२६ डिसेंबर २०२३

महाराष्ट्रातील पंचायत राज....!!



आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


🌸1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌸2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌸3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌸4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🌸5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌸6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🌸7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌸8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🌸9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌸10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962


🌸11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🌸12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌸13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🌸14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी


🌸15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌸16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌸17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌸18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌸19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌸20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌸21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🌸22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌸23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती


🌸24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌸26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌸28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌸29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌸30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌸31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌸32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌸33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🌸34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌸35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते


🌸36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🌸37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌸38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌸39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌸40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक

ग्रामसेवक / सचिव.


🧩निवड :

🅾जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

🧩नेमणूक :

🅾 मुख्य कार्यकारी अधिकारी

🧩नजीकचे नियंत्रण :

🅾गट विकास अधिकारी

🧩कर्मचारी :

🅾ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

🧩कामे :

1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.

🧩ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन

🧩ग्रामसभा :

🅾 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

🧩बैठक :

🅾आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

🧩सभासद :

🅾गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

🧩अध्यक्ष :

🅾सरपंच नसेल तर उपसरपंच

🧩ग्रामसेवकाची गणपूर्ती :

🅾एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.



1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


चालू घडामोडी :- 25 डिसेंबर 2023

◆ भारताचे माजी केंद्रीय कृषि मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकार 125 रुपयांचे नाणे काढणार आहे.

◆ इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही पहिली महिला ठरली आहे.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात 140 खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली असून गुजरात राज्यात सर्वाधिक 28 खाजगी विद्यापीठ आहेत.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 15 खाजगी विद्यापीठे आहेत.

◆ महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

◆ चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स स्पर्धा 2023 चे विजेतेपद डी. गुकेश याने पटकावले आहे.

◆ ओपेक या संघटनेतून अंगोला देश बाहेर पडला आहे.

◆ 2024 मध्ये तामिळनाडू मध्ये होणारी खलो इंडिया युथ स्पर्धा सहाव्या क्रमांकाची असणार आहे.

◆ कवयित्री सुकृता पॉल कुमार यांना 'मीठ आणि मिरपूड' साठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार जाहीर.

◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने जूट शेतकऱ्यांसाठी 'पाट-मित्रो ॲपचे अनावरण केले.

◆ प्रोफेसर मविता लाडगे यांना रसायनशास्त्र शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी नायहोम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ पूनम खेत्रपाल सिंग यांना 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल ने सन्मानित.

◆ 2022 आणि 2023 चे SASTRA - रामानुजन पुरस्कार बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्न असलेल्या युनकिंग तांग आणि रुईीझयांग झांग या गणितज्ञांना प्रदान करण्यात आले.

◆ नौदलाच्या 'इंफाळ' या स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिकेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेव्हल डॉकयार्ड येथे  मंगळवारी मुंबईमध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे.

◆ इंफाळ ही स्वदेशी बनावटीची सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक असून विशाखापट्टणम श्रेणीच्या विनाशिकेतील तिसरी आहे.

◆ इंफाळची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉक लिमिटेड येथे झाली आहे.

◆ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या दालनातील पाटीवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिले आहे.

◆ मुलाला आपल्या आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे, त्याबाबत त्या मुलाचे वडील सक्ती करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

◆ 25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या देदीप्यमान नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस 'सुशासन दिन' म्हणून पाळण्याचे ठरविण्यात आले.

◆ 2014 साली भारतीय जनता पक्षाद्वारे दरवर्षी भारतात 25 डिसेंबरला सुशासन दिवसाच्या रूपात साजरा करण्याची घोषणा केली गेली होती.

◆ 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...