Sunday, 22 August 2021
उभरते सितारे फंड’: निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी नवीन कोष
🔰निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना समर्पित असलेला नवीन कोष तयार करण्यात आला आहे. भारताचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 21 ऑगस्ट 2021 रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे 'उभरते सितारे फंड' याचा प्रारंभ केला.
🔰हा कोष भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्यातर्फे प्रायोजित आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यासाठी पात्र असलेल्या कंपनीच्या वाढीच्या अडचणी ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
🏵ठळक वैशिष्ट्ये
🔰‘राइजिंग स्टार प्रोग्राम’ याच्या अंतर्गत निधी मिळवण्यासाठी कंपनीची उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
मोटार-वाहन, वाहनांचे सुटे भाग, विमान निर्मिती, कॅपिटल गुड्स, रसायने, संरक्षण, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, औषध निर्मिती, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्या निधी मिळविण्यासाठी पात्र ठरू शकतात.
🔰तसेच यामध्ये आधुनिकीकरण, तंत्रज्ञान/क्षमता सुधारणा, संशोधन आणि विकास आणि उत्पादन सुविधा यांचा समतोल साधण्यासाठी गुंतवणूक तसेच सल्ला सेवांचा समावेश आहे.
🔰यत्रसामुग्री, उपकरणे, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण उपकरणे, भूखंड आणि इमारतीमध्ये गुंतवणूकीसाठी मुदत कर्ज घेतले जाऊ शकते.
उत्पादन सुधारणे, परदेशात बाजारपेठ विकासासाठी होणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त, क्षेत्र आणि बाजाराच्या अभ्यासात मदत घेता येते.
🔰परारंभी, या कोषचा आकार 250 कोटी रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे, जो आवश्यक असल्यास 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत, उद्योजकांना पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) याकडून मदत मिळेल. निधीसोबतच तांत्रिक मदत अर्थात सल्लागार सेवा देखील उपलब्ध असेल. सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्या या कार्यक्रमाच्या कक्षेत येतील.
पर्यावरणासंबंधी काही महत्त्वपूर्ण दिवस.
⭐️ ०२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन
🐻 ०३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन
🌊 १४ मार्च : नद्यांसाठी कृती दिन
🌳 २१ मार्च : जागतिक वन दिन
💧 २२ मार्च : जागतिक जल दिन
☂️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🐟 २२ मे : जागतिक जैवविविधता दिन
🌴 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन
🌊 ०८ जून : जागतिक समुद्र दिन
🍃 १५ जून : जागतिक वारा दिन
🏜️ १७ जून : वाळवंटीकरण प्रतिरोध दिन
🌳 २८ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन
⭐️ ३१ जुलै : जागतिक रेंजर दिन
👨🔬 १० ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन
⭐️ १६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन
🦁 ०४ ऑक्टोबर : जागतिक प्राणी दिन
🏭 ०२ डिसेंबर : राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन
🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन
⛰️ ११ डिसेंबर : जागतिक पर्वत दिन
☀️ १४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
Latest post
महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...
-
1) नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे. वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 2) रक्ताच...
-
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प...
-
घटना दुरुस्ती कायदा 📌जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले....