Tuesday 21 March 2023

Daily Top 10 News : 21 March 2023


1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील. या परिषदेला विविध देशांचे कृषी मंत्री, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, स्टार्टअप नेते आणि इतर भागधारक उपस्थित राहणार आहेत.


2) हरिद्वार येथील आयुर्वेदिक विद्यापीठाच्या ऋषीकुल कॅम्पसने नुकतेच “पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद” या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेट कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. 17 मार्च रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या हस्ते करण्यात आले.


3) संपन्ना रमेश शेलार या शारीरिक शिक्षणाच्या पदवीधर विद्यार्थिनीने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते तामिळनाडूतील धनुसकोडीपर्यंत पोहण्याच्या 21 वर्षांखालील गटात सर्वात वेगवान भारतीय बनून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने 29 किमीचे अंतर अवघ्या 5 तास 30 मिनिटांत पूर्ण केले.


4) हरिद्वार येथे ‘पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेत संमेलनाचे उद्घाटन झाले.


5) भारताच्या G20 अध्यक्षतेखालील Startup20 Engagement Group (B20) ची दुसरी बैठक 18-19 मार्च रोजी गंगटोक, सिक्कीम येथे झाली आहे.


6) ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारत 13 व्या क्रमांकावर आहे.


7) जी कृष्णकुमार यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


8) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेत वित्त आणि विनियोग विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणा केली. राजस्थानमध्ये आता 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग असतील, ज्यामुळे जिल्ह्यांची संख्या 50 आणि विभागांची संख्या 10 होईल.


9) राम सहाया प्रसाद यादव हे नेपाळचे तिसरे उपराष्ट्रपती बनले आहेत.


10) सेव्हन पीएम मित्रा (प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल) पार्क साइट्सची घोषणा करण्यात आली.

पोलीस भरती प्रश्नसंच


1. एका विशिष्ट रक्कमेवर 7 % दराने 2 वर्षात 1449 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?

1000 

10000🏆

12000

1200


2. 4312 x 5417 =?

23358104 🏆

23357104

23348104

23349104


3. 96435 या संख्येतील 6 व 3 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?

6300

6030🏆

603


4. एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 3: 4: 5 आहे लहान व मोठ्या कोणातील अंतर 30°आहे तर मोठ्या कोणाचे माप किती?

30° 

45°

75°🏆

60°


 

5. 72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी रेल्वे 50 सेकंदात किती अंतर कापेल?

900 

800

1000🏆

1200


6. 20 वर्ष वय असलेल्या मुलाचे 55 वर्ष वय असलेल्या वडीलांशी असलेले गुणोत्तर किती?

4: 11 🏆

11: 4

 5: 4 

5: 11


7. x आणि y दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वतंत्रपणे y 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम X किती दिवसात पूर्ण करेल?

10 

20🏆

15

25


8. संयुक्त संख्या ओळखा . 7, 3, 5, 9

9 🏆

5

7

3


 

9. जय व हरि १४०० रुपयात अनुक्रमे १ शर्ट व खरेदी केला. हरीच्या किंमत जायच्या शर्टच्या किमतीपेक्षा ३०० रुपयाने अधीक आहे तर शर्टची किमत किती?

750 

850

1100

550🏆


10. एका संख्येमध्ये त्याचा संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

30 

35

20

40🏆


11. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

49, 121,169,289, _.

256 

324

361🏆

441


12. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

AZ, CX, EV, GT, _.

HS 

HT

IR🏆

IQ


13. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

12: 35: : : ? : 63

14 

15

16🏆

18


14. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ab _ cd _ cbcd

aa, bb 

cc, aa

ca, bc

cb, ab🏆


 

15. मुंबईवरून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटास एक वस आहे अमरल सकाळी 7: 00 वा बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वीच गेलेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?

7: 25 

7: 45

7: 55

8: 05🏆


16.एका सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल?

 16 

36🏆

45

60


17.एका सांकेतिक लिपीत WETHER = 13119753 तर WERE = ?

7357 

57911

131135🏆

35115


18. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

QFODJM 

AFODJM

QFOJMD

ODMBHK🏆


 

19. जर 1 = D, 2 = Y, 3 = X, 4 = P, 5 = N, तर 2351432 =?

YXPDPYX 

YXNDPXY🏆

 XYNDPYX

XYDNPYX


20. जर ANSWER म्हणजे REWSNA तर QUESTION म्हणजे काय?

NOITSEUQ 🏆

QRQTJSON

QNUOESTI

PDVJSTON


31. खालीलपैकी संत एकनाथ यांची रचना कोणती?

भावार्थरामायण 🏆

अभंगगाथा

भावार्थदीपीका

गीतारहस्य


32. आपण सर्वांनी हळू वाचावे

सकर्मक कर्तरी 

सकर्मक भावे

अकर्मक भावे🏆

यापैकी नाही


33. पंचमुखी

दिगू 

बहुव्रीही🏆

कर्मधारेय 

अव्ययीभव


34. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

विसावा 

विश्रांती

विश्राम🏆

 आराम


 

35. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.

तृतीय 

पंचमी🏆

सप्तमी

व्दितीय


36. राजनने अभ्यास केला.

चतुर्थी  

व्दितीया

तृतीया🏆

षष्ठी


37. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे

पकडून ठेवणे 

कचाट्यात पकडण🏆

आळवणी करणे

शरण आणणे


38. 'आणि' हे कोणते अव्यय आहे?

विकल्प बोधक  

परिणामबोधक 

संकेतबोधक 

समुच्चयबोधक🏆


 

39. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .

तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही  

तळेराखणारा मनुष्य पाणी पितोच 

ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच 🏆

तळेराखणारा अधिकाराचा वापर करतो 


40. सज्जन 

सत् + जन  🏆

सन् + जन 

सज् + जन 

सज् + ज्जन


21. ......... हा संघराज्य व घटकराज्य  यामधील दुवा म्हणून कार्य करतो?

मुख्यमंत्री 

पंतप्रधान

राष्ट्रपती

राज्यपाल


22. कोणतेही अर्थविधेयक -------------- मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?

राष्ट्रपती 🏆

अर्थमंत्री

पंतप्रधान

मंत्रीमंडळ


23. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरुन घेण्यात आली?

आफ्रिका 

आयर्लंड🏆

अमेरिका

कॅनडा


24. भारतीय राज्यघनेच्या ........... कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१४ ते १८ 🏆

३१ ते ३५

२२ ते २

३१ ते ५


 

25. केंद्रीय मंत्रीमंडळातील एखादा सदस्य संसदेंच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून --------- त्यासा कोणत्याही एका गृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक आहे?

तीन महिन्याच्या आत 

सहा महिन्याच्या आत🏆

एका न्यायालयाची आत

पाच वर्षाच्या आत


26. केंद्रीय कायदेमंडळात कुणाचा समावेश असतो ?

लोकसभा 

राज्यसभा

राष्ट्रपती

यापैकी सर्व🏆


27. महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे?

राष्ट्रपती 🏆

कायदा आयोग

सर्वोच्च न्यायालय

कायदेमंत्री


28. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

१८ 

१२🏆

१६

२०


 

29. राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार ---------- घटनेवरून घेण्यात आले आहेत

रशियाच्या 

ऑस्ट्रेलियाच्या

वायरमन प्रजासत्ताक🏆

कॅनडाच्या


30. संसद सदस्य होण्याकरिता कोणत्याही व्यक्तीला किमान कोणती पात्रता पूर्ण करावी लागते?

तो भारताचा नागरिक असावा 

त्याच्या वयाला २५ वर्षे पूर्ण असावीत

लोकप्रतिनिधी कायघात देण्यात आलेल्या सर्व अटी पूर्ण कराव्यात

यापैकी सर्व🏆

महत्त्वाचे प्रश्नसंच

1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

संघराज्य

विधानमंडळ

राज्यांचा संघ

विधान परिषद

उत्तर : राज्यांचा संघ


2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

दिल्ली

अंदमान-निकोबार बेटे

पौंडेचेरी

दीव व दमण

उत्तर : अंदमान-निकोबार बेटे



 

3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

प्रत्यक्ष मतदान

अप्रत्यक्ष मतदान

प्रौढ मतदान

प्रौढ पुरुष मतदान

उत्तर : प्रौढ मतदान


4. गोगलगाय —– या संघात मोडते.

मोलुस्का

आर्थोपोडा

इकायनोडमार्ट

नेमॅटोडा

उत्तर : मोलुस्का


5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो. 

एकेरी बंध

दुहेरी बंध

तिहेरी बंध

यापैकी एकही नाही

उत्तर : एकेरी बंध


6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

शुक्र

बुध

मंगळ

पृथ्वी

उत्तर : बुध


7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

मुल्क राज आनंद

शोभा डे

अरुंधती राय

खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

सिंधुदुर्ग

ठाणे

रत्नागिरी

रायगड

उत्तर : ठाणे


9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

मुंबई

बंगलोर

कानपूर

हैदराबाद

उत्तर : बंगलोर


10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

01

02

03

यापैकी एकही नाही

उत्तर : यापैकी एकही नाही


11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

मुख्यमंत्री

महाधीवक्ता

पंतप्रधान

महान्यायवादी

उत्तर : पंतप्रधान



 

12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

9800 J

980 J

98 J

9.8 J 

उत्तर : 980 J


13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय

केशव चंद्र सेन

देवेंद्रनाथ टागोर

ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

डॉ. बी.आर. आंबेडकर

वि.रा. शिंदे

महात्मा जोतिबा फुले

भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

अॅथलेटिक्स

कुस्ती

क्रिकेट

स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

हत्ती

वाघ

सिंह

हरिण

उत्तर : हत्ती


17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

21

25

30

35

उत्तर : 35


18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

1 मे 1960

1 मे 1961

1 मे 1962

1 मे 1965

उत्तर : 1 मे 1962



 

19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

78

238

250

288

उत्तर : 288


20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

CO२

H२S

SO२

NH३

उत्तर : NH३

सराव प्रश्न

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.

1. 110

2. 115

3. 105

4. 120

उत्तर : 110


2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.

1. पेंच

2. मणिकरण

3. कोयना

4. मंडी

उत्तर : मणिकरण


3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1. मुल्क राज आनंद

2. शोभा डे

3. अरुंधती राय

4. खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.

1. सिंधुदुर्ग

2. ठाणे

3. रत्नागिरी

4. रायगड

उत्तर : ठाणे


5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

1. मुंबई

2. बंगलोर

3. कानपूर

4. हैदराबाद

उत्तर : बंगलोर


6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

1. 20 मीटर

2. 200 मीटर

3. 180 मीटर

4. 360 मीटर

उत्तर : 200 मीटर


7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.

1. दोन

2. तीन

3. चार

4. एक

उत्तर : तीन


8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.

1. राज्यपाल

2. मुख्यमंत्री

3. मंत्रीपरिषद

4. राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल


9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.

1. नील-हरित

2. हरित

3. लाल

4. रंगहीन

उत्तर : हरित


10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

1. नायट्रोजन

2. अमोनिया

3. हेलियम

4. कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:

लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

आतापर्यंत झालेल्या व होणाऱ्या सर्व जी २० परिषदा

🇺🇲 ०१ली : २००८ : वॉशिंग्टन , अमेरिका 

🇬🇧 ०२री :  २००९ : लंडन , ब्रिटन 

🇺🇲 ०३री :  २००९ : पीट्सबर्ग , अमेरिका

🇨🇦 ०४थी : २०१० : टोरांटो , कॅनडा 

🇰🇷 ०५वी : २०१० : सियोल , दक्षिण कोरिया 

🇫🇷 ०६वी : २०११ : कान्स , फ्रांस 

🇲🇽 ०७वी : २०१२ : लॉस कॉबोस , मॅक्सिको

🇷🇺 ०८वी : २०१३ : सेंट पिटर्सबर्ग , रशिया 

🇦🇺 ०९वी : २०१४ : ब्रिस्बेन , ऑस्ट्रेलिया 

🇹🇷 १०वी : २०१५ : अंतालिया , तुर्की 

🇨🇳 ११वी : २०१६ : हांगझोऊ , चीन

🇩🇪 १२वी : २०१७ : हैम्बर्ग , जर्मनी 

🇦🇷 १३वी : २०१८ : अर्जेंटिना

🇯🇵 १४वी : २०१९ : ओसाका , जपान 

🇸🇦 १५वी : २०२० : सौंदी अरेबिया

🇮🇹 १६वी : २०२१ : इटली 

🇮🇩 १७वी : २०२२ : इंडोनेशिया

🇮🇳 १८वी : २०२३ : भारत

🇧🇷 १९वी : २०२४ : ब्राझील .


✔️ जी २० देश 


🇺🇲 अमेरिका

🇦🇷 अर्जेंटिना 

🇦🇺 ऑस्ट्रेलिया 

🇧🇷 बराझील 

🇨🇦 कनडा 

🇨🇳 चीन

🇪🇺 यरोपियन संघ 

🇫🇷 फरान्स 

🇩🇪 जर्मनी

🇮🇳 भारत 

🇮🇩 इडोनेशिया

🇮🇹 इटली 

🇯🇵 जपान

🇲🇽 मक्सिको 

🇷🇺 रशिया 

🇸🇦 सौदी अरेबिया 

🇿🇦 दक्षिण आफ्रिका 

🇰🇷 दक्षिण कोरिया

🇹🇷 तर्की

🇬🇧 बरिटन .

दुसरी पंचवार्षिक योजना (Second Panchwarshik Scheme)


कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.

मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : पी. सी. महालनोबिस.

प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी

                 (ii) दळणवळण

                 (iii) शेती.

अपेक्षित वृद्धी दर : 4.5%.

प्रत्यक्ष वृद्धी दर : 4.5%.

योजनेचे उपनाव : नेहरू – महालनोबिस योजना.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 4800 कोटी रु,

                  वास्तविक खर्च – 4600 कोटी रु.


उद्दिष्टे :

विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.

जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून उद्योगीकरण.

10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.

समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.


प्रकल्प :

भिलाई पोलाद प्रकल्प – रशियाचा (1959)

रूरकेला पोलाद प्रकल्प – प. जर्मनी (1959)

दुर्गापुर पोलाद प्रकल्प – ब्रिटन  (1962)

BHEL – भोपाल

दोन खत कारखाने – (i) नानागल (ii) रूरकेल


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

📚  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश


✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

✔️ करोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

✔️टगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

✔️तल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

✔️यरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

✔️मगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम


― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.

― मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. 

― (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. 

― ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.

― गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.

― कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.

― प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.

― बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

― या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.

― सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.

― या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.

― काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.

― व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.

― मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.

― भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

― निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

― स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.

― भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.


▪️छोडो भारत चळवळ


क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.


▪️नेताजी सुभाष चंद्र बोस


भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


▪️आझाद हिंद सेना


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.


▪️भारतीय नौदलाचा उठाव


आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

---–----------------------------------------------------

पाचवी पंचवार्षिक योजना (Fifth Panchwarshik Scheme)

कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979

मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन

प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र

योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर – 4.4%

प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%



उद्दिष्टे :

1. आर्थिक वाढ – लक्ष्य – 4.4%

2. दारिद्र्य निर्मूलन

3. उत्पादक रोजगारात वाढ



प्राधान्य :

1. शेती

2. उद्योग

3. इंधन / ऊर्जा


कार्यक्रम :

TRYSEM – ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

किमान गरजा कार्यक्रम –

1. दरिद्री रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा.

2. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यकक्षमता वाढविणे.




विशेष घटनाक्रम :

1. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या.

2. 1976-77 मध्ये दुसर्‍यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल ठरला.

3. 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.

4. 1975-76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली.

5. 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्येपरिस्थिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)सुरू करण्यात आला.


मूल्यमापण :

1. अशुभ सुरवात –1973 चातेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे.

2. दरिद्रय निर्मूलन, बेरोजगारी, आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.

3. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती.   

4. 26 जुन 1975 – आणीबाणीची घोषणा

5. 1 जुलै 1905 – 20 कलमी कार्यक्रम.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

९ वी पंचवार्षिक योजना

👉 कालावधी: इ.स. १९९७ - इ.स. २००२

👉 पराधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती 👉 घोषवाक्य : सामाजिक न्याय आणि समनतेसह आर्थिक वाढ. 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ८,९५ ,२०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ९,४१,०४० कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना(१५ ऑगस्ट १९९७)- स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे. 

👉 २. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना(डिसेंबर १९९७)- शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार 

👉 ३. भाग्यश्री बाल कल्याण योजना 

👉 ४. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना(१९ ऑक्टोबर १९९८)- स्त्रियांसाठी विमा संरक्षण 

👉 ५. अन्नपूर्णा रोजाना(मार्च १९९९) - पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा. 

👉 ६. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना(१ एप्रिल १९९९)- IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 

👉 ७. जवाहर ग्राम समृद्धी योजना(१ एप्रिल १९९९)- सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती 

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ?

 देशांतर्गत संस्था व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षात मिळवलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे तीन पद्धतीने मोजली जाते.


1) उत्पन्न पद्धत (income method)

2) उत्पादन पद्धत (product method)

3)  खर्च पद्धत (expenditure method)


 1) उत्पन्न पद्धत(income method) –

    या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणार्‍या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते.वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य वापरले जाते.त्यांच्या मालकांना उत्पन्न म्हणजे खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होतो. याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे उत्पन्न पद्धत म्हणतात.  उत्पन्न पद्धतीत घटक किंमत विचारात घेतली जाते.


 2) उत्पादन पद्धत (product method) –

       या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज करून काढली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.


 3) खर्च पद्धत(expenditure method) –

           राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते.  उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो.  गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील असा दोन प्रकारचा असतो.

जवाहर ग्राम योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999


योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्माण करणे

उद्देश जवाहर रोजगार योजनेस अधिक प्रभावी आणि व्यवहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये मागणी आधारीत सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी  साधन सामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

जवाहर ग्रामसमृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 75:25% आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली.


🔰शेती.

वानिकी, लॉगिंग आणि मासेमारी यासारख्या शेती आणि संबंधित क्षेत्राचा वाटा जीडीपीच्या  होता, या क्षेत्राने  2014 मध्ये एकूण कामगारांपैकी% रोजगार मिळविला. कृषी क्षेत्राने जीडीपीच्या २% काम केले आणि देशातील एकूण कामगारांपैकी  रोजगार उपलब्ध झाला. 

मध्ये 2016  भारतीय अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण आणि घेतले आहे म्हणून, जीडीपी शेती योगदान हळू हळू 1951 ते 2011 पर्यंत कमी झाली आहे, पण तो अजूनही देशातील सर्वात मोठी रोजगार स्रोत आणि त्याच्या एकूणच सामाजिक व आर्थिक विकास लक्षणीय तुकडा आहे.

 पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीवर विशेष भर देण्यात आल्यामुळे आणि सिंचन, तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धतींचा वापर आणि शेती पतपुरवठा यांच्या तरतूदीत सातत्याने सुधारणा केल्यामुळे सर्व पिकांचे पीक-उत्पन्न-प्रति-युनिट-क्षेत्र १ since since० पासून वाढले आहे.

भारतातील हरित क्रांतीपासून अनुदान. तथापि, आंतरराष्ट्रीय तुलनेत भारतातील सरासरी उत्पादन हे सहसा जगातील सर्वाधिक सरासरी उत्पादनाच्या 30% ते 50% पर्यंत असल्याचे दिसून येते. राज्यांत उत्तरप्रदेश , पंजाब , हरियाणा , मध्यप्रदेश , आंध्रप्रदेश , तेलंगणा , बिहार , पश्चिमबंगाल , गुजरात आणिभारतीय शेतीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे.

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...