Saturday 19 August 2023

19 ऑगस्ट चालू घडामोडी

1) महाराष्ट्र राज्यात क्रांती गाथा या भारतीय क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी

2) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित केली जाणार आहे?
✅ डेन्मार्क

3) जागतिक नमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इशा सिंह आणि शिवा नरवाल यांनी कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्ण

4) डोप चाचणीत अपयशी ठरल्याने कोणत्या भारतीय खेळाडूवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे?
✅ दुती चंदवर

5) अलीकडेच मोफत अन्न पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे?
✅ राजस्थान

6) भारत आणि कोणत्या देशात स्थानिक चलनात पहिला कच्चा तेलाचा व्यवहार अलीकडे झालेला आहे?
✅ UAE

7) कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केंद्रिय मंत्री मंडळाने 32,500 कोटी रुपयांच्या किती रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
✅ सात

8) महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे?
✅  'लखपती दीदी’

9) नुकतेच जागतिक अँथलेटिक्स कार्यकारी मंडळावर कोणाची निवड झाली आहे?
✅ अदिले सुमारीवाला

10) भारतीय नौदलाच्या ताफ्यात नवीनतम INS विंध्यगिरी कोणी लाँच केली?
✅ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठवाडा मुक्ती संग्राम



मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.

मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये 

1)औरंगाबाद

2)नांदेड 

3)परभणी 

4)बीड 

5)जालना 

6)लातूर 

7)उस्मानाबाद व 

8) हींगोली 

हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत

लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.


पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.


या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.


निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला. 

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.

15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.

 या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.

    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.


१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

महाराष्ट्र पोलिस भरती- प्रश्नसराव


           

Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???

(१) जात आणि भाषा

(२) धर्म आणि जात 

(३) भाषा आणि वंश

(४) एकतर धर्म किंवा भाषा🚨


Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत  भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?

(१) 15,325, 12

(2) 14,321,10🚨🚨

(3) 16,320,8

(4) 17,324,10


Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??

(1) 7

(२) 15

(3) 16

(4) 14🌹🌹


Q 4  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते 

(1) कलम 16

(2) कलम 14 🚔🚔

(3) कलम 13 

(4) कलम 15


Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??

(1) एन, जी , रंगा🇮🇳🇮🇳

(2) शंकर देव 

(3) नरेंद्र देव 

(4) श्री, अमृत डांगे


Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???

(1) ना, म, जोशी 

(2) लोकमान्य टिळक

(3) लाला लजपतराय ✍️✍️

( 4) महात्मा गांधी


Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??

(1) लॉर्ड कर्झन 

(2) पंचम जॉर्ज 🌹🌹

(4) इंग्लड सरकार

(4) ब्रिटिश पार्लमेंट

स्पष्टीकरण:-

1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली


Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे  जयंती साजरी केली??

(1) कबीर 🇮🇳🇮🇳

( 2) मुझिनी

(3) आदिलशहा

(4) अकबर


Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????


(1) 61.6

(2) 64.4👑👑

(3) 63.3

(4)66.6

 


Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????

(1) बिलिगिरी

(2) निलगिरी 🦚🦚

(3) नल्लामल

(4) निमगिरी


Q 11 लु" कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????

(1) एप्रिल-मे

(2) मे-जून🇮🇳🇮🇳

(3) जून-जुलै

(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर


Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??

(1) 3२.5%

(2) 30.5%

(3) 25%☘️☘️

(4) 28%


Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर  होता????**

(1) 4.5%

(2) 2.5%

(3) 3.5%🚔🚔

(4) 4.0%


Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??

Q 14  Which cells in human body release histamine in responses to an infection??

(1) मस्ट पेशी  📌📌

(2) लाल रक्त पेशी 

(3) लिंफोसाइट्स

(4) मिनोसाइट्स


Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ......... या प्राणी वर्गत मोडते???

Q 15 Egg laying mammals are included in .......... animal gruop.???

(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)

(2) थेरिया(Theria) 📌📌

(3) युथेरिया(Eutheria)

(4) मेतेथेरूया(Metatheria)

🩸


1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले? 


A. चूरामन (चूड़ामणि) ✅

B. गोकुलसिंह

C. राजाराम

D. बदनसिंह


🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721)


मुगलांबरोबर लढाई



2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते? 


A. जवाहरसिंह

B. सूरजमल ✅

C. नंंदराम

D. गोकुल सिंह


🔴जाटों का प्लेटों

कार्यकाल 1755 ते 1763


1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

 

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली




3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला? 


A. सूरजमल

B. अली बहादुर

C. बंदा बहादुर ✅

D. बदनसिंह


🔴गरु गोविंदसिंग यांची राजधानी होती


लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर

खालसा राज्य स्थापना



4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली? 


A. वजीर खां

B. फर्रुखसियर ✅

C. बहादुरशाह पहिला

D. यापैकी कोणी नाही


🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.


5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ? 


A. कर्नल स्लीमेन ✅

B. लॉर्ड एल्गिन

C. सर जॉन लॉरेंस

D. लॉर्ड मियो


🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.

साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये



🎯भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे. 


🛑साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम पाच राज्य खालीलप्रमाणे सांगता येतील.

 1) केरळ (93.91%), 

 2) लक्षद्वीप (92.28%), 

 3) मिझोराम(91.58%),

 4) त्रिपुरा(87.75%), 

 5) गोवा(87.40%), 


🛑साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्ये


1) बिहार (63.82 टक्के )

2) तेलंगणा (66.5 टक्के )

3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के )

4) राजस्थान (67.06 टक्के )

5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)

6) झारखंड (67.63 टक्के)

7) जम्मू आणि कश्मीर (68.74 टक्के) 

8) उत्तर प्रदेश ( 69.72 टक्के )

9) मध्य प्रदेश (70.63 टक्के) 

10) छत्तीसगड (71.04 टक्के)

महाराष्ट्र - सामान्यज्ञान



★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. देवेंद्र फडणवीस
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : चेन्नमनेनी विद्यासागर राव
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१

दुहेरी राज्यव्यवस्था



०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.


०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.


०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.


०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.


०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)


०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.

मूलभूत अधिकार/हक्क



· भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे. 


· घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे. 


· म्हणून सध्या 6 अधिकार आहेत. 


1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18




2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22




3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24




4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28




5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30




6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार - कलम 32

Imp इन्फॉर्मशन.....


1) ✅️ कच्ची फळे पिकवण्यासाठी गॅस  - इथिलीन



2) ✅️ शक्तीचे एकक  - वॅट



3) ✅️ हवेचा दाब मोजण्यासाठी  - बॅरोमीटर



4) ✅️ संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना - मुंबई



5) ✅️ अभिनव भारत संघटना - स्वातंत्र्यवीर सावरकर



6) ✅️ उर्दू भाषेचा निर्माता  - अमीर खुसरो



7) ✅️ शेतकऱ्यांचा आसूड  - महात्मा फुले



8) ✅️ केसरी वर्तमानपत्र  - बाळ गंगाधर टिळक



9) ✅️ भोगावती नदीवरील धरण  - राधानगरी



10) ✅️ मनसर टेकड्या  - नागपूर



11) ✅️ तिस्ता नदीचा उगम  - पश्चिम बंगाल



12) ✅️ नर्मदा नदीचा उगम  - अमरकंटक



13) ✅️ मसूरी थंड हवेचे ठिकाण  - उत्तराखंड



14) ✅️ जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन   - भारत



15) ✅️ जीवन रेखा सिंचन प्रकल्प - जालना



16) ✅️ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान   - आसाम



17) ✅️ भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार  -  नवी दिल्ली



18) ✅️ जगातील सर्वात लांब नदी  - नाईल



19) ✅️ भारताचे मध्यवर्ती ठिकाण  - नागपूर



20) ✅️ इंटरपोलचे मुख्यालय  - फ्रान्स



21) ✅️ भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती  - 1843



22) ✅️ माहिती अधिकार कायदा  - 2005



23) ✅️ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय   - हेग



24) ✅️ इस्राईलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव   - मोझाद



25) ✅️ महाराष्ट्राचे निमलष्करी दल   - SRPF



26) ✅️ महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय   -  मुंबई



27) ✅️ महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने  - पानझडी



28) ✅️ भारतातील सर्वात मोठा दिवस - 21 जून



29) ✅️ अफगाणिस्तान देशाची राजधानी  - काबुल



30) ✅️ केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक   - गोपाळ गणेश आगरकर

माहितीचा अधिकार कायदा (RTI - Right to Information Act)

 माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला देश स्वीडन हा ठरला आहे.

 1766 मध्ये फ्रिडम ऑफ प्रेस अक्ट असा कायदा करून स्वीडने महितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य केला.

 स्वीडननंतर डेन्मार्क, फीनलँड व नॉर्वे या देशांनी माहितीच्या अधिकारचे कायदे केले.

 1966 साली अमेरिकेत 'फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्ट' स्वीकारण्यात आला.

 1966 मध्ये ब्रिटनने महितीचा अधिकार स्वीकारला....

 1982 च्या दरम्यान कॅनडा, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रकुलातील देशांनी माहितीच्या अधिकाराचा पुरस्कार केला.

 1990 पर्यंत जगातील 13 राष्ट्रांनी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता.

 १९९० नंतर भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता...

 28 डिसेंबर 2005 रोजी चीनने 'द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन ऑफ लॉ' असा कायदा लागू केला..

 जागतिक माहिती अधिकार सप्ताह 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत असतो.

 महाराष्ट्र माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर हा असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त केंद्र सरकारने माहितीचा अधिकार हा कायदा संपूर्ण भारतात 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू केला.

 माहितीचा अधिकार हा कायदा एकूण 31 कलमांचा आहे. या कायद्यातील कलम 12 नुसार, केंद्रीय माहिती आयोगाची रचना केली आहे.

 केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 साली करण्यात आली. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

 आयोगात 1 मुख्य माहिती आयुक्त असतो. तर जास्तीत जास्त इतर 10 माहिती आयुक्त असतात.

 केंद्रीय माहिती आयुक्तांचा दर्जा निवडणूक आयुक्तांसारखा असतो. यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना दरमहा 90000 इतके वेतन असते.

 भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह हे होते.

विभागीय आयुक्त



     राज्याने प्रशासन योग्यरीत्या चालविले जावे यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहेत. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद.

प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात. विभागीय आयुक्त हा सर्वात महत्वाचा प्रादेशिक अधिकारी असतो. तो आपल्या क्षेत्रात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. लॉर्ड विल्यम बेन्गटिंकने १८२९ मध्ये महसूल आयुक्त हे पद निर्माण केले. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीश यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले.

– राजस्थान सरकारने १९६१ ला आपल्या राज्यातून विभागीय आयुक्त हे पद रिक्त ( रद्द ) केले.

– उत्तरप्रदेशमध्ये विभागीय आयुक्तांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली.

पात्रता                       पदवीधर

निवडणूक                   UPSC मधून बढतीद्वारे

नेमणूक                      राज्य शासन

दर्जा                          IAS  चा असतो.

कार्यक्षेत्रे                     महसूल आणि प्रशासकीय विभाग

वेतन व भत्ते                 राज्य शासन

कार्यकाळ                    महसूल आणि प्रशासकीय विभाग

वेतन व भत्ते                  राज्य शासन

कार्यकाल                     ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

राजीनामा                     राज्य शासनाकडे

रजा                            राज्य शासन

बडतर्फी                       केंद्र शासनाद्वारे


विभागीय आयुक्तांचे अधिकार व कार्य 


१) विभागीय महसूल प्रशासकीय अधीकारी म्हणून भूमिका पार पाडणे.

२) आपल्या क्षेत्रातील शासनाच्या विविध विबीभागामध्ये काही वाद झाल्यास त्यांचे निराकरण करणे.

३) पंचायतिराजसंबंधित भूमिका पार पाडणे.

४) जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार

५) गावातील पडीक जमिनीचे मागासवर्गीयांमध्ये वाटप करणे.

६) जमीनदारी पद्धतीवर अंकुश ठेवणे.

७) पोलीस प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

८) विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

९) विभागातील विविध यंत्रणामधून माहिती, आकडेवारी, तक्ते, अहवाल मागविणे त्यांची तपासणी करणे व राज्य शासनास अहवाल देणे.

१०) शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणे.

११) विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.


भारतीय संविधानाचे भाग


------------------------------------------------

 •    भाग १ - कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी

------------------------------------------------

•    भाग २ - कलमे ५-११ नागरिकत्व

------------------------------------------------

•    भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

•    कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

•    कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

•    कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

•    कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

------------------------------------------------

•    भाग ४ 

•  सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१ 

•  कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन 

•  कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार 

•  भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये. 

------------------------------------------------

•  भाग ५ -

•  प्रकरण १ - कलमे ५२-७८ 

•  कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, 

•  कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक 

•  कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी, 

•  कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत. 

•  कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत, 

•  कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत, 

•  कलमे ९९-१०० 

•  कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत, 

•  कलमे १०७-१११ (law making process) 

•  कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत, 

•  कलमे ११८-१२२ 

•  प्रकरण ३ - कलम १२३ 

•  कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत 

•  प्रकरण ४ - कलमे १२४-१४७ 

•  कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत 

•  प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत. 

