Saturday 13 March 2021

आतरराष्ट्रीय चर्चेतील ठिकाणे१) गितेगा - 'बुरुंडी' देशाची नवी राजकीय राजधानी. 'बुजुम्बुरा' ही पूर्वीची राजधानी (सध्या आर्थिक राजधानी) 


२) नुरसुलतान - कझाकिस्तानच्या राजधानीचे नवे नाव – पूर्वीचे नाव अस्ताना – नुरसुलतान हे तेथील पहिल्या राष्ट्रपतीचे नाव होते. 


३) कॉलिमन्टन - इंडोनेशियाची नवी राजधानी (सध्याची जकार्ता) - जकार्ता येथे सध्या १ कोटी पेक्षा अधिक लोक राहतात. त्यामुळे वायू प्रदुषण, वाहतूक समस्येमूळे स्थलांतरित 


४) प्युअर्टो विल्यम्स - जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर (चिली देशातील) - पूवीचे सर्वात दक्षिणेकडील शहर उशुआया (अर्जेंटिना) 


५) नोत्र दाम कॅथेड्रल - फ्रान्समधील गौथिक शैलीची इमारत (आग लागल्याने नष्ट) -११६३ मध्ये सातवा लईच्या काळात बांधकाम सरु 


६) मलहम - जगातील सर्वात मोठी मिठाची गुहा (लांबी १० किमी) - ईस्त्रालयच्या पर्वत रांगेमध्ये सापडली 


७) समजियोन - उ.कोरिया मधील 'आधुनिक सभ्यतेचे प्रतीक' असलेले शहर - ३ डिसे २०१९ रोजी किम जोग उन च्या हस्ते उद्घाटन 


८) बौगेनव्हिले - ब्रिटन व मॉरिशसचा या बेटावरुन बाद सुरु झाला. पापुआ न्यु गिनीपासून स्वतंत्र झाला.


९) चागोस बेट - ब्रिटन व मॉरिशसचा या बेटापासून वाद सुरु होता. संयुक्त राष्ट्रांनी हे बेट 'मॉरिशसला' परत करण्याचा ठराव मंजूर केला.

बदललेल्या चिनीनीतीनंतर नवीन व्यूहविचार - नौदलप्रमुखभारतीय नौदल चीनवर लक्ष ठेवून आहे. चीन इतरांप्रमाणे विचार करत नाही, त्यांची रणनीती वेगळी आहे. ते ध्यानात ठेवून आता भारतीय नौदलातर्फे नवीन व्यूहविचार आकारास येत असल्याचे प्रतिपादन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी बुधवारी केले.


प्रोजेक्ट ७५ अंतर्गत कलवरी वर्गातील तिसरी स्टेल्थ स्कॉर्पिन पाणबुडी ‘आयएनएस करंज’ समारंभपूर्वक नौदलात दाखल झाली. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नौदलप्रमुख बोलत होर्ते. हिंदी महासागरातीलच नव्हे तर देशाच्या तिन्ही बाजूंना असलेल्या सागरी सीमा अभेद्या राहण्याची खातरजमा करण्यासाठी अलीकडे देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर व बेटसदृश्य असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या सागरीसीमांवरही एकाच वेळेस ‘सी व्हिजिल’ युद्धाभ्यास पार पडला.


त्यामध्ये लक्षात आलेल्या काही बाबींनंतर सागरीसुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, असे सांगून अ‍ॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले की, ‘आयएनएस करंज’ ही आत्मनिर्भर भारत योजनेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.


कारण यापूर्वी कलवरी वर्गातील दोन्ही स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मिती- तपासणी आणि त्यावरील नौदलाच्या ताफ्याचे प्रशिक्षण यात फ्रेंच सहभाग होता. मात्र ‘आयएनएस करंज’ ही पूर्णपणे भारतीय नजरेखाली तयार झालेली पहिलीच पाणबुडी आहे. येणाºया काळात पाणबुडीचा ऊर्जास्रोत असलेल्या प्रोपल्शन यंत्रणेमध्येही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. 

व्यक्ती विशेषकर्नाटक उच्च न्यायालयाचे नवनियुक्त अतिरिक्त न्यायाधीश - मोहम्मद घोउसे शुकुरे कमाल.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (आसामी) याचे विजेता - अपूर्ब कुमार सैकिया.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (बंगाली) याचे विजेता – मनी शंकर मुखोपाध्याय.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (बोडो) याचे विजेता - धरणीधर ओवरी.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (डोगरी) याचे विजेता - ज्ञान सिंग.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (इंग्रजी) याचे विजेता - अरुंधती सुब्रमण्यम.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (गुजराती) याचे विजेता - हरीश मीनाक्षु.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (हिंदी) याचे विजेता - अनामिका (कविता “टोकरी में दिग्गंत”).


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (कन्नड) याचे विजेता - एम.   वीरप्पा मोईली.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (काश्मिरी) याचे विजेता – हिदय कौल भारती.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (कोंकणी) याचे विजेता - आर.एस. भास्कर.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (मैथिली) याचे विजेता - कमलकांत झा.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (मणीपुरी) याचे विजेता – इरुंगबम देवेन.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (मराठी) याचे विजेता - नंद खरे (कादंबरी ‘उद्या’).


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (पंजाबी) याचे विजेता – गुरदेव सिंग रुपाना.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (संस्कृत) याचे विजेता - महेशचंद्र शर्मा गौतम (कादंबरी ‘वैशाली’).


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (संताली) याचे विजेता - रूपचंद हंसदा.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (सिंधी) याचे विजेता - जेठो लालवाणी.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (तामिळ) याचे विजेता – इमईयाम.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (तेलगू) याचे विजेता - निखिलेश्वर.


साहित्य अकादमी पुरस्कार 2020 (उर्दू) याचे विजेता - हुसेन-उल-हक.


10 मार्च 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेचे नवे कार्यकारी संचालक - स्वरूप कुमार साहा.

नीती आयोगाचे ‘SDG इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड 2020-21'भारताच्या शाश्वत विकास ध्येय (SDG) निर्देशांकाची तिसरी आवृत्ती नीती आयोगामार्फत प्रकशित केली जात आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार हे “SDG इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड, 2020-21 : पार्टनरशिप इन द डीकेड ऑफ अॅक्शन” प्रकाशित करतील.


भारताने 2030 कार्यसूची साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश टप्पा पूर्ण केला आहे.


▪️पार्श्वभूमी


“SDG इंडिया इंडेक्स” हा निर्देशांक देशातील SDG प्रगतीवर देखरेख ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर त्याने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे. हा निर्देशांक जागतिक उद्दिष्टे व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने देशाच्या राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय पातळीवरील प्रगतीचे मोजमाप करतो.


डिसेंबर 2018 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. सन 2018-19 मधील पहिल्या आवृत्तीतील 13 उद्दिष्टे, 39 लक्ष्य आणि 62 सूचकांक, द्वितीय आवृत्तीमध्ये 17 उद्दिष्टे, 54 लक्ष्य आणि 100 सूचकांक तर तिसऱ्या आवृत्तीमध्ये 17 उद्दिष्टे, 70 लक्ष्य आणि 115 सूचकांकाचा समावेश आहे.


▪️शाश्वत विकास ध्येये (SDGs) विषयी


2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.


शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.


सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.


सन 2030 साठीची शाश्वत विकास ध्येये (SDGs)


ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन


ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)


ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे


ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)


ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)


ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता


ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा


ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)


ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)


ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)


ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती


ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन


ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)


ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)


ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे रक्षण आणि पुनर्संचयन करणे, वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे तसेच भूमी नापीक होण्यास थांबविणे आणि परिस्थितीला उलट करणे आणि जैवविविधतेची हानी थांबविणे.


ध्येय 16: शांती, न्याय आणि बळकट संस्था (सर्वांसाठी न्यायपूर्ण व्यवस्था तयार करणे, शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक मानवी समाजांना प्रोत्साहन देणे, सर्व सर्व स्तरांवर प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था तयार करणे.


ध्येय 17: ध्येयांसाठी भागीदारी (शाश्वत विकासासाठी वैश्विक भागीदारीची अंमलबजावणी आणि पुनरुत्थान करण्यास उद्देशांना भक्कम करणे.

अमेरिका ४ जुलैपर्यंत करोनामुक्तीच्या समीप’ .🔰 १ मेपर्यंत पात्र व्यक्तींचे करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करून अमेरिकेला ४ जुलै या स्वातंत्र्य दिनी करोनामुक्तीच्या समीप आणण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला आहे.


🔰२० जानेवारीला अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी प्रथमच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले , की करोना साथीतून देशाला बाहेर काढण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येईल. १ मे पर्यंत सर्व प्रौढांना लस घेण्याची परवानगी देऊन त्यांचे लसीकरण करण्यात येईल. ४ जुलैपर्यंत देशाला करोनामुक्तीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करून स्वातंत्र्य दिन करोनाच्या छायेत नव्हे, तर मुक्त वातावरणात साजरा करता येईल अशी परिस्थिती निर्माण करू. संपूर्ण वर्षभर कठीण गेले आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष असणार आहे. त्यात आपण करोनापासूनही स्वातंत्र्य मिळवणार आहोत.


🔰बायडेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सच्या करोना मदत योजनेवर नुकतीच स्वाक्षरी केली आहे.  त्यांनी सांगितले, की चाचण्या व जनुकीय क्रमनिर्धारण केले जाईल. चाचण्या व जिनोमच्या माध्यमातून हे शक्य आहे. कोविड प्रतिबंधासाठी आम्ही योजना आखली आहे.


🔰कोविड १९ मुळे अमेरिकेत गुरुवारी मृतांची संख्या ५,२७,००० झाली असून ही संख्या पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध व व्हिएतनाम युद्ध तसेच ९/११ हल्ला या सर्वांमधील एकूण प्राणहानीपेक्षा मोठी आहे,असे त्यांनी सांगितले.

१ ली ते ११ वी सगळेच पास; विद्यार्थ्यांना सुखद धक्का.🔰करोना काळात देशभरात अनेक भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन घेण्यात आली. काही भागात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन झाल्या. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पुद्दुचेरीमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसत आहे.


🔰इयत्ता १ली ते इयत्ता ११वी अशा सर्वच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास 

करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर


🔰साहित्य अकादमी पुरस्कार – २०२० आज (शुक्रवार) जाहीर झाले असून नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.


🔰तसेच, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ.निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


🔰साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.

गूगल डूडलने केला ‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा सन्मान🔰गूगल डूडलने बुधवारी प्रख्यात भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडुपी रामचंद्र राव यांचा ८९ वा वाढदिवस साजरा केला, ज्यांना लोक “भारताचे सॅटेलाईट मॅन” म्हणून ओळखतात.


🔰डडलमध्ये उजव्या हातात उपग्रह घेतलेले प्रोफेसर राव यांचे रेखाटन आहे आणि त्यांच्यामागे अंतराळ आणि पृथ्वीचे चित्र आहे. “आपली ताऱ्यांच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजुनसुध्दा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे,” असं गुगलने त्यांच्या वर्णनात लिहिलं आहे.


🔰भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष असलेले राव यांनी १९७५ साली “आर्यभट्ट” या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते.


🔰“१० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील एका दुर्गम गावात प्रा. राव यांचा जन्म झाला. त्यांनी वैश्विक किरणशास्त्रज्ञ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर प्रो. राव अमेरिकेत गेले, जिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आणि नासाच्या पायोनियर आणि एक्सप्लोरर स्पेस प्रोब या प्रकल्पांवर देखील काम केले, ” असे गुगल डूडलच्या संकेतस्थळावरील वर्णनात लिहिले आहे.


🔰१९६६ मध्ये भारतात परत आल्यावर प्रा. राव यांनी भौतिक विज्ञान संशोधन प्रयोगशाळेत, एक व्यापक उच्च उर्जा खगोलशास्त्र कार्यक्रम सुरू केला. १९८४ ते १९९४ पर्यंत प्रो. राव यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

देशातील पहिली राज्यस्तरीय 'ई-लोक अदालत छत्तीसगडमध्ये▪️कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 11 जुलै 2020 रोजी भारताची पहिली राज्यस्तरीय 'ई-लोक अदालत छत्तीसगडमध्ये यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. 


▪️छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. आर. रामचंद्र मेनन यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या राज्यस्तरीय ई-लोक अदालत चे उद्घाटन करण्यात आले.


▪️छत्तीसगड उच्च न्यायालय, बिलासपूर आणि छत्तीसगड राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण यांनी संयुक्तपणे याचे आयोजन केले.


▪️उच्च न्यायालयासह राज्य न्यायिक सेवा प्राधिकरणाची राज्यभरातील सर्व 195 खंडपीठे यात सामील झाली होती


🎯पार्श्वभूमी :


✅ कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल आणि 11 जुलै 2020 रोजी नियोजित 2020 मधील द्वितीय आणि तृतीय राष्ट्रीय लोक अदालत रद्द करण्यात आली होती.


✅ 8 फेब्रुवारी 2020 रोजी 2020 सालची पहिली राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती.


🎯राष्ट्रीय लोक अदालतचे महत्त्व :


👉 नयायिक सेवा प्राधिकार कायदा 1987 अंतर्गत स्थापना.


💥 राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority : NALSA) चा उपक्रम :


👉 अपघाती विमा दावे, चेक परत जाणे, आर्थिक विवाद १. यासारखे आर्थिक खटले प्रामुख्याने लोक अदालतीमध्ये सोडविले जातात.


❇️ राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority: NALSA).


▪️नयायिक सेवा प्राधिकार कायदा 1987 अंतर्गत स्थापना.


▪️ ठिकाण : नवी दिल्ली


▪️भारताचे सरन्यायाधीश हे प्रमुख आश्रयदाता (Patron-in- Chief) आणि सर्वोच्च न्यायालयातील द्वितीय क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश हे त्याचे कार्यकारी अध्यक्ष (Executive Chairman) असतात.


▪️उद्दिष्ट : समाजातील तळागाळातील कमकुवत गटाला मोफत न्यायिक सेवा पुरविणे.


▪️राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण यांच्या सहकार्याने लोक अदालतींचे आयोजन करण्यात येते.


▪️याशिवाय न्यायिक साक्षरतेसाठी जनजागृती करणे, सामाजिक न्यायासंबंधी खटले लढविणे ही या संस्थेची प्रमुख कार्ये आहेत.


केंद्र सरकारच्या समित्या:-


१. व्ही. के. सरस्वत:-

हायपरपूल तंत्रज्ञानाची तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवहार्यता शोधण्यासाठी उच्च स्तरीय समिती


२. शशी हेम्प्ती:-

मुंबईत उघडकीस आलेल्या पार्श्वभूमीवर दुरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा फेरआढावा घेणे


३. न्या. मदन बी लोकुर :- 

पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या हेतूने उपाय सुचविणे


४. के. एन. दीक्षित :-

भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास यांचा भ्यास करण्यासाठीची उच्च समिती


५.  राजीव महर्षी :- 

कर्ज माफीचे आणि कोव्हीड-१९शीसंबधीत कर्जाच्या स्थगीतीवरील व्याजाचे आर्थिक परिणाम यांचे मोजमाप करणे


६. डॉ. प्रसन्न कुमार मोहंती :- 

देशातील खासगी क्षेत्रातील बँकांचा प्रचलीत मालकी हक्क आणि त्यांची सरंचना यांचा आढावा घेण्यासाठी नेमलेला कार्यगट


७. डी. पी. सिंग:- 

अधिकाधिक विद्यार्थीनी भारतात रहावे आणि त्यांचे उच्च शिक्षण चालू ठेवावे यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे


८. डॉ. व्ही. के. पाॅल:-

भारतसाठी कोणती कोरोना लस खरेदी करावी, तिचे वितरण कसे करावे यासाठी किती निधी लागेल याचा अभ्यास करणे


९. के. व्ही कामत :- 

कोव्हीड;-१९ मुळे प्रभावीत झालेल्या कर्जाच्या पुर्नरचनेसाठी आर्थिक मापदंड ठरविणे


१०. व्ही. रामगोपाल राव:- 

भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेची भूमिका आणि उत्तरदायीत्वाची पुनर व्याख्या तयार करणे

वाहतूक व दळणवळण१) कर्नल शेवांग रिनशेज पूल/लडाखचा सिंह 

भारतातील सर्वाधिक उंचीवरील सर्व ऋतूकालीन पूल 

आक्टो. २०१९ राजनाथसिंह हस्ते उद्घाटन 

समुद्र सपाटीपासून १४०५० फूट उंचीवर 

लडाखमध्ये श्योक नदीवर (दूरबूक व दौलत बेगओल्डी) 


२) मैत्री ब्रिज 

भारतीय लष्कराने केवळ ४० दिवसात तयार केलेला 

सिंधू नदीवर (लेह) झुलता पुल


३) बोगीबिल पूल / अटल सेतू

देशातील सर्वात लांब रेल्वे – रस्ते पूल (४.९४ किमी) 

ब्रहमपुत्रा नदीवर (आसाम- अरुणाचल प्रदेश जोडतो) 

पुलाच्या खालच्या भागात दुहेरी रेल्वेमार्ग तर पुलाच्या वरच्या भागात ३ पदरी रस्ता


४) चेनानी – नाश्री बोगदा 

देशातील सर्वाधिक लांबीचा (९.२ किमी) बोगदा 

आक्टो २०१९ मध्ये या बोगदयास डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले. 

JK मध्ये हा बोगदा रा.महामार्ग क्र. ४४ वर आहे. 


५) कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट 

जाने २०२० मध्ये या बंदराला १५० वर्षे पूर्ण 

या प्रसंगी त्याचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी 

कांडला बंदर – प.दीनदयाल उपाध्याय पोर्ट ट्रस्ट 

न्हावाशेवा बंदर - प.जवाहरलाल नेहरु बंदर (JNPT) 


६) द.किनारपट्टी रेल्वे क्षेत्र (आंध्रप्रदेश) 

भारताचा १८ वा रेल्वे विभाग 

मुख्यालय - विशाखापट्टण

एकूण लांबी - ३४९० किमी 


७) तेजस एक्सप्रेस 

विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाई देणारी रेल्वे 

पहिली खाजगी रेल्वे (दिल्ली – लखनौ प्रवास) 

१ ली सेमी – हाय स्पीड, पूर्ण वातानुकुलित रेल्वे 


८) बुध्दीस्त सर्किट ट्रेन 

भारत नेपाळ दरम्यान धावणार

गौतम बुध्दांच्या जीवनाशी निगडीत स्थळांना भेट देणारी 


९) थार एक्सप्रेस व समझोता 

थार - जोधपूर ते मुनाबाव दरम्यान (साप्ताहिक) एक्सप्रेस 

समझोता - दिल्ली ते अटारी दरम्यान 

भारत व पाक दरम्यान धावणाऱ्या या रेल्वे कलम ३७० हटवल्यानंतर रद्द करण्यात आल्या


१०) वंदे भारत एक्सप्रेस/ ट्रेन १८ 

स्वदेशी बनावटीची सर्वात वेगवान (१६०-१८० किमी) 

पहिला प्रवास - दिल्ली ते वाराणसी 

दुसरा प्रवास - (दिल्ली ते कटरा)

स्वतंत्र इंजिन नसणारी, १६ डब्यांची रेल्वेगाडी


११) समानता एक्सप्रेस 

डॉ.बाबासाहेब व गौतम बुध्द यांच्याशी संबंधित 

स्थळांना भेट देणारी ही रेल्वे 

चैत्यभूमी, महू, बोधगया, सारनाथ, लुंबिनी, दीक्षाभूमी. 


