आजचे प्रश्नसंच

1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले?

A. चूरामन (चूड़ामणि) ✅
B. गोकुलसिंह
C. राजाराम
D. बदनसिंह

🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721)

मुगलांबरोबर लढाई

2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते?

A. जवाहरसिंह
B. सूरजमल ✅
C. नंंदराम
D. गोकुल सिंह

🔴जाटों का प्लेटों
कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली

3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला?

A. सूरजमल
B. अली बहादुर
C. बंदा बहादुर ✅
D. बदनसिंह

🔴गुरु गोविंदसिंग यांची राजधानी होती

लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर
खालसा राज्य स्थापना

4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली?

A. वजीर खां
B. फर्रुखसियर ✅
C. बहादुरशाह पहिला
D. यापैकी कोणी नाही

🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.

5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ?

A. कर्नल स्लीमेन ✅
B. लॉर्ड एल्गिन
C. सर जॉन लॉरेंस
D. लॉर्ड मियो

🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.

पाबना शेतकरी विद्रोह 1873-76

★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली

★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध "युसूफ सराय" च्या शेतकर्यांनी "क्रुषक संघ" स्थापन केला

🔸प्रमुख नेता:- ईशान चन्द्र राय, शंभुपाल

★ कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले

★ दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, " आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो"

★ समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय,  आर.सी. दत्त,  सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले

आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष


📚 पहिली १९६० : सयाजी सिलम

📚 दुसरी १९६२ : त्र्यंबक भरडे

📚 तिसरी १९६७ : त्र्यंबक भरडे

📚 चौथी १९७२ : एस. के. वानखेडे, बाळासाहेब देसाई

📚 पाचवी १९७८ : शिवराज पाटील, प्राणलाल वोरा

📚 सहावी १९८० : शरद दिघे

📚 सातवी १९८५ : शंकरराव जगताप

📚 आठवी १९९० : मधुकरराव चौधरी

📚 नववी १९९५ : दत्ताजी नलावडे

📚 दहावी १९९९ : अरुणलाल गुजराती

📚 अकरावी २००४ : बाबासाहेब कुपेकर

📚 बारावी २००९ : दिलीप वळसे-पाटील

📚 तेरावी २०१४ : हरिभाऊ बागडे

📚 चौदावी २०१९ : नाना पटोले
_____________________________________

चीनची नवी खेळी, भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी.

🔰भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचं मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

🔰भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केलं जाऊ शकतं.

🔰१५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान झालं असून भारताचे २० जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत.

काँग्रेसचे अधिवेशन व अध्यक्ष

1885 - मुंबई : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

1886 -  कोलकाता : दादाभाई नौरोजी

1887 -  मद्रास : बुद्रुदिन तय्यबजी

1888 -  अलाहाबाद : जॉर्ज युल

1889 - मुंबई : सर विल्यम वेडरबर्न

1890 - कोलकाता : फिरोजशहा मेहता

1891 - नागपूर : पी आनंदा चारलू

1892 -  अलाहाबाद : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

1893 - लाहोर : दादाभाई नौरोजी

1894 -  चेन्नई : आल्फ्रेड वेब

1895 - पुणे : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

1896 - कोलकाता : महंमद सयानी

मत्स्यव्यवसाय

खाऱ्या पाण्याच्या मत्स्योत्पादनात प्रथम क्रमांक – केरळ

गोड पाण्याच्या मत्स्य उत्पादनात प्रथम क्रमांक – पश्चिम बंगाल

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचबरोबर सागरी मासेमारी करिता 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव आहे.

महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावर मासोळी उतरण्याकरिता 173 केंद्र आहे

देशातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 13.1 % इतके आहे सर्वात जास्त बोंबीलचे उत्पादन ठाणे जिल्ह्यात होते.

खोपोली (रायगड) येथे पहिला मत्स्यबीज व केंद्राची स्थापना करण्यात आली होती.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्रांती घडवून आणलेले आहे.

