Saturday 25 January 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ः शिक्षणाचा दर्जेदारपणा तपासण्याचे आदेश

◾️शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते. मात्र, अशा शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जाते का हे तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केल्या.

◾️बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्‍यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरुम' उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी आज दिले.

◾️शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

◾️ यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆
🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान)

★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड

●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विजय

●1977 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात

●जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे.

●यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश
1. 2013 - 🥉कांस्यपदक
2. 2014 - 🥉कांस्यपदक
3. 2017 - 🥈रौप्यपदक
4. 2018 - 🥈रौप्यपदक
5. 2019 - 🥇सुवर्णपदक

🏆भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके
(त्यातील 5 पदके एकट्या पी.व्ही.सिंधुची)

🎖वयाच्या 24 वर्षी पी.व्ही.सिंधू 🏸बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपदाची🏆 मानकरी ठरली आहे.

​​​​ पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार

•  भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे.

• यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे.

📚 भारताची घसरण

• तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे.

• त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत.

• यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे.

✅ या स्थानावर भारतासह
📌 चीन,
📌 बेनिन,
📌 घाना आणि
📌मोरोक्को हे देश आहेत.

• भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे.

• शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे.

• गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता.

नवी दिल्लीत द्वितीय ‘NIC तंत्रज्ञान परिषद’ संपन्न झाली

🌺नवी दिल्लीत ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ (Tech Conclave) आयोजित करण्यात आली. 21 जानेवारी 2020 रोजी या दोन दिवस चालणार्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.

🌺राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC) या संस्थेच्या वतीने ‘टेक्नॉलॉजीज फॉर नेक्स्ट-जेन गव्हर्नन्स’ या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

🌺या कार्यक्रमाची देशभरातल्या सरकारी अधिकार्‍यांच्या क्षमता वाढीस मदत होणार आणि उच्च दर्जाची नागरिक-केंद्रित सेवा देण्यास मदत होणार आहे.

⭐️NIC विषयी..

🌺राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (National Informatics Centre -NIC) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत एक संलग्न कार्यालय आहे. या संस्थेची स्थापना 1976 साली झाली. हे केंद्र सरकारी IT सेवांच्या वितरणासाठी आणि डिजिटल इंडियाच्या काही उपक्रमांच्या वितरणास मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवते.

राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित; हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.

✅ ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल

🍥 भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे.

🍥 मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे.

🍥 ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

🍥 हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे.

🍥 मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

🍥 मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते.

🍥 सुमारे वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते.

🍥 जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

🍥 याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

🍥 ग्रीनपीसच्या अहवालात असेही म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ १२२ सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत. ही १२२ शहरे २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

🍥 त्यातील १६६ शहरांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या शहरांचाही समावेश सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत करावा.

✅✅ २० शहरे अतिप्रदूषित :

🍥 हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत(पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.

🍥 डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.

🍥 ग्रीनपिसच्या अभ्यासानुसार, डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.

पोपटराव पवार आणि राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री जाहीर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण २१ जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि बीजमाता राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.

पोपटराव पवार आणि जलसंधारण :
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. पोपटराव पवार  गेल्या २० ते २५ वर्षाहूनही अधिक काळ पाणलोट क्षेत्र विकास हा एकाच कार्याला वाहून घेतले आहे.

'बीजमाता' राहीबाई पोपेरे :
महाराष्ट्रात बियाणांची बँक राहीबाई पोपेरे चालवितात. 'बीजमाता' म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केले होते. शंभरहून अधिक देशी बियाणांचे जतन राहीबाई पोपरे यांनी केले आहे. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिले.

पोलीस भरती प्रश्नसंच


(1) महात्मा फुले यांनी ......... या समाजाची स्थापना केली  ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) सत्यशोधक ✅✅
(2) आर्य
(3) प्रार्थना
(4) भारतसेवक

(2) वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे ? ( मुंबई लोहमार्ग पोलीस -2018 )
(1) गितांजली
(2) आनंदमठ✅✅✅
(3) उत्सर्ग
(4) यापैकी नाही

(3) महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्याची लांबी किती ? ( मुंबई लोहमार्ग पोलीस -2018 )
(1) 278 किमी
(2) 720 किमी✅✅
(3) 7200 किमीै
(4) 720 मैल

(4) बिहु नृत्य कोणत्या राज्याची संबंधित आहे ? ( पुणे बँड्समन 2018 )
(1) आसाम ✅✅
(2) हिमाचल प्रदेश
(3) तेलंगणा
(4) कर्नाटक

⚛⚛उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे ? (सोलापुर ग्रामीण पोलीस - 2018)
(1)बारामती
(2) पंढरपूर
(3) करमाळा
(4)  माढा✅✅

🔯🔯 पोलीस खाते हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो ? (लातूर जिल्हा पोलीस -2018)
(1)केंद्र सूची
(2)राज्य सूची✅✅
(3)समवर्ती सूची
(4)वरीलपैकी सर्व

⚛⚛ मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ? ( लातूर जिल्हा पोलीस -2018 )
(1)महात्मा फुले
(2)लोकमान्य टिळक
(3)न्यायमूर्ती रानडे ✅✅
(4)स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

