Sunday 4 August 2019

✅✅एका ओळीत सारांश, 4 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉2018 साली भारताची अर्थव्यवस्था (GDP मूल्य) - 2.73 लक्ष कोटी डॉलर.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉जागतिक बँकेच्या “ग्लोबल GDP रॅंकिंग फॉर 2018’ या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान – अमेरीका (20.5 लक्ष कोटी डॉलर).

👉2 ऑगस्ट 2019 रोजी पाकिस्तानने या जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक "गुरुद्वारा चौवा साहिब" याचे दरवाजे फाळणीच्या 72 वर्षानंतर उघडले - झेलमजिल्हा, पंजाब प्रांत.

👉मिस इंग्लंड 2019 – भारतीय वंशाची डॉ. भाषामुखर्जी.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना (MSME) SMILES फंड (स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज सॉफ्ट लोन्स स्कीम) अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी, या संस्थेनी मदुराई डिस्ट्रिक्ट टायनी अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनसह (MADITSSIA) सामंजस्य करार केला – भारतीय लघू उद्योग विकास बँक (SIDBI).

👉27-28 सप्टेंबर रोजी भारतात होणार्‍या तिसर्‍या ‘रूरल इनोव्हेटर्स स्टार्टअप कॉनक्लेव (RISC)’ याचे ठिकाण - राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था (NIRDPR), हैदराबाद.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉माइंडट्री या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रमुख भारतीय कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - देबाशिस चटर्जी.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉मुंबईच्या चर्चगेट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) याच्या क्रिडा संकुलाचे दिनशॉ वाचा मार्गावरील प्रवेशद्वाराला या माजी कसोटीवीराचे नाव देण्यात येणार - दिवंगत विजय मर्चंट.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉स्थानिक भाषांमधील शेतकर्‍यांना स्थान आणि पीक आणि पशुधनासंबंधी हवामानावर आधारित शेतीविषयक सल्ला प्रदान करण्यासाठी भु-विज्ञान व कृषी मंत्रालयाने तयार केलेले मोबाइल अॅप्लिकेशन - मेघदूत.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय अंतराळ संशोधन संस्था  (ISRO) – स्थापना वर्ष: सन 1969; मुख्यालय: बेंगळुरू. 

👉ISRO चा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (सन 1975).

👉भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम - 22 ऑक्टोबर 2008.

👉क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) – मुंबई, महाराष्ट्र.

👉जागतिक बँक - स्थापना वर्ष: सन 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी (अमेरिका).

👉भारतीय लघू उद्योग विकास बँक (SIDBI) - स्थापना वर्ष: सन 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.

❇️ फ्रेंडशिप डे चा इतिहास ‼️

▪️फ्रेंडशिप डेची सुरूवात १९३५ मध्ये अमेरिकेतून झाली.

▪️ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिका सरकारने एका निर्दोष व्यक्तीला मारले होते. त्याच्या हत्येचे सर्वात जास्त दुःख त्याच्या मित्राला झाले होते.

▪️मित्राच्या विरहात त्याने आत्महत्या केली.

▪️त्याचेमैत्री प्रेम पाहून अमेरिकेतील नागरिकांनी ऑगस्टचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला,

▪️मात्र, अमेरिका सरकारला ही गोष्ट मंजुर नव्हती.

▪️२१ वर्ष लोक हा प्रस्ताव घेऊन लढत होते.

✅ अखेर १९५८ मध्ये अमेरिका सरकारने नागरिकांच्या प्रस्तावला मान्यता दिली आणि ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.

✅ यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने २७ एप्रिल २०११ मध्ये झालेल्या बैठकीत ३० जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे' म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता.

▪️मात्र, काही वर्ष झाले ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी भारतात 'फ्रेंडशिप डे' मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. तसेच भारतासोबत दक्षिण अशियातील काही देशाही साजरा करतात.

▪️काही देश मात्र 'फ्रेंडशिप डे' साजरा करतात पण, तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी नव्हे. तर, त्यांना सोयीच्या असणाऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या दिवशी.

▪️८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो.

​🔹भारतीय अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ म्हणून ओळखले जाणार, जाणून घ्या या शब्दाचा अर्थ

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ २०२२ पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे. भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल. भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणार भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे.

▪️‘व्योमनॉट्स’चा अर्थ काय?
भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे. अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट’ म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे. ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा अकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अॅस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द तयार झाला आहे. त्यामुळे शब्दाची फोड केल्यास साधारपणे अवकाशातील व्यक्ती असा याचा अर्थ होतो.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’, रशियन अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ आणि चीनची अंतराळ संशोधन संस्था ‘सीएनएसए’ या संस्थांनी यशस्वीरित्या अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत. इस्रोसाठी ही मोहिम खूप महत्वाची आहे. आत्तापर्यंत केवळ एकच भारतीय अंतराळात गेला आहे. १९४८ साली सोव्हिएत युनियनच्या अंतराळ मोहिमेमध्ये भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांचा समावेश होता.

