Saturday 29 June 2024

IAS, IPS होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, सरकार देणार मोफत प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपल्या राज्यात शेकडो विद्यार्थी आहेत, जे आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करतात. पण काही विद्यार्थ्यांना यात यश येते तर बहुसंख विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागते.



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने स्पर्धा परीक्षेसची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून दिली आहे. बार्टीतर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती यासाठी मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी बार्टीतर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत. 3 जुलै 2024 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.



कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार प्रशिक्षण


बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, (आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील.   



स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील बार्टीमार्फत सन 2024-25 करिता वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत.



अर्ज करण्यासाठी काय पात्रता हवी? 

 

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे गरजेचे आहे. 


>>> उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा

 

>>> उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असणे गरजेचे आहे. 



>>> उमेदवाराचे वय वरील परीक्षांच्या अटी व शर्तीनुसार असावे. 



>>> आर्थिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असणाऱ्या उमेदवारालाच त्यासाठी अर्ज करता येणार आहे. 



>>> अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उणेदवाराकडे महाराष्ट्र शासानाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 



>>> उमेदवार दिव्यांग असल्यास 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणापत्राची साक्षांकित प्रत सदार करावी. 



या पूर्व प्रशिक्षणासाठी आरक्षण खालीलप्रमाणे असेल


>>> महिलांसाठी 30 टक्के आरक्षण असेल. 



>>> दिव्यांगांसाठी 5 टक्के आरक्षण असेल. 



>>> वंचित 5 टक्के आरक्षण असेल. (वाल्मिकी व तत्सम जाती-लोहार, बेरड, मातंग, मांग, मागदी इत्यादीसाठी) 



निवडीचा निकष काय असेल? 


या प्रशिक्षणासाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. 



इच्छुक उमेदवारांनी http://trtipune.in/bartregmay24/ लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 3 जुलै 2024 आहे.





Today 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांची पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती

◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील

❇️ पंतप्रधान मोदी उद्या मन की बात मध्ये आपले विचार मांडणार आहेत
◾️तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच मन की बात आहे
◾️ मन की बात चा हा 111 वा भाग असणार आहे
◾️3 ऑक्टोबर 2014 ला याची सुरवात झाली होती
❇️ भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्यासाठी 'Hindi @ UN' प्रकल्पासाठी 1.16 दशलक्ष डॉलर चे मोठे योगदान दिले आहे.
◾️भारताच्या स्थायी मिशनचे प्रभारी आर. रवींद्र यांनी हा धनादेश यूएनच्या ग्लोबल कम्युनिकेशन्स विभागाच्या (DGC) न्यूज आणि मीडिया विभागाचे संचालक इयान फिलिप्स यांना दिला.
◾️2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा हिंदी भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आणि जागतिक स्तरावर अधिक जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला .
❇️ भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे

◾️अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरा क्रमांक
◾️एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईड (ओएजी) यांच्या आकडेवारी नुसा

❇️ विक्रम मिस्री यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आह
े.
◾️1989 बॅचचे IFS अधिकारी
◾️विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतील
◾️मिस्री सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
◾️त्यांनी चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून काम केले आ
हे.
❇️ नुकतेच दिले गेलेले महत्वाचे पुरस्कार लक्षात ठ
ेवा

◾️सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ़ द ईयर अवार्ड 2023 - राधिका सेन
◾️साहित्य अकादमी फेलोशिप अवार्ड : रस्किन बांड
◾️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024: जेनी एर्पेनबेक (Kairos)
◾️व्हिटली गोल्ड अवार्ड (Green Oscar) 2024- पूर्णिमा देवी बर्मन (असम)
◾️गोल्डमन पर्यारण पुरस्कार 2024 (Green Nobel prize) - आलोक शुक्ल
◾️आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव
◾️लता दीनानाथ मंगेश्कर पुरुस्कार 2024 - अमिताभ बच्चन
◾️एबेल पुरस्कार (गणित चे नोबेल ) : Michel Talagrand
◾️इरासमस पुरस्कार - अमिताभ घोष
◾️2024 pritzkar पुरस्कार - रिकेन यामामोटो
◾️हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2023 : IPS कृष्ण प
्रकाश

❇️ पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100 वा सदस्य बन
ला आहे
◾️INTERNATIONAL SOLAR ALLIANCE (ISA)
◾️ उद्देश : जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या उपयोजनाला गती देणे
◾️2021 मध्ये स्थापना
◾️भारत आणि फ्रान्स यांनी मिळून याची स्थपणा केली
◾️अध्यक्ष : अजय माथुर
◾️मुख्यालय: नवी दिल्ली
◾️सदस्
य : 100

❇️ लडाख पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हण
ून घोषित
◾️भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केली आहे .
◾️ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लडाखने 97 टक्क्यांहून अधिक साक्षरता गाठली आहे.
◾️ 25 जून 2024 रोजी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ बीडी मिश्रा यांनी सिंधू सांस्कृतिक केंद्र (SSK), लेह येथे एका कार्यक्रमात ही मा
हिती दिली

❇️ अरुंधती रॉय यांना 2024 पेन पिंटर साहित्य पुरस्कार
 दिला गेला
◾️पुरस्कार सुरवात : 2009
◾️हेरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ सुरू केला
◾️हेरोल्ड पिंटर यांना 2005 मध्ये साहित्यासाठी
◾️पेन पिंटर पुरस्कार प्रतिवर्ष यूनाइटेड किंगडम, आयरलैंड गणराज्य, राष्ट्रकुल सदस्य देशातील लेखकांना दिला जातो
◾️अरुंधती रॉय यांना ' द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ' साठी 1997 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला
◾️बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या
भारतीय आहेत

महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्वाच्या योजना

❇️ कर्नाटक राज्य
गृहलक्ष्मी योजना  : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी

❇️ तमिळनाडू राज्य
कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना  : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये

❇️ आंध्र प्रदेश राज्य :
अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये

❇️ उत्तर प्रदेश राज्य
कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये

❇️ मध्य प्रदेश राज्य
लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये

❇️ पश्चिम बंगाल
लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये
कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये
रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान

❇️ महाराष्ट्र

◾️ लेक लाडकी योजना
🔥मुलीचा जन्म झाल्यावर : 5 हजार रुपये
🔥मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर : 6 हजार रुपये
🔥मुलगी सहावीत गेल्यावर: 7 हजार रुपये
🔥मुलगी 11 वीत गेल्यावर: 8 हजार रुपये
🔥मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: 75 हजार रुपये

◾️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार

👱‍♀️ कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते.
👱‍♀️ महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते

-------------------------------------------

राष्ट्रीय सांख्यिकी दिन

🔷भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी 29 जून रोजी भारतातील आधुनिक सांख्यिकीचे जनक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो .

🔷2024 मध्ये" निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर करा " या थीम अंतर्गत साजरा केला जाणार आहे.

🔷2007 मध्ये, भारत सरकारने महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त आणि सांख्यिकी आणि आर्थिक नियोजनातील त्यांच्या व्यापक कार्याची दखल घेण्यासाठी 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून नियुक्त केला. पहिला राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा 2007 मध्ये झाला आणि तेव्हापासून हा वार्षिक कार्यक्रम बनला आहे जो राष्ट्रीय विकासात आकडेवारीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो

🔷तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा जागतिक सांख्यिकी दिनासोबत गोंधळून जाऊ नये, जो संयुक्त राष्ट्रांनी 20 ऑक्टोबर रोजी दर पाच वर्षांनी साजरा केला जातो

🔰पार्श्वभूमी👇👇👇

🔷फेब्रुवारी 2010 मध्ये झालेल्या 41 व्या सत्रात, संयुक्त राष्ट्रसंघ सांख्यिकी आयोगाने 20 ऑक्टोबर 2010 हा जागतिक सांख्यिकी दिवस  म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.

🔷माहितीपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि सहस्राब्दी विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी विश्वासार्ह, वेळेवर आकडेवारी आणि देशांच्या प्रगतीचे सूचक तयार करणे अपरिहार्य आहे हे मान्य करून, 3 जून 2010 रोजी सर्वसाधारण सभेने ठराव स्वीकारला, ज्याने 20 ऑक्टोबर 2010 रोजी अधिकृतपणे नियुक्त केले. पहिला जागतिक सांख्यिकी दिन "अधिकृत आकडेवारीच्या अनेक उपलब्धी साजरे करणे" या सामान्य थीम अंतर्गत.

🔷2015 मध्ये जनरल असेंब्लीने 20 ऑक्टोबर 2015 हा सर्वसाधारण थीम अंतर्गत दुसरा जागतिक सांख्यिकी दिवस म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, "चांगले डेटा, चांगले जीवन" तसेच दर पाच वर्षांनी 20 ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

🔷20 ऑक्टोबर 2020 रोजी जगभरात तिसरा जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला गेला" जगाशी कनेक्ट करणे ज्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो अशा डेटासह " या थीमसह साजरा केला गेला ही थीम राष्ट्रीय सांख्यिकीय प्रणालींमध्ये विश्वास, अधिकृत डेटा, नावीन्य आणि सार्वजनिक हिताचे महत्त्व प्रतिबिंबित करते

🔷युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचा सांख्यिकी विभाग हा या मोहिमेचा जागतिक समन्वयक आहे, जागतिक प्रमुख संदेश परिभाषित करतो आणि या वेबसाइटद्वारे देश आणि इतर भागीदारांना पोहोच संसाधने उपलब्ध करून देतो.

Friday 28 June 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

❇️ सोप्या भाषेत समजून घ्या

◾️वय 21 ते 60 वर्षे
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार
◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

❇️ पात्रता पहा

◾️महाराष्ट्र रहिवासी
◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

❇️ आपत्र कोण असेल
◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
◾️घरात कोणी Tax भरत असेल तर
◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

❇️ लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो

◾️योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:
◾️ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांची पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती

◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील

❇️ पंतप्रधान मोदी उद्या मन की बात मध्ये आपले विचार मांडणार आहेत
◾️तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच मन की बात आहे
◾️ मन की बात चा हा 111 वा भाग असणार आहे
◾️3 ऑक्टोबर 2014 ला याची सुरवात झाली होती

❇️ भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्यासाठी 'Hindi @ UN' प्रकल्पासाठी 1.16 दशलक्ष डॉलर चे मोठे योगदान दिले आहे.
◾️भारताच्या स्थायी मिशनचे प्रभारी आर. रवींद्र यांनी हा धनादेश यूएनच्या ग्लोबल कम्युनिकेशन्स विभागाच्या (DGC) न्यूज आणि मीडिया विभागाचे संचालक इयान फिलिप्स यांना दिला.
◾️2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा हिंदी भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आणि जागतिक स्तरावर अधिक जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला .
❇️ भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे
◾️अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरा क्रमांक
◾️एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईड (ओएजी) यांच्या आकडेवारी नुसार

❇️ विक्रम मिस्री यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◾️1989 बॅचचे IFS अधिकारी
◾️विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतील
◾️मिस्री सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
◾️त्यांनी चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून काम केले आहे.

❇️ नुकतेच दिले गेलेले महत्वाचे पुरस्कार लक्षात ठेवा

◾️सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ़ द ईयर अवार्ड 2023 - राधिका सेन
◾️साहित्य अकादमी फेलोशिप अवार्ड : रस्किन बांड
◾️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024: जेनी एर्पेनबेक (Kairos)
◾️व्हिटली गोल्ड अवार्ड (Green Oscar) 2024- पूर्णिमा देवी बर्मन (असम)
◾️गोल्डमन पर्यारण पुरस्कार 2024 (Green Nobel prize) - आलोक शुक्ल
◾️आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव
◾️लता दीनानाथ मंगेश्कर पुरुस्कार 2024 - अमिताभ बच्चन
◾️एबेल पुरस्कार (गणित चे नोबेल ) : Michel Talagrand
◾️इरासमस पुरस्कार - अमिताभ घोष
◾️2024 pritzkar पुरस्कार - रिकेन यामामोटो
◾️हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2023 : IPS कृष्ण प्रकाश

❇️ पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100 वा सदस्य बनला आहे
◾️INTERNATIONAL SOLAR ALLIANCE (ISA)
◾️ उद्देश : जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या उपयोजनाला गती देणे
◾️2021 मध्ये स्थापना
◾️भारत आणि फ्रान्स यांनी मिळून याची स्थपणा केली
◾️अध्यक्ष : अजय माथुर
◾️मुख्यालय: नवी दिल्ली
◾️सदस्य : 100

❇️ लडाख पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित
◾️भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केली आहे .
◾️ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लडाखने 97 टक्क्यांहून अधिक साक्षरता गाठली आहे.
◾️ 25 जून 2024 रोजी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ बीडी मिश्रा यांनी सिंधू सांस्कृतिक केंद्र (SSK), लेह येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली

❇️ अरुंधती रॉय यांना 2024 पेन पिंटर साहित्य पुरस्कार दिला गेला
◾️पुरस्कार सुरवात : 2009
◾️हेरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ सुरू केला
◾️हेरोल्ड पिंटर यांना 2005 मध्ये साहित्यासाठी
◾️पेन पिंटर पुरस्कार प्रतिवर्ष यूनाइटेड किंगडम, आयरलैंड गणराज्य, राष्ट्रकुल सदस्य देशातील लेखकांना दिला जातो
◾️अरुंधती रॉय यांना ' द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ' साठी 1997 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला
◾️बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत

IBPS मार्फत 9900+ जागांसाठी मेगा भरती[IBPS RRB Bharti]

1] ऑफिस असिस्टंट (Multipurpose) :- 5585 पदे
2] ऑफिसर स्केल-I & ऑफिसर स्केल-II :- 3499 पदे

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1&2 :- कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2024[मुदतवाढ]
पूर्व परीक्षा :- ऑगस्ट 2024
मुख्य परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/rrb13oamay24/

जाहिरात पाहण्यासाठी:- CLICK HERE 

सरकारिया आयोगाच्या शिफारशी

🎯मख्यमंत्र्याची निवड करताना राज्यपालाने पुढील तत्त्वे लक्षात घ्यावीत.


📌(१) ज्या पक्षाला किंवा पक्षांच्या आघाडीला विधानसभेत जास्तीत जास्त पाठिंबा आहे असे राज्यपालास वाटेल त्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला राज्यपालाने मंत्रिमंडळ बनविण्यास सांगावे.

📌(२) राज्यपालास जी धोरणे मान्य आहेत ती अमलात आणण्यास तयार असलेले मंत्रिमंडळ बनवण्याचा राज्यपालाने प्रयत्न करू नये. राज्यात लोकप्रतिनिधींचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ होईल अशी व्यवस्था करणे हे त्याचे काम आहे.

📌(३) कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला काठावरचे किंवा साधे बहुमतही मिळालेले नसते तेव्हा 'त्रिशंकू' विधानसभा अस्तित्वात येते. अशा परिस्थितीत ज्या पक्षाचे किंवा निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या आघाडीचे विधानसभेत संख्याबळ इतर पक्षांच्या किंवा आघाडीच्या आमदारांच्या संख्याबळापेक्षा जास्त असेल त्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला आवश्यक त्या किमान बहुमतासाठी 'स्वतंत्र' किंवा 'अपक्ष" म्हणून निवडून आलेल्या आमदारांचा पाठिंबा मिळवून मंत्रिमंडळ बनवण्याचा दावा करता येईल.

📌(४) निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनवली असेल, तर तीत सहभागी झालेल्या सर्व पक्षांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देता येईल. 

📌(५) निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या आघाडीने बनवलेल्या मंत्रिमंडळास आघाडीतील काही घटकपक्ष तसेच अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवार बाहेरून पाठिंबा देतील तर काही घटकपक्षांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात सामील होतील.

📌(६) राज्यपालाने निवडलेल्या मुख्यमंत्र्याला विधानसभेत साध्या किंवा काठावरच्या बहुमताचाही पाठिंबा नसल्यास त्याने ३० दिवसांच्या मुदतीत विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडावा. तो एक मत जास्त मिळाल्यामुळे पारित झाला तरी त्याचे मंत्रिमंडळ अधिकारावर राहू शकते.

📌(७) आपण निवडलेल्या मुख्यमंत्र्याला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही ते राज्यपालाने पुढाकार घेऊन विधानसभेबाहेर म्हणजे उदाहरणार्थ- राजभवनात आमदारांची ओळखपरेड आयोजित करून निश्चित करण्याचा धोका पत्करू नये. बहुमताचा पाठिंबा आहे की नाही हे ठरवण्याची एकच जागा म्हणजे विधानसभा!

पोलीस भरती प्रश्नसंच


1. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

लोकसभा सदस्य ✅

मंत्रिमंडळ

राज्यसभा सदस्य

राष्ट्रपती


2. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

विधानसभा ✅

विधानपरिषद

लोकसभा

राज्यसभा


3. भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

१९ ते २२ ✅

३१ ते ३५

२२ ते २४

३१ ते ५१


4. केंद्रीय मंत्रीमंडळातील एखादा सदस्य संसदेंच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून --------- त्यासा कोणत्याही एका गृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक आहे?

तीन महिन्याच्या आत 

सहा महिन्याच्या आत✅

एका न्यायालयाची आत

पाच वर्षाच्या आत


 

5. महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सभासद संख्या किती आहे?

२७० 

२८८

२८९✅

२९०


6. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे ---------- मानले आहेत.

घटनात्मक प्रमुख 

कार्यकारी प्रमुख

तिन्ही दलाचे प्रमुख

यापैकी सर्व✅


7. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तविक वापर कोण करते?

संसद 

मंत्रीमंडळ✅

सरन्यायाधिश

उपराष्ट्रपती


8. सरन्यायाधीशाला आपल्या पद व गोपनियतेची शपथ कोण देतो?

निवृत्त होणारे सरन्यायाधीशा 

राष्ट्रपती✅

सर्वोच्च न्यायालयातीला कार्यकारी न्यायाधीश

पंतप्रधान


 

9. उपराष्ट्रपतीला पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

राष्ट्रपती ✅

पंतप्रधान

सरन्यायाधीश

लोकसभेचे सभापती


10. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

संरक्षण 

तार

पोस्ट

जमिनमहसूल✅


11. शेतकऱ्यांनी पेरणी केली.

अपूर्ण भूतकाळ 

साधा भूतकाळ ✅

पूर्ण वर्तमानकाळ 

भविष्यकाळ


12. पुढील वाक्यातील मुळ विधेय कोणते? जयंतास घरी येण्यास उजाडले.

जयंतास  

घरी येण्यास ✅

घरी येण्यास उजाडले

उजाडले 


13. मोठ्या माणसाचा टिकाव कसा लागणार?

प्रश्नार्थक ✅

नकारार्थी

उद्गारार्थी

होकारार्थी


14. तुणतुणे वाजवणे-

तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे  ✅

स्तुती करणे

निंदा करणे

गाणे म्हणणे


 

15. ‘डोळ्यात अंजन घालणे’ म्हणजे –

 डोळ्यात काजळ घालणे  

चूक लक्षात आणून देणे ✅

डोळ्यात दुखापत होणे 

डोळे रागाने मोठे करून पाहणे 


16. पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?

स्वरूपदर्शक  ✅

हेतू दर्शक 

कारण दर्शक

संकेत दर्शक


17. सैनिकाने बंदूकीने शत्रुचा प्राण घेतला

प्रथमा 

व्दितीय

तृतीया✅

चतुर्थी


18. विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)

भाटी ✅

बोकी 

बोके

यापैकी नाही


 

19. संकेतार्थी वाक्य ओळखा

पाऊस पडला आणि हवेत गारवा आला 

पाऊस पडला तर हवेत गारवा येईल✅

हवेत गारवा येण्यासाठी पाऊस पडावा

हवेत गारवा येण्यासाठी मेघा पाऊस पाड


20. कवी

कवयित्री ✅

कवित्री

कवियत्री

कवियित्री


21. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

1, 11, 29 ____, 89.

46 

55✅

57

63


22.जर शिक्षक दिन दुधवारी आला असेल तर त्याच वर्षात गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

मंगळवार ✅

बुधवार

गुरुवार

शनिवार


23.  एका सांकेतिक लिपीमध्ये MUMBAI हे LVLCZJ असे लिहितात तर SOLAPUR हे कसे लिहाल?

TPLBQVS 

MBQVSTP

TPMBSVQS

RPKBOVQ✅


24. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ab _, bca, _, abc

abbc 

cbca

cacb

cabc✅


 

25. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

3, 24, 81,192, ____.

348 

375✅

384

378


26.एका सांकेतिक लिपीत SUITINGS हा शब्द SGNITIUS असा लिहितात तर SHIRTING हा शब्द कसा लिहील?

GNIRHTSI 

GNITRISHII

SGNIRTHI

GNITRIHS✅


27.राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी 2 गुण 100 गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?

60 ✅

65

70

75


28.जर एका सांकेतिक भाषेत 3 = N, 5 = C, 7 = E, 9 = A, 11 = R, 13 = Y तर NEAR = ?

37911 ✅

11973

79113

97113


 

29. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

1, 9, 25, 49,?

69 

64

81

100✅


30. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ad _, cdb _, adh _

a, a, cc 

bb, cc

bc, a, c✅

dd, cc

गरामपंचायतीच्या सभासदांची पात्रता.



1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

🅾️गरामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

🅾️सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

🅾️सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

🧩राजीनामा :

🅾️सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

🅾️उपसरपंच - सरपंचाकडे

🅾️निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

🅾️सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

🧩अविश्वासाचा ठराव :

🅾️सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️बठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

🅾️अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

🅾️तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

🅾️अदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

🅾️आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

आजचे प्रश्नसंच

 .......... साली भारताच्या गव्हर्नर जनरल ने भारत सरकारचे सचिवालय बंगालच्या सरकारपासून वेगळे केले..

A. 1835

B. 1839

C. 1843✔️

D. 1848


योग्य कोणते.

1.. भारतातील सचिवालय ही ब्रिटन मधील व्हाईट हॉल व्यवस्थेपेक्षा निराळी आहे.

2. धोरण बनविणे आणि त्याची अंबलबजावणी करणे या दोहांची जबाबदारी ब्रिटन मध्ये मंत्रालयावर असते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff

 

............ मध्ये केंद्र सरकारमधील कामकाजाच्या पद्धतीत "डेस्क ऑफिसर सिस्टम" लागू केली.

A. १९४७

B.१९६१

C. १९७३✔️

D. १९७६



........... याने पोर्टफोलिओ पद्धत सुरू केली.

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग✔️

D. लॉर्ड कर्जन



पदावधी व्यवस्था कोणी सुरू केली..

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग

D. लॉर्ड कर्जन

१९४७ साली केंद्रीय सचिवालय मध्ये .....

खाती होती.

A. १५

B. १८✔️

C. १९

D. २१


........... हा शाखेचा प्रमुख असतो म्हणून त्याला शाखा अधिकारी असे संबोधले जाते.

A. सचिव

B. उपसचिव

C. अवर सचिव✔️

D. सह सचिव


योग्य कोणते.

1.. भारतातील कॅबिनेट साचिवाचे पद १९५० मध्ये निर्मिले गेले.

2. एन.आर. पिल्लई हे पहिले मंत्रिमंडळ सचिव होते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff


1.जावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ) प्रसिद्ध संगीतकार आहेत 

ब) प्रसिद्ध गीतकार 

क) प्रसिद्ध गीतकार आहेत 

1) फक्त अ 

2) अ व ब

3) ब व क  ✔️✔️

4) फक्त ब

 

2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारताचे सरन्यायाधिश उपराष्ट्रपती व राष्ट्रपती या तिन्ही पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे? 

1) व्ही. व्ही गिरी 

2) बी.डी.जत्ती

3) महमंद हिदायतुल्ला  ✔️✔️✔️

4) मिलम संजीव रेड्डी


3. २०१५ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  

1) कोर्ट  ✔️✔️✔️

2) पानासिंग तोमर 

3) शीप ऑफ थिसेस

4) आर्गो


4.

पंडित शंकर घोष यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) घोष हे प्रसिद्ध सतारवादक होते.

ब) घोष हे किराणा घराण्यातील कलाकार होते 

क) घोष हे प्रसिद्ध तबलावादक होते.

वरीलपैकी सत्य विधान/न कोणते/ती?

1)  फक्त अ  

2)  अ व ब 

3)  ब व क 

4)  फक्त क ✔️✔️✔️



 

5. आनंदमठ या कादंबरीचे जनक कोण? 

1) बकिमचंद्र चॅटर्जी  ✔️✔️✔️

2) स्वींद्रनाथ टागोर

3) अरुणा असफ अली

4) धोंडो केशव कर्वे


6. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? 

1) दहाव्या 

2) बाराव्या

3) तेराव्या ✔️✔️✔️

4) चौदाव्या


7. रिओ ऑलिम्पिक गॉल्फ साठी  किती देश पात्र आहेत? 

1) २४  ✔️✔️✔️

2) ३०

3) २५

4) १५


8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौदलाचे केंद्र (नेव्ह कमांड) नाही? 

1) मुंबई 

2) विशाखापदृणम

3) कोची

4) कन्याकुमारी ✔️✔️✔️

 

9.

जागतिक बँकेने भारताच्या स्वच्छभारत या उपक्रमासाठी पाठिंबा म्हणून कर्ज देण्याचे घोषित केले.

अ) स्वच्छ भारत अभियान हे २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झाले.

ब) या अभियानाची उदिष्टे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

क) साज्यांचा उपक्रमात सहभाग असावा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रयत्न करते.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  ✔️✔️✔️

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


10. मराठी रंगभूमीचा पहिला प्रयोग कोठे सादर झाला? 

1) सातारा

2) पुणे

3) सांगली ✔️✔️✔️

4) कोहापूर                                                                                                                                                                                                                                                                  11.

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ संबंधी खालील विधाने विचारात घ्या 

अ) या निर्देशांकानुसार भारत हा श्रीलंकेपेक्षा वरच्या स्थानावर आहे.

ब) सार्क देशांपैकी पाकिस्तान या देशात सर्वात अधिक भ्रष्टाचार आदळून येतो.

1)  अ बरोबर ब चूक  ✔️✔️✔️

2) ब बरोबर अ चूक 

3) वरिल दोन्ही बरोबर 

4) वरिल दोन्ही चूक


12.

खालील विधाने वाचा 

अ) बीड जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या सीमेवर नाही.

ब) जालना हा जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर नाही

क) बीड जिल्ह्याच्या सीमेवर उस्मानाबाद जिल्हा आहे.

वरीलपैकी सत्य विधान कोणते?

1)  अ व ब 

2)  ब व क  ✔️✔️✔️

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


13. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केव्हा झाली?

1) २००० - २००१  ✔️✔️✔️

2) २००१ - २००२

3) २००२ - २००३

4) २००४ – २००५


14.

केप्लर हे काय आहे?

अ) अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठविलेले अवकाशयान आहे.

ब) केप्लर यान नासाने २००९ मध्ये प्रक्षेपित केले

1)  अ बरोबर ब चूक  

2) ब बरोबर अ चूक ✔️✔️✔️

3) वरील दोन्ही बरोबर 

4) वरील दोन्ही चूक 


 

15. खालीलपैकी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री कोण आहेत?

1) प्रकाश मेहता 

2) पंकजा मुंडे ✔️✔️✔️✔️

3) विष्णू सावरा

4) रामदास कदम


16.

नई मंझिल या केंद्रीय क्षेत्र योजनेसंबंधी विधाने वाचा.

अ) ही योजना अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय राबविते.

ब) शिक्षण सोडलेल्या अल्पसंख्यांक युवकांना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देणे हा या योजनेमागचा उगेश आहे.

क) अल्पसंख्यांक मंत्री नज्मा हेत्पुल्ला यांनी ८ ऑगस्ट २०१५ रोजी पटना येथून या योजनेस सुरुवात केली.

वरीलपैकी चुकीचे विधान कोणते?

1)   अ व ब  

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️ 


17.

चैन सिंग या खेळाडूसंबंधी विधाने वाचा 

अ) चैनसिंग हा भारतीय सैन्याकडून खेळणारा नेमबाजीतील खेळाडू आहे.

ब) चैनसिंग याने ५९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुबर्ण पदक जिंकले.

सुवर्ण पदक जिंकले.

1)   अ बरोबर, ब चूक  

2)  ब बरोबर, अ चूक 

3)  वरील दोन्ही बरोबर  ✔️✔️✔️

   4) वरील दोन्ही चूक 



18.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंबंधी विधाने वाचा

अ) या योजेनेंर्ग्त रस्त्यांनी जोडले न गेलेले सर्व पात्र प्रामीण रस्ते जोडण्यात येणार

ब) ही योजना २०० साली सुरु केली गेली 

क) या योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते जोडणीचे उगिष्ट २०२२ ऐवजी २०११ पर्यंतच पूर्ण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

वरीलपैकी चुकीचे विधाने कोणते.

1)   फक्त अ  

2)  फक्त ब

3)  ब व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राष्ट्रपती राजवट केव्हा लागते?



एखाद्या राज्यातील शासनयंत्रणा कोलमडल्यास, घटनेप्रमाणे कारभार चालू शकणार नाही, अशी राज्यपालांची खात्री झाल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना पाठवितात. त्या अहवालाबाबत खात्री झाल्यास राष्ट्रपती तेथील सरकार बडतर्फ करू शकतात.


कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते.


पुन्हा निवडणूक होईपर्यंत तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते हा कालावधी 6 महिन्यापर्यंत वाढविता येतो.


राज्यात जास्तीत जास्त 3 वर्षे राष्ट्रपती राजवट लावू शकता येते. (भारतात प्रथम पंजाब राज्यात 1951 साली 356 कलम लावल्या गेले.)


राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात.

राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत विधानसभा निलंबित अवस्थेत राहते. ती स्थापनही झाली नसेल तर तिचे गठनही निलंबित राहते.


राज्यपालांच्या मदतीसाठी तीन सनदी अधिकारी सल्लागार म्हणून काम करतात. राज्याचे सर्व प्रशासन राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येते. विधानसभा जे कायदे करते ते कायदे संसदेत केले जातात.


संसदेच्या दोन्ही सभागृहांची संमती न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी संपुष्टात येते. संसदेची संमती घेऊन एका वेळी सहा महिने अशा प्रकारे जास्तीत जास्त तीन वर्षे राष्ट्रपती राजवट लागू राहू शकते. मात्र राष्ट्रपती राजवट एक वर्षाहून अधिक काळ लागू ठेवायची असेल तर संबंधित राज्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र सक्तीचे असते. देशात आधीपासूनच आणिबाणी पुकारलेली असेल तर एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट एक वर्षांहून जास्त काळ लागू ठेवता येऊ शकते.


राज्यातील शासन राज्यघटनेनुसार चालविता येण्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याची खात्री झाल्याने राज्यपालांनी तशी शिफारस केल्यास लागू असलेली राष्ट्रपती राजवट केव्हाही संपुष्टात आणता येते. सरकार स्थापन न होऊ शकल्याने लावलेली राष्ट्रपती राजवट सरकार स्थापनेची शक्यता निर्माण होईल तेव्हा उठविता येते. लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी संसदेच्या संमतीची गरज नसते.


राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात. सर्वांत जास्त संख्या असलेल्या किंवा बहुमताचा आकडा शक्य असलेल्या राजकीय पक्षांना सत्तास्थापनेचा दावा करता येतो. त्यांना ठराविक मुदत देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाते.


राष्ट्रपती राजवटीच्या काळात मंत्रिमंडळच नसते. त्यामुळे पालकमंत्री असण्याचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतात.


पंचायत_समिती



पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

📌भारतीय शासन कायदा 1935📌

·जवळ जवळ राज्यघटनेचा मोठा भाग भारतीय शासन कायदा 1935 पासून घेण्यात आला.

संघराज्यीय शासन पद्धती

·न्यायव्यवस्था

लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, राज्यपालाचे पद

प्रशासकीय तरतूद



📌बरिटिश घटना📌

·संसदीय शासन व्यवस्था

कॅबिनेट व्यवस्था

 द्विगृही संसद पद्धती

फर्स्ट पास्ट-पोस्ट-सिस्टम

कायदे प्रणाली व कायदा करण्याची पद्धत

एकेरी  नागरिकत्व

 संसदीय विशेषाधिकार

आदेश देण्याचे विशेष हक्क  



📌य एस ए ची घटना📌

 राज्यघटनेतील मूलभूत हक्क

·उपराष्ट्रपती हे पद

·न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य

न्यायिक पुनर्विलोकन

·राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत

·सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत


    


📌कनडाची घटना📌

 प्रभावी केंद्र असलेले संघराज्य

· शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद ( राज्यघटनेमध्ये समावर्ती सूची, केंद्र सूची  व राजयसूची चा समावेश असतो ज्या विषयाचा या तिन्ही पैकी कोणत्याही सूचित समावेश नसतो त्यास शेषाधिकार असे म्हणतात )

·राज्यपालाची केंद्राचा प्रतींनिधी म्हणून नेमणूक

· सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार आधिकार क्षेत्र



📌आयरीश घटना📌

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे

·राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत

·राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन



📌आस्ट्रेलियाची घटना📌

राज्यघटनेतील समावर्ती सूची

संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक

· व्यापार व वाणीज्याचे स्वातंत्र्



📌फरांस ची घटना📌

   गणराज्य

· प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य

समता व बंधुता हे आदर्श



📌दक्षिण आफ्रिकेची घटना📌

घटना दुरुस्तीची पद्धत

राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक



📌सोव्हिएत रशियाची घटना📌

मूलभूत कर्तव्य

प्रस्ताविकेतील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श


📌जपानची घटना📌

कायद्याने प्रस्थापित पद्धत



📌जर्मनीची घटना📌

आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे

​भारतीय निवडणूक आयोग

ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.

▪️राज्यसभा
- संसदेचे उच्च सभागृह
- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात
- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त
- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)
- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा
- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

▪️लोकसभा
- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)
- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952
- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

▪️लोकसभा निवडणूक 2014
- 16 वी लोकसभा निवडणूक
- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान
- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना
- एकूण मतदारसंघ: 543
- एकूण मतदान केंद्र: 927553
- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)
राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3
- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

▪️ पक्षीय बलाबल
- भारतीय जनता पक्ष: 282
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
- कम्युनिस्ट पक्ष: 01
- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
- राज्यस्तीय पक्ष: 182
- नोंदणीकृत पक्ष: 16
- अपक्ष: 03

▪️ वैशिष्ट्ये
- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.
- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला
- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये
--------------------------------------
• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014
- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.
- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.
- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.
- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...