१२) स्पाइसजेट 

१०० विमाने असणारी भारतातील चौथी कंपनी 

एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो नंतरची ४ थी कंपनी 


१३) कर्तापुर – साहिब कॉरिडॉर 

भारतातील डेरा बाबा नामक ते पाक मधील कर्तापूर साहिब गुरुव्दारा जोडणारा हा मार्ग 

(९/११/१९ रोजी उद्घाटन)

गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त

प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी”: आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी🔰आरोग्यासाठी “प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी” (PMSSN) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.


🔰‘वित्त कायदा 2007’ याच्या कलम 136(ब) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे.


💠योजनेची वैशिष्ट्ये


🔰हा सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी आहे.


🔰आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा निधीमध्ये जमा केला जाईल.

निधीमधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खालील योजनांसाठी उपयोग केला जाईल.


🍁आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)


🍁आयुषमान भारत - आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (AB-HWCs)


💠राष्ट्रीय आरोग्य अभियान


🔰परधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)

आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद


🔰शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टे


🔰निधीचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे.


🔰कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च सुरवातीला निधीमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत करण्यात येईल.

सार्वजनिक वितरण केंद्रांना शोधण्यासाठी “मेरा रेशन” मोबाईल अ‍ॅप🔥गराहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले.


🔥“एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” (ONORC) योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या शिधापत्रिका धारकांना होईल.


🔰“एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” (ONORC) योजना


🔥एक राष्ट्र, एक शिधापत्रिका यंत्रणा ही महत्वपूर्ण नागरीक केंद्रीत योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) या अंतर्गत लाभार्थ्यांना विशेषतः स्थलांतरीत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देशातील कोणत्याही शिधावाटप दुकांनातून (स्वस्त धान्य दुकान) शिधा मिळणे सुनिश्चित केले आहे.


🔥या योजनेने स्थलांतरीत होणारी जनता, ज्यात मुख्यत्वे करून कामगार, रोजंदारीवरील कामगार, शहरी गरीब लोक उदाहरणार्थ कचरा गोळा करणारे, रस्त्यावरील रहिवासी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणारे, घरेलू कामगार ज्यांच्या रहीवासाच्या जागा सतत बदलत असतात अशांचे सशक्तीकरण करून त्यांना अन्नसुरक्षेबाबत आत्मनिर्भर केले आहे.


🔥ऑगस्ट 2019 मध्ये सुरुवातीला 4 राज्यांत सुरू करण्यात आलेली यंत्रणा डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आणि येत्या काही महिन्यातच उर्वरित 4 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात (आसाम, छत्तीसगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल) एकत्रीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


🔥वर्तमानात या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86 टक्के NFSA लोकसंख्या) आहेत आणि ‘एक राष्ट्र एक शिधापत्रिका’ अंतर्गत मासिक सरासरी 1.5 ते 1.6 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार नोंदवले जात आहेत.


🔥दशातील 17 राज्यांत ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ (वन नेशन, वन रेशनकार्ड) योजना यशस्वीपणे कार्यान्वित होत असून उत्तराखंड या राज्याने ही योजना नुकतीच पूर्णत्वास नेली आहे.


🔥ही योजना पूर्ण करणाऱ्या राज्ये त्यांच्या सकल राज्य घरगुती उत्पादनाच्या 0.25 टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास पात्र असतील. त्या अनुषंगाने या राज्यांना अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने 37,600 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल


ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .


क्रनावपासूनपर्यंत


१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिलइ.स. १९४३इ.स. १९४८


२)राजा महाराज सिंगइ.स. १९४८इ.स. १९५२


३)सर गिरीजा शंकर बाजपाईइ.स. १९५२इ.स. १९५४


४) डॉ. हरेकृष्ण महताबइ.स. १९५५इ.स. १९५६


५) श्री प्रकाशइ.स. १९५६इ.स. १९६२६)डॉ. पी. सुब्बरायण१७ एप्रिल इ.स. १९६२६ ऑक्टोबर इ.स. १९६२


