Monday 25 May 2020

जागतिक बँकेतील पदावर आभास झाला

- जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

-  हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...