Tuesday 5 October 2021

अमेरिकेचे वैज्ञानिक "डेव्हिड ज्युलियस आणि अर्डेम पॅटापॉशियन" यांना २०२१चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे..

✍️ ज्युलियस आणि पॅटापॉशियन यांनी
तापमान, स्पर्श यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात याचा शोध संवेदक संकल्पनेच्या माध्यमातून घेतला आहे..📚

✍️ त्याचा फायदा वेदनांपासून मुक्ती देणारी औषधे तयार करण्यासाठी होणार आहे. आपली चेतासंस्था ही उष्णता, थंडी आणि यांत्रिक बलास कसा प्रतिसाद देते याचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे..📚

✍️ गेल्या वर्षी अमेरिकेचे 'हार्वे अल्टर' आणि 'चाल्र्स राइस' तसेच ब्रिटनचे 'मायकेल हॉटन' यांना हेपॅटाटिस सी विषाणूच्या शोधासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते..📚

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q :टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?

(अ) जे.आर. एल. बेयर्ड ✔️✔️

(ब) एडिसन

(क) जेम्स वॅट

(ड) यापैकी  नाही

Q  : दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते?

(अ) लैक्टोमीटर ✔️✔️

(ब) हायड्रोमीटर

(क) मॅनोमीटर

(ड) यापैकी नाही


Q: खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे?

(अ) लिथियम✔️✔️

(ब) ओस्मियम

(क) अॅल्युमिनियम

(ड) वरील सर्व 

Q : जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा खालीलपैकी कोणत्या रंगात सर्वाधिक अपवर्तन होते?

(अ) निळा✔️✔️

(ब) लाल

(क) हिरवा

(ड) वरील सर्व

Q : खालीलपैकी कोणत्या कारणामुळे रोलिंग बॉल दूर गेल्यानंतर थांबतो?

(अ) घर्षण शक्ती✔️✔️

(ब) गुरुत्व

(क) जडत्व

(ड) यापैकी नाही


Q : शहरांमध्ये तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?

(अ) सल्फर डाय ऑक्साईड

(ब) क्लोरीन✔️✔️

(क) नायट्रोजन

(ड) अमोनिया


Q  : कुपोषण कोणत्या अभावामुळे होते?

(अ) व्हिटॅमिन 'C'

(ब) कार्बोहायड्रेट

(क) प्रथिने✔️✔️

(ड) यापैकी नाही



Q :कोणत्या धातूचा उत्कलनांक बिंदू सर्वात जास्त आहे?

(अ) अॅल्युमिनियम

(ब) टंगस्टन✔️✔️

(क) मोलिब्डेनम

(ड) यापैकी नाही


Q  : ध्वनीचा वेग अधिकतम कोणत्या माध्यमात असतो?

(अ) हवेत

(ब) पाण्यात

(क) स्टील ✔️✔️

(ड) वरील सर्व


Q : हाडे आणि दात यांमध्ये कोणता रासायनिक पदार्थ आहे, त्याला काय म्हणतात?

(अ) कॅल्शियम क्लोराईड

(ब) कॅल्शियम सल्फेट

(क) कॅल्शियम फॉस्फेट✔️✔️

(ड) वरील सर्व


Q  : निक्रोम मेटल घटक इलेक्ट्रिक हीटरमध्ये वापरला जातो, कारण?

(अ) यात उच्च प्रतिरोधकता आहे

(ब) त्याचा वितळण्याचा बिंदू जास्त आहे

(क) अधिक शक्तिशाली प्रवाह त्यात प्रवाहित केला जाऊ शकतो

(ड) वरील सर्व बरोबर ✔️✔️



Q : खालीलपैकी कोणी रक्तगट (Blood group) शोधून काढला?

(अ ) कार्ल लँडस्टीनर✔️✔️

(ब) विल्यम हार्वे

(क) अलेक्झांडर फ्लेमिंग

(ड) वरील सर्व


Q  : शुष्क बर्फ म्हणजे काय आहे?

(अ) कार्बन मोनोऑक्साइड

(ब) कार्बन डाय ऑक्साईड✔️✔️

(क) सल्फर डाय ऑक्साईड

(ड) हायड्रोजन पेरोक्साइड


Q  : प्रकाशाचा वेग __ या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो?

(अ) हिरा

(ब) पाणी

(क) व्हॅक्यूम ✔️✔️

(ड) काच

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...