Monday 25 May 2020

देशांतर्गत विमान सेवा

🔰टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद  असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज  50 विमानांची ये-जा होणार आहे.
मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी  घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

🔰केंद्र सरकारने 25 मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे.तर महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत  असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.

🔰देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने रविवारी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी अलगीकरणासंदर्भात राज्यांना स्वतंत्र नियमावली आखण्याची परवानगी देण्यात आली आहे.तसेच विविध राज्य सरकारांनीही त्यानुसार नियमावली जाहीर केली आहे. मात्र, या नियमावलींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार.

🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ॲमेझॉनने देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे.

🔰लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

🔰मागणी आणि पुरवठा साखळीमधील वेगवेगळ्या स्तरामधील नोकऱ्या उपलब्ध असल्याचे ॲमेझॉनने स्पष्ट केलं आहे. या ५० हजार नोकऱ्यांमध्ये अगदी फुलफीलमेंट सेंटर्स म्हणजेच वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांमधील नोकऱ्यांपासून ते डिलेव्हरी करण्यापर्यंत अनेक नोकऱ्यांचा समावेश आहे.

🔰लॉकडाउनच्या कालावधीमध्ये म्हणजेच २५ मार्चपासून १७ मेपर्यंत देशामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तुंची डिलेव्हरी करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि किरणामालाच्या वस्तू वगळता इतर वस्तूंच्या डिलेव्हरीवर घालण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठवली आहे. देशभरामध्ये अत्यावश्यक वस्तूंबरोबरच इतर वस्तूंची डिलेव्हरी करण्याची परवानगीही ई-कॉमर्स कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर ई-कॉमर्स साईटवरुन वस्तूंच्या ऑर्डरची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा 1 जून नंतरच.


🔰लॉकडाऊन दरम्यान कर्मचारी भरती आयोगाने म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती परीक्षांबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे.

🔰देशातील कोविड – 19 विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की 1 जून 2020 रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.

🔰तर अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.तसेच आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले  आहे.

प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण.

🅾 प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण योजनाच्या अंतर्गत महिला शक्ती केंद्रे स्थापन करण्याची उपाययोजना सन २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ तसेच आरोग्य व स्वछताविषयक मदत व मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये हक्क आणि अधिकार याबाबत जागृती निर्माण करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

🧩योजनेच्या ठळक तरतुदी व वैशिष्ट्ये

🅾योजनेअंतर्गत राज्यस्तरावर महिलांसाठी राज्य संशोधन केंद्र संबंधित राज्य सरकारच्या अधिपत्याखाली विविध योजनांचा अभ्यास करून तांत्रिक साहाय्य व सल्ला उपलब्द करून देईल.

🅾जिल्हास्तरीय महिला केंद्रे ही महिलाविषयक विविध योजनांची माहिती गोळा करून राज्य स्तरावर आणि जनतेस उपलब्द करून देतील. ही केंद्रे तालुका ग्राम पातळी आणि राज्य पातळी यामध्ये दुव्याचे कार्य करतील.

🅾महिला शक्ती केंद्रे ही तालुका पातळीवर कार्य करतील व गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देतील. गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, ANM, सामान्य सेवा केंद्रे,

🅾महिला स्वयंसहायता समूह, बँक मित्र, शिक्षा मित्र, न्याय मित्र, महिला ओकप्रतिनिधी, महिला पोलीस स्वयंसेविका या गाव पातळीवर विविध शासकीय/अशासकीय कार्यामध्ये कार्यरत व्यक्तींची मदत घेण्यात येईल.

🅾महाविद्यायातील NSS/NCC कॅडेट्स तसेच इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सहा महिन्याची समूह सेवा देता येईल. हा कालावधी २०० तास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना समूह सेवा प्रमाणपत्र देण्यात येईल.

🅾अशा प्रकारे जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना समूह सेवेमध्ये उपयोजित करून त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकांचे गुण निर्माण करण्यासही यातून हातभार लागणार आहे.

🅾 ग्रामीण महिलांना ग्रामसभा तसेच पंचायत राज संस्थांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती तसेच संसाधने उपलब्द करून देण्यात येतील.

🅾 विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेणे, त्यामध्ये सहभागी होणे, यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात येईल.

🅾 विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे बनवून घेण्यासाठी ग्रामीण महिलांना साहाय्य करण्यात येईल.

🅾 बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मदत करण्यात येईल. महिलांच्या तक्रारी, तक्रार नोंदविणे तसेच त्याबाबतचा पाठपुरवठा यामध्ये साहाय्य करणे.

🅾महिलांना एकत्र येण्यास, सामूहिक कार्ये करण्यास, समूह बनवण्यास प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी व विकास घडविणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

🅾 योजनेच्या अंमलबजावणीची प्रगती दर्शविण्यासाठी तसेच शंकाचे व समस्यांचे निराकरण करणे, आणि तक्रारी नोंदविणे यासाठी संकेतस्थळ उपलब्द करून देण्यात येणार आहे.

🅾 ही योजना नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्वात मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यामध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नंदुरबार, जळगाव, गडचिरोली व नांदेड या चार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

🅾प्रत्येक जिल्ह्यातील कमाल, ८ तालुके, याप्रमाणे ९२० तालुक्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणीमध्ये प्राप्त झालेल्या अनुभवावरून देशातील उर्वरित जिल्ह्यामध्ये विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येईल.

 🅾यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० या प्रमाणात निधी उपलब्द करून देण्यात येईल. ईशान्येकडील राज्ये व विशेष दर्जा प्राप्त राज्यामध्ये निधीचा हिस्सा ९०:१० याप्रमाणे असेल. 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य.


🅾समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा यासाठी माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेत आता आमूलाग्र बदल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

🅾भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

🅾 राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला पती-पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसू्चित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही प्रोत्साहन योजनेत आण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रोख १५ हजार रुपये दिले जात होते. २०१० मध्ये त्यात वाढ करून ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. आता या योजनेत आणखी बदल करण्यात येणार आहे.

🧩 काय होणार?

🅾 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण आणि उदरनिर्वाहाची हमी म्हणून त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार आहे.

🅾 सुकन्या योजनेच्या धर्तीवर आंतरजातीय दाम्पत्याला जन्मलेल्या मुला-मुलींच्या नावार बँकेत एक लाख रुपये जमा केले जातील. त्यांना शिक्षणात आर्थिक सवलती देण्याचा विचार आहे.

🅾 पती सवर्ण व पत्नी मागासवर्गीय असेल तर त्यांच्या मुलांना सवलती मिळत नाहीत. अशा दाम्पत्यांच्या अपत्यांनाही त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

🅾 त्याचबरोबर आता प्रोत्साहन म्हणून मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या रकेमत आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व नव्या सवलतींचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

महाराष्ट्र पोलिस भरती

● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : गोविंदा राजुलू चिंतला

● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?

*उत्तर* : 21 मे

● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?

*उत्तर* : महाराष्ट्र

● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?

*उत्तर* : हरियाणा

● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?

*उत्तर* : राजेश गोयल

● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?

*उत्तर* : उत्तरप्रदेश

● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?

*उत्तर* : 21 मे

● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?

*उत्तर* : राजीव गांधी विद्यापीठ

1)खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

1) सिझिअम 13  -  कर्करोगावर उपचारासाठी
2) सेलेनिअम 75 -  रक्तप्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी✅✅
3) स्ट्रॉन्शिअम 85-  हाडांची निर्मिती व चयापचाय अभ्यास
4) कोबाल्ट 57 -  ॲनिमियाचे निदान

2)खालील विधानांचा विचार करा.

   अ) प्रथिने तसेच विकरांचे स्त्रावांच्या स्वरूपात उत्सर्जन करून वहनाचे काम करतात.
   ब) पीटिका व रिक्तीकांच्या निर्मिती सहभागी असतात.
   क) पेशी भित्तीका, लयकारिका आणि प्रद्रव्यपटल यांच्या निर्मितीत सहभाग घेतात.
1) केंद्रक   
2) तंतुकणिक  
3) गॉल्गी संकुल  ✅✅
4) यापैकी नाही

3} अ) गाजराला गुलाबी रंग बीटा कॅरोटीनमुळे येतो.
    ब) लसणाला वास इ-बीटा कॅरोटीनमुळे येतो.

1) अ विधान सत्य    ✅✅
2) अ, ब सत्य
3) ब सत्य     
4) अ, ब असत्य

4) योग्य पर्याय निवडा.

   अ) टमाटर    -  लाइकोपेन
   ब) गाजर    -   कैरोटीन
   क) चुकन्दर    -  बिटानीन
   1) अ, ब सत्य   
   2) अ, ब, क सत्य    ✅✅
   3) ब, क सत्य   
   4) फक्त अ

5) अ) ते रंगहीन असते.
    ब) ते कोल्टरपासून बनते.
    क) ज्याला पालक संयुग म्हणतात.
   वरील विधान कोणत्या घटकाशी संबंधीत आहेत.

1) मिथेन  
2) इथेन     
3) बेन्झीन    ✅✅
4) फेनॉल

6) अ) प्राचीन वस्तूंच्या वयोमापनासाठी कार्बन डेटींग पध्दत वापरतात.

    ब) कार्बन डेटींग पध्दत विलार्ड लिबी याने शोधून काढली.

    क) कार्बन डेटींग पध्दतीत 14c हे कार्बनचे समस्थानिक वापरले जाते.

    ड) या शोधाबाबत विलार्ड लिबी याला नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
   वरील विधानांबाबत अचूक पर्याय निवडा.

1) अ सत्य, ब, क, ड असत्य    2) अ, क सत्य, ब, ड असत्य
3) अ, ब, क, ड असत्य     
4) अ, ब, क, ड सत्य✅✅

7) अयोग्य जोडी निवडा.
अ) बी – 1  - थायमीन  
ब) बी – 2  - रायबोफ्लेवीन
क) बी – 3  - निकोटीनामाइड    ड) बी – 5  - पेन्टॅथॉइक
इ) बी – 6  - पायरीडॉक्सीन    ई) बी – 7  - बायोटीन
उ) बी – 9  - फॉलीक आम्ल    ऊ) बी – 12  - कोबालमीन

1) वरीलपैकी नाही  ✅✅
2) ब, ड, ई, उ  
3) ब, क, ड, इ, ई   
4) क, ड, इ, ई, उ

8) एखाद्याच वस्तुमान असणा-या पदार्थाला जमिनीपासून 2 इंचीवर नेल्यास त्या पदार्थातील स्थितीज ऊर्जा किती असेल ?

   1) ½ mgh   
   2) mgh      
   3) m × gh/2   
   4) 2 mgh✅✅

9) मोसंबीला सुगंध .......................... मुळे प्राप्त होतो.

1) प्रोपीन   
2) आयसोप्रोपीन   
3) लायमोनीन    ✅✅
4) इथीन

10) खालीलपैकी कोणते शैवाल आयोडीन बनवण्यासाठी उपयुक्त आहे.

अ) लेमिनेरिया    ब) फ्युकस    क) एकलोनिया    ड) सर्व
1) अ, क   
2) ब, क     
3) अ, ब    
4) ड✅✅

11) खालील विधानांचा विचार करा.

अ) यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे. जी पचनामध्ये महत्त्वाचे कार्य करते.

ब) यकृत मुख्यत: पित्तरस स्त्रावते जे पित्ताशयात साठवले जाते.

क) मोठया आतडयात पचन होण्यासाठी अल्कली माध्यम लागते जे पित्तरसाव्दारे पुरविले जाते.

ड) पित्तरस व स्वादुरस हे सामूहिक नलिकेव्दारे मोठया आतडयात सोडले जाते.
1) अ, ब बरोबर   ✅✅
2) अ, ब, क बरोबर 
3) सर्व बरोबर   
4) अ, ब, ड बरोबर

12) खालीलपैकी कोणता हार्मोन RNA व प्रोटीन बनविण्यासाठी मदत करतो.

अ) एथिलीन   
ब) सायटोसायनीन 
क) फ्लोरिजेन्स
   1) अ     
   2) ब     ✅✅
   3) अ, ब     
   4) अ, क

13) गर्भनिरोधक गोळयांमध्ये कशाचा वापर करतात ?

1) अल्केन   
2) अल्कीन   
3) अल्काईन    ✅✅
4) विवृत्त गट

14) इथीनच्या रेणुसूत्रामध्ये दोन कार्बन बंधांमधील अंतर ...................... एवढे असते.

  1) 121 पिकोमीटर  
2) 130 पिकोमीटर   
3) 133 पिकोमीटर    ✅✅
4) 135 पिकोमीटर

15) सरदार स्वर्णसिंग नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रिन्युएबल एनर्जी ही संस्था कोठे आहे ?

   1) कर्नाल (पंजाब)   
   2) जालंधर (पंजाब)   
   3) कपुरथाला (पंजाब)✅✅
   4) मटींडा (पंजाब)

16)आईस्क्रीमच्या कपात लाकडी चमचा टाकला, तर चमच्याच्या दुस-या टोकावर काय परिणाम होईल ?

1) दुसरे टोक उष्णतेच्या वहनामुळे थंड होते.     
2) दुसरे टोक उष्णतेच्या अभिसरणामुळे थंड होते.
3) दुसरे टोक उष्णतेच्या प्रारणामुळे थंड होते.     
4) चमच्याचे दुसरे टोक थंड होत नाही.✅✅

17) IUPAC म्हणजे .............................
  
👉🏻👉🏻  International Union pure Applied Chemistry

18) कार्बनच्या कोणत्या अपरूपाला बॅकीबॉल म्हणून ओळखतात.
👉🏻👉🏻 फुलेरीन्स

Q1) 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान भवन येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात आहे. 2020 या वर्षी या दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर:- विमेन इन सायन्स

Q2)भारतातल्या कोणत्या शहरात सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेत?
उत्तर:- बंगळुरू

Q3) कोणत्या राज्याने वर्ष 2021 यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याविषयीचा ठराव मंजूर केला?
उत्तर:- बिहार

Q4) राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) याच्या अंतर्गत ____ या वर्गातल्या ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक मदत आणि सहाय्यक ठरणारी उपकरणे प्रदान केली जातात.
उत्तर:- दारिद्र्य रेषेखाली (BPL)

Q5) 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत तिबेटी लोकांनी ‘लोसार उत्सव’ साजरा केला. छम नृत्य हे उत्सवाचे वैशिष्ट्य होते. छम नृत्य _ या समुदायाशी संबंधित आहे.
उत्तर:- तिबेटी बौद्ध धर्म

Q6) कोणत्या व्यक्तीला ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020’ देण्याचे जाहीर झाले?
उत्तर:- जादव पायेंग

Q7) शाश्वत विकास ध्येये यांच्या संदर्भातल्या प्रथम प्रायोगिक प्रकल्पासाठी कोणत्या राज्याची / केंद्रशासित प्रदेशाची NITI आयोगाने निवड केली?
उत्तर:-  जम्मू व काश्मीर

Q8) ____ या राज्यात दोन दिवसांचा ‘मिरची महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
उत्तर:- मध्यप्रदेश

Q9) कोणत्या संघाने ‘खेलो इंडिया विद्यापीठ खेळ’ यामध्ये पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले?
उत्तर :- दिल्ली विद्यापीठ

Q10) राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) _ या शहरात आहे.
उत्तर :-  हैदराबाद

पंचायत राज

महानगरपालिकांच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम खालीलप्रमाणे

१.  महाराष्ट्र              27
२.  उत्तरप्रदेश           16
३.  आंध्रप्रदेश           14
४.  मध्यप्रदेश            14
५.  बिहार                 13
६.  छत्तीसगड           13
७.  तमिळनाडू           13
८.  कर्नाटक              11
९.  गुजरात                08
१०.हिमाचलप्रदेश       02

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संख्येनुसार जिल्ह्यांचा क्रम खालीलप्रमाणे-

(१) ठाणे ०६
(२) पुणे ०२
(३) नाशिक ०२
- पनवेल-रायगड ही शेवटची महानगरपालिका आहे.

भारतील महानगरपालिका आकारमानानुसार उतरता क्रम-

(१) मुंबई
(२) दिल्ली
(३) कलकत्ता
(४) बंगलोर
(५) चेन्नई
(६) हैदराबाद
(७) अहमदाबाद
(८) सुरत
(९) पुणे

General Knowledge


सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणता देश ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ याच्या यादीत अग्रस्थानी आहे?
उत्तर : नॉर्वे

▪️ कोणत्या CSIR संस्थेनी कोविड-19 रोगासाठी ‘फेलुदा’ चाचणी विकसित केली?
उत्तर : इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘विद्यादान 2.0’ मंच प्रस्तुत केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आपदामित्र’ मदत क्रमांक कार्यरत केला?
उत्तर : कर्नाटक

▪️ कोणत्या संस्थेनी कोविड-19 संदर्भात ‘लॉकडाऊन लर्नर्स’ मालिका आरंभ केली?
उत्तर : औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC)

▪️ भारताच्या ध्वजाने प्रज्वलित केलेले मॅटरहॉर्न पर्वतशिखर कोणत्या देशात आहे?
उत्तर : स्वित्झर्लंड

▪️ सिटी युनियन बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कोण आहेत?
उत्तर : एन. कामाकोडी

▪️ सुधा मुर्ती यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या ऑडियो बूकचे शीर्षक काय आहे?
उत्तर : हाऊ द ओनियॉन गॉट इट्स लेयर्स

▪️ 2020 साली जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : क्लायमेट अॅक्शन

▪️ कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

मिझोरम सरकारने ‘क्रिडा’ क्षेत्राला ‘औद्योगिक’ हा दर्जा दिला

- क्रिडाविषयक क्रियाकलापांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मिझोरम सरकारने ‘क्रिडा’ क्षेत्राला ‘औद्योगिक’ हा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. अशी घोषणा करणारे हे देशातले पहिले राज्य आहे.

- या निर्णयामुळे अनुदान, बँकिंग सुविधांसह सर्व औद्योगिक फायदे आता क्रिडाक्षेत्रासाठी वाढविण्यात येणार. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळणार.

- मिझोरम सरकार नवीन औद्योगिक धोरण आखत आहे, त्यानुसार क्रिडाक्षेत्रालाही बरेच फायदे मिळतील. राज्यातही क्रिडा धोरण चांगले आहे.

- ईशान्य भारतातल्या आठ राज्यांपैकी मिझोरमने अनेक खेळात वर्चस्व गाठले आहे. आज या राज्याचे नाव फुटबॉल, हॉकी, भारोत्तोलन अश्या विविध आघाडीच्या क्रिडाप्रकारांमध्ये समोर येते. मिझोरममध्ये फुटबॉल, हॉकी, कुस्ती, स्टिक फाइटिंग, इन्सुकनावरा, कलछेत काल, इनारपठई अशा अनेक देशी खेळ देखील आहेत.

▪️मिझोरम राज्य

- मिझोरम हे भारताच्या ईशान्य भागातले एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणीपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत.

- मिझोरम राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी आसाम राज्याला विभागून केली गेली. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी आहे. मिझो व इंग्रजी या राज्यातल्या प्रमुख भाषा आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ‘कांगारा चहा’ प्रभावी: ICMRचा दावा

- कोविड-19 रोगावरील उपचार पद्धतीत बदल करीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘हायड्रोक्झीक्लोरोक्वीन’ (HCQ) ऐवजी HIV वरील औषधे देण्याचे ठरवले आहे.

- शिवाय, कांगारा चहामधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात HIV वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथील हिमालयन जैवस्रोत तंत्रज्ञान संस्थेचे (IHBT) संचालक डॉ. संजय कुमार यांनी ही माहिती दिली. कांगारा चहाची हिमाचल प्रदेशात लागवड होते.

▪️कांगारा चहाचे औषधीयुक्त गुणधर्म

- कांगारा चहात मनुष्यप्राणीच्या शरीराला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहेत. IHBT संस्थेनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोविड-19 वर मात करण्यासाठी हे सिद्ध केले आहे.

- शास्त्रज्ञांना कांगारा चहात '65 बायोॲक्टीव' रसायने किंवा 'पॉलिफेनोल्स' आढळून आली. त्यांच्या संयोगाने ते विशिष्ट विषाणूवर अधिक प्रभावी ठरु शकते. सध्या HIV वरील बाजारात उपलब्ध औषधांपेक्षाही ही रसायने अधिक प्रभावी आहेत. सध्या HIV वरील मान्यताप्राप्त औषधे कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहेत.

- 'कॅटेचिन' हे नैसर्गिक आरोग्यवर्धक घटक आहे. पेशींचे नुकसान टाळणे आणि इतर अनेक फायदे प्रदान करणे, यासाठी ते ओळखले जाते. कांगारा चहात ते पुरेपूर आहे.

- कांगारा चहा मधील रसायने मानवी शरीरातल्या प्रथिनेयुक्त विषाणूंना प्रतिबंध करु शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

- तसेच संस्थेनी या चहाचा वापर करून अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर, औषधी साबणचीही निर्मिती केली आहे. बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी, स्वच्छतायुक्त आणि आर्द्रतायुक्त लाभदायक गुणधर्म आहेत.

Latest post

चालू घडामोडी :- 18 मार्च 2024

◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली. ...