14 June 2025

TOP Current Affairs

१. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०२६ हे वर्ष "महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष" म्हणून घोषित केले आहे.


२. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, भारतातील एकूण लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे १,०२० महिलांपर्यंत वाढले आहे.


३. अलिकडेच हिमाचल प्रदेशने सीमा पर्यटन उपक्रम सुरू केला आहे.


४. अलिकडेच मालदीवने कतरिना कैफला पर्यटनासाठी जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.


५. अलिकडेच, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांना “संयुक्त राष्ट्रांचा सासाकावा पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला आहे.


६. मध्य प्रदेशने जून २०२५ मध्ये 'पचमढी वन्यजीव अभयारण्य' चे नाव बदलून 'राजा भाभूत सिंह वन्यजीव अभयारण्य' करण्याचा निर्णय घेतला आहे.


७. सध्या जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान २५% आहे.


८. 'जागतिक रक्तदाता दिन' १४ जून रोजी साजरा केला जातो.


९. जून २०२५ मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने ६४०५ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. 


१०. अलिकडेच NHAI ने त्यांच्या पहिल्या रस्ते मालमत्तेच्या मुद्रीकरण धोरणाअंतर्गत ₹१.४ लाख कोटींपेक्षा जास्त निधी उभारला आहे. 


११. अलिकडेच न्यायमूर्ती एन.एस. संजय गौडा यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.


12. उत्तर प्रदेशमध्ये श्री बांके बिहारी जी कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.


१३. अलिकडेच संरक्षणमंत्र्यांनी एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या १० सदस्यीय एनसीसी पथकाचा सन्मान केला आहे.


१४. २०२३-२४ पर्यंत शहरी-ग्रामीण वापरातील तफावत ६०% पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.


१५. सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय बांधले जाईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

  पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?

👉 181


 भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

👉 7517 Km


 महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?

👉 अप्सरा


महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?

👉 कोयना


 महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?

👉 गडचिरोली


 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?

👉 पसिफिक महासागर


 इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?

👉 नाईल


 जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

👉 गरीनलँड


 रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

👉 राजस्थान


अस्तंभा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉 नदुरबार


 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

👉 सांगली


दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?

👉 86 %


 कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

👉 सातारा व रत्नागिरी


फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?

👉 भिलाई


 सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?

👉 शक्र


 ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?

👉 भकंपनाभी 


महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?

👉 रत्नागिरी


 उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?

👉 भीमा


 पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?

👉 अकोला


तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?

👉 चामडे उत्पादन

भारताची सामान्य माहिती


• भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.


• भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी. 


• भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.


• भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%


• भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी. 


• भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात.


• भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422 


• भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248 


• भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174 


• भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%


• पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%


• महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%


• भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी. 


• भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी. 


• भारताची राजधानी : दिल्ली 


• भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन 


• भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते 


• राष्ट्रीय गीत : वंदेमातरम 


• 'जन-गण-मन' या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर 


• राष्ट्रीय गीत 'वंदेमातरम' चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी 


• भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा 


• राष्ट्रीय फळ : आंबा 


• राष्ट्रीय फूल : कमळ 


• भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर 


• भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ 


• भारतात एकूण घटक राज्ये : 28 


• भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

   ( सुरुवातीला 7 होती ,नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती ,परंतु पुन्हा 26 jan 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे )


• भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ 


• भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार 


• भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान


सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्वपूर्ण IMP सराव प्रश्न


1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?

उत्तर : भारत


2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

उत्तर : चीन


3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?

उत्तर : निक्सन


4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?

उत्तर : माद्री


5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?

उत्तर : मजलीस


6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?

उत्तर : ओडिसा


7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?

उत्तर : अंकारा


8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?

उत्तर : खरगपूर


9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?

उत्तर : अल्फ्रेड नोबेल


10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?

उत्तर : रेडक्लिफ रेष


11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?

उत्तर : बाळ गंगाधर टिळक


12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?

उत्तर : 14 नोव्हेंबर


13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : पुणे


14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

उत्तर : नागपूर


15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?

उत्तर : विदर्भ


16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते

उत्तर : जांभी.



महत्वपूर्ण IMP प्रश्नसंच


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ 
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन 
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन


३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅


५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३


६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 
४. जेट ट्रेनर



७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून



८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर


९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९


१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.



११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१


१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ 
४. परम तेज


१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क


१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.


1) कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

1) लघु शुष्क ऋतृचा मोसमी प्रकार 
2) उष्णकटिबंधीय सॅव्हाना ✅
3) उष्ण वाळवंटी प्रकार 
4) ध्रुवीय प्रकार

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

2) " एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

1) अर्जेटिना 
2) पेरू ✅
3) ब्राझील 
4) चीली

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

3) -----------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापरेंत पोहचत नाही .

1) 79 % 
2) 59 %
3) 49 %✅
4) 39 %

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

4) असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

1) फ्रान्स 
2) स्वित्झलंड ✅
3) स्वीडन 
4) पेरू

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

5) पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात.

1) अमेरिका आणि मेक्सिको 
2) अमेरिका आणि कॅनडा ✅
3) ब्राझील आणि अर्जेटिना 
4) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड.

परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जिल्ह्यातील महत्वाची जलाशये.

रायगड = कालाते - (हे एक तलाव आहे.)


सातारा= धोम, कन्हेर, कोयना.


 कोल्हापूर = दुधगंगा, तिलारी, राधानगरी.


बुलढाणा = नळगंगा.


 पुणे = पवना, भाटघर, खडकवासला, माणिकडोह, डींभे, खापोली, शिवपूरी


ठाणे = भातसा.


परभणी = येलदरी (जिंतूर तालूका - पूर्णा नदीवर.)


सिंधूदुर्ग = धामापूर (एक तलाव आहे.)


औरंगाबाद = जायकवाडी (नाथसागर)


यवतमाळ = अरुणावती.


सोलापूर = उजनी (यशवंत सागर).


नाशिक = गंगापूर, (पुणेगाव - अपूर्ण प्रकल्प आहे.)


अहमदनगर = भाटघर, भंडारदरा.


उस्मानाबाद/नांदेड = मांजरा.


रत्नागिरी = फणसवाडी.

नदीने तयार केलेल्या सीमा

           🎇 गोदावरी नदी 🎇

🚦अहमदनगर-औरंगाबाद

🚦जालना-बीड

🚦बीड-परभणी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


             🎇 भीमा नदी 🎇

🚦पणे-सोलापूर

🚦पणे-अहमदनगर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

             

            🎇 कष्णा नदी 🎇

🚦सांगली-कोल्हापूर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

             

             🎇 नीरा नदी 🎇

🚦पणे-सोलापूर

🚦पणे-सातारा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


          🎇 मांजरा नदी 🎇

🚦उस्मानाबाद - बीड


गोदावरी नदी

 गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


गोदावरी नदीचा उगम :-


सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी * किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


गोदावरीच्या उपनद्या


पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.


गोदावरी नदीच्या काठावरील शहरे


नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


गोदावरी नदीवरील धरणे


गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.


महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

Latest post

महाजनपद आणि त्यांची माहिती:

1. अंग 🟢    - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार    - राजधानी: चंपा 🏰    - राजा: दशरथ 👑    - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...