७) विजयालक्ष्मी पंडित२८ नोव्हेंबर इ.स. १९६२१८ ऑक्टोबर इ.स. १९६४८) डॉ. पी.व्ही. चेरियन१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ ८ नोव्हेंबर इ.स. १९६९९) अली यावर जंग२६ फेब्रुवारी इ.स. १९७०११ डिसेंबर इ.स. १९७६१०) सादिक अली३० एप्रिल इ.स. १९७७३ नोव्हेंबर इ.स. १९८०११) एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा३ नोव्हेंबर इ.स. १९८०५ मार्च इ.स. १९८२१२) एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ६ मार्च इ.स. १९८२१६ एप्रिल इ.स. १९८५१३) कोना प्रभाकर राव३१ मे इ.स. १९८५२ एप्रिल इ.स. १९८६१४) डॉ. शंकर दयाळ शर्मा३ एप्रिल इ.स. १९८६२ सप्टेंबर इ.स. १९८७१५) कासू ब्रह्मानंद रेड्डी२० फेब्रुवारी इ.स. १९८८१८ जानेवारी इ.स. १९९०१६) डॉ. सी. सुब्रमण्यम१५ फेब्रुवारी इ.स. १९९०९ जानेवारी इ.स. १९९३१७) Dr. पी.सी. अलेक्झांडर१२ जानेवारी इ.स. १९९३१३ जुलै इ.स. २००२१८) मोहम्मद फझल१० ऑक्टोबर इ.स. २००२५ डिसेंबर इ.स. २००४१९) एस.एम. कृष्णा१२ डिसेंबर इ.स. २००४५ मार्च इ.स. २००८२०)एस.सी. जमीर९ मार्च इ.स. २००८२२ जानेवारी इ.स. २०१०२१) काटीकल शंकरनारायण २२ जानेवारी इ.स. २०१०२१ ऑगस्ट इ.स. २०१४२२) सी. विद्यासागर राव३० ऑगस्ट इ.स. २०१४३१ ऑगस्ट, इ.स. २०१९२३) भगत सिंह कोश्यारी१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .


आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची पहिली बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली संपन्न


🚨आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2021 या कालावधीत संपन्न झाली.


🚨बराझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांची संघटना असलेल्या BRICS समूहाची 2021 या वर्षासाठी संकल्पना “BRICS@15: BRICS देशांदरम्यान अखंडता, दृढता आणि सर्वसहमती यासाठी सहकार्य” (BRICS@15:Intra BRICS Cooperation for Continuity Consolidation and  Consensus) ही आहे.


🚨आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाच्या (CGETI) भारत सरकारच्या अध्यक्षतेदरम्यान पूर्ण करता येतील अशा बाबीविषयीचे भारत सरकारच्या विविध संबंधित विभागांनी तयार केलेले सादरीकरण निरनिराळ्या सत्रांत प्रस्तावित केले गेले. या सादरीकरणात खालील बाबींचा समावेश होता -


🚨रशियाच्या 2020 मधील BRICS अध्यक्षपदाच्या कालावधीत  स्वीकारलेल्या ‘BRICS आर्थिक भागिदारी 2025 रणनीती’ या दस्तावेजावर आधारीत कृती आराखडा

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) ट्रिप्स (TRIPS) सवलत प्रस्तावासह बहुआयामीय व्यापार प्रणालीबाबत BRICS सहकार्य

ई कॉमर्स प्रणालीतील ग्राहक संरक्षणासाठी चौकट तयार करणे


🚨शल्करहित उपाययोजना ठराव यंत्रणा

स्वच्छता आणि शारिरीक आरोग्य स्वच्छता कार्य यंत्रणा (SPS)


🚨अनुवांशिक संसाधने आणि पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी सहकार्याची चौकट


☄️वयावसायिक सेवा सहकार्यासाठी BRICSची संरचना


🚨कोरोना विषयक सद्यस्थितीत भारताने प्रस्तावित केलेल्या विविध उपक्रमांतून एकत्रपणे कार्य करण्याला BRICSच्या भागीदार देशांची सहमती दर्शविली.


☄️BRICS समूहाविषयी


🚨BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🚨रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

चीनला मोठा दणका देण्याची भारताची तयारी, Huawei वर लवकरच बंदी घालण्याची शक्यता🎍भारत चीनला अजून एक मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेनंतर आता भारतही चीनची दिग्गज टेक कंपनी Huawei वर बंदी घालण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल असंही समजतंय.


🎍१५ जूननंतर नाही खरेदी करता येणार Huawei  ची उपकरणं? :- वृत्तसंस्था Reutersने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या Huawei या कंपनीच्या दूरसंचार उपकरणांचा वापर करण्यापासून भारतातील मोबाईल कंपन्यांना रोखलं जाईल, असं सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. ‘१५ जूननंतर टेलिकॉम कंपन्यांना केवळ सरकारद्वारे परवानगी देण्यात आलेल्या काही ठराविक कंपन्यांकडूनच उपकरणं खरेदी कारावी लागतील. तसेच ज्या कंपन्यांकडून उपकरणं खरेदी करता येणार नाहीत त्यांची ब्लॅकलिस्टही जारी केली जाईल. या ब्लॅकलिस्टमध्ये Huawei कंपनीचं नाव असू शकतं’, असंही या दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं.


🎍ZTE कॉर्पवरही बंदीची शक्यता :- भारतात एखादी कंपनी गुंतवणूक करत असताना भारतीयांच्या सुरक्षेला धक्का लागत असेल तर अशा परिस्थितीत आर्थिक फायदा-तोटा न पाहता जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल, असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, ZTE कॉर्प या चिनी कंपनीलाही भारतात बंदी घातली जाऊ शकते, असं अन्य एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं. दोन्ही कंपन्या आपल्या उपकरणांद्वारे चिनी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


🎍दरम्यान, गेल्या वर्षी भारत-चीन सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या बहुतांश लोकप्रिय आणि मोठ्या कंपन्यांचे अॅप्स बॅन करत आहे. सरकार आता Huawei या चीनच्या मोठ्या टेक कंपनीवरही बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

पाकिस्तानला देणार ४.५ कोटी Made In India व्हॅक्सिन ❄️❄️


🍁भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


🍁GAVI अंतर्गत लसींच्या पुरवठ्यासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. यामुळे जगातील अर्ध्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण केलं जातं. करोना संकटाच्या काळातही पाकिस्तानला ही मदत केली जात होती. सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानला करोना लस पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.


