17 September 2025

वारे

 उष्ण व कोरडे वारे ⚡️

१) फॉन - आल्प्स पर्वताच्या उतारावरून

२) चिनुक - उत्तर अमेरिका व कॅनडात असणाऱ्या रॉकी पर्वतावरून पूर्वेकडे

३) सिमुन - सहारा व अरब भागातील वाळवंटी प्रदेशातून

४) सिरोक्को - उत्तर आफ्रिका, सिसली व दक्षिण इटली

५) शामल - इराण, इराक, अरब प्रदेशातील वाळवंटी भागातून

६) झोंडा - अर्जेंटिना (अँडिज पर्वतातून)

७) खामसिन - उत्तर आफ्रिकेतून

८) हबुब - उत्तर सुदान

९) हरमॅटन - पश्चिम आफ्रिकेच्या गिनीच्या आखताकडे

१०) नोर्वेस्टर - पश्चिम बंगाल

११) लू - पाकिस्तान व उत्तर भारतातील मैदानी प्रदेश

१२)बाग्यो - फिलिपाईन्स 



थंड वारे ⚡️

१) पंपेरो - अर्जेंटिना, उरुग्वेमधील पंपास

२) बोरा - दक्षिण युरोपातील ऑडियाट्रीक समुद्रावरून

३) मिस्ट्रल - फ्रान्स

४) सर्दली बूस्टर - ऑस्ट्रेलिया

५) पापागयो - मेक्सिको

६) ब्लिझार्ड - सायबेरिया, कॅनडा

७) बर्ग विंड - दक्षिण आफ्रिक

बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५

१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा 


२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू 


३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट


४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू 


५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला 


६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव 


७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन) 


८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री* 


९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती* 


🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस 


१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष 


१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर


दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)

🔹 नियंत्रण – ग्रामविकास मंत्रालय

🔹 सुरुवात – २५ सप्टेंबर २०१४

🔹 उद्दिष्ट – ग्रामीण गरीब तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणून समावेशक विकास साधणे


🔹 लक्ष्यगट – १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण गरीब तरुण

▪️ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

▪️ प्रशिक्षित झालेल्या किमान ७५% तरुणांना रोजगाराची हमी


🔹 आरक्षण प्रमाण –

▪️ महिला – ३३%

▪️ अनुसूचित जाती व जमाती – ५०%

▪️ अल्पसंख्यांक – १५%


💠 प्रादेशिक योजना (DDU-GKY अंतर्गत)

🔹 हिमायत – जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण तसेच शहरी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण

🔹 उम्मीद – जम्मू-काश्मीरमधील स्त्रियांचे सबलीकरण व स्वयंसहायता गटांची निर्मिती

🔹 परवाज – दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण अल्पसंख्यांक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व शिक्षण

🔹 रोशनी – अति डाव्या विचारसरणीने बाधित जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणे