Saturday 20 February 2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे



१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)

अजय मल्होत्रा यांची मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली



• माजी भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अजय मल्होत्रा   संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.  


• या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय आहेत.  


• आपल्या सेवा कालावधीत त्यांनी बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत.  ते रशियामध्ये भारताचे उच्चायुक्त राहिले आहेत.  त्यांनी केनियामधील नेरोबी इंडियन हाय कमिशनमध्येही काम केले आहे.  


• नोव्हेंबर 2013 मधे ते परराष्ट्र सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.


• केनिया आणि सेशल्ससारख्या देशांशी देशाचे संबंध दृढ करण्यासाठी अजय मल्होत्रा   यांनी 1979 1982 to या काळात नैरोबीच्या उच्च आयोगातही काम केले आहे.  


• 1985 मध्ये त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मिशनमध्ये सचिव म्हणूनही काम पाहिले.  येथे त्यांनी 1989 पर्यंत सेवा बजावली.


• ILO मध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.


• संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार सल्लागार समिती ही परिषदेची “थिंक टँक” म्हणून काम करते.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) 


• संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, ही संस्था संयुक्त राष्ट्राचे एक अंग म्हणून एक आंतर-सरकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.  


• स्थापना - 2006 साली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या जागी ही परिषद स्थापन केली गेली.  


• उद्देश - विविध देशांमध्ये मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि उल्लंघन झाल्यास तोडगा काढणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.


• मुख्यालय -  जिनिव्हा (स्वित्झर्लंड)  

• सदस्य - 47, सदस्य भौगोलिक आधारावर  तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात केले आणि जास्तीत जास्त दोन टर्म असतात.


• गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान पुन्हा यूएनएचआरसीचा सदस्य झाला असून आता तो  2023 पर्यंत सदस्य राहील तर 2021 पर्यंत भारत परिषदेचा सदस्य आहे.


• अलीकडेच फिजीचे राजदूत नाझत शमीम खान यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

तरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दशकातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले



पुरस्कार विजेत्यांची यादी

◆ दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 

- विराट कोहली

◆ दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी

◆ दशकातील सर्वोतम कसोटी क्रिकेटपटू 

- स्टीव्ह स्मिथ

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू 

- विराट कोहली 

◆ दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू 

- राशिद खान 

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम दवेन्टी-२० महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू  

- कायले कोएटझर 

◆ दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू 

- कॅथरिन ब्राइस

◆ दशकातील सर्वोत्तम खेलभावनेचा पुरस्कार 

- महेंद्रसिंह

एक एप्रिलपासून मोबाइल युझर्सला कॉल आणि इंटरनेटसाठी मोजावे लागणार जास्त पैसे



🔰दशभरातील टेलीकॉम कंपन्यांनी येणाऱ्या महिन्यांमध्ये दरवाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. या दरवाढीचा थेट फटका मोबाइल वापरणाऱ्यांना बसणार असून फोन कॉल तसेच इंटरनेटचेही दर यामुळे वाढणार आहेत. टेलीकॉम कंपन्या एक एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून दरवाढ करण्याच्या विचारात आहेत.


🔰इनव्हेस्टमेंट इनफॉर्मेशन अ‍ॅण्ड क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या (आयसीआरए) अहवालानुसार एक प्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच २०२१-२२ मध्ये आपला नफा वाढवण्याच्या दृष्टीने कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही दरवाढ नक्की किती असेल यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


🔰आयसीआरएच्या अहवालानुसार दरवाढ केल्याने आणि ग्राहकांना टू जी वरुन फोर जी सेवेकडे जाण्यासाठी प्रवृत्त केल्याने दर वापरकर्त्यामागील सरासरी नफा वाढण्याची कंपन्यांना अपेक्षा आहे. अर्थ्या वर्षात हा नफा जवळजवळ २२० कोटींपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पुढील दोन वर्षांमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचा नफा ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑप्रेटिंग मार्जिनचा नफा ३८ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.


🔰करोना लॉकडाउन आणि त्यामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या वातारवणामध्येही टेलिकॉम क्षेत्राला विशेष फटका बसला नाही. उलट लॉकडाउनच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा वापर वाढल्याने कंपन्यांना त्याचा आर्थिक फायदा झाला. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, व्हिडीओ कॉल्स यामुळे इंटरनेटचा वापर वाढल्याने लॉकडाउनमध्येही कंपन्यांची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत झाली.

महाराष्ट्रात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणास ठाकरे सरकारची मंजुरी; जाणून घ्या कॅरॅव्हॅन पार्क म्हणजे काय



🔰पर्यटन धोरण- २०१६ मधील तरतूदीनुसार तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली.


🔰मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आली. या धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास परदेशामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी मोठ्या संख्येने कॅरॅव्हॅन उभ्या करुन पर्यटक एकत्र जमतात तसेच चित्र लवकरच महाराष्ट्रात दिसू शकेल.


🔰करॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या धोरणांचा हातभार लागणार आहे. मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट यासारखी प्रोत्साहने कॅरॅव्हॅन पार्क तसेच कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू केल्या जाणार आहेत. पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक असणार आहे.


🔰करॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिध्दी देखील करण्यात येईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. या कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅनवर आधारित पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खाजगी गुंतवणूकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आसाममध्ये 'महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा प्रारंभ.



🔰18 फेब्रुवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ प्रकल्पाचा प्रारंभ केला.


🔰‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा आरंभ प्रसंगी त्यांनी नेमाती-माजुली बेटे, उत्तर गुवाहाटी-दक्षिण गुवाहाटी आणि धुबरी-हातसिंगीमारी दरम्यानच्या रो-पॅक्स जहाज वाहतुकीचे उद्‌घाटन केले.


🔰आसाम आणि ईशान्येकडील अन्य भागात संपर्क हे मोठे आव्हान राहिले आहे. ‘महाबाहु-ब्रह्मपुत्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राद्वारे बंदर विकासातून जल संपर्क सुविधा मजबूत केली जाणार आहे. सुरू करण्यात आलेल्या तीन रो-पॅक्स सेवांमुळे इतक्या मोठ्या स्तरावर रो पॅक्स सेवेशी जोडले गेलेले आसाम राज्य देशातील अग्रणी राज्य झाले आहे. यामुळे चार पर्यटन जेट्टीसह आसामसह ईशान्येकडील संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा होईल.


🔰माजुली ते नेमाटी दरम्यान रो-पॅक्स सेवा असा एक मार्ग आहे, ज्यामुळे रस्ते प्रवासाचे सुमारे 425 किमीचे अंतर कमी होऊन ते फक्त 12 किमीपर्यंत येईल. या मार्गावर दोन जहाजे चालविण्यात येत आहेत, जी एका वेळेला 1600 प्रवासी आणि डझनभर वाहनांची वाहतूक करतात.


🔰गवाहाटीमध्ये सुरू झालेली अशाच प्रकारची सुविधा उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीमधील अंतर 40 किमीवरून 3 किमीपर्यंत कमी करेल.

नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ जाहीर.



💫18 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय 

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज अभियानाने ‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ समूहासाठी (आपल्या आजूबाजूचा परिसर विकास आव्हान) अंतर्गत 25 शहरांची अंतिम यादी जाहीर केली आहे.


💫‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ समूहासाठी पुढील शहरे निवडली आहेत - आगरतळा, बंगळूरू, कोइंबतूर, धर्मशाला, इरोडे, हुबळी-धारवाड, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, काकीनाडा, कोची, कोहिमा, कोटा, नागपूर, राजकोट, रांची, रोहतक, राउरकेला, सालेम, सूरत, तिरुवनंतपुरम, तिरुपुर, उज्जैन, वडोदरा आणि वरंगल.


💫तीन महिन्यांच्या अर्जाच्या कालावधीत, नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज अंतर्गत 100 पेक्षा जास्त शहरे दूरस्थ किंवा वैयक्तिक चर्चा आणि ऑनलाइन क्षमता-निर्माण कार्यशाळांमध्ये सहभागी झाली. एकत्रितपणे, संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त पायलट प्रकल्प प्रस्तावित आहेत जे 0-5 वर्षे वयोगटातील 12 लाख मुलांचे जीवनमान सुधारतील.


🌈कार्यक्रमाविषयी.....


💫4 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंजने सर्व स्मार्ट शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. 


💫या उपक्रमात, निवडलेल्या शहरांना त्यांचा प्रस्ताव, सज्जता आणि वचनबद्धतेच्या आधारे-लहान मुलांचे जीवनमान सुधारणारे प्रायोगिक प्रकल्प आणि स्थानिक समाधान विकसित करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक मदत आणि क्षमता-निर्मिती उपलब्ध करून दिली जाईल.


💫सर्वसमावेशक विकासाच्या मुख्य उद्देशांतर्गत, केंद्र सरकार सर्व असुरक्षित नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी शहरी भागात संधी वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे.


💫हा तीन वर्षात राबविला जाणारा उपक्रम आहे, सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत मुलांचे बालपण केंद्रस्थानी ठेवून शेजारील परिसराचा विकास करण्यास मदत करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

बर्नार्ड व्हॅन लीअर फाऊंडेशन आणि तांत्रिक भागीदार WRI इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


💫लहान मुलांच्या समृद्ध बालपणासाठी आरोग्यदायी शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी शहरांना सहभागी करून या आव्हानाने स्थानिक पातळीवरील शेजारील परिसर विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांची गुणवत्ता वाढविणार्‍या स्थानिक क्षेत्रात सुटसुटीत, सर्वसमावेशक, लोकाभिमुख विकासासाठी शहर-व्यापी उपाययोजना वाढविण्यासाठी स्मार्ट सिटीज अभियानाच्या धोरणाशी हा दृष्टिकोन सुसंगत आहे.

सार्वत्रिक लसीकरणासाठी ‘सघन मिशन इंद्रधनुष 3.0’



🔰केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 19 फेब्रुवारी 2021 रोजी ‘सघन मिशन इंद्रधनुष (IMI) 3.0’ या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ केला.


🔰कद्रीय मंत्र्यांनी IMI 3.0 पोर्टल देखील सुरू केले आणि IMI 3.0 यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली तसेच अभियानाचा एक भाग म्हणून विकसित केलेल्या जनजागृती साहित्य / IEC पॅकेजचे अनावरण केले.


🅾️ठळक बाबी


🔰अभियान दोन फेऱ्यात होणार असून, पहिली फेरी 15 दिवसांसाठी 22 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार आणि दुसरी फेरी 22 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे.


🔰दशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात त्यांचे आयोजन केले जाईल.


🔰कोविड-19 महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवती स्त्रियाना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर या कार्यक्रमामध्ये भर दिला जाणार आहे. IMI 3.0 च्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लस दिली जाईल.


🔰सथलांतरित क्षेत्रातील लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.


🅾️भारत सरकारचे मिशन इंद्रधनुष


🔰2020 सालापर्यंत देशातील सर्व बालकांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत आणण्यासाठी 15 डिसेंबर 2014 रोजी ‘मिशन इंद्रधनुष’ हे अभियान आरोग्य मंत्रालयाने सुरू केले. 2018 सालापर्यंत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत दोन वर्षाखालील वयोगटातली मुले आणि गर्भवती स्त्रियांना उपलब्ध सर्व लसी प्रदान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होता.


🔰8 ऑक्टोबर 2017 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये ‘सघन मिशन इंद्रधनुष’ (Intensified Mission Indradhanush -IMI) या अभियानाला सुरुवात करण्यात आली. हा भारत सरकारचा एक प्रमुख लसीकरण कार्यक्रम आहे. यादरम्यान निवडक शहरी क्षेत्रांमध्ये आणि अन्य ठिकाणी, जेथे लसीकरण कमी प्रमाणात केले जाते, तेथे लक्ष केंद्रित केले गेले. या विशेष अभियानांतर्गत 90 टक्के क्षेत्रांना सामील केले जाईल.


🔰“सघन मिशन इंद्रधनुष” आतापर्यंत 690 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आले आहे आणि 3 कोटी 76 लक्ष 40 हजार मुले आणि 94 लक्ष 60 हजार गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

‘गो इलेक्ट्रिक’: विजेवर चालणाऱ्या वाहन व उपकरणांच्या लाभाबाबत जागृती मोहीम



🔰19 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘गो इलेक्ट्रिक’ नामक एका मोहिमेचा प्रारंभ केला गेला. शिवाय ई-मोबिलिटी इको सिस्टीमचा विकास दर्शवणाऱ्या गो इलेक्ट्रिक मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.


🔰विजेवर चालणारी वाहने, अश्या वाहनांसाठी चार्जिंगची पायाभूत सुविधा आणि स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या लाभाबाबत जागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.


🅾️ठळक बाबी


🔰ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी ब्युरोकडे (BEE) ही जागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयातीचे 8 लक्ष कोटी रुपयांचा खर्च असलेल्या जीवाश्म इंधनासाठी ‘इलेक्ट्रिक वीज’ इंधन हा एक शाश्वत पर्याय आहे. पारंपरिक इंधनाशी तुलना करता वीज इंधन हे कमी खर्चिक, कार्बन उत्सर्जन कमी करणारे आणि स्वदेशी आहे.


🔰गो इलेक्ट्रिक मोहीम, येत्या काही वर्षात देशाचे आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करेल आणि स्वच्छ आणि हरित भविष्यासाठीही हे महत्वाचे पाऊल ठरेल.


🔰दशभरात जागृती निर्माण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांचा आत्मविश्वास वृद्धिगत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नासाची ऐतिहासिक झेप! ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग



🔰मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था 'नासा'ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. १८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.


🔰मगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरील पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं. नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हर पाठवला होता. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता रोव्हरचं यशस्वीपणे लँडिंग करण्यात आलं. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.


🔰नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे. मंगळवार जीवसृष्टी अस्तित्वात होती का? याचा शोध घेण्यासाठी नासानं पर्सिव्हरन्स रोव्हर पाठवलं असून, मंगळ ग्रहावरील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जेजेरो क्रेटरमध्ये (Jezero Crater) रोव्हर उतरवण्यात आलं आहे. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येणार आहे.


🔰'पर्सिव्हवरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येऊल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,' असं नासानं म्हटलं आहे.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...