Tuesday 4 February 2020

Current affairs question set

1)मेडागास्करमध्ये आपत्ती निवारणात मदतीचा हात देण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ____' राबवत आहे.
(A) निस्तार
(B) व्हॅनिला.  √
(C) सुनयना
(D) मदद

2)कोणत्या शब्दाची निवड ‘ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर 2019’ म्हणून झाली?
(A) नारी शक्ती
(B) टॉक्सिक
(C) संविधान.  √
(D) क्लायमेट एमर्जन्सी

3)कोणत्या शहरात ‘बीटींग द रिट्रीट’ सोहळा आयोजित केला जातो?
(A) चेन्नई
(B) लखनऊ
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली.  √

4)कोणत्या दिवशी ‘वंश नाश करण्यामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 27 जानेवारी.   √
(D) 29 जानेवारी

5)सुनिता चंद्रा ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या?
(A) हॉकी.  √
(B) क्रिकेट
(C) कुस्ती
(D) बॅडमिंटन

6)माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा.  √
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

7)टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद.   √

8)कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन.  √
(D) संयुक्त राज्ये अमेरिका

9)कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली.   √
(D) चंदीगड

10)कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर.   √
(C) गोरखपूर
(D) कानपूर

महत्त्वाचे प्रश्नसंच


कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
(A) गुवाहाटी
(B) भुवनेश्वर
(C) पणजी✅✅
(D) नवी दिल्ली

♻️♻️
कोणी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2019-20’ सादर केले?
(A) निर्मला सितारामन✅✅
(B) राम नाथ कोविंद
(C) कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम
(D) नरेंद्र मोदी

♻️♻️
कोणत्या राज्यात तीन दिवस चालणारा नर्मदा महोत्सव आयोजित करण्यात आला?
(A) गुजरात
(B) मध्यप्रदेश✅✅
(C) झारखंड
(D) छत्तीसगड

♻️♻️
दरवर्षी कोणता दिवस ‘भारतीय तटरक्षक दल दिन’ साजरा केला जातो?
(A) 2 फेब्रुवारी
(B) 30 जानेवारी
(C) 31 जानेवारी
(D) 1 फेब्रुवारी✅✅

♻️♻️
प्रथमच ‘डिफेंस एक्स्पो 2020’ दरम्यान ‘भारत आणि ______ संरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली आहे?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) आफ्रिका✅✅
(C) बांग्लादेश
(D) रशिया

♻️♻️
भारतात ________ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.
(A) 30 जानेवारी✅♻️✅
(B) 1 फेब्रुवारी
(C) 31 जानेवारी
(D) 25 जानेवारी

♻️♻️
कोणत्या व्यक्तीला 2019-2020 या वर्षासाठी ‘PEN गौरी लंकेश अवॉर्ड फॉर डेमोक्रेटिक आयडेलिझम’ हा पुरस्कार देण्यात आला?
(A) युसूफ जमील✅♻️✅
(B) रवीश कुमार
(C) राजदीप सरदेसाई
(D) रजत शर्मा

♻️♻️
‘आर्थिक सर्वेक्षण’ याच्यानुसार, 2019-2020 या वर्षात भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर किती असण्याचा अंदाज आहे?
(A) 8.8 टक्के
(B) 5.2 टक्के
(C) 5 टक्के✅✅
(D) 9.9 टक्के

♻️♻️
कोणत्या व्यक्तीची केंद्रीय अप्रत्यक्ष कर व जकात मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
(A) प्रणब कुमार दास
(B) एम. अजित कुमार✅✅
(C) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
(D) यापैकी नाही

♻️♻️
कोणत्या टेनिसपटूने डोमिनिक थिएमचा पराभव करून ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2020’ या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे जेतेपद पटकवले?
(A) नोव्हाक जोकोव्हिच♻️✅✅
(B) राफेल नदाल
(C) डॅनिल मेदव्हेदेव
(D) रॉजर फेडरर

♻️♻️
कोणत्या दिवशी 'जागतिक पाणथळ भूमी दिन’ पाळला जातो?
(A) 1 फेब्रुवारी
(B) 25 जानेवारी
(C) 2 फेब्रुवारी✅✅
(D) 4 फेब्रुवारी

♻️
कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी महिन्याभर चालणारा “एक्युषी पुस्तक मेळावा’ याचे उद्घाटन केले?
(A) श्रीलंका
(B) बांगलादेश✅✅
(C) भारत
(D) मालदीव

♻️♻️
कोणत्या व्यक्तीच्या हस्ते कर्नाटकाच्या हुबळी या शहरात ‘कौशल्य विकास केंद्र’चे उद्घाटन झाले?
(A) एम. वेंकय्या नायडू✅✅
(B) राम नाथ कोविंद
(C) नितीन गडकरी
(D) महेंद्र नाथ पांडे

♻️♻️खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला?
अ) राजस्थान
ब) गुजरात
क) आसाम ✅
ड) महाराष्ट्र

स्पष्टीकरण :  खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम आसाम या राज्यात सुरू करण्यात आला.

♻️♻️कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅
(D) 22 जानेवारी

♻️♻️कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?*
(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

♻️♻️पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता ? 
A) आर्य समाज ✅
B) सत्यशोधक समाज
C) ब्रह्मो समाज
D) प्रार्थना समाज

ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधानांनी केले स्वागत या करारामुळे बोडो नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन येणार.

🌷आज झालेल्या ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

🌷हा करार बोडो जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणणारा ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

🌷‘या करारामुळे शांतता, सौहार्द आणि एकत्रित भावनेची नवी पहाट उजाडली आहे. भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे.

🌷बोडो संघटनांसोबत आज झालेला करार त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.आज झालेला बोडो करार अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

🌷या करारामुळे विविध हितसंबंधी गट एकत्र आले आहेत.  आजवर जे गट सशस्त्र कारवायांमध्ये गुंतलेले होते ते आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावणार आहेत.

तब्बल ९ लाख पीएफ खाती ब्लॉक; यात तुमचं खातं तर नाही ना.

✍नोकरी करणाऱ्या प्रत्येकांचं आजकाल पीएफ खातं आसतेच. ज्यांचं पीएफ खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत.

✍केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे ८० हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे. या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेचा अवैध लाभ जवळपास नऊ लाख जण घेत आहेत. पीएफ आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेचा एकत्र लाभ घेणाऱ्या नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहे.

✍बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या नऊ लाख लाभार्थांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे नऊ लाख जण या योजनेचा यापुढं लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना लागू होण्याआधी ९ लाख जण फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते. बिझनेस स्टँडर्ड वृत्तानुसार, दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या नऊ लाख कर्मचाऱ्यांवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खाती ब्लॉक करत कारवाई केली आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांकडून २२२ कोटी रूपयांची वसूलीही करण्यात आली आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

🦠 केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती रक्कम वाटप केली गेली?

(A) 2.73 लक्ष कोटी रुपये
(B) 2.51 लक्ष कोटी रुपये
(C) 2.83 लक्ष कोटी रुपये✅✅
(D) 93000 कोटी रुपये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 प्रथमच ‘डिफेंस एक्स्पो 2020’ दरम्यान ‘भारत आणि ____ संरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) आफ्रिका✅✅
(C) बांग्लादेश
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या व्यक्तीने उत्तरप्रदेश राज्याचे अंतरिम पोलीस महानिदेशक (DGP) या पदाचा भार सांभाळला?

(A) हितेश चंद्र अवस्थी✅✅
(B) ओ. पी. सिंग
(C) कुंदन लाल तमता
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠____________ हिने गॅर्बिन मुगुरुझाचा पराभव करीत ‘2020 ऑस्ट्रेलियन ओपन’ या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद जिंकले.

(A) निकोला मेक्टिक
(B) बार्बोरा क्रेझीकोवा
(C) जेमी मुरे
(D) सोफिया केनिन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या देशाने सर्वोच्च उंचीवर फॅशन शो कार्यक्रम आयोजित करून नवा विश्वविक्रम केला?

(A) भुटान
(B) चीन
(C) नेपाळ✅✅
(D) भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?

(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगणा
(C) तामिळनाडू✅✅
(D) ओडिशा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?

(A) फरीदाबाद✅✅
(B) जयपूर
(C) अजमेर
(D) गुरुग्राम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1)कोणत्या राज्यात आसाम रायफल्स या भारतीय भुदलाच्या तुकडीने एक युद्ध स्मारक उभारले?
(A) नागालँड.   √
(B) मेघालय
(C) अरुणाचल प्रदेश
(D) मणीपूर

2)2020 या साली ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ या कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले?
(A) 15 वा
(B) 16 वा.  √
(C) 27 वा
(D) 6 वा

3)कोणत्या देशाने सर्वोच्च उंचीवर फॅशन शो कार्यक्रम आयोजित करून नवा विश्वविक्रम केला?
(A) भुटान
(B) चीन
(C) नेपाळ.   √
(D) भारत

4)कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगणा.   √
(C) तामिळनाडू
(D) ओडिशा

5)कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
(A) फरीदाबाद.   √
(B) जयपूर
(C) अजमेर
(D) गुरुग्राम

6)‘संप्रीती’ हा भारत आणि _ यांच्यादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे.
(A) श्रीलंका
(B) बांग्लादेश.   √
(C) चीन
(D) जापान

7)कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
(A) पी. आर. श्रीजेश
(B) कृष्ण बहादुर पाठक
(C) सूरज लता देवी
(D) राणी रामपाल.  √

8)__________ यांनी कर्नाटकच्या मंगळुरू येथे दलात एक ‘सी-448’ हाय-स्पीड इंटरसेप्टर नौका दाखल केली आहे.
(A) भारतीय नौदल
(B) भारतीय तटरक्षक दल.  √
(C) भारतीय सशस्त्र सेना
(D) यापैकी नाही

9)भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जानेवारी 2020 या महिन्यात KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक
(C) HDFC बँक.  √
(D) इंडियन बँक

10)भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) RBIचे कार्यकारी संचालक __ यांची पतधोरण समितीचे (MPC) सदस्य म्हणून नियुक्ती केली.
(A) जनक राज.   √
(B) एम. डी. पात्रा
(C) बी. पी. कानुनगो
(D) एम. के. जैन
"

1)कोणत्या व्यक्तीला 2019-2020 या वर्षासाठी ‘PEN गौरी लंकेश अवॉर्ड फॉर डेमोक्रेटिक आयडेलिझम’ हा पुरस्कार देण्यात आला?
(A) युसूफ जमील.  √
(B) रवीश कुमार
(C) राजदीप सरदेसाई
(D) रजत शर्मा

2)‘आर्थिक सर्वेक्षण’ याच्यानुसार, 2019-2020 या वर्षात भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर किती असण्याचा अंदाज आहे?
(A) 8.8 टक्के
(B) 5.2 टक्के
(C) 5 टक्के.   √
(D) 9.9 टक्के

3)कोणत्या व्यक्तीची केंद्रीय अप्रत्यक्ष कर व जकात मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
(A) प्रणब कुमार दास
(B) एम. अजित कुमार.   √
(C) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
(D) यापैकी नाही

4)कोणत्या टेनिसपटूने डोमिनिक थिएमचा पराभव करून ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2020’ या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे जेतेपद पटकवले?
(A) नोव्हाक जोकोव्हिच.   √
(B) राफेल नदाल
(C) डॅनिल मेदव्हेदेव
(D) रॉजर फेडरर

5)कोणत्या दिवशी 'जागतिक पाणथळ भूमी दिन’ पाळला जातो?
(A) 1 फेब्रुवारी
(B) 25 जानेवारी
(C) 2 फेब्रुवारी.   √
(D) 4 फेब्रुवारी

6)कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी महिन्याभर चालणारा “एक्युषी पुस्तक मेळावा’ याचे उद्घाटन केले?
(A) श्रीलंका
(B) बांगलादेश.  √
(C) भारत
(D) मालदीव

7)फेब्रुवारी 2020 या महिन्यात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेनी (NABARD) कोणत्या बँकेला कमी व्याज दरावर 140 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले?
(A) मालवा ग्रामीण बँक
(B) श्रेयस ग्रामीण बँक
(C) आर्यावत बँक
(D) पंजाब राज्य कृषी विकास बँक.  √

8)‘अद्दू पर्यटन क्षेत्र’ तयार करण्यासाठी भारत आणि _______ या देशाने पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या.
(A) बांगलादेश
(B) मालदीव.  √
(C) चीन
(D) भुटान

9)कोणत्या व्यक्तीच्या हस्ते कर्नाटकाच्या हुबळी या शहरात ‘कौशल्य विकास केंद्र’चे उद्घाटन झाले?
(A) एम. वेंकय्या नायडू.  √
(B) राम नाथ कोविंद
(C) नितीन गडकरी
(D) महेंद्र नाथ पांडे

10)कोणत्या बॅंकेनी ग्राहकांसाठी ‘iBox’ नावाची एक अद्वितीय स्व-सेवा वितरण सुविधा सुरू केली?
(A) HDFC बँक
(B) देना बँक
(C) इंडियन बँक
(D) ICICI बँक.  √

आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

➖ आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी दक्षिण आफ्रिकेतला चित्ता हा वन्यजीव भारतात आणण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.

➖ भारतातल्या योग्य अधिवासात आफ्रिकेतला चित्ता आणता येणार आहे. आपल्या चपळतेसाठी ओळखला जाणारा चित्ता भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

➖ भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाला आहे, त्यामुळे आफ्रिकेतल्या नामिबिया देशामधून चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

➖ सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्या. बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी केली.

🚦राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA)

- 'टायगर प्रोटेक्शन प्रोग्राम' (व्याघ्र प्रकल्प) नावाचा एक कार्यक्रम 1973 साली भारत सरकारने WWF या जागतिक संस्थेच्या सहकार्याने सुरू केला.

- भारतातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या पुनर्गठित व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना डिसेंबर 2005 मध्ये झाली.

- ‘वन्यजीव संरक्षण कायदा-1972’ मध्ये 2006 साली दुरूस्ती करण्यात आली ज्यामुळे संकटात सापडलेल्या वाघांच्या (तसेच वाघ या प्रजातीतले इतर पशू) संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणारी ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण’ ही संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पर्यावरण व वन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना करण्यात आली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला 17 वर्षांपूर्वीचा विक्रम


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर एकीकडे विविध प्रतिक्रिया येत आहेत.

तर दुसरीकडे हा अर्थसंकल्प काही वेगळ्या कारणांमुळे विशेष देखील ठरला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या अर्थसंकल्पाद्वारे 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेच्यानुसार सर्वात प्रदीर्घ असे भाषण केले आहे. त्यांचे भाषण 2 तास 40 मिनिटं चालले.

तर या अगोदर माजी अर्थमंत्री जसवंतसिंह यांच्या नावावर सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांनी 2 तास 13 मिनिटं भाषण केले होते.

तसेच त्यांच्या खालोखाल दिवगंत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा क्रमांक येतो. त्यांनी 2 तास 10 मिनिटं भाषण केले होते. तर, 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी 2 तास 5 मिनिटं भाषण केलेलं आहे.

याशिवाय निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री देखील ठरल्या आहेत.

या अगोदर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील दोनवेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाशिवाय अन्य खात्यांची देखील अतिरिक्त जबाबदारी होती.

मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकचे नवे पंतप्रधान

◾️इराकचे अध्यक्ष बरहामसालेह ह्यांनी मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे.

◾️बरहाम सालेह यांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे इराकचे माजी संवाद मंत्री असलेल्या मोहम्मद तौफिक यांनी सांगितले.

◾️यामुळे इराकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला राजकीय पेच सुटला आहे.

◾️दरम्यान इराकमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आणि माजी पंतप्रधान आदेल अब्दुल माहदी यांनी राजीनामा दिल्यानंतरही दोन महिन्यांपासून नागरिकांनी सरकारविरोधात सुरू केलेले आंदोलन सुरूच आहे.

◾️राजकीयदृष्ट्‌या स्वतंत्र पंतप्रधान, भ्रष्टाचार आणि आंदोलनाशी संबंधित हिंसाचाराच्या उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनाच्या चार महिन्यांत प्रामुख्याने बगदाद आणि परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टोळधाडीमुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

🌻पिकांवर आलेल्या टोळधाडीमुळे पाकिस्तान देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या काळात शेत आणि शेतकर्‍यांचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.

🌻टोळधाडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी 31 जानेवारी 2020 रोजी  मंत्रिमंडळाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चार राज्यांसाठी 7.3 अब्ज रुपयांच्या ‘राष्ट्रीय कृती कार्यक्रम’ला मंजुरी देण्यात आली.

🎄ठळक बाबी...

🌻पाकिस्तानातल्या सिंध प्रांतानंतर पंजाब प्रांतात सुद्धा टोळ पिके नष्ट करीत आहेत.सिंध आणि पंजाबवर हल्ला केल्यानंतर प्रथमच टोळ भारतीय सीमेजवळील खैबर पख्तूनख्वामध्ये दाखल झाले आहेत. टोळ सिंध आणि बलुचिस्तानमधून चोलिस्तान आणि नारा येथे दाखल झाले होते.

🌻हवामानातले बदल हे एक कारण आहे ज्यामुळे अधिक काळापर्यंत टोळ जीवंत आहेत. 1993 साली पाकिस्तानला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता त्यापेक्षा आजची परिस्थिती बिकट आहे.