⚛⚛ गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ? ( जालना जिल्हा पोलीस - 2018 )
(1) त्रिपुरा
(2)मिझोराम
(3)मणिपूर
(4)सिक्कीम✅✅

⚛⚛ कर्कवृत्त या राज्यातून जात नाही ? ( जालना जिल्हा पोलीस 2018 )
(1) मध्य प्रदेश
(2)पश्चिम बंगाल
(3) राजस्थान
(4) ओडिशा ✅✅✅

⚛⚛ मुंबई-नाशिक लोहमार्ग........ घाटातून गेला आहे ? ( नाशिक ग्रामीण पोलीस 2018 )
(1)कुंभार्ली
(2)थळ ✅✅✅
(3)माळशेज
(4)अंबा

चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.1) सहयोग हॉप टॅक 2018 हा तटरक्षक दलाचा संयुक्त युद्धाभ्यास  कोणत्या दोन  देशात नुकताच पार पडला...?

अ)भारत - व्हिएतनाम ✅✅✅✅
ब) भारत - इस्राइल
क) भारत - रशिया
ड) भारत - सेशल्स

स्पष्टीकरण : सहयोग हॉप टॅक 2018 हा तटरक्षक दलाचा संयुक्त युद्धाभ्यास  भारत - व्हिएतनाम  दोन  देशात नुकताच पार पडला.

प्र.2) खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला?
अ) राजस्थान
ब) गुजरात
क) आसाम ✅✅
ड) महाराष्ट्र

स्पष्टीकरण :  खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम आसाम या राज्यात सुरू करण्यात आला.

प्र.3) भारतातील पहिले डॉल्फिन रिसर्च सेंटर कोठे स्थापन केले जाणार आहे...?
अ) लखनौ
ब) पटना✅
क) लुधियाना
ड) भुवनेश्वर

स्पष्टीकरण :  भारतातील पहिले डॉल्फिन रिसर्च सेंटर पटना येथे स्थापन केले जाणार आहे.

प्र.4) हुक्का पार्लर वर बंदी आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते..?
अ)  महाराष्ट्र
ब)  गुजरात✅✅
क)  गोवा
ड) हरियाणा

स्पष्टीकरण : हुक्का पार्लर वर बंदी आणणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य.

प्र.5) मानवरहित लेव्हल क्रॉसिंग मुक्त कोणता रेल्वे विभाग आहे..?
अ) पश्चिम रेल्वे
ब) उत्तर रेल्वे
क) दक्षिण रेल्वे✅✅✅
ड) पूर्व रेल्वे

स्पष्टीकरण : मानवरहित लेव्हल क्रॉसिंग मुक्त दक्षिण रेल्वे रेल्वे विभाग आहे.

प्र.6) जागतिक शिक्षक दिन 2018 आंतरराष्ट्रीय परिषद’ याचे आयोजन कोणत्या शहरात केले गेले होते..?
अ) जकार्ता
ब) पॅरिस✅✅
क) दिल्ली
ड) सिंगापूर

स्पष्टीकरण :  जागतिक शिक्षक दिन 2018 आंतरराष्ट्रीय परिषद’ याचे आयोजन पॅरिस या शहरात केले गेले होते.

प्र.7) भारतीय वायुसेना  दिवस कधी असतो..?
अ) ७ ऑक्टोबर
ब) ८ ऑक्टोबर✅✅
क) ९ ऑक्टोबर
ड) १०ऑक्टोबर

स्पष्टीकरण : भारतीय वायुसेना  दिवस ८ ऑक्टोबर रोजी असतो.

प्र.8) कोणत्या राज्याच्या 14 वा  भारत-अमेरिका यांच्या लष्करांचा ‘युध्द अभ्यास 2018’ 29 सप्टेंबर संपन्न  झाला..?
अ) उत्तराखंड✅✅
ब) मेघालय
क) जम्मू काश्मीर
ड) या पैकी नाही

स्पष्टीकरण : उत्तराखंड  राज्याच्या 14 वा  भारत-अमेरिका यांच्या लष्करांचा ‘युध्द अभ्यास 2018’ 29 सप्टेंबर संपन्न  झाला.

प्र.9)  ICDS - एकात्मिक बालविकास योजना 1975 सालापासून कोणाच्या 106 व्या जयंती निमित्त सुरु करण्यात आली..?
अ) दीनदयाळ उपाद्याय
ब) सुभाष चंद्र बोस
क) महात्मा गांधी✅✅✅
ड) प नेहरू

स्पष्टीकरण : 🎯 ICDS - एकात्मिक बालविकास योजना 1975 सालापासून महात्मा गांधी यांच्या 106 व्या जयंती निमित्त सुरु करण्यात आली.

प्र.10) हुक्का पार्लर वर बंदी आणणारे  भारतातील  महाराष्ट्र कितवे राज्य आहे...?
अ) पहिले
ब) चौथे
क) तिसरे
ड) दुसरे✅✅

स्पष्टीकरण :   हुक्का पार्लर वर बंदी आणणारे  भारतातील  महाराष्ट्र हे दुसर्या क्रमांकावर असलेले राज्य आहे.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...