Friday 8 May 2020

पोलीस भरती प्रश्नसंच


(1)भारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे त्यांच्या लांबीशी काय प्रमाण असते? (महाबीज विभाग Junior Clerk Cum Typist - 2018)
A. 2:3
B. 3:5
C. 2:4
D. 3:4
उत्तर : 2:3

========================
(2)भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ...... होत्या.(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P9 2018)
A. शीला दिक्षित
B. सुचेता कृपलानी
C. नंदिनी सत्परथी
D.उमा भारती
उत्तर : सुचेता कृपलानी

========================
(3)भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?(महाबीज विभाग Peon - Watchman- 2018)
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. जी. बी. पंत
C. जी. एल. नंदा
D. लाल बहादूर शास्त्री
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

========================
(4) लोकसभेचे पिता ..... आहे. (नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P5 - 2018)
A. अनंतसांणम
B. झिकीर हुसैन
C. बासमम
D. मावळणकर
उत्तर : मावळणकर

========================
(5) महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत ? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
A. 42
B. 46
C. 44
D. 48
उत्तर : 48

========================
(6) ........ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P1 2018)
A. इंदिरा गांधी
B. सरोजिनी नायडू
C. प्रतिभा पाटील
D. शीला दीक्षित
उत्तर : प्रतिभा पाटील

========================
(7)महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? (कृषी सेवक AR P2 2018)
A. शंकरराव चव्हाण
B. वसंतराव नाईक
C. यशवंतराव चव्हाण
D. मारुतराव कन्नमवार
उत्तर : यशवंतराव चव्हाण

========================
(8)महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे ? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID P4 -2018)
A. 18
B. 19
C. 20
D. 21
उत्तर : 19

========================
(9)भारताचे सर्वात प्रदीर्घ सेवा करणारे पंतप्रधान कोण आहेत?(नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग TP - P2 - 2018)
A. जवाहरलाल नेहरू
B. मनमोहन सिंग
C. इंदिरा गांधी
D. राजीव गांधी
उत्तर : जवाहरलाल नेहरू

========================
(10) महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे कोण आहेत? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
A. वसंतराव नाईक
B. विलासराव देशमुख
C. यशवंतराव चव्हाण
D. शरद पवार
उत्तर : वसंतराव नाईक
====================

भारतात लैंगिक असमानता

एकविसाव्या शतकातील भारतीयांचा आम्हाला अभिमान आहे की जो मुलगा जन्माला येतो तेव्हा आनंद साजरा करतात आणि जर मुलगी जन्माला येते, तरीही ते शांतताप्रिय असतात जेव्हा कोणतेही लग्न साजरे करण्याचे नियम नसले तरीसुद्धा. मुलावर इतके प्रेम आहे की मुलाच्या जन्माच्या इच्छेनुसार, आम्ही जन्माच्या अगोदर किंवा जन्माच्या आधीपासूनच मुलींना मारत आहोत, सुदैवाने जर त्यांना मारले गेले नाही तर आयुष्यभर त्यांच्याशी भेदभाव करण्याचे बरेच मार्ग आपल्याला सापडतात.

लिंग असमानतेची व्याख्या आणि संकल्पना

'लिंग' ही सामाजिक-सांस्कृतिक संज्ञा आहे आणि समाजातील 'पुरुष' आणि 'स्त्रिया' यांचे कार्य आणि त्यांचे वर्तन सामाजिक परिभाषेशी संबंधित आहे, तर 'लिंग' हा शब्द 'पुरुष' आणि 'स्त्री' परिभाषित करतो. जी एक जैविक आणि शारीरिक घटना आहे. त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये लिंग हा पुरुष आणि स्त्रियांमधील सामर्थ्याशी संबंध आहे जिथे पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. अशाप्रकारे, 'लिंग' मानवनिर्मित तत्त्व म्हणून समजले जाणे आवश्यक आहे, तर 'सेक्स' हे माणसाचे एक नैसर्गिक किंवा जैविक वैशिष्ट्य आहे.

लिंग असमानतेचे वर्णन लिंगाच्या आधारे भेदभाव म्हणून सामान्य शब्दात केले जाऊ शकते. पारंपारिकपणे, महिलांना समाजात दुर्बल जातीचे वर्ग मानले जाते

भारतातील लिंग असमानतेची कारणे आणि प्रकारसंपादित करा

भारतीय समाजातील लैंगिक असमानतेचे मूळ कारण त्याच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सिल्व्हिया वाल्बे यांच्या मते, "पुरुषप्रधानत्व ही सामाजिक रचनाची प्रक्रिया आणि प्रणाली आहे ज्यात माणूस स्त्रीवर वर्चस्व ठेवतो, अत्याचार करतो आणि शोषण करतो." स्त्रियांचे शोषण ही शतकानुशतके भारतीय समाजातील सांस्कृतिक घटना आहे. पितृसत्ताक व्यवस्थेने हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचे असो, आपल्या धार्मिक श्रद्धेतून त्यांना कायदेशीरपणा आणि मान्यता प्राप्त झाली आहे.

उदाहरणार्थ, प्राचीन भारतीय हिंदू कायद्याच्या निर्मात्या मनुच्या म्हणण्यानुसार, "असे मानले जाते की एखाद्या स्त्रीने आपल्या बालपणात आपल्या पतीच्या अंतर्गत, लग्नानंतर पतीच्या खाली, आणि वृद्धत्वानंतर किंवा विधवेनंतर आपल्या मुलाच्या अधीन असावे." त्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र राहण्याची परवानगी नाही. "

मुस्लिमांचीही समान स्थिती आहे आणि तेथेही धार्मिक ग्रंथ आणि इस्लामिक परंपरेद्वारे भेदभाव किंवा अधीनतेला परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे, इतर धार्मिक श्रद्धेमध्ये, स्त्रियांमध्ये समान किंवा भिन्न प्रकारे भेदभाव केला जात आहे अत्यंत गरीबी आणि शिक्षणाचा अभाव ही स्त्रिया समाजात कमी असल्याचे काही कारणे आहेत. दारिद्र्य आणि शिक्षणाच्या अभावामुळे बर्‍याच महिलांना कमी पगारावर घरगुती कामे करणे, संघटित वेश्याव्यवसायात काम करणे किंवा प्रवासी कामगार म्हणून काम करणे भाग पडते.

लहानपणापासूनच मुलीला शिक्षण देणे ही एक वाईट गुंतवणूक मानली जाते कारण एक दिवस तिचे लग्न होईल आणि तिला आपल्या वडिलांचे घर सोडून दुसर्‍या घरात जावे लागेल. म्हणूनच, चांगले शिक्षण नसल्यामुळे सध्या नोकरी कौशल्य मागणीच्या अटी पूर्ण करण्यास असमर्थ आहेत, तर उच्च माध्यमिक आणि इंटरमीडिएटमधील मुलींचे निकाल दरवर्षी मुलांपेक्षा चांगले असतात.त्यामुळे वरील चर्चेच्या आधारे असे म्हणता येईल समाजात, घरात आणि घराच्या बाहेर वेगवेगळ्या स्तरावर असमानता आणि स्त्रियांबरोबर भेदभाव केला जातो.

लैंगिक असमानतेविरूद्ध कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षणास

भारतीय राज्यघटनेने लैंगिक असमानता दूर करण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत; घटनेची प्रस्तावना प्रत्येकासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवण्याच्या उद्दीष्टे तसेच आपल्या सर्व नागरिकांना समानता आणि संधी प्रदान करण्याच्या उद्दीष्टेबद्दल बोलली आहे. या क्रमवारीत महिलांनाही मतदानाचा हक्क आहे.

घटनेच्या कलम १ 15 मध्ये लिंग, धर्म, जाती आणि जन्मस्थळाच्या विभाजनाच्या आधारे सर्व भेदभावांनाही प्रतिबंधित केले आहे. अनुच्छेद १ (()) कोणत्याही राज्यास मुले व महिलांसाठी विशेष तरतूद करण्यास सामर्थ्य देते. याव्यतिरिक्त, राज्य धोरणाचे निर्देशक तत्त्वे देखील महिलांना संरक्षण देण्यास आणि त्यांना भेदभावापासून वाचविण्यात मदत करणार्‍या अनेक तरतुदी प्रदान करतात.

भारतातील महिलांसाठी अनेक घटनात्मक संरक्षणात्मक उपाय केले गेले आहेत, परंतु यामागील वास्तविकता खूप वेगळी आहे. या सर्व तरतुदी असूनही, महिलांना अजूनही देशात दुसर्‍या श्रेणीतील नागरिक मानले जाते, पुरुष लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरुष त्यांना एक माध्यम मानतात, महिलांवरील अत्याचार त्यांच्या धोकादायक स्तरावर आहेत, हुंडा प्रथा आज तसेच प्रचलित आहे की, आमच्या घरात स्त्री भ्रूणहत्या ही एक रूढी आहे.

वेण्णा

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातून वायव्य- आग्नेय दिशेने वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. हिचा उगम महाबळेश्वर पठारावर क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असून तेथून उगम पावणाऱ्या पंचनद्यांपैकी ही एक आहे. सुमारे ६५ किमी. लांबीची ही नदी उत्तरेस हातगेगड-आर्ले (आरळे) डोंगररांग आणि दक्षिणेस सातारा डोंगररांग यांच्यामधून, प्रामुख्याने जावळी व सातारा तालुक्यांतून वाहत जाते व सातारा शहराच्या पूर्वेस सु. ५ किमी. वरील माहुली येथे कृष्णेला मिळते. या संगामामुळे माहुली हे क्षेत्राचे ठिकाण बनले आहे.
वेण्णा नदीच्या उगमप्रदेशातच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून तेथील ‘वेण्णा लेक’ नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे ३९.६५ हेक्टर क्षेत्रात पसरलेला हा तलाव १८४२ च्या सुमारास तयार करण्यात आला. याचे मोठ्या जलाशयात रुपांतर करण्याचे काम पूर्ण होत आले आहे
(२०००). या तलावातून बाहेर पडणारे वेण्णा नदीचे पाणी जवळच असलेल्या लिंगमाळा (लिंगमळा) किंवा वेण्णा या सु. १८० मी उंचीच्या धबधब्यावरुन दरीत कोसळते. पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य मनोहारी असते. लिंगमळा भागात स्ट्रॉबेरी, मलबेरी, बटाटे (लाल रंगाचे) यांसारखी उत्पादने घेतली जातात. हा जास्त पावसाचा, संरक्षित जंगलप्रदेश असून या खोऱ्यात जांभूळ, पिसा, गेळा, हिरडा, शिकेकाई, कारवी इ. वनस्पतिप्रकार आढळतात.
वेण्णा नदीवर सातारा तालुक्यात सातारा शहराचा वायव्येस कण्हेर गावाजवळ १९८८ साली मातीचे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची उंची ५०.३४ मी. असून उजवा कालवा ५८ किमी. तर डावा कालवा २१ किमी. लांबीचा आहे. कालव्यांचे काम १९९० साली पूर्ण झाले. धरणाची पाणी साठवण क्षमता २,८६० लक्ष घ. मी. आहे. एकूण लाभक्षेत्र १२,७४५ हे. असून त्यापैकी लागवडयोग्य क्षेत्र ११,०७८ हे. आहे.
१९९३-९४ मध्ये ओलिताखालील एकूण क्षेत्रापैकी बारमाही ५५४ हे. व हंगामी ६,४०५ हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ होत होता. या धरणाच्या जलाशयात मत्स्यव्यवसायाचा विकास करण्यात आला आहे. १९९० साली कण्हेर येथे ४ मेवॉ. वीज निर्मितिक्षमतेचे जलविद्युत्‌ केंद्र उभारण्यात आले आहे. केळघर, मेढा, कण्हेर ही वेण्णा नदीखोऱ्यातील प्रमुख गावे आहेत.

नीरा नदी

कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगर रांगांत उगम पावते.

पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते.
भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. भोरपासून इंगवली गावापर्यंत नीरा तीव्र वळणे घेऊन मग पुन्हा पूर्ववाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून शिवगंगा नदी मिळते. नंतर नीरा पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे १६० किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयीस इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूरजवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे.

पुणे – बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळच या नदीवर पूल बांधला आहे. नीरा नदी मुख्यतः जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. तिच्या येळवंडी उपनदीवर भाटघर येथे बांधलेल्या लॉइड धरणाचे पाणी नीरेतच सोडले जाते.

वीर गावाजवळ नीरा नदीवर धरण बांधले असून डावा व उजवा असे दोन कालवे काढले आहेत [ वीर धरण]. नाटंबी येथे या नदीवर आणखी एक धरण बांधण्याची योजना आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

🔹जेव्हा ___ यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने, ते धर्मशाळेसाठी काय करु शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विंनती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्या कडून एक पै देखिल भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा.

A)  गजाननमहाराज

B)  गाडगेमहाराज ✅

C) मंचरपुर सावरे गावचे पाटील

D)  देवदत्त घाटे

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर

B) ज्ञानसागर

C)  कालनिर्णय

D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर

B) वासुदेव दास्ताने

C)  अब्दुल सैफ

D) अण्णासाहेब भोकरकर✅

🔹______ शहरातील द अलबर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्यम्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती.

A) मुंबई

B) पुणे

C)  कोल्हापूर ✅

D) सुरत

🔹खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्रीय पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधीत्व नसते.

(b) महाराष्ट्र राज्य पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधान सभेतीलच असतात. या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधीत्व नसते.

A( विधान (a) बरोबर आहे✅

B)  विधान (b) बरोबर आहे

C) दोन्हीही विधाने बरोबर आहेत

D) दोन्हीही विधाने चूकीची आहेत

🔹भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?

A) 1 एप्रिल 2005✅

B) 1 एप्रिल 2003

C)  1 एप्रिल 2001

D) 1 एप्रिल 2002

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर

B) ज्ञानसागर

C) कालनिर्णय

D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर

B) वासुदेव दास्ताने

C)  अब्दुल सैफ

D) अण्णासाहेब भोकरकर✅

◾️मौर्य पूर्व काळात भारत _____ म्हणून ओळखला जाई.

A)  द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅

B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज

C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज

D)  द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी

नौदलाचं ऑपरेशन ‘समुद्र सेतू’, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल

◾️करोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच केले आहे.

◾️ या ऑपरेशनतंर्गत भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.

◾️ मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका दाखल झाली आहे.

◾️आयएनएस जलाश्व 🛳बरोबर आयएनएस मगर 🛳ही युद्धनौका सुद्धा या मिशनमध्ये असणार आहे.

◾️पहिल्या टप्प्याच्या ऑपरेशनमध्ये मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

◾️परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ऑपरेशन समुद्र सेतू सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.

◾️ भारताने आयएनएस शार्दुल 🛳 ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे.

◾️याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

_______________________________________

वायूकांड (विशाखापट्टणम वायुगळती)

भोपाळमध्ये १९८४ ला झालेल्या वायू गळतीच्या आठवणी अजूनही पुसलेल्या नाहीत. तेथील लोकांना काय भोगावे लागले, याच्या करूण कहाण्या अजूनही शहारे आणणा-या आहेत. आता देश एकीकडे कोरोनाच्या संकटाशी लढत असताना विशाखापट्टणम शहराजवळच्या एका रासायनिक प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक जणांना वायूबाधा झाली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईजवळ अशीच छोटीशी वायू दुर्घटना घडली होती. या वायू गळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरात जाणवतो आहे.

नशीब दाट लोकवस्तीच्या भागात ही कंपनी असती, तर वायू गळतीच्या बळींची संख्या वाढली असती. ग्रामीण भाग असल्याने तेथे लोकसंख्येची घनता कमी आहे. त्यामुळे जीवितहानी फार झाली नाही. या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचे आढळून येत आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. लोकांना मेघाद्री गेड्डा आणि इतर काही ठिकाणी नेण्यात येत आहे. वायू गळतीची माहिती मिळताच आर. आर. वेंकटापूरम्, वेंकटापूरम्, पद्मनाभपूरम्, बीसी कॉलनी आणि कंपारापालेमच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

काही जण हा वायू नाकावाटे शरीरात गेल्यामुळे बेशुद्ध झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या वायू गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा रासायनिक प्रकल्प एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. 1961 मध्ये सुरू झालेले येथील प्रकल्प हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचे होते. 1997 मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे याची मालकी आली.

