🔹️ मायर व बाल्डविन - "आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे, ज्याअंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते."
🔹️ किंडल बर्जर - "अधिक उत्पादन व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक स्थळातील बदल म्हणजे आर्थिक विकास होय."
🔹️ ए. मॅडिसन - "श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी, तर गरीब राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक विकास होय."
🔹️ उर्सुला हिक्स - "विकसित देशांतील आर्थिक प्रगतीस वृद्धी तर अविकसित देशांतील आर्थिक प्रगतीस विकास म्हणता येईल."
🔹️ शुम्पिटर - "आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थितीक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून, विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते. या उलट अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात संथपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे वृद्धी होय."
🔹️ जे. के. मेहता - "आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल संख्यात्मक (Quantitative) तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील बदल गुणात्मक (Qualitative) स्वरूपाचे असतात."
🔹️ प्रो. बने - "विकसनशील देशात अर्थव्यवस्थेचा विविध घटकात वाढ करून ती टिकविण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन व नियमांची गरज असते याला आर्थिक विकास म्हणतात, तर विकसित अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया स्वयंसूर्ते नसते त्यामुळे त्या प्रगतीला आर्थिक वृद्धी म्हणता येते."
No comments:
Post a Comment