Friday 6 September 2019

महाराष्ट्र : अभयारण्ये.

▫️कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.

🔸पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे

🔸नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.

🔹औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.

🔻अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) दाशी    2) दासी      3) माळीण    4) मादी

उत्तर :- 2

2) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.

   अ) शहारे    ब) हाल      क) केळे      ड) रताळे.

   1) अ आणि ब    2) अ आणि ड    3) अ, क आणि ड    4) फक्त ड

उत्तर :- 1

3) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) कुत्र्या    2) कुत्री      3) कुत्रे      4) कुत्रि

उत्तर :- 1

4) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?

   1) सात    2) नऊ      3) आठ      4) दहा

उत्तर :- 3

5) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.

   1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल      2) पाऊस पडेल
   3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते    4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

उत्तर :-2

6) एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द ................. आहेत.

   1) उद्देश्य    2) विधेय      3) उद्देश्यविस्तार    4) विधेयविस्तार

उत्तर :- 3

7) ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) कर्मकर्तरी

उत्तर :- 1

8) ‘नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

   1) नौ रात्रीचा समूह  2) नव रात्रींचा समूह  3) नऊ रात्रींचा समूह  4) नवरात्रौत्सव

उत्तर :- 3

9) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
    “वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे ................ येतो.”

   1) अर्धविराम    2) अपूर्णविराम    3) स्वल्पविराम    4) पूर्णविराम.

उत्तर :- 4

10) ‘पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) व्यतिरेक    2) अपन्हुती    3) उत्प्रेक्षा    4) यमक

उत्तर :- 2

विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटलाः इस्रोची माहिती

विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली.  साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.

रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता.  सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते. एक वाजून ५३ मिनिटांनी  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या  यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, असे सांगितले आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी के. सीवन यांची पाठ थोपटत त्यांनाही धीर दिला.

निश्चित संकेत प्राप्त होईपर्यंत ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. विक्रम लँडरकडे २.१ कि.मी. पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती 'इस्रो'कडून देण्यात आली.

दरम्यान, पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार किलोमीटर दूर चांद्रभूमीवरील धुरळा उडवत 'विक्रम लँडर' चंद्रावर कसा उतरतो आणि आजवर कोणताही देश न पोचलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भागात भारतीय तिरंगा कधी फडकतो याची उत्सुकता आणि चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता. रात्री १२ वाजल्यापासून चांद्रयान-२ बद्दलची उत्सुकता वाढली होती. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान मोदी इस्रो सेंटरमध्ये दाखल झाले.

'चांद्रयान-२'चा चंद्राच्या दिशेने प्रवास २२ जुलैला सुरू झाला असून, आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले आहेत. या मोहिमेतील अचूकतेद्वारे भारताने अवकाश तंत्रज्ञानातील आपल्या क्षमतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे. सन २०१६ मध्ये रशियाने लँडर देण्यात असमर्थता दर्शवल्यावर तीन वर्षांच्या विक्रमी काळात 'इस्रो'ने स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लँडर आणि रोव्हर विकसित केले. 'चांद्रयान-२'च्या रूपाने इस्रोने भारतीय भूमीवरून आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि कोणताही अनुभव नसताना पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने लँडर आणि रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवण्यासाठी प्रयत्न केले.

चंद्रापासून ३५ किमी अंतरावर असलेले 'विक्रम लँडर' १५ मिनिटांत चंद्रस्पर्श करील. या प्रक्रियेला 'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी '१५ मिनिटांचा थरार' असे संबोधले. 'नवजात बाळ अचानक कुणी तुमच्या हाती सोपवावे, अशीच ही स्थिती आहे. हे बाळ इकडे-तिकडे दुडदुडेल. पण तुम्हाला त्याला सांभाळायचे आहे. 'लँडर' आमच्यासाठीही असेच बाळ आहे,' असे सिवन म्हणाले.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 06 सप्टेंबर 2019


✳ आयएसएसएफ शूटिंग रायफल / पिस्तूल वर्ल्ड कप रिओ येथे होणार आहे

✳ भारताने आयएसएसएफ नेमबाजी रायफल / पिस्टल वर्ल्ड कप मेडल टॅलीसह 09 पदके मिळविली

✳ एंग्लो चायनिज स्कूल, सिंगापूरने ग्लोबल टॉप 50 आयबी स्कूल्सची यादी टॉप 2019

✳ धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ग्लोबल टॉप 50 आयबी स्कूल 2019 यादीमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे

✳ रशियात 10 वा आशियाई पॅसिफिक युथ गेम्स

✳ कादंबरीकार किरण नगरकर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन

✳ झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

✳ आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला

✳ निसान इंडियाने राकेश श्रीवास्तव यांची नवीन एमडी म्हणून नियुक्ती केली आहे

✳ बॉब कार्टरने न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ डी मॅराडोना अर्जेंटिना सुपरलिगा साइड जिमनासिया प्रशिक्षक नियुक्त

✳ बी बाला भास्कर यांनी नॉर्वेमध्ये पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली

✳ सुमित डेबने एनएमडीसीचे संचालक (कर्मचारी) म्हणून पदभार स्वीकारला.

✳ डी एल मार्टिन कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडले गेले

✳ एम एन आर बालन पुडुचेरी असेंब्लीचे उपाध्यक्ष म्हणून निवडले

✳ बी पी दास यांनी ओडिशा मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला

✳ भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यपाल म्हणून शपथ घेतली

✳ ओलेक्सी होनारुक यांची युक्रेनियन पंतप्रधान म्हणून नेमणूक

✳ 2022 फिफा विश्वचषक पात्रता: ओमान बीट इंडिया

✳ कॉंग्रेस नेते सुखदेवसिंग लिब्रा यांचे 87 व्या वर्षी निधन

✳ गुजरात सरकार - अमेरिकेच्या डेलावेर स्टेटने बहिणीच्या राज्यासाठी सामंजस्य करार केला

✳ सहावा भारत-चीन सामरिक आर्थिक संवाद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ सेरेना विल्यम्सने यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ बियान्का अँड्रिसकू दशकात यूएस ओपन उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रथम किशोर बनला

✳ यूपी पोलिसांनी जातीय तणाव कायम ठेवण्यासाठी ‘सी-प्लॅन’ अॅप सुरू केला

✳ कोक इंडियाने कोकिंग कोलसाठी रशियाबरोबर सामंजस्य करार केला.

चालू घडामोडी प्रश्नसंच 6/9/2019

📌कोणत्या शहरात असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) या संस्थेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे?

(A) नवी दिल्ली, भारत
(B) सोल, दक्षिण कोरिया✅✅✅
(C) टोकियो, जापान
(D) बिजींग, चीन

📌मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या वार्षिक क्रमावारीनुसार कोणते शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहे?

(A) बँकॉक✅✅✅
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) जयपूर

📌कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?

(A) ओमान
(B) पाकिस्तान
(C) कतार✅✅✅
(D) सौदी अरब

📌इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट याच्या वार्षिक ग्लोबल लाइव्हअॅबिलिटी इंडेक्स 2019 याच्या यादीमध्ये नवी दिल्लीचा कोणता क्रमांक आहे?

(A) 115
(B) 118✅✅✅
(C) 119
(D) 220

📌इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (लंडन) याच्या वार्षिक ग्लोबल लाइव्हअॅबिलिटी इंडेक्स 2019 यानुसार कोणते शहर जीवन जगण्यास जगातले सर्वाधिक उत्तम शहर आहे?

(A) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया✅✅✅
(B) मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
(C) सिडनी, ऑस्ट्रेलिया
(D) ओसाका, जापान

📌100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.

(A) सन 2020
(B) सन 2021✅✅✅
(C) सन 2022
(D) सन 2023

📌दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी भारतात कोणत्या शहरात एक AWEB केंद्र उभारले जाणार आहे?

(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली✅✅✅

📌कोणाकडे सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) याचे अध्यक्षपद आहे?

(A) रोमानिया
(B) चीन
(C) भारत✅✅✅
(D) जापान

📌बांग्लादेशात 750 मेगावॅट क्षमतेचा गॅस-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या भारतीय ऊर्जा कंपनीने जपानी JERA कंपनीबरोबर भागीदारी केली?

(A) रिलायन्स पॉवर✅✅✅
(B) टाटा पॉवर
(C) NTPC मर्यादित
(D) अदानी पॉवर

📌वर्ष 2019 साठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाचा विषय कोणता आहे?

(A) लाइफस्टाइल अँड पोषण
(B) कॉम्प्लिमेंटरी फीडिंग✅✅✅
(C) पोषण, इज मस्ट
(D) गुड फीड, गुड डेव्हलपमेंट

गरवी गुजरात 🏛 गुजरातच्या दुसर्‍या राज्य भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले 🕍

🏛 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत गुजरात सरकारचे दुसरे राज्य भवन 'गरवी गुजरात' चे उद्घाटन झाले.

🏛 उद्घाटनादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (सध्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल) उपस्थित होते.

🏛 हे गुजरातमधील संस्कृती, हस्तकला आणि पाककृती यांचे प्रतिनिधित्व करेल.

🏛 हे राष्ट्रीय राजधानीतील 'प्रथम पर्यावरणपूरक' राज्य भवन आहे.

🏛 सुमारे 131 कोटी रुपये खर्चून हे बांधण्यात आले आहे

लग्नसमारंभ, हॉटेलिंगसाठी राज्यातील गडकिल्ले भाडेतत्वावर, देणार महाराष्ट्र सरकार


🌸......अत्यंत दुःखद घटना...... 🌸

शिक्षकांचा आदर राखण्यात भारत आठव्या स्थानी

🔰शिक्षक म्हटले की समाजातील प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणारी विशेष व्यक्ती आणि शिक्षकी व्यवसाय म्हणजे सन्मान आणि आदर असलेले क्षेत्र. ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स 2018 च्या अहवालानुसार शिक्षकांना आदर देण्याच्या बाबतीत भारत आठव्या स्थानी आहे.