•  कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत 

------------------------------------------------ 

भाग ६- राज्यांच्याच्या बाबतची कलमे. 

•  प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या 

•  कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून 

•  प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत 

•  कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत, 

•  कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर, 

•  कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत. 

•  कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत. 

•  प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित. 

•  कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती 

•  कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार 

•  कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी 

•  कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे 

•  कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी 

•  कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी 

•  कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी 

•  प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत 

•  कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके. 

•  प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

•  भाग ७- राज्यांच्या बाबतील कलमे. 

•  कलम २३८ - 

------------------------------------------------

*•  भाग ८* - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे 

•  कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

•  भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे 

•  कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत 

------------------------------------------------

•  भाग ९ऎ- नगरपालिकांबाबतची कलमे. 

•  कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत 

------------------------------------------------

•  भाग १० - 

•  कलमे २४४ - २४४ऎ 

------------------------------------------------

•  भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी 

•  प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  प्रकरण २ - कलमे २५६ - २६३ 

•  कलमे २५६ - २६१ - सामान्य 

•  कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत. 

•  कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध. 

------------------------------------------------

•  भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत 

•  प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत 

•  कलमे २६४ - २६७ सामान्य 

•  कलमे २६८ - २८१ 

•  कलमे २८२ - २९१ इतर 

•  प्रकरण २ - कलमे २९२ - २९३ 

कलमे २९२ - २९३ 

•  प्रकरण ३ - कलमे २९४ - ३०० 

•  कलमे २९४ - ३०० 

•  प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक 

•  कलम ३००ऎ - 

------------------------------------------------

•  भाग १३- भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे 

•  कलमे ३०१ - ३०५ 

•  कलम ३०६ - 

•  कलम ३०७ - 

------------------------------------------------

•  भाग १४ - 

•  प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४ 

•  कलमे ३०८ - ३१३ 

•  कलम ३१४ - 

•  प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

•  कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

--------------------------------------.........

•  भाग १४ऎ - आयोग च्या बाबत कलमे 

•  कलमे ३२३ऎ - ३२३बी 

---------------------------------------------

•  भाग १५- निवडणूक विषयक कलमे 

•  कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे 

•  कलम ३२९ ऎ - 

----------------------------------------------

•  भाग १६- 

•  कलमे ३३० -३४२ 

-------------------------------------------

•  भाग १७- अधिकृत भाषॆबाबतची कलमे 

•  प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत 

•  कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी 

•  कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि 

•  प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश 

•  कलम ३५० - 

•  कलम ३५० ऎ - 

•  कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम 

•  कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम 

-----------------------------------------------

•  भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलम ३५९ऎ - 

•  कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

---------------------------------------------- 

•  भाग १९ - इतर विषय

•  कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय 

•  कलम ३६२ - 

•  कलमे ३६३ - ३६७ - इतर 

-----------------------------:-::-------------

•  भाग २० -

•  कलम ३६८ - घटनादुरुस्ती

---------------------------------------------

•  भाग २१ -

•  कलमे ३६९ -३७८ऎ 

•  कलमे ३७९ - ३९१ - 

•  कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क 

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती.


✅ भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.


✅ भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.


❇️ भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल.


❇️ अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.


❇️ सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.


❇️ जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)


❇️ इग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.


✅ आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.


❇️ गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. 


❇️ गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.

प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. 


❇️ गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. 


5⃣ परांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.


❇️ गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.


❇️ परधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


१) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32    2) अनुच्छेद 25    3) अनुच्छेद 14    4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1

२) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4

३) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
   2) मालमत्तेविषयक हक्क
   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क
   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- 2

४) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये
   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार
   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट
   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4

५) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा    2) विधान परिषद    3) उच्च न्यायालय    4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

   1) सर्व विधाने
   2) कोणतेही नाही
   3) फक्त अ 
   4) अ आणि ब

उत्तर :- 3

७) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

उत्तर :- 4

८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती
        व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.

   1) अ    
   2) ब  
   3) क   
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

९) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा    2) स्वातंत्र्याचा 
   3) धर्माचा    4) चौथ्या

उत्तर :- 1

१०) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार 
    2) संपत्तीचा अधिकार
   3) स्वातंत्र्याचा अधिकार  
   4) शैक्षणीक अधिकार

उत्तर :- 2

११) मूलभूत हक्कांसदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत.
   ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते.
   क) संसद त्यांवर मर्यादा घालू शकते.
   ड) ते समर्थनीय आहेत.

    1) अ 
    2) ब   
   3) क  
   4) ड

उत्तर :- 1

१२) भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील “धर्मस्वातंत्र्याचा हक्क” यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ?

   1) एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क

   2) एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क

   3) एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क

   4) सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क

उत्तर :- 4

१३) मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे  ?

   1) कायदेमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ
   3) राजकीय पक्ष 
   4) न्यायमंडळ

उत्तर :- 4

१४) भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती ?

   1) कलम 13 ते 17 
  2) कलम 14 ते 18 
  3) कलम 15 ते 19   
4) कलम 16 ते 20

उत्तर :- 2

१५) घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

   अ) पोटकलम 4-A चा 77 व्या घटनादुरुस्तीव्दारे समावेश केला गेला.

   ब) पोटकलम 4-A हे पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात आहे.

   क) पोटकलम 4-A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या हिताकरता, पदोन्नतीमधील    आरक्षणासंदर्भात आहे.

   1) अ आणि ब बरोबर, तर क चूक आहे.

   2) अ आणि क बरोबर, तर ब चूक आहे.

   3) सर्व बरोबर आहेत

   4) अ बरोबर, तर ब आणि क चूक आहेत.

उत्तर :- 1

१६) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

   1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

    2) मुद्रण स्वातंत्र्य

   3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2

१७) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व 
   ब) देशाची एकता   
   क) प्रांताची सुरक्षितता  
   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

   1) अ, क    2) ब, ड    
  3) अ, ब      4) ड

उत्तर :- 3

१८) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क   
   2) स्वातंत्र्याचा हक्क 
   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 
  4) मालमत्तेचा हक्क

उत्तर :- 4

१९) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. 

   1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)
   2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)

उत्तर :- 3

२०) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या   अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.

         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ  
2) केवळ ब आणि क   
3) केवळ अ आणि क   
4) केवळ अ, ब आणि क

उत्तर :- 4

1935 चा कायदा.



🔹या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.


🔸1935 च्या कायद्याने प्रांतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.


🔸1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.


🔹सघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.


🔸या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.


🔹1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.


🔸भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.


🔹मस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.


🔸1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.


🔹1935 चा कायदा म्हणजे – संपूर्ण सडलेला मूलत: निष्कृष्ट, अनई संपूर्णपणे अस्विकाहार्य बॅ.जिना.


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स


.

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी

76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले

78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील

79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज

80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा

81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख

82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे

83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी) 

84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज

85) गीता प्रवचने —- विनोबा भावे


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 7)

86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे

87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर

88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे

89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर

90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे

91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख

92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख

93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे

94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे

95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे

96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख

97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर

98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे

99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे

100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 8)

101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख

102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले

103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे

104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर

105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर

106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय

107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र

108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर

109) यंग इंडिया - - महात्मा गांधी

110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट 

111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले

112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर

113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे

114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 9)

115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर 

116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर

117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर

118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे

119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ

120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी

121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर

122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे

123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक

124) वेदोक्त प्रकरण — शाहू महाराज / टिळक

125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी

126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

महत्वाचे प्रश्नसंच

 १】भिमाई आणि रामजी बाबा यांना एकूण किती मूलं होती???

A】 ५

B】 ८

C】 १२

D】 १४


उत्तर:- D


२】बळीराजाच्या आजोबांचे नाव काय???

A】 विरोचन

B】 हिरण्यकशप

C】 प्रल्हाद

D】 हिरण्याक्ष


उत्तर:- C


३】राष्ट्रपिता जोतिबा यांचे शिक्षण किती  होते???

A】 सातवी

B】 पाचवी

C】 दहावी


D】 नववी


उत्तर:- A


४】 रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली???

A】 संत गाडगेबाबा

B】 अंणाभाऊ साठे

C】 कर्मवीर भाऊराव पाटिल

D】 शाहू महाराज


उत्तर:- C


५】 संभाजी राजांनी लिहिलेला एक  संस्कृतमधला ग्रंथ कोणता???

A】 बुधभुषण

B】 बुद्धभूषणम्

C】 बुद्धभुषण

D】 बुधभूषणम्


उत्तर :- D


६】संभाजी राजांचा वयाच्या कितव्या वर्षी

       मृत्यु झाला???


A】 ३३


B】 ३२

C】 ३५

D】 ३४


उत्तर:- B


७】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला???

A】 १९८९

B】 १९९०

C】 १९९१

D】 १९९२


उत्तर:- B


८】 जगामधे सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली???

A】 तथागत गौतम बुद्ध

B】 वर्धमान महावीर

C】 प्रियदर्शी अशोक सम्राट

D】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


उत्तर:- A


९】शिवाजी महाराज हे स्वत्ताचे आद्यगरु कोणाला मानत होते???

A】 दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी.

B】 जीजाई आणि संत तुकाराम.

C】 मंबाजी आणि रामेश्वर


उत्तर:- B


१०】 जगाच्या शिल्पकारांमधे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो???

A】 पहिला 

B】 दूसरा

C】 तिसरा

D】 चौथा 


ऊत्तर:- D


११】 भगतसिंग यांना फासी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते???

A】 २२ वर्ष

B】 २३ वर्ष

C】 २४ वर्ष

D】 २५ वर्ष 


उत्तर:- B


१२】उजव्या बाजूला लकवा मारल्यामुळे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय???

A】 गुलामगिरी

B】 शेतकऱ्यांचा आसूड

C】 सार्वजनिक सत्यधर्म

D】 भटोबांचा कर्दनकाळ जोतिबा 


उत्तर:- C


१३】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला???

A】२० मार्च १९२५

B】 २० मार्च १९२७

C】 २० मार्च १९२९

D】 २० मार्च १९३


उत्तर:- B


 १४】विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली???

A】 कलम ३४०

B】 कलम ३४१

C】 कलम ३४२

D】 कलम ३४३


उत्तर:- A


१५】 "सच्ची रामायण" हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 शाहू महाराज

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी


उत्तर:- D


१९】 भिमाई ची समाधि कोठे आहे???

A】 कोल्हापुर

B】 सातारा

C】 सांगली

D】 दापोली


उत्तर:- B


२०】 सिद्धार्थ गौतमाला दन्यान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेस व कोठे झाली???


A】 वैशाख, कुशीनगर

B】 आषाढ, सारनाथ

C】 वैशाख, बुद्धगया

D】 वैशाख, लुंबिनीवन


उत्तर:- C


२१】 सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता???

A】 पनवेल

B】 दादर

C】 रायगड

D】 भायखला


उत्तर:- A


२२】 प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला???

A】 शाहू महाराज १९१७

B】 डॉ बाबासाहेब आंबेडकर १९४२

C】 राष्ट्रपिता जोतिबा फुले १८४८

D】 सयाजीराव गायकवाड १९२०


उत्तर:- A


 २३】 तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले???

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 बुद्धगया

D】 लुंबिनी


उत्तर:- B


 २४】 बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले???


A】 ३५,५०० ग्रंथ

B】 ३४,३०० ग्रंथ

C】 ३७,४०० ग्रंथ

D】 २१,९०० ग्रंथ


उत्तर:- C


२५】 बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगती किती महिन्यांनी झाली???

A】 १ महीना

B】 २ महीना

C】 ३ महीना

D】 ४ महीना


उत्तर:- D


२६】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरु केले???

A】 १९२० साली

B】 १९३० साली

C】 १९२५ साली

D】 १९२७ साली


उत्तर:- A


२७】 राष्ट्रपिता जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी केली???

A】 २० सप्टेंबर १८७६

B】 २२ सप्टेंबर १८७४

 C】 २३ सप्टेंबर १८७५

D】 २४ सप्टेंबर १८७३


उत्तर:- D


२८】 तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण कोणाची आहे???

A】 राजमाता जिजाऊ 

B】 क्रांति जोती सावित्री

C】 अहिल्याबाई होळकर

D】 रमाई


उत्तर:- B


 २९】 राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचे लग्न कोणत्या साली झाले???

A】 १८३९

B】 १८४०

C】 १८४१

D】 १८४२


उत्तर:- B


३०】 ओ बी सी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पद केव्हा सोडले???

A】 १९५०

B】 १९५१

C】 १९५२

D】 १९५३


उत्तर:- B


३१】 संत गाडगेबाबा यांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला???

A】 २० डिसेंबर १९५५

B】 २० डिसेंबर १९५६

C】 २१ डिसेंबर १९५४

D】 २३ डिसेंबर १९५६

उत्तर:- B


 ३२】 राष्ट्रपिता जोतिबा आणि सावित्री यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या साली काढली???