हरितक्रांती

नीळक्रांती मत्स्यउत्पादन

पित्त क्रांती गळीत धान्य तेल उत्पादन वाढविण्यासाठी

श्वेतक्रांती रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी

गुलाबी क्रांती झिंगी उत्पादन वाढविण्यासाठी

इंद्रधनुष क्रांती डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचविलेल्या 7 सुधारणांना इंद्रधनुष क्रांती असे म्हटले जाते

सुवर्ण क्रांती फळे व मधमाशी पालन

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती


▪️1. ग्रहाचे नाव - बूध

·         सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

·         परिवलन काळ - 59 

·         परिभ्रमन काळ - 88 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 

▪️2. ग्रहाचे नाव - शुक्र

·         सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

·         परिवलन काळ - 243 दिवस 

·         परिभ्रमन काळ - 224.7 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

▪️3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

·         सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

·         परिवलन काळ - 23.56 तास 

·         परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 

▪️4. ग्रहाचे नाव - मंगळ

·         सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

·         परिवलन काळ - 24.37 तास 

·         परिभ्रमन काळ - 687 

·         इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत. 

▪️5. ग्रहाचे नाव - गुरु

·         सूर्यापासुन चे अंतर - 77.86 

·         परिवलन काळ - 9.50 तास 

·         परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे 

इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

 

▪️6. ग्रहाचे नाव - शनि

·         सूर्यापासुन चे अंतर - 142.6 

·         परिवलन काळ - 10.14 तास 

·         परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष 

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत. 

▪️7. ग्रहाचे नाव - युरेनस  

·         सूर्यापासुन चे अंतर - 268.8  

·         परिवलन काळ - 16.10 तास 

·         परिभ्रमन काळ - 84 वर्षे 

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

▪️8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  

·         सूर्यापासुन चे अंतर - 449.8 

·         परिवलन काळ - 16 तास 

·         परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे 

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी


📚लोककला क्षेत्रात प्रदीर्घ कामगिरीसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा '**तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ कलावंत गुलाब संगमनेरकर** यांना.

📚तसेच संगीत रंगभूमीवरील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी देण्यात येणारा 'संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना  जाहीर झाला.

📚 मानपत्र, मानचिन्ह व पाच लाख रुपयेअसे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

📚नारायणगावकर पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठीचा तर किर्लोस्कर पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठीचा आहे. सरकार स्थापनेची प्रक्रिया आणि नंतर करोना संकट या कारणांमुळे पुरस्कार घोषणेची प्रक्रिया लांबली.

📚संगमनेरकर यांनी वयाच्या नवव्या वर्षांपासून तमाशा क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांनी तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत कामे केली. काही हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या. 'रज्जो' चित्रपटात त्यांची भूमिका आहे.

📚लता मंगशेकर यांच्या 'लताबाईंच्या आजोळची गाणी' या अल्बममध्ये त्यांनी काही गाण्यांवर अदाकारी सादर केली आहे. 'गाढवाचे लग्न' या वगनाट्यात त्यांनी काम केले आहे. ८८ वर्षांच्या संगमनेरकर वयोमानामुळे आता निवडक ठिकाणी गाण्याचे सादरीकरण करतात.

📚बालगंधर्वांना आदर्श मानणाऱ्या दांडेकर यांनी संगीत रंगभूमीची दीर्घ काळ सेवा केली आहे. नाटककार विद्याधर गोखले यांच्या रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये काम करून त्यांची कारकीर्द घडली. '

📚एकच प्याला', 'कृष्णार्जुनयुद्ध', 'झाला महार पंढरीनाथ', 'देव दीनाघरी धावला', 'मानापमान', 'मृच्छकटिक', 'संशयकल्लोळ', 'सौभद्र' व 'स्वयंवर' अशा गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. सत्तरी पार केलेल्या दांडेकर आजही संगीत रंगभूमीवर उत्साहाने कार्यरत आहेत.

संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार

📚 राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी आज सूत्रे हातात घेतली आहे . मावळते मुख्य सचिव म्हणून अजोय मेहत यांचा आज मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज संजय कुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली आहे.

📚संजय कुमार हे अजोय मेहता यांच्याप्रमाणेच १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असून त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारदेखील आहे.

📚अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रवीणसिंह परदेशी हेही मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते मात्र ज्येष्ठतेनुसार संजय कुमार यांना संधी देण्यात आली.

📚संजय कुमार यांनी प्रशासनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. बीड, उस्मानाबाद, औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जून १९९२ ते सप्टेंबर १९९७ दरम्यान काम पाहिले. त्याआधी ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते.

📚पुणे महापालिका आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिवही होते अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदाची मुदत आज संपली आहे. त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच वेळी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात महत्त्वाची
जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहता हे विश्वासू मानले जातात.

मेहतांकडे ही जबाबदारी:-

📚कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

📚कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असे मुख्यमंत्री सचिवालययाने म्हटले आहे.

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...