Thursday 20 January 2022

राज्यसेवा पूर्व साठी चालु घडामोडी चा अभ्यास करताना खालील गोष्टी नक्की ध्यानात असू द्या..

👉 Year book वाचायची सुरुवात डायरेक्ट पुरस्कार पासून करा ( 1 ते 2  मार्क्स कव्हर होतील) ( जास्त फोफट पसारा न वाचता selected पुरस्कार करा ).
मराठी भाषे संदर्भातील पुरस्कार चांगले करा ( Ex. मागच्या वेळेच्या नाळ चित्रपट वरील प्रश्न )

👉 दुसऱ्या नंबर ला तुम्ही पर्यावरणीय घडामोडी (Selected) ठेऊ शकता ( यात प्रत्येक गोष्ट वाचणे expected नाहीये ज्या गोष्टी जास्त चर्चेत होत्या फक्त त्याच करा ex. मागच्या वर्षी अमेझॉन जंगलात लागलेली आग) .

👉 तिसऱ्या क्रमांकावर राजकीय घडामोडी घ्या ( इथे सुद्धा खूप specific वाचा जास्त डीप प्रश्न विचारत नाही महत्त्वाचं तेवढं विचारलं जात ) ( ex. राज्यांच्या निवडणुकांचे रिपोर्ट सहसा paper मध्ये विचारले जात नाही, किंवा काही विधेयके/कायदे विचारले जात नाहीत) यामध्ये जे सर्वाधिक चर्चेत होते तेच वाचा.

👉 चौथ्या क्रमांकावर तुम्ही अंतरराष्ट्रीय घडामोडी ठेवू शकता ( हे वाचताना भारताचा ज्या ज्या ठिकाणी संबंध आहे ते चांगल करा Ex. मागच्या वेळी चाबहर बंदर विचारले)

👉 5 व्य क्रमांकावर आर्थिक घडामोडी ( यात HDI, GHI हे दोनच इंडेक्स महत्त्वाचे आहेत तेवढे जास्त चांगले करा बाकी आवश्यकता नाही )
महत्त्वाच्या परिषदा ( ब्रिक्स/ SCO / UNFCCC )

👉 6 व्या क्रमांकावर काही लेखकांचे पुस्तके / संमेलने यासंदर्भात माहिती घ्या ( मराठी साहित्य संमेलन )

👉 काही महाराष्ट्र संदर्भात असलेल्या घडामोडी चांगल्या करा ( ex. मागच्या वेळी आरे वसाहत विचारले )

या क्रमाने का करायचे..... ?
CURRENT वाचत असताना ते जर पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेटपर्यंत वाचत जातो म्हटल्यास ते जास्त रटाळवाने वाटते.
आणि यामध्ये ज्या महत्त्वाचा गोष्टी असतात त्या जास्त Highlite होत नाहीत.
म्हणून आधी महत्त्वाचे नंतर बाकीचे...

MPSC राज्यसेवा पुर्व मधील Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?

राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.

🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.

❇️ गरिबी व बेरोजगारी -

यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.

❇️ लोकसंख्या-

यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.

❇️ 3.शाश्वत विकास -

या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.

❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -

यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या  लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.

❇️ 5. समावेशन -

यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना  चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.

❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -

यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.

🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.

एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.

परीक्षेसाठी सर्वाना All the Best.💐💐

राज्यसेवा पूर्व CSAT

⭕ कोणते टॉपिक आत्ता शेवटच्या दिवसात REVISION करावेत.
तसेच पहिला पेपर झाल्या नंतर मध्ये जो वेळ भेटेल त्या मध्ये कोणते टॉपिक अवश्य वाचून घ्यावे.

☀️ Reasoning :-
     १. वर्गीकरण/ कोडे
     २. नातेसंबंध
     ३. Syllogism
     ४. खरे - खोटे
     ५. विधान - अनुमान/ निष्कर्ष/गृहितक
     ६. आकृतीमालिका
     ७. बैठक वयवस्था
     ८. दिशाज्ञान

☀️☀️ Math
       १. समीकरणे ( एक/द्वी चल)
       २. काळ, काम, वेग
       ३. भूमिती ( वर्तुळ, चौकोन, आयात)
       ४. वयवारी
       ५. Permutation and combination
       ६. सभाव्यता

इतका Target असू द्या.

23 तारखेच्या राज्यसेवा पुर्व मध्ये Attempt किती असावा🤔?

सध्याचा सर्वात  Hot Topic म्हणजे Attempt किती असावा? यावर माझं वयक्तिक मत मी सांगत आहे. यामध्ये मतमतांतर असू शकतात पण काही बाबी सांगाव्या वाटतात त्या खालीलप्रमाणे :

1. Attempt  हा व्यक्तीपरत्वे वेगळा असू शकतो. शेवटी तुमच्या attempt ची link तुमच्या अभ्यासापर्यंत जाते.
                     
2. एखादा 100 Attempt करून gs ला 120+ marks घेऊ शकतो तर दुसरा 75-80  Attempt करून सुद्धा 120+ Marks घेऊ शकतो. सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या Accuracy चा आहे. ती जर मध्यम स्वरूपाची असेल तर तुम्ही जास्त attempt करायला पाहिजे. Accuracy जर खूपच चांगली असेल तर कमी Attempt मध्ये सुद्धा तुम्ही चांगले Marks मिळवू शकता. आता एवढे Paper Solve केल्यावर तुम्हाला तुमचा अंदाज आलाच असेल. मी पहिल्या Category मध्ये येतो.
  
3. आणखी एक मुद्दा म्हणजे Paper च्या Difficulty Level चा. जर paper जास्त Tough वाटत असेल तर Attempt थोडा कमी झाला तरी चालेल. पण थोडा Easy - Moderate Paper ला मात्र Attempt खूप कमी असून चालणार नाही.Paper Easy का Tough हे प्रश्न समोर आल्यानंतर लगेच लक्षात येऊन जाते. त्यानुसार आपल्याला आपला Attempt  कमी - जास्त हे ठरवता यायला पाहिजे. एक Optimum Risk घेतली तर फायदाच होईल. कारण 50-50 वर आलेले Questions Skip करून / काही Logic लागत असूनही भीतीपोटी प्रश्न सोडून देऊन हाती काही लागत नाही.

4. जे लोक वरती सांगितलेल्या पहिल्या Category मध्ये येतात त्यांनी gs मध्ये Min 85-90 Attempt करायला हवा. आणि CSAT मध्ये 65-70..कारण Accuracy खूपच चांगली नसल्यामुळे Attempt थोडा High ठेवावा लागणार आहे. बाकी आणखी कितीपर्यंत न्यायचा हे तुम्ही वयक्तिक ठरवू शकता. 

5.शेवटी Attempt ही गोष्ट एका Limit नंतर जास्त मॅटर करत नाही. तुमचा अभ्यास, Revision, Exam Hall मधील तुमची Psychology, Temperament etc. या गोष्टीच जास्त परिणाम करतात.

6. So Attempt चा निर्णय तुम्ही वरील Criteria's लावून घेऊ शकता.आणि आपल्यासाठी काय Best आहे हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही ओळखू शकत नाही. So choose Your Best👍👍.

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

🦚भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाने २०२२ हे कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याची घोषणा बुधवारी केली आहे.

🦚मार्च २०१९मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर ३५ वर्षीय सानियाने पुनरागमन केले. मात्र करोनाच्या साथीमुळे तिच्या वाटचालीवर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली. महिला एकेरीतही सानियाने जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली होती. परंतु मनगटाच्या दुखापतीमुळे सानियाने एकेरीऐवजी दुहेरीकडे लक्ष केंद्रीत केले आणि तिला अनपेक्षित यश मिळाले.

🦚‘‘मला वाटले आता खेळू नये, म्हणून निवृत्तीच्या निर्णयापर्यंत आलेले नाही. अनेक कारणे याला जबाबदार आहेत. मला दुखापतीतून सावरायलाही बराच वेळ लागत आहे. माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. त्याला सोबत घेऊन स्पर्धेसाठीचा प्रवास करणे हा जोखमीचा आहे. जे मला अधिक महत्त्वाचे वाटते,’’ असे सानियाने सांगितले.

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

चालू घडामोडी 2020-21


Q  : ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मध्ये भारताने कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे?

(अ) 74 वा

(ब) 94 वा✔️✔️

(क) 80 वा

(ड) 70 वा

Q : आंतरराष्ट्रीय गरीबी उन्मूलन दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 15 ऑक्टोबर

(ब) 14 ऑक्टोबर

(क) 18 ऑक्टोबर

(ड) 17 ऑक्टोबर✔️✔️

Q : कोणत्या देशातील वेगवान गोलंदाज उमर गुलने 16 ऑक्टोबर 2020 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली?

(अ) पाकिस्तान✔️✔️

(ब) अफगाणिस्तान

(क) दक्षिण आफ्रिका

(ड) ऑस्ट्रेलिया

Q  : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची कितवी जयंती 15 ऑक्टोबर 2021 रोजी साजरी केली गेली?

(अ) 80 वी

(ब) 90 वी✔️✔️

(क) 99 वी

(ड) 78 वी

Q : ऑक्टोबर 2020 मध्ये 'थॅलेसीमिया बाल सेवा योजने'चा कोणता टप्पा सुरू केला आहे ?

(अ) 3 रा

(ब) 1 ला

(क) 5 वा

(ड) 2 रा✔️✔️

Q : आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 12 ऑक्टोबर

(ब) 14 ऑक्टोबर

(क) 13 ऑक्टोबर

(ड) 15 ऑक्टोबर✔️✔️

Q  : काला घोडा कला महोत्सव (The Kala Ghoda Arts Festival ) खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे?

(अ) दिल्ली

(ब) मुंबई✔️✔️

(क) हरियाणा

(ड) केरळ

Q : कोणती भारतीय अकॅडमी नृत्य, नाटक आणि संगीत या कलांना प्रोत्साहित करत असते?

(अ) साहित्य अकादमी

(ब) ललित कला अकादमी

(क) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा

(ड) संगीत अकादमी✔️✔️

Q  : हनुख, प्रकाशाचा उत्सव( Hanukkh, the festival of light) खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

(अ) ज्यू✔️✔️

(ब) हिंदू

(क) ख्रिस्ती

(ड) जैन

Q  : पुंगी( Pungi) हा राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे?

(अ) पंजाब

(ब) हिमाचल प्रदेश✔️✔️

(क) हरियाणा

(ड) दिल्ली

Q : कोणत्या वर्षी प्रथम राष्ट्रगीत गायले गेले?

(अ) 1920

(ब) 1906

(क) 1915

(ड) 1911 ✔️✔️

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते?
(अ) सॅफ्रनिन
(ब) आयोडीन ✅
(क) इसॉसिन 
(ड) मिथेलिन ब्लू

Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?
(अ) स्थूलकोन
(ब) मूल ऊती
(क) दृढकोण ऊती ✅
(ड) वायू ऊती

Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे
(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते
(क) प्रचलन न करणारे
(ड) वरील सर्व बरोबर  ✅

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) गांडूळ 
(ब) लीच (जळू)
(क) नेरीस
(ड) वरील सर्व ✅

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा:
(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
(अ) मोलुस्का
(ब) आर्थोपोडा ✅
(क) एकायनोडर्माटा
(ड) सीलेंटेराटा

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) तारामासा
(ब) सी- ककुंबर
(क) सी-अर्चिन
(ड) ऑफिऑथ्रिक्स
(इ) वरील सर्व ✅

Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे?
(अ) लोहखनिज
(ब) मॅंगनीज
(क) कोळसा ✅
(ड) यापैकी नाही

Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो?
(अ) लोह
(ब) मॅंगनीज
(क) तांबे
(ड) अँल्युमिनियम ✅

Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
(अ) लोहखनिज ✅
(ब) मॅंगनीज
(क) तांबे
(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो?
(अ) सिलिका 
(ब) मॅंगनीज
(क) लोहखनिज ✅
(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो?
(अ) मॅंगनीज 
(ब) लोहखनिज✅
(क) सिलिका
(ड) बॉक्साईट

उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते.

