Sunday 30 January 2022

यशाची पहिली पायरी म्हणजे कृती करणे...


👉 मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि लोक अपयशी का होतात... आणि यशाची पहिली पायरी कोणती आहे... हे सर्व आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत आणि  शिकणार आहोत... 👍

👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या काळात सर्वांना यशस्वी व्हायचं आहे... प्रत्यक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्न नुसार मोठ मोठ्या योजना तयार करतो, तरी सुद्धा खुप कमी लोक यशस्वी होतात...

👉 प्रत्येकजण स्वप्न पाहतो,  Goal ठरवतो, Plan तयार करतो तरी सुद्धा 98% लोक अपयशी होतात... आणि फक्त 2% लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि यशस्वी होतात... यामागे फक्त आणि फक्त एक कारण आहे ते म्हणजे Action न घेणे...

यशाची सर्वात महत्वाची पहिली पायरी ती म्हणजे Action घेणे...

खुप लोक दिवसभर विचार करतात, दिवसभर योजना तयार करतात परंतु Action करत नाही... त्यामुळे त्यांना अपयश येते...

👉 मित्रांनो, तुम्ही ठरवलेल्या योजना नुसार Action केलीच नाही तर तुम्हाला Result हा हमेशा शून्यच  मिळेल...

आजकल लोक Action का घेत नाही त्यामागे कोणकोणते कारणे आहेत ते पाहुयात...

Action न घेण्याचे कारणे किंवा अपयशी होण्याचे कारणे...

1) आत्मविश्वासाची कमी असणे...
2) कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी चांगल्या वेळेची वाट पाहणे...
3) आजचे काम उद्यावर ढकलणे
4) आळस

मित्रांनो, जसे कि मी सांगितल तुम्ही जो पर्यंत Action करणार नाही तो पर्यंत तुम्हाला Result मिळणार नाही... त्यामुळे तुम्ही आज पर्यंत फक्त स्वप्न पाहत असाल किंवा फक्त plan करत असाल किंवा चांगल्या वेळेची वाट पाहत असाल तर त्या साऱ्या गोष्टी आजपासून सोडुन द्या... आणि डायरेक्ट Action करा...

उदाहरणं :-  पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळते... आता ही गोष्ट सर्वांना माहित आहे... परंतु तुम्ही जो पर्यंत पुस्तक वाचणार नाही तो पर्यंत तुमचे ज्ञान वाढणार नाही... 👍

ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला रोज पुस्तके वाचावे लागतील तेंव्हाच तुमचे ज्ञान वाढेल... फक्त विचार करून तुमचे ज्ञान वाढणार नाही हे लक्षात ठेवा...

मित्रांनो, Action घेण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देत आहे... त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...

1) सर्वात प्रथम Goal ठरवा...
👉 ( Goal कसे ठरवावे याबद्दल मी अगोदर एक लेख लिहिलेला आहे तो लेख नक्की वाचा...)

तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचे याची कल्पना करा...  त्यानंतर तुम्हाला कोणती नोकरी करायची किंवा कोणता बिजनेस करायचा आहे हे ठरवा...

मित्रांनो, आपले Goal आपल्याला माहिती पाहिजे जेंव्हा आपल्याला आपले goal माहिती असते तेंव्हाच आपण पूर्ण स्पीड ने त्या Goal कडे जाऊ शकतो... आणि Goal पूर्ण करू शकतो...

सर्वात प्रथम तुमचे Goal काय आहे हे ठरवा... 👍

2) Micro Plan बनवा...
👉 मित्रांनो, तुम्ही जे कोणते  Goal ठरवले असतील  ते Goal कसे पूर्ण होतील हा प्रश्न स्वतःला विचारा आणि थोडा वेळ विचार करा...

एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...

👉 समजा, माझं स्वप्न आहे पोलीस बनायचं...

मी माझे Goal ठरवलं मला पोलीस बनायचं आहे...

नंतर मी स्वतःला एक प्रश्न करेल कि... मला पोलीस बनण्यासाठी काय काय करावे लागेल...?

हा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारेल तेंव्हा मला खुप उत्तरे मिळतील... जसे कि

रोज सकाळी लवकर उठावे लागेल

रोज सकाळी रनिंग करावी लागेल व्यायाम करावा लागेल...

रोज 4 घंटे अभ्यास करावा लागेल...

हे पहा.. मला पोलीस बनण्यासाठी वरील सर्व गोष्टी कराव्या लागतील तेंव्हाच मी पोलीस होऊ शकतो...

परंतु

👉 मी जर अभ्यास केलाच नाही किंवा सकाळी रनिंगला गेलोच नाही तर काय होईल... याचा परिणाम असा होईल कि मी पोलीस अजिबात होऊ शकणार नाही..

मित्रांनो, तुमचे जे कोणते स्वप्न असतील त्याचा plan नक्की बनवा परंतु Micro Plan वर जास्त फोकस करा

Micro Plan म्हणजे प्रत्येक लहान गोष्टीचा plan बनवणे

समजा तुम्हाला टरबूज खायाचे आहे तर कसे खासाल...

तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे

आपण त्या टरबूजचे छोटे छोटे भाग करू आणि नंतर एक भाग खाऊ

मित्रांनो यालाच Micro plan म्हणतात... तुमचा जो कोणता Plan आहे त्याला खुप लहान भागामध्ये विभागून घ्या... जेंव्हा तुम्ही Micro Plan बनवता तेंव्हा प्रत्येक दिवसी काय करायचे आहे हे तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्ही Action घेशाल

समजा

एक पुस्तक एक महिन्यात वाचायचे असेल तर सर्वात प्रथम विचार करा...त्या पुस्तकात ऐकून पेज किती आहेत

समजा त्या पुस्तकात ऐकून पेज 450 आहेत

तेंव्हा त्या पेजला विभागून घ्या 30 दिवसामध्ये..

450 ÷ 30 = 15 पेज

म्हणजे तुम्हाला एक पुस्तक एका महिन्यात संपवायचे असेल तर रोज पेज वाचावे लागतील तेंव्हाच 30 दिवसात एक पुस्तक वाचुन संपवाल
🏃 PRACTICE MAKES MAN PERFECT✒👍🏻

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव


1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात 🔸🔸
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली 🔸🔸
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान 🔸🔸
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 🔸🔸
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व 🔸🔸

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर 🔸🔸
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे 🔸🔸
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर 🔸🔸
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 🔸🔸
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी 🔸🔸
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश 🔸🔸
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम 🔸🔸
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता 🔸🔸
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद 🔸🔸
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा 🔸🔸

  🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

म्हाडाच्या परीक्षा आता 31 जानेवारीपासून; वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल


🔰 म्हाडाच्या भरती परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला.

🔰 7 फेब्रुवारी पासुन सुरु होणाऱ्या परिक्षा आता 31 जानेवारीपासून ऑनलाईन सुरु होणार आहे.

🔰 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे.

🔰 565 पदांसाठी ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.

🔰 दरम्यान, या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी

- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना
- गांधी युग 1917 ते 1947
- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस
- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन
--------------------------------------------------
● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल
--------------------------------------------------
● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918

- पहिले उपोषण / भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात
--------------------------------------------------
● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918

- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी
--------------------------------------------------
● रौलट सत्याग्रह 1919

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात
- पहिले जन आंदोलन (Mass Strike)
- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.
- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड
--------------------------------------------------
● असहकार चळवळ

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला
- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित
- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.
--------------------------------------------------
● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला
--------------------------------------------------
● गांधी इर्विन करार 1931

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार
- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली
- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली.
--------------------------------------------------
● पुणे करार 1931

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण
- यावरूनच महात्मा गांधी आणि डाॅ. आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला
- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.
--------------------------------------------------
● वैयक्तिक सत्याग्रह

- 1933 मध्ये सुरूवात
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही
--------------------------------------------------
● चले जाव

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त
- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...