🍁खवाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत ४.५ कोटी लसीचे डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारे लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली.


🍁“GAVI करारांतर्गत भारतात निर्मिती करण्यात आलेली लस पाकिस्तानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विकसनशील आणि गरीब देशांना लस पुरवणं हा या कराराचा मुख्य हेतू आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं

राष्ट्रीय राजमार्ग (#National_Highways)राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1B (km. 274) – बटोटे से खानाबल तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1C (km. 8) – डोमेल से कटरा तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1D (km. 422) – श्रीनगर से कारगिल से लेह तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2 (km. 1,465) – दिल्ली से कोलकाता तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2A (km. 25) – सिकन्दरा से भोगनीपुर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2B (km. 52) – बर्धमान से बोलपुर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 3 (km. 1,161) – आगरा से मुम्बई तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4 (km. 1,235) – थाणे के पास राष्ट्रीय राजमार्ग 3 से चेन्नई तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4A (km. 153) – बेलगाम से पणजी तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4B (km. 27) – नवाशेवा से पाल्सपे तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5 (km. 1,533) – राष्ट्रीय राजमार्ग 6 से चेन्नई तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5A (km. 77) – राष्ट्रीय राजमार्ग 5 के पास से पारादीप बंदरगाह तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 6 (km. 1,949) – हजीरा से कोलकाता तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 7 (km. 2,369) – वाराणसी से कन्याकुमारी तक


राष्ट्रीय राजमार्ग NH) 7A (km. 51) – लयमकोट्टई से तूतीकोरन बंदरगाह तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8 (km. 1,428) – दिल्ली से मुंबई तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8A (km. 473) – अहमदाबाद से मांडवी तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8B (km. 206) – बामनबोर से पोरबंदर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8C (km. 46) – चिलोड़ा से सरखेज तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8D (km. 127) – जेतपुर से सोमनाथ तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8E (km. 220) – सोमनाथ से भावनगर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) NE 1 (km. 93) – अहमदाबाद से वडोडरा तक


एक्सप्रेस वेराष्ट्रीय राजमार्ग (NH) 9 (km. 841) – मुणे से मछलीपट्टनम तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 10 (km. 403) – दिल्ली से फज़िल्का से भारत पाकिस्तान सीमा तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11 (km. 582) – आगरा से बीकानेर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11A (km. 145) – मनोहरपुर से कोथम तक


http://telegram.me/sailakshya


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11B (km. 180) – लालसोट से धौलपुर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12 (km. 890) – जबलपुर से जयपुर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12A (km. 333) – जबलपुर से झाँसी तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 13 (km. 691) – शोलापुर से मंगलौर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 14 (km. 450) – बीवार से राधापुर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 15 (km. 1,526) – पठानकोट से समाखियाली तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 16 (km. 460) – निजामाबाद से जगदलपुर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17 (km. 1,269) – पानवेल से इदपल्ली तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17A (km. 19) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कोर्टलम से मढ़गाव तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17B (km. 40) – पोंडा से वास्को तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18 (km. 369) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कुरनूल से राष्ट्रीय राजमार्ग 4 के पास चित्तूर तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18A (km. 50) – तिरुपति से पुथलपट्टू तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 19 (km. 240) – गाजीपुर से पटना तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 20 (km. 220) – पठानकोट से मंडी तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21 (km. 323) – चंड़ीगढ़ के पास राष्ट्रीय राजमार्ग 22 से मनाली तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21A (km. 65) – पिंजौर से स्वारघाट तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 22 (km. 459) – अंबाला से भारत चीन सीमा के पास शिपकिला तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 23 (km. 459) – चस से राष्ट्रीय राजमार्ग 42 के संगम तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24 (km. 438) – दिल्ली से लखनऊ तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24A (km. 17) – बख्शी का तालाब से चेन्हट (राष्ट्रीय राजमार्ग 28) तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 25 (km. 352) – लखनऊ से शिवपुरी तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 25A (km. 31) – राष्ट्रीय राजमार्ग 25 से बख्शी का तालाब तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 26 (km. 396) – झाँसी से लखनादौन तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 27 (km. 93) – इलाहाबाद से मंगावन तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28 (km. 570) – बरौनी के पास राष्ट्रीय राजमार्ग 31 से लखनऊ तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28A (km. 68) – पिपरा के पास राष्ट्रीय राजमार्ग 28 से भारत नेपाल सीमा तक


राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28B (km. 121) – छपवा से छपरा से राष्ट्रीय राजमार्ग 28 ए के पास बाघा तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 28C (km. 184) – बारबंकी से नेपाल सीमा तक


भारत के पर्वत, पहाड़ियाँ व राज्य🔳कराकोरम, कैलाश श्रेणी – भारत एवं चीन


🔳लद्दाख श्रेणी – भारत (जम्मू कश्मीर)


🔳जास्कर श्रेणी – जम्मू कश्मीर


🔳पीरपंजाल श्रेणी – जम्मू कश्मीर


🔳नगा पर्वत (8126) – जम्मू कश्मीर


🔳कामेत पर्वत (7756) – उत्तरांचल


🔳नदा देवी (7817) – उत्तरांचल


🔳धौलागिरि (8172) – हिमाचल प्रदेश


🔳गरू शिखर (1722) – राजस्थान


🔳मांउट एवरेस्ट (8848) – नेपाल


🔳खासी,जयंतिया,गारो पहाडियां - असम-मेघालय


🔳नागा पहाड़ी – नागालैण्ड


🔳अरावली श्रेणी – गुजरात, राजस्थान,दिल्ली


🔳माउंटआबू (1722) – राजस्थान


🔳विन्ध्याचल श्रेणी – मध्य प्रदेश


🔳सतपुड़ा पहाड़ी – मध्य प्रदेश


🔳महादेव पहाड़ी(धूपगढ़ 1350) – मध्य प्रदेश


🔳मकाल पहाड़ी (अमरकंटक 1036) मध्य प्रदेश


🔳राजमहल पहाड़ी – झारखण्ड


🔳सतमाला पहाडी – महाराष्ट्र


🔳अजंता श्रेणी – महाराष्ट्र


🔳महेन्द्रगिारि पहाड़ी – उड़ीसा


🔳महाबलेषवर पहाड़ी – महाराष्ट्र


🔳नीलगिरि पहाड़ी – तमिलनाडू


🔳अन्नामलाई पहाड़ी (1695) – तमिलनाडू


🔳छोटा नागपुर का पठार – झारखंड


🔳बदेलखण्ड पठार –  (म.प्र., उ.प्र


🔳बघेल खण्ड पठार – म.प्र


🔳तलांगना पठार- आंध्र प्रदेश (नर्मदा के दक्षिण)


🔳मसूर पठार – कर्नाटक


🔳दोदाबेटा – केरल, तमिलनाडू


🔳इलाइची पहाड़ियां – केरल, तमिलनाडू


🔳डाफ्ला पहाड़ियां – अरूणाचल प्रदेश


🔳मिषमी पहाड़िया – अरूणाचल प्रदेश


🔳मिकिर पहाड़ी – अरूणाचल प्रदेश


🔳लशाई           –   मिजोरम


🔳गाडविन आस्टिन चोटी (के2) जम्मू-कश्मीर


🔳कचनजंघा – सिक्किम

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार◾️जन्म: 12 मार्च 1913


◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होय 


◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 


◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.


◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.


◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.


🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.


◾️तयांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता. 


◾️ यरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.


◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला


◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.


◾️ दसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. 

◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले


◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.


◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले


◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.


◾️1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री,

1966-70 गृहमंत्री,

1970-74 पर्यंत अर्थमंत्री व

 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.


◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

इनोव्हेशन इंडेक्स २०२१ : द. कोरिया जर्मनीला पिछाडीवर टाकून पहिल्या क्रमांकावर🔸जगभरात नव्या शोधाच्या क्षेत्रात दक्षिण कोरिया यंदा अग्रस्थानी आहे.

🔸अमेरिका आघाडीच्या १० देशांच्या यादीतून बाहेर आहे.

🔸बलूमबर्गने आपला इंडेक्स २०२१ जाहीर केला आहे. यादीत भारताचा क्रमांक ५० वा आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने चार अंकांनी प्रगती केली आहे.

🔸गल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या जर्मनीला कोरियाने मागे टाकले. जर्मनीचा क्रमांक आता चौथा आहे.

🔸नऊ वर्षांपासून ही क्रमवारी जाहीर केली जाते. त्यात ७ वेळा आशियाई देशांनी आघाडी घेतली आहे.

🔸यात क्रमाक्रमाने वर येत सिंगापूर व स्वित्झर्लंड क्रमश: दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ब्लूमबर्ग इंडेक्स दहाहून जास्त मापदंडांचे विश्लेषण करते.

🔸तयात संशोधन, विकासावरील खर्च, उत्पादनातील क्षमता, हायटेक पब्लिक कंपन्यांना प्रोत्साहन देणे व इतर निकषांवर ही क्रमवारी दिली जाते.


📍इनोव्हेशन रँक

१. द कोरिया

२. सिंगापूर

३. स्वित्झर्लंड

४. जर्मनी


Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी सिरिल रामाफोसा यांची निवड ◾️त्यांना ही दुसऱ्या वेळी अध्यक्ष पद भेटले ◾️आता पन तेच अध्यक्ष आहेत ❇️ नुकतीच नि...