Wednesday 9 September 2020

‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत आंध्रप्रदेश अग्रस्थानी



केंद्रीय अर्थ व कंपनी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ अंतर्गत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत विविध धोरणे अंमलात आणण्यात राज्यांनी केल्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले आहे आणि त्यानुसार राज्यांना क्रम देण्यात आला आहे.

सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य - आंध्रप्रदेश

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी अव्वल दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश - (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि गुजरात.

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा केंद्रशासित प्रदेश - दिल्ली.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन: 8 सप्टेंबर



संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला जातो. या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते.

“लिटरसी टिचिंग अँड लर्निंग इन द कोविड-19 क्राईसीस अँड बियॉन्ड” या संकल्पनेखाली 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला गेला.

पार्श्वभूमी :

संपूर्ण जगात दरवर्षी 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ पाळला जातो. 1965 साली या तारखेला तेहरानमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या वैश्विक शिखर परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच बैठक आयोजित केली गेली होती. या घटनेच्या स्मृतीत UNESCOने नोव्हेंबर 1966 मध्ये आपल्या 14व्या सत्रात 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून घोषित केले.

या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते. शिवाय शिक्षणाचा प्रचार करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देणार्‍यांना साक्षरता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

✅ भारतातली स्थिती :

‘जनगणना 2011’च्या अहवालानुसार, भारतात निरक्षरता दर 22 टक्के आहे. भारत जगातला सर्वाधिक साक्षर लोकसंख्या असणारा देश आहे.

2011 जनगणनेनुसार, केरळ हे 93.91 टक्क्यांसह सर्वात जास्त साक्षर असलेले राज्य ठरले. त्यापाठोपाठ लक्षद्वीप, मिझोराम, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांचा क्रम लागतो.

बिहार आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अनुक्रमे 63.82 टक्के आणि 66.50 टक्के याप्रमाणे सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आढळले.

समुदायानुसार, जैन समाजात सर्वाधिक म्हणजे 86.73 टक्के लोक साक्षर आहेत, तर 13.57 टक्के अशिक्षित आहेत. सर्वाधिक निरक्षरता मुस्लिम (42.72 टक्के) समाजात आहे, त्यानंतर हिंदूमध्ये 36.40 टक्के, शीख समाजात 32.49 टक्के, बौद्ध समाजात 28.17 टक्के आणि ख्रिस्ती समाजात 25.66 टक्के याप्रमाणे निरक्षरता आहेत.

लिंग-निहाय, 61.6 टक्के पुरुष आणि 38.4 टक्के महिला यांनी पदवी किंवा त्यापुढचे शिक्षण घेतले आहे.

साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी



✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे.

✔️आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण 66.4 टक्के आहे. बिहारपेक्षाही आंध्र प्रदेश साक्षरतेमध्ये मागे आहे. बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण 70.9 टक्के आहे.

🔰आकडेवारी काय सांगते?

✔️ नशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

✔️साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण 84.8 टक्के आहे.

✔️ परुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल 12.3 टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष 90.4 टक्के तर महिला 78.4 टक्के साक्षर महिला आहेत.

✔️ पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो.

✔️ दरम्यान, साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

खादी अगरबत्ती आत्मनिर्भर अभियान



सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने अगरबत्ती तयार करणाऱ्या कारागिरांना विविध स्तरावर पाठबळ देवून या उद्योगाच्या विस्तारासाठी आणि उदबत्ती निर्मिती क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या हेतूने 4 सप्टेंबर 2020 रोजी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. यामुळे अगरबत्ती निर्मिती व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकणार आहे.

अभियानाचे स्वरूप

अगरबत्ती बनविण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा पुरवठा करण्यात येणार. अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल नियमित पुरविणे सुनिश्चित करण्यात येणार.

अगरबत्ती निर्मितीसाठी आधी 200 स्वयंचलित यंत्रांचा पुरवठा करण्यात आला होता. आता, 400 यंत्रे संबंधित संस्थांना देण्यात येणार आहेत. तसेच सायकलप्रमाणे पायाने चालविता येणारी अतिरिक्त 500 यंत्रे स्वमदत समुहांना देण्यात येणार आहेत.

अगरबत्ती निर्मिती क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशभरामध्ये 20 पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी तयार करणे तसेच बनलेल्या मालाचे व्यावसायिक पद्धतीने विपणन करणे, यांचा समावेश आहे.

सरकारने अगरबत्ती कारागीर विकास कार्यक्रमला व्यापक स्वरूप दिले असून यासाठी सरकार आता 55 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

मंत्रालयाच्या पारंपरिक उद्योगांच्या पुनर्रचनेसाठी ‘स्फूर्ती’ या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी 10 केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी 50 कोटी सरकार खर्च करणार आहे. त्याचा लाभ देशातल्या सुमारे 5000 अगरबत्ती कारागिरांना होणार आहे.

या क्षेत्रामध्ये खादी आणि कुटिरोद्योग आयोगाच्यावतीने हाताने अगरबत्ती करणाऱ्या आणि स्वमदत समुहांमधल्या कारागिरांना मदत करण्यात येणार आहे.

होणारी कार्ये

अगरबत्ती कारागिरांना प्रशिक्षण, कच्चा माल, विपणन यासाठी मदत करणे आणि सातत्याने पाठिंबा देणे.

अगरबत्ती उत्पादनाच्या सर्व बाबींवर कार्य करणे. यामध्ये सुगंधासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविताना पर्यायी कच्च्या मालाच्या फेरवापराचा विचार करणे. वाहिलेल्या फुलांचा वापर करणे, काथ्याचा वापर, त्याचबरोबर कृषी मंत्रालयाच्या मदतीने बांबूच्या काड्या उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यात येत आहे.

कन्नौज हे सुगंधाचे केंद्र स्थान आहे, हे लक्षात घेवून अगरबत्ती निर्मितीमध्ये वेगवेगळे गंध विकसित करण्यासाठी कन्नौज येथे एक ‘उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमामुळे जवळपास 1500 कारागिरांना ताबडतोब लाभ मिळणार आहे. त्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे. यासाठी जे स्थलांतरित कामगार आहेत, आणि हाताने अगरबत्ती तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...