Saturday 19 March 2022

करोना महामारीचा शेवट कधी होणार? WHO च्या प्रवक्त्यांनी दिलं उत्तर, म्हणाले

🔶जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 साथीच्या रोगाचा शेवट खूप दूर आहे. त्यांच्या ताज्या साप्ताहिक आकडेवारीमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे.

🔷यू.एन.च्या आरोग्य संस्थेने यापूर्वी म्हटले आहे की या वर्षी साथीच्या रोगाचा तीव्र टप्पा संपू शकतो परंतु इतर घटकांसह प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आपण किती लवकर पूर्ण करतो यावर ते अवलंबून असेल.

🔶जिनेव्हा येथ पत्रकारपरिषदेत जेव्हा एका पत्रकाराने महमारी संपण्याच्या वेळेबद्दल विचारले असता, मार्गारेट हॅरिस म्हणाल्या की त्या “संपण्यासून खूप दूर आहे”. “आपण नक्कीच साथीच्या आजाराच्या मध्यात आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

🔷एक महिन्याहून अधिक काळ कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, मागील आठवड्यापासून जगभरात कोविडची प्रकरणे वाढू लागल्याचे समोर येत आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, आशिया आणि चीनच्या जिलिन प्रांतात लॉकडाउनसह कोविड संख्येचा उद्रेक रोखण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

चीनमध्ये एका वर्षानं करोना मृत्यू ; अमेरिकेतही निर्बंध परतणार.

🔮जागतिक कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोना महामारीने जागतिकस्तरावर डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. चीन आणि दक्षिण कोरिया सारखे देश दररोज कोविड -19 प्रकरणांच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठत आहेत, जे मुख्यतः ओमायक्रॉन व्हेरिएंटद्वारे वाढत आहेत. शिवाय अमेरिकेतही निर्बंध पुन्हा लागू केले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

🔮२०२० मध्ये वुहानमध्ये सुरुवातीच्या उद्रेकानंतर चीन सध्या स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोविड-19 प्रकरणांच्या सर्वात मोठ्या लाटेशी लढत आहे. तसेच, आज (शनिवार) चीनमध्ये दोन करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. जानेवारी २०२१ नंतर करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली ही पहिली वाढ आहे.

🔮चीनमध्ये शनिवारी सामुदायिक संक्रमणातून २ हजार १५७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत. तर जिलिन प्रांतात करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि लोकांना प्रवास करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे देखील आवश्यक केले आहे.

प्रो लीग हॉकी (पुरुष) - अर्जेटिनाविरुद्धच्या लढतीत भारताचे प्रयोगाचे धोरण.

🌅‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी स्पर्धेत दुसरा पराभव पत्करल्यानंतरही भारतीय पुरुष संघाने व्यग्र हंगामाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना अजमावत प्रयोगाचे धोरण कायम ठेवले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय संघ अर्जेटिनाविरुद्धच्या दोन लढतींपैकी पहिला सामना शनिवारी खेळणार आहे.

🌅किलगा स्टेडियमवर स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताने ५-४ असा विजय मिळवला, परंतु दुसऱ्या सामन्यात ३-५ अशी हार पत्करली. याआधी गेल्या महिन्यात भारताने फ्रान्सकडून २-५ असा पराभव पत्करला होता. मात्र तरीही भारतीय संघ १२ गुणांसह नेदरलँड्स (१६ गुण) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत चार विजय मिळवले आहेत.

🌅येत्या वर्षांत राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाची महत्त्वाची आव्हाने भारतापुढे आहेत. या स्पर्धाना २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राखीव खेळाडूंनाही संधी देण्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी ठरवले आहे.

🌅स्पेनविरुद्धच्या लढतीमधील भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कनिष्ठ विश्वचषक खेळलेला मध्यरक्षक मोयरंगथेम रबिचंद्रन पदार्पण करणार आहे.

🌅दुखापतीतून सावरलेला गरुजत सिंगसुद्धा या सामन्यात पुनरागमन करणार आहे. गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठक हा सूरज करकेराची जागा घेईल. बचावफळीत मनदीप मोर आणि दीपसन तिर्की यांच्या जागी अमित रोहिदास आणि जुगराज सिंग खेळतील. मध्यफळीत जसकरण सिंग आणि अक्षदीप सिंग यांच्या जागी सुमित आणि रबिचंद्र खेळतील.

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत.

🔴संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.

🟠सलग पाचव्या वर्षी फिनलँड अव्वल - या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला असून ऑस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.

🔴अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी - दरम्यान, या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

🟠यादीमध्ये भारत कुठे - जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग

🌺 हिमरुशाली - औरंगाबाद

🌺पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)

🌺चादरी - सोलापूर

🌺लाकडाची खेळणी - सावंतवाडी

🌺सुती व रेशमी कापड़- नागपूर, अहमदनगर

🌺 हातमाग साडय़ा व लुगडी- उचलकरंजी

🌺 विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर, सोलापूर

🌺काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी

🌺रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा)

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸

मोफत सामान्य ज्ञान व पोलीस भरती टेस्ट

प्र. १.   नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर

प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी  झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२

प्र. ३.   जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%

प्र.४.  कलम १ (३)  नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;

१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व

प्र.५.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -

I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक

प्र. ६.  सध्या भारतीय राज्यघटनेत  (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?

१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४

प्र.७.  १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?

१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व

प्र.८.  भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य  ओळखा.

अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.

पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड

प्र. ९.  कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?

१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील

प्र. १०  कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?

१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल

उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटक

वॉरन हेस्टिंग्स (जन्म: 1732- मृत्यू : 1818)

हैस्टिंग्ज बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल(1774-1785)

भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट 1773 कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली.

🔶1] बंगालमध्ये द्विदल राज्यपद्धती थांबवली (ज्याची ओळख रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केली होती).

🔶2] टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.

🔶3] जेम्स ऑगस्टस हिकीचे बंगाल गॅझेट - 1780 पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध

🔶4] कलेक्टर पदाची निर्मिती

🔶5] महाभियोगाचा खटला चालविण्यात आलेला पहिला गव्हर्नर जनरल.(पहिल्या रोहिल्ला युद्धामध्ये त्याच्या सहभागाचा परिणाम म्हणून)

🔶6] कलकत्ता मदरसा (अलिया विद्यापीठ) ची स्थापना केली.

🔶7] फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयची स्थापना झाली

🔶8] भगवद गीतेचे इंग्रजीत भाषांतर चार्ल्स विकिन्सन

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...