🔰तर चीन आणि मलेशिया हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असून शिक्षकी पेशाला डॉक्टरांच्या व्यवसायाइतकाच मान दिला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच फिनलंड सारख्या देशांत या क्षेत्राला सामाजिक कार्याप्रमाणेच महत्त्व दिले जाते.

🔰 जगातील 35 देशांतील  सामान्य नागरिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावली आणि त्यावर आधारित अहवालांवरून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

🔴समाजातील इतर व्यवसायांशी तुलना करताना शिक्षकी पेशाकडे कसे पहिले जाते ❓❓❓

🔰 या एका निर्देशकांचा वापर या अहवालासाठी करण्यात आला आहे. सोबतच शिक्षकांचा त्या त्या देशांतील पगार, पालक त्यांना या व्यवसायामध्ये
येण्यासाठी किती प्रोत्साहित करता किंवा नाही या निर्देशकांचाही वापर या अहवालाच्या निष्कर्षांसाठी करण्यात आला आहे.

🔰2018 च्या ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स अहवालानुसार  शिक्षकांविषयीचा समाजातील आदर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यांमध्ये सकारात्मक संबंध आहे. चीन आणि मलेशिया या देशांना अनुक्रमे 100 आणि 93 गुण असून हे देश प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत. तायवान रशिया आणि इंडोनेशिया हे देश पहिल्या पाचमध्ये तर अर्जेंटिना, घाना, इटली, इस्त्राईल आणि ब्राझील हे देश शेवटच्या पाच देशांत आहेत.

चंद्रावर तिरंगा फडकविण्यासाठी ‘विक्रम’ सज्ज

🛰 ‘चांद्रयान- २’पासून वेगळा झालेला ‘विक्रम’ लॅंडर चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.

🛰 शनिवारी पहाटे दीड ते अडीच या वेळेत ‘विक्रम’ लॅंडर ही कामगिरी करणार आहे.

🛰भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (इस्रो) ही ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. भारताचा तिरंगा प्रथमच चंद्रावर फडकणार आहे. ही कामगिरी फत्ते होईल, याबाबत शास्त्रज्ञांनाही विश्‍वास आहे.

🛰‘‘विक्रम लॅंडर चंद्रावर उतरणे (सॉफ्ट लॅंडिंग) ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी असणार आहे, त्यात १०० टक्के यश येईल,’’ असे मत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी व्यक्त केले आहे. ‘चांद्रयान- १’ची मोहीम जी. माधवन नायर यांच्याच नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेली होती.

🛰‘इस्रो’ने २२ जुलै रोजी ‘चांद्रयान- २’चे प्रक्षेपण केले होते.

🛰 सुमारे ९७८ कोटी रुपये खर्च आलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा एक टप्पा २ सप्टेंबर रोजी पार पडला. त्या वेळी चांद्रयानापासून विक्रम लॅंडर वेगळा करण्यात आला.

      🌓 असे होईल चंद्रावतरण 🌔

🛰 लँडर चंद्राभोवतीच्या कक्षेत ३० किलोमीटर उंचीवर असताना एक वाजून ४० मिनिटांनी त्याच्यावरील ८०० न्यूटन शक्तीचे पाचपैकी दोन इंजिन सुरू करण्यात येतील.

🛰६२० सेकंदांच्या या प्रक्रियेतून (रफ ब्रेकिंग फेज) लँडर ५८७ किलोमीटर अंतर कापून चंद्राच्या जमिनीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर येईल.

🛰जमिनीपासून १०० मीटर उंचीवर असताना लँडर २२ सेकंदांसाठी तरंगते ठेवून उतरण्याच्या ठिकाणाची पाहणी करेल.

🛰जमिनीपासून १० मीटर उंचीवर असताना लँडरचा वेग शून्य करण्यात येईल. या स्थितीत एक वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरेल.

🛰लँडर चंद्रावर उतरल्यावर चार तासांनी त्याच्या आतील प्रग्यान रोव्हर बाहेर येऊन चांद्रभूमीवरील प्रवास सुरु करेल.

      🙇‍♀ विद्यार्थी अनुभवणार थरार🙇‍♂

🛰‘चांद्रयान- २’ मोहिमेनिमित्त ‘इस्रो’ने घेतलेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत ६० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

🛰त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘चांद्रयान- २’ची कामगिरी ‘इस्रो’च्या मुख्यालयात बसून पाहता येणार आहे.

🛰प्रश्नमंजूषा स्पर्धेत वीस प्रश्‍न विचारण्यात आले होते व त्यांची उत्तरे १० मिनिटांत द्यायची होती. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...