Tuesday 12 May 2020

अँटिबॉडी’चा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्ट किट तयार

⚡ कोरोनाच्या लढ्यामध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. भारताने कोविड 19 अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (NIV) पहिली स्वदेशी कोरोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे.

💁‍♂️ केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याविषयी माहिती दिली. अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना संसर्गावर पाळत ठेवण्यात व कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल”, असे ते म्हणाले. अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची क्षमता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

👍 *प्रकल्प राबविणार* : कोविड19 विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत.

👌 आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ही संस्था असून तिच्या सहकार्याने ही लस विकसित केली जाणार आहे. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे.

📌 या संशोधनासाठी प्राण्यांवर तसेच पुढील टप्प्यांत माणसांवर प्रयोग करावे लागणार आहेत. त्यासाठी परवानग्या वेळेत मिळण्यासाठी आयसीएमआर बीबीआयएलला मदत करणार आहेत. लस तयार करण्यासाठी जगभरात अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देश प्रयत्नात आहेत.

'मिशन सागर': क्षेत्रीय मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी भारत सरकारची मोहीम.

🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इतर देशांपुढे मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'मिशन सागर' अंतर्गत भारतीय नौदलाचे ‘INS केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी अन्न, आवश्यक औषधे अशी मदत सामुग्री घेवून 10 मे 2020 रोजी रवाना झाले.

🔰मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, कोविड-19 महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या HCQ औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक पाठवण्यात आले.

🔴इतर ठळक बाबी

🔰संपूर्ण क्षेत्रामध्ये अशी मोहीम चालवून परदेशांना असा मदतीचा हात पुढे करणारा भारत पहिला देश आहे.

🔰हे अभियान भारत सरकारने 2015 साली आरंभ केलेल्या ‘सागर कार्यक्रम’ (क्षेत्रामधील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास / Security and Growth for All in the Region) याचा एक भाग आहे. कोविड-19 महामारी संकटाच्या काळात क्षेत्रीय देशांना आवश्यक असणारी मदत करून संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ‘मिशन सागर’ राबवण्यात येत आहे.

🔰या मोहिमेची जबाबदारी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सरकारच्या इतर संबंधित संस्था/विभाग मिळून संयुक्त समन्वयाने पार पाडत आहेत.

विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

☄कोरोना व्हायरसच्या लढाईत रतन टाटा यांच्यानंतर देशाला मदत करणारे विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी जगात तिसरा क्रमांक पटकावला  आहे.

☄कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी जगभरातील  80 अब्जाधिशांनी हात सैल केले आहेत. यात प्रेमजी देखील मागे राहिलेले नाहीत.

☄अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत.

☄पहिल्या क्रमांकावर ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी  असून दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचे या यादीतील एकमेव अब्जाधिश अझीम प्रेमजी आले आहेत.

☄तर या तीन व्यक्तींनी जगात सर्वाधिक दान केले आहे. फोर्ब्स मॅक्झिननुसार मार्चनंतर जगातील अब्जाधिशांच्या दान रकमेवर ही यादी बनविण्यात आली आहे.

इतिहास(History Quiz)

*1. 'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली?*
स्वा. सावरकर✅ 
बटुकेश्र्वर दत्त
रासबिहारी घोष
भुपेंद्रनाथ दत्त

*2. करा व मरा व चले जाव हे संदेश महात्मा गांधीजानी भारतीयांना कोणत्या दिवशी दिले?*
७ ऑगस्ट १९४२
८ ऑगस्ट १९४२✅
८ जुलै १९४२
१६ जुलै १९४२

*3. ऑमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध कोणी सादर केला?*
शि.म.परांजपे
पंडिता रमाबार्इ
कर्मवीर वि.रा. शिंदे✅
रा.गो. भांडारकर

*4. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?*
महात्मा गांधी
महंमद इकबाल
खान अब्दुल गफारखान✅
मौलाना आझाद

*5. भागवत धर्माचा पाया कोणी घातला?*
संत ज्ञानेश्वर ✅
संत नामदेव
संत एकनाथ
संत तुकाराम

*6. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले?*
बिपिनचंद्र पॉल 
लाला लजपतरॉय✅
सुरेंद्रनाथ बॅनजा
न्यायमूता तेलंग

*7. सन १९४२च्या आंदोलनात आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता?*
अरुणा असफअली
उषा मेहता✅
सुशीला नायर
सुचेता कृपलानी

*8. स्वराज पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती?*
चित्तरंजन दास✅
मोतीलाल नेहरू
महात्मा गांधी
लाला लजपतराय

*9. महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रसार कोणत्या संताने केला?*
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव✅
संत एकनाथ
संत तुकाराम

*10. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले?*
राजगुरू 
सुखदेव
चंद्रशेखर आझाद✅
जतीन दास

General knowledge

☞. *P D F* चा अर्थ?
उत्तर:- *Portable Document Format.*

☞. *H T M L* चा अर्थ?
उत्तर:- *Hyper Text Mark up Language.*

☞. *N E F T* चा अर्थ?
उत्तर:- *National Electronic Fund Transfer.*

☞. *M I C R* चा अर्थ?
उत्तर:- *Magnetic Inc Character Recognition.*

☞. *I F S C* चा अर्थ?
उत्तर:- *Indian Financial System Code.*

☞. *I S P* चा अर्थ?
उत्तर:- *Internet Service Provider.*

☞. *E C S* चा अर्थ?
उत्तर:- *Electronic Clearing System.*

☞. *C S T* चा अर्थ?
उत्तर:- *Central Sales Tax.*

☞. *CRR* चा अर्थ?
उत्तर:- *Cash Reserve Ratio.*

☞. *U D P* चा अर्थ?
उत्तर:- *User Datagram Protocol.*

☞. *R T C* चा अर्थ?
उत्तर:- *Real Time Clock.*

☞. *I P* चा अर्थ?
उत्तर:- *Internet Protocol.*

.☞. *C A G* चा अर्थ?
उत्तर:- *Comptroller and Auditor General.*

.☞. *F E R A* चा अर्थ?
उत्तर:- *Foreign Exchange Regulation Act.*

☞. *I S R O* चा अर्थ?
उत्तर:- *International Space Research organization.*

☞. *I S D N*  चा अर्थ?
उत्तर:- *Integrated Services Digital Network.*
.
☞. *SAARC* चा अर्थ?
उत्तर:- *South Asian Association for Regional co –operation.*

☞. *O M R* चा अर्थ?
उत्तर:- *Optical Mark Recognition.*

☞. *A H R L* चा अर्थ?
उत्तर:- *Asian Human Right Commission.*

☞. *J P E G*  चा अर्थ?
उत्तर:- *Joint photo Expert Group.*

☞. *U. R. L.* चा अर्थ?
उत्तर:- *Uniform Resource Locator.*

☞. *I R D P* चा अर्थ?
उत्तर:- *Integrated Rural Development programme.*

☞. *A. S. L. V.* चा अर्थ?
उत्तर:- *Augmented satellite Launch vehicle.*

☞. *I. C. U.* चा अर्थ?
उत्तर:- *Intensive Care Unit.*

☞. *A. T. M.* चा अर्थ?
उत्तर:- *Automated Teller Machine.*

☞. *C. T. S.* चा अर्थ?
उत्तर:- *Cheque Transaction System.*

☞. *C. T. R* चा अर्थ?
उत्तर:- *Cash Transaction Receipt.*

☞. *N E F T* चा अर्थ?
उत्तर:- *National Electronic Funds Transfer.*

☞. *G D P* चा अर्थ?
उत्तर:- *Gross Domestic Product.*

☞. *F D I* चा अर्थ?
उत्तर:- *Foreign Direct Investment .*

☞. *E P F O* चा अर्थ?
उत्तर:- *Employees Provident Fund Organization.*

☞. *C R R* चा अर्थ?
उत्तर:- *Cash Reserve Ratio.*

☞. *CFRA* चा अर्थ?
उत्तर:- *Combined Finance & Revenue Accounts.*

☞. *GPF* चा अर्थ?
उत्तर:- *General Provident Fund.*

☞. *GMT* चा अर्थ?
उत्तर:- *Global Mean Time.*

☞. *GPS* चा अर्थ?
उत्तर:- *Global Positioning System.*

☞. *GNP* चा अर्थ?
उत्तर:- *Gross National Product.*

☞. *SEU* चा अर्थ?
उत्तर:- *Slightly Enriched Uranium.*

☞. *GST* चा अर्थ?
उत्तर:- गुड्स एण्ड सर्विस टैक्स *(Goods and ServiceTax).*

☞. *GOOGLE* चा अर्थ?
उत्तर:- *Global Organization Of Oriented GroupLanguage Of Earth.*

☞. *YAHOO* चा अर्थ?
उत्तर:- *Yet Another Hierarchical Officious Oracle .*

☞. *WINDOW* चा अर्थ?
उत्तर:- *Wide Interactive Network Development forOffice work Solution .*

☞. *COMPUTER* चा अर्थ?
उत्तर:- *Common Oriented Machine ParticularlyUnited and used under Technical and EducationalResearch.*

☞. *VIRUS* चा अर्थ?
उत्तर:- *Vital Information Resources Under Siege.*

☞. *UMTS* चा अर्थ?
उत्तर:- *Universal Mobile TelecommunicationsSystem.*

☞. *AMOLED* चा अर्थ?
उत्तर:- *Active-matrix organic light-emitting diode.*

☞. *OLED* चा अर्थ?
उत्तर:- *Organic light-emitting diode*

☞. *IMEI* चा अर्थ?
उत्तर:- *International Mobile EquipmentIdentity.*

☞. *ESN* चा अर्थ?
उत्तर:- *Electronic Serial Number.*

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती ) 13/05/2020

यशाचा राजमार्ग सराव प्रश्नसंच 12/5/2020

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...