०२ जून २०२२

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

◆ आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

◆ महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

◆ अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी

: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

❇️ आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :-

◆ डॉ. अरुणा देरे - 2019✅
◆ विजया ध्यसा- 2001
◆ शांता शेलड़े- 1996
◆ दुर्गा भागवत - 1973
◆ कुसूमावती देशपांडे - 1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ कालावधी :  3, 4 व 5 डिसेंबर 2021

◆ स्थळ : नाशिक

◆ अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅

◆ स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ स्थळ : उदगीर ✅

◆ अध्यक्ष : भारत सासणे ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

◆ स्थळ : वर्धा ✅

◆ अध्यक्ष : पु. शि.रेगे ✅

सात बेटांचे शहर: मुंबई


🎯 महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेले आहे.

🎯 पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती.

🎯 या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले व आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

☑️ मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे

1) माहीम (Mahim)
2) वरळी (Worli)
3) परळ (Parel)
4) माझगाव (Mazgaon)
5) मुंबई (Bombay)
6) कुलाबा (Calaba)
7) छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)

🎯 एकसंघ मुंबईची निर्मिती

☑️ या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.

☑️ ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. 

☑️ जेराल्ड इंजिनिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

☑️ त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

☑️ मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत.

☑️ त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉईंट पासून वरळी पर्यंत पसरला आहे.

☑️ या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे.

☑️ दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे.

☑️ या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे.

☑️ या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत.

☑️ या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...