Friday 10 March 2023

…म्हणून तुमच्या 'या' सवयी बदला!

आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टींपुढे हतबल होऊन जातो. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असला तरी या सगळ्यांच्या काही सवयींमध्ये कमालीचा एकसारखेपणा आहे. पाहुयात आपल्याला जीवनात मागे खेचणाऱ्या काही सवयी..._

☑️सकाळी लवकर उठा

_ : _'सकाळी लवकर उठा जा' हा सल्ला आपल्याला नेहमीच बोअरिंग वाटतो. पण अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ दिवसाची सुरूवात लवकर करतात. रात्रभर शांत झोप झाल्यावर सकाळी उठल्यानंतरचे काही तास आपलं मन शांत असतं. यावेळी आपण अनेक गोष्टींचा शांतपणे विचार करू शकतो. पुढे सुरू होणाऱ्या दिवसाबाबत आपण यावेळी प्लॅन आखू शकतो. आणखी बरंच काही करू शकतो._

☑️समतोल साधता आला पाहिजे

_आयुष्यात पुढे जायचं तर आपल्याला समतोल साधता आला पाहिजे. आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना वेळ देणंही महत्त्वाचं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे व्हाईट हाऊसमध्ये असताना दर दिवशी सकाळी त्यांच्या मुलींच्या शाळेच्या तयारीसाठी वेळ द्यायचे आणि मगच त्यांच्या कामांकडे वळायचे. जर अमेरिकेचा अध्यक्ष आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढत हे करू शकतो तर आपण तर हे नक्कीच करू शकतो._

☑️योग्य आहार आणि व्यायाम: _

बराक ओबामा रोज 90 मिनिटं व्यायाम करायचे ते हि न चुकता. आता यापुढे तुमचं एक्सक्युज काय आहे? चांगलं आरोग्य राखण्यासाठी नियमित केलेला हलका व्यायामही उपयुक्त ठरतो._

☑️सोशल लाईफला वेळ द्या

_आता सोशल लाईफ म्हणजे सोशल मीडियावरचं लाईफ नाही. तर खरोखरचं सोशल लाईफ. आपल्या कामात व्यस्त असताना आपला मित्रपरिवार तसंच आपल्यासोबत काम करणार आपले सहकारी यांच्यासोबतचं आपलं नातंही आपला कामातला उत्साह दुणावायला मदत करतो._

☑️अपयशाचं योग्य मूल्यमापन करणं

_मोठ्या व्यक्ती कधी अपयशी झाल्याच नाहीत का? तर असं अजिबात नाही. त्यांनी वेळीच अपयशाचं योग्य मूल्यमापन केला आणि आपल्या या सगळ्या लोकांनी पुढे इतिहास घडवला. उदा. स्टीव्ह जाॅब्स, कार्टूनिस्ट वाॅल्ट डिस्नी, अमिताभ बच्चन._ 

_या सगळ्या खूप साध्यासोप्या गोष्टी आहेत. आपण आपल्या रोजच्या जीवनात या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोठमोठ्या मॅनेजमेंटचे फंडे वाचत बसतो. तसं म्हटलं तर ‘लाईफ इझ सिंपल’. बेसिक गोष्टींची आपण काळजी घेतली तरी आपण जीवनात मोठी प्रगती करू शकतो.

महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती

- महाराष्ट्रातील 5 प्रादेशिक विभाग

- कोकण : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड 

- पाश्चिम महाराष्ट्र : पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर

- खानदेश/उत्तर महाराष्ट्र : जळगाव, नंदुरबार, धुळे

- विदर्भ : नागपूर, चंदपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम 

- औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद 


महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

- ताडोबा - चंदपूर 

- प्रियदर्शनी/पेंच - नागपूर 

- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरीवली, नवी मुंबई

- गुगामाल/मेळघाट - अमरावती

- नवेगाव बांध - गोंदिया

- सह्याद्री/चांदोली वाघ्र प्रकल्प - सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर 


गोदावरी नदी [ भारतातील प्रमुख नदी ]

१) भारतातील आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे.


🅾️पर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते


🅾️10 जिल्हे नविन निर्माण झाले


🅾️त अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?


🧩Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा


🅾️सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

🅾️जा- जालना (१मे१९८१)

🅾️ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

🅾️ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

🅾️मबा- मुंबई  (१९९०)

🅾️वा- वाशिम (१जुलै१९९८)

🅾️न- नंदूरबार (१जुलै१९९८)

🅾️हि- हिंगोली (१मे१९९९)

🅾️गो- गोंदिया (१मे१९९९)

🅾️पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)


🅾️भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


🧩Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही


🅾️अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

🅾️माझी- मिझोराम(५२)

🅾️सक्की- सिक्किम(८६)

🅾️मा- मणिपुर(११५)

🅾️ना- नागालँड(११९)

🅾️ही- हिमाचल प्रदेश(१२३)


महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

आजची प्रश्नमंजुषा


Que.1 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग

2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅

3⃣ लॉर्ड कर्झन

4⃣ लॉर्ड माउंटबॅटन



Que .2 : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम

2⃣ एम. ए. जिन्ना

3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅

4⃣ रहीमतुल्ला एम सयानी


 

Que.3 : पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅

2⃣ 1857

3⃣ 1905

4⃣ 1919


Que .4 : खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922

2⃣ भारत सोडा - 1942

3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅

4⃣ बगालचे विभाजन - 1905


Que.5 : भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू

2⃣ राजेंद्र प्रसाद

3⃣ सी राजगोपालाचारी

4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅


महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
 A) वर्धा 
 B) गडचिरोली 
 C) चंद्रपूर 
 D) गोंदिया ✅✅


 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
 A) ६ लिटर 
 B) ५ लिटर 
 C) ४ लिटर ✅✅
 D) ३ लिटर


 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
 A) प्रथमान्त ✅✅
 B) द्वितीयांत 
 C) चतुर्थ्यांत 
 D) तृतीयान्त


“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
 A) कारणबोधक 
 B) विकल्पबोधक 
 C) न्यूनत्वबोधक 
 D) परिणामबोधक✅✅


: नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
 A) २ जानेवारी 
 B) २१ एप्रिल ✅✅
 C) २८ फेब्रुवारी 
 D) १४ सप्टेंबर


 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
 A) PRYW 
 B) ORTW 
 C) NPUH 
 D) ORYH ✅✅


: : x चे 15% = 900 चे 10% तर x =?
 A) 60 
 B) 600 ✅✅
 C) 700 
 D) 800


भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 
 B) डायरेक्टर आई. बी. 
 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 
 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅
 


 पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 
 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅
 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



 “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
 A) तत्पुरुष ✅✅
 B) अव्ययीभाव 
 C) कर्मधारय 
 D) द्विगु


देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
 A) अकोदरा ✅✅
 B) रावतभाटा 
 C) बडोदरा 
 D) मानकापूर

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

🔸अमरावती जिल्हा: 

ऊर्ध्व वर्धा धरण


🔸अहमदनगर जिल्हा : 

आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


🔸 औरंगाबाद जिल्हा : 

गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


🔸 उस्मानाबाद जिल्हा :

 तेरणा धरण


🔸 कोल्हापूर जिल्हा : 

रंकाळा तलाव


🔸 गडचिरोली जिल्हा : 

दिना


🔸 गोंदिया जिल्हा :

 इटियाडोह


🔸चंद्रपूर जिल्हा :

 पेंच आसोलामेंढा


🔸जळगाव जिल्हा : 

अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


🔸 ठाणे जिल्हा :

 भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


🔸धुळे जिल्हा : 

अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


🔸 नंदुरबार जिल्हा :

 यशवंत तलाव,


🔸 नागपूर जिल्हा : 

उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


🔸 नांदेड जिल्हा : 

इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


🔸नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


🔸 परभणी जिल्हा : 

कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


🔸 पुणे जिल्हा :

आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


🔸 बुलढाणा जिल्हा :

खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


🔸 बीड जिल्हा :

 माजलगाव धरण,मांजरा धरण


🔸 भंडारा जिल्हा :

 इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


🔸मुंबई जिल्हा :

 मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


🔸 यवतमाळ जिल्हा:

 पूस ,अरुणावती ,बेंबळा


🔸 वर्धा जिल्हा : 

ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


🔸 सातारा जिल्हा :

 उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


🔸 सिंधुदुर्ग जिल्हा :

 तिलारी धरण,देवधर धरण


🔸 सोलापूर जिल्हा : 

आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


🔸 हिंगोली जिल्हा : 

येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...