Tuesday 12 March 2024

राज्यसेवा प्रश्नसंच

1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?


 97,000

 9,700

 10,000

 21,000

उत्तर : 97,000


2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.


 5 km/s

 18 km/s

 18 m/s

 5 m/s

उत्तर : 5 m/s


3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?


 यकृत ग्रंथी

 लाळोत्पादक ग्रंथी

 स्वादुपिंड

 जठर

उत्तर : यकृत ग्रंथी


4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?


 A

 B

 D

 C

उत्तर : D


5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.


 42 ओहम

 576 ओहम

 5760 ओहम

 5.76 ओहम

उत्तर : 576 ओहम


6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?


 A

 B

 C

 D

उत्तर : A


7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?


 मुकनायक

 जनता

 समता

 संदेश

उत्तर : संदेश


8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?


 9800 J

 980 J

 98 J

 9.8 J  

उत्तर : 980 J


9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?


 वि.दा. सावरकर

 अनंत कान्हेरे

 विनायक दामोदर चाफेकर

 गणेश दामोदर चाफेकर

उत्तर : अनंत कान्हेरे


10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?


 गांधीजींना अटक

 काँग्रेसचा विरोध

 चौरी-चौरा घटना

 पहिले महायुद्ध

उत्तर : चौरी-चौरा घटना


11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?


 अनंत कान्हेरे

 खुदिराम बोस

 मदनलाल धिंग्रा

 दामोदर चाफेकर

उत्तर : मदनलाल धिंग्रा


12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?


 135 व 50

 135 व 60

 145 व 50

 145 व 60

उत्तर : 145 व 60


13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?


 अप्पासाहेब परांजपे

 तात्यासाहेब केळकर

 भास्करराव जाधव

 धोंडो केशव कर्वे

उत्तर : धोंडो केशव कर्वे


14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?


 राजा राममोहन रॉय

 केशव चंद्र सेन

 देवेंद्रनाथ टागोर

 ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?


 उदारमतवादी पक्ष

 स्वराज्य पक्ष

 काँग्रेस पक्ष

 मुस्लिम लीग

उत्तर : स्वराज्य पक्ष


16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?


 स्वामी दयानंद

 स्वामी विवेकानंद

 अॅनी बेझंट

 केशवचंद्र सेन

उत्तर : अॅनी बेझंट


17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?


 इस्लामाबाद

 ढाका

 अलाहाबाद

 अलिगड

उत्तर : ढाका


18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?


 1895

 1896

 1897

 1898

उत्तर : 1897


19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?


 डॉ. बी.आर. आंबेडकर

 वि.रा. शिंदे

 महात्मा जोतिबा फुले

 भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?


 1915

 1916

 1917

 1918

उत्तर : 1916



1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ 
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर 

   2) एस. डी. आर. 

   3) पेट्रो डॉलर   

   4) जी. डी. आर.


उत्तर :- 2✔️✔️


२) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब  

  2) ब व क 

   3) अ व क    

4) वरीलपैकी सर्व


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?


   1) नाबार्ड   

 

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


   3) स्टेट बँक ऑफ इंडिया


    4) वरील सर्व


उत्तर :- 1✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?



   1) कच्च्या मालाचा अभाव   

   2) अपु-या पायाभुत सुविधा

   3) आधुनिकीकरण   

   4) कामगारांची अनुपलब्धता


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे. 

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.  

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?


   1) अ फक्त  

  2) अ आणि ब फक्त 

   3) अ, ब आणि क  

  4) अ, ब आणि ड



उत्तर :- 3✔️✔️

अलिगड मुस्लीम आंदोलन


🔹अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.

🔸आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते

🔹तयांनी 'पीरी-मुरीदी प्रथा' एवं 'दास प्रथा' समाप्त करण्याचे प्रयत्न केले

🔸सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला 'ऐंग्लों ओरियन्टल स्कूल' म्हणत

🔹यथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !



📚 आन्दोलनाचेे इतर नेते 📚

🔸दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली। 

🔹कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली

🔸 1870 नंतर प्रकाशित 'डब्ल्यू. हण्टर' चे पुस्तक 'इण्डियन मुसलमान' मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा

🔹सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित 'अलीगढ़ आन्दोलन' चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता👇

🔺नजीर अहमद चिराग 

🔺अली अल्ताफ 

🔺हसैन मौलाना 

🔺शिबली नोमानी


अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?

उत्तर👇


1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता. 

2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे. 

3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. 

4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले. 

5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला. 

6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला. 

7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.

 8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला. 

9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.


पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला. 


10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

Mpsc प्रश्न सराव


1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.

   1) बालाघाट    2) महादेव    3) सातपुडा    4) अजिंठा


उत्तर :- 1


2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?

   1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा    2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा

   3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना    4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा


उत्तर :- 1


3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

   ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

   क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.

   ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

   1) ब      2) क      3) ड      4) कोणतेही नाही


उत्तर :- 4


4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?

   1) गोदावरी    2) भीमा      3) कृष्णा      4) वरील एकही नाही


उत्तर :- 2


5) योग्य जोडया लावा.

  धबधबे      ठिकाण

         अ) मार्लेश्वर      i) सातारा

         ब) ठोसेघर      ii) रत्नागिरी

         क) सौताडा      iii) अहमदनगर

         ड) रंधा      iv) बीड


    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  i  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  iv  iii  ii

           4)  ii  i  iv  iii


उत्तर :- 4



1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?

   1) तापी    2) वैनगंगा    3) नर्मदा      4) कृष्णा


उत्तर :- 2


7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?

   अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.

   ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.


   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य    3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब योग्य नाहीत


उत्तर :- 2


8) जोडया लावा.

  जिल्हा      धबधबा

         अ) अहमदनगर    i) सौताडा धबधबा

         ब) अमरावती    ii) सहस्त्रकुंड धबधबा

         क) बीड      iii) रंधा धबधबा

         ड) यवतमाळ    iv) मुक्तागिरी धबधबा

    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  iv  i

           2)  i  iv  iii  ii

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  ii  iii  i


उत्तर :- 3


9) खालील विधाने पहा.

   अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

   ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

   क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

   1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.    2) विधान अ आणि क बरोबर आहेत.

   3) विधान ब आणि क बरोबर आहेत.    4) सर्व विधाने बरोबर आहेत.


उत्तर :- 4


10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?

   1) पूर्णा    2) पांझरा    3) दुधना      4) गिरणा


उत्तर :- 3


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    ड) अपक्ष

   1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड      2) ब, क, ड    3) अ, ब, क    4) अ, ड, क


उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.


उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा      ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ    3) अ, ब, क, इ    4) ब, क, इ


उत्तर :- 3



6) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती


   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड


उत्तर :- 1


7) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर    2) आयव्हर जेनिंग्ज  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन  4) मॉरिस जोन्स


उत्तर :- 4


8) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना      2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता    4) न्यायालयीन पुनर्विलोकन


उत्तर :- 1


9) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता      3) न्याय      4) बंधुभाव


उत्तर :- 3


10) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या .............  घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी      3) 42 वी      4) 46 वी


उत्तर :- 3

वेव्हेल योजना विषयी माहिती


मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता.

त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते. युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती.

अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती.

मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले.

14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.

नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.
जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.

त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील.

त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.
भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.

केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.

विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले. बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली.

व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते.

याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत.

त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.

भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या.

त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

"चलेजाव चळवळ १९४२"

नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)


२अधिवेशने-

१-वर्धा -प्रस्ताव संमत

२-गवालिया टँक,मुंबई-सुरु


◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२


◾️कारण-

क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या

जपाण आक्रमण

महागाईचा भडका

महायुध्द


◾️घोषणा-

चले जाव (युसुफ मेहेरअली)

करा अथवा मरा(गांधी)


◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे

नेहरु-अल्मोडा

जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह


◾️असहभागी घटक-

मुस्लीम लीग,

हिंदु महासभा

लिबरल पार्टी

भारतीय कम्युनीस्ट पक्ष


◾️पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा

उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )

बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)

बिहार -पुर्णिया


◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो

INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद


◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.


सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* १८२९ : सती बंदीचा कायदा

* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.

* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.

* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना

* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव

* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.

* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.

* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.

* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत

* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.

* १९०४ : अभिनव भारतची स्थापना

* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.

* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.

* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.

* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह

* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.

* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.

* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.

* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.

* १९१५ : होरूल लीगची चळवळ.

* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.

* १९१६ : लखनौ करार.

* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.

१९१९ : माँटफर्ड कायदा.

* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.

* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.

* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.

* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा

* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.

* १९२३ : झेंडा सत्याग्रह.

* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.

* १९२७ : बार्डोली सत्याग्रह

* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.

* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट

* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.

* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.

* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.

* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

* १९३१ : गांधी-आयर्विन करार.

* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.

* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.

* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.

* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार

* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.

* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.

* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.

* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.

* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.

* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.

* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना

* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.

* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.

* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.

* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.

* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.

* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.

* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.

* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.

* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.

* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.

* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार

* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.

* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) ग्लुकोजचा द्रवणांक ...... इतका आहे.

1) 150⁰c✅✅

2) - 150⁰c 

3)-218⁰c

4)218.4⁰c





2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे .... आणि  .... पासून तयार करतात.

1) लाईम आणि सल्फर

2) लाईम आणि सोडियम

3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅

 4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर





3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?

 1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%

2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅

3) काॅपर 80% + टीन 20 %

4) काॅपर 90 % + टीन 10 %




4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?

अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 

ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर

क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर

ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे  


 1) अ, ब आणि क 

 2) फक्त क  

 3) ब आणि ड ✅✅

 4) फक्त ड






5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना .... वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.   

1) हायड्रोजन✅✅ 

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायाॅक्साइड

4) अमोनिया






6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :

1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅ 

2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.     

3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात. 

4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.






7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास  ' फूल्स  गोल्ड ' ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात. 

1)  हेमाटाईट 

2) मॅग्नाटाईट

3) सायडेरेईट 

4) पायराईट ✅✅





8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे. 

1) सेल्यूलोज

2) सुक्रोज

3) सॅकॅरिन ✅✅

4) ग्लुटेन 






9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी...... चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .

1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅

2) मॅगेनीज डायऑक्साईड 

3) कॅल्शियम कार्बोनेट 

4) सिल्व्हर नायट्रेट   







10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ..... हा वायू ' ब्लू कार्बन ' या नावाने ओळखला जातो. 

1) नायट्रोजन 

2) ऑक्सिजन 

3) कार्बन डायऑक्साईड✅✅

4) हायड्रोजन

पचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास


पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते. 


अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.

गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. 


गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची.


 गावामध्ये काही वाद, भांडणे झाल्यास त्यामध्ये लक्ष घालून सोडविणे, गावचा विकास होण्यासाठी योजना आखणे, गावाचा कारभार चालविणे, गावाचा कर गोळा करून राजाला खंड वसूली देणे इ. कामे ही पंचमंडळी पार पाडीत असत.


 गावात त्यांना फार मान होता. गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत.

मौर्याच्या काळामध्ये तर त्यांना ग्रामशासनाचा अधिकार होता. व त्या दृष्टीने ह्या पंचायती खूपच विकसित झालेल्या होत्या. 


सन ८०० ते १००० च्या दरम्यान बोल घराण्याच्या इतिहासातील एकल येथील चौदा शिळा खऱ्या ग्रामपंचायतीच्या निर्देशक आहेत. आजच्या ग्रामपंचायती करीत असलेली विविध गाव विकासाची कामे या ग्रामपंचायती त्या वेळी करीत होत्या. 


ग्रामपंचायतीची निवडणूक दरसाल होत असे व सर्व सभासद लोकनियुक्त असत. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नेमणूक होई.


 ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या निधी असायचा.न्याय निवाडे ही पंचायत करी, फाशीची शिक्षा क्वचितच अंमलात येई. देवळात नंदादीप लावणे अगर पंचायतीस अमुक इतक्या गाई पुरविणे या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत.



भारतात अनेक साम्राज्ये आली होती. बाहेरून आलेल्या मोगलांनी ही पद्धत स्विकारली. भारता सारख्या खंडप्राय खेडया पाड्यात विखुरलेल्या देशाला विकेंद्रित शासनाचीच जरुरी होती.


 त्यामुळेच ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण बनत होती. ग्रामीण कारागीर, कष्टकरी यांना पोट भरण्याकरीता व्यवसाय मिळत होता.



शिवाजी महाराजांच्या काळात

 ग्रामपंचायतीची पद्धत चोहीकडे चालू होती. तीच रयतेच्या सोयीची वाटल्यावरून महाराजांनी कायम ठेवली.


 रयतेला न्याय मिळवण्यासाठी लांब कुठे जावे लागू नये म्हणून गावातील पंचांनीच फुकट न्याय दयावा हे अभिप्रेत होते. छत्रपतीच्या काळात ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे चालू होत्या.



ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी मात्र आपल्या आपल्या स्वार्थासाठी गावगड्यांची चालू व्यवस्था मोडीत काढून तलाठी पोलीस पाटील यांच्यापासून ते कलेक्टर पर्यंत नोकरशाहीची फौज निर्माण केली. 


१८८२ साली लॉर्ड रिपनने मर्यादित स्वरुपात स्थानिक स्वराज संस्थेचा कार्यक्रम अंमलात आणला. परंतु आरोग्य आणि प्राथमिक सोयी सुविधा पुरतेच त्यांचे उद्दिष्ट मर्यादित होते. 


त्यामध्ये स्वराज्याचा मागमूसही नव्हता. याच काळात तालुका लोकल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड व काही मोठया गावात ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही काही काळ चालू होत्या.



देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या पुनुरुत्थापनाचा व नवनिर्माणाचा विचार सुरु झाला. त्यामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने विचार होणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा मुलभूत आणि व्यापक अर्थ मिळाला. 


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि घटना समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढयात लोकांनी उराशी बाळगलेल्या ध्येयात ग्राम स्वराज्य हे सूत्र होते. 


त्यामुळे देशाची घटना होत असताना ग्रामपंचायतीचा स्वतंत्र तिसरा सत्र असावा अशी सूचना मांडण्यात आली. त्या सूचनेला घटना समितीतील काही लोकांनी विरोध केला. 


भारतीय समाज व्यवस्था जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर आधारीत असल्यामुळे तथाकथित उच्च वर्गीय जातींना पंचायत व्यवस्थेत पंच म्हणून स्थान मिळत असे.


 तसेच गांवातील उच्च जातीय लोकच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असत. अशा रितीने या पूर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते..


 ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता. 


🔹परस्तावना🔹


आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.

महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.


🔹गरामसभेचे सदस्य 🔹


पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.


🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹


 कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.


🔹गरामसभेचा कारभार 🔹


ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.


🔹गरामसभेचे पदाधिकारी 🔹


ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]

अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.


🔴राज्य घटनेत करण्यात आलेला बदल🔴


७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग ९-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम २४३ ते कलम २४३-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायदयाने राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे.

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे.


🔴घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश🔴

पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारे आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप व मनमानी करू शकत नाहीत. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहीलेल्या नाहीत. बऱ्याचशा वेळा राज्यामध्ये शासन करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक घेण्याकरीता अनुकूल परिस्थिती नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलल्या जात असत. महाराष्ट्रात एकेकाळी निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तब्बल १२ वर्षानंतर घेण्यात आल्या होत्या. आता दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये ज्याकाही तरतूदी असतील त्यांचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे.


यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

'✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी'

कुठल्याही कामाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. उगाच घाई-गडबड करून काम लवकर होण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं(chemical reaction) उदाहरण नक्की समोर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, प्रयोगशाळा आहे, आवश्यक ती तज्ज्ञता आहे, सर्व अभिक्रियाकारके (reactants) आणि उत्प्रेरके(catalysts) हे सर्व असलं आणि आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरीही हवा तो product तयार होण्यासाठी आपल्याला आवश्यक तो वेळ हा द्यावाच लागतो. याला म्हणायचं time constant, हा ठरलेला असतोच. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातही तो असतोच आवश्यक त्या सर्व गोष्टी पुस्तकं, अभ्यासिका, test series हे सर्व उपलब्ध असूनही वेळ द्यावा लागणारच असतो कारण काही गोष्टींमध्ये वेळेनुसारच maturity येत असते. Teachers/Mentors हे Catalysts प्रमाणे काम करून हा वेळ थोडाफार कमी करू शकतात एवढंच परंतू हवं ते product म्हणजे यश मिळवण्यासाठी स्वत:च transform होणं आवश्यक असतं.

दुसरं म्हणजे नियोजन. कितीही वेळ दिला तरीही आपल्याकडे योग्य नियोजन नसेल तरीही आपल्याला यश मिळणं अवघड आहे. कारण क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतो म्हणून काटेकोर नियोजन असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये long term, short term planning तसेच macro and micro management चं महत्त्व असतं.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कारण प्रत्यक्ष कृतीविना सर्व संकल्प निरर्थक असतात.
(क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे) ही बऱ्याच जणांची समस्या असते.. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.. प्रत्यक्ष कृती करणे आणि त्यात सातत्य आणि सुधारणा राखने हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्याच टप्प्यावर out of the control factors आपल्याला सर्वाधिक त्रास देतात म्हणून अंमलबजावणीच्या वेळी मानसिक स्थिरता अत्यंत आवश्यक असते. ही स्थिरता आपण केलेल्या नियोजनावर आणि करत असलेल्या अभ्यासावर आपला पूर्ण विश्वास असल्यास मिळू शकते. अभ्यासिकेत किती वेळ बसतोय किंवा किती pages वाचून काढलेत यापेक्षा किती घटकांचा अभ्यास मी व्यवस्थित पूर्ण केला या गोष्टीला यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून दिखाऊपणा किंवा अवडंबर म्हणून पहाटे चार ला उठून अभ्यासाला बसने किंवा रात्र जागून काढून अभ्यास करणे असं काहीही अचाट न करताही व्यवस्थित, नियोजनपूर्वक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने आपला अभ्यास आपण पूर्ण केला, micro notes काढल्या, multiple revisions केल्या तर यश आपल्याला नक्की मिळेल.

शेवटी पुन्हा एकच  क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतोच तर परिपूर्ण नियोजन आणि कठोर अंमलबजावणीचा तो परीणाम असतो.
म्हणून वेळ द्या, नियोजन करा आणि अंमलात आणा.
स्व.बाबा आमटेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा"

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


गणितातील महत्वाची सूत्रे

🔴 सरासरी 🔴

1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

 

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14

 

संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

 

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

 

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

 

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

 

3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

 

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810

 

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20) 

 

 सरळव्याज :-

·         सरळव्याज (I) = P×R×N/100

·         मुद्दल (P) = I×100/R×N

·         व्याजदर (R) = I×100/P×N

·         मुदत वर्षे (N) = I×100/P×R

·         चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे  

 नफा तोटा :-

·         नफा = विक्री – खरेदी    
 

·         विक्री = खरेदी + नफा     

·         खरेदी = विक्री + तोटा 

·         तोटा = खरेदी – विक्री    
 

·         विक्री = खरेदी – तोटा   
 

·         खरेदी = विक्री – नफा 

·         शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)  

 आयात, चौरस, त्रिकोण, कोन :-

·         आयत -
आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)   
    

·         आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी 

·         आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी    
 

·         आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी 

·         आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

·         आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         चौरस -

·         चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी     

·         चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2 

·         चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.

   समभुज चौकोण -

·         समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ     

·         = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2 

·         समलंब चौकोण -

·         समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2 

·         समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज 

·         समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर 

·         त्रिकोण -

·         त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2

·         काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ    
 

·          

·         = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2

·          

·         पायथागोरस सिद्धांत -

·         काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2 

 प्रमाण भागिदारी :-

·         नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर 

·         भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर 

·         मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर 

 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-

A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 

B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5 

C) गाडीचा ताशी वेग  = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ  × 18/5

 

D) गाडीची लांबी  = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.

1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर  = 3600/1000 = 18/5

 

G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2

 

H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी

 

I) भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

 

= वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक

 

लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 

************************************************************************

polity questions for mpsc exam practice

1.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार-विनिमय करण्याचा अधिकार आहे?

A) कलम 124 B) कलम 130 C) कलम 143 D) कलम 147

उत्तर – कलम 143


2. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ) संसद न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केवळ वाढ करू शकते मात्र घट घडवू शकत नाही.

ब) भारताचे सर्वोच्च न्यायालय अमेरिकन न्यायालयात प्रमाणे फेडरल कोर्ट म्हणून कार्य करते.

क) ब्रिटिश न्यायालयाचा प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.

A) अ आणि ब

B) अ आणि क

C) अ ब आणि क

D) ब आणि क

उत्तर – अ, ब आणि क


3. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्य स्थान त्यांच्या राजधानीच्या शहरात नाही?

अ) उत्तर प्रदेश ब) मध्य प्रदेश

क) छत्तीसगड ड) सिक्किम

A) अ आणि ब

B) क आणि ड

C) अ,ब आणि क

D) अ ब आणि ड

उत्तर – अ ब आणि क


४.भारतीय राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.

A) कलम 214 B) कलम 226 C) कलम 230 D)कलम 231

उत्तर – कलम 231


५. गावातील अनुभवी ज्येष्ठांकडून तक्रार निवारणाच्या भारतातील पारंपरिक व्यवस्थेची सुधारित व गांधीवादी तत्त्वावर आधारित व्यवस्था म्हणजे काय?

A) लोकायुक्त B) लोक अदालत

C) लोकपाल D) कौटुंबिक न्यायालय

उत्तर – लोकअदालत


६. राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात योग्य पर्याय निवडा.

अ)कॅबिनेट ने केवळ लेखी स्वरुपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.

ब) अशी तरतूद घटनेत 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ,ब

D) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – फक्त अ


७. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालया वरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?

A) नेमणुका

B) निवृत्ती वेतन

C) बदली

D) सक्तीची निवृत्ती

उत्तर – निवृत्तीवेतन


८.73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दल च्या कोणत्या तरतुदी राज्यसरकार साठी  ऐच्छिक आहेत?

अ) दोन-तीन स्तरीय रचना ब) निश्चित कार्यकाळ

क) ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती ड) जिल्हा नियोजन समिती

A) क आणि ड

B) अ आणि ब

C) ब आणि ड

D) अ आणि क

उत्तर – क आणि ड


९.केंद्रीय निवडणूक आयोगा संबंधित अयोग्य विधान ओळखा.

अ) याला अखिल भारतीय स्वरूप आहे

ब)देशात मुक्त व न्याय निवडणुका घेणे हेतू आहे.

क) राष्ट्रपती किंवा राज्यपाल आयोगास त्यांच्या मागणीनुसार स्टाफ उपलब्ध करून देते.

ड)राज्यपाल आयोगास मदत करण्यासाठी प्रादेशिक आयुक्त नेमू शकतात.

