Tuesday, 12 October 2021
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी लागणाऱ्या कोळसा साठ्याची स्थिती
🔰देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांची गरज भागवू शकेल, एवढा पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय कोळसा मंत्रालयाने दिले आहे.
🔰दशात एकूण 135 औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहेत, जिथे वीज निर्मितीसाठी कोळसा वापरला जातो. 106 (जवळजवळ 80 टक्के) प्रकल्प क्रिटिकल किंवा सुपरक्रिटिकल दर्जाचे आहेत.
🔰वर्तमानात, वीजनिर्मिती प्रकल्पांकडे 72 लक्ष टन इतका कोळसा साठा असून आणखी चार दिवसांसाठी तो पुरेसा आहे आणि कोल इंडिया लिमिटेडकडे आणखी 400 लक्ष टन साठा असुन त्याचा पुरवठा वीजनिर्मिती प्रकल्पांना केला जात आहे.
🔰यावर्षी देशांतर्गत, कोळशापासून वीजनिर्मिती 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. (सप्टेंबरपर्यंत) कोळसा कंपन्यांकडून होणाऱ्या कोळसा पुरवठ्यामुळेच ही वाढ शक्य झाली आहे.
सध्या देशातल्या सर्व औष्णिक वीज प्रकल्पांना दररोज, 18.5 लक्ष टन कोळसा लागतो.
🔰कोल इंडिया लिमिटेड (CIL) कंपनीने वीज कंपन्यांना 255 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला. यंदा CIL कंपनीने सर्वाधिक H-1 पुरवठा केला. CIL कडून वीजनिर्मिती कंपन्यांना दररोज 14 लक्ष टन कोळशाचा पुरवठा केला जातो. पाउस कमी झाल्यानंतर लगेचच हा पुरवठा दररोज 15 लक्ष करण्यात आला असून लवकरच त्यात आणखी भर घातली जाणार आहे.
🔰आतरराष्ट्रीय बाजारात, कोळशाच्या किमती वाढल्याने, आयात होणाऱ्या कोळशात सुमारे 30 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, मात्र देशांतर्गत कोळसा उत्पादन 24 टक्क्यांनी वाढले आहे.
🔰दशात कोळशाची स्थिती समाधानकारक असून कोल इंडिया तर्फे दररोज, 2.5 लक्ष टन कोळसा, बिगर वीजनिर्मितीही कंपन्यांना पाठवला जात आहे.
🔰यदाच्या वर्षात देशांतर्गत कोळसा उत्पादनामुळे कोळशाच्या आयातीला पर्याय उभा केला आहे.
Latest post
तलाठी विशेष
१) सर्वनामाचा प्रकार ओळखा : पुस्तके कोणी नेली ? अ) पुरुषवाचक सर्वनाम ब) दर्शक सर्वनाम क) सामान्य सर्वनाम ड) प्रश्नार्थक सर्वनाम ===========...
-
1) नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे. वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 2) रक्ताच...
-
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44 - पर्वीचे नाव NH 07 - लांबी 3745 km - राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प...
-
घटना दुरुस्ती कायदा 📌जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले....