१३ नोव्हेंबर २०२५

रेल्वेभरती प्रश्नसंच

 ALP & RPF पेपर  Click Here


Group D Click Here


NTPC Graduate पेपर  Click Here


NTPC Under Graduate पेपर  Click Here

भारताचे व्हाईसरॉय

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१) लॉर्ड कॅनिंग (१८५६-१८६२) 🏛️

➤ १८५७ चा उठाव – शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय

➤ भारतात व्हाईसरॉय प्रणालीची सुरुवात

➤ कलकत्ता, मुंबई, मद्रास उच्च न्यायालयांची स्थापना (१८६१)

➤ इंडियन कौन्सिल ॲक्ट १८६१ अमलात

➤ ईस्ट इंडिया कंपनीचे शासन समाप्त होऊन ब्रिटिश क्राउनकडे सत्ता


२) लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) 📊

➤ भारतातील पहिली अधिकृत जनगणना (१८७२)

➤ आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक

➤ मेयो कॉलेज, अजमेर – राजपूताना सरदारांसाठी

➤ अंडमान भेटीदरम्यान हत्या


३) लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) ⚔️

➤ दिल्ली दरबार – राणी व्हिक्टोरियाला कैसर-ए-हिंद पदवी

➤ देशी वृत्तपत्र कायदा (Vernacular Press Act, 1878)

➤ सर्वात भीषण दुष्काळ (१८७६-७८)

➤ शस्त्र कायदा (Arms Act, 1878)

➤ आर्थिक काटकसर धोरण


४) लॉर्ड रिपन (1880-1884) 🏛️📘

➤ स्थानिक स्वराज्याचा जनक – १८८२ चा रेजोल्यूशन

➤ हंटर शिक्षण आयोग (१८८२)

➤ इल्बर्ट बिल विवाद (१८८३)

➤ प्रेसवरील निर्बंध हटवले


५) लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) 🇮🇳

➤ १८८५ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना

➤ काँग्रेसविषयी “Dufferin Report”


६) लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) 🗺️

➤ बंगालची फाळणी (१९०५)

➤ सहकारी पतपेढी कायदा (1904)

➤ प्राचीन स्मारक संरक्षण कायदा (1904)

➤ इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट (1904)


७) लॉर्ड मिंटो (१९०५-१९१०) 🕌

➤ मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा १९०९

➤ मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ

➤ मुस्लिम लीगचे प्रोत्साहन


८) लॉर्ड हार्डिंग (१९१०-१९१६)

➤ बंगालची फाळणी रद्द (१९११)

➤ राजधानी कलकत्ता → दिल्ली

➤ दिल्ली दरबार (१९११)

➤ बॉम्ब हल्ला (क्रांतिकारकांनी)


९) लॉर्ड चेम्सफर्ड (१९१६-१९२१) 📜

➤ मॉंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा १९१९

➤ प्रांतिक द्विगुही शासन

➤ रौलट अ‍क्ट (काळा कायदा), १९१९

➤ जालियनवाला बाग हत्याकांड


१०) लॉर्ड आयर्विन (१९२६-१९३१) 🕊️

➤ सायमन कमिशनविरोधी आंदोलन

➤ पहिली गोलमेज परिषद (१९३०)

➤ गांधी-आयर्विन करार

➤ सविनय कायदेभंग आंदोलन


११) लॉर्ड वेलिंग्टन (१९३१-१९३६)

➤ दुसरी गोलमेज परिषद

➤ रामसे मॅक्डोनाल्डचा जातीय निवाडा

➤ गांधी-आंबेडकर पुणे करार

➤ भारत सरकार कायदा १९३५


१२) लॉर्ड लिनलिथगो (१९३६-१९४४) 🌏

➤ १९३७ प्रांतिक निवडणुका

➤ प्रांतिक सरकारांचे राजीनामे

➤ क्रिप्स मिशन (१९४२)

➤ भारत छोडो आंदोलन (१९४२)


१३) लॉर्ड वेव्हेल (१९४४-१९४७) 🏛️

➤ सिमला परिषद

➤ हंगामी सरकार

➤ त्रिमंत्री (कॅबिनेट) मिशन योजना

➤ संविधान सभेची स्थापना


१४) लॉर्ड माऊंटबॅटन (१९४७-१९४८) 🇮🇳

➤ ३ जून १९४७ – माऊंटबॅटन योजना

➤ भारताचा विभाजन निर्णय

➤ १५ ऑगस्ट १९४७ – भारत स्वातंत्र्य

➤ संस्थानांचे विलिनीकरण प्रोत्साहन

नद्याकाठच्या संस्कृती

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१) मेसोपोटेमिया संस्कृती 🌾

▪️नद्यांची नावे : टायग्रीस व युफ्रेटीस

▪️वैशिष्ट्ये :

➤ इराक, सिरिया, इराणचा पश्चिम भाग आणि तुर्कस्तानचा आग्नेय भाग या प्रदेशाचा समावेश.

➤ मेसोस = मधला, पोटेमोस = नदी; दोन नद्यांच्या मधल्या सुपीक प्रदेशास मेसोपोटेमिया म्हणतात.

➤ भटक्या मानवाचे येथे स्थिर वसाहत जीवन सुरू झाले.

➤ इ.स.पू. १०,००० वर्षांपूर्वी नवाश्मयुगातील आद्य वसाहती निर्माण.

➤ बाली, गहू यांची शेती सर्वप्रथम येथे सुरू.

➤ सर्वात प्राचीन शहरी संस्कृतींपैकी एक; झिगुरॅट मंदिरे, क्युनिफॉर्म लिपी, सुमेर-अक्काड राज्ये ही वैशिष्ट्ये.


२) इजिप्तची नाईल संस्कृती 🏺

▪️नद्यांची नावे : नाईल

▪️वैशिष्ट्ये :

➤ इ.स. १७९८ मध्ये नेपोलियनच्या मोहिमेदरम्यान रोझेट्टा गावात कोरीव शिलालेख (Rosetta Stone) सापडला.

➤ यात चित्रलिपी (Hieroglyphics) होती – नंतर तिचे ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले.

➤ इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी नवाश्मयुगीन वसाहतींची निर्मिती.

➤ नाईलच्या वार्षिक पुरामुळे अतिशय सुपीक जमीन – म्हणून इजिप्तला “नाईलची देणगी” म्हटले जाते.

➤ पिरॅमिड बांधणी, ममीकरण, फराओचे सत्ताकेंद्र, गणित-वैद्यकातील प्रगती ही प्रमुख वैशिष्ट्ये.


३) चीनची होयांग-हो (पिवळी नदी) संस्कृती 🌾

▪️नद्यांची नावे : होयांग-हो (Yellow River)

▪️वैशिष्ट्ये :

➤ इ.स.पू. ७००0 च्या सुमारास नवाश्मयुगाचा प्रारंभ.

➤ कृषीला सुरुवात – गहू, राळा (मिलेट), भात ही प्रमुख पिके.

➤ या नदीच्या खोऱ्याला चीन संस्कृतीचे उगमस्थान (Cradle of Chinese Civilization) मानले जाते.

➤ शांग-झोउ राजवंश, कांस्यपदार्थांचे उत्पादन, ओरेकल बोन लिपी ही वैशिष्ट्ये.


४) भारतीय उपखंडातील सिंधू सरस्वती संस्कृती 🇮🇳

▪️नद्यांची नावे : सिंधू व सरस्वती

▪️वैशिष्ट्ये :

➤ पंजाबातील रावी नदीकाठी हडप्पा, सिंधू नदीवरील मोहेंजोदडो येथे उत्खनने.

➤ इ.स.पू. ८००० च्या सुमारास स्थिर वसाहती – घरे, धान्यकोठारे, ग्रामरचना.

➤ मातीची भांडी, मृद्भांडकला, जलनिस्सारण व्यवस्था, नगररचना – अत्यंत प्रगत.

➤ ही संस्कृती जगातील सर्वात शिस्तबद्ध नगरसंस्कृतींपैकी एक.

➤ व्यापार, माप-तोल, शिक्के, धातुकाम यांचे पुरावे.

रक्तपेशी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


 1. ❤️ लाल रक्तपेशी (Red Blood Cells - RBCs)

➤ या पेशी लाल रंगाच्या असतात, कारण त्यात हिमोग्लोबिन हे प्रथिन असते.

➤ हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो.

➤ या पेशींचा आकार तबकडीसारखा (biconcave disc) असतो.

➤ प्रौढ लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसते, त्यामुळे त्या अधिक ऑक्सिजन वाहून नेऊ शकतात.

➤ त्यांचा जीवनकाळ सुमारे १२० दिवसांचा असतो.

➤ त्या प्लीहा (spleen) आणि यकृत (liver) मध्ये नष्ट होतात.

➤ त्यांचे मुख्य कार्य म्हणजे:

    ➤ ऑक्सिजनचे फुफ्फुसांमधून शरीरात नेणे

    ➤ कार्बन डायऑक्साइड शरीरातून फुफ्फुसांमध्ये आणणे

➤ एका घन मिलिमीटर रक्तामध्ये सुमारे ५० लाख RBCs असतात.

➤ त्यांची निर्मिती लाल अस्थिमज्जेत (Red Bone Marrow) होते.

➤ त्यांच्या कार्यक्षमतेसाठी शरीरात लोहतत्व (Iron), विटामिन B12, फॉलिक अॅसिड आवश्यक असते.


2. 🛡️ पांढऱ्या रक्तपेशी (White Blood Cells - WBCs)

➤ या पेशी रंगहीन असतात.

➤ त्यांचा आकार अनियमित असतो.

➤ या पेशींमध्ये केंद्रक उपस्थित असते.

➤ त्यांचा जीवनकाळ काही तास ते काही वर्षे असतो (प्रकारावर अवलंबून).

➤ त्यांचे मुख्य कार्य म्हणजे:

    ➤ शरीराचे रोगप्रतिकारक संरक्षण

    ➤ बॅक्टेरिया, विषाणूंविरुद्ध लढा देणे

➤ त्यांचे पाच प्रमुख प्रकार:

    ➤ न्यूट्रोफिल्स

    ➤ लिम्फोसाइट्स

    ➤ मोनोसाइट्स

    ➤ इओसिनोफिल्स

    ➤ बेसोफिल्स

➤ एका घन मिलिमीटर रक्तामध्ये ५,००० ते ७,००० WBCs असतात.

➤ यांची निर्मिती अस्थिमज्जा, लिम्फ नोड्स, प्लीहा, आणि थायमस ग्रंथी मध्ये होते.

➤ लसीमिया (Leukemia) हा रोग पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो.


3. 🩹 प्लेटलेट्स (Platelets / Thrombocytes)

➤ या पेशी रंगहीन असतात.

➤ त्यांचा आकार लहान, गोलसर वा अनियमित असतो.

➤ प्लेटलेट्समध्ये केंद्रक नसते.

➤ त्यांचा जीवनकाळ ८ ते १४ दिवसांचा असतो.

➤ त्यांचे मुख्य कार्य म्हणजे:

    ➤ रक्तस्त्राव रोखणे

    ➤ रक्त गोठवण्यास मदत करणे (Clotting)

➤ एका घन मिलिमीटर रक्तामध्ये सुमारे २,५०,००० प्लेटलेट्स असतात.

➤ त्यांची निर्मिती अस्थिमज्जेतील मेगाकारियोसायट्स (Megakaryocytes) पासून होते.

➤ थ्रोम्बोसाइटोपेनिया या स्थितीत प्लेटलेट्सची संख्या कमी होते, ज्यामुळे जखमांमधून रक्तस्त्राव वाढतो.

➤ डेंग्यू, मलेरिया, वायरल फिव्हर इत्यादी आजारांमध्ये प्लेटलेट्सची संख्या घटते.


4. 🔬 रक्तपेशींचे तुलनात्मक विश्लेषण

➤ RBCs – ऑक्सिजन/CO₂ वाहतूक, केंद्रक नसते, आयुष्य १२० दिवस, सर्वाधिक संख्या

➤ WBCs – रोगप्रतिकारक, केंद्रक असतो, विविध प्रकार, संख्या कमी

➤ Platelets – रक्त गोठवणे, केंद्रक नसते, आयुष्य लहान, संख्या मध्यम


5. 🧬 अतिरिक्त माहिती 

➤ संपूर्ण रक्ताचे 55% भाग हे प्लाझ्मा असतो व उर्वरित 45% हे रक्तपेशी.

➤ रक्त गटांची ओळख Karl Landsteiner यांनी दिली.

➤ Rh factor ही एक महत्त्वाची रासायनिक खूण असते (Positive / Negative).

➤ रक्तदानाद्वारे अनेक रोगांवरील उपचार शक्य होतात.

चालू घडामोडी संबंधित महत्वाच्या योजना व उपक्रमांची यादी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1.स्वास्थ्य साथी आरोग्य विमा योजना

➤ राज्य: पश्चिम बंगाल

➤ उद्दिष्ट: सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण


2.ऑपरेशन नया सवेरा

➤ राज्य: बिहार

➤ उद्दिष्ट: मानवी तस्करी रोखण्यासाठी बिहार पोलिसांची मोहीम


3.स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार योजना

➤ अंमलबजावणी संस्था: राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC)

➤ उद्दिष्ट: महिलांसाठी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण


4.सब्बेटिकल रजा योजना

➤ राज्य: सिक्कीम

➤ उद्दिष्ट: सरकारी कर्मचाऱ्यांना विश्रांती व वैयक्तिक प्रकल्पांसाठी दीर्घकालीन रजा


5.हरमिला आर्मा मॉडेल

➤ राज्य: आसाम

➤ आंतरराष्ट्रीय स्वीकार: कंबोडिया देशाने जैवविविधता संवर्धनासाठी स्वीकारलेले मॉडेल


6.भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज

➤ राज्य: मध्य प्रदेश

➤ उद्दिष्ट: वैद्यकीय शिक्षणाचे स्थानिक भाषेत माध्यम


7.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

➤ राज्य: महाराष्ट्र

➤ उद्दिष्ट: ग्रामपंचायतींच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी


बृहद सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप

➤ स्थान: वैशाली, बिहार

➤ उद्दिष्ट: भगवान बुद्धांच्या सम्यक दर्शन तत्त्वज्ञानावर आधारित सांस्कृतिक व धार्मिक केंद्र

श्वसनासंबंधी संज्ञा (Respiratory Terms)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1.Hypercapnia (हायपरकॅपनीया)

➤ शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडची साठवणूक होणे

➤ सुरुवातीस श्वसन क्रिया वाढते, परंतु नंतर चेतासंस्थेवर विपरित परिणाम होतो

➤ गंभीर स्थितीत कोमा किंवा मृत्यू होऊ शकतो


2.Eupnea (युप्नीया)

➤ सामान्य व निरोगी श्वसन

➤ दर: 12 ते 18 श्वास प्रति मिनिट


3.Hypopnea (हायपोप्नीया)

➤ श्वसनाचा दर किंवा खोली कमी होणे

➤ झोपेमध्ये आढळणारी स्थिती, विशेषतः स्लीप अ‍पनिया मध्ये


4.Hyperapnea (हायपरऑप्नीया)

➤ श्वसनाचा दर किंवा खोली जास्त होणे

➤ व्यायाम किंवा ताणाच्या वेळी सामान्यपणे घडते


5.Dyspnea (डिसप्नीया)

➤ श्वास घेण्यास त्रास होणे

➤ लक्षण: गुदमरणे, छातीत जडपणा, श्वसनासाठी प्रयत्न करणे


6.Hypoxia (हायपॉक्सिया)

➤ शरीराच्या ऊतींना आवश्यकतेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळणे

➤ विविध प्रकार: हायपॉक्सिक, अ‍नेमिक, सायटोमिक, इस्केमिक


7.Anoxia (अ‍नॉक्सिया)

➤ शरीराच्या ऊतींना अजिबात ऑक्सिजन न मिळणे

➤ हायपॉक्सियाची अत्यंत तीव्र अवस्था


8.Asphyxia (अ‍स्फिक्झिया)

➤ Hypoxia + Hypercapnia

➤ ऑक्सिजनचा अभाव + CO₂ चे संचयन

➤ लक्षणे: गुदमरल्यासारखे वाटणे, बेशुद्ध होणे, त्वचेचा निळसर रंग


9.Cyanosis (सायनोसिस)

➤ रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ निळसर दिसणे

➤ हायपॉक्सियाचे दृष्यमान लक्षण

उत्तरवैदिक काल (1000–600 इ.स.पू.)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1. साहित्य आणि स्त्रोत📚

➤ उत्तरवैदिक काळातील मुख्य ग्रंथ: सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद

➤ ऋग्वेद संहितेचा दहावे मंडल देखील या काळात समाविष्ट

➤ यावेळी वैदिक साहित्य धार्मिक विधी, गूढ मंत्र, औषधी, समाजरचना यावर केंद्रित


2. भौगोलिक क्षेत्रफळाचा विस्तार

➤ सप्तसिंधू क्षेत्रातून आर्यांचा गंगा-यमुना दोआब, कोसळ (पूर्व उत्तर प्रदेश) व विदेह (उत्तर बिहार) कडे स्थलांतर

➤ जंगलांची साफसफाई करून स्थायिक शेती व वस्ती वाढवली


3. 🔱 राजकीय रचना (Polity)

➤ जनपद संकल्पनेचा उदय - जमिनीवर आधीच्या गोत्र/जनांची सत्ता

➤ राष्ट्र या शब्दाचा वापर प्रथम याच काळात

➤ राजा/राजन म्हणजे प्रमुख; आता तो विशिष्ट भूप्रदेशाचा रक्षक

➤ राजन्य शब्दाचे रूपांतर क्षत्रिय वर्गात - शक्तिशाली सैन्यप्रधान

➤ राज्य व राजसत्ता आता वंशपरंपरागत; राजसूय, वाजपेय यांसारख्या विधींचा वापर राजसत्तेच्या वैधतेसाठी

➤ करप्रणालीचा प्रारंभ: ✅️ → बली: शेती उत्पादनावर लावला जाणारा कर

✅️ → शुल्क: टोल व व्यापार कर

✅️ → भग: राज्याचा भाग म्हणून घेतलेले उत्पादन

➤ सभा आणि समिती यापैकी सभा अधिक प्रभावशाली

➤ राजा मुख्यतः क्षत्रिय वर्गातूनच निवडला जाई

➤ ब्राह्मण यांचा वाढता प्रभाव – पूजा व यज्ञ यामधून संपत्ती आणि प्रतिष्ठा


4. 👨‍👩‍👧‍👦 समाजजीवन व व्यवस्था

➤ पितृसत्ताक कुटुंबपद्धती – गृहपती ला विशेष स्थान

➤ गोत्र प्रणाली सुरू – एकाच गोत्रातील विवाह वर्ज्य

➤ एकपत्नी विवाह आदर्श, परंतु बहुपत्नीत्वही अस्तित्वात

➤ चातुर्वर्ण्य व्यवस्था अधिक स्पष्ट: ✅️ → ब्राह्मण: धार्मिक विधी व शेतीशी संबंधित विधी

✅️ → क्षत्रिय: शासन व संरक्षण

✅️ → वैश्य: कृषी, व्यापार व उद्योग

✅️ → शूद्र: सेवा – उच्चवर्णीयांसाठी

➤ उपनयन संस्कार – केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच (द्विज)

➤ आश्रम व्यवस्था:

✅️ → ब्रह्मचर्य → गृहस्थ → वानप्रस्थ

✅️ → नंतर संन्यास आश्रम ची संकल्पना उदयास आली

➤ स्त्रियांचे स्थान:

✅️ → सार्वजनिक निर्णयप्रक्रियेत सहभाग नव्हता

✅️ → बालविवाह वाढीस लागले

✅️ → स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त


5. 🕉️ धर्म व धार्मिक जीवन

➤ इंद्र व अग्नी यांचा प्रभाव कमी; विष्णु व रुद्र (शिव) उदयाला

➤ पुषण – शूद्रांचा देव

➤ यज्ञांची संख्या व प्रचंडता वाढली – प्राणीबलिदान प्रचलित

➤ महत्त्वाचे यज्ञ:

✅️ → राजसूय: राज्याभिषेक

✅️ → वाजपेय: सत्ता-प्रदर्शन

✅️ → अश्वमेध: सार्वभौमत्वासाठी

➤ ब्राह्मण वर्ग यज्ञांतून दान, दक्षिणा स्वरूपात संपत्ती प्राप्त करीत

➤ यज्ञप्रधान परंपरेविरुद्ध प्रतिक्रिया – उपनिषदांमध्ये तत्त्वचिंतन व आत्मज्ञानावर भर


6. 🌾 अर्थव्यवस्था (Economy)

➤ स्थलांतरित पशुपालनावरून स्थायिक शेतीकडे संक्रमण

➤ लोखंडी अवजारांचा वापर: शेती अधिक उत्पादक बनली

✅️ → लोखंडी फावडे, नांगर

➤ दुहेरी पीकपद्धती सुरू – गहू, बार्लीबरोबर तांदूळ

➤ धान्य प्रकार:

✅️ → व्रीही, तंदुल, साली – सर्व तांदळाचे प्रकार

✅️ → याशिवाय गहू, डाळी, बाजरी, ऊस, तिळ, मटकी

➤ मिश्र शेती – शेती + पशुपालन

➤ पशुधन: म्हैस, बैल, गाय यांचा शेतीसाठी उपयोग

➤ इंद्राला ‘नांगराचा अधिपती’ अशी पदवी

➤ राजसूय यज्ञात धान्य, दूध, साजूक तूप, जनावरांचे अर्पण

➤ अथर्ववेदातील 12 यज्ञांमध्ये ब्राह्मणांना देणग्यांमध्ये:

✅️ → गायी, वासरे, बैल, सुवर्ण, पक्के तांदूळ, घरे, चांगली शेती दिली जाई


7. 💡 इतर विशेष वैशिष्ट्ये

➤ शिक्षणाचा प्रारंभ – गुरुकुल पद्धत, विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्गासाठी

➤ आयुर्वेदाची सुरुवात – अथर्ववेदातील जादूटोणा, औषधोपचार ह्याच्याशी संबंध

➤ नवे धार्मिक-तत्त्वज्ञान – उपनिषदांमध्ये आत्मा, ब्रह्म, मोक्ष यावर विवेचन

➤ स्थापत्य व नगरी जीवनाची सुरुवात – लहान नगरे, वेगवेगळ्या समाजवर्गांची वस्ती


डाॅ बाबासाहेब आंबेडकर

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ? 

🎈डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर


२ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी व कोठे झाला ? 

🎈१४ एप्रिल १८९१,महू.


३ )डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरू कोण ? 

🎈तथागत बुद्ध,संत कबीर,महात्मा जोतीराव फुले.


४ ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक कोणी दिले ? 

🎈कृष्णाजी अर्जून केळूस्कर.


५ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्रातील डाॅक्टरेट पदव्या कोठून मिळवल्या ?

🎈कोलंबिया विद्यापीठ अमेरिका,लंडन 

स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स.


६ ) उस्मानिया विद्यापीठ हैदराबादने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणती 

पदवी दिली ? 

🎈डी.लिट्.


७ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी.पदवी केव्हा स्विकारली ? 

🎈५ जून १९५२.


८ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोठून निवडून आले ?

🎈पश्चिम बंगाल प्रांत.


९ ) भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण ?

🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


१० ) भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ? 

🎈 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


११ ) संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ? 

🎈९ डिसेंबर १९४६.


१२ ) भारतीय संविधान निर्मितीस एकूण किती कालावधी लागला ? 

🎈२ वर्षे ११ महिने १८ दिवस.


१३ ) भारतीय संविधान केव्हा स्विकारले गेले ? 

🎈२६ नोव्हेंबर १९४९.


१४ ) भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो ? 

🎈२६ नोव्हेंबर.


१५ ) भारतीय संविधान केव्हा अंमलात आले ? 

🎈२६ जानेवारी १९५०.


१६ ) प्रजासत्ताक दिन का साजरा करतात ? 

🎈भारतीय संविधान अमलांत आले म्हणून.


१७ ) भारतीय संविधानानुसार देशाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत ? 

🎈राष्ट्रपती.


१८ ) भारतीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते ? 

🎈संसद.


१९ ) भारताचे राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य घटक असतात काय ? 

🎈होय.


२० ) भारतीय घटनेनुसार संसदेचे वरीष्ठ सभागृह कोणते ?

🎈राज्यसभा.


२१ ) संविधानाची उद्देशिका काय दर्शवते ?

🎈स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय.


२२ ) १९२० च्या मानगांव परिषदेत "हाच आता तुमचा भावी नेता"अशा शब्दांत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख 

कोणी करून दिली ?   

🎈राजर्षी छत्रपती शाहू महाराज.


२३ ) स्वतंत्र भारताचे 

पहिले कायदामंत्री कोण होते ?       

🎈डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


२४ ) 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' ही घोषणा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कोठे केली ? 

🎈१३ ऑक्टोबर १९३५,येवले.


२५ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दिक्षा कधी व कोठे घेतली ? 

🎈१४ ऑक्टोबर १९५६,नागपूर.


२६ ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणते पाक्षिक सुरू केले ? 

🎈 मूकनायक .


२७ ) 'दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली ?  

🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


२८ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 'बोधिसत्व' ही पदवी कोणी दिली ? 

🎈बौद्ध भिक्खूंनी.


२९ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता संदेश दिला ?          

🎈शिका ! संघटीत व्हा !! संघर्ष करा !!!


३० ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे व केव्हा झाले ? 

🎈दिल्ली,६डिसेंबर १९५६.


कलम २६२ – आंतरराज्यीय नदी पाणी तंटे निवारण(PYQ POINTS)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🔹️ अनुच्छेद २६२ अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे.


🔹️ भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २६२ (२) हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांस अटकाव करण्याची तरतूद करण्याचा अधिकार देते.


🔹️ पाणी विवाद अधिनियम, १९५६ अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता न्यायाधिकरण (Tribunal) स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.


🔹️ नदीच्या पाण्याशी निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सांविधानिक अधिकार संसदेला आहे.


🔹️ संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतीत कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरिता तरतूद करता येईल.


🔹️ अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद संसदेला कायद्याद्वारे करता येते.


🔹️ पाणी-तंटा अधिनियमानुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निवारणाकरिता लवाद (Tribunal) स्थापण्याचा अधिकार आहे.


🔹️ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील कृष्णा पाणीवाटप लवाद (Krishna Water Disputes Tribunal) हा राज्यघटनेच्या कलम २६२ च्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आला आहे.


🔹️ महादायी जल विवाद न्यायाधिकरण (२०१०) मध्ये खालील राज्यांचा समावेश आहे: गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र.


🔹️ महानदी जल विवाद न्यायालयची स्थापना मार्च २०१८ मध्ये करण्यात आली आहे.


🔹️ १६ फेब्रुवारी २०१८ रोजी कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राला विस्तार झाला आहे. (अनुच्छेद १३६ चे पुनर्रष्टीकरणारे)

महत्त्वाच्या घटना सुधारणा

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


प्रश्न: पहिली संविधान सुधारणा कधी झाली?  

उत्तर: 1951 मध्ये


प्रश्न: 42 व्या सुधारणेस काय म्हणतात?  

उत्तर: लघु संविधान


प्रश्न: 44वी सुधारणा कोणत्या वर्षी झाला?  

उत्तर: 1978 मध्ये


प्रश्न: 73 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: पंचायत राज व्यवस्थेशी


प्रश्न: 74 वी सुधारणा कोणाला लागू करते?  

उत्तर: नगर निकाय व्यवस्था


प्रश्न: 86 वी सुधारणा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?  

उत्तर: 6-14 वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी


प्रश्न: 61 व्या सुधारणे मध्ये किमान मतदान वय काय केले?  

उत्तर: 18 वर्षे


प्रश्न: 52 वी सुधारणा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?  

उत्तर: पक्षबदल कायदा


प्रश्न: 101 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: GST लागू करणे


प्रश्न: 97 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: सहकारी समित्यांशी


प्रश्न: 93 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: खासगी संस्थांमध्ये आरक्षणाशी


प्रश्न: 104 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: एंग्लो इंडियन आरक्षण समाप्त करणे


प्रश्न: 36 व्या सुधारणे मध्ये कोणते राज्य समाविष्ट आहे?  

उत्तर: सिक्कीम


प्रश्न: 17 वी सुधारणा कोणत्या यादीशी संबंधित आहे?  

उत्तर: 9वी अनुसूची


प्रश्न: 69 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?

उत्तर: दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र घोषित करणे


अल्लाउद्दीन खिलजी (1296 ते 1316)



🔹 त्याचे मूळ नाव अली गुरशास्प होते.


🔹 हा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या व जावई होता. जलालुद्दीन खिलजीला ठार मारून गादीवर बसला.


🔹 स्वतःला सिकंदर-ए-सानी ही पदवी घेतली.


🔹 दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम शासक.


🔹 प्रशासन चालविताना बाजार किमतींचे नियंत्रण, मद्यपान बंदी, जमिनीचे मोजमाप करून कर लादणे अशा अनेक नाविन्यपूर्ण सुधारणा त्याने केल्या.


🔹 हिंदूंवर खराज, जिझिया, करी, चराई कर लादले.


🔹 मोठ्याप्रमाणात खडे सैन्य उभारले व सैन्याचा पगार रोख स्वरूपात देण्यास सुरुवात केली.


🔹 त्याने ‘चेहरा’ आणि ‘दाग’ पद्धत सुरु केली.


🔹 कुतुबमिनाराचे प्रवेशद्वार असणारा ‘अलाई दरवाजा’ त्याच्या काळात बांधण्यात आला.


🔹 त्याने "सिरी" हे आपले राजधानीचे शहर कुतुबमिनार परिसरात उभारले.


🔹 मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या ऐतिहासिक काव्यात राणी पद्मावतीने अल्लाउद्दीन खिलजीमुळे केलेल्या जौहरचा उल्लेख आहे.


🔹 अमीर खुस्रो हा कवी त्याच्या दरबारात होता. अल्लाउद्दीनने त्याला तुती-ए-हिंद हा किताब दिला.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

चालू घडामोडी

01) भारताचा पहिला डिजिटल आदिवासी स्वातंत्र्यसेनानी संग्रहालय कोणत्या राज्यात उद्घाटन होणार आहे ?

👉  छत्तीसगड



02) भारताचा 90 वा चेस ग्रँडमास्टर (बुद्धिबळ) कोण ठरला ?

👉  इलमपार्थी. ए. आर



03) भारताने प्रथमच जीआय-टॅग केलेले इंडी आणि पुलियांकुडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केले आहेत ? 

👉  इंग्लंड



04)  "05 ट्रिलियन डॉलर्सच्या" बाजारमूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती आहे ?

👉 Nvidia (एनव्हिडिया) 



05) 'समृद्धि ग्राम भौतिक सेवा' पायलट प्रकल्प कोणत्या विभागाने सुरू केला ?

👉  दूरसंचार विभाग



06) लखनऊतील नौसेना शौर्य संग्रहालयाचा केंद्रबिंदू कोणते जहाज असेल ?

👉  "INS गोमती"



07) "तिसरा प्रवासी परिचय" महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता ? 

👉  रियाध (सौदी अरेबिया)



08) भारताची पहिली डिफेन्स ईव्ही ‘VEER’ कोणत्या कंपनीने विकसित केली ?

👉  प्रवेग डायनॅमिक्स 



09) 69 व्या शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते  ?

👉  इटानगर

 


10) अलीकडेच "उद्भव उत्सव 2025" हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?

👉  मध्यप्रदेश ( ग्वालियर )

 


11) "रवींद्र कोरीसेट्टर" यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ते कोण आहेत ? 

👉  पुरातत्वशास्त्रज्ञ

 


12) 2025 बॅटमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक कोणी जिंकले ?

👉  सायना मनीमुथू

 


13) भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचे नाव काय आहे ?

👉  बजरंग सेतू

 


14) सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती कधी साजरी करण्यात आली ?

👉  31 ऑक्टोबर



15) आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी मंत्रिमंडळाने कोणाची नियुक्ती केली आहे ?

👉  रंजना प्रकाश देसाई


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

घटनादुरुस्ती

घटनादुरुस्ती क्रमांक 1 (1951) – मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 2 (1952) – लोकसभेतील प्रतिनिधींच्या प्रमाणाचे पुनर्विनियोजन केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 3 (1954) – त्रिपुरामधील विधानसभेतील जागांची मर्यादा बदलली.


घटनादुरुस्ती क्रमांक 4 (1955) – संपत्ती हक्क व भरपाईवरील मर्यादा घालण्यात आल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 5 (1955) – राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या सीमांच्या सुधारणा सुलभ केल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 6 (1956) – आसाम, मणिपूर व इतर राज्यांतील आदिवासी भागांसाठी विशेष तरतुदी.


घटनादुरुस्ती क्रमांक 7 (1956) – भाषावार राज्य पुनर्रचना व नव्या राज्यांची निर्मिती.


घटनादुरुस्ती क्रमांक 8 (1960) – अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षणाची मुदत १० वर्षांनी वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 9 (1960) – आसाम व पश्चिम बंगालच्या सीमांमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 10 (1961) – दादरा-नगरहवेलीला केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 11 (1961) – राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवड प्रक्रियेमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 12 (1962) – गोवा, दमण-दीव यांना भारतात समाविष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 13 (1962) – नागालँड राज्याची निर्मिती व त्यासाठी विशेष तरतुदी.


घटनादुरुस्ती क्रमांक 14 (1962) – पाँडिचेरीचा भारतात समावेश व केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 15 (1963) – उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 16 (1963) – देशविरोधी क्रियाकलापांवर निर्बंध व निष्ठापत्राची आवश्यकता.


घटनादुरुस्ती क्रमांक 17 (1964) – जमिन सुधारणा कायद्यांवरून संपत्ती हक्कावर अधिक मर्यादा.


घटनादुरुस्ती क्रमांक 18 (1966) – मतदारसंघ पुनर्रचनेवर केंद्र व राज्यांचे अधिकार स्पष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 19 (1966) – निवडणूक लवाद व न्यायालयांच्या अधिकारांमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 20 (1966) – जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीस वैधता दिली.


घटनादुरुस्ती क्रमांक 21 (1967) – सिंधी भाषेला आठव्या अनुसूचीत समाविष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 22 (1969) – आसाममधील नवे स्वायत्त राज्य (मेघालय) तयार केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 23 (1969) – अनुसूचित जाती, जमाती व अँग्लो-इंडियनसाठी आरक्षणाची मुदत वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 24 (1971) – राष्ट्रपतीने घटनादुरुस्त्यांवर सहमती देणे बंधनकारक केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 25 (1971) – संपत्ती हक्कावर निर्बंध व राज्य धोरणांना प्राधान्य.


घटनादुरुस्ती क्रमांक 26 (1971) – राजघराण्यांचे प्रिव्ही पर्स समाप्त केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 27 (1971) – मिझोरामला विधिमंडळासह केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 28 (1972) – ICS अधिकाऱ्यांचे विशेष हक्क रद्द केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 29 (1972) – केरळमधील दोन जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत समाविष्ट.


घटनादुरुस्ती क्रमांक 30 (1972) – लोकसभा व विधानसभेतील कोट्यांचे पुनर्नियोजन.


घटनादुरुस्ती क्रमांक 31 (1973) – लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ पर्यंत वाढविल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 32 (1974) – सिक्कीमला ‘सहकारी राज्य’ म्हणून स्थान.


घटनादुरुस्ती क्रमांक 33 (1974) – खासदार व आमदारांच्या राजीनाम्याची प्रक्रिया बदलली.


घटनादुरुस्ती क्रमांक 34 (1974) – आणखी २० जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत जोडले.


घटनादुरुस्ती क्रमांक 35 (1975) – सिक्कीमला “पूर्ण राज्य” बनवण्याची प्रक्रिया सुरू.


घटनादुरुस्ती क्रमांक 36 (1975) – सिक्कीमला औपचारिकरीत्या भारताचे राज्य म्हणून मान्यता.


घटनादुरुस्ती क्रमांक 37 (1975) – अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून तयार.


घटनादुरुस्ती क्रमांक 38 (1975) – राष्ट्रपती व राज्यपालांच्या आणीबाणीसंबंधी अधिकारात वाढ.


घटनादुरुस्ती क्रमांक 39 (1975) – पंतप्रधान, अध्यक्ष व लोकसभाध्यक्ष यांच्या निवडणुकीवर न्यायालयांचा अधिकार काढून टाकला.


घटनादुरुस्ती क्रमांक 40 (1976) – जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत जोडले.


घटनादुरुस्ती क्रमांक 41 (1976) – सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय ६२ वर्षे केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 42 (1976) – "लघु संविधान" म्हणून ओळखली जाते; मूलभूत कर्तव्ये, समाजवाद, धर्मनिरपेक्षता यांचा समावेश.


घटनादुरुस्ती क्रमांक 43 (1977) – 42 व्या दुरुस्तीत घातलेले न्यायपालिकेवरचे निर्बंध हटवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 44 (1978) – संपत्तीचा मूलभूत हक्क काढून टाकला; आणीबाणीविषयक तरतुदींमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 45 (1980) – अनुसूचित जाती, जमाती व अँग्लो-इंडियन प्रतिनिधीत्वाचे आरक्षण वाढवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 46 (1982) – वस्तूंवर विक्रीकर लावण्याचा अधिकार सरकारला मिळवून दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 47 (1984) – जमिन सुधारणा कायद्यांचा समावेश नवव्या अनुसूचीत केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 48 (1984) – पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्याची परवानगी दिली.


घटनादुरुस्ती क्रमांक 49 (1984) – त्रिपुरातील आदिवासी भागांना विशेष राज्याचा दर्जा प्रदान.


घटनादुरुस्ती क्रमांक 50 (1984) – सशस्त्र दलातील सेवेच्या अटी सुधारित केल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 51 (1984) – ईशान्य भारतातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 52 (1985) – दलबदल विरोधी कायदा लागू केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 53 (1986) – मिझोरामसाठी विशेष तरतुदी.


घटनादुरुस्ती क्रमांक 54 (1986) – सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या वेतनात वाढ.


घटनादुरुस्ती क्रमांक 55 (1987) – अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 56 (1987) – गोवाला राज्याचा दर्जा; दमण-दीव केंद्रशासित प्रदेश राहिले.


घटनादुरुस्ती क्रमांक 57 (1987) – ईशान्य भारतातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 58 (1987) – संविधानाचे अधिकृत हिंदी भाषांतर राष्ट्रपतीकडून प्रकाशित करण्यास मान्यता.


घटनादुरुस्ती क्रमांक 59 (1988) – पंजाबमध्ये अंतर्गत अशांततेमुळे आणीबाणी लागू करण्याचा अधिकार.


घटनादुरुस्ती क्रमांक 60 (1988) – व्यवसाय व व्यवसायांवरील कराची मर्यादा वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 61 (1989) – मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षांवर आणले.


घटनादुरुस्ती क्रमांक 62 (1989) – SC/ST व अँग्लो-इंडियन आरक्षणाची मुदत वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 63 (1989) – 59 वी दुरुस्ती (पंजाब आणीबाणी) रद्द केली.


घटनादुरुस्ती क्रमांक 64 (1990) – पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 65 (1990) – अनुसूचित जाती व जमाती आयोग स्थापन.


घटनादुरुस्ती क्रमांक 66 (1990) – आणखी जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत समाविष्ट.


घटनादुरुस्ती क्रमांक 67 (1990) – पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट पुन्हा वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 68 (1991) – आणखी एकदा पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 69 (1991) – दिल्लीला "राष्ट्रीय राजधानी प्रदेश" म्हणून विशेष दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 70 (1992) – दिल्ली व पाँडिचेरी विधानसभेस राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा अधिकार.


घटनादुरुस्ती क्रमांक 71 (1992) – कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा आठव्या अनुसूचीत समावेश.


घटनादुरुस्ती क्रमांक 72 (1992) – त्रिपुराच्या आदिवासी भागांमध्ये आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 73 (1993) – पंचायत राज प्रणाली स्थापन; ग्रामपंचायतींसाठी घटनात्मक दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 74 (1993) – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सशक्तीकरण.


घटनादुरुस्ती क्रमांक 75 (1994) – भाडे नियंत्रण कायदा.


घटनादुरुस्ती क्रमांक 76 (1994) – तामिळनाडू आरक्षण कायदा नवव्या अनुसूचीत समाविष्ट.


घटनादुरुस्ती क्रमांक 77 (1995) – SC/ST कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 78 (1995) – नवव्या अनुसूचीत आणखी जमिन सुधारणा कायदे.


घटनादुरुस्ती क्रमांक 79 (1999) – अनुसूचित जाती, जमाती व अँग्लो-इंडियनसाठी आरक्षण वाढवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 80 (2000) – केंद्र–राज्य महसूल वाटप सूत्रात सुधारणा.


घटनादुरुस्ती क्रमांक 81 (2000) – SC/ST साठी पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यासाठी मागील अपूर्ण जागा राखून ठेवण्याची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 82 (2000) – SC/ST साठी परीक्षांमध्ये उत्तीर्ण गुणांच्या निकषात सवलत.


घटनादुरुस्ती क्रमांक 83 (2000) – अरुणाचल प्रदेशला पंचायतांमध्ये आरक्षणातून वगळले.


घटनादुरुस्ती क्रमांक 84 (2001) – २०२६ पर्यंत लोकसभा व विधानसभेतील जागांची मर्यादा गोठवली (१९७१ च्या जनगणनेवर आधारित).


घटनादुरुस्ती क्रमांक 85 (2001) – पदोन्नतीत “परिणामी वरिष्ठता” देण्याची तरतूद SC/ST साठी.


घटनादुरुस्ती क्रमांक 86 (2002) – ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण हा मूलभूत हक्क केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 87 (2003) – मतदारसंघांचे पुनर्रचना २००१ च्या जनगणनेवर आधारित करण्याची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 88 (2003) – सेवा कर लागू करून त्याचा समावेश संघ सूचीमध्ये केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 89 (2003) – अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र आयोगांची निर्मिती (SC आयोग आणि ST आयोग वेगळे).


घटनादुरुस्ती क्रमांक 90 (2003) – आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी प्रतिनिधित्वाची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 91 (2004) – मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा घालणे व दलबदल विरोधी कायदा अधिक कठोर बनवला.


घटनादुरुस्ती क्रमांक 92 (2004) – बोडो, डोगरी, मैथिली व संथाली या भाषांचा आठव्या अनुसूचीत समावेश.


घटनादुरुस्ती क्रमांक 93 (2006) – शैक्षणिक संस्थांमध्ये OBC वर्गासाठी आरक्षणाची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 94 (2006) – बिहार व झारखंडमध्ये आदिवासी कल्याण मंत्रिपदाची गरज काढून टाकली.


घटनादुरुस्ती क्रमांक 95 (2010) – SC/ST व अँग्लो-इंडियनसाठी आरक्षणाची मुदत आणखी १० वर्षांनी वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 96 (2011) – "ओडिया" या नावाने "ओरिया" या भाषेची जागा घेतली (८ व्या अनुसूचीत).


घटनादुरुस्ती क्रमांक 97 (2012) – सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 98 (2013) – हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राच्या विकासासाठी कर्नाटकच्या राज्यपालांना विशेष अधिकार.


घटनादुरुस्ती क्रमांक 99 (2014) – राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना (नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला).


घटनादुरुस्ती क्रमांक 100 (2015) – भारत–बांगलादेश सीमारेषा करारात सुधारणा.


घटनादुरुस्ती क्रमांक 101 (2016) – वस्तू व सेवा कर (GST) लागू केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 102 (2018) – मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 103 (2019) – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षणाची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 104 (2020) – SC/ST साठी लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये आरक्षण वाढवले, परंतु अँग्लो-इंडियन प्रतिनिधित्व समाप्त.


घटनादुरुस्ती क्रमांक 105 (2021) – राज्यांना इतर मागासवर्ग (OBC) ओळखण्याचे अधिकार पुन्हा दिले.


घटनादुरुस्ती क्रमांक 106 (2024) – लोकसभा, राज्य विधानसभांमध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी १/३ जागा आरक्षित केल्या (SC/ST जागांसह).

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


दिल्ली सुलतानची शासनव्यवस्था

 

🔸️ काही महत्त्वाचे अधिकारी :


🔹️ सुलतान : सर्वोच्च शासक, सर्व राजकीय, लष्करी आणि न्यायिक अधिकार सुलतानकडे असायचे.


🔹️ वझीर : महसूल अधिकारी, राज्याची आर्थिक व्यवस्था पाहायचा.


🔹️ सदर-उस-सुदूर : धार्मिक आणि न्यायाधीश अधिकारी, धार्मिक संस्था आणि न्यायदानाची जबाबदारी.


🔹️ अमीर : उच्च दर्जाचा सरदार, लष्करी आणि राजकीय सल्लागार.


🔹️ इक्ता पद्धती : सरदारांना जमीन वाटप करून महसूल गोळा करण्याची जबाबदारी.


🔹️ शाहना-ए-मंडी : बाजारपेठ नियंत्रक, वस्तूंच्या दरांचा आणि गुणवत्तेचा पाहणीकरिता.


🔹️ kazi : न्यायाधीश, शरीयतच्या आधारे न्यायदान करायचा.


🔹️ मुकेद्दम : गावांचा प्रमुख, महसूल संकलन आणि कायदा-सुव्यवस्था राखायचा.


🔸️ विभाग :

🔹️ दीवान-इ-अर्ज : सैन्य विभागाचा प्रमुख, सैन्य भरती आणि व्यवस्था करण्याची जबाबदारी.


🔹️ दीवान-इ-रियासत : धार्मिक विभाग, मुस्लिम कायद्यांचे पालन आणि धार्मिक बाबींचे व्यवस्थापन.


🔹️ दीवान-इ-इन्सा : पत्र व्यवहार विभाग, राजकीय दत्तकवळणाचे व्यवस्थापन.


🔹️ वकील-इ-दर : राजशिष्टाचार विभाग, दरबारातील शिष्टाचार आणि समारंभांची जबाबदारी.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

प्राणी वर्गीकरण – Animal Kingdom (Animal Classification



🔷 General Introduction

➤ सर्व प्राणी किंग्डम अॅनिमेलिया (Kingdom Animalia) मध्ये मोडतात.

➤ हे बहुकोशीय (Multicellular), परपोषी (Heterotrophic) आणि हालचाल करणारे (Motile) असतात.

➤ प्राण्यांना शरीररचना, पेशींची रचना, पोकळीची उपस्थिती, आणि शरीरातील विभाजन (Segmentation) या निकषांवर वर्गीकृत केले जाते.


🔷 1) पोरिफेरा (Porifera) – स्पंज वर्ग (Sponges)

➤ शरीर छिद्रयुक्त (Porous body), पाण्यातून अन्न घेणे.

➤ खरे ऊतक (Tissue) विकसित नाहीत.

➤ उदाहरणे – Sycon, Spongilla, Euplectella


🔷 2) सिलेंट्राटा / नीडेरिया (Coelenterata / Cnidaria)

➤ शरीरात निडोसिस्ट (Nidocyst) नावाचे दंशक पेशी (Stinging cells) असतात.

➤ रेडियल सममिती (Radial symmetry), दोन शरीररूप – पोलिप व मेड्यूसा.

➤ उदाहरणे – Hydra, Jellyfish, Obelia, Coral


🔷 3) प्लॅटीहेल्मिन्थिस (Platyhelminthes) – फ्लॅटवर्म्स (Flatworms)

➤ शरीर सपाट, द्विपार्श्व सममित (Bilateral symmetry), त्रिस्तरीय (Triploblastic).

➤ बरेच परजीवी (Parasitic).

➤ उदाहरणे – Tapeworm (Taenia), Liver fluke (Fasciola)


🔷 4) नेमॅटहेल्मिन्थिस (Nemathelminthes) – राउंडवर्म्स (Roundworms)

➤ शरीर दोन्ही बाजूंनी गोलाकार, अविकसित रक्तवाहिन्या व श्वसनसंस्था.

➤ परजीवी जीवन पद्धती.

➤ उदाहरणे – Ascaris (Roundworm), Wuchereria (Filaria worm)


🔷 5) अ‍निलिडा (Annelida) – खंडयुक्त कृमी (Segmented worms)

➤ शरीरात खंड (Segments), खऱ्या शरीर पोकळीसह (True coelom).

➤ रक्ताभिसरण प्रणाली विकसित.

➤ उदाहरणे – Earthworm (Pheretima), Leech (Hirudinaria)


🔷 6) आर्थ्रोपोडा (Arthropoda) – संधिपाद प्राणी (Joint-legged animals)

➤ शरीरावर बाह्यकंकाल (Exoskeleton) चिटिनयुक्त.

➤ संयुक्त पाय (Jointed legs), सर्वात मोठा संघ.

➤ उदाहरणे – Cockroach, Crab, Butterfly, Spider, Scorpion


🔷 7) मॉलस्का (Mollusca) – शंखधारी प्राणी (Soft-bodied animals)

➤ शरीर मऊ, बहुधा शंख (Shell) असतो.

➤ श्वसनासाठी गिल्स (Gills).

➤ उदाहरणे – Pila (Apple snail), Octopus, Sepia (Cuttlefish)


🔷 8) इकायनोडर्माटा (Echinodermata) – कंटकधारी प्राणी (Spiny-skinned animals)

➤ फक्त सागरी (Marine), शरीरावर काटे.

➤ जलवाहक प्रणाली (Water vascular system) उपस्थित.

➤ उदाहरणे – Starfish (Asterias), Sea urchin, Sea cucumber


🔷 9) हेमीकोर्डेटा (Hemichordata) – अर्धकशेरुकी (Half-chordates)

➤ शरीर तीन भागांत – प्रोबॉसिस, कॉलर, ट्रंक.

➤ नोटोकोर्ड (Notochord) फक्त पुढील भागात आढळतो.

➤ उदाहरण – Balanoglossus


🔷 10) कॉर्डेटा (Chordata) – कशेरुकी प्राणी (Vertebrates)

➤ नोटोकोर्ड (Notochord), पृष्ठीय नाडीतंतू (Dorsal nerve cord), आणि पाठीमागील शेपटी (Post-anal tail) असते.

➤ रक्ताभिसरण प्रणाली बंद प्रकारची.


कॉर्डेटा अंतर्गत प्रमुख वर्ग (Major Classes):

1️⃣ Pisces (माशे) – जलचर, गिल्सद्वारे श्वसन. उदा. Rohu, Shark

2️⃣ Amphibia (उभयचर) – जल व स्थल दोन्ही ठिकाणी राहतात. उदा. Frog, Toad

3️⃣ Reptilia (सरीसृप) – शीत रक्ताचे, खवलेदार त्वचा. उदा. Snake, Lizard, Crocodile

4️⃣ Aves (पक्षी) – उष्ण रक्ताचे, पंख, अंडी देतात. उदा. Pigeon, Sparrow, Peacock

5️⃣ Mammalia (सस्तन प्राणी) – उष्ण रक्ताचे, दूध देतात. उदा. Man, Cow, Dog, Bat


🔷 सारांश (Summary)

➤ प्राणी वर्गीकरणात 10 प्रमुख संघ (Phyla) विचारात घेतले जातात.

➤ यांपैकी Arthropoda हा सर्वात मोठा संघ आहे, तर Chordata मध्ये मानवाचा समावेश होतो.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

वनस्पती वर्गीकरण (Plant Classification)



🔷 १) संकल्पना (Concept)

➤ पृथ्वीवरील लाखो वनस्पतींचे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार गट तयार करण्यास वनस्पती वर्गीकरण म्हणतात.

➤ उद्देश – वनस्पतींची ओळख, तुलना आणि अभ्यास सुलभ करणे.


🔷 २) वर्गीकरणाचे प्रकार (Types of Classification)

➤ (A) कृत्रिम वर्गीकरण (Artificial Classification)

फक्त बाह्य लक्षणांवर आधारित.

उदा. आकार, रंग, उपयोग इ.

उदा. थिओफ्रास्टस, लिनिअस यांनी वापरले.


➤ (B) नैसर्गिक वर्गीकरण (Natural Classification)

बाह्य + अंतर्गत दोन्ही लक्षणांवर आधारित.

उदा. बेंटहॅम आणि हूकर यांचे वर्गीकरण.


➤ (C) उत्क्रांतीवर आधारित वर्गीकरण (Phylogenetic Classification)

वनस्पतींच्या उत्क्रांतीतील नातेसंबंधावर आधारित.

उदा. एंग्लर आणि प्रँटल, हचिन्सन यांनी वापरले.


🔷 ३) वर्गीकरणाचा इतिहास (History of Classification)

➤ थिओफ्रास्टस (Theophrastus) – “Botanyचा जनक”; झाडे, झुडपे, औषधी गटात वर्गीकरण.

➤ लिनिअस (Carolus Linnaeus) – “द्विनाम पद्धतीचा जनक”; प्रत्येक वनस्पतीस दोन नावे – वंश आणि प्रजाती.

➤ बेंटहॅम व हूकर (Bentham & Hooker) – Natural System दिले.

➤ एंग्लर व प्रँटल (Engler & Prantl) – उत्क्रांतीवर आधारित प्रणाली दिली.


🔷 ४) वनस्पतींचे मुख्य गट (Main Groups of Plants)

✅ १) थॅलॉफायटा (Thallophyta)

➤ सर्वात आदिम व साध्या रचनेच्या वनस्पती.

➤ खरे खोड, मुळे, पाने नसतात.

➤ शरीर “थॅलस” स्वरूपाचे असते.

➤ वाहक ऊतक (vascular tissue) नसते.

➤ प्रजोत्पादन बीजांशिवाय बीजुकांद्वारे होते.

➤ पाणी किंवा ओलसर जागी वाढतात.

➤ उदाहरणे:

शैवाल (Algae): Spirogyra, Ulothrix, Chlamydomonas, Volvox, Laminaria, Sargassum.

बुरशी (Fungi): Rhizopus (भाकरीवरील बुरशी), Yeast (साचलेली यीस्ट), Agaricus (मशरूम).


✅ २) ब्रायॉफायटा (Bryophyta)

➤ यांना “पाणथळ वनस्पती” म्हणतात कारण या अंशतः जलजीवी आणि स्थलजीवी आहेत.

➤ खरे वाहक ऊतक नसते पण मुळासारख्या रचना (rhizoids) असतात.

➤ “Amphibians of Plant Kingdom” असेही म्हणतात.

➤ लैंगिक प्रजोत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते.

➤ शरीरात खोड, पाने थोड्याशा प्रमाणात वेगळी दिसतात.

➤ उदाहरणे:

Funaria (Moss), Riccia, Marchantia, Anthoceros.


✅ ३) प्टेरिडोफायटा (Pteridophyta)

➤ या वनस्पतींमध्ये खरे मुळे, खोड आणि पाने असतात.

➤ वाहक ऊतक (xylem, phloem) विकसित असते.

➤ बीज तयार होत नाहीत; बीजुकांद्वारे प्रजनन होते.

➤ यांना “पहिल्या वाहक ऊतक असलेल्या वनस्पती” म्हणतात.

➤ लैंगिक प्रजननासाठी पाण्याची गरज असते.

➤ उदाहरणे:

Fern (Nephrolepis), Equisetum (Horsetail), Lycopodium (Club moss), Marsilea.


✅ ४) जिम्नोस्पर्म (Gymnosperms)

➤ “अनावृत्तबीजी वनस्पती” — बीजांवर आवरण नसते.

➤ बीज तयार होतात पण फुले किंवा फळे नसतात.

➤ या वनस्पती उंच आणि दीर्घायुषी असतात.

➤ खरे मुळे, खोड, पाने असतात आणि वाहक ऊतक पूर्ण विकसित असतात.

➤ परागण आणि फलन वाऱ्याद्वारे (Wind pollination) होते.

➤ उदाहरणे:

Cycas, Pinus (देवदार), Cedrus, Ephedra.


✅ ५) अँजिओस्पर्म (Angiosperms)

➤ “आवृत्तबीजी वनस्पती” – बीज फळाच्या आवरणात बंद असते.

➤ फुलझाडे या गटात येतात.

➤ सर्वाधिक प्रगत व विविधतेने समृद्ध गट.

➤ वाहक ऊतक विकसित आणि पूर्ण कार्यक्षम असतात.

➤ उदाहरणे: आंबा (Mango), गहू (Wheat), तांदूळ (Rice), मटार (Pea), गुलाब (Rose).


🔷 ६) अँजिओस्पर्मचे उपविभाग (Subdivisions of Angiosperms)

✅ (A) एकदलीय (Monocotyledons)

➤ बीजामध्ये एकच दलिका (cotyledon).

➤ शिरा समांतर (Parallel venation).

➤ मूळ तंतुमूल (fibrous).

➤ फुलांची पाकळ्या ३ च्या पटीत.

➤ उदाहरणे: गहू, तांदूळ, ऊस, केळी, लसूण, कांदा.


✅ (B) द्विदलीय (Dicotyledons)

➤ बीजामध्ये दोन दलिका.

➤ शिरा जाळीदार (Reticulate venation).

➤ मूळ प्रधानमूल (tap root).

➤ फुलांची पाकळ्या ४ किंवा ५ च्या पटीत.

➤ उदाहरणे: आंबा, मटार, गुलाब, सूर्यफूल, कापूस.


🔷 ७) आधुनिक वर्गीकरण (Modern Classification)

➤ DNA sequencing, molecular data आणि evolutionary संबंधांवर आधारित.

➤ सर्वाधिक मान्य प्रणाली: APG System (Angiosperm Phylogeny Group)

➤ संगणकीय व जीनोमिक अभ्यासावर आधारित वर्गीकरण.


🔷 ८) वर्गीकरणाचे महत्त्व (Importance of Classification)

➤ वनस्पतींची ओळख आणि अभ्यास सुलभ होतो.

➤ कृषी, औषधी, पर्यावरणशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात उपयोगी.

➤ नवीन प्रजाती शोधणे आणि संरक्षणासाठी मदत होते.


🔷 ९) महत्वाचे शास्त्रज्ञ (Important Botanists)

➤ थिओफ्रास्टस – वनस्पती वर्गीकरणाचा जनक.

➤ लिनिअस – द्विनाम पद्धती.

➤ बेंटहॅम व हूकर – नैसर्गिक प्रणाली.

➤ एंग्लर व प्रँटल – उत्क्रांती आधारित प्रणाली.

➤ हचिन्सन – आधुनिक वर्गीकरण.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली प्रमुख वृत्तपत्रे, संघटना आणि राजकीय पक्ष



🔷 वृत्तपत्रे (Newspapers started by Dr. B. R. Ambedkar)

➤ मूकनायक (Mooknayak) – सन 1920 मध्ये सुरू

➤ बहिष्कृत भारत (Bahishkrit Bharat) – सन 1927 मध्ये सुरू

➤ समता (Samata) – 29 जून 1928 मध्ये सुरू

➤ जनता (Janata) – सन 1930 मध्ये सुरू

➤ प्रबुद्ध भारत (Prabuddha Bharat) – सन 1956 मध्ये सुरू


🔷 संघटना (Organizations founded by Dr. Ambedkar)

➤ बहिष्कृत हितकारिणी सभा (Bahishkrit Hitakarini Sabha) – सन 1924 मध्ये स्थापन

➤ महार बुद्धिस्ट सोसायटी (Mahar Buddhist Society) – सन 1926 मध्ये स्थापन

➤ समता सैनिक दल (Samata Sainik Dal) – सन 1927 मध्ये स्थापन

➤ डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी (Depressed Classes Education Society) – सन 1928 मध्ये स्थापन

➤ पीपल्स एज्युकेशन सोसायटी (People’s Education Society) – सन 1945 मध्ये स्थापन

➤ भारतीय बौद्ध महासभा (Bharatiya Bauddha Mahasabha) – सन 1955 मध्ये स्थापन


🔷 राजकीय पक्ष (Political parties founded by Dr. Ambedkar)

➤ इंडिपेंडंट लेबर पार्टी (Independent Labour Party) – सन 1936 मध्ये स्थापन

➤ शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (Scheduled Castes Federation) – सन 1942 मध्ये स्थापन

➤ भारतीय रिपब्लिकन पार्टी (Republican Party of India) – या पक्षाची संकल्पना 1956 मध्ये मांडली (स्थापना बाबासाहेबांच्या निधनानंतर 1957 मध्ये झाली)


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

चालू घडामोडी प्रश्नसंच

 01) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची 619 वी केंद्रीय मंडळ बैठक कोणत्या शहरात आयोजित झाली ?

👉  उदयपूर / Udaipur ✅



02) स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या वार्षिक कर्मचारी उत्कृष्टता पुरस्काराचे नाव काय आहे ?

👉  SBI Star



03) नैनीताल बँक लिमिटेडमधील आपला बहुसंख्य हिस्सा विकण्याची योजना कोणत्या बँकेने थांबवली आहे ?

👉  बँक ऑफ बडोदा 



04) UPI व्यवहारांची किंमत ₹27.28 लाख कोटींच्या सर्वकालीन उच्चांकावर कोणत्या महिन्यात पोहोचली ?

👉 ऑक्टोबर 2025 



05) National Interoperable Payment Limited (NIPL) ने मलेशियामध्ये UPI पेमेंट सक्षम करण्यासाठी कोणत्या कंपनीशी भागीदारी केली आहे ?

👉  Razorpay Curlec 



06) संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे (DRDL) संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

👉  अंकथी राजू 



07) अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे झालेल्या त्रिसेवा सैन्य सरावाचे नाव काय आहे ?

👉  पूर्वी प्रचंड प्रहार



08) OpenAI ने क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर साठी कोणत्या कंपनीसोबत $38 अब्ज डॉलर्सची भागीदारी केली आहे ?

👉  Amazon Web Services (AWS)



थोरियम-मोल्टन सॉल्ट रिऍक्टरमध्ये थोरियमपासून युरेनियम इंधन रूपांतर करणारा जगातील पहिला देश कोण आहे ?

👉  चीन 



09) अलीकडेच रामसर स्थळ म्हणून घोषित झालेलं Gogabeel Lake कोणत्या भारतीय राज्यात आहे ?

👉  बिहार 



10) “The Loneliness of Sonia and Sunny” या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2025 च्या अंतिम यादीत कोणाचे नाव आले आहे ?

👉  किरण देसाई 

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

काही महत्त्वाच्या नियुक्त्या



◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

ऑक्सिडेशन (Oxidation) आणि रिडक्शन (Reduction)



🔷 १) ऑक्सिजन व हायड्रोजनच्या दृष्टीने व्याख्या:

➤ ऑक्सिडेशन: ज्या क्रियेमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये ऑक्सिजनचा संयोग (Addition of Oxygen) होतो किंवा हायड्रोजनचा अपसारण (Removal of Hydrogen) होते, त्या क्रियेला ऑक्सिडेशन म्हणतात.

उदा. ➤ 2H₂ + O₂ → 2H₂O (हायड्रोजनचे ऑक्सिडेशन झाले)


➤ रिडक्शन: ज्या क्रियेमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये ऑक्सिजनचा अपसारण (Removal of Oxygen) होतो किंवा हायड्रोजनचा संयोग (Addition of Hydrogen) होतो, त्या क्रियेला रिडक्शन म्हणतात.

उदा. ➤ CuO + H₂ → Cu + H₂O (CuO चे रिडक्शन झाले)


🔷 २) इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने व्याख्या:

➤ ऑक्सिडेशन: ज्या क्रियेमध्ये कोणत्याही पदार्थातून इलेक्ट्रॉन दिला जातो (Loss of electrons), ती क्रिया ऑक्सिडेशन असते.


उदा. ➤ Na → Na⁺ + e⁻


➤ रिडक्शन: ज्या क्रियेमध्ये कोणत्याही पदार्थाने इलेक्ट्रॉन घेतला जातो (Gain of electrons), ती क्रिया रिडक्शन असते.


उदा. ➤ Cl₂ + 2e⁻ → 2Cl⁻


🔷 ३) प्रोटॉनच्या दृष्टीने व्याख्या (Acid-base संकल्पनेत):

➤ ऑक्सिडेशन: ज्या क्रियेमध्ये प्रोटॉन (H⁺) दिला जातो (Loss of proton), ती ऑक्सिडेशन प्रक्रिया आहे.


➤ रिडक्शन: ज्या क्रियेमध्ये प्रोटॉन (H⁺) घेतला जातो (Gain of proton), ती रिडक्शन प्रक्रिया आहे.


🔷 सारांश:

➤ ऑक्सिडेशन = इलेक्ट्रॉन गमावणे / ऑक्सिजन वाढवणे / हायड्रोजन कमी करणे / प्रोटॉन देणे

➤ रिडक्शन = इलेक्ट्रॉन मिळवणे / ऑक्सिजन कमी करणे / हायड्रोजन वाढवणे / प्रोटॉन घेणे


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

२०२५ मधील विविध ऑपरेशन



1) आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑपरेशन

🔹️ इस्त्रायलने इराणवर हल्ल्यासाठी राबविलेले — ऑपरेशन स्टायकिंग लायन

🔹️ इराणने इस्त्रायलवर हल्ल्यासाठी राबविलेले — ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री

🔹️ अमेरिकेने इराण हल्ल्यासाठी राबविलेले — ऑपरेशन मिड नाईट हॅमर

🔹️ इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद-एअर बेसवर हल्ल्यासाठी — ऑपरेशन बशायर अल फतह

🔹️ भारताने इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी — ऑपरेशन सिंधू

🔹️ युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ल्यासाठी — ऑपरेशन स्कायडर वेब


2) राष्ट्रीय/राज्यस्तरीय नैसर्गिक आपत्ती व बचावकार्य

🔹️ ईशान्य भारतातील बाढग्रस्त स्थळांवरील पुनर्वसनासाठी — ऑपरेशन स्वस्तिक

🔹️ आसाम दुर्गम भागातील गावांना मदत — ऑपरेशन सहयोग

🔹️ पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पुरानंतर लष्करी मदत — ऑपरेशन SWARNA


3) दहशतवादविरोधी आणि सुरक्षाविषयक ऑपरेशन

🔹️ अमरनाथ यात्रा २०२५ पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात — ऑपरेशन बिहाली

🔹️ पहलगाम हल्ल्यात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा — ऑपरेशन महादेव

🔹️ घुसखोरी थांबविण्यासाठी — ऑपरेशन शिवशक्ती


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

🔹️ जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्ध — ऑपरेशन अब्रह्म

🔹️ अमरनाथ यात्रा सुरक्षिततेसाठी — ऑपरेशन शिवा


4) सायबर गुन्हे व आर्थिक फसवणूकविरोधी ऑपरेशन

🔹️ सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी CBI — ऑपरेशन चक्र


5) अंमली पदार्थ व अवैध व्यापाराविरोधी ऑपरेशन

🔹️ बेकायदेशीर औषध व्यापाराविरोधात NCB — ऑपरेशन MED MAX

🔹️ NCB ने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणण्यासाठी — ऑपरेशन MELON

🔹️ भारतातील हायड्रोपोनिक गांजा तस्करीविरोधात — ऑपरेशन सवेरा

🔹️ हायड्रोपोनिक गांजा जप्ती (DRI) — ऑपरेशन राहत

🔹️ दिल्लीतील अंमली पदार्थ तस्करीविरोधात — ऑपरेशन संस्कार

🔹️ राजस्थान पोलीस बाईक टोळीवर कारवाई — ऑपरेशन Weedout

🔹️ ऑपरेशन गरुड

🔹️ ऑपरेशन वीड आऊट


6) सामाजिक सुरक्षा व मुलांवरील मोहिमा

🔹️ १८ वर्षांखालील बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी (केंद्र) — ऑपरेशन मुस्कान

🔹️ १८ वर्षांखालील बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी (महाराष्ट्र) — ऑपरेशन शोध

🔹️ रस्त्यावरच्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी (पंजाब) — ऑपरेशन जीवनज्योत 2

🔹️ तेलंगणा सरकारने मुलांची सुटका करण्यासाठी — ऑपरेशन मुस्कान XI


7) कायद्याची अंमलबजावणी व राज्य सरकार मोहिमा

🔹️ गंभीर गुन्ह्यांमध्ये लवकर न्यायासाठी (उत्तरप्रदेश) — ऑपरेशन कन्व्हिक्शन

🔹️ बनावट साधूंविरुद्ध (उत्तराखंड) — ऑपरेशन कालनेमी

🔹️ बेकायदेशीर चीनी फटाके जप्ती — ऑपरेशन फायर ट्रेल

🔹️ गोदावरी नदीतील अवैध रेती उपसा थांबविण्यासाठी (नांदेड़) — ऑपरेशन फ्लश आऊट

🔹️ कानपूर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात जमीन माफिया आणि खंडणी टोळ्यांवर कारवाई — ऑपरेशन महाकाल

🔹️ BSF ने राजस्थान सीमेजवळ शिकारींपासून संरक्षणासाठी — ऑपरेशन अलर्ट

🔹️ उत्तरप्रदेश पोलिसांनी व्यसनमुक्तीसाठी — ऑपरेशन फाल्कन

🔹️ आंध्रप्रदेशात स्वर्णभूमी दलाला अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी — ऑपरेशन रेनो

३१ ऑक्टोबर २०२५

भारताचे उपराष्ट्रपती (Vice President of India)



🔹 संविधानातील कलमे :

 • कलम 63 ते 71 — उपराष्ट्रपतींच्या पदासंबंधी आहेत.


🔹 उपराष्ट्रपतींची निवड (Election):

 1. निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते.

 2. संसदेचे दोन्ही सभागृह (लोकसभा आणि राज्यसभा) यांच्या सदस्यांद्वारे निवड केली जाते.

 3. गुप्त मतदानाने (Secret Ballot) व एकांतरणीय हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote) पद्धतीने निवड होते.


🔹 पदाचा कार्यकाळ:

 • 5 वर्षांचा असतो.

 • पुन्हा निवड होऊ शकते.


🔹 अर्हता (Qualifications):

 1. भारताचा नागरिक असावा.

 2. किमान वय 35 वर्षे असावे.

 3. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असावे.

 4. कोणत्याही नफ्याच्या पदावर नसावा.


🔹 पदाचे अधिकार व कर्तव्ये:

 1. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती (Ex-officio Chairman of Rajya Sabha) असतात.

 2. राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास किंवा मृत्यू झाल्यास कार्यवाह राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.

 3. राज्यसभेतील शिस्त, कार्यवाही आणि चर्चेचे नियंत्रण ठेवतात.


🔹 पद रिक्त होण्याची कारणे:

 1. राजीनामा (राष्ट्रपतींकडे दिला जातो)

 2. कार्यकाळ पूर्ण होणे

 3. मृत्यू

 4. अपात्र ठरविणे (संसद ठरवते)

सविनय कायदेभंग चळवळ (1930-1934)



1️⃣ पार्श्वभूमी व आरंभ

➤ 1929 च्या लाहोर अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे राष्ट्रध्येय ठरविण्यात आले.

➤ याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला.

➤ सविनय कायदेभंग चळवळीसाठी ‘मीठ’ या वस्तूची निवड करण्यात आली.


2️⃣ दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930)

➤ एकूण अंतर : 385 कि.मी. (240 मैल) – साबरमती ते दांडी.

➤ गांधीजींसोबत 78 सहकारी सहभागी झाले.

➤ 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी किनाऱ्यावर मिठाचा सत्याग्रह केला.

➤ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना “नेपोलियन अल्बावरून पॅरिसकडे गेला” या घटनेशी केली.


3️⃣ महिलांचा सहभाग 👩‍🦰

➤ सरोजिनी नायडू

➤ कमलादेवी चट्टोपाध्याय

➤ कमला नेहरू

➤ हेमप्रभा दास

➤ सुचेता कृपलानी

➤ कस्तूरबा गांधी

➤ हंसाबाई मेहता

➤ अवंतीबाई गोखले


4️⃣ सविनय कायदेभंगाचे स्वरूप व प्रमुख केंद्रे

➤ पेशावर सत्याग्रह : नेतृत्व – अब्दुल गफार खान.

➤ सोलापूर सत्याग्रह : लष्करी कायदा अस्तित्वात असताना गिरणी कामगारांनी सत्याग्रह केला.

  मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली.

➤ धारासना सत्याग्रह (गुजरात) : नेतृत्व – सरोजिनी नायडू, मीराबेन.

➤ बॉम्बे चौपाटीवर : कमलादेवी चट्टोपाध्याय व अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाचा सत्याग्रह केला.

➤ महाराष्ट्रात : वडाळा, मालवण, शिरोडा, दहीहंडा इ. ठिकाणी मिठाचा सत्याग्रह.

➤ कर्नाटकात : ‘सनिकट्टा’ येथे मिठाचा सत्याग्रह.

➤ ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता, तेथे इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.


5️⃣ इतर स्थानिक चळवळी

➤ महाराष्ट्रातील पुसद येथे बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह झाला.

➤ सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे राजुताई कदम यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह.

➤ गुजरातमध्ये : खेडा, बाडोली, जंबुसार, भरुच येथे साराबंदी चळवळ राबविण्यात आली.


6️⃣ जनसहभाग व प्रतीकात्मक उपक्रम

➤ प्रभातफेरी, मुलांची वानरसेना या आंदोलनात सक्रिय होती.

➤ देशभरात ब्रिटिश कायद्यांविरुद्ध असहकार, बंद, सभा, निदर्शने झाली.

संसदेचे कामकाज करण्याची साधने (Devices of Parliamentary Proceedings)



1️⃣ प्रश्न काळ (Question Hour)

✅️ अर्थ: प्रत्येक संसदीय बैठकीचा पहिला तास म्हणजे प्रश्नकाळ असतो.

➤ या काळात सदस्य शासनाच्या धोरणांबद्दल, निर्णयांबद्दल आणि प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारतात.

➤ संबंधित मंत्री हे प्रश्नांचे उत्तर देतात.


2️⃣ प्रश्नांचे प्रकार (Types of Questions)

अ) तारांकित प्रश्न (Starred Question)

✅️ उत्तर: तोंडी दिले जाते.

➤ सदस्य उपप्रश्न (Supplementary Questions) विचारू शकतात.

➤ अध्यक्ष/सभापती हे प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये रूपांतरित करू शकतात.

➤ एका दिवशी एका सदस्याला एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.

➤ एका दिवशी जास्तीत जास्त 20 प्रश्न घेतले जातात.

➤ पेपरचा रंग: हिरवा (Green Paper)


ब) अतारांकित प्रश्न (Unstarred Question)

✅️ उत्तर: लेखी स्वरूपात दिले जाते.

➤ सदस्यांना उपप्रश्न विचारता येत नाहीत.

➤ या प्रश्नांमध्ये सामान्यतः आकडेवारी किंवा विस्तृत माहिती मागवली जाते.

➤ एका दिवशी एका सदस्याचे 4 किंवा 5 प्रश्न घेतले जातात.

➤ एका दिवशी एकूण 230 प्रश्न घेतले जातात.

➤ पेपरचा रंग: पांढरा (White Paper)


क) अल्प सूचना प्रश्न (Short Notice Question)

✅️ अर्थ: जेव्हा 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत उत्तर आवश्यक असते, तेव्हा हा प्रश्न विचारला जातो.

➤ अध्यक्ष/सभापती आणि संबंधित मंत्र्यांची परवानगी आवश्यक असते.

➤ या प्रश्नाचे उत्तर तोंडी दिले जाते.

➤ मंत्र्यांविरुद्ध खासगी सदस्यांनाही प्रश्न विचारता येतात (खाजगी विधेयक असल्यास).

➤ पेपरचा रंग: फिकट गुलाबी (Light Pink Paper)


ड) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न (Question by Private Member)

✅️ अर्थ: हे प्रश्न सरकारी मंत्र्यांऐवजी इतर खासगी सदस्यांना विचारले जातात.

➤ पेपरचा रंग: पिवळा (Yellow Paper)


📘 महत्त्व:

➤ प्रश्नकाळ हा संसदेतील लोकशाही उत्तरदायित्वाचा सर्वात प्रभावी साधन मानला जातो.

➤ तो शासनाचे कामकाज पारदर्शक ठेवतो आणि मंत्र्यांना जबाबदार बनवतो.

महत्त्वाचे जागतिक निर्देशांक – 2025 (Exam Point of View)

 


1️⃣ मानव विकास निर्देशांक (HDI - 2025)

▪️ Theme: A matter of choice: People & possibilities in the age of AI

➤ भारताचा क्रमांक: 130 वा

➤ पहिले 4 देश: आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क


2️⃣ जागतिक असमानता निर्देशांक (GII - 2025) (Global Inequality Index)

▪️ भारताचा क्रमांक: 102 वा


3️⃣ जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 102 वा


4️⃣ जागतिक नवोन्मेष निर्देशांक (Global Innovation Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 38 वा (139 देशांत)


5️⃣ जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 118 वा


6️⃣ जागतिक शांतता निर्देशांक (Global Peace Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 115 वा


7️⃣ भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (Corruption Perception Index - 2024)

▪️ भारताचा क्रमांक: 96 वा


8️⃣ शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report - 2025)

▪️ संस्था: SDSN (Sustainable Development Solutions Network)

▪️ भारताचा क्रमांक: 99 वा

➤ पहिले 3 देश: फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क


9️⃣ जागतिक लिंगभेद निर्देशांक (Global Gender Gap Report - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 131 वा

भूगर्भीय हालचाली व वलीकरण (Geological Movements and Folding)



१) पर्वत निर्माणकारी हालचाली (Orogenic Movements)

✅️ भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या पर्वत निर्माणकारी हालचाली दोन प्रमुख प्रकारच्या असतात :

➤ संकोचीय हालचाल (Compressional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर दाब निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांकडे सरकतात व दुमडले जातात.

➤ तणावक हालचाल (Tensional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांपासून दूर जातात व भेगा पडतात.


२) संकोचीय हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या प्रमुख संरचना:

✅️ ➤ सवलन (Warping) – पृथ्वीच्या पृष्ठभागावर मृदू व संथ दाबामुळे वर-खाली वाकणे होते.

✅️ ➤ वलीकरण (Folding) – संकोचामुळे खडकांच्या थरांना वळ्या पडतात व पर्वतरचना निर्माण होते.


३) वलीकरण (Folding):

✅️ भूपृष्ठावरील संकोचीय हालचालींमुळे मृदू आणि अवसादी खडकांच्या थरांना वळ्या पडतात, त्याला वलीकरण असे म्हणतात.

✅️ या प्रक्रियेत खडकांच्या थरांना दाब पडल्याने ते तुटत नाहीत तर वाकतात.

✅️ वलीकरणामुळे अंतर्वल (Anticline) व बहिर्वल (Syncline) अशा संरचना तयार होतात.


४) वळ्यांचे प्रकार (Types of Folds):

1️⃣ साधारण / सम्मित वळण (Symmetrical Fold):

➤ दोन्ही भुजा समान उताराच्या असतात.

➤ वळणाच्या मध्यावर अक्ष रेषा उभी राहते.


2️⃣ असाधारण / असममित वळण (Asymmetrical Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांचे उतार असमान असतात.

➤ एका बाजूचा उतार दुसऱ्यापेक्षा जास्त तीव्र असतो.


3️⃣ एकनत वळण (Monoclinal Fold):

➤ एक भुजा मंद उताराची तर दुसरी जवळपास लंबवत असते.

➤ साधारणतः एका दिशेने वाकलेला थर दिसतो.


4️⃣ सम्मयत वळण (Isoclinal Fold):

➤ दोन्ही भुजा एकाच दिशेने झुकलेल्या असतात व जवळपास समांतर होतात.

➤ खूप दाबाखाली हे वळण तयार होते.


5️⃣ परिवलित वळण (Recumbent Fold):

➤ वळ्याच्या भुजा इतक्या वाकतात की एक भुजा दुसऱ्यावर उलटते.

➤ वळ्याचे शीर्ष जवळपास समांतर दिसते.


6️⃣ पंख आकार वळण (Fan-shaped Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांची उंची वाढत जाऊन वळण पंखासारखे दिसते.

➤ मध्यभाग खाली व बाजू उंच असतात.


7️⃣ विखंडीत वळण (Nappes Fold):

➤ खूप ताण पडल्याने वळणाची एक भुजा तुटते व दुसऱ्या भुजेवर सरकते.

➤ ही तुटलेली भुजा कधी दुसऱ्या खंडावर जाऊन स्थिरावते.

➤ अशा वळ्यांमुळे भूगर्भीय विस्थापन (displacement) मोठ्या प्रमाणात होते.


५) वलीकरणाचे भूगर्भीय महत्त्व:

✅️ ➤ पर्वतरचना निर्माण करण्यास कारणीभूत (उदा. हिमालय).

✅️ ➤ खनिजांचे, धातूंचे व जलस्रोतांचे स्थान निश्चित करण्यात मदत होते.

✅️ ➤ पृथ्वीच्या अंतर्गत बलांची दिशा व तीव्रता यांचे संकेत मिळतात.

✅️ ➤ भू-रचना विज्ञानात वलीकरण अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

नदी प्रवाहाचे प्रकार (Types of River Drainage / Flow)

१) अनुवर्ती प्रवाह (Consequent Stream)

➤ हा प्रवाह प्रदेशाच्या नैसर्गिक उतारानुसार वाहतो.

➤ पर्वतरांग, पठार किंवा भूभागाच्या उताराची दिशा ज्या दिशेने असेल, त्या दिशेनेच हा प्रवाह वाहतो.

➤ या प्रवाहाला ‘आनुषंगिक प्रवाह’ असेही म्हणतात.

➤ उदा. गंगा, गोदावरी, नर्मदा यांच्या काही उपनद्या.


२) परावर्ती प्रवाह (Subsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहानंतर तयार होतो.

➤ तो मुख्य प्रवाहाला समांतर वाहतो आणि दऱ्यांमधून प्रवाहित होतो.

➤ भूपृष्ठाच्या मृदू थरांमध्ये क्षरण झाल्यामुळे अशा प्रवाहांची निर्मिती होते.

➤ उदा. यमुना (गंगेची उपनदी).


३) प्रत्यनुवर्ती प्रवाह (Obsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतो.

➤ परंतु शेवटी तो मुख्य प्रवाहात मिळतो.

➤ भूगर्भीय उन्नतीनंतर किंवा उतार बदलल्याने असे प्रवाह निर्माण होतात.

➤ उदा. काही हिमालयीन उपनद्या ज्या उलट दिशेने वाहतात.


४) गुंफित प्रवाह (Braided Stream)

➤ प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व गोटे असल्यास नदीचा प्रवाह विभागला जातो.

➤ अनेक लहान प्रवाह एकमेकांत गुंफल्यासारखे वाहतात.

➤ प्रवाहात बेटांसारखे गाळाचे भाग तयार होतात.

➤ उदा. ब्रह्मपुत्रा नदीचा काही भाग.


५) अननुवर्ती प्रवाह (Insequent Stream)

➤ या प्रवाहाचा दिशा, वाहण्याचा क्रम प्रदेशाच्या उताराशी किंवा भूपृष्ठाच्या रचनेशी जुळत नाही.

➤ भूभागातील स्थानिक क्षरण किंवा खडकांच्या वेगवेगळ्या प्रतिकारक्षमतेमुळे हा प्रवाह तयार होतो.

➤ हे प्रवाह अव्यवस्थित स्वरूपाचे असतात.

पंतप्रधानांचे कार्यालय (Prime Minister’s Office – PMO)



१) स्थापना :

➤ 1977 साली पंतप्रधानांचे कार्यालय (PMO) स्थापन झाले.

➤ सुरुवातीला याला Prime Minister’s Secretariat असे म्हणत असत; मोरारजी देसाई यांच्या काळात (1977) याचे नामकरण Prime Minister’s Office (PMO) असे करण्यात आले.


२) रचना आणि कार्यप्रणाली :

➤ हे कार्यालय म्हणजे भारताच्या पंतप्रधानांचे तात्काळ कर्मचारी वर्ग आणि सहाय्यक यंत्रणा आहे.

➤ यात विविध स्तरांवरील अधिकारी, सल्लागार, सचिव आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असतो.

➤ PMO चे प्रशासकीय प्रमुख – पंतप्रधानांचे प्रधान सचिव (Principal Secretary to PM) असतात.

➤ सध्या या पदावर प्रमोद कुमार मिश्रा कार्यरत आहेत.


३) PMO अंतर्गत येणाऱ्या प्रमुख संस्था :

➤ Department of Atomic Energy (परमाणु ऊर्जा विभाग)

➤ Department of Space (अंतराळ विभाग)

➤ Performance Management Division (कामगिरी व्यवस्थापन विभाग)

➤ National Security Council (राष्ट्रीय सुरक्षा परिषद)


४) PMO ची मुख्य कार्यक्षेत्रे :

➤ पंतप्रधानांच्या वैयक्तिक लक्षाची आवश्यकता असलेल्या धोरणात्मक व प्रशासकीय बाबींचे व्यवस्थापन.

➤ केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी समन्वय राखणे.

➤ राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व केंद्र-राज्य संबंधातील महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांना सल्ला देणे.


५) PMO द्वारे हाताळल्या जाणाऱ्या प्रमुख बाबी :

1️⃣ संरक्षणविषयक महत्त्वाचे मुद्दे.

2️⃣ नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील त्या बाबी, ज्या राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय अमलात आणता येत नाहीत.

3️⃣ सर्व महत्त्वाचे धोरणात्मक (policy-related) निर्णय.

4️⃣ परदेशातील भारतीय मिशन प्रमुखांच्या नियुक्त्या आणि भारतामध्ये कार्यरत विदेशी मिशन प्रमुखांसाठी मंजुरी प्रस्ताव.

5️⃣ कॅबिनेट सचिवालयाशी संबंधित सर्व निर्णय, तसेच राज्य प्रशासकीय व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, UPSC, निवडणूक आयोग, वैधानिक व संवैधानिक समित्या यांच्या सदस्यांच्या नियुक्त्या.

6️⃣ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि इतर नागरी सेवांच्या धोरणात्मक व प्रशासकीय सुधारणा विषयक निर्णय.

7️⃣ राज्यांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजचे निरीक्षण, तसेच त्यासंबंधित नियतकालिक अहवाल सादर करणे.


६) PMO चे महत्त्व :

➤ हे कार्यालय भारत सरकारचे प्रशासकीय व धोरणात्मक केंद्रबिंदू आहे.

➤ पंतप्रधानांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व राजनैतिक सहाय्य पुरवते.

➤ राष्ट्रीय धोरणनिर्मिती, अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वात PMO चे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

राजा राममोहन रॉय व ब्राम्हो समाज – भारतीय प्रबोधन युगाचे जनक



➊ मूलभूत माहिती व पार्श्वभूमी

➤ संपूर्ण नाव : राजा राममोहन रॉय

➤ जन्म : १७७२, राधानगर, हुगळी जिल्हा (पश्चिम बंगाल)

➤ वडील : रमाकांत रॉय | आई : तारिणीदेवी

➤ आजोबा : कृष्णचंद्र बंदोपाध्याय (बंगाल नबाबांच्या दरबारात अधिकारी)

➤ 'रॉय' ही पदवी नबाब दरबाराकडून सन्मान म्हणून देण्यात आली


➋ शिक्षण व भाषाशिक्षण

➤ १७८९ मध्ये अरबी व पर्शियन भाषा शिकण्यासाठी पाटणा येथे पाठवले

➤ नंतर बनारस येथे संस्कृत आणि हिंदू धर्मशास्त्रांचे शिक्षण

➤ १८०३ नंतर इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली

➤ फारसी, बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, हिब्रू या भाषांवर प्रभुत्व


➌ सामाजिक व धार्मिक सुधारणा कार्य

➤ १८०५ साली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी

➤ १८१५ मध्ये नोकरी सोडून ‘आत्मिया सभा’ ची स्थापना – वैचारिक चर्चेचे व्यासपीठ

➤ १८२८ मध्ये ‘ब्राम्हो समाज’ ची स्थापना – एकेश्वरवादावर आधारित समाज

➤ सती प्रथेविरुद्ध प्रयत्न –

  ➤ १८२९ मध्ये सतीप्रथा रद्द करण्यात यश

➤ विधवा पुनर्विवाहासाठी ब्रिटिश सरकारकडे सातत्याने प्रयत्न

➤ स्त्रीशिक्षण व स्त्री हक्कांचा पुरस्कार

➤ धार्मिक सहिष्णुता आणि सर्व धर्मांचा अभ्यास


➍ पत्रकारिता व साहित्य योगदान

➤ तुहफत-उल-मुव्वहिदीन (१८०३) – फारसीत एकेश्वरवादाचा पुरस्कार

➤ वेदांत ग्रंथ (१८१५) – शंकराचार्यांच्या भाष्यांचे बंगालीत भाषांतर

➤ उपनिषदांचे भाषांतर – ईश, केण, मुंडक, मांडूक्य

➤ संवाद कौमुदी (१८२१) – बंगाली साप्ताहिक

➤ मिरात-उल-अखबार (१८२२–१८३२) – फारसी साप्ताहिक

➤ इतर विषयांवरही पुस्तके : इतिहास, भूगोल, बंगाली व्याकरण


➎ शिक्षणासाठी योगदान

➤ १८२७ – डफ्यू हिअर यांच्यासह श्रीरामपूर विद्यालय स्थापन

➤ आधुनिक, वैज्ञानिक व स्त्री शिक्षणावर भर

➤ आत्मीय सभेत विविध विषयांवर चर्चासत्रे – द्वारकानाथ ठाकूर, प्रसन्नकुमार टांगरे, आनंदप्रसाद इत्यादींचा सहभाग


➏ इंग्लंडप्रवास व मृत्यू

➤ इंग्लंडमध्ये दिल्लीच्या बादशाहाचे दूत म्हणून गेले – ‘राजा’ किताब प्राप्त

➤ ब्रिटनच्या स्टेपलटन येथे १८३३ साली मृत्यू

➤ रवींद्रनाथ ठाकूर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर यांनी कलकत्त्यात समाधी बांधली


➐ ऐतिहासिक महत्त्व व गौरव

➤ भारताच्या सामाजिक सुधारणांचा पाया घालणारे व्यक्तिमत्त्व

➤ ‘भारतीय रेनेसॉन्स’ चे पितामह

➤ आधुनिक भारतातील सर्वांत पहिला जागरूक समाजसुधारक

➤ हिंदू धर्माचे आत्मपरीक्षण घडवून आणणारा क्रांतिकारक

महत्त्वाच्या घटना सुधारणा



प्रश्न: पहिली संविधान सुधारणा कधी झाली?  

उत्तर: 1951 मध्ये


प्रश्न: 42 व्या सुधारणेस काय म्हणतात?  

उत्तर: लघु संविधान


प्रश्न: 44वी सुधारणा कोणत्या वर्षी झाला?  

उत्तर: 1978 मध्ये


प्रश्न: 73 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: पंचायत राज व्यवस्थेशी


प्रश्न: 74 वी सुधारणा कोणाला लागू करते?  

उत्तर: नगर निकाय व्यवस्था


प्रश्न: 86 वी सुधारणा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?  

उत्तर: 6-14 वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी


प्रश्न: 61 व्या सुधारणे मध्ये किमान मतदान वय काय केले?  

उत्तर: 18 वर्षे


प्रश्न: 52 वी सुधारणा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?  

उत्तर: पक्षबदल कायदा


प्रश्न: 101 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: GST लागू करणे


प्रश्न: 97 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: सहकारी समित्यांशी


प्रश्न: 93 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: खासगी संस्थांमध्ये आरक्षणाशी


प्रश्न: 104 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: एंग्लो इंडियन आरक्षण समाप्त करणे


प्रश्न: 36 व्या सुधारणे मध्ये कोणते राज्य समाविष्ट आहे?  

उत्तर: सिक्कीम


प्रश्न: 17 वी सुधारणा कोणत्या यादीशी संबंधित आहे?  

उत्तर: 9वी अनुसूची


प्रश्न: 69 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?

उत्तर: दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र घोषित करणे


सिंधू नदी प्रणाली : प्रमुख नद्या व प्रकल्प



1) झेलम नदी

➤ उगम — काश्मीर, पीरपंजाल रांगा, शेषनाग तलावाजवळ

➤ प्राचीन नाव — वितस्ता

➤ काश्मीरमध्ये झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते

➤ पाकिस्तानमध्ये जाऊन चिनाब नदीला मिळते


▪️किशनगंगा जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ झेलमची उपनदी किशनगंगा नदीवर (J&K)

➤ क्षमता — 330 MW

➤ प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप


2) चिनाब नदी

➤ उगम — बारा लाचा ला, चंद्र + भागा जलप्रवाह

➤ लांबी — 1180 किमी

➤ पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर झेलम व रावी नदी मिळतात

➤ पुढे पंचनद येथे सिंधूला मिळते

➤ प्राचीन नाव — असिकनी


▪️बागलिहार जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ चिनाब नदीवर — जम्मू व काश्मीर

➤ क्षमता — 900 MW


3) रावी नदी

➤ उगम — हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा, रोहतांग खिंडीजवळ

➤ लांबी — 725 किमी

➤ प्राचीन नाव — पारुष्णी

➤ पाकिस्तानातील रापूर येथे चिनाब नदीला मिळते


4) बियास नदी

➤ उगम — रोहतांग खिंडीच्या दक्षिणेला बियास कुंड

➤ लांबी — 460 किमी

➤ प्राचीन नाव — विपाशा

➤ पंजाबमधील हरिके येथे सतलज नदीला मिळते


5) सतलज नदी

➤ उगम — राकस सरोवर, तिबेट (चीन)

➤ लांबी — एकूण 1450 किमी • भारतातील 1050 किमी

➤ प्राचीन नाव — सतद्रू / सुतुद्री / शतुद्री

➤ तिबेटमध्ये लंगकेन झांगो नावाने ओळख

➤ ताशी गंगमार्गे हिमाचल → पंजाब प्रवेश

➤ पाकिस्तानातील मिथानकोट येथे सिंधू नदीला मिळते


▪️भाक्रा-नांगल बहुउद्देशीय प्रकल्प ⚡️

➤ सतलज नदीवर — पंजाब

➤ जलाशयाचे नाव — गोविंदसागर

भू-आकार (भूरूपे) निर्मिती प्रक्रिया



1) नदीद्वारे निर्माण होणारे भू-आकार

➤ नदीच्या क्षरण कार्यात पाणी चार प्रकारे कार्य करते –

➤ द्रविक क्रिया

➤ अपघर्षण

➤ संधर्षण क्रिया

➤ भक्षणक्रिया


▪️ क्षरण व निक्षेपणामुळे निर्माण होणारे भू-आकार –

➤ धावत्या तयार होणारे प्रवाहवैशिष्ट्य

➤ जलप्रपात / धबधबा

➤ अव्खात दरी

➤ घळई

➤ निदरी

➤ जलविभाजक

➤ नागमोड

➤ नालाकृती सरोवरे

➤ पूरमैदाने

➤ नदी तटमंच

➤ पूरतट

➤ त्रिभुज प्रदेश / डेल्टा


▪️ नदी खोर्‍यांचे प्रकार –

➤ विहंगपद प्रकार

➤ क्षीणोकार प्रकार

➤ धनुष्याकार प्रकार

➤ मैदानप्राय प्रकार


2) हिमनद्या (Glaciers) ❄️


▪️हिमनदीचे खणण कार्य (Erosional Landforms)

➤ हिमेरेषा

➤ हिमगव्हर

➤ श्रृंगे (Aretes)

➤ ‘U’ आकाराची दरी

➤ हिमानी सरोवरे

➤ हिमविदर

➤ लांबट्या/टांगत्या दऱ्या

➤ फियॉर्ड


▪️हिमनदीचे संचयन कार्य (Depositional Landforms)

➤ हिमोढ

➤ हिमानी गाळ

➤ हिमजलौढ निक्षेप

➤ तळ हिमोढ

➤ पार्श्व हिमोढ

➤ मध्य हिमोढ

➤ अंत्य हिमोढ

➤ हिमोढगिरी

➤ एस्कर

➤ कॅम्पस

➤ हिमाजलाढे मैदाने (Outwash plains)


3) वार्‍यामुळे निर्माण होणारे भू-आकार 🌬️


▪️वाऱ्याचे खणण कार्य (Erosional Work)

➤ अपवहन

➤ अपघर्षण

➤ संधर्षण


▪️ क्षरणामुळे तयार होणारे भूविशेष –

➤ भूछत्र खडक

➤ इन्सेलबर्ग

➤ यारदांग

➤ भूस्तंभ

➤ द्वीपगिरि


▪️वाऱ्याचे निक्षेपण कार्य

➤ वालुकागिरी (Dunes)

➤ लोएस क्षेत्र


4) कार्स्ट प्रदेशातील भूरूपे (Karst Landforms)

➤ चुनखडी प्रदेशातील क्षरण व विदलनामुळे निर्माण

▪️सामान्यतः येणारी कार्स्ट भूरूपे —

➤ चुनखडी गुहा

➤ स्टॅलेक्टाइट

➤ स्टॅलेग्माइट

➤ कार्स्ट दरी

➤ सिंकहोल

➤ उवाला

➤ ड्राय व्हॅली


5) सागरी लाटा / किनारी प्रक्रियेमुळे निर्माण होणारे भू-आकार 🌊

➤ सागरकिनारा — किनाररेषा — सागरतट


▪️सागरतटाचे प्रकार

➤ अग्रतट

➤ पश्चतट


▪️क्षरणामुळे तयार होणारे भूरूपकार

➤ विरखंडित सागररेषा

➤ कडा / चबुतरे (Cliffs)

➤ सागरकाठाची गुहा (Sea Caves)

➤ नैसर्गिक चिमणी (Blow Hole)

➤ प्रवेशद्वार (Archway)

➤ नैसर्गिक कमानी (Sea Arch)

➤ सागरी स्तंभ (Stacks)


▪️निक्षेपणामुळे तयार होणारे भू-आकार

➤ अपतट दांडा / वाळूचा दांडा (Spit)

➤ लगून

➤ पुळण (Beach)

➤ स्पीट

➤ हुक

➤ लूप

➤ टोमबोलो

आहारशास्त्र (Dietetics)



१) पोषणतत्त्वे

➤ अन्नातील रासायनिक घटक जे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत ठेवतात त्यांना पोषणतत्त्वे म्हणतात.

➤ समतोल आहारातील प्रमाण :

▪️ पिष्टमय पदार्थ – ५० ते ७०%

▪️ प्रथिने – १० ते १५%

▪️ स्निग्ध पदार्थ – २० ते ३५%

➤ प्रौढ व्यक्तीस साधारण २४०० कॅलरी ऊर्जा आवश्यक.


२) कर्बोदके / पिष्टमय पदार्थ (Carbohydrates) 🌾

➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन पासून बनलेली संयुगे.

➤ सामान्य सूत्र : Cₙ(H₂O)ₙ

➤ सर्वांत सोपे स्वरूप – ग्लुकोज (त्वरित ऊर्जा).

🔹️उदाहरणे :

➤ माल्टोज = ग्लुकोज + ग्लुकोज (बियामध्ये)

➤ लॅक्टोज = ग्लुकोज + गॅलॅक्टोज (दुधात)

➤ सुक्रोज = ग्लुकोज + फ्रुक्टोज (उसाच्या साखरेत)

➤ सेल्युलोज = ग्लुकोज + ग्लुकोज (वनस्पतींच्या सालीत)

➤ स्टार्च = तांदूळ, गहू, बटाटा इ.

🔹️कार्य :

➤ शरीराला ऊर्जा पुरवणे

➤ प्रथिनांची बचत करणे

➤ स्निग्ध पदार्थांचे पचन सुलभ करणे

➤ सेल्युलोजमुळे मलप्रवृत्ती सुधारते


३) प्रथिने (Proteins) 🧬

➤ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त संयुगे.

➤ प्रथिने = अमिनो आम्लांची साखळी (एकूण २० अमिनो आम्ले आवश्यक).

➤ क्रियाशील गट : अमिनो (–NH₂) व कार्बोक्झिल (–COOH).

🔹️स्रोत :

➤ डाळी, तेलबिया, मांस, अंडी

🔹️कार्य :

➤ शरीराची वाढ व झीज भरून काढणे

➤ एंझाइम्स, संप्रेरके, प्रतिपिंडे — सर्व प्रथिनांचेच बनलेले


४) स्निग्ध पदार्थ / मेद (Fats) 🧈

➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन, परंतु हायड्रोजनचे प्रमाण जास्त.

➤ ग्लिसेरॉल + स्निग्ध आम्ले = मेद.

🔹️स्रोत :

➤ तेलबिया, वनस्पती तूप, दूध, तूप, लोणी, मांस, कॉड लिव्हर ऑईल

🔹️कार्य :

➤ ऊर्जेचा अंतिम स्रोत

➤ जीवनसत्त्वांचे वाहक

➤ शरीराचे तापमान संतुलित ठेवणे

➤ अंतर्गत अवयवांचे संरक्षण

➤ अन्नाची चव व रुचि वाढवणे

महत्त्वाचे शास्त्रज्ञ



अ) ॲरिस्टॉटल –

➤ याला "जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने वनस्पती व प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील कार्यक्षम भाग जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

➤ त्याने प्रथम प्राण्यांचे वर्गीकरण केले.


ब) थिओफ्रास्टस –

➤ याला "वनस्पतीशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने वनस्पतींच्या जुन्या वास्तव्यावरून (Habitat) आणि आकारावरून प्रथमच वर्गीकरण केले.


क) कार्ल लिनियस –

➤ याला "आधुनिक जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने प्रथमच वनस्पती व प्राण्यांचे शास्त्रीय नामकरण केले.

➤ त्याने वनस्पती व प्राणी यांना नावे देण्याची द्विनाम पद्धती (Binomial Nomenclature) सुरू केली.


ड) क्युआयर –

➤ याला "जीवाश्म शास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने प्राण्यांचे अस्थिमुळे साधर्म्य आहे व अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या सांगाड्याच्या तुलनेत अभ्यास केला.


इ) शेलडेन व श्वान –

➤ यांनी "पेशी सिद्धांत" मांडला.

➤ प्रत्येक सजीवाचे शरीर पेशीपासून बनलेले असते.

➤ पेशींना आकार सर्व अवयवांत सारखा असतो.

➤ पेशीद्वारे अनुवांशिक गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जातात.


फ) ओपेरिन –

➤ यांनी "सजीवाच्या उत्पत्तीविषयीचा सिद्धांत" मांडला.

➤ चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीभोवती उष्ण वायू व धातूंचे बाष्प होते.

➤ हायड्रोजन अधिक क्रियाशील होता; त्याने कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजनशी अभिक्रियेतून मिथेन, अमोनिया, पाणी तयार झाले.

➤ ५०°C तापमानावर अल्कोहोल, ग्लिसरॉल, स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, शर्करा, नायट्रोजनयुक्त पदार्थ निर्माण झाले.

➤ यांच्या संयोगातून प्रथिने, स्निग्ध पदार्थ व कर्बोदके तयार झाली.

➤ यांच्या एकत्रिकरणातून प्राथमिक अवस्थेतील पेशी तयार झाली.

➤ यालाच Chemosynthetic theory म्हणतात.


ग) जॉन लॅमार्क –

➤ याने "सजीवाच्या उत्क्रांतीविषयक सिद्धांत" मांडला.

▪️उपयोग-अनुपयोगी नियम:

➤ अवयवाचा अधिक वापर → विकास

➤ उपयोग न केल्यास → ऱ्हास

➤ उदा. जिराफाची मान लांब, सापाचे पाय नष्ट

▪️संपादित गुण:

➤ एका पिढीत मिळालेले गुण पुढील पिढीत संक्रमित होतात.

➤ हे तत्त्व उत्क्रांती पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.


च) चार्ल्स डार्विन –

➤ याला "उत्क्रांतीवादाचा जनक" म्हणतात.

➤ १८५९ मध्ये Origin of Species लिहून "नैसर्गिक निवड सिद्धांत" मांडला.

▪️Struggle for Existence:

➤ सजीवाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो.

▪️Survival of the Fittest:

➤ ज्याच्यात सक्षम गुणधर्म आहेत तोच टिकतो.

▪️Natural Selection:

➤ उपयुक्त गुण पुढील पिढीत जातात.


छ) ह्यूगो डी. व्ह्राईस –

➤ याने "उत्परिवर्तन सिद्धांत" मांडला.

➤ नवीन पिढीमध्ये अचानक बदल होणे = उत्परिवर्तन.


ज) जॉन ग्रेगर मेंडेल –

➤ याला "अनुवांशशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ १८६६ मध्ये संकरण प्रयोग केले.

➤ संकरित पिढीत प्रभावी गुण उतरतो.

➤ कमजोर गुण सुप्त राहतो व पुढील पिढीत व्यक्त होतो.

आधिवासातील जीवनपद्धती



1) सहजीवन (Symbiosis) 🤝

▪️दोन किंवा अधिक सजीव एकमेकांकडून फायदा घेऊन निर्माण करतात त्या घनिष्ठ संबंधांना सहजीवन म्हणतात.


🔹️उदाहरणे :

▪️लायकेन (दगडफूल)

➤ शैवाल + कवक यांचे सहजीवन.

➤ कवक पाणी व खनिजे पुरवतो; शैवाल अन्न तयार करून देतो.

▪️वाळवीतील ट्रायकॉनिंफा

➤ वाळवीला लाकूड पचविण्यास मदत.

➤ ट्रायकॉनिंफाला सुरक्षित आश्रय.

▪️शिंबीवर्गीय वनस्पती – रायझोबियम

➤ मुळांच्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण.

➤ वनस्पतींना नायट्रोजनयुक्त संयुगे मिळतात.

▪️जलव्याल (Hydra) – Zoochlorella शैवाल

➤ शैवाल सूर्यप्रकाशातून अन्न देतो.

➤ Hydra संरक्षण व निवासस्थान प्रदान करते.

▪️बाभळीची झाडे – मुंग्या

➤ मुंग्यांना काट्यांमध्ये निवास व अन्न.

➤ मुंग्या झाडांचे संरक्षण करतात.


2) परजीवन (Parasitism) 

▪️एका सजीवाचा लाभ आणि दुसऱ्याचा तोटा होत असल्यास त्या संबंधाला परजीवन म्हणतात.

▪️तोटा होणारा → पोषिंदा (Host)

▪️फायदा घेणारा → परजीवी (Parasite)


🔹️उदाहरणे :

▪️तंबाखूवरील बंबाकू (Aphids)

➤ वनस्पतीचा रस पिऊन जगतात.

➤ वनस्पतीची वाढ कमी होते.

▪️अमरवेल (Cuscuta) – आंबा/कांचन

➤ हिरव्या रंगाचा अभाव; स्वतः अन्न तयार करू शकत नाही.

➤ पोषिंदाच्या वाहिनीतून रस शोषण.

▪️मानवी शरीरातील जंत (Roundworm इ.)

➤ अन्ननलिकेत राहून अन्न शोषून घेतात.

➤ रक्ताल्पता व पोषणतुटी निर्माण होऊ शकते.

२९ ऑक्टोबर २०२५

काही महत्त्वाच्या नियुक्त्या सर्व परीक्षांसाठी


◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.

ज्वालामुखींचे प्रकार (Types of Volcano Eruptions)


1️⃣ हवाईयन (Hawaiian) प्रकार

➤ शांतपणे उफाळणारा ज्वालामुखी — उध्वंसक नसतो.

➤ भेगीय (Fissure) स्वरूपाचा उद्रेक, लाव्हा कमी उंचीचा शंकू तयार करतो.

➤ लाव्हा आम्लारी (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ प्रवाही लाव्हामुळे विस्तीर्ण लाव्हा पठारे तयार होतात.

➤ उदाहरण : मौना लोआ (Mauna Loa), मौना केआ (Mauna Kea) — हवाई बेटे.


2️⃣ स्ट्रॉम्बोलीयन (Strombolian) प्रकार

➤ सतत लहान-लहान उद्रेक होत राहतात, त्यामुळे विध्वंस क्षमता कमी असते.

➤ लाव्हा शंकू मध्यम उंचीचा असतो.

➤ लाव्हा आम्लीय (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ उद्रेक वेगाने पण सातत्याने होतात — मध्यम तीव्रतेचे स्फोट.

➤ उदाहरण : स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी (इटली).


3️⃣ वल्कॅनियन (Vulcanian) प्रकार

➤ काही काळ शांततेनंतर अचानक होणारा तीव्र उद्रेक.

➤ त्यामुळे विध्वंसक शक्ती जास्त असते.

➤ उंच लाव्हा शंकू तयार होतो.

➤ गडगडाटी (Noisy) उद्रेक — दाबाखालील लाव्हा भूगर्भातून बाहेर पडतो.

➤ मोठ्या प्रमाणात राख, धूर आणि वायू उत्सर्जन.

➤ उदाहरण : व्हल्कानो बेट (इटली).


4️⃣ पेलियन (Pelean) प्रकार

➤ सर्वाधिक विध्वंसक ज्वालामुखी प्रकार.

➤ अत्यंत आम्लीय (Highly Acidic) लाव्हा असतो.

➤ उंच आणि तीव्र लाव्हा शंकू तयार होतो.

➤ मोठ्या प्रमाणात उष्णता व ऊर्जा उत्सर्जित होते.

➤ राखेचे ढग व गरम वायू प्रवाह (Pyroclastic flows) दूरवर जातात.

➤ उदाहरण : माँट पेली (Mount Pelée), मार्टिनिक (West Indies).

लाव्हामुळे तयार होणारी भूरूपे (Landforms Formed by Lava)


1️⃣ भूअंतर्गत लाव्हा भूरूपे (Intrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीच्या आत थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील रचना आढळतात –

  🔸 बॅथोलिथ (Batholith)

   ➤ पृथ्वीच्या गर्भात मोठ्या खोलीवर थंड झालेला प्रचंड लाव्हाचा थर.

   ➤ हे खडक पर्वताच्या पाया भागात आढळतात.

  🔸 डाईक (Dyke)

   ➤ लाव्हा भेगेतून वर येऊन थंड होतो व उभे स्तंभ तयार करतो.

   ➤ हे उभ्या भेगांमध्ये घुसलेले घनरूप खडकाचे थर असतात.

  🔸 सिल (Sill)

   ➤ लाव्हा आडव्या थरांमध्ये प्रवेश करून थंड झाल्यास तयार होणारे सपाट खडकाचे थर.

  🔸 लॅकॅालिथ (Laccolith)

   ➤ लाव्हा वरच्या थरांना उचलून त्याखाली थंड होऊन तयार झालेली गुमटाकार रचना.

   ➤ यामुळे वरचा प्रदेश थोडा उंच दिसतो.

  🔸 स्टॉक (Stock)

   ➤ बॅथोलिथपेक्षा आकाराने लहान, पण खोलवर तयार होणारी घनरचना.


2️⃣ बाह्य लाव्हा भूरूपे (Extrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीवर बाहेर पडून थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील प्रकार येतात –

  🔸 कॅल्डेरा (Caldera)

   ➤ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या मुखाचा भाग कोसळल्याने तयार झालेला मोठा खोल खड्डा.

  🔸 लाव्हा शंकू (Lava Cone)

   ➤ लाव्हा व राखेच्या थरांच्या साचण्याने तयार झालेली शंकूच्या आकाराची रचना.

  🔸 बेसॉल्ट मैदान (Basalt Plain)

   ➤ सतत लाव्हा वाहून आल्याने व थंड झाल्याने तयार झालेली सपाट काळ्या दगडांची मैदानं.

  🔸 पठार (Plateau)

   ➤ लाव्हाच्या अनेक थरांच्या थंड होण्याने तयार झालेली उंच व सपाट भूप्रदेशाची रचना.

   ➤ उदाहरण: दख्खन पठार (Deccan Plateau) — भारतातील सर्वात प्रसिद्ध लाव्हा पठार.

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)


कलम 36: 

व्याख्या "राज्य" ची व्याख्या (संविधानाच्या भाग 3 प्रमाणे).


कलम 37: 

अंमलबजावणी DPSP कायदेशीररित्या बंधनकारक नसली, तरी शासनासाठी मूलभूत आहेत.


कलम 38: 

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणे, असमानता कमी करणे.


कलम 39: 

आर्थिक तत्त्वेसमान उपजीविकेची साधने, संपत्तीचे समान वितरण, लिंग समता, कामगार आणि बालकांचे शोषण टाळणे.


कलम 39A: 

मोफत कायदेशीर सहाय्य आर्थिक कमतरतेमुळे कोणालाही न्याय नाकारला जाऊ नये.


कलम 40: 

ग्रामपंचायतींची स्थापना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण स्वराज्याला प्रोत्साहन.


कलम 41:

काम, शिक्षण आणि सामाजिक सहाय्यकाम, शिक्षण आणि बेरोजगारी, वृद्धापकाळ, अपंगत्व यामध्ये सहाय्य प्रदान करणे.


कलम 42: 

कामगारांचे संरक्षण कामाच्या न्याय्य आणि मानवीय परिस्थिती, प्रसूती लाभ सुनिश्चित करणे.


कलम 43: 

कामगारांना योग्य वेतन आणि जीवनमान सुनिश्चित करणे; कुटीर उद्योगांना प्रोत्साहन.


कलम 43A: 

कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे.


कलम 44:

एकसमान नागरी कायदा सर्व नागरिकांसाठी एकसमान नागरी कायदा लागू करणे.


कलम 45: 

बालकांचे शिक्षण 14 वर्षांखालील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे.


कलम 46:

मागासवर्गीयांचे संरक्षण अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे शैक्षणिक, आर्थिक हितांचे संरक्षण.


कलम 47: 

आरोग्य आणि जीवनमान पोषण, जीवनमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे; दारूबंदीला प्रोत्साहन.


कलम 48: 

कृषी आणि पशुसंवर्धन शेती आणि पशुसंवर्धनाचे आधुनिकीकरण; गायींचे संरक्षण.


कलम 48A: 

पर्यावरण संरक्षण , जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि सुधारणा.


कलम 49: 

राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण.


कलम 50:

न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण लोकसेवा व्यवस्थेत न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण.


कलम 51: 

आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य आंतरराष्ट्रीय शांतता, मैत्री आणि कायद्याचा आदर वाढवणे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील क्रांतिकारी चळवळी: महत्त्वाचे टप्पे (१८७९ – १९१९)



1.🚩 बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

➤ प्रारंभ (१९०२)

  ➡️ छोट्या क्रांतिकारी गटांची स्थापना — मिदनापूर व कलकत्ता येथील अनुशीलन समिती (प्रमथनाथ मित्र, पुलिन बिहारी दास, बारिंद्रकुमार घोष).

➤ प्रचाराची साधने

  ➡️ १९०६ पासून युगांतर हे क्रांतिकारी साप्ताहिक सुरू झाले.

  ➡️ १९०५–०६ पर्यंत संध्या व युगांतर यांसारख्या वृत्तपत्रांनी क्रांतिकारी दहशतवादाचा पुरस्कार केला.

➤ महत्त्वाच्या घटना

  ➡️ १९०७ — पूर्व बंगालच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरवर हल्ल्याचा प्रयत्न.

  ➡️ १९०८ — प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरचे मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुदीराम बोस यांना फाशी, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली.

  ➡️ १९०८ — अलिपूर बॉम्ब कट प्रकरण : अरविंद घोष, बारिंद्र घोष व इतरांवर खटला.

  ➡️ १९०८ — बऱ्हा डकैती : ढाका अनुशीलनने सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न.

  ➡️ १९१२ — दिल्ली कट : रासबिहारी बोस व सचिन सन्याल यांनी व्हाईसरॉय हार्डिंग यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला.

  ➡️ पहिले महायुद्ध (१९१४–१९१८) : जतीन दास व युगांतर गट जर्मन कटात सामील — जर्मनीच्या मदतीने सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न (अयशस्वी).


2.🦁 महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

➤ आद्य क्रांतिकारक

  ➡️ १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी व गरीब लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. (भारताचा आद्य सशस्त्र क्रांतिकारी उठाव).

➤ जनजागृती

  ➡️ १८९० चे दशक — लोकमान्य टिळक यांनी शिवाजी व गणपती उत्सवांद्वारे तरुणांमध्ये जहाल विचार व देशभक्ती निर्माण केली.

  ➡️ केसरी व मराठा या नियतकालिकांद्वारे ब्रिटिशविरोधी विचारांचा प्रसार.

➤ चाफेकर बंधू

  ➡️ १८९७ — प्लेग कमिशनर रँड व ले. आयर्स्ट यांची पुण्यात चाफेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) हत्या केली. (भारताच्या राजकीय हत्येचे पहिले मोठे क्रांतिकारी कृत्य).

➤ सावरकर आणि अभिनव भारत

  ➡️ १८९९ — विनायक व गणेश सावरकर यांनी मित्र मेळा या गुप्त संस्थेची स्थापना.

  ➡️ १९०४ — मित्र मेळा → अभिनव भारत संघटनेत रूपांतर.

  ➡️ १९०९ — नाशिक कट खटला : अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या केली.


3.⚔️ पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

➤ नेतृत्व आणि प्रचार

  ➡️ लाला लजपत राय, सरदार अजित सिंग, आगा हैदर सय्यद हैदर रझा, भाई परमानंद, लालाचंद ‘फलक’, सुफी अंबाप्रसाद इ. नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ चालवली.

  ➡️ सरदार अजित सिंग यांनी भारत माता सोसायटी ची स्थापना केली.

  ➡️ लाला लजपत राय यांचे पंजाबी व अजित सिंग यांचे भारत माता वृत्तपत्रे क्रांतिकारक विचारांचे प्रसारक.

➤ महत्त्वाची घटना

  ➡️ गदर चळवळ (१९१३) : लाला हरदयाल यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना केली. उद्देश — ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी जगभरातील भारतीयांना एकत्र आणणे.

  ➡️ पहिल्या महायुद्धादरम्यान पंजाबातील क्रांतिकारकांचा क्रांतीचा प्रयत्न.

  ➡️ रासबिहारी बोस यांनी उत्तर भारतातील अनेक क्रांतिकारी कारवायांत पडद्यामागून नेतृत्व केले.