A】 १८४८

B】 १८५१

C】 १८५३

D】 १८५२


उत्तर:- A


1. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?

सिंधुदुर्ग

रत्नागिरी

सातारा

कोल्हापूर

उत्तर : कोल्हापूर


2. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?

पुणे

अहमदनगर

औरंगाबाद

लातूर

उत्तर : औरंगाबाद


3. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते?

लोणंद

पाडेगाव

शेखमिरेवाडी

कागल

उत्तर : पाडेगाव


4. खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

नागपूर

भिवंडी

पुणे

बुलढाणा

उत्तर : बुलढाणा


5. उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ....... या पांचवार्षिक योजनेत झाली.

नवव्या

सातव्या

आठव्या

वरीलपैकी नाही

उत्तर : नवव्या


6. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय.

राज्य विधिमंडळ

कार्यकारी मंडळ

संसद

न्यायमंडळ

उत्तर : संसद


7. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ..... हे असतात.

उपराष्ट्रपती

राज्याचे सचिव

मुख्यमंत्री

राज्यपाल

उत्तर : मुख्यमंत्री


8. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?

ल.ना. बोंगिरवार

बाबूराव काळे

वसंतराव नाईक

प्राचार्य पी.बी. पाटील

उत्तर : वसंतराव नाईक


9. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?

संत तुकाराम महाराज

संत गाडगे महाराज

संत तुकडोजी महाराज

संत नामदेव महाराज

उत्तर : संत गाडगे महाराज


10. 'जलमणी' योजना कशाशी संबंधित आहे?

शहरांना शुद्ध पाणी पुरवठा

विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे

पावसाचे पाणी साठवणे

पाण्याचा जपून वापर करणे

उत्तर : विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे


महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले :



मूळ आडनाव – गोह्रे

जन्म – 11 मे 1827

मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890


1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.


उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन परिचय :


आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.


शिक्षण:


फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.


विवाह:


महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.

त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.


पुढील शिक्षण :


इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.


संस्थात्मक योगदान :


3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.

1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.

1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :


1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 - 'ब्राम्हणांचे कसब'

1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.

1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.

1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

वैशिष्ट्ये :


थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.

1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.

2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.

ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.

सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

नाम व त्याचे प्रकार

 प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

 उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव,स्वर्ग, पुस्तक इ.

 नामाचे प्रकार :

·         नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम -

·         एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.

उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध,सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

 

·         ( सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते. )

विशेष नाम -

·         ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.

उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन,अमेरिका,गोदावरी इ.

·         ( विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे. )

उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम -

·         ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.

उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

 

·         ( पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.

उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात. )

इतिहास प्रश्नसंच

१. युरोपियन सत्तांनी भारतात स्थापन केलेल्या पहिल्या वाखारींसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

अ) पोर्तुगीज             १) कोची
ब) डच                      २) मछलीपट्टनम
क) ब्रिटीश                ३) सुरत
ड) डेन्स                    ४) चिंचोसा

        अ   ब   क   ड
   A.  ३   ४   २   १
   B.  ४   २   ३   १
   C.  १   २   ३   ४ ✔
   D.  २   १   ३   ४

२. १८१३ च्या सनदी कायद्यानुसार खालीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) कंपनीचा भारतातल्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त केला.
ब) ख्रिश्चन मिशानरींना भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली.
क) दरवर्षी १ लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली.
ड) भारतासाठी बिशप व कंपनीच्या इतर तीन प्रांतांसाठी आर्चबिशपची नेमणूक करण्यात आली.

   A. अ केवळ
   B. अ आणि ब
   C. अ ब आणि क
   D. वरील सर्व ✔

३. खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार नियामक मंडळाची (Board of Control) स्थापना करण्यात आली ?

   A. नियामक कायदा १८७३
   B. पिट्स इंडिया कायदा ✔
   C. सनदी कायदा १८१३
   D. सनदी कायदा १८३३

४. वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या.

अ) 'कलेक्टर' या पदाची निर्मिती केली.
ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली.
क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.
ड) चार्ल्स विल्किंस च्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना लिहिली.

   A. ब बरोबर
   B. ब,क आणि ड बरोबर
   C. क आणि ड बरोबर
   D. अ,क आणि ड बरोबर ✔

५. १८०२ रोजी 'वसई' येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

   A. वॉरेन हेस्टींग्ज
   B. वेलस्ली ✔
   C. डलहौसी
   D. कॉर्नवॉलिस

६. आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या कोणत्या व्यक्तीने पंजाबमध्ये 'अहमदिया' आंदोलन सुरु केले ?

