1) स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDP) :- देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या "अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GDP होय.
🛑GDP - अंतर्गत शक्ती दर्शवते.
2)स्थूल राष्ट्रीय उत्पाद(GNP) :- "देशाच्या नागरिकांनी जगात कोठेही राहून उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GNP होय.
उदा :- अजय - अतुल यांनी अफ्रिकेत जाऊन तिथे स्टेज शो केला तर त्यांना तिथे मिळालेले पैसे GNP मध्ये मोजले जातील. ते GDP मध्ये मोजले जाणार नाहीत.(हा M(आयात) झाला.)
उदा :- जाॅन सीना त्याच्या देशातून भारतात आला आणि स्टेज शो केला त्याने भारतातात मिळवलेले पैसे जाताना त्याच्या देशात घेऊन गेला तर ते वजा करावे लागतील (हा X (निर्यात)झाला)
📍गेलेला पैसा वजा (-)करता आणि आलेला पैसा समाविष्ट (+)करता तेंव्हा आपल्याला GNP मिळतो.
🔰 निर्यात(X) - जास्त असेल तर GNP जास्त असणार आहे.
उदा - GDP 1000 रू + निर्यात 400 + आयात 300 = 1100 GNP
म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 1100 रू.
💠आयात(M) - जास्त असेल तर GDP जास्त असणार आहे आणि GNP कमी असणार आहे.
उदा - GDP 1000 रु + निर्यात 400 - आयात 600 = 800 GNP
म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 800 रू.
🔶स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP) = GDP + X(निर्यात ) - M(आयात ) पाठच करा (PYQ)
⭕️घसारा (डेप्रिसिएशन) - एखादी भांडवली वस्तू आहे ती जर एका आर्थिक वर्षात घसरत असेल (तिची झीज होत असेल )तर तिची घसरण पैशाच्या स्वरूपात मोजली जाते. त्याला घसारा म्हणतात.
🔰 निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP):-
घसारा वजा करून जे उत्पन्न मिळते त्याला म्हणतात नेट डोमेस्टिक प्रोडक्ट (NDP)
✅NDP = GDP - घसारा
⭕️ निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(NNP):-
घसारा जर GNP मधून वजा केला तर NNP मिळतो.
✅NNP = GNP - घसारा
🟡 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे सर्वात सुयोग्य साधन/मापन NNP हे आहे.
म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात NNP चा वापर केला जातो.
💠 राष्ट्रीय उत्पन्न टाॅपिकवरती वरील महत्त्वाच्या संकल्पनांवरती राज्यसेवा पूर्व तसेच संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न आलेले आहेत.(PYQ)
पाठच करा.
No comments:
Post a Comment