गोदावरी नदी


१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम


1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके

2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके

3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके

4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके

5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके

6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके




🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :


1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके


2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके


3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके.



🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :


1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा


2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास


3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल


4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव


5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल



💦 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) :-


🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):


1.गोदावरी - 69000

2. भीमा - 46184

3. वर्धा - 46182

4. वैनगंगा - 38000

5. तापी - 31200

6. कृष्णा - 28700



🔰लांबीनुसार(किमी) : 


1. गोदावरी - 668

2. पैनगंगा - 495

3. वर्धा - 455

4. भीमा - 451

5. वैनगंगा - 295

6. कृष्णा - 282

7. तापी - 208 


🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :


1. कृष्णा - 769

2. वैनगंगा - 719

3. गोदावरी - 404

4. भीमा - 309

5. तापी - 229


Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...