Tuesday 19 November 2019

इतिहास महत्त्वाचे प्रश्नसंच 20/11/2019

1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

 तात्या टोपे

 राणी लक्ष्मीबाई

 शिवाजी महाराज

 नानासाहेब पेशवे

उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

 महादेव गोविंद रानडे

 लिओ टॉलस्टॉय

 दादाभाई नौरोजी

 गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

 सरोजिनी नायडू

 प्रितीलता वडडेदार

 इंदिरा गांधी

 राणी लक्ष्मीबाई

उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

 पंडित नेहरू

 विनोबा भावे

 साने गुरुजी

 सरदार पटेल

उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

 डॉ. आंबेडकर

 लॉर्ड आयर्विन

 बॅ. जिना

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर

6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

 स्वा.सावरकर

 बटूकेश्वर दत्त

 रासबिहारी घोष

 भुपेंद्रनाथ दत्त

उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

 सुभाषचंद्र बोस

 रासबिहारी बोस

 कॅ. भोसले

 कर्नल धिल्लन

उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

 1 एप्रिल 1878

 मार्च 1905

 मार्च 1978

 एप्रिल 1994

उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मॅकॉले

 लॉर्ड मेयो

 लॉर्ड विलीग्टन

उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

 मुंबई ते ठाणे

 मुंबई ते दिल्ली

 कल्याण ते ठाणे

 मुंबई ते पुणे

उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

 मंगल पांडे

 तात्या टोपे

 कूंवरसिंह राणा

 कर्नल आयरे कूट

उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

 पटियाळा

 दिल्ली

 अमृतसर

 अलाहाबाद

उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

 सर सय्यद अहमद खान

 मौलाना अली महंमद

 आगाखान

 महात्मा गांधी

उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

 नेताजी सुभाषचंद्र बोस

 जवाहरलाल नेहरू

 मोतीलाल नेहरू

 मौलाना आझाद

उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

 नबाब सलीमुल्ला

 आगाखान

 बॅ. महंमद जीना

 मौलाना आझाद

उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

 सेनापती बापट

 बी.सी.दत्त

 मोहन रानडे

 पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 नानासाहेब पेशवे

 तात्या टोपे

उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 बंकिमचंद्र चटर्जी

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 महात्मा गांधी

उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल

सारांश, 19 नोव्हेंबर 2019


                  🔘दिनविशेष🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌भारतातला निसर्गोपचार दिन - 18 नोव्हेंबर.

                      🔘संरक्षण🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌17 नोव्हेंबर रोजी दोहा येथे या दोन देशांच्या नौदलांच्या दरम्यानचा ‘झ’ईर-अल-बहर (समुद्राची गर्जना)’ नावाचा सागरी सराव सुरू झाला - भारत आणि कतार.

📌20 नोव्हेंबर 2019 रोजी भारताचे राष्ट्रपती या संस्थेला ‘राष्ट्रपती रंग’ प्रदान करणार आहेत - इंडियन नेव्हल अॅकॅडमी.

📌समुद्रसपाटीपासून 1900 फूटपेक्षा अधिक उंचीवरच्या प्रदेशात रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने दौलत बेग ओल्डी (DBO) येथे सीमा रस्ते संस्था (BRO) प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे - मायक्रोपाईल किंवा सिमेंटेशियस सब बेस (CTSB) तंत्रज्ञान.

                  🔘अर्थव्यवस्था🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याने अनैतिक व्यवसाय पद्धती वापरल्या जाणार्‍या उत्पादनांसाठी या प्रकाराचे मूल्य लावण्याची शिफारस सरकारला केली आहे - "मिनिमम ऑपरेटिव्ह प्राइस".

                🔘आंतरराष्ट्रीय🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌सहाव्या एशियन डिफेन्स मिनिस्टर्स मिटींग-प्लस (ADMM प्लस) बैठकीचे ठिकाण - बँकॉक, थायलँड.

📌किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची बैठक 18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत या शहरात आयोजित केली जात आहे - नवी दिल्ली.

📌2019 या वर्षासाठी किंबर्ली प्रोसेसचा अध्यक्ष - भारत (“KP चेअर” - बी. बी. स्वाइन; “KP फोकल पॉईंट” - रूपा दत्ता).

📌या देशाने 002 या नावाने ओळखले जाणारे प्रथम स्वदेशी निर्मित विमानवाहू जहाज तैवान सामुद्रधुनीत तैनात केले - चीन.

                        🔘राष्ट्रीय🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌या वैचारिक संस्थेनी ‘हेल्थ सिस्टीम्स फॉर ए न्यू इंडिया: बिल्डिंग ब्लॉक्स –पोटेंशल पाथवेज टू रीफॉर्म्स’ या शीर्षकाचा अहवाल जाहीर केला – NITI आयोग.

📌या प्रदेशासाठीची पहिली विंटर-ग्रेड डिझेल आउटलेट सुविधा सुरू करण्यात आली - लडाख.

                    🔘व्यक्ती विशेष🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌श्रीलंका या देशाचे नवे राष्ट्रपती - गोताबया राजपक्षे.

📌18 नोव्हेंबर रोजी लोकसभेत शपथ घेणार्‍या चार खासदारांची नावे - प्रिन्स राज (बिहार), हिमाद्री सिंग (मध्यप्रदेश), श्रीनिवास दादासाहेब पाटील (महाराष्ट्र) आणि डी.एम. काथिर आनंद (तामिळनाडू).

                       🔘क्रिडा🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌17 नोव्हेंबरला झेक प्रजासत्ताकच्या या टेनिसपटूने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली - टॉमस बर्डीच.

📌‘AIBA अॅथलीट्स कमिशन’ याचा सदस्य म्हणून निवडला गेलेला भारतीय मुष्टियोद्धा - लैशराम सरिता देवी.

📌11 जानेवारी ते 28 जून या कालावधीत खेळवल्या जाणार्‍या 2020 हॉकी प्रो लीग भारतातले सामने या शहरात होणार – भुवनेश्वर, ओडिशा.

📌मॅड्रिड (स्पेन) येथल्या या टीव्ही वाहिनीच्या हिंदी मंचाचे 13 नोव्हेंबरला उद्घाटन झाले - ऑलम्पिक चॅनल.

                 🔘ज्ञान - विज्ञान🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌हिमाच्छादित प्रदेशांकरिता उणे 33 अंश सेल्सियसवर ओतल्या जाऊ शकणारे विशेष विंटर-ग्रेड डिझेल इंधन तयार करणारी कंपनी - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन.

📌‘किरीन A1’ हे शरीरावर परिधान केली जाऊ शकणारी जगातली पहिली समर्पित चिपसेट - हुवेई (चीन).

                 🔘सामान्य ज्ञान🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌इंडियन नेव्हल अॅकॅडमी - कायमस्वरूपी ठिकाण: एझिमाला, केरळ; उद्घाटन: 8 जानेवारी 2009.

📌जागतिक प्रत्यारोपण खेळ महासंघ (WTGF) - स्थापना: सन 1978; मुख्यालय: विंचेस्टर, ब्रिटन; संस्थापक: डॉ. मॉरिस स्लॅपॅक.

📌आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) - स्थापना: सन 1924 (07 जानेवारी); मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड; विद्यमान अध्यक्ष: नरिंदर बत्रा.

📌किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची स्थापना – सन 2003.

📌किंबर्ली प्रोसेस (KP) जागतिक पुरवठा साखळीमधून ही वस्तू वगळण्यासाठी वचनबद्ध आहे – विवादात असलेले हिरे.

📌सीमा रस्ते संस्था (BRO) - स्थापना: सन 1960 (7 मे); संस्थापक: जवाहरलाल नेहरू.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) समानार्थी वाक्प्रचार द्या. -  ‘ब्रभा करणे’

   1) काखा वर करणे    2) खो घालणे   
   3)  टाके ढिले करणे    4) डांगोरे पिटणे

उत्तर :- 4

2) शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. – ‘फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे’

   1) शिपाईगडी    2) बाजारबुणगे   
   3) सेवेकरी    4) भोई

उत्तर :- 2

3) प्रचलित शुध्दलेखनानुसार चुकीचा शब्द कोणता ?

   1) लघुकथा    2) गतिमान   
   3) वधुपरीक्षा    4) महीपाल

उत्तर :- 3

4) एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला ...................... म्हणतात.

   1) अनुनासिक    2) व्दित्त     
   3) घर्षक    4) अल्पप्रमाण

उत्तर :- 2

5) ‘कवीश्वर’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

   1) विसर्गसंधी    2) स्वरसंधी   
  3) व्यंजनसंधी    4) पररूप संधी

उत्तर :- 2

6) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?

      ‘विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला’
   1) उत्तीर्ण    2) परीक्षेत    3) झाला      4) विश्वाय

उत्तर :- 4

7) पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.

      ती मुलगी चांगली गाते.
   1) मुलगी    2) ती      3) गाते      4) चांगली

उत्तर :- 2

8) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. – अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.

   1) साधित विशेषण    2) परिणाम दर्शक विशेषण
   3) नामसाधित विशेषण    4) अविकारी विशेषण

उत्तर :- 3

9) ‘मला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

   1) शक्य क्रियापद  2) प्रयोजक क्रियापद  3) अनियमित क्रियापद  4) साधित क्रियापद

उत्तर :- 1

10) जोडया जुळवा.

   अ) नामसाधित क्रियाविशेषणे    i) निजल्यावर, खेळताना
   ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे     ii) दररोज, शास्त्रदृष्टया
   क) धातुसाधित क्रियाविशेषणे    iii) सकाळी, प्रथमत:
   ड) समासघटित क्रियाविशेषणे    iv) मोटयाने, सर्वत्

  अ  ब  क  ड

         1)  iii  iv  i  ii
         2)  iii  i  iv  ii
         3)  iv  ii  iii  i
         4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 1

भुतान, जगातले प्रथम क्रमांकाचे आनंदी राष्ट्र कसे बनले ?

🔰"भुतान" हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांत सुंदर देश आहे. शून्य प्रदुषण.  देशभर कमालीची स्वच्छता, शांताता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.

🔰मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांची सुची तयार केली जाते. जगातील सुमारे 222 देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान प्रथम क्रमांकावर आहे.

🔰खरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही इथला माणूस आनंदी आहे. प्रसन्न आहे. सुखी आहे.

🔰का आहे? कसं जमलं त्यांना हे?
भुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.
भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.

🔰हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.

🔰थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.

🔰शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.

🔰तुम्ही जगात कुठेही गेलात तरी प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध रहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.

🔰भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील इतरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा नो चोर्‍या असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.

🔰हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारसे नाहीत.
चोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.

🔰भारतीय माणसांना त्यांच्या नोटा घ्यायची गरज नाही.  आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही.

🔰भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे.

🔰इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा नाही.

🔰यातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.

🔰माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?

🔰हे दोन प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.

🔰भारतानं भुतानकडून हे शिकायल हवं...

18 नोव्हेंबर झटपट दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

केंद्र सरकारने मेघालयमधील फुटीरतावादी एचएनएलसी आणि त्याच्याशी संबंधित सर्व गटांना केले बेकायदेशीर घोषित

▪ जेएनयू विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृहाच्या शुल्कामध्ये वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड

▪ पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल पक्षांचं कौतुक; भाजपने आदर्श घेण्याचा सल्ला

▪ व्हॅटिकनपोप फ्रान्सिस धार्मिक तसेच कौटुंबिक दौऱ्यावर जाणार; युद्धातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे करणार सांत्वन

▪ कभी कभी लगता है की अपुन ही भगवान है; संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संजय राऊतांचा भाजपला टोला.