पर्यायी उत्तरे

A) अ , ब

B) ड

C) अ

D) अ ब क ड

उत्तर – ड


१०. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते?

A) राज्यपाल  B) संसद  C) विधिमंडळ  D) राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर – विधिमंडळ


११. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे?

A) कलम 165 B) कलम 166 C) कलम 164 D) कलम 76

उत्तर – कलम 165


१२.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायव्यवस्था यांच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत?

A) भाग 4 B) भाग 5 C) भाग 6 D) भाग 7

उत्तर – भाग 6


१३.न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)केवळ संसदीय व राज्य विधिमंडळाचे कायदे नव्हे तर शासकीय कार्यकारी आदेशाची ही तपासणी करणे न्यायिक पुनर्विलोकन याच्या साह्याने शक्य आहे.

ब)राज्यघटनेच्या तत्वांचे चुकीच्या कायद्यापासून संरक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट आहे.

A) फक्त अ बरोबर

B) फक्त ब बरोबर

C) दोन्ही बरोबर

D) दोन्ही चूक

उत्तर – दोन्ही बरोबर


१४. खालील विधाने विचारात घ्या.

अ) राज्य विधिमंडळाचे कायदे केवळ राज्याच्या परिक्षेत्रा साठीच लागू असतात

ब) संसदेचे कायदे भारतीय नागरिकांच्या परदेशातील संपत्तीला लागू असतात वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) वरीलपैकी नाही

उत्तर – अ आणि ब


१५.आदिवासी क्षेत्रांना संसदीय कायदा लागू होणार नाही असे निर्देश देण्याचे अधिकार अनुक्रमे कोणाला आहेत?

A) राष्ट्रपती, राज्यपाल

B) राज्यपाल, राष्ट्रपती

C) केवळ राज्यपाल

D) पंतप्रधान, राष्ट्रपती

उत्तर – राज्यपाल राष्ट्रपती


१६. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र व राज्यांच्या कायदेविषयक विषयांची विभागणी दिलेली आहे?

A) परिशिष्ट 4 B) परिशिष्ट 2

C) परिशिष्ट 7 D) परिशिष्ट 8

उत्तर – परिशिष्ट 7


17. शेषाधिकार संबंधित खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारतीय घटनेत शेषाधिकार याची तरतूद ऑस्ट्रेलियन घटनेवरून घेतली आहे.

ब) भारतात असे शेषाधिकार यांचे अधिकार संसदेस आहेत.

क)  स्वित्झर्लंड मध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत.

ड) स्पेनमध्ये शेषाधिकार केंद्र व राज्य दोघांकडेही आहेत.

A) वरील सर्व योग्य

B) केवळ ब योग्य

C) ब आणि ड योग्य

D) ब आणि क योग्य

उत्तर ब आणि ड योग्य


18. भारतीय निवडणूक आयोगामार्फत खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जातात?

अ) भारताचा राष्ट्रपती ब) भारताचे उपराष्ट्रपती

क) संसद ड) राज्यविधी मंडळ

इ) नगरपालिका

A) अ,ब,क, इ

B) ब,क,ड

C) अ,क,ड

D) अ,ब,क,ड

उत्तर – अ, ब,क,ड


१९.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेपास मनाई आहे?

A) कलम 326 B) कलम 328

C) कलम 329 D) कलम 330

उत्तर – कलम 329


२०. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

A) संघ लोकसेवा आयोग B) संसद

C) राष्ट्रपती D) वरीलपैकी नाही

उत्तर – राष्ट्रपती


२१. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणास सादर करतो?

A) संबंधित राज्याचे राज्यपाल

B) संबंधित राज्याचे विधिमंडळ

C) संबंधित राज्याचे मुख्यमंत्री

D) संबंधित राज्याचे विधिमंडळ अध्यक्ष

उत्तर – संबंधित राज्याचे राज्यपाल


२२. राज्याच्या कार्यकारी विभागात कोणाचा समावेश होतो?

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री मंत्रिमंडळ

क) महाधिवक्ता ड) विधानसभा अध्यक्ष


A) अ आणि ब

B) ब आणि क

C) अ, ब, आणि क

D) अ,ब,क,ड

उत्तर – D. अबकड


२३. भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

A) अमेरिका B) ब्रिटन

C) कॅनडा D) ऑस्ट्रेलिया

उत्तर – कॅनडा


२४.कोणत्या घटना दुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद संविधानात केली?

A) चौथी घटनादुरुस्ती

B) सहावी घटनादुरुस्ती

C) सातवी घटना दुरुस्ती

D) आठवी घटनादुरुस्ती

उत्तर 7 वी घटना दुरुस्ती


२५. 73 व्या घटनादुरुस्तीने कायद्यातील कोणत्या कलमाला मूर्त स्वरूप दिले?

A) कलम 19

B) कलम 40

C) कलम 45

D) कलम 21

उत्तर – कलम 40


२६. पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?

A) विभागीय आयुक्त

B) जिल्हाधिकारी

C) पंचायत समितीचा उपसभापती

D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष


२७. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50 टक्के आरक्षण कधी मिळाले?

A) 2000

B) 2005

C) 2007

D)2011

उत्तर – 2011


28. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला?

A) अशोक राव मेहता समिती

B) एल एम सिंघवी समिती

C) दिनेश गोस्वामी समिती

D) ताखत्मल जैन समिती

उत्तर एम सिंघवी समिती

भारताची राज्यघटना 200 प्रश्न आणि उत्तर

1.राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?

1. राष्ट्रपती

2. महान्यायवादी

3.उपराष्ट्रपती✅

4.पंतप्रधान 


2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचा अध्यक्ष कोण असतो?

1.पोलीस अधीक्षक

2.जिल्हाधिकारी✅

3.मुख्य कार्यकारी अधिकारी

4.पालकमंत्री


3.महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?

1.46

2. 48✅

3.50

4 44


4.मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

1.61 वी✅

2. 62 वी

3.71 वी

4.81 वी


5.नव्या कायद्याच्या प्रस्तावाला  काय म्हणतात?

1.ठराव

2. अध्यादेश

3.वटहुकूम

4.विधेयक✅

 

6.भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? 

1.भारताचा नियंत्रक व महालेखापाल

2.सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

3.भारताचा महान्यायवादी✅

4. Ad. जनरल


7.संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?

1.लोकसभा

2.राज्यसभा✅

3.विधानसभा

4.विधानपरिषद


8.भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेल पहिलं राज्य कोणतं?

1.पंजाब

2.महाराष्ट्र

3.गुजरात

4 आंध्रप्रदेश✅


9.कोणत्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?

1.महाराष्ट्र

2.कर्नाटक

3.गुजरात✅

4. केरळ


10.राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?

1. 361

2.368✅

3.371

4.378


1. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रुपांतर झाले आहे?

१.काम करण्याचा अधिकार

२.माहिती अधिकार

३.चांगल्या पर्यावरणाचा अधिकार

४.शिक्षणाचा अधिकार✅


2. सरपंचा विरुद्ध चा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते?

१.अविश्वास ठराव पुन्हा सहा महिन्यांच्या आत आणता येतो

२.अविश्वास ठराव पुन्हा आणताच येत नाही

३.एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो✅

४.सरपंचाला विवाद अर्ज उच्च न्यायालयात सादर करता येतो


3. महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ. स. १९६० या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते?

१.श्री ग मवळकर

२.श्री त्र्य शि भारदे

३.श्री स ल सिलम✅

४.श्री के कृ वानखेडे


4. 'नेमो डिबेट ई इंडेक्स इन प्रोप्रिया क्वाझा' (Nemo Debet Esse Index In Propria Causa) या लॅटिन माक्झिम चा पुढीलपैकी के अर्थ आहे?

१.राजा कधीही चूक करत नाही

२.कोणतीही व्यक्ती स्वतः च्या प्रकरणात न्यायाधीश असू शकत नाही✅

३.बाजू मांडण्याची संधी दिल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यात येणार नाही

४.जो ऐकेल तोच निर्णय देईल


5.भारतीय संसदेतील स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती?

अ)शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण

ब)कामगिरी चे मूल्यमापन व देखरेख

क)राज्यशासनाच्या कार्यांचे मूल्यमापन

ड)पुरवणी अंदाजाचे परीक्षण

१.अ, ब आणि क

२.अ, ब आणि ड✅

३.अ, क आणि ड

४.ब, क आणि ड


6.राज्यघटनेच्या मसुद्यावर 'वकिलांचे नंदनवन' अशी टीका केली जाते, त्याची कारणे कोणती आहेत?

१.मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांना च परिचित आहे

२.तरतुदी मागील धनव्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला च समजू शकतो

३.मसुदा लोकांना सत्या पासून दूर नेतो म्हणतात

४.मसुदा समितीतील सात पैकी तीन सभासद त्या काळातील कायदे तज्ञ होते✅


7. भारतीय संविधानाच्या १० व्या परिशिष्टां नुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे?

अ)राज्यसभेचे अध्यक्ष

ब)लोकसभेच सभापती

क)भारताचे राष्ट्रपती

ड)सर्वोच्च न्यायालय

१.अ, ब, क

२.अ, ब,क, ड

३.अ, ब✅

४.अ, ब, ड


8.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास

१.अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेरसदर केले जाते

२.राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता ठेवले जाते

३.राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी पाठवले जाते

४.पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो✅


9. खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधानपरिषदेची स्थापना केली आहे?

१.महाराष्ट्र

२.राजस्थान

३.जम्मू काश्मीर

४.आंध्र प्रदेश✅


10. संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो?

१.आकस्मिक निधी

२.सांचीत निधी

३.भविष्य निर्वाह निधी✅

४.यापैकी नाही


 1.कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे राष्ट्रपती ना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे?

१.४२ वी घटना दुरुस्ती ✅

२.४४ वी घटना दुरुस्ती

३.24 वी घटना दुरुस्ती 

४.५२ वी घटना दुरुस्ती


2.१९३५ च्या कायद्यांत कशाची तरतूद होती?

१.प्रौढ मताधिकर

२.साम्राज्यांर्गत शासनाधिकार

३.सापेक्ष स्वायत्तता

४.प्रांतिक स्वायत्तता✅


3.संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती?

१.भारतात अधिवास आणि

२.भारतात जन्म किंवा

३.माता व पितांचा भारतात जन्म किंवा✅

४.अशा प्रारंभ पूर्वी किमान ५ वर्षे भारतात सामान्यतः निवास


4.खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णया द्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले?

१.बेरुबाली खटला ✅

२.गोलाखनाथ खटला

३.केशवानंद भारती खटला

४.बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य


5.घटनेच्या कलम ८२ मधील सध्याच्या तरतुदी प्रमाणे, राज्या-राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते?

१.२०१८

२.२०२१

३.२०२६✅

४.२०३१


6.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली?

१.एम सी छागल

२.एम हिदायतुल्ला✅

३.वाय चंद्रचूड

४.यापैकी नाही


7.भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता?

१.डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण

२.डॉ झाकीर हुसेन✅

३.श्री व्ही व्ही गिरी

४.डॉ फकरुद्दी अली महंमद


8.ऍमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात?

१.न्यायालयाचा मित्र वकिल✅

२.न्यायालयाचा संदेशवाहक

३.नायलायचा एक पगारी अधिकारी

४.न्यायालयाचे एक ब्रिटिशकालीन नामाभिधान


9.महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

१.२०००

२.२००५

३.२०१०✅

४.२०११


10.भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता?

१.मराठवाडा

२.आंध्र प्रदेश ✅

३.महाराष्ट्र

४.कर्नाटक


1. 'मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे' असे कोणी म्हटले आहे?

१.डॉ बी आर आंबेडकर

२.प्रो के टी शहा✅

३.एन जी रंगा

४.बी एन राव


2. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे?

१.उद्देशपत्रिका✅

२.मूलभूत अधिकार

३.मूलभूत कर्तव्ये

४.राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे


3. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

१.संसद कायदा करून आंतरराज्यीय नदी अथवा नदी खोऱ्यामधील पाणी वापर, वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते.

२.संसद कायदा करून आशा आंतरराज्यीय जल विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदीत करू शकत नाही✅

३.संसद कायद्याद्वारे उच्चन्यायालयाच्या अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते

४.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांमधील कृष्णा पाणीवाटप लवाद हा राज्य घटनेच्या कलम २६२ च्या तरतुदी नुसार जाहीर करण्यात आला आहे.


4. खालीलपैकी कोणती/कोणत्या संस्था वैधानिक नाहीत?

अ.राष्ट्रीय विकास परिषद

ब.विद्यापीठ अनुदान आयोग

क.नियोजन आयोग

ड.केंद्रीय दक्षता आयोग

१.फक्त अ

२.अ आणि ब

३.अ आणि क✅

४.ब आणि ड


5.भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ नुसार "राज्य" या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा अंतर्भूत होत नाही?

१.विधानसभा

२.विधानपरिषद

३.उच्च न्यायाल✅

४.जिल्हा परिषद


6. राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोण असू शकते?

१.जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते

२.जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते

३.जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते✅

४.जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते


7.भारतीय संविधानात अनुछेद ३७१ काय सांगतो?

१.जम्मू व काश्मीर बाबत विषय तरतूद

२.केवळ उत्तम पूर्व भागाकरिता विशेष तरतुदी

३.निव्वळ हैदराबाद राज्यकरिता विशेष तरतूद

४.विविध राज्यांकर्ता विशेष तरतुदी✅


8. संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या?

अ. रेल्वे

ब.सीमाशुल्क

क.आयकर

ड. डाक व तार

१.अ ब आणि क

२.ब क आणि ड

३.अ ब आणि ड✅

४.अ क आणि ड


9. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?

१.१९५२

२.१९६६

३.१९७६✅

४.१९८६


10. ए के क्रयपाक विरुद्ध केंद्र (AIR 1970 S. C. 150) च्या खटल्या मध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

१.आर्थिक पक्षपात

२.वैयक्तिक पक्षपात✅

३.विषय पक्षपात

४.वरील सर्वच


1. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्य वरून असे  निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे?

१.प्रातिनिधिक लोकशाही

२.अध्यक्षीय लोकशाही

३.सांसदीय लोकशाही✅

४.प्रत्यक्ष लोकशाही



2. "आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्टेचे केले आहे" राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले?

१.पंडित जवाहरलाल नेहरू✅

२.डॉ बाबासाहेब आंबेडकर

३.के एम मुन्शी

४.डॉ राजेंद्र प्रसाद



3. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारसंबंधी प्रतिपादन केलेल्या पुढील विधनातील अयोग्य विधान कोणते?

१.कोर्ट मार्शल द्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही✅

२.राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्याने च करतात

३.राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही

४.घटनेच्या कलम ७२ नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्याची गरज नाही



4. भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्याने बजावलेल्या स्वेच्छानिर्णय अधिकाऱ्यांचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते?

१.प्रशासकीय निर्णयाची योग्यता बघण्यासाठी

२.साक्षी पुराव्याची योग्यता पुन्हा पडताळणीसाठी

३.निर्णय प्रक्रिया बरोबर झाली की नाही हे पडताळण्यासाठी✅

४.वरीलपैकी एक ही नाही



5. पुढील राज्यांचा निर्मिती नुसार क्रम लावा.