MPSC PRELIMS-2021

⭕️CSAT:

1-Comprehension(उतारे):
-एकूण 10 Passage पैकी एखादा Passage अवघड असतो, जो त्या दोन तासात आपल्याला जमत नाही. हा Passage प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असू शकतो.तो Passage शक्यतो सर्वात शेवटी सोडवणे.(Skip केला तरी हरकत नाही.)
-हा अवघड Passage त्या 2 तासात आपली mentality खराब करू शकतो.
-राहिलेले 8-9 Passage पैकी 35-40 प्रश्न बरोबर यायला पाहिजे.
-Passage मध्ये Minimum 90 मार्क्स मिळाल्यास CSAT चा Score वाढतो.
-उतारे सलग सोडवण्यापेक्षा ज्या विषयात आपल्याला Comfortableness आहे अश्या टॉपिक वरती आलेले उतारे अगोदर सोडवल्यास Confidence वाढतो आणि अवघड उतारे पण बरोबर येतात.
(अवघड अगोदर घेतल्यास वेळेअभावी Easy miss होऊ शकतो.)

2-Maths and Reasoning:
-हा Part शक्यतो 2 Round मध्ये सोडवल्यास नक्की फायदा होतो.
-Round 1-आपण Practice केल्यानंतर आपली command असलेले Topics.
(Command असलेले Topics म्हणजे जे Question आपल्याला 45-60 सेकंद मध्ये सुटणे.)
-Round 2 हा सगळ्यात शेवटी घ्यावा, Else in between आपण एखाद्या Question वरती खूप time घालवतो.
-Rule Of 30 Seconds:
Complete Question 30 Second मध्ये Comprehend झाला तरच तो सोडवणे else तो प्रश्न शेवटी सोडवणे.
-5-7 Question हे Home Work चे असतात.
-15-20 प्रश्न Net बरोबर येऊ शकतात.
-40+ मार्क्स आपला टार्गेट या part साठी असावं.

3-Decision Making:
-कमीत कमी वेळात Keywords च्या माध्यमातून प्रश्न सोडवणे.
-5-8 मिनिट पेक्षा जास्त वेळ या part वरती दिल्यास 10+ मार्क्स येतात आणि 15 मिनिट देऊन पण तेवढेच मार्क्स येतात.

👉65+ Attempt(80 Question त्या दोन तासात read झाले पाहिजे म्हणजे Easy Question miss होणार नाहीत.)आणि 140-160 मार्क्स CSAT मध्ये मिळाल्यास नक्कीच Prelims Clear होण्याचे Chances वाढतात.

👉आयोगाचे 2020-17 पेपर आणि 2016-13 मधील Maths and Reasoning चे Question यावरून तुम्हाला Exact Idea येऊ शकते.

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात 🔸🔸
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली 🔸🔸
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान 🔸🔸
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 🔸🔸
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व 🔸🔸

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर 🔸🔸
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे 🔸🔸
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर 🔸🔸
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 🔸🔸
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी 🔸🔸
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश 🔸🔸
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम 🔸🔸
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता 🔸🔸
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद 🔸🔸
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा 🔸🔸

  🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे

◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना


प्रस्तावना

योजनेची वैशिष्ट्ये

योजनेतील घटक

आहाराचे स्वरूप

अंमलबजावणी यंत्रणा

प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

✅योजनेची वैशिष्ट्ये✅

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

🎯योजनेतील घटक🎯

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

✅आहाराचे स्वरूप✅

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

♻️अंमलबजावणी यंत्रणा♻️

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

♻️ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...