   A. सर सय्यद अहमदखान
   B. लियाकत अली
   C. खाफार खान
   D. मिर्झा गुलाम अहमद ✔

७. खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे सुसंकृतपणा(ब्रिटीश) व रानटीपणा यांमधील झगडा होता ?

   A. व्ही. ए. स्मिथ
   B. सर जॉन लॉरेन्स
   C. टी. आर. होल्म्स ✔
   D. सायमन फ्रेजर

८.
अ) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म १८५६ मध्ये टेंभू(कराड) येथे झाला.
ब) १८८८ मध्ये सुधारक हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरु केले.
क) कर्वे प्रकरणामध्ये आगरकर व टिळक यांना १०१ दिवस तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

   A. फक्त अ
   B. अ आणि ब ✔
   C. वरीलपैकी एकही नाही
   D. वरील सर्व

९. खालीलपैकी कोणी नाग महिला नेत्या 'गायदिन लियू' यांना 'राणी' हि पदवी देऊन सन्मानित केले ?

   A. सुभाषचंद्र बोस
   B. महात्मा गांधी
   C. पंडित नेहरू ✔
   D. सरदार पटेल

१०) 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?

   A. स्वातंत्र्यवीर सावरकर
   B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   C. डॉ. राजेंद्रप्रसाद ✔
   D. सर सय्यद अहमदखान

११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या काराघृहात ठेवले होते ?

   A. ठाणे
   B. अंदमान
   C. मंडाले
   D. एडन ✔

१२. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?

अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोशिएशन
क) लंडन इंडियन असोशिएशन
ड) ईस्ट इंडिया असोशिएशन

   A. अ,ब आणि क फक्त
   B. ब,क आणि ड फक्त
   C. अ,ब आणि ड फक्त
   D. अ,ब,क आणि ड ✔

१३.भारतात रेल्वे चे जाळे उभारण्या करिता लोर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त ✔
   C. ब आणि क फक्त
   D. अ,ब आणि क

१४. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्या साठी प्रयत्न का केला ?

अ) ते विचाराने उदारमतवादी होते
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे, असे वाटत होते
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते

   A. अ आणि ब फक्त
   B. अ आणि क फक्त
   C. अ,ब आणि क
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत ✔

१५. भारतातला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रीतीशांच्या धोरणात बदल झाला कराण -

अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रावादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम

   A. अ आणि ब फक्त
   B. बआणि क फक्त
   C. अ आणि क फक्त
   D. अ,ब, आणि क ✔

१६. खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परम हंस’ मंडळीचा भर होता ?

अ) जातीबंधाने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तीपूजा बंदी

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त
   C. अ,ब आणि क फक्त
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य ✔

१७. हिंदुस्तान सरकारच्या १९३५ कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?

अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रीपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे

   A. अ,ब आणि क
   B. ब,क आणि ड
   C. अ,ब आणि ड
   D. अ,ब,क आणि ड ✔

१८. १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि ह्या अधिवेशनात

अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदेमातरम्’ पहिल्यांदाच गायले गेले
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला
क) मवाळ मार्ग चा स्वीकार करण्यात आला
ड) बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले

   A. अ आणि ब
   B. क आणि ड
   C. ब आणि क ✔
   D. अ आणि ड

१९. अयोग्य जोडी निवडा

   A. श्रीधरलू नायडू - वेद समाज
   B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
   C. रवींद्रनाथ टागोर – तत्वबोधिनी सभा ✔
   D. शिवनारायण अग्निहोत्री – देव समाज

२०. अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवड च्या सभेत कोणी मागणी केली ?

अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बि.सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर

   A. अ फक्त ✔
   B. ब फक्त
   C. क आणि ड
   D. ड फक्त

२१. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
   A. नीळ
   B. भात फक्त
   C. गहू फक्त
   D. भात व गहू ✔

२२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
क) लॉंर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

   A. अ आणि ब ✔
   B. ब आणि क
   C. अ आणि क
   D. अ,ब आणि क

२३. पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

   A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्दासान सभा
   B. प्रार्थना समाज व आर्य समाज
   C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्विस लीग
   D. वरील तीन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही ✔

२४. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

   A. जगन्नाथ शंकर शेठ
   B. बाळशास्त्री जांभेकर ✔
   C. भाऊ दाजी लाड
   D. छत्रपती शाहूमहाराज

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...