१.झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड

२.उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड

३.छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड

४.छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड✅



6. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

१.मोरारजी देसाई

२.वसंतराव नाईक

३.मारोतराव कन्नमवार✅

४.शंकरराव चव्हाण



7.खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्री परिषद यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात?

१.राज्यपाल

२.मुख्यमंत्री✅

३.मूख्य सचिव

४.राज्य सरकार



8. काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्या संदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो?

१.राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात आणि त्यामध्ये बहुमताने जो निर्णय होईल तो मान्य होतो

२.राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो

३.विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो✅

४.सादर बाब निर्णयासाठी राष्ट्रपती कडे पाठवली जाते



9. कोणत्या राज्यांना ७३ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदी पासुन सूट देण्यात आली आहे?

अ)मिझोराम

ब)मेघालय

क)नागालँड

ड)अरुणाचल प्रदेश

१.अ, ब, क✅

२.ब, क, ड

३.क, ड, अ

४.ड, अ, ब



10. शिक्षणच्या व्यवसायिकर्णावर कोणत्या समितीने भर दिला?

१.कोठारी समिती

२.बोगीरवर समिती

३.चटोपाध्यय समिती✅

४.बळवंत राय मेहता समिती


1. भारतीय राज्यघटनेत ५२ वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली?

अ)पक्षांतरला आळा घालणे

ब)मतदारांची वयोमर्यादा वाढवणे

क)निवडणूक प्रक्रियेत बदल करणे

ड)निवडणूक आयोगा बहू सदस्यीय करणे

१.फक्त अ✅

२.अ आणि ब

३.अ ब क

४.अ ब ड


2. निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानाची निवड करा.

अ)मतदारसंघांची आखणी करणे

ब)राजकीय पक्षांना मान्यता देने

क)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे

ड)देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे

१.अ आणि क✅

२.अ आणि ब

३.ब आणि ड

४.अ आणि ड


3. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात "कायद्याचे राज्य" या तत्वाचा समावेश केला आहे?

अ)संविधानाची प्रस्तावना

ब)भाग lll मूलभूत हक्क

क)भाग IV-A मूलभूत कर्तव्ये

१.अ आणि ब फक्त✅

२.अ, ब आणि क 

३.ब आणि क

४.वारीपैकी कोणताही नाही


4. प्रशासनिक न्यायाधिकरण....

 नुसार अस्तित्वात येतात?

१.विभाग

२.प्रशासन

३.कायदा✅

४.न्यायपालिका


5. नैसर्गिक न्यायचा नियम...... ला लागू होत नाही?

१.कायदे करण्या संबंधी कायदेमंडळची कृती✅

२.न्यायालय विषयक कृती

३.प्रशासकीय कृती

४.वरीलपैकी एक ही नाही


6. विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदींवर आधारित पुरावा देता येत नाही?

१.विभागीय धोरण

२.सार्वजनिक धोरण✅

३.अधिकारीय धोरण

४.वरीलपैकी काही नाही


7. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे?

१.पाच वर्षे व दंड

२.सात वर्षे व दंड

३.जन्मठेप

४.मृत्यूदंड✅


8. संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतींना पुढील बाबींवर सल्ला देतो.

अ)नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धतीन संदर्भातील बाबी

ब)भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासना बाबत ची प्रकरणे

क)एका वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्यासंबंधी ची नियमितता

ड)सनदी सेवा आणि पदांवरील नेमनुकसाठी अनुकराव्याच्या तत्वा संबधी

१.अ आणि ब 

२.ब आणि क

३.अ, ब आणि क

४.अ, ब, क आणि ड✅


9. खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?

१.सी रंगराजन✅

२.मनमोहन सिंग

३.डॉ डी सुबाराव

४.नरेंद्र जाधव


10. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?

१.एक

२.दोन

३.तीन

४.एकही नाही✅


1. भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी कोणते विधान अयोग्य आहे?

१.घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर करता येते

२.घटनादुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना घ्यावीच लागते

३.घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते✅

४.घटनादुरुस्ती विधेयकसबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहात असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद नाही


2. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोण कोणता अर्थ ध्वनित होतो?

अ)बाह्य हस्तक्षेपविना भारत स्वतः शी निगडित निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो

ब)संघ आणि घटकराज्ये दोन्ही सार्वभौम आहेत

क)भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो

ड)भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत

१.ब, क, ड

२.अ, ब, क

३.अ, क, ड✅

४.अ, ब, ड


3. खलील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.

विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्दता वाढवणारे विधेयक मे १९९७५ मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?

१.विधिमंडळाची सक्रियता

२.अंत्यतिक विधीवाध✅

३.कार्यकारी मंडळाची सक्रियता

४.प्रशासकीय सक्रियता


4. लोकसभेत अनुसुचित जाती व अनुसूचित जनजाती याच्याकरता जागा राखून ठेवण्या संदर्भात कोणत्या राज्यकरिता वेगळी तरतूद आहे?

१.केवळ आसाम करीता✅

२.केवळ जम्मू व काश्मीर करिता

३.वरील दोन्ही करिता

४.वरील कोणाही करीत नाही


5. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश.... च्या शिफारशी वरून करण्यात आला?

१.वल्लभभाई पटेल समिती

२.कृपलानी समिती

३.सरकारिया आयोग

४.स्वर्णसींग समिती✅


6. भारतीय संविधानाच्या १९ (१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

१.भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

२.मुद्रण स्वतंत्र्य ✅

३.भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वतंत्र

४.विनाशस्त्र व शांतपणे एकत्र जमण्याचे स्वतंत्र


7. खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचित अंतर्भूत आहेत?

अ)शिक्षण

ब)व्ययसाय कर

क)वजन माप मानके (प्रमाण)

ड)वजन

ई)वने

१.अ, ड, इ✅

२.अ, ब, क

३.सर्व

४.एकही नाही


8. खालीलपैकी कोणत्या दाव्यात 'ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्यासाठी मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?

१.स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध जी चावला

२.हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर✅

३.कृष्ण गोपाळ विरुद्ध स्टेट ऑफ एम पी

४.धनलाल विरुद्ध आय जी पोलीस बिहार



9. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे आहे?

अ)संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते

ब)संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते

क)संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते

ड)सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो

१.अ, क

२.ब, ड

३.फक्त ब

४.फक्त अ✅


10. खलील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

अ)आतापावेतो नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला

ब)डॉ झाकीर हुसेन व श्री फकरुद्दीन हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत

१.फक्त अ

२.फक्त ब✅

३.दोन्ही नाही

४.दोन्हीही

1.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
1. 30 वर्षे
2. 21 वर्षे
3. 25 वर्षे✅
4. 18 वर्षे

2.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
1. मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. यापैकी नाही

3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
1. पंतप्रधान व मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. मुख्य न्यायमूर्ती

4.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?
1. तहसीलदार
2. जिल्हाधिकारी✅
3. आयुक्त
4. उपजिल्हाधिकारी
  

5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
1. १ मे १९६०
2. १ मे १९६१
3.  १ मे १९६२✅
4.  १ मे १९६४

6. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती? 
1. अकलूज
2. इस्लामपूर✅
3. मिरज
4. सांगली

7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत 
1. लोकसभा
2. पंचायतराज संस्था
3. राज्य विधिमंडले
4. यापैकी nahi✅

8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती? 
1.पाच
2. सात✅
3. नऊ
4. अकरा

9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
1. चावडी
2. पार
3.दफ्तर
4. सजा✅

10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
1. तहसीलदार✅
2. उपविभागीय अधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. विभागीय अधिकारी

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?
1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅
2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते
3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा
4. यापैकी नाही

2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती
3. लोकसभेचे सभापाती✅
4. पंतप्रधान

3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?
1. चौदा
2. दोन
3. तीन✅
4. सोळा