▪️भारताची पहिली अंतराळवीर महिला?
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी भारताकडून अंतराळात जाणारा ‘व्योमनॉट्स’ महिला असावी अशी इस्रोची इच्छा असल्याचे सांगितले आहे. अंतराळात कोणाला पाठवायचे याची निवड भारतीय हवाईदलामार्फत केली जाणार असल्याचेही सिवन यांनी सांगितले आहे.

▪️इस्रोच्या भविष्यातील मोहिमा
इस्रो २०२२ साली गगनयान मोहिमेअंतर्गत तीन व्योमनॉट्स अंतराळात पाठवणार आहे. २०२३ मध्ये इस्रो शुक्र ग्रहावर यान पाठवणार आहे.तर २०२९ पर्यंत भारत अंतराळात स्वत:चे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) तयार करणार आहे. २०२५ ते २०३० च्या दरम्यान भारत चंद्रावर मानवरहीत यान पाठवण्याच्या तयारीत आहे. पुढील दहा वर्षांमध्ये इस्रो कॉस्मीक रेडिएशनच्या अभ्यासासाठी २०२० मध्ये ‘एक्सपोसॅट मोहिम’ , २०२१ मध्ये सुर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल वन’ मोहिम, २०२२ मध्ये ‘मंगळ परिक्रमा मोहिम-२’, २०२४ मध्ये ‘चांद्रयान ३’ आणि सुर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी २०२८ साली एक मोहिम राबवणार आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या या सर्व मोहिमांचा खर्च जगभरातील इतर देशांच्या मोहिमांपेक्षा अगदीच कमी आहे.

जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन केल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचं कारण दिलं असलं तरी केंद्र सरकारच्या या कृतीमुळे काश्मीरमधील राजकारण ढवळून निघालं आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तेत आल्यास ३७० कलम रद्द करण्यात येईल असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं होतं. आता शहाच केंद्रीय गृहमंत्री झाले असून त्यातच काश्मीरमध्येही ३८ हजार अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आल्याने जम्मू- काश्मीरमधील ३५ अ आणि ३७० ही दोन्ही कलमे हटविण्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहेत ही कलमं त्याविषयीची ही माहिती...

▪️कलम ३५ अ

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये महाराजा हरिसिंग यांच्या काळातील; कायमस्वरूपी नागरिकांची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे.

▪️कलम ३७०

शेख अब्दुल्ला यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे तसेच पंतप्रधान नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलेल असल्यामुळे या कलमाची आणि काश्मीर भारतात यावे यासाठी काय पावले उचलावीत असा पेच निर्माण झाला होता. अशावेळी सरदार पटेल यांनी ‘इन्स्ट्रमेंट ऑफ अ‍ॅक्सेशन’ अर्थात ‘सामीलनामा’ ही संकल्पना मांडली. (अन्य संस्थानांबाबत ‘विलीननामा’ ही संकल्पना आहे.) आणि या पेचातून यशस्वी तोडगा काढला. काश्मीरी जनतेचे काही अधिकार अबाधित ठेवत तसेच त्यांच्या सार्वमताची हमी देत काश्मीर भारतात सामील झाले. सदर कलमाच्या ‘अधिकारक्षेत्रात’ वेळोवेळी बदल झाले. मात्र भारतीय संविधानातील नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्यातील उच्च न्यायालयाची कार्यकक्षा, निवडणूक प्रक्रिया आदी बाबी काही अपवादात्मक तरतुदींद्वारे या राज्यास लागू होतात. राष्ट्रपती- संसद यांचे अधिकार, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, महालेखापालांचे कार्यक्षेत्र (कॅग), सर्वोच्च न्यायालयाची अधिकार व्याप्ती या बाबी भारताच्या मूळ राज्यघटनेत ‘जशा आहेत तशा’ स्थितीत काश्मीरलाही लागू होतात. मात्र, राज्य लोकसेवा, राज्यांतर्गत आणिबाणी लागू करणे, राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे राज्यघटनेतील मुद्दे काश्मीरला ‘जसेच्या तसे’ लागू होत नाहीत. म्हणजे नेमके काय तर, अशा मुद्यांचा अवलंब करण्यापूर्वी काश्मीरच्या राज्य विधानसभेची सहमती घेणे अनिवार्य होते.

▪️कलम ३५ अ कशामुळे चर्चेत?
वी द सिटिझन या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.

▪️विरोध का?
३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

Latest post

ऊती व ऊतींचे प्रकार

 (Tissue and types of tissue) 🌸 समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. 🌸 सजीवांमध्ये निरनिराळ्या...