञात धान्य, दूध, साजूक तूप, जनावरांचे अर्पण

➤ अथर्ववेदातील 12 यज्ञांमध्ये ब्राह्मणांना देणग्यांमध्ये:

✅️ → गायी, वासरे, बैल, सुवर्ण, पक्के तांदूळ, घरे, चांगली शेती दिली जाई


7. 💡 इतर विशेष वैशिष्ट्ये

➤ शिक्षणाचा प्रारंभ – गुरुकुल पद्धत, विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्गासाठी

➤ आयुर्वेदाची सुरुवात – अथर्ववेदातील जादूटोणा, औषधोपचार ह्याच्याशी संबंध

➤ नवे धार्मिक-तत्त्वज्ञान – उपनिषदांमध्ये आत्मा, ब्रह्म, मोक्ष यावर विवेचन

➤ स्थापत्य व नगरी जीवनाची सुरुवात – लहान नगरे, वेगवेगळ्या समाजवर्गांची वस्ती


No comments:

Post a Comment