Saturday 31 October 2020

बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. मूळचे भारतीय असलेल्या वैवेल रामकलावन यांची  सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली  आहे.


🔰माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


🔰ववेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. जिथे ते साधारणपणे दोन वर्षां अगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही असे म्हटले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.


🔰शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. सर्व ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याचे ते अभिमाने सांगतात. खरंतर या गावाची परिस्थिती फारशी चांगली नाही, गाव अत्यंत मागासलेलं देखील आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास १३५ वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक


🔰अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे.


🔰तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.


🔰टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नव्या कंपनीला तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाकडून 500 एकर जागा देण्यात आली फॉक्सकॉन यापूर्वीपासून भारतात आयफोन 11 सहित अन्य मोबाईल फोन्सची निर्मिती करत आहे.


🔰टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेडद्वारे (TEAL) या प्रकल्पाला तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे.

या प्रकल्पात ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे.तसंच यापैकी 90 टक्के महिला कर्मचारी असतील अशीही माहिती समोर आली आहे.

'माहीत आहे का तुम्हांला ?


◾️ राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते.


◾️ तयांनी अठराव्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच ठिकाणी जंतर-मंतर (खगोलीय वेधशाळा) बांधले. 


◾️आज मथुरा येथील जंतर-मंतर अस्तित्वात नाही परंतु उर्वरित चारही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. 


◾️आजही जंतर-मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. 


◾️जतर-मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखविणारे घड्याळ नव्हे तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून खगोलांच्या निरीक्षणाची सोयही उत्तम आहे.


◾️जतर-मंतर मधील यंत्रांच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. 


◾️अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे 'सांस्कृतिक वारसा' म्हणूनच महत्त्वाची ठरली आहेत.


प्रश्न मंजुषा

(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?

तात्या टोपे

मंगल पांडे✅✅✅

नानासाहेब पेशवे

बहादुरशहा जफर2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

उत्तरांखंड 

उत्तर प्रदेश

पंजाब

बिहार✅✅✅ 
3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?

पाचवा

सहावा✅✅✅

सातवा

आठवा
4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?

5+3+3+4✅✅✅

5+10+12

5+8+4

5+4+3+2
5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?

नादौन पोलीस ठाणे✅✅✅

नानखारी पोलीस ठाणे

रामपूर पोलीस ठाणे

नेरवा पोलीस ठाणे


१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅
२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?


१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 
३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 
५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 
६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 
७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅
८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅
९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅
१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा
१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅

सातवाहन राजा1) सीमुक (100-70 ईसा पूर्व)


2) कान्हा (70-60 ईसा पूर्व)


3) सातकर्नी (212 - 195 ईसा पूर्व)


4) शिवस्वति (पहली शताब्दी ईसवी)


5) गौतमीपुत्र सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


6) वशिष्ठिपुत्र पुलूमवी (दूसरी शताब्दी ईसवी)


7) वशिष्ठिपुत्र सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


8) शिवस्कंद सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


9) यज्ञश्री शातकर्णी (दूसरी शताब्दी ईसवी)


10) विजय (दूसरी शताब्दी ईसवी)


सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन


🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे.


🔰अप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते.


🔰त मॉडेल वॉट्सअप, टेलिग्राम, संवाद (SAMVAD) आणि GIMS या सारख्या व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अप्लिकेशन सारखे असुन ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग पद्धतीचा अवलंब करते.


🔰सवेच्या काळात सुरक्षित मेसेजिंग पद्धत सुलभ करण्यासाठी संपूर्ण भुदलात SAI अॅपचा वापर केला जाणार आहे.


🔴भारतीय भुदलाविषयी...


🔰भारतीय लष्कराचा पायदळ विभाग म्हणजेच भारतीय भुदल हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. दलाची स्थापना 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली.


🔰दलाची संरचना: तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती हेच असतात. भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) व त्याखाली उप (व्हॉइस) भूसेनाध्यक्षांचे स्थान असते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशाचे सात कक्ष (कमांड) पाडले असून त्या प्रत्येकावर लेफ्टनन्ट जनरलच्या हुद्याचा अधिकारी प्रमुख (आर्मी कमांडर) असतो.


🔰भदलाची जबाबदारी: भारताच्या भूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, देशात कायदा व सुरक्षा राखण्याकरीता सरकारला मदत करणे व आपत्काली नागरिकांना साहाय्य करणे

पडिता रमाबाई★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.


★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)


★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.


★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.


★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.


★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.


★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.


 ★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,

 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.


★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष


★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.


★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.


★ आत्मचरित्र - माझी साक्ष


★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.


★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.


🎯 पडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था


१) आर्य महिला समाज


२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी


३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी


४) बातमी सदन 👉 अधांसाठी


५) प्रीतिसदन 👉 वद्ध,अशक्त,अपंगांसाठी


 ६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी


★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.

____________________________


🎯 सवासदन :-


★ स्थापना-1908 (मुंबई)


★ संस्थापक - रमाबाई रानडे,


👉 बहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने


★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग


✍️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:


✍️बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.


✍️बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.


✍️बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.


✍️परत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.


✍️बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे.


✍️परत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे.


✍️कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तातंरण, अपहरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानि होता कामा नये.


✍️बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा.


✍️बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करू नये, अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हीतासाठी साठी आवश्यक असते.


✍️कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क असतो.


✍️बालकांची काळजी घेणे किंवा संरक्षण करणे यासाठी जबाबदार संस्था, सेवा आणि सुविधांनी संस्थापित मानाकंनाना धरून राहण्याची निश्चिती करावी.


✍️मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबंत्वाचा पुरस्कार आणि समाजामध्ये सक्रिय सहभागाने आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता यावा आणि चांगले जीवन जगता यावे.


💕आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत.


✍️मलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये.


✍️बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षण आहे.


✍️परत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे.


✍️कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मूकायला लागता कामा नये.


✍️कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानि भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत.


✍️सन्य हमल्या बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.


✍️आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.


✍️कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप, त्याच्या/तिच्या घरावर किंवा त्याच्या/तिच्या सन्मान आणि नावलौकीकावर आघात होता कामा नये.

ग्राम विकास व पंचायतराज विभागपंचायत महिला शक्ती अभियान


पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांनी सन 2007 पासून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरु केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना महिला प्रतिनिधींना येणा-या अडीअडचणी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यप्रणाली याबाबत महिला लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभियान महत्वाचे आहे.


पंचायत महिला शक्ती अभियानचे कार्य :


कोअर कमिटीची स्थापनाराज्यस्तरीय संमेलनाचे आयोजनविभागीय संम्मेलनाचे आयोजनराज्य आधार केंद्राची स्थापनालोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ स्थापन करणे.


पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य सहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियांनांतर्गत विभाग निहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.


पंचायत महिला शक्ती अभियांनातर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्हयातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा 33 जिल्हयातून प्रत्येकी 3 अशा 99 सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या 99 सदस्यांतून 18 प्रतिनधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते. अशा प्रकारचा लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ देशात प्रथम महाराष्ट्र राज्याने स्थापित केला आहे.


लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या संघाची जबाबदारी :


लैंगिक अन्याय, बालकांचे शोषण, अस्पृश्यता संबंधित विषयाबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे.याबाबतचे ठराव घेऊन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणे.महिला सबलीकरणासाठी कृती आराखडा सादर करणे.चार्टर ऑफ डिमांडमध्ये मान्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करणे.


या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्हयात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्हयातील 3 महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या 5 जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर 2 महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.


संघाच्या कार्यकारीणीची मुदत 2 वर्षांची आहे. संघाच्या कार्यकारीणीची दर तिमाही बैठक बोलाविणे आणि त्या बैठकांचे समन्वय करणे यासाठी समन्वयक म्हणून यशदा, पुणे येथे पंचायत महिला शक्ती अभियान हाताळणारे सहयोगी प्राध्यापक हे कामकाज पाहतात. कार्यकारीणीची बैठक दर 3 महिन्यातून घेणे तसेच संघातील सर्व महिला लोकप्रतिनिधींची परिषद वर्षातून एकदा घेणे ही समन्वयक यांची जबाबदारी आहे.

चालू घडामोडी

 प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...