Wednesday 9 September 2020

खादी अगरबत्ती आत्मनिर्भर अभियानसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने अगरबत्ती तयार करणाऱ्या कारागिरांना विविध स्तरावर पाठबळ देवून या उद्योगाच्या विस्तारासाठी आणि उदबत्ती निर्मिती क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या हेतूने 4 सप्टेंबर 2020 रोजी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. यामुळे अगरबत्ती निर्मिती व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकणार आहे.

अभियानाचे स्वरूप

अगरबत्ती बनविण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा पुरवठा करण्यात येणार. अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल नियमित पुरविणे सुनिश्चित करण्यात येणार.

अगरबत्ती निर्मितीसाठी आधी 200 स्वयंचलित यंत्रांचा पुरवठा करण्यात आला होता. आता, 400 यंत्रे संबंधित संस्थांना देण्यात येणार आहेत. तसेच सायकलप्रमाणे पायाने चालविता येणारी अतिरिक्त 500 यंत्रे स्वमदत समुहांना देण्यात येणार आहेत.

अगरबत्ती निर्मिती क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशभरामध्ये 20 पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी तयार करणे तसेच बनलेल्या मालाचे व्यावसायिक पद्धतीने विपणन करणे, यांचा समावेश आहे.

सरकारने अगरबत्ती कारागीर विकास कार्यक्रमला व्यापक स्वरूप दिले असून यासाठी सरकार आता 55 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

मंत्रालयाच्या पारंपरिक उद्योगांच्या पुनर्रचनेसाठी ‘स्फूर्ती’ या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये अगरबत्ती निर्मिती उद्योगासाठी 10 केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी 50 कोटी सरकार खर्च करणार आहे. त्याचा लाभ देशातल्या सुमारे 5000 अगरबत्ती कारागिरांना होणार आहे.

या क्षेत्रामध्ये खादी आणि कुटिरोद्योग आयोगाच्यावतीने हाताने अगरबत्ती करणाऱ्या आणि स्वमदत समुहांमधल्या कारागिरांना मदत करण्यात येणार आहे.

होणारी कार्ये

अगरबत्ती कारागिरांना प्रशिक्षण, कच्चा माल, विपणन यासाठी मदत करणे आणि सातत्याने पाठिंबा देणे.

अगरबत्ती उत्पादनाच्या सर्व बाबींवर कार्य करणे. यामध्ये सुगंधासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविताना पर्यायी कच्च्या मालाच्या फेरवापराचा विचार करणे. वाहिलेल्या फुलांचा वापर करणे, काथ्याचा वापर, त्याचबरोबर कृषी मंत्रालयाच्या मदतीने बांबूच्या काड्या उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यात येत आहे.

कन्नौज हे सुगंधाचे केंद्र स्थान आहे, हे लक्षात घेवून अगरबत्ती निर्मितीमध्ये वेगवेगळे गंध विकसित करण्यासाठी कन्नौज येथे एक ‘उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमामुळे जवळपास 1500 कारागिरांना ताबडतोब लाभ मिळणार आहे. त्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे. यासाठी जे स्थलांतरित कामगार आहेत, आणि हाताने अगरबत्ती तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...