4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
2. मुद्रण स्वातंत्र्य
3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 
4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅

5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?
1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत
3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना
4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅

6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..
अ)येथे लोकशाही आहे
ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो
क)येथे संसदीय पद्धती आहे
ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते
1.अ फक्त
2.अ व ब
3.ब फक्त✅
4.क व ड 

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.
1.२१
2.२२
३.२३✅
4.२४

8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते
2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते
3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते
4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅

9.भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे?
अ)बिहार
ब)कर्नाटक
क)तेलंगणा
ड)मध्यप्रदेश
1.अ, ब, क✅
2.अ, ब, ड
3.ब, क, ड
4.अ, क, ड

10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा.
अ)हरियाणा
ब)मेघालय
क)तेलंगणा
ड)झारखंड
इ)गुजरात
1.इ, अ, ब, ड, क✅
2.अ, इ, ब, ड, क
3.ब, अ, इ, ड, क
4.इ, ब, अ, ड, क


1. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत?
अ)सामाजिक अन्यायापासून दुरबल घटकांचे संरक्षण करणे
ब)व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्तेक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे
क)सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे
ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे
1.अ, ब
2.क, ड
3.अ, ब, क
4.ब, ड✅

2. भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्या बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ)सर्वनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे
ब)सारनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अमलात आणता येतात
क)सारनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो
1.अ✅
2.क
3.ब, क
4.अ, ब, क

3. अनुच्छेद 12 नुसार 'राज्य' मध्ये याचा समावेश होतो.
अ)भारताचे शासन व संसद
ब)प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळा
क)सर्व स्थानिक संस्था(नगरपालिका, जिल्हा बोर्ड)
ड)भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
1.अ, ब, ड
2.अ, ब, क
3.अ, ब
4. वरील सर्व✅

4. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेशन रीट याचिका दाखल करता येत नाही.
1.जेथे अधिकारक्षेत्र वापरण्यात चूक/गफलत झाली असेल
2.जेथे कायद्याची चूक/गल्लत झाली असेल
3.जेथे प्रथमदर्शनी तथ्यांची चूक/गल्लत झाली असेल✅
4.जेथे नैसर्गिक न्यायत्वाचा भंग झाला असेल

5. 'शुन्य प्रहर' बाबत खलील विधाने विचारात घ्या.
अ)प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो
ब)त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे
क)सांसदीय कार्यप्रणालीतील भारतातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे
ड)कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात
1.अ, ब, क
2.अ, क, ड✅
3.ब, क, ड
4.अ, ब, ड

6. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारणी विभागाचे अंग आहेत?
अ)राष्ट्रपती
ब)मंत्रिमंडळ
क)महन्यायवादी
ड)भारताचा नियंत्रक व महालेखपरिक्षक
1.अ, ब, ड
2.ब, क, ड
3.अ, ब, क✅
4.अ, क, ड

7. खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पद्ग्रहन करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते?
अ)राष्ट्रपती
ब)उपराष्ट्रपती
क)पंतप्रधान
ड)लोकसभा सभापती
1.अ फक्त✅
2.अ, ब
3.अ, ब, क
4.अ, ब, क, ड

8. भारताचे स्वतंत्र आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात.
अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत
ब)घटकराज्याना अधिक अधिकार दिले आहेत
क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत
ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत
1.अ फक्त✅
2.ब फक्त
3.ब, क
4.क, ड

9. सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खलील मुद्द्याद्वारे अधोरेखित होते.
अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार
ब)न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गाची भरती व नियुक्ती
क)कार्यकाळाची सुरक्षितता
ड)न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती संबंधि संविधानिक तरतुदी
1.अ, ब, क
2.ब, क, ड
3.अ, ब, ड
4.वरील सर्व✅

10. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वतंत्रेशी संबंधित आहे?
अ)न्यायधीशाची नियुक्ती व पदच्युती
ब)कार्यकाळाची सुरक्षा
क)वेतन व सेवा शर्ती
ड)न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार 
1.अ, ब, क
2.अ, ब, ड
3.ब, क, ड
4.वरील सर्व✅

१) कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६८ नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले?
१) केशवानंद भारती ✅  २) गोलकनाथ    ३) सज्जन सिंग    ४) शंकरी प्रसाद

२) भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
१) देशाचे संरक्षण करणे    २) नियमित कर भरणे  ✅  ३) सहा ते १४ वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांस शिक्षणाच्या संधी देणे   ४) वरील एकही पर्याय योग्य नाही.

३) कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
१) गोलकनाथ खटला  २) मिनर्व्हा मिल्स खटला  ३) केशवानंद भारती खटला ✅ ४) शकरी प्रसाद खटला

४) नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र __ लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
१) सुखशांती   २) एकरुप नागरी संहिता  ✅ ३) एकरुप ज्ञान संहिता    ४) विविध भाषा संहिता

५) "भारताची ____, एकता व _ उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे" हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
१) अस्मिता, एकात्मिकता २) सार्वभौमता, एकात्मता ३) सुरक्षा, एकात्मता ✅४) सार्वभौमता, विविधता

६) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.
२) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.
३) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करण्याऱ्या राष्ट्राला मदत केली असेल.
४) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.✅

७) "राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील" हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
१) ६९     २) ४२  ✅   ३) ४४     ४) ४८ 

८) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी १९ मे १९२८ रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
१) सचिदानंद सिन्हा    २) डॉ. राजेंद्र प्रसाद   ३) प. मोतीलाल नेहरू✅   ४) प. जवाहरलाल नेहरू

९) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१) १७९३ चा सनदी कायदा    २) १८१३ चा सनदी कायदा    ✅
३) १७७३ चा नियमनाचा कायदा    ४) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा

१०) भारताच्या संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये किती आहेत?
१) ११✅    २) १२        ३) १०     ४) 1

१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅
४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१) बिहार    २) किंद्रीय प्रांत ✅   ३) बॉम्बे    ४) पंजाब

३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा
१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व✅

४) योग्य क्रम निवडा
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे

५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये ✅   ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे

६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?
१) २१  ✅   २) २२     ३) २३     ४) २४

७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?
समिती     -     अध्यक्ष
१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद      
२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी
३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी
४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅

८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?
१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४✅

९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू

१०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?
१)प्रौढ मताधिकार
२)साम्राज्य अंतर्गत शासन✅
३)सापेक्ष स्वायत्तता
४)प्रांतीय स्वायत्तता

१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती ✅
ब) वांछू व गोस्वामी समिती 
क) तारकुंडे समिती 
ड) गोपालकृष्णन समिती 


२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे✅
ब) सहा वर्षे 
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे

३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅


४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग✅


५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य✅
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?
१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
२.भारतीय राज्यघटना✅
३.माहिती व प्रसारण मंत्रालय
४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया

7) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?
१.२/३
२.१/४
३.१/३✅
४.३/४

8.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
१. नियोजन मंत्री
२.वित्तमंत्री
३.पंतप्रधान✅
४.राष्ट्रपती

9. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?
१.राष्ट्रीय विकास परिषद
२.आंतरराज्य परिषद
३.नियोजन आयोग
४.वित्त आयोग✅

10. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?
१.जवाहरलाल नेहरू
२.सरदार पटेल✅
३.महात्मा गांधी
४.मोतीलाल नेहरू

1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322
२.324
३.326✅
४.329


2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?
१. संसद✅
२.राज्याचे राज्यपाल
३.राष्ट्रपती
४. सर्वोच्च न्यायालय


3.खालील विधानांचा विचार करा.
अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.
ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.
क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.
ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.
१.अ,ब,क,ड
२.अ,ब,ड✅
३.अ,क,ड
४.ब,क,ड

4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?
१.फ्रेंच राज्यक्रांती 1789
२.रशियन राज्यक्रांती 1917✅
३.जर्मनी (वायमर संविधान)
४.जपान संविधान

5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅
२.जी. वी. माळवणकर
३.जगदीश चंद्र बसु
४.आर. के. नारायण

6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?
१.कलम 11✅
२.कलम 10
३.कलम 9
४.कलम 8

7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
१.12 महिने
२.3 वर्ष
३.5 वर्ष✅
४.7 वर्ष

8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
१.राष्ट्रपती
२.पंतप्रधान
३.सर्वोच्च न्यायालय
४.संसद✅

9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
१.केंद्रीय मंत्रिमंडळ
२.संसद✅
३.राज्य विधिमंडळ
४.संसद आणि राज्य विधिमंडळ

10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.
पर्याय
१.अ,ब,क,ड✅
२.अ,ब,क
३.ब,क,ड
४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51

2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल

3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅
४.परिशिष्ट-4

6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅
२.48
३.52
४.यापैकी नाही


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅
४.विधानपरिषद

10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी 
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए 
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅


1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार 
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल 
४. लोकायुक्त

4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो 
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे 
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21 
२. कलम 23 
३. कलम 24 ✅
४. कलम 28

9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370 
४. कलम 360

10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र 
२. राजस्थान 
३. जम्मू कश्मीर 
४. आंध्र प्रदेश✅

1. ओबीसींना खासगी संस्थांमध्ये आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आले?
१. 92 वी घटनादुरुस्ती 
२. 93 वी घटनादुरुस्ती✅
३. 94 घटनादुरुस्ती 
४. 95 वी घटनादुरुस्ती

2. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषवलेल्या मुख्यमंत्री कोण?
१. सुधाकरराव नाईक 
२. शरद पवार 
३. वसंतराव नाईक ✅
४. विलासराव देशमुख

3. महाभारतातील ग्रामव्यवस्थेचा ग्रामप्रमुख कोणत्या नावाने ओळखले जात असे?
१. ग्रामीणी
२. गावण्डा 
३. ग्रामीक ✅
४. ग्राममुकुटा 

4. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१. लॉर्ड मेयो 
२. लॉर्ड रिपन 
३. हॉब हाऊस ✅
४. लोर्ड कॉर्नवॉलीस

5. ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमांना दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली?
१. पंचायत समिती ✅
२. जिल्हा परिषद 
३. तहसीलदार 
४. जिल्हाधिकारी

6. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?
१. बोंगीरवार 
२.पी बी पाटील 
३. काटजू 
४. वसंतराव नाईक✅

7. सरपंचाचे ऐकून जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असल्याची शिफारस बीबी पाटील समितीची होती?
१. 33%
२. २७%
३. २५%✅
४. ५०% 

8. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठविते?
१. पंचायत समिती
२. राज्य शासन
३. जिल्हा परिषदेची स्थायी समिती ✅
४. मुख्य कार्यकारी अधिकारी

9. सार्वजनिक निवडणुकांनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
१. तहसीलदार
२. गटविकास अधिकारी
३. उपजिल्हाधिकारी 
४. सरपंच✅

10. सरपंच अनुपस्थित असल्यास ग्राम सभेची बैठक बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
१. ग्रामसेवक
२. उपसरपंच✅
३. तहसीलदार 
४.जिल्हाधिकारी

1. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे कारण...
१. भारत हा समाजवादी देश आहे 
२. भरतात असंख्य धर्म आहेत
३. भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक आहे✅
४. भारतात धर्माला महत्त्व दिले जात नाही

2. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
१. सामान्य व मोफत कायदेशीर मदत 
२. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन 
३. ऐतिहासिक वस्तूंचे जतन
४. समान नागरी कायदा 
अ. फक्त ४
ब. १, २, ३
क. २, ३, ४
ड. १, २, ३, ४✅

3. जनमत हा कोणत्या प्रकारच्या  शासन व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे?
१. अप्रत्यक्ष लोकशाही 
२. नियंत्रित लोकशाही 
३. आनियंत्रित लोकशाही
४. प्रत्यक्ष लोकशाही✅

4. राष्ट्रध्वजातील अशोकचक्रा मध्ये किती आले आहेत?
१. 22 
२. 23 
३. 21 
४. 24✅

5. 'समाजवादी' आणि
 'धर्मनिरपेक्ष' हे दोन शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेच्या प्रास्ताविकात समाविष्ट करण्यात आले?
१. 41व्या 
२. 42 व्या✅
३.44 व्या
४. 46 व्या

6. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
१. सिमला परिषद 
२. कॅबिनेट मिशन ✅
३. क्रिप्स योजना 
४. ऑगस्ट प्रस्ताव

7. भारत हे गणराज्य आहे कारण..
१. देशाचा प्रमुख जनतेने निवडून दिला आहे ✅
२. भारत लोकशाही राष्ट्र आहे
३. अंतिम सत्ता लोकांच्या हाती आहे 
४. भारत राजेशाहीचा विरोध करतो

8. स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
१. रशियन राज्यक्रांती 
२. आयरिश राज्यक्रांती
३. अमेरिकेची राज्यक्रांती
४. फ्रान्सची राज्यक्रांती✅

9. घटनेच्या सरनाम्यातुन  खालील पैकी काय दिसून येते?
१. साध्य करावयाचे आदर्श
२. शासन व्यवस्था 
३. सत्तेचा स्त्रोत
अ. फक्त १
ब. फक्त २
क. १, २
ड. १, २, ३✅

10. घटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?
१. राज्यघटनेचा सरनामा✅
२.मार्गदर्शक तत्त्वे 
३. मूलभूत कर्तव्य
4. आणीबाणीच्या तरतुदी

1. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे?
१. जापान ची घटना 
२. आयरिश घटना
३. ऑस्ट्रेलियाची घटना 
४. वायमार प्रजासत्ताक ची घटना✅

2. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाही?
१. के एम मुंशी 
२. एन माधवराव 
३. टी टी कृष्णमाचारी 
४. जे बी कृपलानी✅

3. खाली दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा.
१. संविधान सभेत एकूण 379 सदस्य होते
२. संविधान सभेच्या निर्मितीची रचना ऑगस्ट ऑफर मध्ये करण्यात आली 
३. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये दहा जागा अपक्षांना मिळाल्या 
४. 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले✅

4. खालील विधानांचा विचार करा..
अ) भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही 
ब) सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही
१. फक्त अ बरोबर
२. फक्त ब बरोबर
३. दोन्ही चूक
४. दोन्ही बरोबर✅

5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आली.
ब) संस्थानिकांना मिळालेल्या 93 जागा भरू शकल्या नाहीत कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला.
१. फक्त अ बरोबर
२. फक्त ब बरोबर✅
३. दोन्ही चूक
४. दोन्ही बरोबर

6. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले?
१. 41
२. 43
३. 44
४. यापैकी नाही✅

7. घटनेच्या संघ राज्य शासन व्यवस्थेवर विविध तज्ञांची मते खाली दिलेली आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
१. अर्ध संघराजीय - के सी व्हेयर
२. सहकारी संघराज्य - ग्रेन विल ऑस्टिन 
३. वाटाघाटीचे संघराज्य - मॉरीस जोन्स 
४. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य - एच सी मुखर्जी✅

8. 42 वी घटनादुरुस्ती किती सली संमत करण्यात आली?
१. 1974
२. 1975
३. 1976 ✅
४. 1977 

9. घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?
1. साध्य करावयाचे आदर्श
2. शासन व्यवस्था 
3. सत्तेचा स्त्रोत
१. फक्त 1
२. फक्त 2
३. 1, 2
४. 1, 2, 3✅

10. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?
१. राज्यघटनेचा सरनामा✅
२. मार्गदर्शक तत्त्वे 
३. मूलभूत कर्तव्य
४. आणीबाणीच्या तरतुदी


Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...