भोपाळचा प्रकल्प अमेरिकेच्या कंपनीचा होता, तर विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे. स्टायरिन या वायूची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टाळेबंदीनंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजता वायू गळती सुरू झाली. अनेकांना याबाबत लगेच लक्षात आले नाही; पण हळूहळू वायू गळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. चाैकशी होईल, कारवाईचे नाटक उभे राहील; परंतु विषारी वायू पोटात गेल्याचे परिणाम कित्येक दशके भोगावे लागतात, त्याची भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या ठिकाणी 2021 साली पुरुषांची जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : बेलग्रेड, सायबेरिया

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आयुर रक्षा क्लिनिक’ कार्यरत केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ निधन झालेले रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : इतिहास कार्य

▪️ प्रथमच कोणता देश आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 4 मे

▪️ कोणत्या मंत्रालयाने “अ रे ऑफ जीनीयस” हा लघुपट प्रदर्शित केला?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या मंत्रालयाने “प्रोफ. बी. बी. लाल - इंडिया रिडिसकव्हर्ड” हे शीर्षक असलेले ई-पुस्तक प्रकाशित केले?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) नावाचे उपकरण विकसित केले?
उत्तर : राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था

▪️ कोणत्या संस्थेनी UV ब्लास्टर नावाचे एक निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण

राज्यसेवा आणि सयुक्त पुर्व परिक्षासाठी जुन पर्यंत अभ्यास नियोजन पुढीलप्रमाणे असावे..

1) सर्वसाधारण  जून पर्यंत म्हणजेच 50 दिवस

2) कोरोना नंतर साधारण ऑगस्ट  किवा त्यानतंर  पुर्व परिक्षा होतील असा अंदाज

3) जून पर्यंत पुढील विषयावर  विशेष  भर असावा
    (मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून)
   -भूगोल    
   -राज्यघटना
   -अर्थव्यवस्था
   -(फक्त सयुक्त परिक्षा लक्ष्य आसलेले
    विद्द्यार्थ्यांनी काही काही प्रमाणात मराठी आणि
    इंग्लिश ही करुन घ्यावे )

4 ) दररोज किमान एक तास 30 मी csat करावे
    ( सयुक्त पुर्व वर भर असणारे विद्द्यार्थ्यांनी
    बुद्धिमत्ता आणि  गणीत अधिक करावे )

5)बाकी इतर सर्व विषय पुर्व परिक्षेच्या उद्देश  समोर ठेउन पुर्व करण्यावर भर  द्यावा

6) सद्या तुमच्या सोबत अभ्यास साहित्य जेवढे आहे ते उत्तम करण्यावर भर द्या( बाकी साहीत्य  नाही ही समश्या मानू नका)

7) सद्या जे अभ्यास साहीत्य नाही ते जुलै  महिन्यात करण्याचे नियोजन करा.

8) परिक्षा आपली कोणतीही समश्या समजुन घेत नाही ( आपण परीक्षेच्या demand पुर्ण करावेच लागेल )

9)  If u want RESULT  dont give
    REASON (मार्ग शोधा दिशा सापडेल )

10) तूम्ही परिक्षा फॉर्म  भरला आहे तर अभ्यास केलाच पाहिजे.

11) तुमच्या आजुबाजुला लहान भाऊ बहिण आहेत त्यांच्या कडून state board book घ्या आणि  तात्पुरता  आभ्यस चालू ठेवा.

12) अभ्यास होत नसेल तेव्हा सराव प्रश्नसंच अधिक वापरा..

13) आरोग्य आणि अभ्यास  दोन्हीची उत्तम काळजी घ्या...उत्तम रहा.. सकारात्मक रहा..

                                    )

Motivation


आईवडीलांच्या संघर्षातुन निर्माण झालेले मोटीव्हेशन हे जगातील कोणत्याही मोटीव्हेशनल बायोपीक पेक्षा जास्त टचिंग असतात.



Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...