बटुकेश्वर दत्त 

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले.

१९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

१९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब मोहनदास गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

१९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारी स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

म्हणी व अर्थ ----

म्हण - आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.

अर्थ - दुसऱ्यांनी केलेल्या बारीक-सारीक चुका दिसतात, परंतु आपल्या हातून कितीही मोठी चूक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे.

म्हण - आलीया भोगासी असावे सादर.

अर्थ - आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे त्यानुसार भोगावे लागते, त्याबद्दल कुरकुर करु नये.

म्हण - आहेर नारळाचा गजर वाजंत्र्याचा.

अर्थ - लहानसे काम करुन त्याचा गाजावाजा मोठ्याने करायचा.

🔶🔶Synonyms🔶🔶


✳️Economical ,  frugal , thrifty

🔶Extravagant , lavish , wasteful , excessive

✳️False , untrue

🔶Fatal , lethal , mortal , deadly

✳️Enthusiasm - zeal , eagerness , fervour , passion

🔶Eradicate , uproot , destroy , remove

♻️ ठिकाण – विशेष नाव ♻️


______________

• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.

• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.

• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.

• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.

• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.

• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.

• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
______________________________

◼️उत्तराखंड: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना राबविण्यात सर्वोत्तम ठरलेले राज्य

भारत सरकारची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्तराखंड राज्य हे देशातल्या पाच सर्वोत्तम कामगिरी दर्शविणार्‍या राज्यांपैकी एक ठरले आहे. जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या (SRB) बाबतीत उत्तराखंडने सर्वोत्तम कामगिरी दर्शविलेली आहे.

उत्तराखंडच्या व्यतिरिक्त, हरियाणा राज्याने जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या बाबतीत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी एक राज्यस्तरीय आणि दोन जिल्हास्तरीय पुरस्कारांसह एकूण तीन पुरस्कार जिंकले आहेत. हरियाणाच्या भिवानी आणि महेंद्रगड या दोन जिल्ह्यांनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवलेत.

सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तर सरासरीने 161 जिल्ह्यांमध्ये वाढले असून ते प्रमाण सन 2015-16 मधील 909 मुली (प्रत्येक 1000 मुलांमागे) यावरून सन 2018-19 मध्ये 919 मुली एवढे होते.

❇️‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा मुलगी शिकवा) (BBBP) हया उपक्रमाचा शुभारंभ हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी झाला. या उपक्रमात बाल लिंग गुणोत्तरात (child sex ratio) होणारी घसरण तसेच महिला सक्षमीकरण संदर्भातल्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

◼️कार्यक्रमाची उद्दिष्टे -

🔸पक्षपाती लिंग निवड प्रक्रियेचे उच्चाटन करणे.

🔸मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण याची खात्री करणे.

🔸मुलींच्या शिक्षणाची खात्री करणे.

‘पूर्वग्रह व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा-1994' कायद्याची अंमलबजावणी, देशभर जनजागृती आणि सल्ला ही मोहीम राबवणे तसेच बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्‍या 100 जिल्ह्यांमध्ये बहु-विभागीय उपाययोजना करणे यांचा पहिल्या टप्प्‍यात समावेश आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात प्रशिक्षण, जनजागृती यामध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते, लाडली लक्ष्मी, मुलींसाठी शाळेचा शुल्क माफ, मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत प्राधान्य, ‘सर्वांना घर’ योजनेच्या अंतर्गत अनुदान, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विनामूल्य LPG जोडणी आणि अन्य अश्या विविध योजना राबविल्या जातात.

​🔹भारतातली जागतिक वारसा स्थळे

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.

आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

▪️सांस्कृतिक

1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

▪️नसर्गिक

1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

▪️मिश्र

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

▪️UNESCO बाबत

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

Latest post

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत. ◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 ...