▪ किशोरी पेडणेकर यांचा मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

▪ दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; येत्या वर्षात 3 मार्चपासून दहावी तर 18 फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा होणार सुरु

▪ फेसबुक आणि ट्विटरला टक्कर देण्यासाठी विकिपीडियाचे 'डब्लूटी: सोशल' अ‍ॅप येणार; वेबसाईटही सुरु

▪ धोनीमुळं 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये माझं शतक हुकलं: गौतम गंभीरचा खळबळजनक खुलासा

▪ अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना खानचा 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' हा लघुचित्रपट प्रदर्शित

चालू घडामोडी प्रश्नसंच 19 /11/2019

📍 कोणता देश सहावी ‘ASEAN डिफेंस मिनिस्टर्स मिटिंग-प्लस’ या बैठकीचे आयोजन करणार आहे?

(A) थायलँड✅✅
(B) इंडोनेशिया
(C) मलेशिया
(D) भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा-ऑन-अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे?

(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) संयुक्त अरब अमिराती✅✅
(D) कुवैत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या न्यायमूर्तींनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली?

(A) न्या. अपरेश कुमार सिंग
(B) न्या. एस. चंद्रशेखर
(C) न्या. सुजित नारायण प्रसाद
(D) न्या. डॉ. रवी रंजन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले?

(A) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड✅✅
(B) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10 सराव प्रश्न उत्तरे सोडवून पहा 19/11/2019

1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

 51

 52

 50

 48

उत्तर :51

 2. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

 10

 15

 25

 30

उत्तर :15

 3. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

 PICEP

 CEPRJ

 PIRCE

 PRICE

उत्तर :PRICE

 4. विसंगत शब्द शोधा.

 जव (सातू)

 कापूस

 तांदूळ

 गहू

उत्तर :कापूस

 5. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

 2 तास

 अडीच तास

 1 तास

 दिड तास

उत्तर :दिड तास

 6. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

 31520201514

 31515202014

 32520152014

 31420151520

उत्तर :31520201514

 7. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

 तीन वेळा

 दोन वेळा

 चार वेळा

 पाच वेळा

उत्तर : दोन वेळा

 8. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

 1

 25

 5

 15

उत्तर :5

 9. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

 12

 15

 18

 20

उत्तर :12

 10. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

 9 वाजून 25 मिनिटे

 10 वाजून 35 मिनिटे

 11 वाजून 20 मिनिटे

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

झाशीची राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीची राणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या धाडसी स्त्रीची आज १९१ वी जयंती. कशाचीही भिडभाड न ठेवता इंग्रजांशी लढण्यासाठी सज्ज झालेल्या या राणीबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. झाशीच्या राणीच्या १९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करुया…

१. राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मदिनाबाबतचा वाद मागच्या अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी येथे झाला असे म्हटले जाते.

२. आपल्याला त्यांचे नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई असल्याचे माहित आहे. मात्र त्यांचे खरे नाव मनिकर्णिका तांबे असे होते. अनेक जण त्यांना मनू या नावाने हाक मारत.

३. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

४. झाशीचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वयाच्या ७ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

५. त्या जन्मत: अतिशय धाडसी होत्या. त्यांनी घरी राहून शिक्षण घेतले. त्यांच्या अभ्यासात घोडेस्वारी, बंदूक चालविणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.

६. अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या.

७. त्यांनी लढलेल्या युद्धात ह्युज रोज हा वरिष्ठ ब्रिटीश आर्मी ऑफीसर होता. त्याने राणीचे वर्णन चाणाक्ष, सुंदर आणि देखण्या असे केले होते.

८. लक्ष्मीबाई यांचा राजवाडा राणीचा महाल म्हणूनही ओळखला जातो. आता त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे.

९. त्यांचे पहिले मूल ४ महिन्याचे असताना गेले. मग त्यांनी मुलाला दत्तक घेतले.

१०. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

११. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

१२. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण भारतामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता.

१३. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले.

१४. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

१५. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड

🔰विश्वस्त म्हणून निवड झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.

🔰या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

🔰यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

🔰नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

🔰रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने भारतात कला, संगीत आणि संस्कृती विषयक अनेक उत्सव आणि महोत्सवांचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जातं आहे.

🔰या उपक्रमांमुळे अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं तर भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख जगभर पोहचण्यास मदत झाली असंही नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...