25 October 2025

काही महत्त्वाचे नियम



1.न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम -

एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेतच राहील अथवा सरळ रेषेत एकसमान गतीत असल्यास ती सतत त्या रेषेत एकसमान गतीत राहील.


2.न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम -

संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.


3.न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम -

कोणत्याही एका वस्तूवर बलाची क्रिया होत असताना बल निर्माण करणाऱ्या (दुसऱ्या) वस्तूवर विरुद्ध दिशेने तेवढ्याच परिमाणचे बल प्रतिक्रिया करीत असते.

किंवा

क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात; परंतु त्यांच्या दिशा परस्परांविरोधी असतात.


4.ऊर्जा अक्षय्यतेचा नियम -

ऊर्जेची निर्मिती किंवा तिचा नाश होऊ शकत नाही. एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करता येते, तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते.


5.तरणणाचा नियम -

तरणणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रव्यास भागाने विस्थापित केलेल्या द्रव्याच्या वजनाएवढे असते.


6.ओहमचा नियम -

जर वाहकाची भौतिक अवस्था कायम राहात असेल तर वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) व वाहकातून जाणारी विद्युत्धारा (I) यांचे गुणोत्तर स्थिर राहते.

No comments:

Post a Comment