🎄पाकिस्तान देश...

🌻दक्षिण आशियातला हा एक सार्वभौम इस्लामी प्रजासत्ताक देश आहे. भारताची फाळणी होऊन 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हे राष्ट्र अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान हा प्रांत पुढे 1971 साली बांगलादेश या नावाने स्वतंत्र देश झाला. इस्लामाबाद ही देशाची राजधानी आहे आणि पाकिस्तानी रुपया राष्ट्रीय चलन आहे.

🌻पाकिस्तानची (ब्रिटिश भारताची वायव्य सीमा) अफगाणिस्तानबरोबरची सीमा “ड्युरँड रेषा” म्हणून ओळखली जाते व ती 1893 साली सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी निश्चित केली आहे तर पाकिस्तानची भारताबरोबरची वर्तमानची सीमा 1947 साली ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ या सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या निवाड्याप्रमाणे निश्चित केली आहे.

🌻सॉल्ट रेंज किंवा सैंधव-मीठदगड-डोंगररांग हे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. ही डोंगररांग झेलमच्या उत्तरेस जोगीतिला व बाक्राला येथून सुरू होऊन नैर्ऋत्य दिशेने जाते आणि कालाबागजवळ सिंधू नदी ओलांडते आणि सिंधूच्या पश्चिमेस बन्नू व डेरा इस्माइलखान या जिल्ह्यांत पसरते.

राज्यांचा महसुली वाटा ४१ टक्क्य़ांवर

🔰केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या हिस्स्यात एक टक्के घट करून तो ४१ टक्के करण्याची १५व्या वित्त आयोगाची शिफारस केंद्राने मान्य केली. परिणामी राज्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत घट होणार आहे.

🔰वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना केंद्राकडून मदत मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. १४व्या वित्त आयोगाने केंद्राकडून राज्यांना ३२ टक्क्य़ांवरून ४२ टक्के वाटा देण्याची केलेली शिफारस मोदी सरकारने २०१५ मध्ये मान्य केली होती. त्यानुसार राज्यांना केंद्राकडे कर रुपाने जमा होणाऱ्या एकूण रक्कमेपैकी ४२ टक्के रक्कम मिळत होती.

🔰१५व्या वित्त आयोगाने मात्र जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासीत राज्यांना जास्त मदत देणे आवश्यक असल्याने अन्य राज्यांच्या हिश्श्यांत कपात सुचविली होती. सद्य स्थितीत जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या केंद्रशासीत राज्यांचा हिस्सा वाढविणे आवश्यक होते. केंद्राकडे जमा होणाऱ्या रक्कमेतूनच राज्यांना मदत दिली जाते. केंद्राच्या तिजोरीवर जादा बोजा शक्य नसल्यानेच अन्य राज्यांच्या हिस्स्याच एक टक्का कपात करण्याची शिफारस वित्त आयोगाने केली होती व केंद्रीय मंत्रिमंडळाने ती मान्य केली.

🔰वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून केंद्राच्या महसुलात घट झाली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये ही घट वाढली होती. वस्तू आणि सेवा कराचा परतावाही महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळालेला नाही. काही वेळा वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळण्यास विलंब लागतो. या पाश्र्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या मदतीत घट होणार हे निश्चितच मानले जात होते. वित्त आयोगाने एक टक्का कपात सुचविली असली तरी त्याचा राज्यांच्या मदतीवर परिणाम होईल. छोटय़ा राज्यांना या कपातीचा जास्त फटका बसेल.

Hobart International स्पर्धेमध्ये सानिया मिर्झाचं दणक्यात पुनरागमन, पहिल्याच प्रयत्नात पटकावलं विजेतेपद.

🔰 बाळतंपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केलं आहे. 

🔰 WTA Hobart International Tennis स्पर्धेत सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.

🔰 अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला. अवघ्या १ तास २१ मिनीटांत सानिया मिर्झा आणि तिच्या साथीदाराने हा सामना खिशात घातला.

🔰 तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केलं आहे.

🔰 सानियाचं हे दुहेरीमधलं ४२ वं विजेतेपद ठरलं. याव्यतिरीक्त सानियाच्या नावावर २०१६ सालचं ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरी आणि २००९ साली मिश्र-दुहेरी स्पर्धेचं जेतेपदही जमा आहे. त्यामुळे आगामी काळात सानिया टेनिसमध्ये कशी प्रगती करतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here